Tag: आमदार सुधाकर अडबाले

  • Old Pension Scheme : राज्‍यातील सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन योजना लागू करा आमदार सुधाकर अडबाले यांची मुख्यमंत्री, अर्थमंत्र्यांकडे मागणी

    Old Pension Scheme : राज्‍यातील सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन योजना लागू करा आमदार सुधाकर अडबाले यांची मुख्यमंत्री, अर्थमंत्र्यांकडे मागणी

    News34 chandrapur

    चंद्रपूर – : राज्‍यातील सर्व शिक्षक व राज्‍य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी व पेंशन योजनेचे संरक्षण करावे, या प्रमुख मागणीसाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेद्वारा ‘व्होट फॉर ओपीएस’ नागपूर ते मुंबई संकल्प पदयात्रा काढण्यात येत आहे. राज्‍यातील कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन योजना तात्‍काळ लागू करावी, अशी आग्रही मागणी राज्‍याचे मुख्यमंत्री, अर्थमंत्र्यांकडे आमदार सुधाकर अडबाले यांनी केली. Old pension scheme

     

    आतापर्यंत सहा राज्यातील कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन योजना लागू करण्यात आली आहे. नुकतेच सिक्कीम या राज्यानेसुद्धा जुनी पेन्शन योजना लागू केली. मात्र, महाराष्ट्र सरकारने अजूनही जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत कोणताही निर्णय घेतला नाही. शासनाने जुनी पेंशन योजना लागू करण्यासंदर्भात गठीत करण्यात आलेल्‍या समितीचा अहवाल सुद्धा शासनास सादर करण्यात आलेला आहे. तो अहवाल अर्थसंकल्‍पीय अधिवेशन २०२४ मध्ये सभागृहात सादर करून राज्‍यातील सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन योजना लागू करावी, असेही निवदेनात म्‍हटले आहे. Retirement plan

     

    नागपूर हिवाळी अधिवेशनादरम्‍यान १२ डिसेंबर २०२३ रोजी नागपूर येथे महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेद्वारा पेंशन जनक्रांती महामोर्चा काढण्यात आला होता. या महामोर्चात लाखोंच्या संख्येने राज्‍यातील कर्मचारी सहभागी झाले होते. हिवाळी अधिवेशनादरम्‍यान सरकार जुनी पेंशन योजना लागू करण्यासंदर्भात सकारात्‍मक असल्‍याचे सभागृहात म्‍हटले होते. मात्र, अजूनही यावर निर्णय झाला नाही. त्यामुळे कर्मचारी वर्गात प्रचंड असंतोष निर्माण झालेला आहे. यामुळे नागपूर ते मुंबई काढण्यात येत असलेल्‍या संकल्प पदयात्रेत मोठ्या संख्येने शिक्षक-कर्मचारी सहभागी झालेले असून मुंबईच्या दिशेने निघालेले आहे. या यात्रेचा समारोप मुंबई येथील आझाद मैदानावर २८ फेब्रुवारी २०२४ रोजी होणार आहे. financial security

    कर्मचाऱ्यांत वाढता असंतोष बघता सरकारने राज्‍यातील सर्व कर्मचाऱ्यांना तात्‍काळ जुनी पेन्शन योजना लागू करावी व राज्यातील १६ लाख कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांना दिलासा द्यावा, अशी मागणी राज्‍याचे मुख्यमंत्री, अर्थमंत्र्यांकडे आमदार सुधाकर अडबाले यांनी केली.  Government employee

  • MLA Sudhakar Sabale : आमदार अडबाले यांचा सततचा पाठपुरावा आणि थेट जाहिरात झाली प्रसिद्ध

    MLA Sudhakar Sabale : आमदार अडबाले यांचा सततचा पाठपुरावा आणि थेट जाहिरात झाली प्रसिद्ध

    News34 chandrapur

    चंद्रपूर : राज्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरण्याबाबत शिक्षक आमदार सुधाकर अडबाले यांनी पावसाळी अधिवेशनात २५ जुलै २०२३ रोजी तारांकित प्रश्न उपस्थित केला. यावर उत्तर देताना शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी १५ ऑगस्ट २०२३ पासून राज्यात पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरती प्रक्रिया सुरू होईल असे सभागृहात सांगितले. मात्र, प्रत्यक्षात शिक्षक भरती प्रक्रियेला सुरवात झालेली नाही. याबाबत आमदार अडबाले सतत सभागृहात पाठपुरावा करीत होते. अखेर शिक्षक भरतीसंदर्भात पवित्र पोर्टलवर ५ फेब्रुवारी २०२४ रोजी जाहिरात प्रसिद्ध झाल्‍याने आमदार सुधाकर अडबाले यांच्या पाठपुराव्‍याला यश आले आहे. Pavitra portals

     

     

    राज्यात शालेय शिक्षण विभागातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. जिल्हा परिषदेच्या शाळांमधील पदे शासन भरत नसल्याने रिक्त जागांचा आकडा दरवर्षी वाढत असतो, काही जागा समायोजन प्रकियेने भरण्यात येत असल्या तरी रिक्त जागांचा अनुशेष भरून निघत नसल्याने याचा विपरित परिणाम या शाळांमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्यावर होत आहे. याबाबत आमदार अडबाले यांनी पावसाळी अधिवेशन २०२३ मध्ये शिक्षक भरती करण्याबाबत तारांकीत प्रश्‍न उपस्‍थित केला. यावर शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी १५ ऑगस्ट ते २४ ऑक्‍टोंबर २०२३ दरम्‍यान राज्‍यातील शिक्षकांच्या रिक्‍त पदांपैकी ३० हजार पदे पवित्र प्रणालीद्वारे भरण्याची कार्यवाही करण्यात येईल, असे उत्तर दिले होते. परंतु, १५ ऑगस्‍ट लोटूनही राज्याच्या शिक्षण विभागाला शिक्षक भरतीची प्रक्रिया कार्यवाही करण्यात अपयश आले. Mla sudhakar adbale

     

     

    राज्य शासनाने तातडीने शिक्षक भरतीची प्रक्रिया राबवावी, अशी मागणी सातत्‍याने आमदार सुधाकर अडबाले सभागृहात व शिक्षण विभागाकडे करीत होते. अखेर त्‍यांच्या पाठपुराव्‍याला यश आले. शिक्षक भरतीसंदर्भात पवित्र पोर्टलवर ५ फेब्रुवारी रोजी जाहिरात प्रसिद्ध झाली. राज्यात स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍थांसह खासगी शिक्षण संस्‍थांच्या शाळांमधील २१ हजार ६७८ रिक्‍त जागांवर शिक्षकांची पदे भरली जाणार आहेत. गेल्‍या एक वर्षांपासून प्रतिक्षेत असणाऱ्या टीईटी धारकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

     

     

    नागपूर विभागातील नागपूर जिल्हा परिषद प्राथमिक विभागात ५०१, चंद्रपूर ३०७, भंडारा २८२, गोंदिया ४, गडचिरोली ११ तर वर्धा २२८ रिक्‍त पदे भरली जाणार आहे. आमदार सुधाकर अडबाले यांनी सतत केलेल्‍या पाठपुराव्‍याला यश आल्‍याने त्‍यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.

  • विदर्भाच्‍या विकासावर आमदार अडबाले यांनी वेधले लक्ष

    विदर्भाच्‍या विकासावर आमदार अडबाले यांनी वेधले लक्ष

    News34 chandrapur

    चंद्रपूर : नागपूर हिवाळी अधिवेशनात अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना आमदार सुधाकर अडबाले यांनी विदर्भातील विविध प्रश्नांवर चर्चा केली. वन्यप्राण्यांचा धोका, दुष्काळी परिस्थिती, उद्योगामुळे होत असलेले प्रदूषण, बेरोजगारी आणि सैनिकी शाळेमध्ये विदर्भातील विद्यार्थ्यांना आरक्षण देण्याची मागणी यावेळी त्यांनी सभागृहात केली.

     

    आमदार अडबाले म्हणाले की, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये वन्यप्राण्यांचा धोका मोठ्या प्रमाणात वाढला आहे. शेतकरी व शेतमजुरांचा वन्यप्राण्यांमुळे बळी जात आहे. गडचिरोली जिल्ह्यामध्ये हत्तींचा हैदोस सुरू आहे. जंगली प्राण्यांमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. शेतकऱ्यांना सौर ऊर्जा पंप पुरेशा प्रमाणात देण्याची गरज आहे. जंगली प्राण्यांमुळे शेतीचे नुकसान होत असेल तर पिक कव्हर इन्शुरन्स देण्याची व्यवस्था करावी.

     

    विदर्भामध्ये विशेष करून चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सिमेंट उद्योग मोठ्या प्रमाणात आहे. या उद्योगांमुळे प्रदूषण होत आहे. प्रदूषणामुळे पिकांचे आणि नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. अनेक आजारांनी चंद्रपुरकरांना ग्रासले आहे. गडचिरोली जिल्ह्यातील सूरजागड या ठिकाणी खनिज संपत्ती मोठ्या प्रमाणात आहे. या ठिकाणीही प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात कोळसा खाणी असल्यामुळे जलसाठा खोली वाढली आहे. विहिरी किंवा बोरिंगचे पाणी खाेलवर गेले आहे. वर्धा नदीवर शेतकऱ्यांच्या सिंचन दृष्टीने बॅरेजेस बांधण्याची गरज आहे.

     

    विदर्भात बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. सुशिक्षित बेरोजगार पूणे-मुंबईला जातात. विदर्भातील उद्योगांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे. कापूस आणि सोयाबीन हे विदर्भाचे मुख्य पीक आहेत. या पिकांच्या भावात स्थिरता आणण्याची गरज आहे.

     

    गडचिरोली जिल्ह्यामध्ये रेल्वे नाही. रेल्वे कशी पोहोचेल, यादृष्टीने शासनाने पाऊले उचलावीत. चंद्रपूर जिल्ह्यात असलेल्‍या सैनिकी शाळेमध्ये विदर्भातील विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी विशेष आरक्षण द्यावे. जेणेकरून होतकरू विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाचे शिक्षण घेता येईल व इतर विदर्भ विकासाच्या बाबींकडे आमदार सुधाकर अडबाले यांनी लक्ष वेधले.

  • चंद्रपुरातील सैनिक स्कूलच्‍या विद्यार्थ्यांची प्रलंबित शिष्यवृत्ती तात्‍काळ मंजूर करा

    चंद्रपुरातील सैनिक स्कूलच्‍या विद्यार्थ्यांची प्रलंबित शिष्यवृत्ती तात्‍काळ मंजूर करा

    News34 chandrapur

    चंद्रपूर : सैनिक स्कूल चंद्रपूर येथे महाराष्ट्रातील शेतकरी, शेतमजूर व इतर पालकांची मुले इयत्ता ६ वी ते १२ वी पर्यंतच्या वर्गात शिक्षण घेत आहे. गेल्‍या ५ वर्षांपासून शिष्यवृत्तीस पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती न मिळाल्‍याने त्‍यांना शाळेत प्रवेश दिला जात नसल्‍याची गंभीर बाब समोर येताच आमदार सुधाकर अडबाले यांनी हिवाळी अधिवेशनात सदर प्रश्‍न उपस्‍थित करून सैनिक स्कूलच्‍या विद्यार्थ्यांची प्रलंबित शिष्यवृत्ती तात्‍काळ मंजूर करण्याची मागणी केली.

     

    महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत अनुसूचित जाती – जमाती व आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र असून गेल्या पाच वर्षांपासून सदर विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती (स्कॉलरशिप) मिळालेली नाही. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळत नसल्याने पालकांनी कर्ज घेऊन मुलांची फी भरत होते. परंतु, आता ते पाल्यांची फी भरू शकत नाही आहे तसेच सैनिक स्कूल चंद्रपूर ही शाळा शासनाच्या कोणत्याही आदेशाला मानत नाही. फी न भरल्यामुळे गेल्या १ ते २ महिन्यांपासून विद्यार्थ्यांना शाळेत बसू दिले जात नाही. विद्यार्थी शाळेत न गेल्याने शिक्षण व इतर ॲक्टिवीटी पासून वंचित आहेत. यामुळे मुलांना व पालकांनाही मानसिकदृष्ट्या खूप त्रास सहन करावा लागतो आहे.

     

    सर्व शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत देण्यात येते. विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीची फाईल मुख्यमंत्र्यांकडे मंजुरीसाठी पाठविलेली आहे.

     

    विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडू नये म्हणून लवकरात लवकर सदर शिष्यवृत्ती मंजुर करावी तसेच मुलांचे शिक्षण सुरळीत सुरू राहील, यासाठी प्राचार्य, सैनिक स्कूल चंद्रपूर यांना विद्यार्थ्यांना पुन्हा शाळेत सामावून घेण्यासाठी आदेशित करावे, अशी मागणी आमदार अडबाले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती. त्‍यानंतर चालू हिवाळी अधिवेशनात प्रश्‍न उपस्‍थित करून सदर गंभीर बाबीकडे लक्ष वेधले.

  • चंद्रपुरात २५ व्या युथ राज्यस्तरीय अजिंक्यपद व्हॉलीबॉल स्पर्धेचे उद्घाटन

    चंद्रपुरात २५ व्या युथ राज्यस्तरीय अजिंक्यपद व्हॉलीबॉल स्पर्धेचे उद्घाटन

    News34 chandrapur

    चंद्रपूर : ऑनलाईन युगात मैदानी खेळ होणे अत्यंत गरजेचे आहे. चंद्रपुरात होत असलेली २५ वी युथ राज्यस्तरीय अजिंक्यपद व्हॉलीबॉल स्पर्धा जिल्ह्यातील खेडाळूंमध्ये नवचैतन्य निर्माण करेल, असा विश्वास आमदार सुधाकर अडबाले यांनी व्यक्त केला.

     

    मथुरा व्हॉलीबॉल स्पोर्टींग क्लब तर्फे आयोजित महाराष्ट्र राज्य व्हॉलीबॉल संघटना व चंद्रपूर जिल्हा व्हॉलीबॉल संघटना यांच्या मान्यतेने रवींद्रनाथ टागोर प्राथ. शाळेचे मैदान, विठ्ठल मंदिर वॉर्ड, चंद्रपूर येथे २५ वी युथ राज्यस्तरीय अजिंक्यपद व्हॉलीबॉल स्पर्धा २०२३ (मुले व मुली) या स्पर्धेचे उद्घाटक म्हणून आमदार अडबाले बोलत होते.

     

    यावेळी अध्यक्षस्थानी आमदार सुभाष धोटे तर प्रमुख अतिथी म्हणून आमदार प्रतिभा धानोरकर, शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रितेश तिवारी, माजी महापौर संगीता अमृतकर, डॉ. अनिल शिंदे, प्रा. रवी झाडे, प्रशांत दानव, क्लबचे अध्यक्ष अभय बद्दलवार, सचिव प्रकाश मस्के, पुरुषोत्तम पंत आदींची उपस्थिती होती.

     

    या स्पर्धेत राज्यातील विविध विभागातील संघ सहभागी झाले आहेत. स्पर्धेचे उद्घाटन करताना आमदार अडबाले म्हणाले की, व्हॉलीबॉल हा एक उत्तम खेळ आहे. हा खेळ खेळल्याने खेळाडूंमध्ये सहकार्य, संघभावना, संयम, लवचिकता यासारख्या गुणांचा विकास होतो. ऑनलाईन युगात शारीरिक आरोग्यासाठी मैदानी खेळांचे महत्त्व वाढले आहे. चंद्रपुरात होत असलेली ही स्पर्धा जिल्ह्यातील खेडाळूंसाठी एक चांगली संधी आहे. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व खेळाडूंना मी शुभेच्छा देतो.

     

    यावेळी आमदार सुभाष धोटे, आमदार प्रतिभा धानोरकर यांनीही खेडाळूंना शुभेच्छा दिल्या. उदघाटन समारंभाचे संचालन प्रफुल पुलगमकर यांनी केले. या स्पर्धा २४ ते २६ नोव्हेंबरपर्यंत चालेल.

  • राज्‍यातील शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजना तात्‍काळ लागू करा – आमदार सुधाकर अडबाले

    राज्‍यातील शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजना तात्‍काळ लागू करा – आमदार सुधाकर अडबाले

    News34 chandrapur

    चंद्रपूर : राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना १०, २०, ३० वर्षाची आश्वासित प्रगती योजना तात्‍काळ लागू करा, अशी मागणी नागपूर विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार सुधाकर अडबाले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार व शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

    राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजनेंतर्गत १०, २०, ३० वर्षांच्या सेवेनंतर तीन लाभ मिळावे, यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून विविध संघटनांमार्फत मागणी होत आहे. मागणीच्या पूर्ततेसाठी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ व इतर अनेक संघटनांनी आंदोलनाद्वारे वेळोवेळी शासनाकडे पाठपुरावा सुद्धा केलेला आहे. मात्र, अद्यापही सरकारकडून शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या बाजूने सकारात्मक पाऊल उचलण्यात आलेले नाही. यामुळे शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजीची भावना निर्माण झालेली आहे.

    केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणे राज्‍यातील इतर कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मिळतो आहे. त्‍याच धर्तीवर शालेय शिक्षण विभागाअंतर्गत येणाऱ्या शासकीय, खासगी अनुदानित, आश्रम शाळा व स्थानिक स्वराज्य संस्थामधील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना १०, २०, ३० वर्षाची आश्वासित प्रगती योजना तात्‍काळ लागू करावी, यासाठी गेल्‍या दोन अधिवेशनात आमदार सुधाकर अडबाले यांचा प्रश्‍नांच्या माध्यमातून पाठपुरावा सुरू आहे. राज्‍य सरकारने राज्‍यातील शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची रास्‍त मागणी असलेली १०, २०, ३० वर्षाची आश्वासित प्रगती योजना तात्‍काळ लागू करावी, अशी मागणी आमदार सुधाकर अडबाले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार व शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याकडे केली आहे.

  • तो शासन निर्णय रद्द करा – आमदार सुधाकर अडबाले

    News34 chandrapur

     

    चंद्रपूर : राज्यातील प्रशासनावरील खर्च आटोक्यात ठेवून विकासकामांसाठी पुरेसा निधी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने विविध विभागातील कामे ही बाह्ययंत्रणेमार्फत करून घेण्यात येणार आहे. यात शाळा, कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची पदेही कंत्राटी तत्वावर भरण्याचा समावेश आहे. या शासन निर्णयाला विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे सरकार्यवाह तथा शिक्षक आमदार सुधाकर अडबाले यांनी तीव्र विरोध दर्शविला आहे.

     

    राज्यात एकीकडे ‘पवित्र पोर्टल’च्या माध्यमातून शिक्षकभरती प्रक्रिया राबवण्यात येत असताना, दुसरीकडे शिक्षक आणि सहाय्यक शिक्षक बाह्ययंत्रणेद्वारे उपलब्ध करून दिले जाणार आहेत. शिक्षक हे समाजाचे आधारस्तंभ असतात. शिक्षकांच्या कंत्राटी तत्त्वावर नियुक्ती केल्यास विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होईल. शिक्षकांना स्थिरता मिळणार नाही. त्यामुळे शिक्षकांमध्ये अस्थिरता निर्माण होईल. यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर विपरीत परिणाम होईल.

     

    प्रशासकीय खर्च आटोक्यात ठेवून विकासकामांना पुरेसा निधी उपलब्ध होण्यासाठी शक्य तिथे बाह्ययंत्रणेद्वारे काम करून घेण्याचे राज्य सरकारचे धोरण आहे. त्यानुसार नऊ खासगी सेवापुरवठादार कंपन्यांमार्फत मनुष्यबळ उपलब्ध करण्याबाबत उद्योग, ऊर्जा, कामगार आणि खनिकर्म विभागाने शासन निर्णय ६ सप्‍टेंबर २०२३ रोजी निर्गमित केला.

     

    आमदार अडबाले यांनी सरकारला आवाहन केले की, शिक्षकांच्या कंत्राटी तत्त्वावर नियुक्ती करण्याचा शासन निर्णय तात्‍काळ रद्द करावा. शिक्षकांना कायमस्वरूपी नियुक्ती द्यावी. शिक्षकांची बाह्ययंत्रणेद्वारे कंत्राटी तत्त्वावर नियुक्ती केल्यास शिक्षकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागेल. शिक्षकांना नोकरीच्या सुरक्षिततेची हमी मिळणार नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर विपरीत परिणाम होईल. आमदार अडबाले यांनी सरकारला या शासन निर्णयावर पुनर्विचार करण्याचे आवाहन केले असून विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाने विरोध दर्शविला आहे.