Tag: शासन निर्णय

  • teacher approval issue in Maharashtra । शाळांना मंजूर ‘शून्य शिक्षक’! अंधाधुंद निर्णयांनी शिक्षण व्यवस्था कोलमडली

    teacher approval issue in Maharashtra

    teacher approval issue in Maharashtra : चंद्रपूर : शैक्षणिक सत्र २०२४-२५ ची शिक्षक संचमान्यता राज्यातील बहुतांश शाळांना नुकतीच वितरीत करण्यात आलेली आहे. यात प्रामुख्याने संचमान्यतेत राज्यातील अनेक शाळांना शुन्य शिक्षक मंजूर झाल्यामूळे विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांसमोर गंभीर समस्या निर्माण झाली आहे. त्‍यामुळे दि. १५ मार्च २०२४ रोजीचा संचमान्यतेबाबतचा अन्यायकारक शासन निर्णय रद्द करण्याबाबत आमदार सुधाकर अडबाले यांच्या नेतृत्‍वात विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांच्या कार्यालयासमोर नुकतेच एक दिवसीय विदर्भस्तरीय धरणे / निदर्शने आंदोलन करण्यात आले. zero teacher sanction schools in Maharashtra

    Powered by myUpchar

    चंद्रपुरात पेव्हर्स ची चोरी, आप ने केली तक्रार

    या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर विमाशि संघाचे सरकार्यवाह तथा आमदार सुधाकर अडबाले यांनी मंत्रालयात शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकजजी भोयर, प्रधान सचिव श्री. रणजीत देओल, उपसचिव श्री. तुषार महाजन यांची भेट घेऊन विषयाची गंभीरता लक्षात आणून दिली.

    zero teacher sanction schools in maharashtra

    दि. २८ ऑगस्ट २०१५ च्या शासन निर्णयानुसार यापूर्वीचे संच निर्धारण होत होते. त्याप्रमाणेच शैक्षणिक सत्र २०२४-२५ चे संच निर्धारण करण्यात यावे व दि. १५ मार्च २०२४ रोजीचा शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा अन्यायकारक शासन निर्णय रद्द करावा, या प्रमुख मागणीसाठी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने झालेल्या धरणे/ निदर्शने आंदोलनाचे निवेदन आमदार सुधाकर अडबाले यांनी शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकजजी भोयर, प्रधान सचिव श्री. रणजीत देओल यांना दिले व शिक्षकांवर अन्‍याय करणारा सदर शासन निर्णय रद्द करावा, अशी मागणी लावून धरली. 

  • तो शासन निर्णय रद्द करा – आमदार सुधाकर अडबाले

    News34 chandrapur

     

    चंद्रपूर : राज्यातील प्रशासनावरील खर्च आटोक्यात ठेवून विकासकामांसाठी पुरेसा निधी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने विविध विभागातील कामे ही बाह्ययंत्रणेमार्फत करून घेण्यात येणार आहे. यात शाळा, कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची पदेही कंत्राटी तत्वावर भरण्याचा समावेश आहे. या शासन निर्णयाला विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे सरकार्यवाह तथा शिक्षक आमदार सुधाकर अडबाले यांनी तीव्र विरोध दर्शविला आहे.

     

    राज्यात एकीकडे ‘पवित्र पोर्टल’च्या माध्यमातून शिक्षकभरती प्रक्रिया राबवण्यात येत असताना, दुसरीकडे शिक्षक आणि सहाय्यक शिक्षक बाह्ययंत्रणेद्वारे उपलब्ध करून दिले जाणार आहेत. शिक्षक हे समाजाचे आधारस्तंभ असतात. शिक्षकांच्या कंत्राटी तत्त्वावर नियुक्ती केल्यास विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होईल. शिक्षकांना स्थिरता मिळणार नाही. त्यामुळे शिक्षकांमध्ये अस्थिरता निर्माण होईल. यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर विपरीत परिणाम होईल.

     

    प्रशासकीय खर्च आटोक्यात ठेवून विकासकामांना पुरेसा निधी उपलब्ध होण्यासाठी शक्य तिथे बाह्ययंत्रणेद्वारे काम करून घेण्याचे राज्य सरकारचे धोरण आहे. त्यानुसार नऊ खासगी सेवापुरवठादार कंपन्यांमार्फत मनुष्यबळ उपलब्ध करण्याबाबत उद्योग, ऊर्जा, कामगार आणि खनिकर्म विभागाने शासन निर्णय ६ सप्‍टेंबर २०२३ रोजी निर्गमित केला.

     

    आमदार अडबाले यांनी सरकारला आवाहन केले की, शिक्षकांच्या कंत्राटी तत्त्वावर नियुक्ती करण्याचा शासन निर्णय तात्‍काळ रद्द करावा. शिक्षकांना कायमस्वरूपी नियुक्ती द्यावी. शिक्षकांची बाह्ययंत्रणेद्वारे कंत्राटी तत्त्वावर नियुक्ती केल्यास शिक्षकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागेल. शिक्षकांना नोकरीच्या सुरक्षिततेची हमी मिळणार नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर विपरीत परिणाम होईल. आमदार अडबाले यांनी सरकारला या शासन निर्णयावर पुनर्विचार करण्याचे आवाहन केले असून विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाने विरोध दर्शविला आहे.