Tag: महावितरण

  • mseb number : सण उत्सव काळात अधिकृत वीज जोडणी घ्या – महावितरणचे आवाहन

    mseb number : सण उत्सव काळात अधिकृत वीज जोडणी घ्या – महावितरणचे आवाहन

    mseb number नवरात्रोत्सव आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनासाठी अधिकृत वीज जोडणी घेण्याचे आवाहन


    Mseb number चंद्रपूर :- आदिशक्तीची आराधना करणा-या ‘नवरात्र’ आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लाखो अनुयायांना पवित्र बौद्ध धर्माची दिक्षा दिलेल्या ‘धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या आगमनाला काही दिवसच शिल्ल्क असून हे दोन्ही उत्सव सर्वांना आनंददायी व निर्विघ्न पार पडावेत यासाठी सार्वजनिक उत्सव मंडळांनी धार्मिक उत्सवांसाठी वीजसुरक्षेबाबत गांभिर्याने उपाययोजना करण्याचे आवाहन महावितरणतर्फ़े चंद्रपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता हरीश गजबे यांनी केले आहे.

    अवश्य वाचा : लाडकी बहीण योजनेच्या रकमेत भविष्यात होणार वाढ – पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार


    नवरात्रातील रोषणाई, देखावे, मंडप, गरबा महाप्रसाद, रावण दहन तसेच धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्याने करण्यात येणारी रोषणाई, भोजनदान व इतर कार्यक्रमासाठी लागणारी वीजव्यवस्था ही अधिकृत वीज कंत्राटदारांकडूनच करून घेण्यात यावी. तातडीच्या मदतीची संभाव्य गरज पाहता सार्वजनिक 24 तास सुरू असणारे नि:शुल्क क्रमांक 1912 किंवा 18002333435 किंवा 18002123435 यावर संपर्क साधावा अथवा 022-50897100 या क्रमांकावर मिस कॉल द्यावा. याशिवाय सार्वजनिक उत्सव मंडळाच्या पदाधिका-यांनी महावितरणच्या संबंधित भागातील अभियंता आणि जनमित्रांचे मोबाईल क्रमांक जवळ ठेवावे, असे आवाहन महावितरणच्या वतीने करण्यात आले आहे. Mseb number


    सार्वजनिक उत्सव मंडळांना महावितरणकडून जोडणीसाठी घरगुती वीजदर आकारण्यात येणार आहे. यासाठी मंडळांना तात्पुरत्या स्वरूपातील वीजजोडणीसाठी नोंदणी प्रमाणपत्र, स्थानिक स्वराज्य संस्थेची मंडप परवानगी, पोलिस स्थानक परवाना, विद्युत निरिक्षक यांचे वीजसंच सुरक्षित असल्याचे प्रमाणपत्र, वीज मागणी अर्ज, वीजसंच मांडणी चाचणी अहवाल आणि राष्ट्रीयकृत बँक खाते पासबुक छायांकित प्रत इ. कागदपत्रे आवश्यक आहेत. Mseb number


    अनामत रक्कम मिळणार विनाविलंब परत…
    तात्पुरत्या वीजजोडणीसाठी मंडळांना मंजूर वीजभारानुसार अनामत रक्कम भरणे आवश्यक आहे. ही रक्कम ऑनलाईन भरल्यास उत्सव संपल्यानंतर वीजबिलाची रक्कम वगळून उरलेली रक्कम विनाविलंब परत केली जाईल. त्यामुळे मंडळांनी अनामत रक्कम ऑनलाईन पद्धतीनेच भरण्याचे आवाहनही महावितरणकडून करण्यात आले आहे

    सार्वजनिक सुरक्षा महत्वाची
    •नवरात्रोत्सव, धम्मचक्र प्रवर्तन दिन आणि इतरही धार्मिक आयोजनादरम्यान मोठ्या प्रमाणात सर्वसामान्य नागरिक सहभागी होतात, त्यांच्या आनंदावर विरजण पडू नये, कुठलीही अप्रिय घटना होऊ न देता भाविकांना नयनरम्य देखाव्यांचा आनंद घेता यावा यासाठी सार्वजनिक मंडळांनी रोषणाई आणि मिरवणूकीतील देखाव्यांचा परिसरातील विद्युत तारा आणि खांबांना स्पर्श होणार नाही याची खबरदारी घ्यावी.

    चंद्रपूर पोलिसांवर गंभीर आरोप


    •गरबा, जागर आदिचे आयोजन विद्युत यंत्रणेपासून लांब अंतरावर करावे.
    •दस-या प्रसंगी होणारे रावण दहन हे मोकळ्या मैदानात आणि वीज यंत्रणेपासून लांब करावे, फ़टाक्यांची आतिषबाजी करतांना आवश्यक त्या सुरक्षेच्या उपाययोजना कराव्यात.
    •वीजपुरवठा आणि जनरेटरसाठी स्वतंत्र न्यूट्रल घेणे आवश्यक आहे.
    •जवळच्या वीजखांबावरून किंवा वीजवाहिन्यांवर आकोडे टाकून वीजपुरवठा घेऊ नये,.
    •वीज जोडणीसाठी लागणारी तार किंवा केबल विजेचा भार पेलण्यास सक्षम असल्याची खातरजमा करावी, तुटलेली किंवा लूज तार वापरू नये आणि वापरायची असल्यास प्रमाणित इन्सूलेशन टेप लाऊन जोडावी.

    जनसंपर्क अधिकारी,
    महावितरण, चंद्रपूर

  • Mahavitaran : शेतकरी व शेतमजुरांचा मृत्यू कसा झाला? महावितरणने सांगितले कारण

    Mahavitaran : शेतकरी व शेतमजुरांचा मृत्यू कसा झाला? महावितरणने सांगितले कारण

    mahavitaran अनाधिकृत जिवंत विद्युत तारांच्या स्पर्शाने चार शेतकऱ्यांचा मृत्यू व एक किरकोळ जखमी

    Mahavitaran महावितरण ब्रह्मपुरी उपविभाग अंतर्गत येणाऱ्या मेंडकी वीज वितरण केंद्रातील मौजा गणेशपुर येथे चार शेतकऱ्यांना प्राणांकित वीज अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच महावितरणचे अधिकारी कर्मचारी तात्काळ घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता त्यावरील सविस्तर माहिती अशी दिनांक 11 सप्टेंबर 2024 रोजी अंदाजे सकाळी ९:३० वाजता दरम्यान श्री नानाजी राऊत यांचे शेतामध्ये वन्यप्राणी पासून शेतीचे होणारे नुकसान किंवा वन्यप्राण्यांच्या बंदोबस्तासाठी कुंपणाची तार लावण्याचे काम सुरु होते.

    सदर तार लावण्याकरिता शेतमालका सोबत इतर सहा जण होते सदर कुंपण तार अंदाजे एक किलोमीटरचा असून संपूर्ण शेताला कुंपण करत असताना शेताच्या एका कोपऱ्यामध्ये असलेल्या लघुदाब वहिनी वर अनाधिकृत 3ph केबल वायरचा वापर करण्यात आला सदर केबल वायरला हाताने ओढत असलेल्या जी आय ताराचे घर्षण झाल्याने केबल वरील इन्सुलेशन निघाले व जे पाच शेतकरी कुंपणासाठी वापरण्यात येणाऱ्या ताराला पकडून ओढत असताना त्यांना करंट लागुन त्यापैकी चार लोकांचा जागेवरच दुर्दैवी मृत्यू झाला तसेच त्यापैकी एका शेतकऱ्याच्या हाताला भाजले व तो मागच्या बाजूला पडला त्यामुळे किरकोळ जखमी झाला.

    अवश्य वाचा : आई – बाबा सॉरी, आणि विद्यार्थिनीने केली आत्महत्या

    एलटी पोल वरून आलेली 3ph केबल वायर हे अनधिकृत वीज पुरवठा करण्यासाठी वापरण्यात येत होते. वन्य प्राण्यांच्या बंदोबस्तासाठी त्याच्या कुंपणात वीज पुरवठा सोडण्याच्या प्रकारातून तर ही दुर्घटना घडली नसावी असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. महावितरण लाईनचा कुठल्याही प्रकारचा संपर्क आलेला नाही याबाबत महावितरण व पोलीस खात्यातर्फे चौकशीचे काम काज सुरू आहे. मरण पावलेल्या शेतकऱ्यांची नावे श्री नानाजी राऊत, प्रकाश राऊत (शेत मालक) युवराज डोंगरे, पुंडलिक मानकर आणि किरकोळ जखमी झालेले श्री सचिन नन्नावरे हे आहेत तसेच त्यांच्या सोबत शेतात श्री विनोद वसाके आणि श्री किशन ढोरे हे होते.

  • Mahavitaran Office : महावितरण कार्यालयात तोडफोड, भूषण फुसेवर गुन्हा दाखल

    Mahavitaran Office : महावितरण कार्यालयात तोडफोड, भूषण फुसेवर गुन्हा दाखल

    mahavitaran office धास्ती : भूषण फुसे यांचे जिवतीत आक्रमक “तोडफोड” स्टाईल आंदोलन
    मुख्यालयी हजर नसणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना दिली तंबी


    Mahavitaran office जिवती – शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, प्रहार संघटना आक्रमक आंदोलना करिता प्रसिद्ध आहे तसेच राजुरा विधानसभा क्षेत्रात सुद्धा सामाजिक कार्यकर्ता भूषण मधुकरराव फुसे हे सुद्धा अभिनव आंदोलनांसाठी प्रसिद्ध आहेत. त्यांची आंदोलने प्रामुख्याने मागासवर्गीय, अपंग, रुग्ण, विधवा, लहान व्यापारी आणि शेतकऱ्यांसाठी असतात. अभिनव आंदोलनाच्या माध्यमातून लक्ष वेधून घेण्याबरोबरच प्रसंगी कायदा हातात घेऊनही त्यांनी आंदोलने केली आहेत. सर्वसामान्य नागरिक, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर भूषण फुसे नेहमी आक्रमक असतात.

    जेलभरो आंदोलन

    Mahavitaran office भूषण फुसे यांच्या आंदोलनाची चांगलीच धास्ती जिवती तालुक्यातील मुख्यालयी नसणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना आली असून यापुढे सर्वसामान्य गोरगरिबांची कामे वेळेवर न केल्यास थोबाडच रंगविण असा आक्रमक इशाराही फुसे यांनी दिला आहे. जिवती तालुक्यात सरकारी अधिकारी-कर्मचारी मुख्यालयी राहत नाही परिणामी नागरिकांची कामे खोळंबतात हि नेहमीच बोंब असताना सुद्धा प्रशासनातर्फे अश्या अधिकारी – कर्मचाऱ्यांनवर कोणतीही कारवाई होत नाही.

    अवश्य वाचा : तुझा रेप करीत ठार मारणार, महिलेला धमकी, चंद्रपूर पुन्हा हादरलं

    दि. ५ सप्टेंबर ला सामाजिक कार्यकर्ता भूषण मधुकरराव फुसे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन जिवतीत होते. एक दिवस अगोदर दि. ४ सप्टेंबर ला जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन कार्यक्रमाचा आढावा घेण्याकरिता भूषण फुसे जिवतीत गेले होते. फुसे जिवतीत आल्याने परिसरातील शेतकरी, महिलावर्ग व सर्वसाधारण नागरिक कार्यलयात आले आणि त्यांनी जिवती तालुक्यातील समस्या सांगितल्या अशीच महावितरणची एक समस्या सोडविण्याकरिता भूषण फुसे हे महावितरण कार्यलयात गेले असताना त्यांनाही तेथील कर्मचारी उडवाउडवीची उत्तरे देत होते. भूषण फुसे यांनी टेबल ठोकत आक्रमक पावित्रा दाखविला यात फुसे यांच्या हातून संगणकाचा स्टॅंड व कुर्सी तुटली यात महावितरणचे एक हजार रुपयाचे नुकसान झाले. महावितरणचे कनिष्ठ अभियंता प्रवीण देवतळे यांनी पोलिसांत याविषयी तक्रार नोंदविली आहे.

    सामाजिक कार्यकर्ता भूषण फुसे यांनी सांगितले कि प्रशासनाने सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहण्याचे आदेश तात्काळ द्यावे व त्याची अंमलबजावणी करावी. यापुढे मुख्यालयी नसणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना विरुद्ध आक्रमक आंदोलन उभे करू परिणामी आंदोलनात तोडफोड झाल्यास त्याची सर्वस्वी जिम्मेदारी प्रशासनावर येईल असा इशारा दिला आहे.

  • Abhay Scheme in maharashtra : वीज ग्राहकांना मिळणार अभय

    Abhay Scheme in maharashtra : वीज ग्राहकांना मिळणार अभय

    abhay scheme in maharashtra महावितरणने आपल्या ग्राहकांसाठी एक नवीन योजना जाहीर केली आहे. वीज कनेक्शन तोडलेल्या ३८ लाख घरगुती, व्यावसायिक, आणि औद्योगिक ग्राहकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. या योजनेत, थकीत वीजबिलावरचे व्याज आणि विलंब शुल्क माफ होणार आहे. सदर योजना 1 सप्टेंबर पासून राज्यात लागू करण्यात आली आहे.

    Abhay scheme in maharashtra महाराष्ट्रातील वीज ग्राहकांना दिलासा देण्यासाठी महावितरणकडून अभय योजना सुरु करण्यात आलीय. १ सप्टेंबरपासून ही योजना अंमलात येतेय.
    राज्याचे उपमुख्यमंत्री आणि उर्जा मंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सूचनेनुसार महावितरणने हा निर्णय घेतलाय.
    वीजबिलाच्या थकबाकीमुळे वीज कनेक्शन कायमस्वरुपी तोडलेल्या ३८ लाख घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक वीज ग्राहकांसाठी अभय योजनेचा फायदा होणार आहे.
    याअंतर्गत वीज बिलाच्या थकबाकीवरील व्याज आणि विलंब आकाराचे एकूण १७८८ कोटी रुपये माफ केले जाणार आहेत.
    या योजनेनुसार पैसे भरल्यानंतर संबंधीत वीज ग्राहकाला पुन्हा एकदा नव्याने वीज कनेक्शन मिळेल.
    महावितरणच्या वेबसाईटवर वीज ग्राहकांना ऑनलाईन पद्धतीने याचा लाभ घेता येईल.

    काय आहे ही योजना?

    अभय योजना ही महावितरणची नवीन योजना आहे. या अंतर्गत ग्राहकांना थकीत वीजबिल भरण्यासाठी सवलत दिली जाणार आहे. (Abhay scheme in maharashtra) जे ग्राहक आपल्या थकीत वीजबिलाचे भरण करणार नाहीत, त्यांच्यावर कारवाई टाळण्यासाठी ही योजना तयार करण्यात आली आहे.

    अभय योजना
    • कालावधी: १ सप्टेंबर २०२४ ते ३० नोव्हेंबर २०२४.
    • लाभार्थी: घरगुती, व्यावसायिक, आणि औद्योगिक ग्राहक.
    • व्याज आणि विलंब शुल्क माफी: थकीत वीजबिलावरील एकूण १,७८८ कोटी रुपये माफ.

    महावितरणच्या वेबसाईट  (www.mahadiscom.in/wss/wss) किंवा मोबाइल ॲपवर अर्ज करता येईल. ग्राहक टोल फ्री क्रमांकावर कॉल करूनही माहिती मिळवू शकतात.

    • टोल फ्री क्रमांक: १९१२, १८००२३३३४३५, १८००२१२३४३५

    ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने सदर योजना लागू करण्यात आली असून लाखो वीज ग्राहकांना या योजनेचा लाभ मिळविता येणे शक्य होणार आहे, थकीत वीज बिल भरून पुन्हा वीज कनेक्शन या योजनेमुळे पुन्हा मिळणार आहे. हे सर्व महायुतीच्या कल्याणकारी सरकारमुळे सदर योजना अंमलात आली आहे.

  • Rice Bribe : पैसे नसतील तर तांदूळ द्या, चंद्रपूर जिल्ह्यातील पहिली घटना

    Rice Bribe : पैसे नसतील तर तांदूळ द्या, चंद्रपूर जिल्ह्यातील पहिली घटना

    News34 chandrapur

    चंद्रपूर – 16 फेब्रुवारी रोजी चंद्रपुरात महावितरणच्या राजुरा उपविभागाच्या वरिष्ठ तंत्रज्ञाला शेतकऱ्यांकडून लाच म्हणून तांदूळ मागितल्याप्रकरणी अटक करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली होती. Corruption in chandrapur

     

    आरोपी शैलेंद्र चांदेकर हा शेतकऱ्यांच्या शेताचा वीजपुरवठा जाणूनबुजून खंडित करत होता, त्यांना जबरदस्तीने लाच देण्यास भाग पाडत होता. चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्या दिवशी दोन कारवाया केल्या, परंतु चांदेकर यांच्या घटनेने लक्ष वेधले गेले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने चांदेकर याला लाचेची रक्कम आणि तांदूळ स्वीकारताना रंगेहात पकडले. Rice bribe

     

     

    मंजुषा भोसले, पोलीस उपअधीक्षक, लाचलुचपत विभाग, चंद्रपूर यांच्या म्हणण्यानुसार, चांदेकर हे जाणूनबुजून शेतकऱ्यांच्या शेतातील वीज बंद करून त्यांच्या कृषी पंपांना वीजपुरवठा खंडित करत होते. त्यानंतर वीजपुरवठा सुरळीत सुरू ठेवण्यासाठी तो प्रत्येक शेतकऱ्याकडून 20 किलो तांदूळ किंवा 1500 रुपयांची लाच देण्याची मागणी करायचा. Anti corruption department

     

     

    ही घटना विशेष उल्लेखनीय आहे कारण जिल्ह्यात लाच म्हणून तांदूळ मागितल्याची ही पहिलीच घटना आहे. भोसले यांनी या नव्या कार्यपद्धतीबद्दल चिंता व्यक्त करून अशा भ्रष्ट कारभाराविरुद्ध कठोर कारवाई करण्याची गरज प्रतिपादित केली. शैलेंद्र चांदेकर यांची अटक भ्रष्टाचाराविरुद्ध सुरू असलेल्या लढाईची आणि सचोटी व निष्पक्षता राखण्यासाठी दक्षतेच्या महत्त्वाची आठवण करून देणारी आहे.

     

     

    आरोपींना पकडण्यासाठी चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची झटपट कारवाई अशा बेकायदेशीर कृत्यांना खपवून घेतली जाणार नाही असा ठोस संदेश जातो. केस जसजशी पुढे जाईल तसतसे न्याय मिळेल अशी आशा आहे आणि ही घटना अशाच प्रकारच्या भ्रष्ट व्यवहारांमध्ये गुंतण्याचा विचार करणाऱ्या इतरांसाठी प्रतिबंधक ठरेल. सार्वजनिक सेवेत पारदर्शकता आणि उत्तरदायित्व सुनिश्चित करण्यासाठी, नागरिकांचे हक्क आणि हित जपण्यासाठी अधिकारी वचनबद्ध आहेत.

  • नागरिकांनो महावितरणच्या इज ऑफ लिव्हिंग सेवेचा लाभ घेतला का?

    News34 chandrapur

    चंद्रपूर /जुनी सदनिका किंवा दुकान खरेदी करतानाच वीजजोडणी किंवा बिल देखील स्वतःच्या नावावर करून घेण्याची सोय खरेदीदारांना महावितरणकडून उपलब्ध झाली आहे. यासाठी नोंदणी व मुद्रांक विभागाची संगणक प्रणाली महावितरणशी जोडण्यात आली आहे. जुनी मालमत्ता खरेदीदारांनी दस्तनोंदणीपूर्वी ‘पब्लिक डेटा एन्ट्री’ करताना वीजबिलाच्या नावात बदल करण्याचा पर्याय निवडल्यास त्याबाबतची पुढील प्रक्रिया महावितरणकडून स्वयंचलित पद्धतीने करण्यात येत आहे.

     

    ‘इज ऑफ लिव्हिंग’ नुसार महावितरणकडून ग्राहकसेवा देण्याची सूचना उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. त्यानुसार महावितरण आणि नोंदणी व मुद्रांक विभागाच्या संयुक्त सहकार्यातून वीजबिलामध्ये नावात बदल करण्याची स्वयंचलित प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. यापूर्वी जुने घर किंवा दुकानाची खरेदी केल्यानंतर वीजजोडणी किंवा बिलावरील नाव बदलण्यासाठी ऑनलाइन अर्ज करणे तसेच ओळखपत्र, इंडेक्स दोन व इतर कागदपत्रे अपलोड करण्याची स्वतंत्र प्रक्रिया करावी लागत होती. तथापि दस्तनोंदणीच्या वेळीच वीजबिल नावावर करून घेण्याची सोय उपलब्ध झाल्यामुळे वीजग्राहकांचा मोठा वेळ वाचणार आहे. आधुनिक जीवनशैलीशी सुसंगत या तत्पर सेवेचा जुने घर किंवा दुकानाच्या खरेदीदारांनी लाभ घ्यावा असे आवाहन महावितरणने केले आहे.

     

    नोंदणी व मुद्रांक विभागाने (आयजीआर) मालमत्तांची नोंदणी करण्यासाठी ‘पब्लिक डेटा एन्ट्री’ हे पोर्टल कार्यान्वित केले आहे. जुन्या घराची किंवा दुकानाच्या दस्तनोंदणीपूर्वी ‘पब्लिक डेटा एन्ट्री’ मध्ये माहिती भरताना वीजजोडणी किंवा बिलाच्या नावात बदल करण्याचा पर्याय निवडणे आवश्यक आहे. दस्तनोंदणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर संगणकीय प्रणालीद्वारे प्राप्त अर्जानुसार महावितरणकडून स्वयंचलित पद्धतीने वीजबिलावरील नाव बदलण्याची प्रक्रिया सुरु होईल. याबाबत ६० दिवसांच्या आत संबंधित मालमत्ता खरेदीदारास ‘एसएमएस’द्वारे कळविले जात आहे व प्रक्रिया शुल्क ऑनलाइन भरण्यासाठी वेबलिंक पाठविण्यात येत आहे. यासोबतच प्रक्रिया शुल्काचे इन्व्हाईस महावितरणच्या अधिकृत www.mahadiscom.in या संकेतस्थळावर व मोबाईल अॅपवर उपलब्ध आहे.

     

    एकाच नावाने मालमत्तेची खरेदी झाली असल्यास अर्जदाराने कोणतेही दस्ताऐवज अपलोड करण्याची गरज नाही. तर एकापेक्षा अधिक व्यक्तींच्या नावे खरेदी असल्यास ज्या व्यक्तीच्या नावे वीजजोडणी करायची त्यासाठीची संमती व ना हरकत प्रमाणपत्र मागविण्यात येईल. याबाबत संबंधित नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर महावितरणकडून ‘एसएमएस’ द्वारे संदेश व वेबलिंक पाठविली जात आहे. तथापि, ‘एसएमएस’ पाठविल्यानंतर ६० दिवसांच्या आत प्रक्रिया शुल्काचा भरणा केला नाही किंवा आवश्यकतेनुसार ना हरकत प्रमाणपत्र वेबलिंकद्वारे अपलोड केले नाही तर नावात बदल करण्याची प्रक्रिया आपोआप रद्द होईल. त्यानंतर वीजजोडणीच्या नावात बदल करण्यासाठी ग्राहकांना सध्याच्या पद्धतीनुसार स्वतंत्रपणे कार्यवाही करावी लागेल.

     

    जागेच्या खरेदीपूर्वी थकबाकी तपासून घ्या- जागेच्या पूर्वीच्या मालकाने किंवा ताबेदाराने न भरलेल्या वीजबिलांची थकबाकी नंतरच्या नवीन मालक / ताबेदाराकडून वसूल करण्याचा अधिकार वीज वितरण कंपन्यांना असल्याचा निकाल मा. सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे. त्यामुळे जुने घर किंवा दुकान खरेदी करण्यापूर्वी वीजबिलाची थकबाकी तपासून घेणे आवश्यक आहे.

  • वीज ग्राहकांनो आता स्मार्ट मीटर आपल्या घरी

    News34 chandrapur
    चंद्रपूर – वीज ग्राहकांना त्यांच्या मर्जीनुसार वीज वापराचा खर्च निश्चित करण्याचा अधिकार देणारे प्रीपेड स्मार्ट मीटर राज्यभर बसविण्याची तयारी सुरू झाली असून काही महिन्यात हे मीटर टप्याटप्प्याने कार्यरत होतील.

    उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांनी वीज ग्राहकांना दर्जेदार, गुणवत्तापूर्ण व ग्राहकाभिमूख सेवा देण्याची सूचना केली आहे. त्यानुसार ग्राहकांना विजेच्या खर्चावर संपूर्ण नियंत्रणाचा अधिकार देणारे प्रीपेड स्मार्ट मीटर बसविण्याचे महत्त्वाचे पाऊल महावितरणने उचलले आहे.

    राज्यातील महावितरणच्या २ कोटी ४१ लाख ग्राहकांचे सध्याचे पारंपरिक मीटर बदलण्यात येणार असून त्या ऐवजी प्रीपेड स्मार्ट मीटर बसविण्यात येतील. स्मार्ट मीटर बसविल्यावर वीज ग्राहक मोबाईल फोनप्रमाणे विजेसाठी पैसे भरून वीज वापरतील.विजेसाठी किती खर्च करायचा हे ग्राहकांना निश्चित करता येईल. किती वीज वापरली याची माहिती ग्राहकाला नियमितपणे मोबाईल फोनवर मिळेल. त्यामुळे भरलेल्या पैशापैकी किती पैसे शिल्लक आहेत व आर्थिक नियोजनानुसार विजेचा वापर किती करायचा हे सुद्धा ग्राहकांना समजेल.

    मुख्य म्हणजे ग्राहकांना नवा प्रीपेड स्मार्ट मीटर मोफत मिळेल. या मीटरचा खर्च केंद्र सरकारकडून मिळालेल्या अनुदानातून तसेच महावितरणतर्फे करण्यात येणार आहे.

    सध्याच्या पद्धतीत वीज ग्राहकांनी वीज वापरल्यानंतर दरमहा त्यांच्या मीटरचे रिडिंग घेतले जाते व त्यानुसार बिल पाठविले जाते. एखाद्या ग्राहकाने नेहेमीपेक्षा जास्त वीज वापरली तर मोठे बिल येते व त्यामुळे ग्राहकाचे आर्थिक नियोजन बिघडते. वीज वापरली असल्याने त्याचे बिल भरण्याशिवाय पर्याय नसतो. पण नव्या प्रीपेड स्मार्ट मीटरच्या बाबतीत वीज ग्राहक आधी पैसे भरून तेवढ्याच रकमेची वीज वापरणार असल्याने ग्राहकांना नियोजन करून विजेवरील खर्च पूर्णपणे नियंत्रणात ठेवता येईल.

    अचानक रात्री वीज खंडीत होणार नाही

    प्रीपेड स्मार्ट मीटरमध्ये ग्राहकाने भरलेले पैसे संपले की वीज पुरवठा खंडित होईल. पण ग्राहकांना त्यांच्या मोबाईलवर वीजवापर आधीच माहिती झाल्यामुळे तसेच किती पैसे उरले आहेत, हे सुद्धा माहिती झाल्यामुळे नव्याने पैसे भरणे सुलभ होईल.
    घर बसल्या मोबाईलवरून ऑनलाईन पेमेंटचीही सुविधा आहे. ग्राहकाचे पैसे संपत आल्यावर त्याला मोबाईलवर मेसेज पाठविण्याची व्यवस्था आहे. एखाद्या ग्राहकाने विजेसाठी भरलेले पैसे मध्यरात्री संपले तर अचानक रात्री वीज पुरवठा बंद होणार नाही. सायंकाळी सहा ते सकाळी दहा या वेळेत पैसे संपले तरी वीज पुरवठा चालू राहील. संबंधित ग्राहकाने दुसऱ्या दिवशी सकाळी दहापर्यंत पैसे भरून वीज पुरवठा चालू ठेवायचा व त्यामधून पैसे संपल्यानंतर वापरलेल्या विजेचे पैसे वजा होईल, अशी सुविधा या मीटरमध्ये केलेली आहे.
  • महावितरणचे आवाहन उत्सव साजरा करा, पण जरा सांभाळून

    News34 chandrapur

    चंद्रपूर – नवरात्रोत्सवाची मोठ्या प्रमाणात तयारी सुरू झाली आहे. उत्सव साजरा करा, पण जरा सांभाळून! विजेपुढे चूकीला माफी नाही. आत्मविश्वास किंवा नजर अंदाजाने झालेली एखादी छोटीसी चुकही आपल्या उत्सवावर वीरजन घालू शकते. सजगता हिच सुरक्षा आहे. त्यामुळे सुरक्षेला प्राधान्य देत अधिकृत वीज जोडणी घेण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.

    मंडप आणि संच मांडणी

    सुरक्षेला प्राधान्य देत मंडपाची रोषणाईसाठी विद्युत व्यवस्था व संच मांडणी ही अधिकृत विद्युत कंत्राटदारांकडूनच करून घेणे आवश्यक आहे.

     

    दुर्गोत्सव मंडपातील वीजयंत्रणेचे अर्थिंग सुस्थितीत असल्याची खात्री करून घ्यावी. मंडळाच्या अंतर्गत वायरचे इन्सूलेशन खराब झाल्यास अशा वायर्समधून मंडपाच्या लोखंडी पत्र्यांमध्ये किंवा ओल्या वस्तुंमध्ये विद्युत प्रवाह येऊ शकतो. हा प्रकार टाळण्यासाठी वायर्सचे जोड काढून टाकावेत किंवा जोड द्यायचा असल्यास योग्य क्षमतेच्या इन्सुलेशन टेपने जोड देण्यात तसेच स्वीचबोर्डच्यामागे प्लायवूड किंवा लाकडी फळी लावल्याची खात्री करून घ्यावी.

    सुरक्षित अंतर राखावे

    महावितरणच्या यंत्रणेकडून उत्सव काळात ग्राहकांना सुरळीत व दर्जेदार वीजपुरवठा होण्यासाठी पुरेपूर काळजी घेण्यात आली आहे. दुर्गोत्सव मंडळांनी मंडप टाकतांना वितरण रोहित्रे ( ट्रान्सफॉर्मर), विद्युत खांबास ताण दिलेली तार भूमिगत वाहिनीचे फिडर पिलर यापासून सुरक्षित अंतर राखणे आवश्यक आहे.

     

    भक्तांनी व मंडळ कार्यकर्त्यांनी विद्युत खांब, रोहित्रे, फिटर पिलर इत्यादी वर चढू नये, मिरवणूकीत लोखंडी / धातूच्या रॉडच्या झेंड्याचा वाहनात किंवा वाहनाच्या टपावरील कार्यकर्त्यांचा विद्युत वाहिन्यांना स्पर्श होणार नाही, याची काळजी घ्यावी.

    घरगुती दराने वीज पुरवठा

    ■ उत्सवासाठी घरगुती दरानेच वीज पुरवठा होणार असल्याने अधीकृत जोडणी घ्यावी. दुर्गोत्सव मंडळांनी अनधिकृत विजेचा वापर केल्यास भारतीय विद्युत कायदा २००३ नुसार कारवाई करण्यात येणार आहे.
    स्वतंत्र न्युट्रल घेणे गरजेचे

    ■ उत्सवादरम्यान वीजपुरवठा आणि जनरेटरसाठी स्वतंत्र न्यूट्रल घेणे अत्यावश्यक आहे. काही कारणास्तव वीजपुरवठा बंद असताना जनरेटर सुरु केल्यास एकाच न्यूट्रलमुळे जनरेटरमधील वीजप्रवाह लघुदाब वीजवाहिनीमध्ये प्रवाहित होतो व त्यातून जीवघेण्या अपघाताची शक्यता निर्माण होते.

    झेंडे फिरवताना काळजी घ्या…

    ■ मूर्ती स्थापनेच्या दिवशी तसेच विसर्जनाच्या दिवशी मिरवणूकीत झेंडे फिरवताना काळजी घ्यायला हवी. उत्साहाच्या भरात झेंड्याचा स्पर्श विद्युत तारांना होणार नाही याची काळजी घ्यावी. बऱ्याचदा लोखंडी किंवा मेटल रॉड लावलेला असतो. या रॉडमधून विजेचा धक्का बसण्याचा मोठा धोका आहे. त्यामुळे लाकडी काठी बसवावी, असे आवाहन महावितरणने केले आहे.

  • वर्षभरात चंद्रपूर महावितरणचे 43 हजार 833 नवे वीज ग्राहक

    News34 chandrapur

    चंद्रपूर –  महावितरणच्या चंद्रपूर परिमंडळात एप्रील २२ ते २० ऑक्टोबर २०२३ या वर्षभराच्या कालावधीत विविध वर्गवारीतील नविन ४३ हजार ८३३ ग्राहकांना वीजजोडण्या देण्यात आल्या. चंद्रपूर मंडळात २४ हजार २७५ तर गडचिरोली मंडळातील १९ हजार ५५८ ग्राहकांना वीजजोडण्या देत महावितरणच्या माध्यमातून प्रकाश पोहोचला.

    देण्यात आलेल्या या लघूदाब वीजजोडण्या
    चंद्रपूर परिमंडळात चंद्रपूर मंडळात घरगुती २६ हजार ८४२, वाणिज्यिक ६ हजार २५३, औदयोगिक ५४१, सरकारी कार्यालये ९४०, पाणिपुरवठा १५१, पथदिवे ९६, कृषिपंप ७ हजार ६३१, कुक्कूटपालन ६१, इतर लघूदाब २०८ व तात्पुरत्या १ हजार १०७ अशा एकंदरीत ४३ हजार ८३३ वीजजोडण्या चंद्रपूर मंडळात देण्यात आल्या
    चंद्रपूर मंडळात घरगुती १४ हजार ८४०, वाणिज्यिक ४ हजार ४५६, औदयोगिक ३३५, सरकारी कार्यालये ५९१, पाणिपुरवठा ७७, पथदिवे ४०, कृषिपंप ३ हजार ५९१, कुक्कूटपालन ३१, इतर लघूदाब १४७, व तात्पुरत्या १६४ अशा एकंदरीत २४ हजार २७५ वीजजोडण्या चंद्रपूर मंडळात देण्यात आल्या.

     

    गडचिरोली मंडळात घरगुती १२ हजार २, वाणिज्यिक १ हजार ७९७, औदयोगिक २०६, सरकारी कार्यालये ३४९, पाणिपुरवठा ७४, पथदिवे ५६, कृषिपंप ४ हजार ४० , कुक्कूटपालन ३०, इतर लघूदाब ६१, व तात्पुरत्या ९४३ अशा एकंदरीत १९ हजार ५५८ वीजजोडण्या गडचिरोली मंडळात देण्यात आल्या.

    तसेचं उच्चदाब वीज वितरण प्रणाली (HVDS) योजअंतर्गत चंद्रपूर परिमंडळात एकंदरीत ४ हजार २८ रोहित्रे बसविण्यात आली तसेच या रोहित्रांच्या माध्यमातून एकंदरीत ४ हजार ७४ वीजजोडण्या देण्यात आल्या आहे.

    केंद्र शासनाच्या अतिमहत्वाकांक्षी अशा उच्चदाब वीज वितरण प्रणाली (HVDS) योजअंतर्गत या योजणेच्या सुरुवतीच्या वर्षापासून म्हणजे २०१८ पासून ३१ मार्च २०१८ पर्यंत पैसे भरुन प्रलंबित असलेल्या वीजजोडण्या देण्याचे निर्धारीत लक्ष पूर्ण करीत चंद्रपूर मंडळात २ हजार ५५१ रोहित्रे बसविण्यात आली तसेच या रोहित्रांच्या माध्यमातून २ हजार ५८४ वीजजोडण्या देण्यात आल्या. तर गडचिरोली मंडळात, १ हजार ४५८ रोहित्रे बसविण्यात आली तसेच या रोहित्रांच्या माध्यमातून १ हजार ४७२ वीजजोडण्या देण्यात आल्या.
    उच्चदाब वीज वितरण प्रणाली (HVDS) योजअंतर्गत चंद्रपूर परिमंडळात एकंदरीत ४ हजार २८ रोहित्रे बसविण्यात आली तसेच या रोहित्रांच्या माध्यमातून एकंदरीत ४ हजार ७४ वीजजोडण्या देण्यात आल्या आहेत.

     

    ग्राहकांप्रति कर्तव्य पार पाडित आपली जबाबदारी ओळखून महावितरणचे अभियंता, अधिकारी व कर्मचारी ग्राहकांना सुरळीत सेवा प्रदान करण्यास नेहमी तत्पर असतात. देण्यात आलेल्या वीजजोडण्यामुळे ग्राहकांच्या जीवनात प्रकाश पडला आहे. परंतु थकबाकीमुळे महावितरणला ग्राहकांच्या दारात वसुलीसाठी जावे लागत आहे. तेव्हा ग्राहकांनी वेळेत वीजबिल भरणा करुन महावितरण्ला सहकार्य करावे असे आवाहन मुख्य अभियंता श्री. सुनिल देशपांडे यांनी केले आहे.

  • सुट्टीच्या दिवशी महावीतरणची ही सेवा सुरू राहणार

    News34 chandrapur

    चंद्रपूर / वीजबिल भरण्यास ग्राहकांना गैरसोईचे होऊ नये यासाठी सुट्टीच्या दिवशीही 30 सप्टेंबर व 1ऑक्टोबर या सुट्टीच्या दिवशीही जिल्ह्यातील सर्व वीजबिल भरणा केंद्रे सुरु ठेवण्यात आली आहेत. One plus कंपनीचे इअर बड्स फक्त 2 हजार रुपयात

     

    सोबतच वीजबिलांचा भरणा करण्यासाठी महावितरणद्वारा ग्राहकांना पर्यावरणपुरक ऑनलाईन पेमेंट, मोबाईल अॅप, गुगल पे,पेटीएम या यासारख्या ग्राहकाभिमुख सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून नियीमत ग्राहकांचा प्रतिसादही या सुविधांना चांगल्या प्रकारे लाभत आहे. iPhone 14 फक्त 62 हजार रुपयात त्वरा करा..

    ऑनलाईन पर्यांयाद्वारे वीजबिलांचा वीजदेयक भरल्यास वेळ व श्रमाची बचत होईलच सोबतच ०.२५ % डिजीटल पेमेंट सुट पण मिळेल. वीजग्राहकांनी घरबसल्या महावितरणची वेबसाईट, मोबाईल एप किंवा इतर ऑनलाईन पर्यांयाद्वारे वीजबिलांचा भरणा करून महावितरणची आर्थिक स्थिती समजून घेवून वीजबिल भरून महावितरण कंपनीला सहकार्य करावे असे आवाहन करण्यात येत आहे.