Tag: रेल्वे अतिक्रमण

  • Sudhir Mungantiwar on railway encroachment । चंद्रपूरमधील रेल्वे अतिक्रमणधारकांसाठी 900 नवीन घरे!

    Sudhir Mungantiwar on railway encroachment

    रेल्वे अतिक्रमण प्रकरणी मुनगंटीवारांचा पुढाकार, म्हाडाची घरे लवकरच

    Sudhir Mungantiwar on railway encroachment : चंद्रपूर, दि. 3: चंद्रपूर शहरातील रेल्वे अतिक्रमणधारकांच्या पुनर्वसनासाठी ठोस उपाययोजना करण्यात येत असून, यासंदर्भात आ.सुधीर मुनगंटीवार यांची केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे महत्त्वपूर्ण चर्चा झाली. शहरातील रेल्वे स्टेशन यार्ड, सावरकर नगर, रयतवारी आणि लखमापूर परिसरातील अतिक्रमणधारकांसाठी पर्यायी घरे उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने मध्य रेल्वेचे मुख्य महाप्रबंधक धर्म वीर मीना यांनाही पत्र पाठवून चंद्रपूर शहर व परिसरातील रेल्वे अतिक्रमणधारकांना पर्यायी घरे उपलब्ध करून देण्यासंदर्भात मुंबई येथे बैठक घेऊन चर्चा उपस्थित केली होती. railway housing project in Chandrapur

    चंद्रपूर जिल्ह्यात वाघाची दहशत, आतापर्यंत १३ नागरिकांची शिकार

    चंद्रपूर शहरातील रेल्वे अतिक्रमणधारकांच्या पुनर्वसनासाठी सकारात्मक पावले उचलल्या जात असून अतिक्रमणधारकांना पर्यायी घरे उपलब्ध करून देण्यात येईल अशी ग्वाही, राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

    नियोजन भवन येथे आढावा

    नियोजन भवन सभागृह येथे रेल्वे अतिक्रमणधारकांना पर्यायी घरे उपलब्ध करून देणे व इतर समस्या संदर्भात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते.यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा, उपविभागिय अधिकारी संजय पवार, तहसीलदार विजय पवार, रेल्वे विभागाचे सहाय्यक मंडळ अभियंता सुबोध कुमार, कार्यकारी अभियंता नवीन शर्मा, उपकार्यकारी अभियंता योगेंद्र कुमार तसेच नागरिकांची उपस्थिती होती. alternative housing for railway encroachers

    आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार म्हणाले, चंद्रपूर शहरात सध्या तिसरी रेल्वेलाईन टाकण्याचे काम प्रगतीपथावर असून, या प्रकल्पात सुमारे 640 घरे बाधित होणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली. मात्र, रेल्वे प्रशासनाने कोणतेही काम जबरदस्तीने न करता नागरिकांच्या सहकार्याने पार पाडावे, असे स्पष्ट निर्देश आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी रेल्वे प्रशासनाला दिले. या प्रकल्पादरम्यान बाधित होणाऱ्या 68 घरांचे सर्वेक्षण करून, संबंधित नागरिकांशी बैठक घ्यावी. तसेच रेल्वे विभागाने अतिक्रमण हटविण्यापूर्वी पुनर्वसनाची ठोस व्यवस्था करावी. या पुनर्वसनासाठी म्हाडा येथील उपलब्ध घरांची पाहणी करण्यात येईल. MHADA homes for displaced families Chandrapur

    alternative housing project in chandrapur

    ९०० घरे उपलब्ध होणार

    महानगरपालिकेने रेल्वे लाईनमधून जाणाऱ्या नाल्यांची योग्यरीत्या स्वच्छता करावी. तसेच जिल्हा प्रशासनाने अतिक्रमित घरांची सविस्तर यादी तयार करावी. रेल्वे लाईनसाठी नेमण्यात आलेल्या कंत्राटदाराने सीएसआर (CSR) अंतर्गत स्थानिक विकासासाठी निधी खर्च करावा. दरम्यान, रेल्वे विभागामार्फत येत्या दोन महिन्यांत अतिक्रमित 68 घरे हटविण्यात येणार असून, संबंधित नागरिकांना म्हाडामार्फत 100 घरे तातडीने उपलब्ध करून देण्यात येतील. पुढील दीड वर्षाच्या कालावधीत टप्प्याटप्याने एकूण 900 घरे नागरिकांना उपलब्ध करून देण्यात येईल असेही ते म्हणाले.

    या संपूर्ण प्रक्रियेस गती देण्यासाठी लवकरच केंद्रीय रेल्वेमंत्री आणि मा. मुख्यमंत्री यांच्यासोबत झूमद्वारे उच्चस्तरीय बैठक घेण्यात येणार असल्याचेही आमदार श्री.सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

    सर्व नागरिकांना कठीण व मानसिक तणावाच्या परिस्थितीतून बाहेर काढल्याबद्दल नागरिकांनी आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांचे मनःपूर्वक आभार मानले.

  • Railway land encroachment rehabilitation । रेल्वे अतिक्रमणधारकांसाठी मिळणार नव्या घरांचा ठराव, जाणून घ्या काय होणार?

    Railway land encroachment rehabilitation

    Railway land encroachment rehabilitation – चंद्रपूर : केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे झालेल्या चर्चेनुसार, चंद्रपूर शहरातील रेल्वे स्टेशन यार्ड, सावरकर नगर, रयतवारी आणि लखमापूर परिसरातील अतिक्रमणधारकांच्या पुनर्वसनासंदर्भात बैठक आयोजित करण्याची मागणी राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी केली होती. या संदर्भात त्यांनी मध्य रेल्वेचे मुख्य महाप्रबंधक यांना पत्र पाठवून मुंबई येथे बैठक घेण्याची विनंती केली होती. चंद्रपूर शहर व परिसरातील रेल्वे अतिक्रमणधारकांना नवीन घरे उपलब्ध करून देण्याच्या संदर्भात मध्य रेल्वेचे मुख्य महाप्रबंधक श्री. धर्म वीर मीना यांच्यासोबत बैठक पार पडली. Chandrapur railway land dispute

    केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या निर्देशांनुसार ही बैठक घेण्यात आली. यामध्ये ९०० घरे हटविण्याचा रेल्वेचा मानस असल्याचे सांगण्यात आले. विशेष म्हणजे आ. श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारामुळेच बैठक घेण्यात आली.

    चंद्रपूर शहरातील व आजूबाजूच्या भागातील २५ वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या नागरिकांचा निवारा हिरावला जाऊ नये, यासाठी सकारात्मक निर्णय घेण्याची विनंती आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी मध्य रेल्वेचे मुख्य महाप्रबंधक श्री. धर्म वीर मीना यांच्याकडे केली. या चर्चेवर सकारात्मक प्रतिसाद देत, रेल्वे विभाग नागरिकांच्या पुनर्वसनाबाबत संवेदनशील असून लवकरच योग्य निर्णय घेतला जाईल, असे मध्य रेल्वेचे मुख्य महाप्रबंधक श्री. धर्म वीर मीना यांनी आश्वासित केले. Railway station yard encroachment removal

    Chandrapur railway land dispute

    त्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना मुनगंटीवार यांच्यामुळे मिळाला न्याय

    मुंबई येथे पार पडलेल्या बैठकीत यावेळी मध्य रेल्वेचे मुख्य महाप्रबंधक श्री धर्म वीर मीना, डॉ. मंगेश गुलवाडे, अजय दुबे, अनिल डोंगरे,अमित निरंजने, राकेश बोमनवार, होमेश्वर नंदनवार, महेश झिटे सुभान पठाण आणि सुरेंद्र मंचलवार तसेच या महत्त्वपूर्ण बैठकीस जिल्हाधिकारी, नागपूरचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी झूमद्वारे उपस्थित होते.

    चंद्रपूर शहरात नवीन रेल्वे लाईन टाकण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. ही नवीन रेल्वे लाईन जिल्ह्याच्या विकासासाठी निश्चितच महत्त्वपूर्ण ठरणार आहे. मात्र, चंद्रपूर शहरातील सावरकर नगर, रेल्वे स्टेशन यार्ड, रयतवारी, लखमापूर या भागांतील रेल्वे विभागाच्या जमिनीवर गेल्या २५ वर्षांपासून काही मजूरांनी पक्की घरे बांधलेली आहेत. रेल्वे विभागाकडून या अतिक्रमणधारकांना अतिक्रमण हटविण्यासाठी नोटिसा बजावण्यात आलेल्या आहेत. चंद्रपूर शहराच्या चारही बाजूंनी विविध उद्योग सुरू असल्यामुळे येथे मोठ्या प्रमाणावर मजूर वास्तव्य करत आहेत. त्यांनी रेल्वे विभागाच्या जागेवर पक्की घरे बांधली आहेत. या अतिक्रमणधारकांचे पुनर्वसन करून त्यांच्या राहण्यासाठी नवीन घरे उभारणे अत्यंत आवश्यक आहे. Chandrapur new railway line development

    आ. श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात मुंबई येथे रेल्वेचे मुख्य महाप्रबंधक श्री. धर्म वीर मीना यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीमध्ये शिष्टमंडळ उपस्थित होते. यामध्ये. या बैठकीत चंद्रपूर रेल्वे स्टेशन वार्ड, सावरकर नगर, रय्यतवारी आणि लखमापूर परिसरातील अतिक्रमणधारकांच्या पुनर्वसनाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.