Tag: आयुष्यमान भारत योजना

  • Ayushman Bharat private hospital panel । खासगी हॉस्पिटलमध्ये ‘गोल्डन कार्ड’वर उपचार? जाणून घ्या चंद्रपुरातील कोणकोणती रुग्णालयं आली पॅनलवर!

    Ayushman Bharat private hospital panel

    Ayushman Bharat private hospital panel : चंद्रपूर : नागरिकांच्या आरोग्याला शासनाचे सर्वोच्च प्राधान्य आहे. केंद्र शासनातर्फे आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व राज्य शासनातर्फे महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना राज्यात एकत्रितपणे 23 सप्टेंबर 2018 पासून राबविण्यात येत आहे. या योजनांची आणखी प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठीव गरजू रुग्णांना योजनेचा लाभ मिळण्यासाठी शासकीय पॅनलवर खाजगी रुग्णालयांची संख्या वाढविणे आवश्यक आहे, त्या दृष्टीने आरोग्य विभागाने नियोजन करावे, अशा सुचना आयुष्मान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष डॉ. ओमप्रकाश शेटे यांनी दिल्या. Maharashtra expand private hospitals Ayushman Bharat scheme

    खासदार प्रतिभा धानोरकर यांनी माजी आमदार बच्चू कडू यांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा

    जिल्हाधिकारी कार्यालय येथे एकत्रित प्रधानमंत्री आयुष्मान भारत व महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा आढावा घेतांना ते बोलत होते. यावेळी आमदार देवराव भोंगळे, मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, अतिरिक्त जिल्हाधिकारी नितीन व्यवहारे, मनपा आयुक्त विपीन पालीवाल, मा.सां. कन्नमवार शास. वैद्य. महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविष्कार खंडाते, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. हेमचंद कन्नाके, महानगर पालिकेच्या वैद्य. अधिकारी डॉ. नयना उत्तरवार आदी उपस्थित होते.

    प्रधानमंत्री आयुष्मान भारत प्रधानमंत्री व महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत 1356 आजारांवर उपचार व शस्त्रक्रियांचा समावेश आहे, असे सांगून डॉ. शेटे म्हणाले, यात आणखी आजारांचा समावेश करण्यात येणार आहे. रुग्णांना स्थानिक स्तरावरच तात्काळ चांगली आरोग्य सेवा मिळावी, असा शासनाचा मानस आहे. त्यासाठीच जास्तीत जास्त खाजगी रुग्णालयांना शासकीय पॅनलवर समाविष्ठ करण्याचे धोरण ठरविण्यात आले आहे. पॅनलवर येणा-या खाजगी रुग्णालयांसाठी चांगले पॅकेज तयार करण्यात येत असून सदर निधी 30 दिवसांत संबंधित रुग्णालयाला वळता करण्यात येईल. आरोग्यासाठी शासन स्तरावरून निधीची कमतरता होणार नाही. Maharashtra Ayushman hospital expansion rural health initiative

    पुढे ते म्हणाले, चंद्रपूर हा आदिवासी बहुल जिल्हा असल्यामुळे ग्रामीण भागातील रुग्णांना चांगली आरोग्य सेवा पुरविणे हे आपले कर्तव्य आहे. त्यामुळे शासकीय पॅनलवर खाजगी रुग्णालयांचा समावेश होण्यासाठी जास्तीत जास्त रुग्णालयांकडून अर्ज मागवा. तसेच अर्ज आलेल्या रुग्णालयांना संवेदनशीपणे समाविष्ठ करून घ्या. पुरवठा विभागाच्या समन्वयाने जास्तीत जास्त नागरिकांच्या शिधापत्रिकांचे केवायसी केल्यास आयुष्मान कार्ड काढणे सोयीचे होईल. आरोग्याचा आपला डेटा संग्रहीत ठेवणे ही आपली जबाबदारी आहे. येत्या काही दिवसांत ‘मिशन संजीवनी’ हा प्रकल्प लाँच होणार असून यात विविध प्रकारचे ट्रॉन्सप्लाँट करणे शक्य होणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

    पॅनलवर असलेल्या रुग्णालयांबाबत जनजागृती करावी : आमदार देवराव भोंगळे

    प्रधानमंत्री आयुष्मान भारत व महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेचा लाभ प्रत्येक पात्र लाभार्थ्याला मिळणे आवश्यक आहे. या योजना प्रभावीपणे राबवायच्या असेल तर खाजगी रुग्णालयांची संख्या वाढविण्या शिवाय पर्याय नाही. जे खाजगी रुग्णालय स्वत:हून पुढे येत असतील, त्यांना यंत्रणेने त्रास देऊ नये, योग्य तपासणी करून संदर्भसेवेसाठी त्यांना परवानगी द्यावी. तसेच जिल्ह्यातील कोणते रुग्णालय शासकीय पॅनलवर आहे, त्याबाबत जनजागृती करावी, असे आमदार देवराव भोंगळे म्हणाले. अनेक दुर्धर आजारांचाही एकत्रित आयुष्मान भारत व महात्मा फुले जनआरोग्य योजनेत समावेश करावा. जिल्ह्यात मिशन मोडवर आयुष्मान गोल्डन कार्ड काढण्याची मोहीम राबवावी आणि रुग्णवाहिकेची संख्या वाढवावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. Chandrapur health panel private hospitals Ayushman benefit

    ही आहेत चंद्रपूर जिल्ह्यातील पॅनलवरील रुग्णालये

    चंद्रपूर जिल्ह्यात आयुष्मान भारत प्रधानमंत्री व महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत एकूण 23 रुग्णालय अंगीकृत असून यात 15 शासकीय रुग्णालय तर 8 खाजगी रुग्णालय आहेत. शासकीय रुग्णालयांमध्ये चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालय, चिमूर, मूल, राजुरा आणि वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालय तसेच बल्लारपूर, भद्रावती, गोंडपिपरी, गडचांदूर, कोरपना, नागभीड, पोंभुर्णा, सावली, सिंदेवाही आणि ब्रम्हपुरी येथील ग्रामीण रुग्णालयांचा समावेश आहे. तर खाजगी रुग्णालयांमध्ये चंद्रपूर येथील कोल सिटी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, क्रीस्ट हॉस्पीटल, गाडेगोणे आर्थोपेडीक हॉस्पिटल, मानवटकर हॉस्पीटल, मुसळे हॉस्पीटल, वासाडे हॉस्पीटल, चिमूर येथील श्रीहरी नेत्रालय आणि ब्रम्हपुरी येथील यशलोक हास्पीटल यांचा समावेश आहे. Chandrapur health panel private hospitals Ayushman benefit

  • Ayushman bharat yojana : 70 वर्षावरील नागरिकांचे होणार मोफत उपचार

    Ayushman bharat yojana : 70 वर्षावरील नागरिकांचे होणार मोफत उपचार

    ayushman bharat yojana प्रत्येक नागरिकांना शासकीय व खासगी रुग्णालयात मोफत उपचार मिळावे यासाठी केंद्र सरकारने वर्ष 2017 मध्ये आयुष्यमान भारत योजनेची सुरुवात केली होती, आता या योजनेत 70 वर्षावरील नागरिकांचा समावेश करण्यात आला आहे.

    ayushman bharat yojana या योजनेनुसार 70 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या नागरिकांवर मोफत उपचार केले जातील. या योजनेनुसार 6 कोटी ज्येष्ठ नागरिकांना 5 लाखांपर्यंतचे मोफत उपचार मिळणार आहेत. त्याचबरोबर त्यांच्या कुटुंबाला 5 लाखांपर्यंतचा मोफत इन्शूरन्स कव्हर मिळणार आहे. 

    आयुष्यमान भारत योजना

    सरकारनं सांगितलं की, ‘योजनेनुसार पहिल्यांदा कव्हर करण्यात आलेल्या परिवारांशी संबंधित 70 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या नागरिकांना प्रत्येक वर्षासाठी 5 लाखांचे अतिरिक्त टॉप अप कव्हर ( जे त्यांना 70 वर्षांपेक्षा कमी वयाच्या कुटुंबातील अन्य सदस्यांना देता येणार नाही) मिळेल.

    ज्येष्ठ नागरिक ( 70 वर्षांपेक्षा ज्येष्ठ) जे पहिल्यापासून केंद्र सरकारची आरोग्य योजना (CGHS), माजी सैनिक अंशदायी आरोग्य योजना (ECHS) आणि आयुष्यमान केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (CAPF) सारख्या अन्य सार्वजनिक विमा योजनांचा फायदा घेत आहेत, ते त्यांची विद्यमान योजना निवडू शकतात. अथवा AB PM-JAY पर्याय निवडू शकतात. Ayushman bharat yojana

    महत्त्वाचे : ई सिम बाबत ही माहिती तुम्हाला माहित आहे काय?

    सरकारनं स्पष्ट केलंय की 70 वर्षांपेक्षा जास्त वयांपेक्षा जास्त वय असलेले ज्येष्ठ नागरिक जे खासगी विमा पॉलिसी तसंच कर्मचारी राज्य विमा योजनेच्या अंतर्गत आहे ते देखील AB PM-JAY योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र असतील.

    योजना काय आहे?
    ७० वर्षे पूर्ण झालेल्या सर्व नागरिकांसाठी खूषखबर .केंद्र सरकारनं ७० वर्षे पुर्ण झालेल्या सर्व नागरिकांना आता ५ लाख रूपयांचं मोफत विमा कवच देण्याचा निर्णय केंद्र सरकारनं नुकताच घेतलाय . याला कोणत्याही उत्पनाची अट नाही . या निर्णयाचा फायदा ६ कोटी लोकांना मिळणार आहे.त्यातही जर तुमचा कुठलाही इतर पाच लाखाचा विमा असेल तर दोन्ही विमा मिळून दहा लाख रुपये पर्यंतचा विमा ७० वर्षे पूर्ण झालेल्या मिळू शकतो. योजनेचा लाभ कसा घेणार ते आता आपण समजावून घेऊ. Ayushman bharat yojana

    कुटुंबातील किती लोकांना मिळणार विमा ?
    या संदर्भात कुटुंबातील गरजू जेवढे सदस्यातील तेवढ्यांना हा विमा मिळण्यासाठी ते पात्र ठरतील . एका कुटुंबात आता एकापेक्षा अधिक आयुष्यमान कार्ड देखील होऊ शकतात.

    योजनेचे लाभार्थी कोण असणार?
    आयुष्यमान भारत या योजनेअंतर्गत देशातल्या सर्वच ७० वर्षावरील नागरिक असतील. तसेच निराधार नागरिक, आदिवासी, दलित तसेच दिव्यांग नागरिक आणि जे असंघटित क्षेत्रात काम करणारे मजूर असतील ते देखील यासाठी पात्र आहेत. ऑनलाइन pmjay.gov.in ह्या संकेत स्थळावर अर्ज करून पात्र आहे किंवा नाही हे देखील समजू शकतं.

    सरकारी योजनेचे लाभ घेणारे देखील पात्र
    केंद्र सरकारच्या योजनेचे लाभार्थी सुद्धा लाभ घेऊ शकतात .या योजनेचा लाभ जेष्ठ नागरिक आधीपासून केंद्र सरकारची आरोग्य योजना (CGHS) घेत आहेत जे माजी सैनिक अंशदायी आरोग्य योजना (ECHS )घेत आहेत आणि जे केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (CAF)तसेच इतर सार्वजनिक आरोग्य विम्याचा लाभ घेणारे देश नागरिक सुद्धा पात्र असतील.