Tag: शिव गर्जना

  • first day of school activities । 🥳 शाळेचा पहिला दिवस झाला खास – लेझीम, शिवगर्जना आणि स्वागत समारंभात रंगत!

    first day of school activities

    first day of school activities : चंद्रपूर, दि. 23 : ‘महाराज, राजनीती धुरंधर, प्रौढप्रताप पुरंदर, सिंहासनाधिश्वर, महाराजाधिराज, राजा शिवछत्रपती महाराजांचा, विजय असो…विजय असो…विजय असो…’ अशा पहाडी आवाजात 7 वी ची विद्यार्थीनी कार्तिकी मुंगले हिने शिवगर्जनेचा जयघोष केला आणि विद्यार्थ्यांचे शाळेत पहिले पाऊल पडले.

    दाताळा येथील पी.एम.श्री. जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांच्या प्रमुख उपस्थितीत जल्लोषपूर्ण वातावरणात विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव पार पडला. यावेळी शिक्षणाधिकारी (प्राथ.) अश्विनी सोनवणे, दाताळाच्या सरपंचा सुनिता देशकर, शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष सुमन दोनाडकर, शिक्षण विस्तार अधिकारी मनोज गौरकार, शाळेचे मुख्याध्यापक लटोरी मोहितकर, शिक्षिका सुनिता पावडे, वंदना वनकर, अर्चना चिंतावार, शिक्षक राजू लांजेकर, केशर चकोले यांच्यासह पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते. pm shri schools facilities

    चंद्रपूर पोलीस दलातील बदल्या, महिला पोलीस निरीक्षकांना साईड पोस्टिंग

    यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा म्हणाले, आजपासून शैक्षणिक सत्र 2025-26 ला सुरुवात झाली असून विद्यार्थ्यांसाठी आज अतिशय महत्वाचा दिवस आहे. पहिल्यांदा शाळेत पाऊल टाकण्याचा क्षण अविस्मरणीय असतो. त्याचे महत्व जीवनभर असते. शिक्षणामुळेच स्वत:चा, कुटुंबाचा तसेच सामाजिक, आर्थिक व सर्वांगीन विकास होण्यास मदत होते. सर्वांना चांगले शिक्षण देणे ही आपली प्राथमिकता आहे. कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही, असा शासनाचा मानस आहे.

    pm shri schools facilities

    जिल्हा परिषदेच्या शाळेत विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण द्यावे, जेणेकरून स्पर्धेच्या या युगात आपलाही विद्यार्थी पुढे राहील. आजचा विद्यार्थी हे उद्याचे भविष्य आहे. विद्यार्थी घडला तरच देश घडेल. शाळांच्या विकासासाठी जिल्हा प्रशासन निधीची कमतरता पडू देणार नाही. विद्यार्थ्यांनो, चांगला अभ्यास करा, तरच मोठ्या पदावर पोहचाल, असे म्हणत जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच पालकांनीसुध्दा मुलांना चांगले शिक्षण द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी शाळेकरीता मिळालेल्या स्मार्ट टीव्हीचे लोकार्पण जिल्हाधिका-यांच्या हस्ते करण्यात आले. district collector school visit news

    कार्यक्रमाचे संचालन वंदना वनकर यांनी तर आभार राजू लांजेकर यांनी मानले. यावेळी पालक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    महत्वाची क्षणचित्रे :

    1. नवीन प्रवेशित बालकांचे सजावट केलेल्या इनोव्हातून आगमन 2. जिल्हाधिकारी विनय गौडा यांची विद्यार्थ्यांसोबत हितगुज 3. लेझीम आणि बॅन्डच्या ठेक्यावर विद्यार्थ्यांचे वाजत-गाजत स्वागत 4. जिल्हाधिका-यांच्या हस्ते शाळेच्या परिसरात वृक्षारोपण 5. फित कापून तसेच दीप प्रज्वलनाने शैक्षणिक सत्राचा प्रारंभ 6. शिवगर्जनेत विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव. 7. नवीन बालकांच्या प्रवेशाच्या पाऊलखुणा 8. विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत. 9. जिल्हाधिका-यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना बॅग, पुस्तके आणि गणवेश वाटप.

    शाळेविषयी माहिती :

    दाताळा येथील पी.एम.श्री. जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत वर्ग 1 ली ते 8 वी पर्यंत एकूण 225 विद्यार्थी प्रवेशित आहेत. नवीन शैक्षणिक सत्र 2025-26 मध्ये 25 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. शाळेमध्ये मुलामुलींकरीता स्वतंत्र आणि स्वच्छ शौचालय, पिण्याच्या पाण्यासाठी दोन आर.ओ. मशीन, 7 वर्गखोल्यांमध्ये स्मार्ट टिव्ही, विज्ञान प्रयोगशाळा, स्टेम लॅब, गार्डन आदी सोयीसुविधा आहेत.