Tag: सामाजिक कार्य

  • birthday celebration with social message । 🌟 सामाजिक भानाची नवी ओळख! लहान वयात मोठं कर्तृत्व

    birthday celebration with social message

    birthday celebration with social message : पोंभुर्णा, उमरी पोतदार: वाढदिवस म्हणजे मौजमजा आणि मित्र-मैत्रिणींसोबतचा आनंद. पण पोंभुर्णा तालुक्यातील उमरी पोतदार येथील ११ वर्षीय सिया मंगेश उपरे हिने आपला वाढदिवस एका वेगळ्याच पद्धतीने साजरा करून समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे. जिल्हा परिषद उच्च माध्यमिक शाळा, उमरी पोतदार येथे इयत्ता पाचवीत शिकणाऱ्या सियाने आपल्या वाढदिवसानिमित्त गावातीलच एक अनाथ बालिकेला शालेय वस्तू भेट देऊन तिच्या चेहऱ्यावर हसू फुलवले. real life stories of children doing good deeds

    नझूलधारकांना मिळणार कायमस्वरूपी पट्टे

    सियाच्या या कृतीने उपस्थितांचे डोळे पाणावले आणि सर्वांनी तिच्या दातृत्वाची भरभरून प्रशंसा केली.

    सियाच्या मनात अनाथ मुलीबद्दलची आपुलकी

    रेणुका साईनाथ कोडपे नावाची ही अनाथ बालिका तिचे आई-वडील गमावल्याने तिच्या वृद्ध आजीसोबत राहत आहे. रेणुकाची परिस्थिती पाहून सियाच्या मनात तिच्याबद्दल नेहमीच आपुलकी आणि प्रेम होते. ‘आपण तिच्यासाठी काहीतरी करायला पाहिजे,’ ही भावना सियाच्या मनात अनेक दिवसांपासून होती. याच भावनेतून तिने आपला वाढदिवस रेणुकाला मदत करण्यासाठी निवडला.

    कुटुंबाचा वारसा आणि सियाचे सामाजिक भान

    सिया उपरे हिचे वडील मंगेश उपरे हे अनेक वर्षांपासून गावात सामाजिक कार्यात सक्रिय आहेत. ते नेहमीच गावातील शोषित आणि वंचित घटकांना मदत करण्यासाठी धावून जातात. सियाची आई, आम्रपाली उपरे, या अंगणवाडी सेविका असून रेणुका अंगणवाडीत येऊ लागल्यापासून त्या तिला मदत करत आहेत. सामाजिक कार्याचा हा वारसा सियानेही स्वीकारला असून, लहानपणापासूनच ती सर्वांसोबत मिळून-मिसळून राहते आणि मैत्रिणींमध्ये ती सर्वांची लाडकी आहे.

    याप्रसंगी सियाचे आई-वडील आम्रपाली उपरे, मंगेश उपरे, जिल्हा परिषद उच्च माध्यमिक शाळेचे शिक्षक गव्हारे सर, कोवे सर, कावरे सर आणि शाळेतील बालमित्रांच्या उपस्थितीत सियाचा हा अनोखा वाढदिवस साजरा करण्यात आला. सियाच्या या कृतीने समाजाला एक महत्त्वाचा संदेश दिला आहे की, खरे समाधान इतरांना मदत करण्यातच असते.

  • त्या 3 महिन्याच्या बालिकेसाठी रुग्णवाहिका निःशुल्क

    त्या 3 महिन्याच्या बालिकेसाठी रुग्णवाहिका निःशुल्क

    News34 chandrapur

    भद्रावती : माणुसकीला धर्म जात नसते आणि सेवेला भिंती नसतात, आलेल्या प्रत्येक रंजल्या गांजलेल्या मदत करणे हाच खरा धर्म समजून शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने रविंद्र शिंदे वरोरा विधानसभा क्षेत्रात काम करीत आहेत. रविंद्र शिंदे यांच्या राजकारणाची दिशा व मार्ग हा प्रचलित नसून वेगळा आहे. त्यांचे राजकारण हे सेवाधर्म व मदतकार्य यास प्राथमिकता देवून सुरू आहे. एक चांगला आदर्श ते त्यांच्या कार्यातून समाजाला देत आहे.

     

    अशीच एक घटना नुकतीच पाहायला मिळाली. स्थानिक डोलारा येथील चंडिका वार्ड मधे राहणारी गृहिणी अमरीन इकबाल शेख यांचा तीन महिन्याचा मुलगा मोहत्र हसनैन इकबाल शेख याच्या ह्रुदयात छिद्र आहे. घरची परिस्थिती जेमतेम आहे. उपचाराकरीता पैशांची गरज आहे. मात्र तेव्हढी आर्थिक तयारी कुटुंबाची नाही. अशा परिस्थितीत शिवसेनेकडे अमरीन शेख यांनी पत्र देवून सहकार्याची अपेक्षा केली. परिस्थिती जाणून घेवून तात्काळ रविंद्र शिंदे यांनी बाळाला रुग्णालयात नियमित ने-आण करण्यासाठी रुग्णवाहिकेची व्यवस्था करून दिली. नागपूर येथे बाळावर उपचार सुरू आहे. त्यानुसार आता दररोज त्या बाळाला रुग्णालयात ने-आण करण्याची जवाबदारी शिवसेनेने घेतली आहे.

     

    शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) वरोरा विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे, स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरिअल रविंद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष प्रा. धनराज आस्वले, ट्रस्टचे कोषाध्यक्ष सुषमा शिंदे तसेच शिवसेना तालुका प्रमुख नंदू पढाल याप्रसंगी उपस्थित होते.

     

    चिमुकल्या हसनैन यांचे उपचार होतपावेतो दर महिण्याला निशुल्क रुग्णवाहीका उपलब्ध करुन देण्याचे वचन विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे यांनी रूग्णाचा पालकांना यावेळी दिले.