Tag: अवैध धंदे

  • illegal liquor sale in residential areas । 🤯 नग्न दारुडे, खुलेआम लघुशंका! अवैध दारू व्यवसायाने बाबुपेठ वॉर्डात त्रासच त्रास

    illegal liquor sale in residential areas

    illegal liquor sale in residential areas : चंद्रपूर – बाबूपेठ मधील गौरी तलाव येथे राहणारे श्री. सुनील तुळशीराम धामणकर हे अवैध दारू विक्रीचा व्यवसाय करत असून यांच्याकडे येणारे दारुडे केव्हा नग्न अवस्थेत तर कधी रोडवर उघड्यावरती लघु शंका करतात यामुळे वार्डामध्ये अनेकदा वाद निर्माण झालेला असून याबाबत सिटी पोलीस स्टेशन येथे तक्रारी सुद्धा दाखल करण्यात आल्या आहे.

    चंद्रपुरात एका आठवड्यात २ हत्या, गुन्हेगारीचा उद्रेक

    परंतु अजून पर्यंत यावरती कुठल्याही प्रकारचा कार्यवाही करण्यात आलेली नसल्याचे गौरी तलाव वॉर्डातील जनतेनी आपचे राजू कुडे यांच्याकडे कारवाई संदर्भात तक्रार केली. अवैध व्यवसाय करणाऱ्या लोकांचा मनोबल वाढल्याने अल्पवयीन मुलं ड्रग्स, गांजा दारू सारख्या अनेक व्यसनाचे आहारी गेले तथा या व्यवसायात गुंतलेले आहे. शहरात सर्रासपणे होत असलेल्या या अवैध व्यवसायावर राज्य उत्पादन शुल्क विभाग, तथा पोलिस प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारची कारवाई होत नसल्याने जनसामान्यांच्या मनात प्रशासनाबद्दल चीड निर्माण होत आहे. local complaints ignored by police on illegal alcohol sales

    तर रस्त्यावर उतरू

    सदर ठिकाणी तथा बाबुपेठ परिसरात तातडीने कारवाई करून अवैध धंदे तात्काळ थांबवून गुन्हेगारीवर अंकुश लावावा अन्यथा नागरिकांना घेऊन आम आदमी पार्टी रस्त्यावर उतरेल असा इशारा आम आदमी पार्टीचे युवा जिल्हाध्यक्ष राजू कुडे यांनी संबंधित विभागाला दिला आहे.

    यावेळी आपचे राज्य संघटन सचिव सुनील मुसळे, जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार, युवा जिल्हाध्यक्ष राजू कुडे, शहराध्यक्ष योगेश गोखरे, शहर संघटन मंत्री संतोष बोपचे, जिल्हा सचिव राज नगराळे, तसेच वॉर्डातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  • चंद्रपुरातील “कैलास” ने जिल्ह्यातील “पर्वतावर” सुरू केला कोंबडा बाजार

    चंद्रपुरातील “कैलास” ने जिल्ह्यातील “पर्वतावर” सुरू केला कोंबडा बाजार

    News34 chandrapur

    चंद्रपूर – जिल्ह्यातील अवैध धंदे आजही छुप्या पध्दतीने सर्रासपणे सुरू आहे, सुगंधित तंबाखू, सट्टा, कोळसा चोरी असो मात्र आता चंद्रपुरातील “कैलास” ने चक्क जिल्ह्यातील “पर्वतावर” कोंबडा बाजार सुरू केल्याची खमंग चर्चा सुरू झाली आहे.

     

    2 वर्षांपूर्वी चंद्रपुरात तब्बल 8 ते 9 कोंबडा बाजार सुरू होते, यामध्ये जुगाराचे खेळ सर्रास बघायला मिळत असे, मात्र पत्रकारांच्या सतत वृत्ताने पोलिसांना ते कोंबडा बाजार बंद करावे लागले होते, मात्र आता चंद्रपुरातील ” सट्टा किंग” “कैलास” ने थेट जिवती येथील पर्वत गाठत कोंबडा बाजार सुरू केला.

     

    कुठे भरतो जुगारांचा मेळा?

     

    चंद्रपूर जिल्ह्यातील पर्वतांच्या रांगा असलेलं तेलंगणा व महाराष्ट्र सीमेला जोडणारे जिवती तालुक्यातील मौजा भारी समोर बाबापूर याठिकाणी हा बाजार भरतो.

     

    याठिकाणी जायचं कसं?

     

    राजुरा वरून वाकडी गावी आलं की उजव्या दिशेवरून सरळ 8 किलोमीटर अंतर गाठून भारी येथे जायचं, त्याठिकाणी कैलास आपल्या माणसांसोबत आपलं स्वागत करण्यास उत्सुक असतो.

     

    कोण आहे कैलास?

     

    चंद्रपूर शहरात राहणारा कैलास मागील अनेक वर्षांपासून सट्टा पट्टी चालवितो, पोलिसांना याबाबत जाणीव आहे, 2 वर्षांपूर्वी त्याने दुर्गापुर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठा पेंडाल टाकत सट्टा व जुगार सुरू केला होता, मात्र News34 च्या बातमीनंतर त्याचा जुगार दुर्गापुरातून हटला, आता त्याने थेट जिवती तालुक्यात महाराष्ट्र व तेलंगणा सीमेवर कोंबडा बाजार सुरू केला आहे, कारण सीमेच्या पलीकडील नागरिक मोठ्या प्रमाणात जुगार खेळण्यासाठी त्याठिकाणी येत असतात.

     

    आधी सोशल क्लब च्या नावाने रमी क्लब तर सुरूच झाले आहे आता त्यामध्ये कोंबडा बाजाराने भर दिल्याने जुगार प्रेमींना चांगली पर्वणी मिळाली आहे.

     

    आपल्या कोंबडा बाजारात जायचं असेल तर आठवड्यातून बुधवार, शुक्रवार व रविवार हे 3 दिवसात जावे, बाकी उर्वरित दिवस “कैलास” ने सुट्ट्या घोषित केल्या आहे, कैलास सोबत चंद्रपूर व तेलंगणा येथील काही पार्टनर सोबत असल्याची माहिती आहे.

  • चंद्रपुरात पालकमंत्री मुनगंटीवार यांनी केले मिशन टिन्स चे उदघाटन

    News34 chandrapur

    चंद्रपूर : चंद्रपूर जिल्हा हा शांतता आणि सामाजिक सलोखा राखणारा जिल्हा आहे. मात्र काही असामाजिक तत्वांकडून जिल्ह्यात गुन्हेगारी वाढविण्याचे प्रकार निदर्शनास येत आहे. याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी गुप्त खब-यांचे जाळे वाढवावे. तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून दोषसिद्धीचे प्रमाण वाढवावे, असे निर्देश राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.

     

    नियोजन सभागृह येथे पोलिस विभाग, राज्य उत्पादन शुल्क विभाग तसेच उप-प्रादेशिक परिवहन विभागाचा आढावा घेतांना ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा पोलिस अधिक्षक रविंद्रकुमार परदेशी, सहाय्यक जिल्हाधिकारी मुरुगानंथम एम., अतिरिक्त पोलिस अधिक्षक रिना जनबंधु, सहाय्यक पोलिस अधिक्षक आयुष नोपानी, मनपा आयुक्त विपीन पालीवाल, उप-प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे, राज्य उत्पादन शुल्क अधिकारी संजय पाटील यांच्यासह सर्व उपविभागीय पोलिस अधिकारी, पोलिस निरीक्षक आदी उपस्थित होते.

     

    पुढे पालकमंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले, पोलिस विभागाने नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून गस्तीवर असणारे वाहन, पोलिस, कर्तव्यावर असलेला वाहतूक पोलिस नक्की कुठे आहे, यावरसुध्दा लक्ष ठेवावे. खब-यांचे जाळे वाढविण्यासाठी पोलिस मित्र/मैत्रीण नियुक्त करता येतात,  याबाबत विचार करावा.
    जिल्ह्यातील जातीय सलोखा कायम ठेवण्यासाठी सोशल मिडीयावरील घटनांचे विश्लेषण करण्यासाठी तंत्रज्ञानाचा उपयोग करावा. शहरातील वाहतुक कोंडी सोडविण्यासाठी बायपास मार्ग काढणे तसेच रस्ते कसे विकसीत करता येईल, याबाबत नियोजन करावे, अशा सुचना पालकमंत्री श्री. मुनगंटीवार यांनी दिल्या.

     

    सादरीकरणात जिल्हा पोलिस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी म्हणाले, जिल्ह्यात ड्रंक ॲन्ड ड्राईव्ह प्रतिबंध, सिटबेल्ट व हेल्मेट बाबत राबविण्यात आलेल्या त्रिसुत्रीच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे अपघातांची संख्या तसेच अपघातातील मृत्युंची संख्या कमी करण्यात यश आले आहे. सन 2022 मध्ये ड्रंक ॲन्ड ड्राईव्हचे 767 प्रकरणांची नोंद होती. यावर्षी सप्टेंबरअखेर पर्यंत 7721 प्रकरणे नोंदविण्यात आली आहे. यात 900 टक्के वाढ आहे. सन 2022 मध्ये सिटबेल्टची 7149 प्रकरणे तर 2023 मध्ये 18281 प्रकरणे (156 टक्के वाढ), 2022 मध्ये सिटबेल्टची 12079 प्रकरणे तर 2023 मध्ये 27303 प्रकरणे (126 टक्के वाढ) नोंदविण्यात आली आहेत. या तीनही बाबींमध्ये गत वर्षीच्या एकूण 19995 प्रकरणांच्या तुलनेत 2023 मध्ये एकूण 53305 प्रकरणांची नोंद आहे.

     

    तसेच अवैध दारुला आळा घालणे, या प्रकणांत 45 टक्क्यांनी वाढ असून 2632 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. सन 2022 मध्ये जनावरांची अवैध वाहतुकीची 39 प्रकरणे होती. यावर्षी 69 प्रकरणे नोंदविण्यात आली असून 2200 जनावरे पकडण्यात आली आहेत. सन 2017 ते 2023 या कालावधीत जिल्ह्यातील अल्पवयीन 300 मुले आणि अल्पवयीन 1271 मुली असे एकूण 1571 जण बेपत्ता असल्याची नोंद झाली. यापैकी 292 मुले तर 1236 मुलींना परत आणण्यात यश प्राप्त झाल्याचे पोलिस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी यांनी सांगितले.

     

    रस्ते अपघातांची संख्या कमी करा

     

    जिल्ह्यातील रस्ते अपघातांची संख्या कमी करण्यासाठी ब्लॅक स्पॉट निश्चित करून त्याच्या उपाययोजनेसाठी निधीबाबतचा प्रस्ताव रस्ता सुरक्षा समितीमध्ये तात्काळ पाठवावा. तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यांवरील खड्डे त्वरीत बुजवावे. अपघातांचे विश्लेषण करण्यासाठी सॉफ्टवेअर विकसीत करा. वाहनांच्या मागे रिफ्लेक्टर प्रभावीपणे दिसण्यासाठी वाहनांच्या तपासणीची मोहीम राबवावी. तसेच टोल नाक्यावर वाहनांच्या रिफ्लेक्टरची तपासणी करावी.

    बाबुपेठ येथे पोलिस चौकी कार्यान्वित करणार :

    बाबुपेठ येथे असलेली पोलिस चौकी एक महिन्याच्या आत पुन्हा कार्यान्वित करण्यासाठी पोलिस विभागाने आवश्यक मनुष्यबळाची पुर्तता करावी. या चौकीच्या बांधकामासाठी निधी लागत असल्यास तो उपलब्ध करून देण्यात येईल, असे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

     

    हेल्मेट वापरण्याबाबत जनजागृती आवश्यक :

    सन 2023 मध्ये दुचाकी अपघातात 161 जणांचा मृत्यु झाला आहे. यात 154 जणांचा मृत्यु हा हेल्मेट न वापरल्यामुळे झाल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे हेल्मेट वापराबाबत जनजागृती करणे आवश्यक आहे. तसेच हेल्मेटचा वापर केल्याने किती जणांचे जीव वाचले आणि न वापरल्याने किती जणांचा मृत्यु झाला, याचा सर्व्हे करावा. हेल्मेट शिवाय (विशिष्ट क्रमांकासह) नवीन वाहनांची नोंदणीच करू नये, याबाबत नियोजन करता येते का, ते तपासावे.

     

    दारू दुकानांची संख्या वाढवू नका

    दारुमुळे अनेक कुटुंब उध्वस्त होतात. दारु दुकानांबद्दल नागरिकांच्या तक्रारी असल्यास त्याकडे गांभियाने लक्ष द्यावे. यापुढे जिल्ह्यात दारुच्या दुकानांची संख्या वाढवू नये, असे निर्देश पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाला दिले.

     

    गोवंश ठेवण्यासाठी जागेची उपलब्धता :

     

    अवैध वाहतुकीदरम्यान पकडण्यात आलेली जनावरे ठेवण्यासाठी किती जागेची मागणी आहे, त्याबाबतचा प्रस्ताव तयार करावा. जागेची उपलब्धता करून देऊन त्याच्या बाजुला वनविभागातर्फे कुरण विकसीत करण्याचे नियोजन करता येईल, असेही पालकमंत्र्यांनी सांगितले.

     

    मिशन ‘टीन्स’ चे उद्घाटन :

     

    पोलिस अधिक्षक कार्यालय व जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने अल्पवयीन मुले / मुली यांना सायबर क्राईम, लैंगिक शोषण, बॅड टच – गुड टच, पोक्सो कायदा आदींबाबत जनजागृती निर्माण व्हावी, यासाठी ‘टीन्स’ उपक्रम (ट्रेनिंग, एज्युकेटिंग, इंपॉवरिंग, नर्चरींग स्टुडंट) राबविण्यात येत आहे. याअंतर्गत जिल्ह्यातील शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. जेणेकरून याबाबत शालेय विद्यार्थ्यांना अवगत करता येईल. तसेच याबाबत जे पिडीत आहेत, त्यांचे मनोर्धर्य उंचाविण्यासाठी मानसोपचार तज्ज्ञांकडूनसुध्दा मार्गदर्शन करण्यात येईल. या उपक्रमाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

  • चंद्रपूर जिल्ह्यात 28 वर्षीय युवकाची हत्या

    News34 chandrapur

    चंद्रपूर : राजुरा शहरालगत असलेल्या रामपुर वस्तीतील वॉर्ड क्रमांक दोन मधील साई मंदिर जवळ राहत असलेला एका युवकाचा रामपूर जंगलात अज्ञात व्यक्तींनी दगडाने ठेचून निर्घूण खून केल्याची घटना मंगळवारी 10 ऑक्टोबर ला सायंकाळी उघडकीस आली आहे. संदीप देवराव निमकर (वय २८) असे मृतकाचे नाव आहे. पोलिसांनी या प्रकरणी 3 संशयितांना ताब्यात घेतले आहे.

     

    राजूरा शहरालगतच्या रामपुर येथे संदीप निमकर हा आपल्या आई वडिलांसह राहत होता. सोमवारी रात्री आठ वाजता घरून निघून गेला होता. तो घरी परत न आल्याने राजूरा पोलिसात बेपत्ता असल्याची तक्रार कुटूंबियांनी दाखल केली होती. तो घरी परत न आल्याने रात्रीपर्यंत त्याच्या नातेवाईकांनी शोधाशोध केली, परंतु रात्रीपर्यंत त्याचा पत्ता लागला नाही.

     

    तो मित्रांसोबत नेहमी जात असलेल्या ठिकाणी नातेवाईक शोध घेत असताना रामपुर लगत असलेल्या जंगलात माथरा रोड जवळ झुडपी जंगलात छिन्नविछिन्न अवस्थेत मृतदेह आढळून आला. लगेच सदर घटनेची माहिती राजुरा पोलिस ठाण्यात देण्यात आली. ठाणेदार योगेश पारधी सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह ताब्यात घेऊन पंचनामा करण्यात आला. यावेळी अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक रीना जनबंधू, उपविभागीय पोलिस अधिकारी दिनेश साखरे यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेची माहिती जाणून घेतली.

     

    राजुरा शहरालगत असलेल्या रामपुर वस्तीत काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. यापूर्वी राजुरा शहरातील नाका नंबर तीन येथे झालेल्या खुनात रामपुर येथीलच आरोपी निघाले होते. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात डिझेल, कोळसा व भंगार चोरीचे प्रकरण समोर येत आहेत. तसेच या ठिकाणी जुगार व सट्टा चालतो. या परिसरातील युवक अवैद्य व्यवसायात गुंतले आहेत. याच प्रकरणातून ही घटना घडल्याचे सांगितल्या जात आहे. मृतक संदीप निमकर यांच्या घराशेजारी असलेल्या साई मंदिर समोर मोठ्या प्रमाणत अवैद्य धंदे सुरू आहेत. जुगार, सट्टा चालतो. माथरारोडवरील बसस्थानकात मोठ्या प्रमाणात कोळसा, डिझेल चोरीसह जुगार खेळल्या जात आहे.

     

    राजुरा शहर हे गुन्हेगारांचे माहेरघर म्हणून अस्तित्वात येत आहे, गोळीबार प्रकरण असो की गांजा तस्करी, कमी वयाची मुले आता बंदूक खेळण्यासारखे जवळ ठेवतात, विशेष म्हणजे राजुऱ्यात कोळसा तस्करांचे मोठे नेटवर्क आहे, दिवसाढवळ्या या ठिकाणी कोळशाची तस्करी केल्या जाते, पण कायद्याचे रक्षक सुद्धा यावर कारवाई करणे टाळतात.

     

  • चंद्रपूर जिल्ह्यातील या ग्रामपंचायतीने घेतला दारूबंदीचा ठराव

    News34 chandrapur

    (प्रशांत गेडाम)
    सिंदेवाही – सिंदेवाही पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या उमरवाही येथे अवैध दारू तसेच अवैध धंदे सुरु आहे. यामुळे येथील नागरिकांसह महिला, मुले झाले आहे आले. दारामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त होत आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी ग्रामपंचायतने पुढाकार घेत ग्रामसभा बोलावली या सभेमध्ये विविध ठराव पारित करण्यात आले यामध्ये गावातील अवैध धंदे तसेच दारुबंदीचा ठराव पारित करण्यात आला.

     

    तसेच गावातील शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी व गावात तंटे होणार नाही याची काळजी घेण्याचे ग्रामसभेत ठरविण्यात आले.

    विशेष ग्रामसभेला सरपंच नीता बोरकर, पोलिस पाटील रागिनी मुंगमोडे, तंटामुक्त समिती अध्यक्ष परमानंद बोरकर, ग्रामपंचायत सचिव अतुल मेश्राम, ग्रामपंचायत सदस्य अशोक मसराम, राजीव मसराम, माजी सरपंच सदाशिव बोरकर, अंगणवाडी शिक्षिका, युवक महिला व नागरिक उपस्थित होते. तसेच विशेष उपस्थित म्हणून नवरगाव बिटचे बीट अंमलदार तसेच पोलिस उपस्थित होते.

  • भाग 2 चंद्रपुरातील या भागात सुरू आहे विना परवाना अवैध बार

    News34 chandrapur भाग 2

    चंद्रपूर – दुर्गापुरात चालतो अवैध सट्टा या पहिल्या सत्रानंतर आता आपण या बातमीत बघणार आहो की दुर्गापुरात कसे खुलेआम विना परवाना अवैध बार सुरू आहे.

     

    विशेष म्हणजे या बार मध्ये कमी किमतीत आपल्याला दारू प्यायला मिळते, महत्वाची बाब म्हणजे दुर्गापुरात 1 नाही तर 2 विना परवाना अवैध बार सुरू आहे. चंद्रपूर जिल्ह्यात 1 कोटी 11 लाखांचा प्रतिबंधित पान मसाला जप्त

     

    मागील अनेक वर्षांपासून हा अवैध दारूचा गोरखधंदा नित्याने सुरू आहे, चंद्रपूर जिल्हा हा औद्योगिक जिल्हा म्हणून ओळखल्या जातो, कामगार वर्गाची संख्या याठिकाणी असंख्य आहे.

     

    त्याचा फायदा घेत काही 2 नंबरी चालकांनी थेट दुर्गापूर पोलीस ठाण्याच्या अवघ्या 500 मीटर अंतरावर हे विना परवाना अवैध बार सुरू आहे, पोलिसांना हे माहिती नसेल असे मुळीच नाही.

     

    या विना परवाना बार मध्ये आपल्याला हॉटेल सारखी व्यवस्था केली जाते, विशेष करून चकना सुद्धा मोफत मिळतो.

     

    पण हे सगळं अवैध व छुप्या पद्धतिने सुरू आहे, विना परवाना अवैध बार धारक काही अंतरावर दारूच्या बॉटल्स लपवून ठेवतात, उर्जानगर येथील कोयना गेट च्या बाजूला तर शक्तीनगर गेट च्या आधी हे दारूचे दुकान थाटण्यात आले आहे.

     

    दुर्गापुरात अनेक ठिकाणी असंख्य घरी दारू मिळते, याबाबत दुर्गापूर पोलीस व उत्पादन शुल्क विभागाला पुरेपूर माहिती असून सुद्धा यावर कारवाई करण्यास हे दोन्ही विभाग टाळाटाळ करतात.

     

    या अवैध बार मुळे शासनाचा महसूल तर बुडतंच आहे सोबत परवाना धारक बार धारकांकडे आता या कमी किमतीच्या दारूमुळे आता व्यसनाधीन नागरिकांनी पाठ फिरविणे सुरू केले आहे.

     

    नकली दारूमुळे असंख्य नागरिकांचा जीव जातो मात्र तश्या घटनेचा उद्रेक जेव्हा होणार त्यावेळी उत्पादन शुल्क विभाग व दुर्गापूर पोलीस नक्की जागे होतील हे निश्चित….क्रमशः… पुढील भागात नक्की भेटूया…नव्या माहितीसह

  • चंद्रपुरातील दुर्गापुरात सुरू असलेला हा सट्टा बाजार कुणाचा?

    News34 chandrapur

    चंद्रपूर – दुर्गापूर हा भाग वन व सांस्कृतिक कार्यमंत्री, पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या विधानसभा क्षेत्रातील मतदार संघ, मात्र या मतदार संघात अवैध धंद्याचा सध्या बोलबाला सुरू आहे.

    जुगार असो की सट्टा हे कार्य या भागात खुलेआम सुरू आहे, मात्र पोलीस यावर कारवाई करणे टाळत आहे, पण का? हे उत्तर तर खुद्द पोलीस विभाग देऊ शकतो.

     

    2 वर्षांपूर्वी दुर्गापूर भागात जाकीर नावाच्या इसमाने सट्टा व जुगार खुलेआम सुरू केला होता, ते सुद्धा पोलीस स्टेशनच्या अवघ्या 200 मीटर अंतरावर, पण त्यावेळी News34 ने जाकीर च्या अवैध धंद्याचा पर्दाफाश केला.

     

    तत्कालीन पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांनी तात्काळ जाकीर व कैलास चा जुगार व सट्टा बंद पाडला, मात्र 2 वर्षे गेल्यावर आज जाकीर पुन्हा या धंद्यात सज्ज झाला.

    त्याने त्याच ठिकाणी सट्टा बाजार सुरू केला आहे, ते सुद्धा दुर्गापूर पोलीस स्टेशनच्या 200 मीटर अंतरावर, ही बाब पोलिसांना माहीत नसेल काय?

    जाकीर हा सट्टा धंद्यातील मास्टर आहे, त्याने यापूर्वी असे अनेक उद्योग केले आहे, त्याने पुन्हा सुरू केलेला हा सट्टा कुणाच्या संमतीने सुरू आहे.

    ही बाब काही दिवसात समोर येईलच, News34 ने याआधी दुर्गापुरातील सट्टा व्यवसायी महाराज च्या धंद्याचं बिंग फोडलं होते.

    सध्या दुर्गापूर पोलीस स्टेशनमध्ये नवे पोलीस निरीक्षक जीत्तावार रुजू झाले आहे, त्यांनी नागपुरातील स्थानिक गुन्हे शाखेत कामगिरी बजावली आहे, पण त्यांच्या हद्दीत सुरू असलेल्या या अवैध धंद्याचं काय?

    मागील अनेक दिवसांपासून सुरू असलेला हा सट्टा बाजार पोलिसांच्या नजरेस पडला नाही काय? कुणाच्या संमतीने हे अवैध धंदे दुर्गापुरात सुरू आहे.

    पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या विधानसभा क्षेत्रात सुरू असलेल्या या अवैध धंद्याना जबाबदार कोण आहे? हा थेट प्रश्न पालकमंत्री मुनगंटीवार यांना लवकरचं विचारण्यात येईल.

    या बातमीमध्ये दुर्गापुरातील जाकीर च्या सट्टा बाजाराची कहाणी आहे, दुसऱ्या भागात दुर्गापूर पोलीस स्टेशन हद्दीत पुन्हा अवैध धंद्याची पोलखोल आम्ही करणार आहोत, ते बघून तुम्ही सुद्धा कपाळावर हात ठेवणार…पुढील दिवसात दुसरा भाग…क्रमशः