Tag: अमोल काचोरे

  • chandrapur police crime branch action । 🔐 कोब्रा आणि मुजोर अटकेत! चंद्रपूर गुन्हे शाखेच्या कारवाईमुळे गुन्हेगार थरथरले

    chandrapur police crime branch action

    chandrapur police crime branch action : चंद्रपूर – चंद्रपूर जिल्ह्यातील गुन्हेगारीस आळा बसावा यासाठी चंद्रपूर पोलीस दलातील स्थानिक गुन्हे शाखा अहोरात्र परिश्रम घेत आहे, ५ जुलये रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने २ रेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगारांना अटक केली, दोघांवर घरफोडी व मोटार सायकल चोरीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे. गुन्हे शाखेच्या पथकाने यावेळी १ लाख ९३ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

    मुजोर कोब्रा ला अटक

    गुन्हेगार शोध मोहीम राबवित असताना २६ वर्षीय अतुल य्र्फ मुजोर विकास राणा राहणार भगतसिंग वॉर्ड बंगाली कॅम्प चंद्रपूर व २४ वर्षीय ऋषेश् उर्फ कोब्रा चंद्रभान आत्राम राहणार विसापूर यांना ताब्यात घेत त्यांची विचारपूस केली असता त्यांनी बल्लारपूर पोलीस स्टेशन हद्दीत घरफोडी, राजुरा येथे दुचाकी वाहन चोरी व रामनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत घरफोडीचे तीन गुन्हे केले असल्याची कबुली दिली. lcb chandrapur latest arrest news

    आमदार मुनगंटीवार यांनी दिली पोलिसात तक्रार

    यावेळी आरोपीकडून १ लाख ९३ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला, दोन्ही आरोपीना बल्लारपूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

    सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात सपोनि दीपक कांक्रेडवार, सपोनि बलराम झाडोकर, पोउपनि संतोष निंबोरकर, पोउपनि सर्वेश बेलसरे, पोलीस कर्मचारी जयसिंह, गणेश मोहुर्ले, संतोष येलपुलवार, नितीन रायपुरे व मिलिंद जांभुळे यांनी केली.