Tag: अमन अन्देवार

  • Aman Andhewar MNS grassroots leadership । अमन अंधेवारांच्या झंझावाती नेतृत्वाखाली 24 कार्यकर्त्यांचा मनसेत भव्य प्रवेश

    Aman Andhewar MNS grassroots leadership

    Aman Andhewar MNS grassroots leadership : चंद्रपूर | जिल्ह्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) कार्यात नवसंजीवनी आणणारा एक भव्य आणि ऐतिहासिक पक्ष प्रवेश सोहळा काल साक्षीला आला. पक्ष प्रमुख राज ठाकरे यांच्या स्पष्ट, ठाम आणि जनतेच्या मनाला भिडणाऱ्या राजकारणावर विश्वास ठेवत तसेच मनसे कामगार सेना जिल्हा अध्यक्ष अमन अंधेवार यांच्या झंझावाती नेतृत्वावर आणि तडफदार कार्यशैलीवर प्रभावित होऊन तब्बल २४ कार्यकर्त्यांनी मनसेच्या ध्वजाखाली प्रवेश केला. हा प्रवेश सोहळा अंधेवार यांच्या चंद्रपूर कार्यालयात मोठ्या उत्साहात पार पडला, ज्यामध्ये मनसेचे पदाधिकारी, स्थानिक कार्यकर्ते आणि नागरिकांची मोठी उपस्थिती होती.

    सणासुदीला हॉटेल व्यावसायिकांसाठी मार्गदर्शक सूचना

    या पक्ष प्रवेशात विविध समाजघटक, व्यावसायिक, तरुण कार्यकर्ते, ग्रामीण भागातील नेते आणि स्थानिक पातळीवरील प्रभावी व्यक्ती एकत्र आले. यामध्ये प्रशांत जुलमे, विनोद गुप्ता, नाविन कोतले, करण चेतूलवार, संतोष सोयाम, सुधीर झाडे, गणेश सोनेकर, गणेश गोखरे, राकेश सल्लम, नितेश खनके, मयूर पावडे, नयन पेदोर, गौरव येकलवार, अशोक कातकर, श्रावण गडपल्ली, अरविंद पेंदाने, सुरज केवळ, राधाकृष्ण भोंगा, रोशन चव्हाण, संपूरणणंद चव्हाण, अभिजीत पांडे, अरविंद चंदनखेडे, ओम बावणे आणि राकेश गाडी या २४ कार्यकर्त्यांचा समावेश आहे. MNS Maharashtra organization strength

    या सर्वांनी मनसेच्या विचारधारेवर पूर्ण निष्ठा ठेवत, जिल्हा पातळीवर पक्षाची पकड अधिक मजबूत करण्याची प्रतिज्ञा घेतली. या प्रवेशामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील मनसेची संघटनात्मक ताकद केवळ वाढणार नाही, तर स्थानिक पातळीवरील राजकीय समीकरणांवरही त्याचा ठोस परिणाम होणार आहे. ग्रामीण आणि शहरी भागात मनसेचा झेंडा आता अधिक वेगाने फडकणार, अशी चर्चा कार्यकर्त्यांमध्ये रंगली आहे.

    अमन अंधेवार यांनी आपल्या भाषणात स्पष्ट केले की, “मनसे म्हणजे फक्त पक्ष नव्हे, तर महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची, स्थानिकांचा हक्क मिळवून देणारी आणि अन्यायाविरुद्ध लढणारी संघटना आहे. आज आमच्यात सामील झालेल्या कार्यकर्त्यांच्या पाठबळामुळे आमची ताकद अनेकपटीने वाढली आहे. येत्या काळात चंद्रपूर जिल्ह्यातील प्रत्येक गावात आणि प्रत्येक समाजघटकात मनसेचे अस्तित्व निर्माण करू.” mns adhikrut

    पक्ष प्रवेश कार्यक्रमात उपस्थित कार्यकर्त्यांनी एकमुखी घोषणा देत, स्थानिक प्रश्नांवर कठोर भूमिका घेण्याचा संकल्प केला. रोजगार, स्थानिकांना प्राधान्य, उद्योगात स्थानिकांचा सहभाग, भ्रष्टाचाराविरोधी भूमिका आणि प्रशासनाच्या निष्क्रियतेविरुद्ध लढा या मुद्द्यांवर मनसे ठामपणे उभी राहणार असल्याचे ठरविण्यात आले.

    कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण

    हा प्रवेश फक्त संख्येचा आकडा वाढवणारा नव्हे, तर तळागाळातील लोकांचा विश्वास जिंकणारा टप्पा असल्याचे स्पष्ट झाले. या कार्यक्रमात जुन्या आणि नव्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह, एकजूट आणि लढाऊ वृत्तीचे दर्शन घडले. स्थानिक राजकारणात बदलाची चाहूल लागल्याची भावना यानंतर स्पष्ट झाली आहे. मनसेच्या या झंझावाती प्रवेशामुळे चंद्रपूरच्या राजकीय पटावर नव्या समीकरणांची बीजे रोवली गेली असून, येत्या काळात त्याचा परिणाम निवडणुकीत ठळकपणे दिसेल, अशी शक्यता आहे. Aman Andhewar MNS grassroots leadership

    ही घटना केवळ पक्षासाठी नाही, तर जिल्ह्याच्या राजकीय इतिहासात महत्त्वाचा टप्पा ठरेल, याबद्दल शंका नाही. मनसेच्या झेंड्याखाली नव्या जोमाने आणि नव्या रक्ताने पुढील लढती अधिक तीव्र होतील, हे निश्चित.

  • Rajasthan company job fraud in Chandrapur । मुलींनी मंगळसूत्र विकून भरले पैसे, चंद्रपूरच्या बाबूपेठ ते विदर्भात खळबळ उडवणारी घटना

    Rajasthan company job fraud in Chandrapur

    Rajasthan company job fraud in Chandrapur : चंद्रपूर, महाराष्ट्र – चंद्रपूर शहर आणि विदर्भातील इतर जिल्ह्यांमधील शेकडो बेरोजगार तरुणांना नोकरीचे आमिष दाखवून लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. राजस्थानस्थित कंपन्यांनी तरुणांना फसवे आश्वासन देऊन त्यांचे पैसे हडपले आहेत. या प्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेने (मनसे) प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू केला आहे, जेणेकरून पीडित तरुणांना न्याय मिळू शकेल. unemployed youth cheated by companies

    केंद्र सरकारने केली जनतेची फसवणूक – खासदार प्रतिभा धानोरकर

    फसवणुकीचे चक्र: ट्रेंडस्टिक वेंचर्स ते डेली ग्रोथ इंडिया

    गेल्या दोन वर्षांपासून चंद्रपूर शहरातील बाबूपेठ, मराठा चौकात ट्रेंडस्टिक वेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड नावाच्या राजस्थानच्या कंपनीने तरुणांना लक्ष्य केले. कंपनीने बेरोजगारांना नोकरीची हमी देऊन आणि कपड्यांच्या मार्केटिंगमधून लाखो रुपये कमावण्याचे स्वप्न दाखवले. प्रत्येक तरुणाकडून रु. ११,००० ते रु. ४६,००० पर्यंतची रक्कम घेऊन त्यांना निकृष्ट दर्जाचे कपड्यांचे ड्रेस दिले जात होते, ज्याची त्यांना मार्केटिंग करायची होती.

    या कंपनीच्या राजस्थानमधील संचालकांनी आपला गाशा गुंडाळल्यानंतर, पैशाची आवक बघता काही परप्रांतीय लोकांनी स्थानिक तरुणांना हाताशी धरून त्याच ठिकाणी डेली ग्रोथ इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नावाची नवीन कंपनी सुरू केली. या कंपनीने पुन्हा गरीब बेरोजगार तरुणांना नोकरीच्या नावाखाली लुटणे सुरू ठेवले. वणी येथील तीन मुली आणि एका मुलाचा ही या कंपनीकडून फसवणूक झाली असून, त्यांनी मनसे कार्यालयात संपर्क साधून आपली व्यथा मांडली आहे. youth fraud through marketing job offers

    पैशांची उधळपट्टी आणि आत्महत्येची वेळ

    कंपनीने असे आश्वासन दिले होते की जेवढे कपडे विकले जातील किंवा जेवढे लोक कंपनीसोबत जोडले जातील, त्या प्रमाणात कमिशन मिळेल. मात्र, बाहेरच्या जिल्ह्यांमधून आलेल्या तरुणांना चंद्रपूरमध्ये आधीच मोठी कपड्यांची दुकाने असताना, बाहेरच्या प्रांतातून आलेल्या कंपनीचे कपडे कोण घेणार, हा प्रश्न होता. यामुळे अनेक तरुण अर्ध्यातूनच काम सोडून आपल्या गावी परतले. दुर्दैवाने, त्यांचे प्रत्येकी रु. ११,००० ते रु. ४६,००० कंपनीने बुडवले आहेत.

    Somayya institute of technology

    कंपनीमध्ये पैसे भरण्यासाठी काही तरुण-तरुणींनी आपल्या आई-वडिलांकडून पैसे घेतले. कुणी स्वतःचे मंगळसूत्र विकून पैसे दिले, तर कुणी मुलींसाठी स्वतःची दुचाकी विकून पैसे दिले. आज हे सर्व पैसे कंपनीने बुडवले असल्याने अनेक तरुण बेरोजगारांवर आत्महत्येची वेळ आली आहे, अशी गंभीर परिस्थिती आहे.

    मनसेचा न्याय मिळवण्यासाठी लढा

    महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष अमन अंधेवार यांनी प्रतिक्रिया दिली की, “पीडित तरुण-तरुणींना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही प्रशासनाकडे पाठपुरावा करत आहोत.” यावेळी फसवणुकीचे बळी ठरलेले अनेक तरुण-तरुणी उपस्थित होते. मनसेने या प्रकरणात लक्ष घालून फसवणूक करणाऱ्या कंपन्यांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे, जेणेकरून भविष्यात असे प्रकार थांबतील आणि पीडितांना त्यांचे बुडवलेले पैसे परत मिळतील.

    हा प्रकार बेरोजगारांच्या असुरक्षिततेचा आणि फसवणूक करणाऱ्या कंपन्यांच्या वाढत्या कारभाराचा एक नमुना आहे. प्रशासनाने यावर तातडीने लक्ष देऊन दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

  • MNS rural expansion in Chandrapur district । 🔥 बल्लारपूरसह गावागावात मनसेचा झेंडा! अमन अंधेवार यांच्या नेतृत्वाची कमाल

    MNS rural expansion in Chandrapur district

    MNS rural expansion in Chandrapur district : बल्लारपूर – महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना जिल्हाध्यक्ष अमन अंधेवार यांच्या नेतृत्वात बल्लारपूर तालुक्यातील ग्रामीण भागातून मनसे मधे भव्य पक्षप्रवेश करण्यात आला.मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अनेक युवक आणि नागरिकांनी मनसे चा झेंडा हाती घेतला.

    विसापूर येथील चुना भट्टी वॉर्ड क्र.६ येथे पार पडलेल्या या पक्षप्रवेश कार्यक्रमात नागरिकांचा मोठा सहभाग पाहायला मिळाला. या वेळी आर्यन कोढापे, मुकेश अढिल, अमर नाग, सनी गुप्ता, गणेश भुजबळ,सुकणे मुजा, मनीष यादव, इंदू यादव,संगीता अत्राम, जयदीप अझिल, सुभाष कश्यप, गीता गुप्ता,विजेता मेश्राम यासह अनेक कार्यकर्ते मनसेत दाखल झाले.

    दुचाकी पुलावर, व्यक्ती बेपत्ता, पैनगंगा नदीत रेस्क्यू ऑपरेशन

    ग्रामीण भागात मनसेला पाठिंबा

    या पक्षप्रवेशामुढे जिल्हात मनसेचा प्रभाव दिवसेंदिवस वाढत असून खासकरून ग्रामीण भागात मनसेला मिळणारा पाठिंबा लक्षवेधी ठरत आहे. अमन अंधेवार यांच्या सक्रिय कार्यामुळे आणि जनतेशी थेट संपर्कामुळे मनसेकडे आकर्षण वाढले असल्याचे मत स्थानिक नागरिकांनी व्यक्त केले. Aman Andhewar MNS leadership Ballarpur

    या वेळी जनहित सेना जिल्हाध्यक्ष रमेश काळबांधे ,जनहित सेना तालुका सचिव राजू लांडगे, प्रतीक चिकाटे, राकेश जवादे, अमन थुल, आसिफ कुरेशी, सह आदी कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

    कार्यक्रमाचे आयोजन यशस्वीपणे पार पडले असून, येत्या काळात संपूर्ण जिल्हाभरात मनसेच्या कार्यात अधिक जोमाने भर पडेल, असा विश्वास मनसे पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

  • Maharashtra Navnirman Kamgar Sena । “30 कामगार पुन्हा कामावर! मनसे कामगार सेनेचा मोठा विजय”

    Maharashtra Navnirman Kamgar Sena

    Maharashtra Navnirman Kamgar Sena : चंद्रपूर :-जिल्ह्याच्या उद्योगात स्थानिक मराठी कामगारांना मोठया प्रमाणात कंपनी व्यवस्थापनाकडून जाणीवपूर्वक त्रास दिला जात असून जर कुणी मराठी कामगार आपल्या हक्कासाठी लढायला पुढे आला की त्याला कुठलीही नोटीस किंव्हा सूचना न देता कंपनी गेटच्या आत येण्यास मनाई केली जाते असाच प्रकार डालमिया कंपनीत घडला.

    ग्रामीण भागातील विविध प्रकल्पाना जिल्हाधिकारी गौडा यांची भेट

    सुरुवातीला कंपनीने तीन कामगारांना कामावरून कमी केले कारण त्या तीन कामगारांना यासाठी कामावरून कमी केले की तें महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष अमन अंधेवार यांच्या नेतृत्वात मनसेच्या यूनियन मध्ये दाखल झाले, या दरम्यान तब्बल 30 कामगारांना कामावरून कमी केल्याने मनसे कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष अमन अंधेवार यांनी केंद्रीय जिल्हा सहाय्यक कामगार आयुक्त यांच्याकडे तक्रार केली मात्र कंपनी व्यवस्थापन मानायला तयार नव्हते.

    कामगारांनी मानले मनसेचे आभार

    शेवटी दिनांक 7 जुलै ला कंपनी चे अधिकारी आणि मनसे पदाधिकारी यांची कामगारांसह आयुक्ताकडे बैठक झाल्यानंतर कंपनी मधून काढून टाकलेले 30 कामगार उद्यापासून कामावर घेण्याचा निर्णय झाल्याने कामगारांनी आनंद व्यक्त केला. workers reinstated after legal battle

    या वेळी मनसे कामगार सेनेकडून अँड कल्याण कुमार यांनी बाजू मांडली तर त्यांचे सोबत मनसे विधी विभाग जिल्हाध्यक्ष अँड अजित पांडे यांनी कामगारांच्या मुळ मागण्या संदर्भात पक्षाची भूमिका मांडली, यावेळी मनसे कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष अमन अंधेवार यांचे सह मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे, मनसे वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष महेश वासलवार, जनहीत कक्ष जिल्हाध्यक्ष सुनील गुढे व डालमिया कंपनीच्या चिअर इंडिया या कंत्राटी कंपनीचे कामगार मोठ्या संख्येने उपास्थित होते, दरम्यान कामगारांच्या प्रमुख मागण्या संदर्भात लवकरच केंद्रीय सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयात निर्णय लागेल असे सांगण्यात आले आहें.

  • MNS party joining event in Chandrapur । 🔥 मनसेचा विसापूरमध्ये झंझावाती प्रवेश – भाजपा व काँग्रेसला मोठा झटका?

    MNS party joining event in Chandrapur

    MNS party joining event in Chandrapur : चंद्रपूर :- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांचे जिल्हा संपर्क अभियान सुरु असून येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तयारीकरिता गावाखेड्यावर मनसेचे कार्यक्रम सुरु आहेत.

    अमन अंधेवार यांच्या मार्गदर्शनात पक्षप्रवेश

    दरम्यान बल्लारापूर तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्वाच्या विसापूर या गावात मनसेच्या शाखा उदघाटनाच्या कार्यक्रमासह इतर राजकीय पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांचा मनसेत प्रवेशाचा कार्यक्रम मनसे कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष अमन अंधेवार यांच्या मार्गदर्शनाखाली विसापूर येथील मनसेचे जुने पदाधिकारी व आता मनसे जनहीत कक्ष बल्लारापूर तालुका सचिव राजू लांडगे यांच्या नेतृत्वात दिनांक 28 जून ला आयोजित करण्यात आला होता. MNS Visapur branch inauguration

    वन्यप्राण्यांचा कर्दनकाळ, रेल्वेच्या धडकेत सांबराचा मृत्यू

    विसापूर गावात शाखा फलकाचे उदघाटन करण्यात आले तर छत्रपती शिवाजी महाराज चौकात पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, यावेळी मंच्यावर मनसे कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष अमन अंधेवार, मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे, मनसे वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष महेश वासलवार, जनहीत कक्ष विभाग जिल्हाध्यक्ष रमेश काळबांधे, सुनील गुढे, रोजगार स्वयंरोजगार सेनेचे जिल्हाध्यक्ष मनोज तांबेकर, जनहीत कक्षाचे चंद्रपूर शहर अध्यक्ष पियुष धुपे, मनसे महिला सेनेच्या चंद्रपूर शहर अध्यक्षा वर्षा भोंबले, अनुप यादव इत्यादीची उपास्थिती होती.

    कार्यक्रमाला गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपास्थित होते, या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी पक्ष प्रवेश विसापूर राजू भाऊ लांडगे, बळी भाऊ नरूले शाखा अध्यक्ष, किशोर नागापुरे, नारायण शिकारदार, दिलीप नान्ने, राकेश जवादे. रमेश शिवरकर, निलेश राऊत, नानाजी शिकारदार, जीवन मेश्राम, ग॔गाधर नान्ने, शिवा वाडिले, फरजना शेख, संगिता लांडगे, अमन थूल, प्रतीक चिकाटे, शरद गणवीर, राज आत्राम, परितोष मंडळ, कैलाश पाटील, आसिफ शेख इत्यादी मानसैनिकांनी प्रयत्न केले.

  • Dalmia Cement company workers termination । एकाच झटक्यात ३० कामगार बेरोजगार!, मनसे आक्रमक, जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव!

    Dalmia Cement company workers termination

    Dalmia Cement company workers termination : डालमिया सिमेंट कंपनीतून तब्बल 30 कामगारांना कुठलीही नोटीस व पूर्व सूचना न देता परस्पर कामावरून काढल्याने महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष अमन अंधवार यांच्या नेतृत्वात आज जिल्हाधिकारी यांच्याकडे सर्व कामगारांना घेऊन निवेदन देण्यात आले.

    बल्लारपुरात १२ लक्ष रुपये किमतीचे चोर बीटी बियाणे जप्त

    जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी त्वरित उपविभागीय अधिकारी यांना डालमिया सिमेंट कंपनीच्या व्यवस्थापनासोबत बैठक लावून कामगारांच्या मागण्या सोडविण्याच्या सूचना केल्या आहें, मागील विस दिवसापासून कामगार आपल्या हक्कासाठी लढत आहें व मनसे कामगार सेनेकडून प्रशासनाकडे व डालमिया सिमेंट कंपनी व्यवस्थापनाकडे याबाबत पाठपुरावा करत होते परंतु कुठलाही निर्णय न झाल्याने अखेर जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी कामगारांना न्याय देण्याबाबत पुढाकार घेतला.

    MNS aman andhewar

    मनसे कामगार सेनेला मान्यता न देता उलट कारवाई

    गडचांदुर परिसरातील डालमिया सिमेंट कंपनीतील कामगारांना किमान वेतन व कामगार कायाद्यानुसार इतर सुविधा मिळत नसल्याने त्या कंपनीच्या कामगारांनी मनसे कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष अमन अंधेवार यांच्या चंद्रपूर कार्यालयात येऊन मनसे कामगार सेनेचे सदस्यत्व स्वीकारले व कंपनी व्यवस्थापनाला मनसे कामगार संघटना स्थापित करण्याचे पत्र दिले, परंतु कंपनी व्यवस्थापनाने मनसे कामगार सेनेला मान्यता न देता उलट ज्या कामगारांनी पुढाकार घेतला त्या कामगारांनाच कुठलीही पूर्व सूचना न देता कामावरून काढून टाकले. Aman Andhewar MNS

    दरम्यान या संदर्भात केंद्रीय कामगार उपायुक्त यांच्यासह जिल्हाधिकारी यांना मनसे कामगार सेनेच्या माध्यमातून निवेदन देऊन त्या कामगारांना त्यांच्या हक्काच्या मागण्याची पूर्तता पूर्ण करून कामावर घेण्यात यावे अशी मागणी करण्यात आली होती, त्यावर जिल्हाधिकारी यांनी संबंधित केंद्रीय कामगार उपायुक्त यांच्याकडे चौकशी करण्याचे आदेश दिले, मात्र तब्बल दहा दिवस उलटून सुद्धा कंपनी कडून कामगारांना केवळ नोटीस वर नोटीस देऊन कामगारावर आरोप करण्यात येत होते मात्र त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यात येत नव्हत्या.

    आज दिनांक 16 जुनला जिल्हाधिकारी यांच्या कडे सर्व कामगारांना उपस्थित करून आंदोलनाची भूमिका घेण्यात आली असता जिल्हाधिकारी यांनी दोन दिवसात डालमिया सिमेंट कंपनीच्या व्यवस्थापनासोबत बैठक लावून कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी उपविभागीय अधिकारी यांच्या कडे जबाबदारी दिल्याने कामगारांना आता न्याय मिळेल असे संकेत मिळत आहें.

  • Dalmia Cement Workers Protest । दालमिया सिमेंट कंपनीला मनसे कामगार सेनेचा इशारा

    Dalmia Cement Workers Protest

    Dalmia Cement Workers Protest : चंद्रपूर – दालमिया सिमेंट भारत लिमिटेड कंपनी अंतर्गत चिअर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड मध्ये मनसे कामगार सेनेची संघटना स्थापन झाल्यानंतर कंपनी चे एच आर अरविंद बरवा यांनी मनसे कामगार सेनेच्या तीन सदस्य कामगारांना सुडबुद्धीने बेकायदेशीरपणे काढून टाकल्याने कंपनी व्यवस्थापनाविरोधात कारवाई करून कामगारांना न्याय द्यावा अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना कंपनी परिसरातील गावातील नागरिकांना घेऊन जनआंदोलन करू असा इशारा मनसे कामगार सेना जिलाध्यक्ष अमन अंधेवार यांनी पत्रपरिषदेत दिला आहे.

    चंद्रपुरातील नागरिकांना पुन्हा आठवले बाळूभाऊ धानोरकर


    जिल्ह्यातील सिमेंट उद्योगात मोठ्या प्रमाणात कामागारांचे आर्थिक शोषण होतं असून स्थानिक राजकीय नेत्यांच्या भ्रष्ट प्रवृत्तीने कंपनी व्यवस्थापनाला मोठे बळ मिळत आहें, मात्र यामध्ये कामगारांना त्यांचे घटनादत्त अधिकार मिळत नाही, महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेने तर्फे आम्ही अन्याय पिडीत कामगारांना त्यांचे कामगार कायाद्यानुसार वेतन व इतर सुविधा मिळाव्या म्हणून कार्यरत आहो. MNS Union Demands Justice

    दरम्यान गडचांदूर परिसरातील दालमिया सिमेंट भारत लिमिटेड कंपनी मध्ये कंत्राटी कंपनी चिअर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड मध्ये काम करणायां कामगारांना किमान वेतन मिळत नसल्याने जवळपास कंपनीच्या एका युनिट मधील 30 कामगारांनी मनसे कामगार सेनेचे सदस्यत्व स्वीकारून न्यायासाठी आम्हांला विनंती केली आहें, मात्र त्या अगोदरचं कंपनी व्यवस्थापनाने त्यापैकी नेतृत्व करणायां तीन कामगार(सौरभ बबन काकडे, अनिकेत मारोती घुगुल, राजकुमार विठोबा कोरांगे,) यांना कुठलीही पूर्व सूचना न देता गुरूवार 29 मे 2025 पासून परस्पर कामावरून कमी केले.

    तर मोठे जन आंदोलन उभारू


    कंत्राटी कंपनीच्या या आडमुठेपणामुळे त्या तीन कामगारांच्या परिवारावर बेरोजगारीचे संकट निर्माण झाले आहे. या प्रकरणी त्वरित दालमिया सिमेंट भारत लिमिटेड व्यवस्थापनाने तीन कामगारांना कामावर वापस न घेतल्यास आसपासच्या गावातील नागरिकांना एकत्र करून कंपनी विरोधात मोठे जनआंदोलन उभारू व त्यांची संपूर्ण जवाबदारी कामगार आयुक्त आणि कंपनीची असेल असा इशारा मनसे कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष अमन अंधेवार यांनी पत्रकार परिषदेतून दिला आहें. Dalmia Cement in Chandrapur


    पत्रपरीषदेला मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे, विधी विभाग जिल्हाध्यक्ष अॅड.अजित पांडे, वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष महेश वासलवार, जनहीत कक्ष विभाग जिल्हाध्यक्ष सुनील गुढे, दालमिया सिमेंट कंपनीचे पिडीत कामगार व इतर मनसे पदाधिकारी कार्यकर्ते उपास्थित होते.