Tag: संदीप गिर्हे

  • today chandrapur news : चंद्रपूर जिल्ह्यातील राजकारणात हद्दपारीची पुनरावृत्ती

    today chandrapur news : चंद्रपूर जिल्ह्यातील राजकारणात हद्दपारीची पुनरावृत्ती

    today chandrapur news राजकीय दबावातून पोलीस विभागाने हद्दपारीची नोटीस बजावल्याचा गंभीर आरोप 5 ऑक्टोबर रोजी स्थानीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत उबाठा गटाचे जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे यांनी केला आहे.


    Today chandrapur news काही दिवसात विधानसभा निवडणुकीची घोषणा होणार असून त्यापूर्वीचं राजकीय द्वंद्वयुद्ध सुरू झाले असल्याचे चित्र चंद्रपूर जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात बघायला मिळत आहे.
    शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे यांनी बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातून निवडणूक लढविण्याची तयारी मागील 2 वर्षांपूर्वी पासून सुरू केली आहे. बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात वर्ष 2009 पासून सुधीर मुनगंटीवार आमदार आहे हे विशेष.

    अवश्य वाचा : चंद्रपूर जिल्ह्यात रेल्वे इंजिन आपसात धडकले


    पत्रकार परिषदेत संदीप गिर्हे म्हणाले की माझ्यावर विविध कलमांतर्गत व प्रतिबंधात्मक कारवाई असे एकूण 12 गुन्हे दाखल होते, आतापर्यंत 8 गुन्ह्यात माझी निर्दोष मुक्तता झाली असून उर्वरित 4 गुन्हे हे राजकीय आंदोलनाचे आहे, असे असतानाही एका राजकीय नेत्यांच्या दबावाखाली मला हद्दपार करण्याचे षडयंत्र रचल्या जात आहे.

    निशाणा कुणाला?


    निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मला हद्दपार कारवाई करण्यासंदर्भात चाललेली धडपड म्हणजेच राजकीय विरोधक संपविण्याचा हा प्रकार आहे. Today chandrapur news


    संदीप गिर्हे यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला, जे लोक हद्दपार होते ते आज पालकमंत्री यांच्या सोबत बसतात, नुकतीच शहरात घडलेल्या कुख्यात गुंड हाजी सरवर यांच्या हत्येत भाजपचा पदाधिकारी सामील होता, अश्या लोकांना भाजप पक्षात प्रवेश चालतो मात्र कुणी विरोधक असता कामा नये अशी स्वयंघोषित विकासपुरुष यांची भूमिका दिसून येत आहे.


    लोकसभेच्या निवडणुकीत दारुण पराभव त्यांच्या पचनी पडलेला नाही त्यामुळे आता विधानसभेत सुद्धा पराभव होणार अशी स्थिती निर्माण झाली, त्यामुळे माझ्यासारख्या शिवसैनिकाला निवडणुकीच्या महासंग्रामातून कस डावलता येणार याची तयारी विकासपुरुष यांनी प्रशासनामार्फत सुरू केली आहे.


    शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे यांना बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात जनसामान्य नागरिकांचा प्रतिसाद मोठ्या प्रमाणात मिळत आहे, त्यामुळे राजकीय करिअर संपुष्टात आणण्यासाठी हे सर्व सुरू असल्याचा आरोप गिर्हे यांनी केला, आपण बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात हजारो कोटी रुपये खर्च करून विकास केला असा गवगवा करणाऱ्या विकास पुरुषांनी माझ्यासारख्या लहान कार्यकर्त्यांला घाबरण्याचे कारण काय? असा प्रश्न यावेळी गिर्हे यांनी उपस्थित केला आहे. Shivsena ubt

    महत्त्वाचे : ब्रेक निकामी, बस पलटली

    निवडणुकीपूर्वी हद्दपारीच्या राजकारणाने सध्या राजकीय वातावरण गढूळ होत आहे, काही वर्षांपूर्वी निवडणुकीच्या काळात दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्यावर सुद्धा अशीच कारवाई झाली होती, मात्र त्या कारवाई नंतर धानोरकर यांनी राजकारणात दमदार पुनरागमन करीत भाजपचे केंद्रीय गृहराज्यमंत्री अहिर यांचा पराभव केला होता.

    इतक्या वर्षांनी पुन्हा त्या परिस्थितीची पुनरावृत्ती होताना दिसत आहे, यामुळे बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात विविध चर्चाना पेव फुटला असून संदीप गिर्हे निवडणूकित धानोरकर सारखेच जायंट किलर म्हणून उदयास येणार आहे. Shivsena ubt

    9 ऑक्टोबर सकाळी संदीप गिर्हे यांना पोलीस प्रशासन समोर जाऊन हद्दपारीच्या नोटीसीला उत्तर द्यायचे आहे.

  • Bsnl Internet Down : शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सरसावले शिवसेना जिल्हाप्रमुख गिर्हे

    Bsnl Internet Down : शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सरसावले शिवसेना जिल्हाप्रमुख गिर्हे

    Bsnl Internet Down मोदी सरकार केंद्रात आल्यावर त्यांनी डिजिटल इंडिया ची घोषणा केली होती, त्यानुसार प्रत्येक गावात इंटरनेट सेवांचे जाळे पसरविण्यात येतील असे सांगितले मात्र प्रत्यक्षात आजही ग्रामीण भागात इंटरनेट व्यवस्थित रित्या चालू नाही, असाच एक प्रकार चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुक्यात असणाऱ्या बेंबाळ या गावात बघायला मिळत आहे.

    अवश्य वाचा : 2 देशी कट्टे व चाकूने युवकावर हल्ला, राजुरा शहरात घडला हत्येचा थरार

    Bsnl internet down मागील 15 दिवसापासून गावातील बँक ऑफ इंडिया ची इंटरनेट सेवा बंद आहे, त्यामुळे नागरिकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे, रोज नागरिक बँकेत जात रांग लावतात मात्र आज सर्व्हर डाऊन आहे, पैसे काढता येणार नाही अशी सूचना नागरिकांना मिळत आहे, पेरणीच्या हंगामात इंटरनेट मुळे बँकेतील संपूर्ण व्यवहार ठप्प पडल्याने, शेतीसाठी लागणारे साहित्य खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना अडचण येत आहे.

    महत्त्वाचे : ऑनलाइन पीक विम्याची पावती कांग्रेस कार्यालयात जमा करा – कांग्रेसचे आवाहन

    सोबतच संजय गांधी निराधार योजनेचे पैसे सुद्धा रखडल्या गेले आहे, सदर बाब शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे यांना कळताच त्यांनी बँक व्यवस्थापकाशी चर्चा करीत नेमकी अडचण जाणून घेतली, Bsnl तर्फे बँकेला सेवा सुरू होणार काम सुरू असे सांगण्यात येते मात्र प्रत्यक्षात त्यांच्याकडून असे काही काम करण्यात येत नसल्याने बँक व शेतकरी यांना अडचण निर्माण होत आहे.

    सदर बाब शेतकरी बांधवांच्या आर्थिक अडचणीची असल्याने संदीप गिर्हे यांनी थेट bsnl महाप्रबंधक यांचे कार्यालय गाठले, त्यांना निवेदनातून सदर बाब स्पष्ट केली असता त्यानंतर त्यांनी कार्यालयाला इंटरनेट सेवा तात्काळ सुरू करण्याचे निर्देश दिले.

    अवश्य वाचा : चंद्रपूर – मूल मार्गावर भीषण अपघात, प्रवासी बचावले, अनियंत्रित बस ची समोरासमोर धडक

    याबाबत माहिती मिळाली नसती तर आजही बँकेतील इंटरनेट सेवा बंद राहिली असती प्रशासन शेतकऱ्यांच्या या महत्वाच्या हंगामात सुद्धा काम करू देत नाही, अशी बाब पुढे आल्यावर संदीप गिर्हे यांनी आपली तळमळ दाखवली, आणि शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पुढे सरसावले.

    यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे, विकास विरुटकर, इलियास शेख, सिकंदर खान, विनय धोबे, शुभम मालुसरे, सुरज घोंगे, करण वैरागडे, गिरीश कटारे, ज्ञानेश्वर लोनगाडगे सह ईतर शिवसैनिक उपस्थित होते.

  • Sandip Girhe : बल्लारपूर शहर कांग्रेस उपाध्यक्षाचा शिवसेना ठाकरे गटात प्रवेश

    Sandip Girhe : बल्लारपूर शहर कांग्रेस उपाध्यक्षाचा शिवसेना ठाकरे गटात प्रवेश

    News34 chandrapur

    चंद्रपूर – शिवसेना पक्षासाठी महत्त्वपूर्ण घडामोडींमध्ये पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे आणि चंद्रपूर शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिऱ्हे यांनी काँग्रेस कमिटीचे शहर उपाध्यक्ष सतीश नंदाराम यांचा आज शिवसेनेत पक्षप्रवेश केला.. चंद्रपूर शिवसेना जिल्हा कार्यालयात हा कार्यक्रम झाला, जिथे नंदाराम यांचे गिर्हे यांनी शिवबंधन आणि दुपट्टा घालून स्वागत केले. Shiv sena

     

    पक्षप्रवेेेश वेळी उपजिल्हाप्रमुख सिक्की यादव, चंद्रपूर विधानसभा प्रमुख प्रमोद पाटील, युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे यांची उपस्थिती होती. शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिऱ्हे यांनी गेल्या पाच वर्षांत चंद्रपूर जिल्ह्यात संघटना बांधणीत मोलाचा वाटा उचलला आहे. Uddhav balasaheb thackeray

     

    त्यांच्या प्रयत्नांमुळे ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागात पक्षाची लोकप्रियता वाढत आहे आणि त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवणारे विविध राजकीय पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते आकर्षित झाले आहेत. पक्षात नुकतीच झालेली ही भर म्हणजे चंद्रपुरात शिवसेनेचा सुरू असलेला वेग आणि विस्तार. अधिकाधिक व्यक्तींनी त्याची दृष्टी ओळखून स्वतःला त्याच्या तत्त्वांशी जुळवून घेतल्याने पक्षाचा विकास होत आहे. Sandip girhe

     

    संदीप गिर्हे यांच्या नेतृत्वाखाली, पक्ष आपली वाढ सुरू ठेवण्यासाठी आणि जिल्ह्यात अर्थपूर्ण प्रभाव पाडण्यासाठी तयार आहे. लोकांची सेवा करण्याची आणि त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्याची शिवसेनेची बांधिलकी अनेकांना ऐकू येत आहे, ज्यामुळे समर्थन आणि सदस्यसंख्या वाढली आहे. Shivsena ubt

     

    पक्ष विविध पार्श्वभूमीतील नेते आणि कार्यकर्त्यांना आकर्षित करत असल्याने, चंद्रपूरमधील एक मजबूत राजकीय शक्ती म्हणून पक्षाने आपले स्थान अधिक मजबूत केले आहे. सतीश नंदाराम यांचा शिवसेना पक्षात समावेश हा पक्षाच्या सर्वसमावेशक दृष्टिकोनाचा आणि समाजाच्या भल्यासाठी काम करण्याचे समान ध्येय असलेल्या व्यक्तींना एकत्र आणण्याच्या क्षमतेचा पुरावा आहे. संदीप गिऱ्हे यांच्यासारख्या नेत्यांनी नेतृत्व केल्याने शिवसेना चंद्रपुरात उज्ज्वल भवितव्यासाठी सज्ज झाली आहे. Leadership

  • Shivsena Chandrapur News : शिवसेनेच्या स्नेहमीलन कार्यक्रमात महिलांची लक्षणीय उपस्थिती

    Shivsena Chandrapur News : शिवसेनेच्या स्नेहमीलन कार्यक्रमात महिलांची लक्षणीय उपस्थिती

    News34 chandrapur

    बल्लारपूर:- बल्लारपूर येथील मंगलमूर्ती लॉन येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख माननीय श्री संदिप भाऊ गिऱ्हे यांचे संकल्पनेतून महिला शिवसेना आघाडी च्या वतीने महिला विधानसभा समन्वयक कल्पना ताई गोरघाटे, नगरसेविका रंजीता ताई बीरे, तालुका अध्यक्ष मीनाक्षी ताई गलघट, शहर अध्यक्ष ज्योती ताई गेहलोत, माजी नगरसेविका सुवर्णाताई मुरकुटे, युवती सेना शहर अध्यक्षा अंजली ताई सोमबंसी,करुणाताई शेगोकार, लावारी उपसरपंच राजुरकर ताई, उप शहर अध्यक्षा वैष्णवी ताई लिचोडे, प्रगती ताई झुल्लारे, ज्योतीताई गुप्ता, व इतर महिला पदाधिकारी तसेच कार्यकर्ते यांच्या माध्यमातून मकर संक्रांतीच्या निमित्ताने महिला मेळावा व हळदी कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात हजारोच्या संख्येने महिलांनी सहभाग घेतला.

     

     

    कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा प्रमुख संदीप भाऊ गिऱ्हे, उपजिल्हा प्रमुख सिक्की भैय्या यादव, तालुका प्रमुख प्रकाश भाऊ पाठक, युवासेना समन्वयक प्रदीप भाऊ गेडाम, शहर प्रमुख बाबा शाहू ,डॉ. हजारे मॅडम, अधिवक्ता मेघा भाले, मुख्यध्यापिका शमीम मॅडम या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या प्रसंगी जिजा फाँऊडेशन अध्यक्षा मनस्वी ताई गिऱ्हे यांची प्रमुख उपस्थिती लाभली व त्यांनी आपले मनोगत व्यक्त करत महिलांना सक्षम करण्यासाठी आम्ही नेहमीच पुढाकार घेत असतो , सर्वानी मिळून मिसळून राहणे गरजेचे आहे तसेच आपल्या भागातील महिलांच्या कोणत्याही समस्या असतील तर आम्ही तुमच्या सोबत कायम आहोत असे आश्वासन दिले. या कार्यक्रमात महिला आघाडीच्या वतीने महिलां साठी विविध उपक्रम, विविध स्पर्धा तसेच हळदी कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले व विविध स्पर्धांमध्ये विजयी अनेकांनी यश मिळवले.

     

    या कार्यक्रमात बल्लारपूर शहरातील तसेच ग्रामीण भागातील महिलांनी हजारो च्या संख्येने सहभाग घेतला. या कार्यक्रमामुळे महिलांमध्ये उत्साह निर्माण झाला. कार्यक्रमास मार्गदर्शन करतानी जिल्हा प्रमुख संदीप भाऊ गिऱ्हे व उपजिल्हा प्रमुख सिक्की यादव यांनी सर्व महिला पदाधिकारी तसेत महिलांचा व मंगल मुर्ती लॉन च्या संचालक प्रशांत मेश्राम यांचे आभार प्रकट केले. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी उप शहर प्रमुख आनंद हनमंत्तु , सचिन अंबादे,रामू मेदरवार, शेख युसूफ, प्रभाकर मुरकुटे,दिनेश लिचोडे , बॉबी कादासी, सुरेंद्र संधू,प्रेम गेहलोत,अनिकेत बेलखोडे, सोनु श्रीवास,अबील जोग, सोनू बेनी, सुधीर कालापेल्ली, मल्लेश अण्णा, धर्मा बानोत , तुलसी बानोत, सह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे महिला पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांनी मोलाचे सहकार्य केले.

  • Shivsena Thackeray Group : असंख्य युवकांचा शिवसेना पक्षात प्रवेश

    Shivsena Thackeray Group : असंख्य युवकांचा शिवसेना पक्षात प्रवेश

    Shivsena Thackeray Group पोंभुर्णा : शिवसेना पक्षाच्या ध्येय धोरणावर व महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवत. शिवसेना चंद्रपूर जिल्हा प्रमुख संदीप गिरहे, युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे यांच्या मार्गदर्शनात व तालुकाप्रमुख आशिष कावटवार यांच्या नेतृत्वात देवाडा बुज येथील असंख्य युवकांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला.

    12 वी शिक्षण पूर्ण झालं तर हा अभ्यासक्रम निवडा

    Shivsena thackeray group पक्षप्रवेश कार्यक्रमात युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे यांनी पक्षाचे ध्येयधोरणे व आज राजकारणात युवकांचा सहभाग अत्यन्त गरजेचे असल्याचे सांगितले.

    पोम्भूर्ण तालुका प्रमुख आशिष कावटवार यांनी ज्यापद्धतीने शिवसेना जिल्हाप्रमुख गिर्हे पक्ष वाढीसाठी अहोरात्र मेहनत करीत आहे त्यासारखं आपल्याला सुद्धा शिवसेना पक्ष वाढीसाठी प्रयत्न करायचे असे असे स्पष्ट केले.

    आयोजित पक्षप्रवेश कार्यक्रमात असंख्य युवक उपस्थित होते.

    आगामी विधानसभा निवडणुकीत बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातून शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे राज्याचे वनमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या विरोधात लढण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे, त्यापूर्वी आतापासून संदीप गिर्हे बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात शिवसैनिकांची फौज तैयार करीत आहे.

    सध्या विविध ठिकाणी कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी संघटना मजबुतीकरण हे काम गिर्हे सातत्याने करीत आहे, विधानसभा, जिल्हा परिषद, नगरपालिका व महानगरपालिका क्षेत्रात शिवसेना आपला भगवा फडकवल्याशिवाय राहणार नाही असा निर्धार शिवसैनिकांनी केला आहे.

    बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील नागरिकांना हक्काचा नेता मिळावा अशी आशा नागरिकांनी आपल्या मनात ठेवली आहे, त्याकरिता संदीप गिर्हे हे मेहनत करीत कार्यकर्ता व संघटन जोमात वाढवीत आहे.

  • Residential Ashram School : भाजप नेत्याच्या निवासी आश्रम शाळेतील 12 वर्षीय मुलीचा मृत्यू

    Residential Ashram School : भाजप नेत्याच्या निवासी आश्रम शाळेतील 12 वर्षीय मुलीचा मृत्यू

    News34 chandrapur

    चंद्रपूर – जिल्ह्यातील मूल तालुक्यातील सुशी दाबगाव येथील जिजामाता प्राथमिक निवासी आश्रम शाळेतील वर्ग 7 वि मध्ये शिकणारी 12 वर्षीय मिताली केशव कोंडागुर्ले चा संशयास्पद मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली.

    मृतक विद्यार्थिनी ही गडचिरोली जिल्ह्यातील मरपल्ली गावातील निवासी आहे, विशेष बाब म्हणजे शाळेतील प्रबंधकाने मिताली चा मृत्यू झाल्यावर सदर बाब तिच्या कुटुंबाला सांगितली. Residential Ashram School

     

    मागील 6 दिवसापासून मिताली ची प्रकृती बरी नव्हती, मात्र शाळा व्यवस्थापनाने याकडे दुर्लक्ष केले, 31 जानेवारीला शाळेतील सांस्कृतिक कार्यक्रमात मिताली ने सहभाग घेतला होता, सोमवारी कार्यक्रमाची तयारी करीत असताना मिताली अचानक कोसळली, त्यानंतर तिला प्राथमिक उपचार केंद्रात नेण्यात आले, त्यानंतर मूल उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले असता डॉक्टरांनी तिला चंद्रपूर रेफर केले, मात्र चंद्रपुरात पोहचण्याआधी वाटेत मिताली चा मृत्यू झाला.

     

    याबाबत शाळेतील मुख्याध्यापक यांनी कुटुंबाला कसलीही माहिती दिली नाही, मिताली चा मृत्यू झाल्यावर तिच्या कुटुंबाला याबाबत माहिती देण्यात आली, ही बाब संदेह उपस्थित करणारी आहे.

     

    याप्रकरणात शिवसेना ठाकरे गट जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे यांनी शाळेतील शिक्षकावर कारवाई करीत शाळेची मान्यता रद्द करण्याची मागणी केली आहे.
    शाळा व्यवस्थापनाने मिताली च्या तब्येतीकडे दुर्लक्ष केले, याबाबत आम्ही लवकरच पत्रकार परिषद घेणार असल्याची माहिती गिर्हे यांनी दिली.

     

    विशेष म्हणजे ही आश्रमशाळा चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा भाजप नेत्या संध्या गुरनुले यांची आहे, त्यामुळे सदर प्रकरणात कमालीची गुप्तता पाळली गेली.

     

    मिताली चे शवविच्छेदन झाल्यावर आई-वडील गावी मृतदेह नेत असताना त्याठिकाणी चंद्रपूर शहर पोलीस निरीक्षक सतीशसिंह राजपूत दाखल झाले, आधीच मुलगी गेल्याचा कोंडागुर्ले दाम्पत्याला धक्का पोहचला होता आणि त्यामध्ये पोलीस निरीक्षकांनी गडचिरोली जिल्ह्यातील छोट्याशा गावातून मुलीचा मृतदेह नेण्यासाठी दाखल झालेल्या नातेवाईकांना निघा इथून म्हणून त्यांना दम दिला, मुलीचा मृत्यू कसा झाला? त्याबाबत कुटुंबाला माहिती नाही आणि पोलीस निरीक्षकाच्या अश्या वागण्याने खाकी ची माणुसकी संपली की काय? असा प्रश्नचिन्ह यावेळी उपस्थित होतो.

    याबाबत संस्था अध्यक्ष संध्या गुरनुले यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी शाळेची चूक नसल्याचे सांगितले.

    हलगर्जीपणा केला नाही : संध्या गुरनुले
    याबाबत आश्रमशाळेच्या संस्थेच्या अध्यक्ष तसेच जिल्हा परिषदच्या माजी अध्यक्ष संध्या गुरनुले यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी ही घटना दुर्दैवी असून यात हलगर्जीपणा बाळगला नसल्याचे त्यांनी सांगितले. मुलीची तब्येत बरी नव्हती तेव्हा तिला प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेले होते. औषध दिल्यावर तिच्यात सुधारणा झाली होती. यानंतर सोमवारी नृत्याचा सराव करताना तिला चक्कर आली. तिला मूल येथील उपजिल्हा रुग्णालयात हलविले मात्र तिची प्रकृती गंभीर असल्याने तिला चंद्रपूर येथे रेफर करण्यात आले मात्र वाटेत तिचा मृत्यू झाला. याबाबतची माहिती मुलीच्या कुटुंबाला देण्यात आली होती. मात्र मृत्यूचे नेमके कारण हे शवविच्छेदन अहवालातुनच समोर येणार आहे, असे त्या म्हणाल्या.

     

    या प्रकरणी मूल पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे, प्रकरणाचा पुढील तपास मूल पोलीस करीत आहे.

  • आमदार अपात्रता निकाल – चंद्रपुरात शिवसेनेचे निषेध आंदोलन

    आमदार अपात्रता निकाल – चंद्रपुरात शिवसेनेचे निषेध आंदोलन

    Mla Disqualification result  चंद्रपूर –  निकालाच्या सत्ता संघर्षानंतर विधानसभेचे अध्यक्ष नार्वेकरांनी निकाल शिवसेना शिंदे गटाच्या बाजूला दिल्यामुळे शिवसेना ठाकरे गट मोठ्या प्रमाणात आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.

    महाराष्ट्रात ठिकठिकाणी आंदोलन होत आहे आहेत अशाच प्रकारच आंदोलन चंद्रपुरात आज शिवसेना ठाकरे गटाकडून करण्यात आलेला आहे. Mla Disqualification result

    भद्रावती नगरपरिषद निवडणुकीत महिलांचा संताप 

    यावेळी केंद्र सरकार, शिवसेना शिंदे गट व विधानसभेचे अध्यक्ष नार्वेकर यांचा निषेध करीत आंदोलन करण्यात आले यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष संदीप गिरे व त्याचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

    शिवसेना जिल्हाप्रमुख संदिप गिऱ्हे यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निकालावर थेट आक्षेप घेतला आहे.

    गिऱ्हे यांनी म्हटले आहे की, जर अध्यक्षांना शिवसेनेची २०१८ ची घटना (ज्यामध्ये पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांची निवड झाली) अमान्य असेल आणि ती घटनाबाह्य ठरवली असेल, तर त्याच घटनेवर आधारित पक्षप्रमुखांनी दिलेला ‘ए-बी’ फॉर्म घेऊन एकनाथ शिंदे आणि त्यांचे आमदार २०१९ मध्ये निवडून आले, हे कसे काय घटनाबाह्य ठरवले जात नाही? अध्यक्षांनी एकाच घटनेचे दोन वेगवेगळे निकष लावले आहेत. एकीकडे २०१८ ची घटना नाकारायची आणि दुसरीकडे त्याच घटनेच्या आधारावर निवडून आलेल्या आमदारांची वैधता मान्य करायची, हा न्याय विसंगत आहे. नार्वेकर यांच्या निकालावर आम्ही हा कायदेशीर प्रश्न उपस्थित करतो.

  • पोम्भूर्ण्यातील या ग्रामपंचायतीवर शिवसेना ठाकरे गटाचे वर्चस्व

    पोम्भूर्ण्यातील या ग्रामपंचायतीवर शिवसेना ठाकरे गटाचे वर्चस्व

    News34 chandrapur

    पोंभूर्णा :- वेळवा माल ग्रामपंचायतीवर शिवसेना (उबाठा)ची सत्ता असून ठल्याप्रमाणे अडीच- अडीच वर्षासाठी सरपंचपदाची वाटाघाटी करून आज झालेल्या निवडणुकीत सरपंचपदी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे जितेंद्र मानकर यांची बुधवारी बिनविरोध निवड करण्यात आली.शिवसेना कार्यकर्त्यांनी मानकर यांची बिनविरोध निवड जाहीर करताच फटाके व गुलाल उधळत आपला आनंद साजरा केला.

     

    वेळवा गट ग्राम पंचायतीच्या सरपंच सिमा निमसकार यांनी आपसात ठरल्याप्रमाणे आपल्या सरपंच पदाचा राजीनामा दिला होता.त्यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या सरपंच पदासाठी बुधवारी ग्राम पंचायत वेळवा माल कार्यालयात सरपंच पदासाठी निवडणूक घेण्यात आली.

     

    यावेळी सरपंच पदासाठी जितेंद्र मानकर यांचा एकमेव उमेदवारी अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी तथा पंचायत समितीचे विस्तार अधिकारी अमरदिप खोडके, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी ग्रामसेवक विकास तेलमासरे यांनी जितेंद्र मानकर यांची बिनविरोध निवड जाहीर केली.यावेळी सदस्य व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.सरपंच पदी निवड झाल्यानंतर नवनियुक्त सरपंच यांनी शिवसेना पक्षाचे जिल्हाप्रमुख संदिप गिऱ्हे व शिवसेना तालुका प्रमुख आशिष कावटवार,गणेश वासलवार निलेश लोणारे यांच्या नेतृत्वाखाली व गावकऱ्यांनी दाखविलेल्या विश्वासाला कधीही तडा जाऊ न देता गावच्या विकासासाठी सदैव प्रयत्न करेन अशी प्रतिक्रिया यावेळी नवनिर्वाचित सरपंच जितेंद्र मानकर यांनी दिली आहे.

     

    यावेळी शिवसेना उबाठा चे तालुका प्रमुख आशिष कावटवार,शहर प्रमुख गणेश वासलवार ,नगरसेवक बालाजी मेश्राम,माजी सरपंच सीमा निमसकार, सदस्य अतुल जाधव, सुरेखा कुडमेथे, निता येरमे, ममता जाधव,रमेश कुडमेथे, समीर लोणारे, मुना लोणारे, वनवासू येरमे माजी सरपंच, मधुकर मेश्राम,विलास कामिडवार,अनिल निमसकार,भाऊजी कुडमेथे प्रशांत कावटवार,अनिल मडावी,सतीश लोणारे,विनोद खोब्रागडे,प्रशिक मानकरयांची उपस्थिती होती.

  • चंद्रपुरात शिवसैनिकांनी पीकविमा कार्यालयाची केली तोडफोड

    चंद्रपुरात शिवसैनिकांनी पीकविमा कार्यालयाची केली तोडफोड

    News34 chandrapur

    चंद्रपूर : शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आंदोलन करीत असलेले उबाठा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संदिप गिऱ्हे यांच्या आंदोलनाची प्रशासन व शासनाकडून कोणतेही दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे आंदोलक शिवसैनिकांचा संयम सुटला असून, सोमवारी दुपारी शिवसैनिकांनी चंद्रपूर जिल्हा पीक विमा कंपनीच्या कार्यालयात धाव घेत कार्यालयातील साहित्याची तोडफोड केली.

    विशेष म्हणजे, प्रशासनाने व शासनाने शेतकऱ्यांच्या प्रश्नांची दखल न घेतल्यास विमा कंपनीचे ऑफिस फोडू, असा इशारा शिवसेना जिल्हाप्रमुख संदिप गिऱ्हे यांच्याकडून देण्यात आला होता.अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यात यावी, जिल्हा दुष्काळ जाहीर करावा, या मागणीसाठी शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर आंदोलन केले आहे. जिल्ह्यातील महसूल मंडळांकडून अतिवृष्टीत बाधितचा अहवाल देऊन ही. अन्य मंडळांमध्येही अतिवृष्टी आणि पुराच्या जबर तडाख्याने शेतकऱ्यांच्या शेतातील पीक जमीनदोस्त झाल्याने खरीप हंगामाच्या प्रारंभीच शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला.२ लाखच्या वरील हेक्टरवरील शेतीचे नुकसान झाले हाेते.

     

     

    अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक व शेत जमिनीच्या नुकसान भरपाईसाठी शासनाने मंजूर करावे. रब्बी हंगाम सुरू झाल्यानंतरही शेतकऱ्यांना खरीप हंगामातील नुकसानाचा मदत मिळालेली नाही. या नुकसान भरपाईसह शेतकऱ्यांच्या अन्य मागण्यांसाठी शिवसेनेचे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाला निवेदन देण्यात आला.यावेळी युवासेनेचे जिल्हाधिकारी विक्रांतभाऊ सहारे शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख सिक्कीभैय्या यादव , उपजिल्हा प्रमुख शालिक फाले , शहर प्रमुख बल्लारपूर प्रकाश पाठक माजी महानगर प्रमुख प्रमोदभाऊ पाटील , तालुका प्रमुख संतोषभाऊ नरुले ,तालुका प्रमुख मुलं प्रशांत गट्टूवार ,तालुका प्रमुख गोंडपिपरी सूरज माडूरवार, जिल्हा संघटिका उज्वलाताई नलगे, युवतीसेना जिल्हाधिकारी सौ रोहिणीताई पाटील, विनयभाऊ धोबे, सुमितभाऊ अग्रवाल, हेमराज बावणे, बाळूभाऊ भगत, बाबा साहू, राहुलभाऊ वीरूटकर, विकासभाऊ वीरूटकर, सिक्किभाई खान ,महेशभाऊ खंगार, रिझवानभाई पाठव, शहाबाज शेख, शिवा वझरकर , वैभव काळे गिरीशभाऊ कटारे पदाधिकारी व युवासेनेचे पदाधिकारी व महिला आघाडी व युवती सेना असंख्य प्रमाणात उपस्थित होते