Tag: आम आदमी पार्टी

  • no FIR filed despite evidence । ठोस पुरावे असूनही FIR नाही; आप ने दिला खळखळ्खट्याक आंदोलनाचा इशारा

    no FIR filed despite evidence

    no FIR filed despite evidence : चंद्रपूर महानगरपालिकेतील भ्रष्टाचाराचा (chandrapur mahanagarpalika corruption)अजून एक काळा अध्याय समोर आला आहे. कोहिनूर ग्राउंड येथील नागरिकांच्या फिरण्यासाठी तयार केलेल्या ट्रॅकवरील शासकीय पेव्हर्स अर्बन एनव्हायरॉन कंपनीने चोरून स्वतःच्या खासगी कार्यालयात लावले आहेत. यासंदर्भात दि. १६ मे रोजी पालिका आयुक्तांना तक्रार व ठोस पुरावे (फोटो, व्हिडीओ) सादर करूनही अद्याप कोणतीही FIR नोंदवण्यात आलेली नाही.

    माजी सैनिकाने दिला आमरण उपोषणाचा इशारा

    गाडीत टाकून नेले ती चोरी नाही

    याप्रकरणी पालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्री. चंदन पाटील यांची भेट घेतली असता, त्यांनी अत्यंत उद्धटपणे व निष्काळजीपणे उत्तर दिले की, “पेव्हर्स गाडीत टाकून नेले, त्याला चोरी म्हणता येत नाही.” हे उत्तर म्हणजे जनतेच्या डोळ्यात धूळ फेकण्याचा प्रयत्न आहे आणि यामधून पालिका प्रशासनाचा भ्रष्ट चेहरा पुन्हा एकदा उघड झाला आहे.

    महानगरपालिकेतील संपूर्ण यंत्रणा भ्रष्टाचाराने पोखरलेली असून, हे अधिकारी स्वतःला कोणीही वाकडं करू शकत नाही अशा भ्रमात आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांकडून महानगरपालिकेतील भ्रष्टाचाराबाबत सातत्याने आवाज उठवला जात आहे. मात्र अधिकारी वर्गाची मानसिकता इतकी बधीर झाली आहे की, सामान्य जनतेच्या हक्कांची खुलेआम पायमल्ली केली जात आहे.

    शासकीय संपत्तीवर डल्ला

    ही घटना केवळ पेव्हर्स चोरीची (Pavers theft) नसून, ती सामान्य जनतेच्या हक्कांवर आणि शासकीय संपत्तीवर डल्ला मारण्याची लक्षणीय घटना आहे. जर सामान्य नागरिक काही चूक करतो, तर प्रशासन त्याच्यावर कठोर कारवाई करते. पण एवढा मोठा प्रकार उघडपणे घडूनही महानगरपालिका शांत का आहे? यामागे गुप्त सांठगांठ व भ्रष्टाचाराचा गंभीर वास येतो.

    आज दिनांक ६ जून २०२५ रोजी आम आदमी पक्षाच्या (Aam Aadmi party) वतीने जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना या गंभीर घटनेबाबत सविस्तर तक्रार अर्ज सादर करण्यात आला.
    या वेळी उपस्थित होते:
    👉 मयूर राईकवार (जिल्हाध्यक्ष),
    👉 राजू कूडे (युवा जिल्हाध्यक्ष),
    👉 योगेश गोखरे (शहर अध्यक्ष),
    👉 प्रशांत सिदुरकर (जिल्हा सचिव),
    👉 संतोष बोपचे (महानगर संगठन मंत्री),
    👉 एड. तबस्सुम शेख (शहर महिला अध्यक्ष),
    👉 हांडेकर गुरुजी (शहर पदाधिकारी),
    👉 विशाल बिरमवार (शहर पदाधिकारी)
    आणि इतर पदाधिकारी व कार्यकर्ते.

    या घटनेबाबत जर पुढील ८ दिवसांत कोणतीही शासकीय कार्यवाही झाली नाही, तर आम आदमी पक्ष चंद्रपूर जिल्हा तर्फे अभिनव आणि बहिरे असल्याचे सॉन्ग करणाऱ्या भ्रष्ट अधिकार्‍यांचा विरोधात तीव्र व ‘खडकट्याक आंदोलन’ करण्यात येईल, असा जबरदस्त इशारा आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार यांनी दिला आहे.

    हा लढा केवळ भ्रष्टाचाराविरोधात नाही, तर सामान्य जनतेच्या न्यायासाठी आहे. आम आदमी पक्ष शेवटच्या श्वासापर्यंत या लढ्याला न्याय मिळवून देण्यासाठी कटिबद्ध आहे.

  • amrut scheme water supply problems । अमृत योजनेचा फटका; पाणी नाही, जनता आहे त्रस्त!, आपने दिला आंदोलनांचा इशारा

    amrut scheme water supply problems

    amrut scheme water supply problems : चंद्रपूर – बाबुपेठ परिसरातील आंबेडकर नगर प्रभागात पाण्याच्या तीव्र टंचाईने नागरिक त्रस्त झाले असून, अमृत योजनेअंतर्गत पाणी मिळावे यासाठी त्यांनी प्रशासनाला जोरदार हाक दिली आहे. अनेक दिवसांपासून नियमित पाणीपुरवठा न झाल्याने जनतेचे हाल सुरू असून, मूलभूत सुविधेसाठी त्यांना रस्त्यावर उतरण्याची वेळ येत आहे.

    पडोली मध्ये १ कोटी रुपयांची आधुनिक अभ्यासिका

    या गंभीर परिस्थितीबाबत आम आदमी पक्षाचे युवा जिल्हाध्यक्ष राजू कुडे यांनी प्रशासनासह लोकप्रतिनिधींवर टीकेची झोड उठवली आहे. “स्थानिक आमदार, खासदार, पालकमंत्र्याकडून बाबुपेठ वर वीज पाण्याची सर्जिकल स्ट्राईक सुरु आहे, प्रशासकीय अधिकारीही या समस्येकडे दुर्लक्ष करत आहेत,” असा आरोप राजू कुडे यांनी केला आहे. aam aadmi party water protest

    तर तीव्र आंदोलन करणार

    राजू कुडे पुढे म्हणाले, “अमृत योजनेसाठी कोट्यवधींचा खर्च झाल्याचे सांगितले जाते, मात्र प्रत्यक्षात नागरिकांना एक थेंब पाणी मिळत नाही. ही दुर्दैवी आणि लज्जास्पद गोष्ट आहे.” त्यांनी प्रशासनाला इशारा दिला की, जर लवकरात लवकर पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास आम आदमी पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल.

    विशेष म्हणजे, तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच महाराष्ट्र विधानसभेत चंद्रपूर महानगरपालिकेतील ९० टक्के अमृत योजनेचे काम पूर्ण झाल्याचे स्पष्ट वक्तव्य केले होते. परंतु या वक्तव्यानंतरही प्रत्यक्षात आंबेडकर नगरसारख्या भागात नागरिकांना एका थेंब पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे, ही बाब खेदजनक आणि खोट्या विकासाच्या दाव्यांचा पर्दाफाश करणारी आहे.

    Powered by myUpchar

    स्थानिक नागरिकांनीही संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत पाण्याविना रोजचे जगणे कठीण झाल्याचे सांगितले. महिलांना, वृद्धांना आणि लहान मुलांना या टंचाईचा सर्वाधिक त्रास सहन करावा लागत असून येणाऱ्या महानगरपालिकेचा निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना धडा शिकवू असे ते म्हणाले.

    आतातरी या गंभीर समस्येकडे प्रशासन आणि लोकप्रतिनिधी लक्ष देतील का, याकडे आता जनतेचे लक्ष्य लागले आहे.

  • important demand : आम आदमी पक्ष युवा आघाडीची महत्वाची मागणी पूर्ण

    important demand : आम आदमी पक्ष युवा आघाडीची महत्वाची मागणी पूर्ण

    Important demand बायपास जवळील नागरिकांना नाल्या-अभावी होत असलेल्या त्रासाला लागणार पूर्णविराम, आम आदमी पक्ष युवा आघाडीच्या मागणीला यश

    Important demand चंद्रपूर : चंद्रपूर – बल्लारशा राष्ट्रीय महामार्गावरील पावसाळ्याच्या पाण्यामुळे अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरत होते तसेच शिरना-या पाण्यामुळे अनेक त्रासांना समोर जावे लागत होते. याबाबत नागरिकांची आम आदमी पार्टीचे युवा जिल्हाध्यक्ष राजू कुडे
    यांच्या कार्यालयात वारंवार तक्रारी करन्यात आल्या. त्या तक्रारीच्या अनुषंगाने आम आदमी पार्टी तर्फे बांधकाम विभागाला अनेक निवेदन देण्यात आले, त्यानंतर जनतेला सोबत घेऊन आंदोलने करण्यात आले. या आंदोलनाची प्रशासनाला दखल घ्यावी लागली.

    7 वर्षांच्या मुलाची बिबट्याने केली शिकार

    आंदोलनामुळे नाली च्या कामाला मंजुरी मिळाली असून आज नालीच्या कामाकरिता बांधकाम विभाग यांच्या टीमने मोजणी करूण जागेची पाहणी केली ४ दिवसात कामाला सुरुवात होणार असल्याचे सुद्धा संबंधित अधिकारी यांनी म्हटले आहे. याकरिता येथील पीडीत नागरिकांनी आम आदमी पार्टीचे राजु कुडे यांचे आभार मानले. Important demand

    भाजपची निवडणूक प्रचाराला सुरुवात


    यावेळेस आपचे जिल्हाध्यक्ष राजु कुडे, युवा जिल्हा उपाध्यक्ष अनुप तेलतुबडे, युवा संघटनमंत्री मनीष राऊत, शहर अल्पसंख्यांक अध्यक्ष जावेद शेख, शहर वाहतूक अध्यक्ष जयदेव देवगडे, आदित्य नंदनवार, अक्षय गोवर्धन, सागर बोबडे, अजय बाथब इत्यादी कार्यकर्ते पदाधिकारी आणि बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

  • special activities : महिला व मुलींच्या सुरक्षेबाबत आप चा पोलीस विभागाला महत्वाचा प्रस्ताव सादर

    special activities : महिला व मुलींच्या सुरक्षेबाबत आप चा पोलीस विभागाला महत्वाचा प्रस्ताव सादर

    special activities चंद्रपूर जिल्ह्यातील महिला आणि अल्पवयीन मुलींच्या सुरक्षिततेसाठी विशेष उपक्रमांचा आप चा प्रस्ताव

    special activities चंद्रपूर जिल्ह्यात वाढत असलेल्या महिला व मुलीच्या अत्याचार प्रकरणबाबत आम आदमी पक्षाच्या वतीने पोलीस विभागाला महिला व मुलींच्या सुरक्षेबाबत विविध उपक्रमांचा प्रस्ताव पोलीस विभागाला सादर केला आहे.

    अवश्य वाचा : त्या 4 शेतकऱ्यांचा मृत्यू असा झाला, महावितरण ने सांगितले कारण


    आम आदमी पक्षाचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील अतिरिक्त पोलीस अधीक्षक रिना जनबंधु यांना एक महत्त्वपूर्ण निवेदन सादर केले आहे. या निवेदनात, त्यांनी जिल्ह्यातील महिला आणि अल्पवयीन मुलींच्या सुरक्षिततेसाठी काही ठोस उपाययोजना सुचवल्या आहेत. (Special activities)
    राईकवार यांनी जिल्ह्यात महिला विद्यार्थींच्या आत्महत्या, अत्याचार आणि ब्लॅकमेलिंगच्या घटनांमध्ये होत असलेली चिंताजनक वाढ निदर्शनास आणून दिली. त्यांनी या गंभीर समस्येवर तातडीने उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली.


    राईकवार यांनी खालील मुद्दे मांडले:

    विशेष महिला पोलीस पथकाची स्थापना:

    शैक्षणिक संस्था आणि कार्यस्थळांवर जाऊन महिला व मुलींशी संवाद साधण्यासाठी.
    महिलांचा विश्वास संपादन करणे आणि त्यांना सुरक्षित वातावरण निर्माण करण्यासाठी.

    व्यापक जनजागृती मोहीम:

    महिलांच्या अधिकार, सुरक्षा उपाय आणि मदतीच्या मार्गांबद्दल माहिती देण्यासाठी.
    आत्महत्या प्रतिबंध आणि मानसिक आरोग्य जागृती कार्यक्रमांवर विशेष भर.

    गोपनीय सल्ला सेवा:

    मानसिक तणाव, ब्लॅकमेलिंग किंवा छळाला सामोरे जाणाऱ्या महिला व मुलींसाठी.
    २४x७ हेल्पलाईन सुविधा उपलब्ध करून देणे.

    त्वरित प्रतिसाद पथक:

    आणीबाणीच्या परिस्थितीत तात्काळ कारवाई करण्यासाठी.
    अत्याचार आणि ब्लॅकमेलिंगच्या तक्रारींवर तातडीने कारवाई. (Special activities)

    नियमित पाठपुरावा आणि मूल्यमापन:

    या उपक्रमांच्या प्रभावाचे मूल्यमापन आणि आवश्यक सुधारणा करण्यासाठी.

    व्हाट्सअॅप गटाची निर्मिती:

    पोलीस आणि नागरिकांमध्ये थेट संवाद साधण्यासाठी.
    सुरक्षा टिप्स आणि महत्त्वाची माहिती शेअर करण्यासाठी.

    खाजगी संस्था आणि व्यापारी संघटनांमध्ये महिला सुरक्षा समिती:

    खाजगी इन्स्टिट्यूट्स आणि व्यापारी संस्थांमध्ये महिला सुरक्षा समित्यांची स्थापना करण्यासाठी प्रोत्साहन.
    शैक्षणिक संस्थांमध्ये विशेष मार्गदर्शन कक्ष स्थापन करणे.

    राईकवार यांनी म्हटले की, “चंद्रपूर जिल्ह्यातील महिला आणि मुलींविरुद्धच्या गुन्ह्यांचे वाढते प्रमाण, विशेषतः महिला विद्यार्थींच्या आत्महत्या, अत्याचार आणि ब्लॅकमेलिंगच्या घटना हे अत्यंत चिंताजनक आहे. आमच्या या सूचना पोलीस प्रशासनाने गांभीर्याने घ्याव्यात आणि त्वरित अंमलबजावणी करावी अशी आमची अपेक्षा आहे.”
    त्यांनी पुढे सांगितले, “या उपाययोजनांमुळे महिला आणि मुलींच्या सुरक्षेत लक्षणीय सुधारणा होईल, त्यांच्यावरील अत्याचार कमी होतील आणि आत्महत्येच्या घटना रोखण्यास मदत होईल असा आमचा विश्वास आहे.”


    अतिरिक्त पोलीस अधीक्षक रिना जनबंधु यांनी या निवेदनाचा स्वीकार केला असून, त्यांनी लवकरच खाजगी संस्था आणि व्यापारी संघटनांमध्ये महिला सुरक्षा कार्यक्रम घेण्याचे आश्वासन दिले आहे. त्याचबरोबर त्यांनी या गंभीर समस्यांवर लक्ष केंद्रित करून कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.


    निवेदन सादर करताना खालील पदाधिकारी उपस्थित होते:
    मयूर राईकवार, जिल्हाध्यक्ष, राजकुमार नगराले, जिल्हा सचिव, प्रशांत सिदुरकर, जिल्हा सचिव, राजू कूड़े, युवा जिल्हाध्यक्ष, कुणाल शेट्टे, जिल्हा पदाधिकारी, योगेश गोखरे, शहर अध्यक्ष, संघम सागोरे, वाहतूक जिल्हाध्यक्ष
    एड. तबस्सुम शेख, महिला अध्यक्ष, आदित्य नंदनवार, युवा सचिव, अनूप तेलतुंबड़े, युवा उपाध्यक्ष,आम आदमी पक्ष पोलीस प्रशासनासोबत सहकार्य करून या उपक्रमांच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करेल.

  • Aap Party News : बल्लारपुर शहरात “वाळू विक्री” कायदेशीर की बेकायदेशीर? -रविकुमार पूप्पलवार

    Aap Party News : बल्लारपुर शहरात “वाळू विक्री” कायदेशीर की बेकायदेशीर? -रविकुमार पूप्पलवार

    News34 chandrapur

    बल्लारपुर – आम आदमी पार्टीचे शहराध्यक्ष रविभाऊ पुप्पलवार यांचे अधिकाऱ्यांपुढे प्रश्न उपस्थित केला आहे कि, तीन-चार महिन्या पासून बल्लारपूर शहरात घर बांधकामासाठी मुबलक प्रमाणात वाळू मिळत नाही आहे, अनेक नागरिकांच्या घरांचे बांधकाम अर्धवट अवस्थेत दिसून येत आहे. घराचं बांधकाम करणारे मालक आणि बांधकाम कंत्राटदार व मजूर या वाळू पुरवठाच्या समस्येने त्रस्त आहेत.

     

     

    गावात कायदेशीर वाळू उपलब्ध नसून अवैध वाळू मात्र मुबलक प्रमाणात मुबलक दरात उपलब्ध कशी होत आहे?, असा प्रश्न देखील पुप्पलवार यांच्या माध्यमातून उपस्थित केला जात आहे. शहरात आजकाल एक टाटा एस भरून अवैध वाळू तीन ते चार हजार रुपया दरात विक्री केली जात आहे. बल्लारपूर शहरातील जनते समोर “मरता क्या ना करता” अशी परिस्थिती निर्माण झाली आहे, तरी बल्लारपूर शहरातील तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, पोलीस प्रशासन आणि संबंधित अधिकारी या गंभीर विषयाकडे दुर्लक्ष करताना दिसत आहेत.

     

     

    बांधकामासाठी जनतेला कायदेशीर वाळू उपलब्ध करून देण्याची तरतूद कोण करणार याकडे दुर्लक्ष करण्याचे कारण काय? शहरात अवैध वाळू विक्रीला कोण प्रोत्साहन देत आहे? शहरात अवैध वाळू कोठून येत आहे? कोणाद्वारे याचा पुरवठा केला जात आहे , हे अधिकाऱ्यांना माहीत नाही का? आज प्रत्येक सामान्य माणसाच्या मनात हा प्रश्न पडतो आहे. अशाप्रकारे शहरातील तसेच आसपासच्या परिसरातील रेती समस्येबाबत आपचे शहराध्यक्ष रविकुमार पुप्पलवार यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.

  • तलाठी भरतीची SIT मार्फत चौकशी करा – आम आदमी पार्टी

    तलाठी भरतीची SIT मार्फत चौकशी करा – आम आदमी पार्टी

    News34 chandrapur

    चंद्रपूर – संपूर्ण महाराष्ट्रभर स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये तणावाची स्थिती निर्माण झालेली आहे. अनेक विद्यार्थी आपल्या भविष्याला घेऊन चिंतेत आहेत. याबाबत आम आदमी पक्षाकडे महाराष्ट्रभरातून विद्यार्थ्यांच्या तक्रारी येत आहेत. तलाठी भरतीच्या निकालाने हा गैरप्रकार समोर आलेला आहे. सोबतच अनेक परीक्षा केंद्रांवर घोळ होतानाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून विद्यार्थी तथा पालकांमध्ये असंतोष पाहायला मिळत आहे. या सर्व प्रकरणांमध्ये शासनाने लक्ष देण्याची गरज आहे.

     

    या पार्श्वभूमीवर आम आदमी पक्षाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एक निवेदन पाठवले आहे. या निवेदनात आम आदमी पक्षाने खालील मागण्या केल्या आहेत:

     

    * तलाठी भरतीची नुकतीच प्रसिद्ध केलेली गुणवत्ता यादी संशयास्पद असल्याने ती तात्काळ रद्द करावी.
    * तलाठी भरतीत ज्या उमेदवारांच्या गुण 200 पैकी 150 पेक्षा जास्त आहेत त्यांच्या ज्ञानाची पुनर्तपासणी करून नव्याने गुणवत्ता यादी प्रकाशित करावी.
    * तलाठी भरती गैरप्रकाराची SIT मार्फत सखोल चौकशी व्हावी.
    * स्पर्धा परीक्षांचे शुल्क कमी करण्यात यावे.
    * उत्तरतालिकेतील उत्तरांवर आक्षेप घेण्यासाठी असलेले शुल्क कमी करावे.
    * पोलीस विभागात नवीन पदभरती लवकर जाहीर करावी.

     

    या मागण्यांवर लवकर निर्णय घेऊन विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासनाने प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा आम आदमी पक्षाने केली आहे.

     

    या निवेदनावर आम आदमी पक्ष युवा आघाडी चंद्रपूर जिल्हाध्यक्ष राजू कुडे यांच्या स्वाक्षरी आहेत. यावेळी महानगर अध्यक्ष योगेश गोखरे, जिल्हा सोशल मीडिया प्रमुख राजेश चेडगुलवार, महानगर संघटन मंत्री संतोष बोपचे, महानगर महासचिव ॲड. तबससूम शेख, महानगर सह संघटन मंत्री सिकंदर सागोरे, अनुप तेलतुंबडे, महानगर ओबीसी आघाडी अध्यक्ष प्रशांत धानोरकर इत्यादी उपस्थित होते.

  • चंद्रपूर जिल्ह्यात आम आदमी पक्षाची संवाद सभा अभियान

    चंद्रपूर जिल्ह्यात आम आदमी पक्षाची संवाद सभा अभियान

    News34 chandrapur

    चंद्रपूर: येत्या 3 जानेवारी, 2024 पासून जिल्ह्यातील प्रत्येक जिल्हा परिषद सर्कलच्या गावामध्ये आम आदमी पार्टीची संवाद सभा घेण्यात येईल. ही सभा जिल्हा परिषद सर्कलच्या नावावरती असणाऱ्या प्रमुख गावातील मुख्य चौकात व मोक्याच्या ठिकाणी घेण्यात येईल, अशी माहिती आम आदमी पक्षाच्या चंद्रपूर जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार यांनी दिली.

     

    या अभियानामार्फत स्थानीय शेती संबंधीच्या विषयांबद्दल शेतकऱ्या बरोबर संवाद साधण्यात येईल.या सभेत शेती संबंधित विषयांवर चर्चा होईल. सभेत तांदूळ, कापूस, सोयाबीन, तूर, चना, ऊस सारख्या शेतमालाला योग्य भाव, पीक विमा प्रक्रिया सुरळीत करणे, जंगली जनावरांनी केलेले नुकसान व अतिवृष्टीने झालेले नुकसान याची भरपाई, सिंचन व्यवस्था, कर्जमाफी, 24 तास शेती करीत वीज देणे या विषयांवर चर्चा होईल. या अभियानाची सुरुवात 3 जानेवारी रोजी होणार आहे. या अभियानात खालील विषयांचा समावेश करण्यात आला आहे:

     

    * तांदूळ, कापूस, सोयाबीन, तूर, चना, ऊस सारख्या शेतमालाला योग्य भाव. स्वामीनाथन आयोग लागू करून उत्तपादनन खर्चच्या दुप्पट भाव देण्यात यावे.
    * पीक विमा प्रक्रिया सुरळीत करण्यात यावी त्याचे पैसे त्वरित देण्यात यावे.
    * जंगली जनावरांनी केलेले नुकसान व अतिवृष्टीने झालेले नुकसान याची भरपाई योग्य मोलाची व योग्य वेळी करण्यात यावी. त्याचबरोबर सरकारकडून नुकसान भरपाईची प्रक्रिया सुरळीत करण्यात यावी.

     

    * विदर्भातील निम्म्याहून अधिक भाग हा कोरडवाहू आहे. स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतर देखील योग्य ती सिंचन व्यवस्था बनलेली नाही. विधर्भातील 105 सिंचनाचे प्रोजेक्ट त्वरित पूर्ण करण्यात यावे.

    * कर्जमाफी करण्यात यावी, सरकार ने सरसकट पूर्ण सातबारा कोरा करावा.

    * 24 तास शेती करीत वीज देण्यात यावी.

    चंद्रपूर जिल्ह्यात या अभियानात खालील गावांमध्ये सभा होणार आहे:

    * दुर्गापूर
    * बोर्डा – जूनोना
    * ऊर्जानगर
    * पडोली – ताडाळी
    * घुघुस
    * नाकोडा – मारडा

    बल्लारपूर तालुका
    * विसापूर – बामणी
    * पळसगाव – कोठारी

    भद्रावती तालुका
    * चंदनखेडा – मुधोली
    * कोकेवाडा – नंदोरी
    * पाटाळा – माजरी
    * कोठा – घोडपेठ

    ब्रम्हपुरी
    * नान्होरी – नवरगाव
    * पिंपळगाव – मालडोंगरी
    * खेड मक्ता – चावघान
    * गांगलवाडी – मेंडकी
    * आवडगाव – मुंडजा

    राजुरा
    * गोवारी – सास्ती
    * चुनाला – विरुर
    * आर्वी – पाचगाव
    * देवाडा – डोंगरगाव

    जिवती
    * पाटण – शेनगाव
    * खडकीरायपूर – पुडियाल मोहदा

    कोरपना
    * कोडासी पुंज – भोयगाव
    * ऊपरवाही – नांदा
    * येरगव्हान – परसोडा

    गोडपिपरी
    * करंजी – खराडपेठ
    * विठ्ठलवाडा – तळोधी
    * तोहगाव – धाबा

    पोंभूर्णा
    * देवाडा खुर्द – केमारा
    * चिंतलधाबा – घोसरी

    मुल
    * राजोली – मारोडा
    * जुनासुरला – बेंबाळ
    * केलझळ – चींचाळा

    सींदेवाही
    * नवरगाव – पळसगाव जाट
    * गुंजेवाही – लोन वाही
    * रत्नापूर – शिवनी
    * मोहाडी नले – वासेरा

    नागभिड
    * कानपा – मोशी
    * पारडी – बाळापुर गुंज
    * गोविंदपुर तळोधी बाळापुर
    * गिरगाव – वाढोना

    चिमूर
    * भिसी – आंबोली
    * शंकरपुर – डोमा
    * सिरपुर – नेरी
    * मुरपार तुकुम – खडसंगी
    * मसाळ बुंज – मदनापुर

    वरोरा
    * खांबाडा – चिकणी
    * टेंबुर्डा – अंबामाक्ता
    * नागरी – माढेली
    * चुरुरखुटी – सलोरी
    * शेगाव बूंज – बोर्डा

    या अभियानातून आम आदमी पार्टी विदर्भातील शेतकऱ्यांच्या समस्या समजून घेईल आणि त्यावर उपाययोजना करण्याचा प्रयत्न करेल.

    या अभियानात आम आदमी पक्षाच्या जिल्हा स्तरावरील नेते, कार्यकर्ते व सदस्य सहभागी होतील. या अभियानातून आम आदमी पक्ष शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यास व त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

  • चंद्रपूर मनपाचा अजब कारभार

    चंद्रपूर मनपाचा अजब कारभार

    News34 chandrapur

    चंद्रपूर : जिल्ह्यातील बल्लारपूर शहरात राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त लागणाऱ्या एलईडी स्क्रीनसाठी चंद्रपूर महानगरपालिकेने निविदा काढली आहे. बल्लारपूर शहरात हा कार्यक्रम होत असतानाही चंद्रपूर महानगरपालिकेने निविदा काढून आपली हद्दपार केली आहे.

    दुसऱ्या शहरातील एल.ई.डी. स्क्रिनसाठी चंद्रपूर मनपाने निविदा कशी काढली, असा प्रश्न आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार यांनी उपस्थित केला आहे. हि निविदा काढण्यास आम आदमी पार्टीने विरोध दर्शवला असून, चंद्रपूरच्या जनतेचा पैसा इतर ठिकाणी खर्च करण्याचा अधिकार आयुक्त विपीन पालीवाल यांना कोणी दिला, असा सवाल आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार यांनी विचारला आहे. भारतीय जनता पार्टीचे नेते आणि पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची मर्जी राखण्यासाठी ही निविदा काढण्यात आली, असा आरोप केला आहे.

    चंद्रपूर शहर महानगरपालिका, चंद्रपूर यांनी जावक क्रमांक: चंशमनपा/विद्युत्त/२०२३/३१० दिनांक : २२/१२/२०२३ नुसार ई-निविदा सुचना काढली आहे. आयुक्त चंद्रपूर शहर महानगरपालिका, जि. चंद्रपूर यांचे वतीने खालील कामासाठी दोन लिफाफा पद्धतीने ई निविदा पद्धतीच्या पंजीबद्ध कंत्राटदाराकडून/फर्मकडुन ई निवीदा मागविण्यात आल्या. निवीदेच्या विस्तृत नमुना महाराष्ट्र शासनाच्या http://www.mahatenders.gov.in या संकेतस्थळावर दिनांक २२/१२/२०२३ पासून पाहण्यास उपलब्ध आहे. ई-निविदा प्रसिद्धीचा तपशील कामाचे नाव चंद्रपुर व बल्लारपूर शहरात ४ एल.ई.डि. स्क्रिन उभारणीचे काम असे दाखविण्यात आले आहे. ऑनलाईन निविदा विक्री व स्वीकृती दिनांक दिनांक २२/१२/२०२३ ते २७/१२/२०२३ ला दु. १२.०० वाजेपर्यंत आणि ऑनलाईन निविदा उघडणी दिनांक दिनांक २८/१२/२०२३ ला दु. ३.०० वाजता असे नमूद आहे. ही जाहिरात एका स्थानिक दैनिकांत देण्यात आली आहे.

     

    राईकवार यांनी सांगितले कि, चंद्रपूर महानगरपालिका आणि बल्लारपूर नगरपालिका या दोन स्वतंत्र संस्था आहेत. कोणतेही काम करताना सीमेच्या बाहेर जाऊन काम करता येत नाही. परंतु, चंद्रपूर महानगरपालिकेचे आयुक्त विपीन पालीवाल यांनी यांनी केवळ पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची मर्जी राखण्यासाठी हा निविदा काढली. या निविदामुळे चंद्रपूर महानगरपालिकेच्या तिजोरीवर वाढीव खर्च होणार आहे. त्यामुळे अवास्तव खर्च टाळण्यासाठी ही निविदा रद्द करण्यात यावी, अशी मागणी राईकवार यांनी केली आहे.

  • चंद्रपुरातील युवा नेते महेंद्र ढूमणे यांचा असंख्य कार्यकर्त्यांसह आम आदमी पक्षात प्रवेश

    चंद्रपुरातील युवा नेते महेंद्र ढूमणे यांचा असंख्य कार्यकर्त्यांसह आम आदमी पक्षात प्रवेश

    News34 chandrapur

    चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील युवा नेते महेंद्र ढूमणे यांनी आज आम आदमी पक्षात प्रवेश केला. आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार यांच्या नेतृत्वाखाली शंकर सरदार यांच्या उपस्थितीत त्यांनी पक्षात प्रवेश केला.

     

    यावेळी बोलताना महेंद्र ढूमने म्हणाले की, आम आदमी पक्ष हा एकच पक्ष आहे जो खऱ्या अर्थाने जनतेच्या हितासाठी काम करतो. दिल्ली, पंजाब आणि गोवा या राज्यांमध्ये आम आदमी पक्षाने केलेल्या कामांमुळे मी प्रभावित झालो आहे. त्यामुळे मी आम आदमी पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.

     

    आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार म्हणाले की, महेंद्र ढूमणे यांचे आम आदमी पक्षात स्वागत आहे. ते एक अनुभवी आणि कार्यक्षम आहेत. त्यांचा पक्षात प्रवेश आम आदमी पक्षाला अधिक मजबूत करेल.

     

    त्यांच्या सोबत तेजस तिगुटला,वैभव पेचे,निलेश गायकवाड, गौरव पोहाकार,नेहल चिवडे, साहिल हजारे, सुरज मोरे, पवन म्हस्के,भवानी सिवी,संदीप वर्मा,श्री जोशी, मयूर इंगळे,गोलू कनोजिया,भवानी बैस, शुभम इंगळे,मनीष इंगळे,सोनू चिवडे,साईराम बल्की, आशु केमेकर, सुजित वर्मा,सुरज कानोजिया,बबलू मानकर,  सन्नी गिल,प्रवीण काळे,कृष्णा तीगुटला,सागर काळे, नंदू झाडे, चेतन पत्रकार, उदय तांड्रा,चिंटू पोगला, मंगेश मुंजेवार,नागेश गायकवाड,कैलाश गायकवाड, दिपक बहुरिया,आकाश भगत,अमित पोटे, अंकुश तडेल, अक्षय सोयाम यांनी प्रवेश केला. या वेळेस आम आदमी पक्षाचे पदाधिकारी सुरज शाह,सुमित हस्तक,नितीन बावणे, गणेश आडे इत्यादी उपस्थित होते.

     

    महेंद्र ढूमणे यांनी चंद्रपूर जिल्ह्यात अनेक युवकांचे संगठन उभे केले आहेत. ते अनेक युवकांच्या हक्कांसाठी लढा देत असतात.

  • 200 युनिट ची थाप, आणि चर्चेत आली आप

    News34 chandrapur

    चंद्रपूर : मागील विधानसभा निवडणुकीमध्ये चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांनी निवडणुकीच्या काळामध्ये नागरिकांना 200 युनिट वीज मोफत देण्याची घोषणा केली होती. आता निवडून येऊन चार वर्षे पूर्ण होऊनही ही मागणी पूर्ण झालेली नाही. त्यामुळे चंद्रपूर शहरातील जिल्हा आम आदमी पार्टीच्या माध्यमातून आमदार जोरगेवार यांच्या विरोधात बॅनरबाजी सुरू झाली आहे.

     

    हे फलक रीतसर परवानगी घेऊन लावण्यात आले होते. तरीही महानगर पालिकेने बॅनर काढण्याची कारवाई केली. आमदाराचा दबावाखाली मनपा ने बेकायदेशीर कारवाई केल्याचा आरोप आम आदमी पक्षाने केला आहे.

     

    चंद्रपूर शहरांमध्ये दोनशे बॅनर लावण्यात आले असून सर्वत्र आमदार जोरगेवार यांनी दिलेल्या आश्वासनाची आठवण करून देण्यात येत आहे. या बॅनरच्या माध्यमातून 200 युनिटच्या आश्वासन फोल ठरल्यामुळे लक्ष वेधण्यात आले आहे.

     

    आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार म्हणाले की, आमदार जोरगेवार यांनी निवडणुकीच्या काळामध्ये दिलेल्या आश्वासनाची त्यांनी पूर्तता केली नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. आमदार जोरगेवार यांनी तात्काळ 200 युनिट वीज मोफत देण्याची मागणी पूर्ण करावी, अन्यथा जनतेला माफीनामा आणि पदाचा राजीनामा द्यावा, अन्यथा आम आदमी पार्टीकडून आंदोलन करण्यात येईल.
    या बॅनरमुळे चंद्रपूर जिल्ह्यात राजकीय वातावरण तापले आहे.