Tag: अम्मा चौक स्मारक

  • Controversial Amma Chowk monument removed । वादग्रस्त अम्मा चौक स्मारक हटविले, चंद्रपूर मनपाची कारवाई

    Controversial Amma Chowk monument removed

    Controversial Amma Chowk monument removed : चंद्रपूर : शहरातील ऐतिहासिक गांधी चौक परिसरातील वादग्रस्त अम्मा चौक स्मारक अखेर हटविण्यात आले आहे. भारतीय पुरातत्त्व विभागाकडे चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीने दाखल केलेल्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली.

    खड्ड्याविरोधात मनसेचे अनोखे आंदोलन

    पुरातत्व स्थळांच्या नियमांचे उल्लंघन

    गांधी चौक ते महानगर पालिकेच्या नेताजी भवनच्या मागील भागात महादेव मंदिर आहे. ते भारत सरकारद्वारे ११ एप्रिल १९२५ रोजी केंद्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आले आहे. प्राचीन स्मारके व पुरातत्त्व स्थळे अधिनियम १९५८ नुसार या परिसरातील १०० मीटरच्या आत कोणतेही नवीन बांधकाम किंवा अतिक्रमण करण्यास सक्त मनाई आहे. तरीदेखील चंद्रपूर महानगरपालिकेच्या माध्यमातून परवानगी न घेता पोलिस ठाणे आणि नेताजी भवनच्या मधोमध अम्मा चौक स्मारकाचे बांधकाम सुरू करण्यात आले होते.


    या प्रकरणी काँग्रेसचे शहराध्यक्ष रितेश (रामू) तिवारी यांनी पुरातत्त्व विभागाकडे लेखी निवेदन देत संबंधित अधिकाऱ्यांवर चौकशी व कारवाईची मागणी केली होती. त्यांच्या मागणीनंतर पुरातत्त्व विभागाने महानगरपालिका आयुक्तांना नोटीस बजावली होती. नोटीसमध्ये सात दिवसांच्या आत अतिक्रमण हटविण्याचे निर्देश दिले होते. तसे न झाल्यास पोलीस प्रशासनाच्या मदतीने कारवाई केली जाईल, असा इशाराही देण्यात आला होता. अखेर महानगरपालिका प्रशासनाने अतिक्रमण हटवून परिसर मुक्त केला. Amma Chowk controversy Chandrapur heritage violation

    या निर्णयाचे स्वागत करत काँग्रेस कमिटीने सांगितले की, गांधी चौक परिसराची ऐतिहासिक व सांस्कृतिक ओळख जपण्यासाठी ही कारवाई आवश्यक होती. नियम मोडून उभारलेले स्मारक हा कायद्याचा अवमान होता. भविष्यात असा प्रकार घडू नये, अशी मागणी काँग्रेसने पुन्हा एकदा केली आहे.

  • Amma Chowk memorial violation | अनधिकृत अम्मा चौक स्मारक बांधकामांवर कारवाईचे निर्देश

    Amma Chowk memorial violation

    Amma Chowk memorial violation : चंद्रपूर : चंद्रपूर येथील महादेव मंदिर (मुळशीगोदाम) हे भारत सरकारद्वारे 11 एप्रिल 1925 रोजीच्या अधिसूचनेनुसार केंद्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आले आहे. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) नुसार, या मंदिराच्या परिसरात महानगरपालिकेच्या माध्यमातून अम्मा चौक स्मारकासाठी अनधिकृत बांधकाम आणि अतिक्रमण झाल्याची तक्रार चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून करण्यात आली होती. या अनुषंगाने, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने यासंदर्भात महानगरपालिका आयुक्तांना नोटीस बजावली आहे.

    चंद्रपुरात 18 वर्षीय मुलाची मफेड्रोन पावडर ची वाहतूक

    नोटीसनुसार, प्राचीन स्मारके आणि पुरातत्व स्थळे व अवशेष अधिनियम 1958 नुसार (Act 24 of 1958) या संरक्षित स्मारकाच्या 100 मीटरच्या परिसरात अनधिकृत बांधकाम, उत्खनन किंवा इतर कोणत्याही स्वरूपाचे बांधकाम (निर्माण) किंवा नूतनीकरण करण्यास सक्त मनाई आहे. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीस दोन वर्षांपर्यंतचा कारावास आणि/किंवा 1,00,000/- (एक लाख) रुपयांपर्यंतचा दंड होऊ शकतो.

    7 दिवसाच्या आत अतिक्रमण हटवा


    या प्रकरणी, भारत सरकारने, पुरातत्व सर्वेक्षण विभागाचे अधिकारी, चंद्रपूर यांना, अनधिकृत बांधकाम किंवा अतिक्रमण करणाऱ्या व्यक्तींना, बांधकामाची प्रक्रिया थांबवून ७ दिवसांच्या आत अतिक्रमण हटवण्याचे निर्देश दिले आहेत. या निर्देशानुसार, जर ७ दिवसांच्या आत अतिक्रमण हटवले नाही, तर स्थानिक पोलीस प्रशासनाच्या मदतीने ते हटवण्यात येईल आणि संबंधित व्यक्तींवर कायदेशीर कारवाई केली जाईल. Amma Chowk controversy


    या नोटीसमध्ये असेही नमूद करण्यात आले आहे की, जर संरक्षित स्मारकाच्या परिसरात कोणत्याही बांधकामाची दुरुस्ती (Repairs) करायची असेल, तर त्यासाठी सक्षम प्राधिकारी (Competent Authority) यांची परवानगी घेणे आवश्यक आहे.


    या नोटीसमुळे, स्थानिक प्रशासनाने महादेव मंदिराच्या संरक्षित परिसरात सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामांवर आणि अतिक्रमणांवर लक्ष केंद्रित केले आहे. मंदिर परिसरातील अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणांविरोधात लवकरच मोठी कारवाई होण्याची शक्यता आहे.

  • Chandrapur Amma Chowk controversy । अम्मा चौक वाद: पुरातत्त्व विभागात काँग्रेसची तक्रार!

    Chandrapur Amma Chowk controversy

    Chandrapur Amma Chowk controversy : चंद्रपूर ४ ऑगस्ट (News३४) | शहर पोलीस स्टेशन व सात मजली इमारतीच्या मधोमध असलेल्या जागेवर चंद्रपूर महानगरपालिकेने कोणतीही पूर्वपरवानगी न घेता अम्मा चौक स्मारकाचे बांधकाम सुरू होते.  या पार्श्वभूमीवर चंद्रपूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष रितेश (रामू) तिवारी यांनी पुरातत्त्व विभागाकडे लेखी निवेदन सादर करीत परवानगी देणाऱ्या महानगरपालिकेची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केली आहे.

    अम्मा चौक वर राजकारण करू नका

    गांधी चौक परिसराची ऐतिहासिक पार्श्वभूमी लक्षात घेता, येथे भारतीय पुरातत्त्व विभागाच्या सूचनेनुसार कोणतेही काम करता येत नाही, असे असताना देखील केवळ आमदार किशोर जोरगेवार यांच्या मातोश्रींच्या नावे स्मारक उभारण्याचा प्रकार सुरू होता. हे काम १९५८ च्या भारतीय पुरातत्त्व अधिनियमाचे उल्लंघन असून, तातडीने हे बांधकाम थांबवावे व चौकशी करून दोषींवर कारवाई करावी. तसेच, याठिकाणी भारतीय पुरातत्त्व विभागाची अधिसूचना लावण्यात यावी, अशी मागणी रितेश तिवारी यांनी केली आहे. archaeology department Amma Chowk complaint

    हा पक्षपाती निर्णय

     चंद्रपूरमधील अनेक स्वातंत्र्यसैनिक, समाजसेवक, माजी लोकप्रतिनिधींनी मोठे योगदान दिले आहे, मात्र त्यांना कधीही स्मारक वा गौरव मिळाला नाही. मात्र टोपल्या विकणाऱ्या एका महिलेसाठी स्मारक उभारण्याचा निर्णय हा पक्षपाती आणि चुकीचा असल्याची टीकाही त्यांनी केली आहे.


    या संपूर्ण प्रकरणावर महानगरपालिकेने तातडीने खुलासा करावा व या बांधकामाची परवानगी देणाऱ्या महानगरपालिकेवर पुरातत्त्व विभागा कडून कारवाई करावी, अन्यथा काँग्रेस पक्षाकडून जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही तिवारी यांनी दिला आहे.