Tag: अवयवदान

  • how to register for organ donation । चंद्रपूर जिल्हाधिकारी व सीईओंनी घेतला अवयवदानाचा निर्णय

    how to register for organ donation

    how to register for organ donation : चंद्रपूर, दि. 11 : शासनाच्या सुचनेनुसार संपूर्ण राज्यात 3 ते 13 ऑगस्ट 2025 या कालावधीत अवयवदान जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. अवयवदान ही आजच्या काळातील सर्वात मोठी मानवसेवा असून ती अनेकांना जीवनदान देऊ शकते. याच संकल्पनेनुसार जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने आयोजित बैठकीत प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह यांनी ऑनलाईन नोंदणी करून अवयवदानाचा निर्णय घेतला आहे.

    नव उद्योजकांनी कृत्रिम वाळू धोरणाचा लाभ घ्यावा – जिल्हाधिकारी व्यवहारे

    जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित या बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार, मा.सां. कन्नमवार शास. वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. हेमचंद कन्नाके आदी उपस्थित होते. 

    यावेळी बोलतांना प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. व्यवहारे म्हणाले, अवयवदानाबाबत जास्तीत जास्त लोकांना माहिती द्यावी. या मोहिमेदरम्यान अवयवदानाविषयी गैरसमज दूर करण्यात येणार आहे. आपण असतांना आणि नसतांनाही समाजाच्या उपयोगी पडू शकतो. ज्यांना अवयवदान करण्याची इच्छा आहे, त्यांनी आरोग्य विभागाची संपर्क करावा. तसेच आपले नातेवाईक व आजुबाजूच्या लोकांना अवयवदानाविषयी प्रवृत्त करावे, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी उपस्थितांना अवयवदानाची शपथ देण्यात आली. organ donation awareness campaign

     जिल्हाभरात या मोहिमेदरम्यान आतापर्यंत 2114 अवयवदानाची ऑनलाईन प्रतिज्ञा घेतली आहे. यात जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातर्फे 1659 तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातर्फे 455 जणांचा समावेश आहे.

    अवयवदानाची पात्रता :

     सर्व वयोगटातील निरोगी व्यक्ती अवयवदान करू शकतात. ब्रेन स्टेम, तीव्र हृदयविकाराचा झटका तसेच अकस्मिक कारणाने झालेला मृत्यु , इत्यादी कारणाने मृत्यु झालेल्या व्यक्तीचे अवयवदान करता येते. ज्या व्यक्तिंचा मृत्यु हा रेबीज, एचआयव्ही, हिपॅटॉयटीस, बुडून मृत्यु होणे, कर्करोग व सेप्टीक व्यक्तींचे अवयवदान करता येत नाही. district organ donation drive

    अवयवदान करण्याची इच्छा असल्यास

     : एखाद्या व्यक्तीस मृत्युनंतर आपल्या अवयवांचे दान करण्याची इच्छा असल्यास त्यांनी कायद्यानुसार संमतीपत्र भरणे आवश्यक आहे. तसेच संमतीपत्रावर एखाद्या जवळच्या नातेवाईकाची सही सुध्दा आवश्यक आहे. हा फॉर्म भरल्यानंतर त्या व्यक्तीस डोनर कार्ड दिले जाईल. जरी डोनर कॉर्डवर सही असली तरी मृत्युनंतर आपल्या जवळच्या नातेवाईकाच्या संमतीशिवाय अवयव दान होऊ शकत नाही. त्यामुळे आपल्या इच्छेविषयी नातेवाईकांना माहिती असणे आवश्यक आहे.

    येथे भरा अवयवदानाचे संमतीपत्र : 

    शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार  https://notto.abdm.gov.in या संकेतस्थळावर अवयवदानाची संमती देऊन आपण प्रमाणपत्र प्राप्त करून घेऊ शकतो.

    1. अवयवदानासाठी नोंदणी कशी करावी?

    अवयवदानासाठी तुम्ही राष्ट्रीय अवयव प्रत्यारोपण संस्थेच्या (NOTTO) अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन फॉर्म भरू शकता किंवा नजीकच्या रुग्णालयातील अवयवदान नोंदणी केंद्रात प्रत्यक्ष अर्ज करू शकता.

    2. अवयवदानासाठी कोण पात्र असतात?

    १८ वर्षांवरील कोणतीही मानसिकदृष्ट्या सक्षम व्यक्ती अवयवदानासाठी नोंदणी करू शकते.

    3. अवयवदान करताना कोणते कागदपत्र आवश्यक असतात?

    ओळखपत्र (जसे की आधारकार्ड, पॅनकार्ड किंवा पासपोर्ट) आणि नोंदणी फॉर्म आवश्यक असतो.

    4. अवयवदानाची नोंदणी केल्यानंतर ती रद्द करता येते का?

    होय, तुम्ही कधीही नोंदणी रद्द करण्यासाठी लेखी अर्ज करू शकता.

    5. अवयवदानाबाबत माहिती मिळवण्यासाठी कोणाशी संपर्क करावा?

    NOTTO हेल्पलाइन, राज्य अवयव प्रत्यारोपण संस्था (SOTTO) किंवा नजीकच्या अधिकृत रुग्णालयाशी संपर्क साधू शकता.
  • angdaan jeevan sanjeevani abhiyan । शहरातील नागरीकांनी अवयवदानासाठी पुढाकार घ्यावा – चंद्रपूर मनपा

    angdaan jeevan sanjeevani abhiyan

    angdaan jeevan sanjeevani abhiyan : चंद्रपुर 5 ऑगस्ट – चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे “अंगदान – जीवन संजीवनी अभियान पंधरवडा” दिनांक 3 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट 2025 दरम्यान राबविला जात आहे.. या अभियानाचा उद्देश नागरिकांमध्ये अंगदानाविषयी जागृती निर्माण करणे, गैरसमज दूर करणे आणि अधिकाधिक लोकांना अंगदानासाठी प्रोत्साहित करणे हा आहे. organ donation awareness campaign Chandrapur

    वरोरा नाका चौकाचे होणार नामांतर

      समाजाभिमुख उपक्रम राबवण्याच्या दृष्टीने मनपा आरोग्य विभागामार्फत अवयवदानबाबत मार्गदर्शन कार्यक्रम राबविण्यात येत आहे 5 ऑगस्ट रोजी मनपा सभागृहात यासंबंधी मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला. डॉ. नयना उत्तरवार यांनी या संदर्भात सविस्तर माहिती उपस्थितांना दिली. याप्रसंगी सर्व उपस्थितांनी अवयवदानाची शपथ घेतली.अवयवदान हे “मरणोत्तर दान” म्हणून याला सर्वोच्च मानले जाते. एका व्यक्तीच्या अंगदानामुळे 8 लोकांचे प्राण वाचू शकतात,अंगदान सुरक्षित, वैद्यकीय दृष्ट्या नियंत्रित आणि कायदेशीर प्रक्रिया आहे.अंगदानामुळे दात्याच्या शरीराचा अपमान होत नाही; सन्मानपूर्वक सर्व प्रक्रिया पार पाडली जाते. अंगदानाच्या  एका निर्णयामुळे अनेक कुटुंबांना आशा, आनंद आणि नवे भविष्य मिळू शकते. organ donation drive Chandrapur municipal corporation  


       डोळे, हृदय, मूत्रपिंड, यकृत, फुफ्फुसे, स्वादुपिंड इ. अवयवांचे प्रत्यारोपण करून रुग्णांना नवे जीवन मिळते. काही अवयव (जसे की किडनी) प्रत्यारोपणामुळे रुग्णाला वर्षानुवर्षे चालणाऱ्या डायलिसिसपासून मुक्ती मिळते. कॉर्निया प्रत्यारोपणामुळे अंध व्यक्तीला पुन्हा दृष्टी मिळू शकते. एका अर्थाने मृत्यूनंतरही आपण समाजासाठी कार्य करू शकतो.


        सदर कार्यक्रमाच्या मार्गदर्शन व जनजागृती प्रसंगी उपायुक्त मंगेश खवले, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नयना उत्तरवार,नगरसचिव नरेंद्र बोबाटे,सहायक आयुक्त संतोष गर्गेलवार,डॉ. अमोल शेळके,उपअभियंता रवींद्र कळंबे,उपअभियंता प्रगती भुरे,सोनू थुल,अमित फुलझेले,सागर सिडाम,डॉ. नरेंद्र जनबंधू तसेच अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    अवयवदानासाठी कुठे संपर्क साधावा –

     अवयवदान संकल्प अणि ऑनलाईन प्रतिज्ञा संदर्भात अधिक माहीतीसाठी नॅशनल ऑर्गन अँड टिश्यू ट्रान्सप्लांट ऑर्गनायझेशन (NOTTO) च्या www.notto.abdm.gov.in या संकेतस्थळावरील वेब पोर्टलच्या माध्यमातुन ऑनलाईन प्रतिज्ञेद्वारे नोंदणी करावी. अधिक माहीतीसाठी NOTTO च्या कॉल सेंटरशी टोल फ्री हेल्पलाईन क्रमांक 1800-11-4770 यावर किंवा चंद्रपूर महानगरपालिका आरोग्य विभाग येथे संपर्क साधावा.