village protest for road : राजुरा तालुका (ता. २३ जून) : पालगाव ग्रामस्थ मागील अडीच ते तीन वर्षांपासून अल्ट्राटेक सिमेंट कंपनीकडे रस्त्याच्या मागणीसाठी पाठपुरावा करीत आहेत. चिखल आणि खड्ड्यांतून जीव मुठीत धरून प्रवास करणाऱ्या ग्रामस्थांनी अनेक वेळा निवेदने देऊन तसेच कंपनी प्रशासनाशी चर्चा करूनही रस्ता प्रश्न सुटला नाही. याच पार्श्वभूमीवर ५ मे रोजी ग्रामस्थ आक्रमक होत कंपनीच्या मुख्य कार्यालयात आंदोलन केले होते.
कंपनी प्रशासनाने पाठ फिरविल्याने ग्रामस्थांनी कार्यालयाचा प्रवेशद्वार बंद करून ठिय्या आंदोलन केले होते. या आंदोलनास राजुरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार देवरावदादा भोंगळे यांनी सक्रिय पाठिंबा दिला होता. स्वतः दोन दिवस आंदोलनस्थळी उपस्थित राहून त्यांनी पुढाकार घेतला होता. त्या आंदोलनानंतर कंपनी प्रशासनाने लेखी आश्वासन दिले होते की ३० मेपर्यंत अल्ट्राटेक ते पालगाव रस्त्याचे काम सुरू केले जाईल. villagers protest for road construction
सिमेंट कंपनी विरोधात गावकऱ्यांमध्ये संताप
मात्र ३० मे तारीख उलटून गेली तरी प्रत्यक्षात कोणतेही काम सुरू झाले नाही. कंपनीकडून केवळ टोलवाटोलवीची उत्तरे मिळू लागली. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला असून आजपासून आमदार देवरावदादा भोंगळे यांच्या नेतृत्वात नांदा फाटा येथील कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर रस्ता कामासाठी पुन्हा ठिय्या आंदोलनास सुरुवात झाली आहे. rural road development issues
पालगाव हे गाव अल्ट्राटेक कंपनीने दत्तक घेतलेले असून कंपनीची खाणसुद्धा गावालगतच आहे. अशा परिस्थितीतही रस्त्यासारख्या मूलभूत सुविधेसाठी गावकऱ्यांना आंदोलन करावे लागणे हे दुर्दैव म्हणावे लागेल.
कोरपना – 23-24 नोव्हेंबर 2023 रोजी अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड , युनिट – माणिकगढ सिमेंट वर्क्स तर्फे नंदाप्पा आणि मरकागोंडी ग्रामपंचायत मधील नंदाप्पा, मरकागोंडी, माताडी आणि गोंडगुडा गावात मोफत वैद्यकीय शिबिराचे आयोजन करण्यात आले होते ज्यामध्ये 270 पुरुष, महिला आणि लहान मुलांची तपासणी करीत त्यांना पुढील उपचारासाठी मार्गदर्शन करण्यात आले होते.
विविध आरोग्य विकार तपासले गेले. कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी माणिकगड तर्फे या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. माणिकगड युनिट हॉस्पिटलच्या प्रभारी डॉ.सौ.रुपाली यादव व त्यांच्या संघाने शिबीर यशस्वी केले. यासोबतच चंद्रपूर येथील टाटा कॅन्सर रिसर्च इन्स्टिट्यूटमधील डॉ. सूरज, डॉ. ट्विंकल आणि त्यांच्या संपूर्ण संघाने कर्करोग, रक्तदाब आदी आजारांवर निदान केले.
रोगांचे निदान करून ग्रामस्थांना सल्ला देण्यात आला. शिबिरादरम्यान सर्व ग्रामस्थांची विविध प्रकारे चाचणी करण्यात आली तसेच गरोदर महिलांचीही तपासणी करून त्यांना योग्य ते समुपदेशनही करण्यात आले. विविध सहाय्यक कर्मचारी आणि माणिकगढच्या डॉक्टरांच्या पथकाद्वारे तपासणी केल्यानंतर औषधांचे मोफत वाटप करण्यात आले आणि पुढील उपचार आवश्यक असलेल्या आजारांसाठी रुग्णांना योग्य सल्लाही देण्यात आला.
या मोफत वैद्यकीय शिबिरात ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. डॉ.रुपाली यादव यांनीही महिलांमध्ये निरोगी शरीर आणि पौष्टिक आहाराचे महत्त्व याविषयी ग्रामस्थांचे ज्ञान वाढवले. या कार्यक्रमात पंचायतीचे नागरिक, आघाडीच्या कार्यकरत्यांनी सहभाग घेतला तरया शिबिराला यशस्वी करण्याकरिता माणिकगड सी. एस.आर. च्या संघाने अथक प्रयास केलेत.
चंद्रपूर : कोरपना तालुक्यातील अल्ट्राटेक सिमेंट कंपनी विरोधात दत्तक गाव सरपंच संघटनेच्या वतीने 13 नोव्हेंबर ते 18 नोव्हेंबर पर्यंत साखळी पोषण व तीन दिवस अखिल भारतीय सरपंच परिषदेचे जिल्हा सचिव रत्नाकर चटप, ग्रा.पं.आवाळपूरचे उपसरपंच बाळकृष्ण काकडे यांनी आमरन उपोषण केले. विविध राजकीय पक्ष, संघटना, सामाजिक संस्थांचा पाठिंबा व स्थानिक नागरिकांचा रोष बघता अखेर 18 नोव्हेंबरला रात्री 10 वाजता अल्ट्राटेक सिमेंट कंपनीकडून मिळालेल्या लेखी आश्वासनानंतर उपोषण सुटले. या आंदोलनाची दखल जिल्ह्याचे पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांनी घेतली आहे. मागण्यांची पूर्तता करण्याचे निर्देश त्यांनी अल्ट्राटेक प्रशासनाला दिले आहे.
जिल्हाधिकारी डॉ.विनय गौडा, मुख्य कार्यपालन अधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराव भोंगडे, कोरपना तहसीलदार व्हटकर, अल्ट्राटेकचे सीएसआर प्रमुख प्रतीक वानखेडे, किरण करमणकर, सरपंच संघटनेचे विदर्भ सरचिटणीस नंदकिशोर वाढई व दत्तक गावातील प्रतिनिधींच्या उपस्थितीत चंद्रपूर येथे नियोजन भवनात नुकतीच बैठक पार पडली. यावेळी दत्तक गाव सरपंच संघटनेच्या वतीने जिल्हा सचिव रत्नाकर चटप यांनी सरपंच संघटनेच्या मागण्यांविषयी चर्चा केली.
अल्ट्राटेक कंपनीने गावासाठी मोठ्या प्रमाणात सीएसआर निधी खर्च करावा, गावातील पांदण रस्त्यासाठी कंपनीच्या डोलामाईट मधून पांदन रस्त्याचे बांधकाम करावे, स्थानिकांना रोजगार उपलब्ध करुन द्यावा या प्रमुख मागण्या केल्या. पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांनी सदर मागण्या रास्त असून त्या पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी, मुख्य कार्यपालन अधिकारी, संवर्ग विकास अधिकारी, तहसीलदार व अल्ट्राटेक प्रशासनाला दिले. परिसरातील व दत्तक गावातील आयटीआय, पॉलिटेक्निक, बीई झालेल्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण व रोजगार, दत्तक गावांमध्ये सुसज्ज क्रिडांगणाचे बांधकाम व प्रदूषण नियंत्रक सयंत्र तात्काळ बसवण्यासह सीएसआर निधी खर्च करत असताना ग्रामपंचायत प्रशासनाला विश्वासात घेवून नियोजन करावे असे कंपणी प्रशासनाला निर्देश दिले.
नियोजन बैठकीला अ.भा.सरपंच संघटनेचे जिल्हा सचिव रत्नाकर चटप, नांदा गावचे उपसरपंच पुरुषोत्तम आस्वले, आवाळपूरचे सरपंच प्रियंका दिवे, उपसरपंच बाळकृष्ण काकडे, हिरापूरचे सरपंच सुनीता तुमराम, उपसरपंच अरुण काळे, सांगोळाचे माजी सरपंच सचिन बोंडे, भोयेगावचे सरपंच शालिनी बोंडे, बाखर्डीचे सरपंच अरुण रागीट, नोकरीचे सरपंच संगीता मडावी, पत्रकार रवी बंडीवार प्रामुख्याने उपस्थित होते.
कंत्राटी कामगारांचे मांडले प्रश्न..
दत्तक गाव सरपंच संघटनेच्या वतीने यावेळी अल्ट्राटेक सिमेंट कंपनीत काम करणाऱ्या कंत्राटी कामगाराच्या वेतना बाबतचा प्रश्न सरपंच संघटनेने मांडला. 120 रुपये दर दिवसाच्या रोजीत वाढ करावी ही प्रमुख मागणी करण्यात आली. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांनी कामगार कल्याण आयुक्त यांच्या सोबत बैठक बोलावून सदर मुद्द्यांवरती चर्चा केली जाईल, असे शिष्टमंडळाला सांगितले.
कोरपना (चंद्रपूर) : – कोरपना तालुक्यातील अल्ट्राटेक सिमेंट कंपनी आवाळपूर अंतर्गत असलेल्या दत्तक गावातील दहा ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंच व सदस्य यांनी कंपनी विरोधात 13 नोव्हेंबरपासून धरणे आंदोलन व बेमुदत साखळी उपोषण केले. अल्ट्राटेक सिमेंट प्रशासनाने कोणतीही दखल न घेतल्याने अखिल भारतीय सरपंच संघटनेचे जिल्हा सचिव तथा ग्रामपंचायत नांदाचे सदस्य रत्नाकर चटप व आवाळपूर ग्राम पंचायतीचे उपसरपंच बाळकृष्ण काकडे यांनी १६ नोव्हेंबरपासून आमरण उपोषण सुरू केले. तब्बल तीन दिवसानंतर आंदोलनाची धार तीव्र झाली असताना गावातील व्यापारीमंडळ विविध पक्ष, सामाजिक संघटना व गावकऱ्यांच्या पाठिंब्यामुळे अल्ट्राटेक कंपणी प्रशासन नरमले. कंपनी प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेत सरपंच संघटनेच्या शिष्टमंडळाशी चर्चा केली.
शिष्टमंडळात नांदा गावचे उपसरपंच पुरुषोत्तम आस्वले, बाखर्डीचे सरपंच अरुण रागीट, पत्रकार प्रमोद वाघाडे, हिरापूरचे उपसरपंच अरुण काळे, सांगोडाचे माजी सरपंच सचिन बोंडे, चंदू राऊत उपस्थित होते. सरपंच संघटनेच्या मागण्यांची भूमिका स्पष्ट करुन कंपनी प्रशासनाने मागण्या मान्य करण्याचे लेखी पत्र दिले. काल (ता.१८) रात्री १० वाजता अल्ट्राटेक सिमेंट कंपनीचे उपव्यवस्थापक नारायणदत्त तिवारी व सतीश मिश्रा यांनी उपोषणकर्ते रत्नाकर चटप व बाळकृष्ण काकडे यांना लिंबू पाणी पाजून लेखी पत्र देत आमरण उपोषण सोडवले. नांदा, बिबी, आवाळपूर, हिरापूर, सांगोडा, भोयगाव, बाखर्डी, तळोधी, नोकारी, पालगाव या गावातील सरपंच, उपसरपंच, सदस्य यांनी आंदोलनाच्या यशस्वीतेसाठी अथक प्रयत्न केले.
या मागण्या केल्या मान्य
अल्ट्राटेक सिमेंट कंपणी अंतर्गत दत्तक गावात सामाजिक दायित्व निधी (सीएसआर) संबंधित गावातील सरपंच व लोकप्रतिनिधींना विश्वासात घेवून कामे केली जातील. दत्तक गावातील आयटीआय व तांत्रिक शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण रोजगारासाठी प्राधान्य दिले जाईल. पोलीस व सैन्य भरती तयारीसाठी कंपणीतील मैदान दत्तक गावातील मुलांना उपलब्ध करण्यात येईल. दरवर्षी गावातील मुख्य रस्त्यांवर होणारा कचरा स्वच्छतेसाठी मशीन उपलब्ध करण्यात येईल. दत्तक गावातील कुठल्याही दुर्घटनेत रुग्णवाहिका व अग्निशमन यंत्र कंपणीकडून उपलब्ध करण्यात येईल.
आंदोलनातील या कृतीने अल्ट्राटेक प्रशासन धास्तावले
आंदोलनात दहा गावातील सरपंच व लोकप्रतिनिधी एकत्र येत धरणे व उपोषण केले. विविध राजकिय व सामाजिक संघटनांनी पाठींबा दिला. प्रहारचे जिल्हाध्यक्ष सतीश बिडकर यांनी रक्तांनी पत्र लिहीले. संतप्त गावक-यांनी कंपणीविरोधात मुंडन केले. ‘मी माझ्या गावासाठी’ असे फलक गावक-यांनी लावले. सिमेंट कंपणींच्या अधिका-यांना दत्तक गावांनी गावबंदी केली. आंदोलनाची तिव्रता वाढल्याने अखेर ६ दिवसानंतर अल्ट्राटेक प्रशासन धास्तावले व आंदोलनस्थळी येत मागण्यांची पुर्तता केली.
अल्ट्राटेक सिमेंट कंपनी आवाळपूर विरोधात करण्यात आलेल्या आमरण उपोषणानंतर कंपनी प्रशासनांनी मागण्या मान्य केल्या. या मागण्यांची अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. त्यासोबतच गावकऱ्यांसह कामगार, गावातील तरुणांच्या रोजगाराबाबत दत्तक गाव सरपंच संघटना कंपनी प्रशासनाकडे आग्रही आहे. सदर मागण्यांकडे कंपनी प्रशासनांने दुर्लक्ष केले तर पुन्हा आंदोलन करण्यात येईल.
– रत्नाकर चटप जिल्हा सचिव, अ.भा.सरपंच परिषद तथा ग्रा.पं.सदस्य नांदा
चंद्रपूर – कोरपणा तालुक्यातील अल्ट्राटेक सिमेंट कंपनी आवरपुर अंतर्गत असलेल्या दत्तक गावातील दहा ग्रामपंचायतीच्या सरपंच उपसरपंच व सदस्य यांनी कंपनी विरोधात 13 नोव्हेंबर रोजी धरणे आंदोलन व बेमुदत साखळी उपोषणाला सुरुवात केली होती. मात्र अजून पर्यंत कंपनीकडून या आंदोलनाची कुठलीही दखल घेण्यात आली नाही त्यामुळे सरपंच संघटनेच्या वतीने 16 नोव्हेंबर पासून आमरण उपोषण पुकारण्यात आलेला आहे.
यावेळी रत्नाकर चटप (ग्रा.प सदस्य नांदा तथा अखिल भारतीय सरपंच संघटना जिल्हा सचिव) व बाळकृष्ण काकडे (उपसरपंच आवरपुर) हे दोघे आमरण उपोषण करीत असून उपोषणाचा आजचा दुसरा दिवस आहे.
कंपनीच्या सी एस आर निधी मधून ग्रामपंचायतींना पाहिजे त्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात येत नसल्याचा ठपका ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी ठेवला आहे. सोबतच ग्रामपंचायत प्रशासनाला विश्वासात न घेता निधी परस्पर खर्च केला जात आहे . कंत्राटी कामगारांचया बोनसमध्ये वाढ करावी.
स्थानिक बेरोजगारांना रोजगार द्यावा .कंपनीने माणिकगड येथे होणारी लाईम स्टोनची वाहतूक तात्काळ थांबवावी आय टी आय विद्यार्थ्यांना अप्रेंटिस करता जागा भरती करावी . गाव शिवारातील पांदन रस्त्याची दुरुस्ती कंपनीमार्फत करण्यात यावी . इतर राज्यातील शिक्षित युवकांना आणून कारखान्याच्या माध्यमातून प्रशिक्षित केल्या जाते दत्तक घेतलेल्या गावांमध्ये अनेक युवक सुशिक्षित आहे अशा प्रशिक्षण झालेल्या युवकांना ट्रेनिंग म्हणून घेण्यात यावे, वाढते प्रदूषण बंद करावे दिवसेंदिवस कारखान्याच्या माध्यमातून वाढत्या प्रदूषणामुळे आजूबाजूच्या दत्तक गावामध्ये राहणाऱ्या अनेक नागरिकांना कॅन्सर अपेंडिक्स हर्निया त्वचेचे रोग असे विविध आजार होत असताना दिसत असून अनेकांनी यामध्ये आपले जीव सुद्धा गमावलेले आहे.
कंपनीच्या प्रदूषणामुळे झाल्याचे तज्ञाचे म्हणणे आहे. यावरती कंपनीकडून कोणत्याही प्रकारच्या ठोस उपाययोजना केल्या जात नाही मात्र, परिसरातील नागरिकांच्या जीवाशी कंपनी खेड करीत आहे. ही समस्या त्वरित निकाली काढावी सी एस आर फंड च्या नावाखाली कंपनी इतर जिल्ह्यातील अनेक प्रतिष्ठानंना व अधिकारी लोकांना यातील फंडाचा हिस्सा वाटप करतानाचे चित्रसुद्धा दिसून येत आहे. ते त्वरित बंद करावे इत्यादी मागण्यासाठी सरपंच संघटना आक्रमक पवित्र घेत असून दत्तक गावातील नांदा, बीबी, आवरपूर, हिरापूर, सांगोडा, नोकारी,पालगाव तळोदी, बाखर्डी, भोयेगाव गावातील सरपंच उसरपंच सदस्य अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या माध्यमातून सदर आंदोलन करीत आहे. या आंदोलनाला दत्तक गावातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमरण उपोषण आंदोलनाला ओबीसी नेते राजेश बेले यांचा जाहीर पाठिंबा
चंद्रपूर : जिल्ह्यातील आवरपुर येथील अल्ट्राटेक सिमेंट कंपनीच्या दत्तक गावांमध्ये सीएसआर निधी खर्च न करण्याच्या कंपनीच्या धोरणाविरोधात 13 नोव्हेंबर 2023 रोजी एक दिवसीय धरणे आंदोलन व साखळी उपोषण करण्यात आले. या आंदोलनाला ओबीसी नेते राजेश बेले यांनी पाठिंबा दर्शविला.
सरपंच संघटनेच्या आंदोलन मंडपात ओबीसी नेते राजेश बेले, आंदोलनाला दिला पाठिंबा
आवारपुर कंपनीच्या दत्तक गावांमध्ये आवाळपूर, नांदा, बीबी हिरापूर सांगोडा, पालगाव, नोकारी, बाखर्डी, तडोधी, भोयेगाव या गावांचा समावेश आहे. या गावांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून कंपनी क्षेत्रात कार्यरत आहे. मात्र सन 2020 ते 2023 या सत्रामध्ये कंपनी प्रशासन सदर दत्तक गावांमध्ये सीएसआर निधी खर्च करण्यास जाणीवपूर्वक टाळाटाळ करीत आहे. यामुळे गावातील आरोग्य, पाणी आणि मूलभूत सुविधांचा प्रश्न निर्माण होत आहे. कंपनीच्या प्रदूषण तसेच ओव्हरलोड वाहतुकीमुळे रस्त्याची अवस्था बिकट झालेली असून अपघाताचे प्रमाणही वाढत चाललेले आहे. याबाबत दत्तक गावातील सरपंच, उपसरपंच सदस्य यांनी कंपनी प्रशासनाकडे विविध विकास कामांची मागणी केली.
मात्र कंपनी प्रशासनाने या मागण्या मान्य करण्यास नकार दिला. त्यामुळे संतप्त नागरिकांनी 13 नोव्हेंबर रोजी शिवाजी चौक नांदाफाटा येथे एक दिवसीय धरणे आंदोलन व साखळी उपोषण केले. या आंदोलनाला ओबीसी नेते राजेश बेले यांनी पाठिंबा दर्शविला. त्यांनी मागण्यात आलेली मंजूर करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे.
गडचांदूर – अल्ट्राटेक कम्युनिटी वेल्फेअर आवारपुर व कौशल्य विकास मंत्रालय यांच्या वतीने सिमेंट कंपनीच्या दत्तक गावातील महिलांना असिस्टंट ब्युटीशियन थेरपीस्ट बनण्याची संधी मिळाली आहे. Skill india program
या मोफत प्रशिक्षण कार्यक्रमाचा महिला लाभ घेत असून त्यांना आता स्वतःच्या पायावर उभे राहण्याची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल अल्ट्राटेक सिमेंट कंपनीचे त्यांनी आभार मानले आहे.