Tag: आमदार प्रतिभा धानोरकर

  • अरविंदो रियालीटी कंपनीकडून शेतकऱ्यांना एकरी २५ – ३० लक्ष मोबदला व स्थायी नोकऱ्या तसेच त्वरित पुनर्वसन देखील करा

    अरविंदो रियालीटी कंपनीकडून शेतकऱ्यांना एकरी २५ – ३० लक्ष मोबदला व स्थायी नोकऱ्या तसेच त्वरित पुनर्वसन देखील करा

    News34 chandrapur

    चंद्रपूर : नागपूर येथील विधिमंडळ अधिवेशनात आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी अरविंदो रियालीटी कंपनीकडून शेतकऱ्यांना एकरी २५ – ३० लक्ष निधी मोबदला मिळावा, स्थायी नोकऱ्या तसेच त्वरित पुनर्वसन देखील करा, या मागणीकरिता लक्षवेधी मांडून सरकारचे लक्ष वेधले. यावेळी कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी शेतकऱ्यांना वाढीव मोबदला देऊन शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

     

    आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी सांगितले की, अरविंदो रियालीटी कंपनीला केंद्र सरकार व्दारे एकुण ९३६ हेक्टर आर जमिन ही कोळसा खाणीकरिता अलॉट करण्यात आलेली आहे. त्यापैकी 128 हेक्टर आर शेतजमिन अरविंदो रियालीटी कंपनीला केंद्र सरकारच्या स्पेशल प्रोव्हिजन अॅक्ट 2015 अन्वये हस्तांतरीत करण्यात आलेली आहे. व उर्वरीत 808 हेक्टर आर जमिन संपादीत करावयाची आहे.

     

    याबाबत आमदार प्रतिभाताई धानोरकर म्हणाल्या की, उर्वरीत 808 हेक्टर जमिन संपादीत करत असतांना शेतकरी व गावक-यांमध्ये समन्वय साधुन त्यांना त्यांच्या मागणीनुसार शेतजमिनीचा २५ – ३० लक्ष रुपये एकरी मोबदला व कंपनीमध्ये स्थायी नोकरी मिळालीच पाहिजे हि आमची आग्रही मागणी आहे.

     

    आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी अरविंदो कंपनीकडून सेंट्रल कॉलरी कंपनी नागपूर (डागा) या आस्थापनेवर जुने प्रकल्पग्रस्त 16 कामगार कार्यरत होते, आमच्या मागणी नुसार त्यांना स्थायी नोकरीत सामावुन घेतले व सानुग्रह मदत म्हणुन प्रत्येकी 7 लाख रूपये दिल्याबद्दल कंपनीचे कौतुक केले.

     

    आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी सांगितले की, सदर प्रकल्पात बेलोरा या गावची संपुर्ण शेतजमिन संपादीत होत असल्याने बेलोरा गावाचे पुनर्वसन तात्काळ करण्यात यावे व त्यासंदर्भाने पुनर्वसन करार करण्यात यावा.

     

    आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या या मागण्यांवर सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद मिळून शेतकऱ्यांना लाभ होईल अशी अपेक्षा आहे.

  • भावी अधिकाऱ्यांना महाराष्ट्रात बस सेवा मोफत द्या – आमदार प्रतिभा धानोरकर

    भावी अधिकाऱ्यांना महाराष्ट्रात बस सेवा मोफत द्या – आमदार प्रतिभा धानोरकर

    News34 chandrapur

    चंद्रपूर : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधुन राज्य शासनाने 75 हजार पदभरतीची प्रक्रिया सुरु करण्याचे घोषित केले होते. शासनाने परीक्षा शुल्कात देखील वाढ केली आहे. ग्रामीण भागातून मोठ्या शहरात जाण्याकरिता अधिकच्या आर्थिक भुर्दंड भावी अधिकाऱ्यांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे सरळ सेवा परीक्षेसाठी मोठ्या शहरात तरुणांना जाण्याठी मोफत बस सेवा देण्याची लोकहितकारी मागणी आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदनातून केली.

     

    या निवेदनात आमदार प्रतिभाताई धानोरकर म्हणाल्या की, सरळ सेवा परीक्षेसाठी राज्यातील अनेक तरुण मोठ्या शहरात जातात. या परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी मोठ्या मेहनतीची आवश्यकता असते. मात्र, आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या तरुणांना या परीक्षेसाठी जाण्यासाठी मोठा खर्च करावा लागतो. त्यामुळे या तरुणांना मोफत बस सेवा देण्याची मागणी त्यांनी केली.

     

    या मागणीचा पाठपुरावा करण्यासाठी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन दिले. या निवेदनात त्यांनी असेही म्हटले की, महाराष्ट्रात कुठेही परीक्षा देण्याकरिता बस प्रवास मोफत करावा. यामुळे आर्थिक दृष्ट्या कमकुवत असलेल्या तरुणांना मोठा दिलासा मिळेल. आमदार प्रतिभाताई धानोरकर यांची ही मागणी स्वागतार्ह आहे. या मागणीमुळे महाराष्ट्रातील अनेक तरुणांना मोठा फायदा होईल.

  • चंद्रपूर शहर महिला कांग्रेसची जम्बो कार्यकारणी जाहीर

    चंद्रपूर शहर महिला कांग्रेसची जम्बो कार्यकारणी जाहीर

    News34 chandrapur

    चंद्रपूर : संघटनात्मक बांधणी करून येणाऱ्या निवडणुकीत महिला संघटन अधिक बळकट करण्याकरिता जम्बो कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे. चंद्रपूर शहर महिला काँग्रेस तर्फे ५१ महिलांची कार्यकारणी जाहीर केली आहे. महिलांनी राजकारणात सक्रिय होण्याचे आवाहन देखील यावेळी आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी केले.
    याप्रसंगी  प्रदेश महासचिव  विनोद दत्तात्रय, काँग्रेस शहर जिल्हा अध्यक्ष रामु तिवारी, शहर महिला काँग्रेस अध्यक्ष चंदाताई वैरागडे, ग्रामीण महिला अध्यक्ष नम्रता ठेमस्कर, जेष्ठ कामगार नेते के के सिंग, अल्पसंख्यांक जिल्हा अध्यक्ष  सोहेल रजा शेख, माजी महिला अध्यक्ष चित्राताई डांगे, काँग्रेस नेते महेश मेंढे, प्राचार्य नरेंद्र बोबडे, मनीष तिवारी, अनुताई दहेगावकर, प्रीती शहा, राहुल चौधरी, प्रशांत भारती ,शालिनी भगत यांची उपस्थिती होती.
    याप्रसंगी चंद्रपूर शहर महिला उपाध्यक्ष पदावर वीणा खनके, सकिना अन्सारी, छाया सोनूले, सुनंदा धोबे, अर्चना चिवंडे, संध्या पिंपळकर, एकता गुरले, ललिता रेवल्लीवार, रेखा सुधाकर वैरागडे तसेच  चंद्रपूर शहर महिला सचिव पदावर प्रियंका वानखेडे, संगीता पेटकुले, मुन्नी मुमताज शेख, शिल्पा आंबटकर, साधना रामटेके, सुषमा मेश्राम, विद्या गड्डमवार, छबू पोहनकर तसेच चंद्रपूर  शहर महिला काँग्रेस महासचिव पदावर शुभांगी भोयर, माया इटनकर, शामीनजी काजी, रेखा भारस्कर, दीपाली वंजारी, जयश्री जाधव, ज्योषना इटनकर, वैशाली किनाके तसेच चंद्रपूर शहर महिला काँग्रेस सदस्य पदावर उषा बल्लावार, रजनी मडावी, वंदना खेडकर, तृप्ती जगनाडे, शीतल गीन्नलवार,
    प्रज्ञा बारसागडे, माधुरी देशट्टीवार, अर्चना राजूरकर, निशिगंधा खोब्रागडे, अर्चना धकाते, वैशाली ऐसेकर, स्नेहल अंबागडे, संगीता टवलारकर, नम्रताताई मोरे, कविता बावणे, सुवर्णा भारसकर, संगीता देठे, लीला बुटले, राणी बेलोरकर, उज्वला कार्लेवार, उषा तंगडपल्लीवार, स्वीटी नगराळे, स्नेहा शिरपूरकर, शालिनी काळे, अर्चना पिपरे तसेच चंद्रपूर शहर महिला मार्गदर्शक पदावर चित्रा डांगे, संगीता अमृतकर, सुनीता लोढिया, अश्विनी खोब्रागडे, उषा धांडे, सुनीता अग्रवाल, अनुताई दहेगावकर, शालिनी भगत, काजी,  वंदनाताई भागवत यांची नियुक्ती करण्यात आली.
  • सतत 4 दिवस आमदार धानोरकर यांचे विधानसभा क्षेत्रात मॅरेथॉन भूमिपूजन

    सतत 4 दिवस आमदार धानोरकर यांचे विधानसभा क्षेत्रात मॅरेथॉन भूमिपूजन

    News34 chandrapur

    चंद्रपूर : वरोरा- भद्रावती मतदारसंघाच्या आमदार प्रतिभाताई बाळुभाऊ धानोरकर यांनी विकास कामाचा वसा अंगिकारला आहे. भद्रावती तालुक्यात मागील आठवड्यात सर्वाधिक भूमिपूजन व लोकार्पण घेतले. त्याच प्रमाणे आता वरोरा तालुक्यात देखील चार दिवस मॅरॅथॉन भुमीपूजन व लोकार्पण सोहळा घेऊन या भागाच्या विकासाचा नवीन चेहरा निर्माण करण्याचे काम सुरु आहे.

     

    शुक्रवारी वरोरा तालुक्यातील विविध विकास कामांचे भुमीपूजन व लोकार्पण सोहळा पार पडला. या सोहळ्यात आमदार धानोरकर यांच्यासह वरोरा तालुका काँग्रेस अध्यक्ष मिलिंद भोयर, वरोरा कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती राजेंद्र चिकटे, पंचायत समिती माजी सभापती रवींद्र धोपटे, प्रदीप उरकुडे, दिवाकर निखाडे, विजू आत्राम, शालिक झाडे, डॉ. पठाण, बंडू शेलकी यासह सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते.

     

    यावेळी, आमदार धानोरकर यांनी सांगितले की, वरोरा भद्रावती मतदारसंघातील सर्व गावांमध्ये विकास कामे सुरू आहेत. या विकास कामांसाठी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा केला होता. या पाठपुराव्याचाच परिणाम म्हणून आज वरोरा तालुक्यातील 16 गावांमध्ये विविध विकास कामांची सुरुवात झाली आहे.

     

    या सोहळ्यात वरोरा तालुक्यातील बोर्डा, जामगाव बु., जामगाव खु., दिदोडा, मेसा, महालगाव बु., धानोली, शेगाव बु., भेंडाळा, चारगाव खु., अकोला नं.2, गिरोला, साखरा, लोधीखेडा, खेमजई आणि परसोडा या गावांमध्ये विविध विकास कामांची सुरुवात करण्यात आली. या कामांमध्ये स्मशानभूमी रस्ता, सिमेंट कॉकीट रस्ता, समाज भवन, ग्रा. पं. भवन, आर.ओ. वॉटर एटीएम मशीन बसविणे, पुलाचे बांधकाम यांचा समावेश आहे. या विकास कामांमुळे वरोरा तालुक्यातील नागरिकांना मोठा लाभ होणार आहे.

  • वरोरा – चिमूर रस्त्याचे काम पूर्ण करून विकासाची साडेसाती दूर करा – आमदार प्रतिभा धानोरकर

    वरोरा – चिमूर रस्त्याचे काम पूर्ण करून विकासाची साडेसाती दूर करा – आमदार प्रतिभा धानोरकर

    News34 chandrapur

    चंद्रपूर : जिल्ह्यात राज्य व राष्ट्रीय महामार्गाचे जाळे निर्माण करून विकासाच्या मुख्य प्रवाहात चंद्रपूर जिल्हा यावा असे स्वप्न होते. मात्र, याच विकासाला मागील साडेसहा वर्षांपासून साडेसाती लागली आहे. वरोरा – चिमूर रस्ता अर्धवट असल्यामुळे या मार्गावर अपघाताचे प्रमाण वाढले असून विकासाला ब्रेक लागला आहे. त्यामुळे तात्काळ या मार्गाचे काम पूर्ण करण्याकरिता स्वतः केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी लक्ष देऊन हा प्रश्न पूर्ण करण्याची विनंती आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी पत्राद्वारे केली आहे.

     

    वरोरा – चिमूर राष्ट्रीय महामार्ग क्र. ३५३ E मध्ये ४२.७५ किमीच्या २८४ करोड रुपयांच्या विकास कामाला दि. ४ मार्च २०१७ ला सुरवात झाली. हे काम ३ मार्च २०१९ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते.त्यानंतर सुधारित वाढीव मुदत देऊन ३० जून २०२३ करण्यात आली. सद्यस्थितीत संबंधित विभागाकडे चौकशी केली असता हे काम ९० टक्के पूर्णत्वास असून येत्या ३१ जानेवारी २०२४ पर्यंत पूर्ण होईल अशी माहिती दिली.

     

    मात्र अजूनही ४-५ किमी चार पदरी रोडचे काम बाकी असून रोड साईड ड्रेनेज १ किमी, १ पाईप कल्व्हर्ट, २ मायनर ब्रिजेस, ८ निवारा शेड व पार्किंग, ४.५ किमी स्ट्रीटलाईट व हायमास्ट बाकी असून गत २-३ महिन्यात लहान मोठ्या अपघातात अनेकांनी जीव गमावले तर काहींना कायम अपंगत्व आले. या जीवघेण्या अपूर्ण कामास त्वरित पूर्णत्वास न नेल्यास ग्रामस्थांना घेऊन रस्त्यावर उतरून आंदोलनाचा इशारा देखील आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी दिला आहे.

  • हिवाळी अधिवेशनात चंद्रपूर जिल्ह्यातील महिला आमदार गाजविणार दिंडोरा बॅरेजचा मुद्दा

    हिवाळी अधिवेशनात चंद्रपूर जिल्ह्यातील महिला आमदार गाजविणार दिंडोरा बॅरेजचा मुद्दा

    News34 chandrapur

    चंद्रपूर : वरोरा विधानसभेतील शेतकरी समृद्ध झाला पाहिजे. येथील शेती ओलिताखाली आली पाहिजे. याकरिता या भागात दिंडोरा प्रकल्पाची सुरुवात केली होती. त्याकाळात या प्रकल्पाकरिता शेतजमिनी देखील अधिग्रहित करण्यात आल्या होत्या. परंतु शासनाच्या लालफितीत हा प्रकल्प अडकला आहे. त्यामुळे तात्काळ हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी विधानसभेत लक्षवेधीच्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांना हा प्रकल्प पूर्ण करण्यास भाग पाडू असे आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी सांगितले आहे.

     

    वरोरा तालुक्यातील दिंडोरा प्रकल्पाकरिता 100 कोटी रुपयांची पुरक मागणी चंद्रपूर पाटबंधारे विभागातर्फे करण्यात आलेली होती. यासंदर्भात दिवंगत खासदार बाळू धानोरकर व विद्यमान आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला होता. सत्तातरानंतर हा प्रश्न थंड बस्त्यात पडला. परंतु या अधिवेशनात शासनाचे लक्ष वेधून हा विषय मार्गी लावणार असल्याचे आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी सांगितले.

     

    चंद्रपूर जिल्हîाच्या वरोरा तालुक्यातील सोईट दिंडोरा या गावाजवळ 14193 हेक्टर सिंचन क्षमतेचा दिंडोरा बॅरेज या प्रकल्पासाठी स्वर्गीय खासदार बाळूभाऊ धानोरकर यांनी पत्र क्र. ३०४९/२०२२ दि- २९-११-२०२२ अन्वेय 100 कोटींची पुरक मागणी केली होती. तसेच पत्र क्र. ३१३५/२२ दि. १५-१२-२०२३ अन्वेय वरोरा, वाणी व हिंगणघाट येथील आमदारांसह उपमुख्यामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बैठकीची मागणी केली होती. परंतु शेतजमीन अधिग्रहित करून देखील हा प्रकल्प पूर्ण न झाल्याने या भागातील शेतकऱ्यांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हितासाठी हा प्रश्न तात्काळ मार्गी लावण्याकरिता या अधिवेशनात हा प्रश्न लावून शासनाला करण्यास बाध्य करणार असल्याचे आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी सांगितले.

  • आमदार प्रतिभा धानोरकर यांच्या दणक्याने कर्नाटक एम्टा व्यवस्थापन हादरले

    आमदार प्रतिभा धानोरकर यांच्या दणक्याने कर्नाटक एम्टा व्यवस्थापन हादरले

    News34 chandrapur

    चंद्रपूर : कर्नाटका पॉवर कार्पोरेशन लिमिटेड कंपनीच्या कोळसा खाणीमुळे बाधित झालेल्या प्रकल्पग्रस्त, कामगार व ग्रामस्थांच्या विविध समस्यां व मागण्यासाठी 25 नोव्हेंबर रोजी आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या नेतृत्वात कामबंद आंदोलन करण्यात आले. यावेळी कर्नाटक एम्टा खाणीतील माल वाहतूक बंद करण्यात आली. याची दखल घेत व्यवस्थापकाने महत्वाच्या मागण्या तात्काळ मान्य करीत उर्वरित मागण्या दोन महिन्याच्या आत पूर्ण करण्याचा शब्द दिला. उर्वरीत मागण्या दोन महिन्यात मान्य न झाल्यास पुन्हा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी दिला.

     

    याप्रसंगी भद्रावती नगर परिषद नगराध्यक्ष अनील धानोरकर, कंपनी व्यवस्थांक गौरव उपाध्याय, भद्रावती काँग्रेस तालुका अध्यक्ष प्रशांत काळे, भद्रावती काँग्रेस शहर अध्यक्ष सुरज गावंडे, वरोरा काँग्रेस तालुका अध्यक्ष मिलिंद भोयर, वरोरा काँग्रेस शहर अध्यक्ष विलास टिपले, वरोरा कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती राजेंद्र चिकटे, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष सोहेल रजा शेख, ओबीसी शहर अध्यक्ष राहुल चौधरी, माजी नगरसेवक राजेश महाजन, युवा नेते राजू डोंगे, प्रवीण बांदुरकर, अजित फाळके, विजय खंगार, मंगेश मंगाम, शशिकला इंगोले, गीता आडे, ललिता आत्राम, सरिता सुर, कविता सुफी, प्रमोद नगोसे, संदीप कुमरे, महेश मोरे, प्रशांत झाडे, लता इंदुरकर,गोरू थैम, तन्वीर शेख, छोटू धकाते, सचिन पचारे, शिवा कोंबे व परिसरातील ग्रामपंचायत मा.सरपंच, उपसरपंच,सदस्य व प्रकल्प बाधित ग्रामस्थ हजारोच्या संख्येने सहभागी होते.

     

    यावेळी कंपनीकडून मिळणारे पुनर्वसन अनुदानात वाढ करावे, चेकबरांज व बरांज (मोकासा) या दोन्ही बाधीत गावांचे पुनर्वसन लवकरात लवकर करावे, चेकबरांज व बरांज (मोकासा) गावातील पात्र प्रकल्पग्रस्तांना ऑप्शन फार्म भरतेवेळी घराच्या मिळणाऱ्या मोबदल्याचे विवरण देण्यात यावे व घराचे दर फलक लावण्यात यावे, गावातील पुनर्वसन होणाऱ्या शेतमजुरांना शेतकऱ्यासारखी 750 दिवसाची कृषीमजुरी देण्यात यावी, शेतमजुरांना नौकरी किंवा नौकरी ऐवजी एकमुस्त 15 लाख रुपये अनुदान देण्यात यावे, कंपनी मधील कार्यरत कामगारांना HPC वेतन लागू करण्यात यावे. उर्वरित प्रकल्पग्रस्तांना कंपनीमध्ये रोजगार देण्यात यावा, कर्नाटका एम्टा माईन्स ते कोंढा गावालगत असणाऱ्या कोल साईडींगमध्ये होणाऱ्या कोळशाच्या वाहतुकीमुळे लगतच्या गावांतील नागरीकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे, तसेच कोळशाच्या दिवसरात्र होणाऱ्या वाहतुकीमुळे लगतच्या शेतातील शेतपिकांचे अतोनात नुकसान होत आहे.

     

    ज्याप्रमाणे जिएमआर व वर्धा पॉवर कंपनीने शेतकऱ्यांच्या शेतपिकांची कृषी विभागामार्फत केलेल्या सर्व्हेक्षणानुसार जी नुकसान भरपाई झाली ती दिली. त्याच धर्तीवर कर्नाटका पॉवर कार्पोरेशन लिमिटेड कंपनीने सुध्दा शेतकऱ्यांच्या शेतपिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून त्यांना त्वरित नुकसान भरपाई दयावी व भविष्यात होणारी जिवीतहानी टाळण्याकरिता योग्य त्या उपाययोजना कराव्या, या कंपनीने प्रकल्पबाधीत गावांच्या विकासाकरिता आजपावेतो कुठलाही सिएसआर निधी खर्च केला नाही.या सीएसआर निधीच्या माध्यमातून येथील विद्यार्थ्यांना स्कूल बस देण्यात यावी या मागण्यांवर आज चर्चा करण्यात आली.

     

    तसेच पीकनुकसान भरपाई, डांबरीकरण व काँक्रिटीकरणाने रोडचे मजबुतीकरण, धुळीवर नियंत्रण, ट्रक वाहतूक ओव्हरलोड न करणे व सुरक्षित करणे, परिसरातील ग्रामपंचायतींना सुमारे १ कोटींचा सामाजिक दायित्व निधी देणे, कोंढा कढोली व चोराळा येथील स्मशानभूमी निर्माण करणे, एम्टा मधील कार्यरत कंपन्यांच्या कामगारांची सविस्तर लिस्ट संपूर्ण माहितीसह देणे, त्यात स्थानिकांना प्राधान्य देणे, सायडिंग जवळच्या १२ व्यक्तींना सेवेत सामावून घेणे, ९ आश्रित विधवा पत्नी किंवा त्यांच्या वारसांना रोजगार देणे, शेतकऱ्यांसाठी ओव्हर बर्डन चा वापर करून अप्रोच रोड निर्माण करणे, २००५ ते २०१४ पर्यंत प्रलंबित देयकांसाठी भुगतान करणे, तसेच प्रकल्पबाधित गावांचे सरपंचांसोबत मासिक बैठक घेणे त्यात स्वतः गौरव उपाध्याय किंवा त्यांचे अधिकृत प्रतिनिधी हजर राहतील या सर्व बाबी स्वीकृत केल्यावरच आंदोलनाची यशस्वी सांगता झाली.

  • चंद्रपुरात २५ व्या युथ राज्यस्तरीय अजिंक्यपद व्हॉलीबॉल स्पर्धेचे उद्घाटन

    चंद्रपुरात २५ व्या युथ राज्यस्तरीय अजिंक्यपद व्हॉलीबॉल स्पर्धेचे उद्घाटन

    News34 chandrapur

    चंद्रपूर : ऑनलाईन युगात मैदानी खेळ होणे अत्यंत गरजेचे आहे. चंद्रपुरात होत असलेली २५ वी युथ राज्यस्तरीय अजिंक्यपद व्हॉलीबॉल स्पर्धा जिल्ह्यातील खेडाळूंमध्ये नवचैतन्य निर्माण करेल, असा विश्वास आमदार सुधाकर अडबाले यांनी व्यक्त केला.

     

    मथुरा व्हॉलीबॉल स्पोर्टींग क्लब तर्फे आयोजित महाराष्ट्र राज्य व्हॉलीबॉल संघटना व चंद्रपूर जिल्हा व्हॉलीबॉल संघटना यांच्या मान्यतेने रवींद्रनाथ टागोर प्राथ. शाळेचे मैदान, विठ्ठल मंदिर वॉर्ड, चंद्रपूर येथे २५ वी युथ राज्यस्तरीय अजिंक्यपद व्हॉलीबॉल स्पर्धा २०२३ (मुले व मुली) या स्पर्धेचे उद्घाटक म्हणून आमदार अडबाले बोलत होते.

     

    यावेळी अध्यक्षस्थानी आमदार सुभाष धोटे तर प्रमुख अतिथी म्हणून आमदार प्रतिभा धानोरकर, शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रितेश तिवारी, माजी महापौर संगीता अमृतकर, डॉ. अनिल शिंदे, प्रा. रवी झाडे, प्रशांत दानव, क्लबचे अध्यक्ष अभय बद्दलवार, सचिव प्रकाश मस्के, पुरुषोत्तम पंत आदींची उपस्थिती होती.

     

    या स्पर्धेत राज्यातील विविध विभागातील संघ सहभागी झाले आहेत. स्पर्धेचे उद्घाटन करताना आमदार अडबाले म्हणाले की, व्हॉलीबॉल हा एक उत्तम खेळ आहे. हा खेळ खेळल्याने खेळाडूंमध्ये सहकार्य, संघभावना, संयम, लवचिकता यासारख्या गुणांचा विकास होतो. ऑनलाईन युगात शारीरिक आरोग्यासाठी मैदानी खेळांचे महत्त्व वाढले आहे. चंद्रपुरात होत असलेली ही स्पर्धा जिल्ह्यातील खेडाळूंसाठी एक चांगली संधी आहे. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व खेळाडूंना मी शुभेच्छा देतो.

     

    यावेळी आमदार सुभाष धोटे, आमदार प्रतिभा धानोरकर यांनीही खेडाळूंना शुभेच्छा दिल्या. उदघाटन समारंभाचे संचालन प्रफुल पुलगमकर यांनी केले. या स्पर्धा २४ ते २६ नोव्हेंबरपर्यंत चालेल.

  • मतदारसंघाच्या विकासासाठी सतत कार्यरत राहीन : आमदार प्रतिभाताई धानोरकर

    मतदारसंघाच्या विकासासाठी सतत कार्यरत राहीन : आमदार प्रतिभाताई धानोरकर

    News34 chandrapur

    चंद्रपूर : मी माझ्या 4 वर्षांच्या कार्यकाळात वरोरा – भद्रावती मतदारसंघातील विकासासाठी कटिबद्ध राहिली आहे. या काळात अनेक विकास कामे पूर्ण झाली आहेत. या कामांमुळे तालुक्यातील नागरिकांना अनेक सुविधा मिळाल्या आहेत. यापुढेही मी तालुक्यातील विकासासाठी सतत कार्यरत राहीन, असे प्रतिपादन वरोरा – भद्रावती मतदारसंघाच्या आमदार प्रतिभाताई बाळुभाऊ धानोरकर यांनी केले.

     

    भद्रावती तालुक्यातील विविध गावांमध्ये भुमीपूजन व लोकार्पण सोहळा दौरा पार पडला. यावेळी त्यांनी मार्गदर्शन केले.

     

    याप्रसंगी भद्रावती काँग्रेस तालुका अध्यक्ष प्रशांत काळे, भद्रावती काँग्रेस शहर अध्यक्ष सुरज गावंडे, सामाजिक कार्यकर्ते प्रमोद मगरे, बाळू चिंचोलकर, भानुदास पा.गायकवाड, भोजराज जी झाडे, सुधीर मुडेवार, अनिल चौधरी, मंगेश मत्ते, ईश्वर पा. धांडे, भगवान काकडे, किशोर पडवे, नयन जांभुळे, चांगदेव रोडे, सलाम शेख, संजय उताणे, संजय काकडे, दिलीप चौधरी, प्रशांत झाडे, आकाश ढवस यांची उपस्थिती होती.

     

    मानोरा ते धानोली रस्त्याचे खडीकरण व मजबुतीकरण, किन्हाळा, आष्टा, घोसरी, टेकाडी, काटवल तु., विलोडा, काटवल न., चोरा, आष्टी का., मासळ व चिंचाळा येथे विविध विकास कामांची पाहणी केली व लोकार्पण केले.
    या दौऱ्यात त्यांनी मानोरा ते धानोली रस्त्याचे खडीकरण व मजबुतीकरणाचे काम पूर्ण झाल्याबद्दल समाधान व्यक्त केले. या रस्त्याचे काम पूर्ण झाल्यामुळे वाहतुकीची सोय सुलभ झाली आहे. त्यांनी किन्हाळा, आष्टा व घोसरी येथे वाढीव पाणी पुरवठा योजनेचे काम पूर्ण झाल्याबद्दलही समाधान व्यक्त केले. या योजनेमुळे या भागातील पाणीटंचाई दूर होण्यास मदत होणार आहे.

     

    तेकडी, काटवल तु., विलोडा, काटवल न., चोरा, आष्टी का., मासळ व चिंचाळा येथे सिमेंट कॉकीट रस्त्याचे काम पूर्ण झाल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. या रस्त्याचे काम पूर्ण झाल्यामुळे या भागातील वाहतुकीची सोय सुलभ झाली आहे. त्यांनी या कामांसाठी संबंधित ग्रामपंचायत व ग्रामस्थांना धन्यवाद दिले.

    या दौऱ्यादरम्यान त्यांनी स्थानिक नागरिकांशी संवाद साधला व त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यांनी या समस्यांचे निराकरण करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.

  • आमदार प्रतिभा धानोरकर यांच्याकडून पोडे कुटुंबियांचे सांत्वन

    आमदार प्रतिभा धानोरकर यांच्याकडून पोडे कुटुंबियांचे सांत्वन

    News34 chandrapur

    चंद्रपूर : चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती गोविंदा पोडे, मुलगा चैतन्य व भाचा गणेश उर्फ उज्वल उपरे यांचा दुर्दैवी व अकाली मृत्यू झाला. आज आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी त्यांच्या नांदगाव येथील घरी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली.

     

    यावेळी शहर काँग्रेस अध्यक्ष रामू तिवारी, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष सोहेल रजा, ओबीसी नेते नरेंद्र बोबडे, चंद्रपूर तालुका काँग्रेस काँग्रेस अध्यक्ष अनिल नरुले, काँग्रेस युवा नेते सचिन कत्याल,अनिता बोबडे यांची उपस्थिती होती.

     

    मोठ्या वडिलांचे अंतिम विधीनंतरचे कार्य पार पडण्यासाठी अख्खे कुटुंब व नातेवाईक वर्धा – इरई नदीच्या संगमावर गेले. तेथे मोठ्या वडिलांच्या अस्थिविसर्जनाचा कार्यक्रम घेतला. अखेरच्या टप्प्यात घराकडे परतण्याची तयारी केली जात होती. मात्र नियतीला हे मान्य नव्हते. वर्धा नदीच्या खोल पाण्यात एकाच कुटुंबातील तिघांचा बुडून मृत्यू झाला. हि दुर्दैवी घटना बल्लारपूर तालुक्यातील नांदगाव (पोडे) गावाजवळ वर्धा – इरई नदीच्या संगमावर रविवारी घडली. हि घटना दुर्दैवी असून यातून पोडे कुटुंबियांना सावरण्याची शक्ती देण्याची प्रार्थना यावेळी आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी केली.