Tag: रानटी हत्ती

  • two elephants kill 60 year old in Sindewahi । 🆘 थरारक! हत्तींच्या हल्ल्याने सिंदेवाही परिसरात खळबळ – वृद्धाला उचलून फेकलं, चिरडून मारलं

    two elephants kill 60 year old in Sindewahi

    two elephants kill 60 year old in Sindewahi : चंद्रपूर / सिंदेवाही – चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सैरावैरा फिरणाऱ्या दोन हत्तींनी अखेर एका वृद्धाचा बळी घेतला आहे. सिंदेवाही तालुक्यातील जाटलापूर गावालगत रविवारी (१५ जून) सकाळी साडेसहाच्या सुमारास ही थरारक घटना घडली. मारोती कवडू मसराम (वय ६०, रा. जाटलापूर) असे मृतकाचे नाव असून, पॅरालिसिसमुळे मसराम यांना पळता न आल्यामुळे हत्तींनी त्यांच्यावर हल्ला केला.

    चंद्रपूरमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार

    मिळून हल्ला चढविला

    एकाने त्यांना पायाने चिरडले, तर दुसऱ्याने सोंडेने उचलून जमिनीवर आदळले, यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.
    आज रविवारी जाटलापूर गावातील काही शेतकरी धान पेरणीसाठी शेताकडे जात असताना गावालगतच्या जंगलातून अचानक हे दोन्ही हत्ती बाहेर आले. त्यांनी शेतकऱ्यांचा पाठलाग करत हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र शेतकरी पळून गेले आणि त्यांचा जीव वाचला. याच दरम्यान मारोती मसराम हे शौचासाठी घराबाहेर पडले होते. अपंगत्वामुळे ते पळू शकले नाहीत. हत्तींनी त्यांच्याकडे धाव घेत एकाने चिरडले, तर दुसऱ्याने सोंडेत उचलून आदळले. ही दुर्दैवी घटना पाहून शेतकरी हादरले. wild elephant attack on disabled man Maharashtra

    हत्तीचा शोध सुरु

    घटनेनंतर काही शेतकऱ्यांनी गावात धाव घेत ही माहिती दिली. गावकरी घटनास्थळी पोहोचले. पोलिस पाटलांनी तत्काळ सिंदेवाही पोलिसांना कळवले. पोलीस निरीक्षक राठोड यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. यानंतर वनविभागाचे अधिकारीही दाखल झाले. मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी सिंदेवाही येथे पाठवण्यात आला. मसराम यांच्या पश्चात पत्नी आणि पाच मुलांचा परिवार आहे. घटनेनंतर वन विभागाने दोन्ही हत्तींचा शोध घेणे सुरू केले आहे. हत्ती घटनास्थळावरून इतरत्र पळाले आहेत. वन विभागाचे अधिकारी त्यांच्या मागावर आहेत. वृत्तलिहीपर्यंत हत्तींच्या शोध लागलेला नव्हता. elephant herd enters farmland Chandrapur rural


    सदर दोन हत्ती गडचिरोली जिल्ह्यातून उमा नदी पार करत ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रात आले आहेत. तेव्हापासून सिंदेवाही व सावली तालुक्यातील अनेक गावांमध्ये त्यांची सतत हालचाल सुरू आहे. काही गावांत ते शिरले असून,नागरिकांवर हल्ला करण्याचे प्रकारही घडले आहेत. त्यामुळे जाटलापूर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.


    या घटनेनंतर ग्रामस्थांत तीव्र संताप आणि भीती आहे. गावकऱ्यांनी वनविभागाकडून तत्काळ हत्ती नियंत्रणात घेण्याची आणि मानवहानी थांबवण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे..

  • elephant movement news update । रानटी हत्तीची भीती, जंगलात एकटे फिरणे टाळा

    elephant movement news update

    elephant movement news update : चंद्रपूर – ओडिसा वरून छत्तीसगड मार्गे गडचिरोलीत दाखल झालेले हत्ती दीड वर्षांनी चंद्रपूर जिल्ह्यात दाखल झाले आहे. पण आता हे हत्ती ताडोबा व्याघ्रप्रकल्पातील बफर क्क्षेत्रात दाखल झाल्याने वनविभागात चिंतेचं वातावरण पसरले आहे. हे हत्ती वैनगंगा नदी ओलांडून सावली वनपरिक्षेत्रात येत असलेल्या गेवरा, डोंगरगाव, निफंद्रा, मेहा या गावातून जंगलाचा मार्गे आले त्यानंतर सिंदेवाही वनपरिक्षेत्र परिसरात ऐन्ट्री करीत गुंजेवाही जंगल मार्गे कळमगाव गन्ना , कुकडहेटी गावपरिसरातून शुक्रवार सकाळच्या सुमारास प्रवेश करीत हत्तीने ऐन्ट्री घेतल्याने दहशत निर्माण झाली आहे. कळमगाव गन्ना कुकडहेटी गावातून रानटी हत्तीने अवागमन केल्याने काही काळ कुतूहल वाटले असले तरी हत्तीने नागरिकांचा पाठलाग केल्याने नागरिकांत भितीचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसून आले. wild elephant movement

    लिफ्ट मागणे पडले महागात

    ३० मे रोजी गडचिरोली जिल्ह्यातून दोन हत्ती उमा नदी पार करून ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील कुकडहेटी गावात दाखल झाले. त्यानंतर ते कक्ष क्रमांक ८०८, २७०A आणि २७०B मार्गे जंगलाच्या दिशेने रवाना झाले . त्यानंतर काही वेळ त्यांनी नलेश्वर तलावाजवळ खेळण्याचा आनंद घेतला. ३० तारखेच्या रात्रीपर्यंत त्यांच्या पायांचे ठसे कंपार्टमेंट क्रमांक ३१९ मार्गे मुख्य गाभा क्षेत्राच्या दिशेने जात असल्याचे निदर्शनास आले.

    घराबाहेर झोपू नका

    वन विभागाकडून ईडीसी सदस्य व स्थानिक ग्रामस्थांना सतर्कतेबाबत जागरूक केले जात आहे. पीआरटी आणि ईडीसी टीम्स या कामात सहभागी करण्यात आल्या आहेत. गावकऱ्यांना सावधगिरी बाळगण्याचा तसेच जबाबदारीने वागण्याचा सल्ला दिला जात आहे. जंगलात एकटे फिरणे टाळण्याचे तसेच रात्री घराबाहेर झोपू नये, असेही आवाहन करण्यात येत आहे. how to stay safe from wild elephants

    संपर्कातील इतर वनपरिक्षेत्रांतील कर्मचारी, बचाव पथक व एसटीपीएफचे कर्मचारी हत्तींच्या हालचालींचा मागोवा घेत आहेत. या टीम्सना रात्री पाहता येणारी उपकरणे (नाईट व्हिजन), IR ड्रोन आणि हत्ती हुसकावण्यासाठी आवश्यक साहित्य पुरवले आहे. हत्तींच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना उंच ठिकाणी तैनात करण्यात आले आहे.

    अफवांपासून दूर रहा

    सर्व नागरिकांना अफवांपासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे. तसेच कुठल्याही प्रकारची माहिती असल्यास तात्काळ नजीकच्या वन विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा.

    रानटी हत्ती चंद्रपूर जिल्ह्यातील मानवी वस्त्यांमध्ये का येतात?

    जंगल कमी होत असल्यामुळे, अन्नाचा अभाव आणि नैसर्गिक स्थलांतराच्या प्रवृत्तीमुळे हत्ती मानवी वस्त्यांमध्ये येतात.

    चंद्रपूर जिल्ह्यात सध्या कोणत्या भागांमध्ये हत्तींची हालचाल आहे?

    गेवरा, डोंगरगाव, निफंद्रा, मेहा, कळमगाव गन्ना, कुकडहेटी आणि सिंदेवाही या भागांत हत्तींची उपस्थिती नोंदवली गेली आहे.

    हत्तींच्या हालचालीदरम्यान नागरिकांनी कोणती काळजी घ्यावी?

    घरातच राहावे, मोठ्याने आवाज करू नये, हत्तींचा पाठलाग किंवा छेड काढू नये, आणि वनविभागाच्या सूचना पाळाव्यात.

    माझ्या परिसरात हत्ती आढळल्यास मी कशी माहिती द्यावी?

    जवळच्या वनविभाग कार्यालयात किंवा वन्यजीव आपत्कालीन हेल्पलाईनवर त्वरित संपर्क साधावा.