Tag: शिक्षण

  • Jhopa Kadha Andolan । मजुरांची रोजी हजार तर शिक्षकांची २६०? आप चे झोपा काढा आंदोलन

    Jhopa Kadha Andolan

    Jhopa Kadha Andolan : चंद्रपूर – २१ ऑगस्ट रोजी आम आदमी पक्षातर्फे संपूर्ण राज्यात शासकीय शाळांची दयनीय अवस्था व शिक्षण क्षेत्राबाबत उदासीन असलेल्या सरकार विरोधात झोपा काढा आंदोलन करण्यात आले. चंद्रपुरात महानगरपालिका समोर आप ने हे अभिनव आंदोलन करीत मनपा, स्थानिक लोकप्रतिनिधी यांचा शिक्षण क्षेत्राकडे असलेल्या दुर्लक्षाबाबत निषेध केला.

    चंद्रपुरात डीजे च्या लेझर लाईटवर बंदी, पोलीस अधीक्षकांचा आदेश

    या अभिनव आंदोलनात आप चे पदाधिकारी स्थानिक आमदार जोरगेवार यांचे मुखवटे घालून सामील झाले होते, चंद्रपूर शहरात मनपाच्या शासकीय शाळांची दुरावस्था होत आहे मात्र याकडे मनपा लक्ष देत नसून इतर कामांकडे जास्त लक्ष देत असल्याचा आरोप केला आहे.

    २६० रु रोजीचे शिक्षक?

    शहरातील ६० ते ७० वर्षे जुन्या शाळा बंद करण्याचा फर्मान मनपा काढत आहे तर दुसरीकडे आयुक्तांनी अजब ठराव पास केला कि २६० रुपये रोजी ने चंद्रपुरातील मनपा शाळेत शिक्षकांची नियुक्ती केल्या जाणार आहे, यावर आप जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार म्हणाले कि मजुरी करणाऱ्यांची रोजी हि ८०० रुपये ते हजार रुपये आहे मग शिक्षक इतक्या कमी पैश्यात मुलांचे भविष्य कसे घडविणार. AAP Jhopa protest against municipal neglect of schools

    इतर इव्हेन्ट मध्ये मनपा हजार रुपये रोजीने कामगारांना काम करायला लावतात मात्र मुलांचे भविष्य घडविणाऱ्या शिक्षकांना इतक्या कमी पैश्यात ठेवणे म्हणजे हा मुलांच्या भवितव्याशी चाललेला खेळ आहे. पालिकेने आपल्या वार्षिक बजेटमधून २५ टक्के शिक्षणावर खर्च करायला हवा, त्यानंतर शिक्षण प्रणाली चांगलीच सुधारेल, मात्र सरकार व मनपा प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे, म्हणून आम्ही या झोपलेल्या प्रशासनाचा निषेध करीत आंदोलन करीत आहो.

    आयोजित आंदोलनात आप चे प्रदेश सचिव सुनील मुसळे, जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार, युवा जिल्हाध्यक्ष राजू कुडे, महिला अध्यक्ष तबस्सुम शेख व इतर पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.