Tag: अल्पवयीन मुलीवर अत्याचार

  • Bhadravati Rape Case । धक्कादायक! चंद्रपूरमध्ये १४ वर्षीय मुलीवर अत्याचार

    Bhadravati Rape Case

    Bhadravati Rape Case : चंद्रपूर : शहरातील एका बेघर वस्तीतील तरुणाने १४ वर्षीय अल्पवयीन मुलीला घरी बोलावून तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही संतापजनक घटना शुक्रवार, १३ जून रोजी दुपारी १ ते १:३० वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत जुना सुमठाणा येथील रहिवासी असलेल्या सलीम मुलखा सैय्यद (३०) या आरोपीला अटक केली आहे. त्याला आज न्यायालयात हजर केले असता, न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. Protect Children

    रात्री चोरी आणि सकाळी अटक, भद्रावती पोलिसांची जलद कारवाई

    मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवार, १३ जून रोजी दुपारी सुमारे १ ते १.३० वाजण्याच्या दरम्यान आरोपी सलीम सैय्यद पीडित मुलीच्या घरी गेला. त्याने मुलीला, “तुझ्या आईने तुला माझ्या घरी बोलावले आहे,” असे खोटे सांगितले आणि तिला आपल्या घरी घेऊन गेला. आरोपीने घरात प्रवेश करताच दरवाजा आतून बंद करून घेतला आणि अल्पवयीन मुलीवर जबरदस्तीने दुराचार केला.

    आरोपीला तात्काळ ठोकल्या बेड्या

    या धक्कादायक घटनेनंतर पीडित मुलीने तातडीने आपल्या पालकांना घडलेला प्रकार सांगितला. मुलीच्या आईने या प्रकरणी भद्रावती पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी वेगाने सूत्रे हलवत त्याच रात्री ९ वाजता आरोपी सलीम सैय्यदला बेड्या ठोकल्या. आरोपीला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. या प्रकरणाचा पुढील तपास वरोरा येथील उपविभागीय पोलीस अधिकारी (SDPO) नयोमी साटम करत आहेत.

  • POCSO conviction case । 📜 चंद्रपूर POCSO केस: आरोपीला 20 वर्षं आणि महिला साथीदाराला 5 वर्षांची शिक्षा!

    POCSO conviction case

    POCSO conviction case : चंद्रपूर/पडोली- १३ वर्षीय अल्पवयीन बालिकेवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला व त्या गुन्ह्यात मदत करणाऱ्या महिलेला चंद्रपूर जिल्हा न्यायालयाने सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

    घटना काय?

    चंद्रपुरातील पडोली पोलीस स्टेशनच्या हद्दीतील हि घटना जानेवारी २०२० मध्ये घडली होती. आरोपी ३५ वर्षीय इसमाने घरासमोर राहणाऱ्या १३ वर्षीय अल्पवयीन बालिकेला ३० वर्षीय महिला मित्राच्या मदतीने घरी बोलाविले. व तिच्यावर अत्याचार केला. Chandrapur POCSO case verdict

    पीडित बालिकेने याबाबत पडली पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली, गुन्ह्याची गंभीरता लक्षात घेत तत्कालीन तपासी अधिकारी मेघा गोखरे यांनी आरोपीवर पॉक्सो व कलम ३७६ (२) व ३७६ (३) व गुन्ह्यात मदत करणाऱ्या महिलेवर कलम ३५४ (अ) (१) अंतर्गत गुन्हा दाखल केला होता.

    ४ महिन्याच्या बाळाला आहे मदतीची गरज, दानशूर व्यक्तींनी पुढं यावं

    ५ वर्षे न्यायालयात चाललेल्या या गंभीर गुन्ह्याचा निकाल २१ मे २०२५ रोजी सुनावण्यात आला, गुन्ह्यातील आरोपी ३५ वर्षीय इसमाला २० वर्षे सश्रम कारावास व द्रव्य दंडाची शिक्षा सुनावण्यात आली व त्याला गुन्ह्यात सहकार्य करणाऱ्या महिलेला न्यायालयाने ५ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.

    महिला व बाल अत्याचाराच्या गंभीर गुन्ह्यात तपासी अधिकारी मेघा गोखरे यांनी आरोपी विरुद्ध भक्कम पुराव्यानिशी दाखल केलेले दोषारोपत्र या गुन्ह्याचा आरोपीना शिक्षा करण्यासंदर्भात मोठा टर्निंग पॉईंट ठरला.

    सदर गुन्ह्याचा निकाल अतिरिक्त सत्र न्यायाधीश पीजी भोसले यांनी सुनावला तर शासनाची भक्कम बाजू सरकारी अभियोक्ता आसिफ शेख यांनी मांडली, तर पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रीना जनबंधू यांच्या मार्गदर्शनात पैरवी अधिकारी म्हणून पोलीस कर्मचारी मधुराज रामानुजवार व दत्तक अधिकारी म्हणून सहायक पोलीस निरीक्षक पडोली पोलीस स्टेशन योगेश हिवसे यांनी मोलाची कामगिरी बजावली. ज्यामुळे आरोपीना त्यांच्या कृत्याची शिक्षा मिळाली.

  • Shocking Incident : खर्ऱ्याच्या उधारीसाठी पान ठेला चालकाने अल्पवयीन मुलीचे केले लैंगिक शोषण

    Shocking Incident : खर्ऱ्याच्या उधारीसाठी पान ठेला चालकाने अल्पवयीन मुलीचे केले लैंगिक शोषण

    Shocking Incident चंद्रपूर : राज्यात सुरू असलेल्या महिला व मुलींवर अत्याचाराच्या घटनेत मोठ्या प्रमाणात वाढ होत असताना चंद्रपुरात पुन्हा धक्कादायक घटनेमुळे जिल्हा हादरून गेला, 52 वर्षीय पान ठेला चालकाने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची बाब उघडकीस आली.

    पोलिसांनी आरोपी पान ठेला चालकाला अटक केली आहे, एकाच आठवड्यात या दोन घटनांनी विकृत मानसिकतेचे उदाहरण पुढे आले आहे.

    अवश्य वाचा : चंद्रपूर जिल्ह्यातून वयोश्री योजनेसाठी 10 हजार 766 अर्ज दाखल

    Shocking incident पानठेल्यावर खर्ऱ्याची उधारी चुकविण्यासाठी चक्क १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण करून तिला गर्भवती केल्याचा धक्कादायक प्रकार दुर्गापूर येथे उघडकीस आला आहे. याप्रकरणी दुर्गापूर पोलिसांनी आरोपीवर बबन रोहणकर (५२) याच्यावर कलम ३७६, पोक्सो, ॲट्रॉसिटी अन्वये गुन्हा दाखल करून अटक केली आहे.

    Shocking incident बबन रोहणकर याचा पानठेला आहे. त्याच्या पानठेल्यावर एक १६ वर्षीय मुलगी खर्रा खरेदी करण्यासाठी येत होती. तिची खर्ऱ्याची उधारी तीन हजारांवर पोहोचली होती. बबनने त्या मुलीला खर्ऱ्याची उधारी मागितली. उधारी दिली नाही तर तुझ्या वडिलांना सांगेल अशी धमकीही दिली. मात्र त्या मुलीकडे खर्ऱ्याची उधारी चुकविण्यासाठी तीन हजार रुपये नव्हते. ही संधी साधून बबनने तिला शारीरिक संबंध ठेवण्याची मागणी करून मागील तीन ते चार महिन्यांपासून तिचे लैंगिक शोषण केले. ती गर्भवती झाल्याने हा प्रकार उघडकीस आला. याबाबत दुर्गापूर पोलिस ठाण्यात शनिवारी मध्यरात्री गुन्हा दाखल करून ठाणेदार लता वाडीवे यांनी आरोपी बबन रोहनकरला अटक केली. पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी सुधाकर यादव करत आहेत.

    असा उघडकीस आला प्रकार
    पीडित मुलीच्या हालचालीवरून तिच्या आईला संशय आला. तिची तपासणी करण्यासाठी तिला वरोरा येथील रुग्णालयात नेले. यावेळी ती तीन महिन्यांची गर्भवती असल्याचे समोर आले. ही बाब वरोरा पोलिसांना रुग्णालयातर्फे कळविण्यात आली. मात्र घटना ही दुर्गापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील असल्याने त्यांनी दुर्गापूर पोलिस ठाण्यात याबाबत माहिती दिली. दुर्गापूर पोलिस स्टेशनच्या पोलिस निरीक्षक लता वाडीवे यांनी लगेच आरोपीला अटक केली.

    विकृत मानसिकता

    चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड शहरात 6 जणांनी मिळून मनोरुग्ण महिलेवर अत्याचार करीत त्या घटनेचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल केला, व्हिडीओ व्हायरल होताच नागरिकांनी संताप व्यक्त केला, पोलिसांनी सदर घटनेत तत्परता दाखवीत आरोपीना अटक केली, या घटनेला 2 दिवस उलटत नाही तर पुन्हा दुर्गापूर येथे घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे. दोन्ही घटनेमध्ये आरोपी यांची विकृत मानसिकता असल्याचे निदर्शनास येते. चंद्रपूर जिल्ह्यातील महिला व मुली सुरक्षित रहावे यासाठी सामाजिक संघटना जागृती मशाल मंचतर्फे मध्यरात्री रॅली चे आयोजन केले आहे.

  • अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणातील आरोपीला कठोर शिक्षा द्या

    News34 chandrapur

    चंद्रपूर – अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचार प्रकरणी चंद्रपूर युवासेना आक्रमक झाली आहे, जिल्ह्यात अश्या घटना वारंवार घडत आहे, विशेष म्हणजे ओळखी मधील असलेले या घटनेत कित्येकदा आरोपी असतात.

     

    जानकापूर नागभीड येथे एका सहा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाला ही घटना 10 सप्टेंबर रोजी रविवारी घडलेली घटना आहे.

     

    घरी कोणी नसताना बघून त्यांच्याच ओळखीच्या 52 वर्षीय सुधाकर महादेव निमगडे या इसमाने वेळेची संधी साधून सहा वर्षाच्या मुलीवर अत्याचार केला. मुलीच्या घरच्यांनी आरोपी विरोधात सावरगाव नागभीड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला आहे.

     

    युवासेना राज्य सहसचिव व युवासेना युवती जिल्हाधिकारी चंद्रपूर रोहिणी विक्रांत पाटील यांनी आज युवासेना युवतीकडून चिमुकल्या मुलीवर झालेल्या अत्याचारा विरोधात आरोपीला कठोर कारवाई करून शिक्षा व्हावी या संदर्भात डेप्युटी एस पी मॅडम यांना निवेदन देऊन मागणी करण्यात आली.

    यावेळी उपजिल्हा युवती अधिकारी धनश्री हेडाऊ, विपश्यना मेश्राम, उपजिल्हा समन्वयक संतुष्टी बुटले ,युवती विभाग अधिकारी काजल मडावी उपस्थित होते.