Tag: आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण

  • Chandrapur flood preparedness training 2025 । 💪 पूर आला तरी घाबरू नका! चंद्रपूरमध्ये नागरिकांना देण्यात येतंय थेट रेस्क्यू ट्रेनिंग

    Chandrapur flood preparedness training 2025

    Chandrapur flood preparedness training 2025 : चंद्रपूर (२१ जुन २०२५ ) – पावसाळ्यात उद्भवणारी पूर परिस्थिती व इतर आपत्ती वेळी नागरिकांनी कोणती दक्षता घ्यावी, याबाबत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण तसेच चंद्रपूर तालुका प्रशासनाच्या वतीने लोहारा येथील तलावावर प्रशिक्षण आयोजित करण्यात आले.

    चंद्रपूर जिल्हा प्रशासनाच्या ताफ्यात नवे वाहन

    नैसर्गिक आपत्तीमध्ये दक्षता

    या प्रशिक्षणाला अतिरिक्त जिल्हाधिकारी नितीन व्यवहारे, उपविभागीय अधिकारी संजय पवार, तहसीलदार विजय पवार यांनी मार्गदर्शन केले. तसेच यावेळी नागरिकांना सीपीआर, नैसर्गिक आपत्तीमध्ये घ्यावयाची दक्षता याबाबत राज्य आपत्ती व्यवस्थापन दलातर्फे प्रात्यक्षिकाद्वारे माहिती देण्यात आली.

    सदर प्रशिक्षणाचा लाभ गावातील नागरीक तसेच तालुक्यातील पोलीस पाटील, इतर शासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी, सरपंच, तलाठी, मंडळ अधिकारी, कोतवाल, ग्रामसेवक, कृषी सहायक, आशा सेवकिा, आपदा मित्र, आपदा सखी, पट्टीचे पोहणारे नागरिक यांनी सहभाग नोंदविला. कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरिता जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सलीम शेख व त्यांच्या टीमने सहकार्य केले.

  • emergency preparedness training for rural areas । आपत्ती आली तर काय कराल? ग्रामीण भागात सुरू झालं ‘सुपर ट्रेनिंग’

    emergency preparedness training for rural areas

    emergency preparedness training for rural areas : चंद्रपूर : आपत्तीच्या काळात तात्काळ व प्रभावी प्रतिसाद देण्यासाठी स्थानिक प्रशासनाच्या क्षमतेत वाढ करण्याच्या उद्देशाने तसेच मान्सून पूर्वतयारीच्या अनुषंगाने चिमूर व नागभीड तालुक्यांमध्ये जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणच्या वतीने विशेष आपत्ती प्रतिसाद दल प्रशिक्षण घेण्यात आले. flood rescue and CPR training for volunteers

    1 लक्ष रुपये मिळणार तेही बिनव्याज, लवकर करा अर्ज

    जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष विनय गौडा जी. सी., निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या प्रशिक्षणामध्ये विविध आपत्तींच्या परिस्थितीत प्रभावी उपाययोजना कशा कराव्यात, याबाबत प्रत्यक्ष मार्गदर्शन करण्यात आले. यात प्राथमिक बचाव व शोध मोहीम, प्राथमिक उपचार व सीपीआर, पूर्वसूचना प्रणाली व समुदाय जनजागृती, आपत्ती काळातील समन्वय व बचाव कार्य, आपत्कालीन उपकरणांचा वापर व सुरक्षाविधी यांचा समावेश होता.

    या प्रशिक्षणामध्ये महसूल, पोलीस, आरोग्य, शिक्षण, कृषी, आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचे अधिकारी, कर्मचारी व स्वयंसेवक यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. चिमूर व नागभीड तालुक्यात राज्य आपत्ती प्रतिसाद दल ,नागपुरचे पोलिस उपनिरीक्षक सोमनाथ भंडारे यांच्या नेतृत्वात 9 रेस्क्यूवर प्रशिक्षण देण्यात आले. चिमूर तहसील कार्यालयामध्ये इम्प्रोवाईज डिवाइस, स्टॅंडर्ड डिवाइस, एम. एफ. आर. मध्ये सीपीआर व विविध प्रकारचे बँडेज कशा प्रकारे बांधतात, अशा बाबींवर आपत्ती व्यवस्थापन विषयक माहिती देण्यात आली. तसेच चिमूर आणि नागभीड तहसील मधील उपलब्ध आपत्ती निवारण साहित्याची तपासणी करण्यात आली.

    flood rescue cpr training for volunteers

    पूरपरिस्थिती हाताळण्यासाठी राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे प्रात्यक्षिक महत्त्वाचे आहे. या प्रशिक्षणातील माहिती आपापल्या तालुक्यातील इतरांना देण्यासाठी अतिशय गांभीर्याने प्रशिक्षण शिकून घ्या. पूर परिस्थितीत नागरिकांचे जीव वाचविणे आणि त्यांना सुरक्षित स्थळी स्थलांतरीत करण्यासाठी टीमवर्क म्हणून काम करणे गरजेचे असल्याचे नागभीडचे तहसीलदार प्रताप वाघमारे यांनी सांगितले. taluka level disaster preparedness training

    चिमूर येथे पार पडलेल्या प्रशिक्षणावेळी अप्पर जिल्हाधिकारी संतोष थिटे, उपविभागीय अधिकारी किशोर घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार श्रीधर राजमाने, नायब तहसीलदार सूर्यकांत पाटील, तसेच नागभीड येथे तहसीलदार प्रताप वाघमारे, गटविकास अधिकारी स्नेहल लाड, तालुका कृषी अधिकारी श्री. पुजारी, नायब तहसीलदार उमेश कावळे व इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

    अधिक प्रशिक्षण सत्रे व मॉकड्रील घेण्याचे नियोजन

    या उपक्रमामुळे जिल्ह्यातील सर्व स्तरांवरील यंत्रणांना आपत्ती काळात योग्य ती तयारी ठेवता येणार असून, आपत्ती व्यवस्थापन अधिक प्रभावीपणे करता येईल. आगामी काळात अधिक प्रशिक्षण सत्रे व प्रत्यक्ष मॉकड्रिल्स घेण्याची योजना आखण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सलीम शेख यांनी दिली.

  • Disaster Management Training for ITI Students । राज्यातील ITI मध्ये ‘आपत्ती व्यवस्थापन’, ६ नव्या अभ्यासक्रमांचा समावेश

    Disaster Management Training for ITI Students

    Disaster Management Training for ITI Students : चंद्रपूर – जम्मू आणि काश्मीर येथील पहलगाम इथे दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान सीमेवर सध्या तणावाचे वातावरण आहे. पार्श्वभूमीवर कौशल्य विभाग आणि अनिरुद्धाज अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील हजारो विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे देण्यात येत आहेत. कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते ठाणे येथील राजमाता जिजाऊ औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत आज  या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. राज्यातल्या सर्व औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात ऑनलाईन द्वारे आपत्ती व्यवस्थापनाच्या कार्यशाळा होणार आहेत.  Disaster management training for ITI students in Maharashtra

    गर्भलिंग निदान करणाऱ्याची आता खैर नाही, चंद्रपुरात आढावा बैठक

    ६ नवे अभ्यासक्रम

              या कार्यक्रमात कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले की, आपत्ती व्यवस्थापन ही काळाची गरज आहे. आपत्ती मानव निर्मित असो किंवा नैसर्गिक असो, याचे व्यवस्थापन आणि बचाव कसा करावा, याचे प्रशिक्षण प्रत्येक नागरिकांनी घेतले पाहिजे. मानवाने प्रगती केली असली तरी, आपत्तीचे स्वरूप ही त्यानुसार बदलले असून बचावाचे प्रशिक्षण नव्या पिढीला देण्याचा आमचा उद्देश असल्याचे श्री. लोढा म्हणाले. त्याचबरोबर या कार्यक्रमात मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी आयटीआयमध्ये  सहा नव्या अभ्यासक्रमाची यावेळी घोषणा केली. यात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), ई व्ही इलेक्ट्रिक वाहन व्यवस्थापन, इंडस्ट्रिअल रोबोटिक्स आणि थ्री डी प्रिंटिंग, ड्रोन तंत्रज्ञान,  सोलर टेक्निशियन या अभ्यासक्रमांचा यात समावेश असून येत्या शैक्षणिक वर्षापासूनच याची सुरुवात होणार आहे.

    Disaster management training for ITI students in Maharashtra

            दोन दिवसीय शिबिरात अनिरुद्धाज अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंटचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. सुनील मंत्री यांचे विद्यार्थ्यांना यावेळी मार्गदर्शन लाभले. तर राज्याचे माजी पोलीस महासंचालक श्री. प्रवीण दीक्षित यांनी राज्यातील आयटीआय विद्यार्थ्यांची नागरी संरक्षण या विषयावर ऑनलाईन कार्यशाळा घेतली.

    बचाव आणि मदत कार्याचे प्रशिक्षण

              राजमाता जिजाऊ औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतल्या शिबिराच्या सुरुवातीला डॉ. लीना गडकरी यांनी आपत्ती व्यवस्थापन संकल्पना नेमकी काय हे विद्यार्थ्यांना सांगितले. या दोन दिवसीय शिबिरात बचाव आणि मदतकार्य याचे प्रशिक्षण ही देण्यात येणार आहे. मानव निर्मित आपत्ती यात युद्धाचा समावेश असून त्या काळात घ्यायची काळजी, उपचार आणि बचाव यावरही विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. तसेच मंत्री श्री. मंगलप्रभात लोढा यांच्या उपस्थितीत बचावाची प्रात्यक्षिके विद्यार्थिनींनी सादर केली. राजमाता जिजाऊ औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्य श्रीमती. एस. एस. माने यांनी यावेळी उपस्थितांचे आभार व्यक्त केले. Rajmata Jijau ITI disaster management training