Tag: मयूर राईकवार

  • aam aadmi party on rto scam । 🧾 “ड्युटीवर कोण, वसुली कुणाची, पैशांचा हिशेब कुठं? – ‘आप’ने मागितला RTOचा ‘ब्लॅकबोर्ड’”

    aam aadmi party on rto scam

    aam aadmi party on rto scam : चंद्रपूर, २१ जुलै २०२५: लकडकोट (महाराष्ट्र-तेलंगणा सीमा) येथील आरटीओ चेकपोस्टवरील कथित गैरकारभाराविरोधात आम आदमी पक्षाने (आप) कंबर कसली आहे. दिनांक १६ जुलै २०२५ रोजी ‘आप’चे जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी प्रमुख आरटीओ अधिकारी श्री. किरण मोरे यांची भेट घेऊन त्यांना या संदर्भात सविस्तर निवेदन सादर केले. आरटीओ चेकपोस्टवर सुरू असलेल्या अपारदर्शक आणि बेकायदेशीर वर्तनावर आप ने यावेळी आक्षेप घेतला आहे. rto checkpost harassment issues

    आमदार जोरगेवार यांनी जिल्हा परिषदेच्या इमारतीचे काम थांबविले

    प्रमुख तक्रारी आणि उपस्थित केलेले गंभीर प्रश्न:

    या निवेदनात ‘आप’ने अनेक गंभीर मुद्दे उपस्थित केले आहेत, ज्यात प्रामुख्याने खालील बाबींचा समावेश आहे:

    • विना-वर्दी ड्युटी: आरटीओ अधिकारी योगिता राणे आणि कांबळे हे सिव्हिल ड्रेसमध्ये ड्युटीवर का होते, असा सवाल ‘आप’ने केला आहे. रूल २८६ आणि २८७ नुसार वर्दी अनिवार्य असताना, या नियमांचे उल्लंघन का केले जात आहे, यावर स्पष्टीकरण मागितले आहे.
    • राष्ट्रीय पक्षाच्या जिल्हाप्रमुखाचे वाहन अडवण्यामागील कारण: ‘आप’ने विचारले आहे की, MH-३४ BR-१८७८ हे वाहन कोणत्या कायदेशीर आधारावर अडीच तास अडवले गेले? तसेच, संबंधित अधिकाऱ्यांची ड्युटी ऑर्डर आणि रजिस्टरमधील नोंद होती का, याचीही माहिती मागितली आहे.
    • आरटीओ चेकपोस्टवरील माहितीची मागणी: चेकपोस्टवर कार्यरत कर्मचाऱ्यांची नावासहित यादी, दररोज आणि मासिक महसूल संकलन, तसेच दररोज किती वाहनांची ये-जा होते, याची सविस्तर माहिती ‘आप’ने मागवली आहे. रोखीच्या स्वरूपात पैसे घेण्याचा अधिकार आहे का आणि ऑनलाईन व्यवहार बंधनकारक आहे का, यावरही स्पष्टीकरण मागितले आहे. चेकपोस्टवरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची संख्या, त्यांचे स्थान आणि रेकॉर्डिंग किती काळ साठवले जाते, याचीही चौकशी करण्यात आली आहे. तसेच, वॉकी-टॉकी वापरणाऱ्या व्यक्ती कोण आहेत आणि त्यांच्या परवानग्यांचा तपशीलही विचारला आहे. rto checkpost lakkadkot 
    • ट्रक चालकांना पाठवले जाणारे काउंटर: कोणत्या खिडकीवर आणि कोणत्या पदावरील व्यक्ती कार्यरत आहेत, याबद्दल माहिती मागितली आहे.
    • सरकारी ठिकाणी व्हिडिओ शूटिंगला बंदी आहे का?: ‘आप’ने विचारले आहे की, हा परिसर प्रतिबंधित (Restricted) आहे का आणि व्हिडिओ घेतल्यास कोणत्या कायद्यानुसार गुन्हा दाखल होतो?

    आरटीओ प्रमुख श्री. किरण मोरे यांचे आश्वासन:

    ‘आप’च्या निवेदनावर आरटीओ प्रमुख श्री. किरण मोरे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

    • ड्रेस कोड प्रकरणात: संबंधित अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस पाठवून त्यांचे लेखी उत्तर मागवले जाईल आणि त्याचा अहवाल पक्षाला पुरवण्यात येईल, असे मोरे यांनी सांगितले. civil dress rto officials legality
    • व्हिडिओ शूटिंगबाबत: “सरकारी कार्यालय किंवा चेकपोस्ट परिसरात व्हिडिओ घेण्यास कोणतीही कायदेशीर मनाई नाही,” असे श्री. किरण मोरे यांनी स्पष्ट केले. त्यामुळे, “व्हिडिओ घेणे गुन्हा आहे” असे सांगणारे अधिकारी चुकीचे आणि दिशाभूल करणारे आहेत, असे त्यांनी मान्य केले. aam aadmi party on rto scam

    आरटीओ मोरे यांनी आम आदमी पक्षाला ४ दिवसांत लेखी उत्तर देण्याचे आश्वासन दिले आहे.

    आम आदमी पक्षाचे नागरिकांना स्पष्ट आवाहन:

    या भेटीनंतर ‘आप’ने चंद्रपूरच्या नागरिकांना आणि विशेषतः ट्रक चालक, ट्रान्सपोर्टर व पत्रकारांना एक महत्त्वाचे आवाहन केले आहे. “लकडकोट आरटीओ चेकपोस्टवर मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू आहे. ट्रक चालकांकडून त्यांच्या वाहनाच्या चाकांनुसार ‘एन्ट्री’च्या नावाखाली पैसे घेतले जातात,” असा आरोप ‘आप’ने केला आहे.

    ‘आप’ने नागरिकांना आवाहन केले आहे की, ट्रक चालक, नागरिक, ट्रान्सपोर्टर, पत्रकार यांनी मोबाईल व्हिडिओ चालू ठेवावा. जेव्हा पैसे मागितले जातात, तेव्हा ते रेकॉर्ड करावे आणि ते सोशल मीडियावर किंवा आम आदमी पार्टीकडे शेअर करून भ्रष्टाचार उघड करावा.

    “आता भ्रष्टाचाराविरुद्ध लढा फक्त नेत्यांनी नव्हे, तर प्रत्येक नागरिकाने उभा राहून द्यावा,” असे ‘आप’ने म्हटले आहे.

    या भेटीत उपस्थित पदाधिकारी:

    या महत्त्वपूर्ण भेटीदरम्यान ‘आप’चे अनेक प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते, ज्यात सुनील मुसळे (प्रदेश जॉईंट सेक्रेटरी), मयूर राईकवार (जिल्हाध्यक्ष), योगेश गोखरे (शहराध्यक्ष), संतोष बोपचे (शहर संघटनमंत्री), दीपक बेरशेट्टीवार (जिल्हाध्यक्ष, शेतकरी आघाडी), एड. तबस्सुम शेख (अध्यक्ष, महिला आघाडी – शहर), राजकुमार नगराळे (जिल्हा कोषाध्यक्ष), सतीश रासावर (सहकोषाध्यक्ष), एकनाथ हांडेकर (अध्यक्ष, शिक्षक आघाडी) आणि इतर कार्यकर्ते यांचा समावेश होता. aam aadmi party on rto scam

    आम आदमी पक्षाची ठाम भूमिका:

    ‘आप’ने स्पष्ट केले आहे की, आरटीओच्या भ्रष्टाचाराविरुद्ध लढा आता जनतेच्या पुढाकारातून दिला जाईल. चेकपोस्टवरील बेकायदेशीर वसुली तात्काळ बंद झाली पाहिजे आणि दोषींवर शिस्तभंगात्मक कारवाई झाली पाहिजे, अशी ‘आप’ची मागणी आहे.

    “सत्ता कोणाच्याही हाती असली, तरी अन्याय करणाऱ्यांवर आम्ही आवाज उठवत राहू. आता प्रत्येक ट्रक ड्रायव्हरच ‘कॅमेरा’च्या माध्यमातून यंत्रणेला आरसा दाखवेल!” असे ‘आप’चे जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार यांनी सांगितले.

  • AAP District President Mayur Raikwar । 🔥 कॉपी पेस्ट बदनामी, RTO नाक्यावर काय घडलं?, मयूर राईकवार यांचा स्फोटक खुलासा

    AAP District President Mayur Raikwar

    AAP District President Mayur Raikwar : चंद्रपूर – शासकीय कामात अडथळा व अधिकाऱ्यांसोबत बाचाबाची केल्याने आम आदमी पार्टी जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार व पत्रकार अर्जुन सिंग धुन्ना यांच्यावर विरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. मात्र चंद्रपूर पोलिसांच्या प्रसिद्धी पत्रकात ट्र्क चालकांकडून खंडणी मागणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल असा उल्लेख असल्याने दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रात आप जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार यांच्यावर खंडणी चा गुन्हा दाखल अश्या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध झाले. यामुळे मयूर राईकवार व अर्जुन सिंग धुन्ना यांची नाहक बदनामी झाली, कारण असा काही प्रकार घडलाच नव्हता. transport check post lakkadkot

    नळजोडणी टिल्लू पंप व काळी यादी, मनपाची मोहीम

    प्रकरण काय?

    १६ जुलै रोजी कारण परिवहन विभागाच्या लक्कडकोट तपासणी नाक्यावर मोटार वाहन निरीक्षक योगिता राणे यांना माहिती मिळाली कि काही इसम हे ट्र्क चालकांना थांबवीत त्यांच्याजवळून पैसे घेत आहे, राणे यांनी याबाबत विचारणा केली असता ते दोघे पत्रकार आहो असे म्हणत आम्ही कुठेही फिरू शकतो असे सांगितले, त्यांना ओळखपत्र मागितले असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे देत फिर्यादीस अश्लील शब्दात शिवीगाळी केली. शासकीय कामात अडथळा व कर्तव्यावर हजर असणाऱ्या अधिकाऱ्याला धमकी दिल्या प्रकरणी मयूर राईकवार व अर्जुन धुन्ना यांच्यावर विविध कलमांव्ये गुन्हे दाखल करण्यात आले.

    नेमकं काय घडलं?

    आप जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार हे सहकारी पदाधिकारी व पत्रकार यांच्यासमवेत लक्कडकोट तपासणी नाक्यावर गेले होते, कारण त्यांच्याजवळ तपासणी नाक्यावर ट्र्क चालकांकडून पैसे घेत असल्याची तक्रार प्राप्त झाली होती. तक्रार मिळताच याबाबत ते तपासणी नाक्यावर गेले होते. यावेळी त्यांची गाडी थांबविण्यात आली. त्यांना नाव, ओळखपत्र अशी चौकशी करण्यात आली. यावेळी पत्रकार धुन्ना यांनी आपली ओळख सांगितली व माझा मोबाईल नम्बर घ्यावा असे म्हटले असता त्याठिकाणी कांबळे नामक अधिकारी म्हणतो कि आधी फ्रेंडशिप होऊ द्या मग नंबर घेतो. असे म्हणाले. तुम्ही इथे व्हिडीओ का काढत आहे, मोबाईल बंद करा अशी अरेरावी राईकवार यांच्यासमवेत करण्यात आली. यावेळी अधिकाऱ्याकडून मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न सुद्धा करण्यात आला.

    काही वेळाने राईकवार हे आपल्या वाहनात बसले मात्र नाक्यावरील अधिकारी हे थोडं थांबा, चला चाय घेऊ असे म्हणायला लागले, मात्र अधिकाऱ्यांसोबत बाचाबाची झाल्याने राईकवार सहकारी सोबत परतले, पण सायंकाळी त्यांच्यावर विविध कलमांव्ये गुन्हे दाखल करण्यात आले कि त्यांनी कर्तव्यावर हजर असणाऱ्या अधिकाऱ्यांना अश्लील शब्दात शिवीगाळी केली. विशेष बाब म्हणजे या सर्व संभाषणाचा मयूर राईकवार यांनी पूर्ण व्हिडीओ रेकॉर्ड केला असून त्यामध्ये त्यांनी कसलीही शिवीगाळी केली नसल्याचे दिसत आहे. AAP District President Mayur Raikwar

    मला शिवीगाळ केली

    काही महिन्यापूर्वी सहायक मोटर वाहन निरीक्षक शिवाजी विभुते याच rto चेकपोस्टवर ट्र्क चालकांकडून ५०० रुपये घेताना लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडकले होते, या नाक्यावर असे प्रकार सतत सुरु असल्याची माहितीही पुढे वारंवार येत आहे. याबाबत मोटर वाहन निरीक्षक योगिता राणे यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले कि काहीजण ट्र्क चालकांना थांबविता त्यांच्याकडून पैसे वसूल करीत आहे, माहिती मिळाल्यावर मी लगेच नाक्यावर पोहोचले होते, मी विचारपूस केली असता त्यांनी बाचाबाची करीत मला शिवीगाळी केली, त्यांच्या वाहनात ५ जण बसलेले होते. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे, याबाबत आम्ही रीतसर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली आहे, पोलीस तपासात सत्य समोर येईलच.

    या सर्व प्रकरणावर आम आदमी पक्षाने पत्रकार परिषद घेत आमच्यावर जो गुन्हा दाखल करण्यात आला आहे तसा कसलाही प्रकार घडलेला नाही, फक्त अधिकाऱ्यांसोबत बाचाबाची झाली हे खरे आहे, मात्र आम्ही कुना ट्र्क चालकांकडून पैसे वसूल केलेले नाही, आम्ही लढणारे कार्यकर्ते म्हणून काम करतो, rto चेक पोस्टवर किती भ्रष्टाचार चालतो हे जगजाहीर आहे, याबाबत आम्ही लढा देत आमच्यावर जे गुन्हे दाखल करण्यात आले आम्ही यावर शांत बसणार नाही. पोलीस अधीक्षकांनी चुकीच्या मथळ्याखाली प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आल्याची बाब कबूल केली आहे, यावर चौकशी लावू असे आश्वासन सुद्धा पोलीस अधीक्षक यांनी दिले आहे. false extortion charges

    आप जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार यांच्याकडे ट्र्क चालकाने चेक पोस्टवर पैसे वसूल केल्या जातात अशी तक्रार केली होती त्याची शहानिशा करण्यासाठी आम्ही चेकपोस्टवर गेलो होतो, मात्र उलट आमच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला, यावर आम्ही शांत बसणार नाही, rto अधिकारी यांना समजलं होत कि आम्ही व्हिडीओ रेकॉर्ड केला आहे, त्यांचा भ्रष्टाचार उघड होणार म्हणून त्यांनी आमच्याविरोधात तक्रार दाखल केली, भ्रष्टाचार विरोधात आम्ही सतत लढा देत राहू अशी प्रतिक्रिया राईकवार यांनी दिली. AAP District President Mayur Raikwar

    विशेष बाब म्हणजे पोलिसांच्या चुकीच्या मथळ्याने राईकवार व धुन्ना यांची नाहक बदनामी झाली, वर्तमानपत्रात खंडणी ची बातमी प्रसारित झाल्यावर पोलीस विभागाने आपली चूक मान्य केल्यावर दुरुस्ती करीत पुन्हा प्रसिद्ध करण्यात आली मात्र या कालावधीत बदनामी तर झालीचं. चंद्रपूर जिल्ह्यात सध्या बोगस पत्रकारांचा धुमाकूळ सुरु आहे. विशेष बाब म्हणजे पोलिसांनी याबाबत नागरिकांना आवाहन केले आहे आहे कि बोगस पत्रकारांविरुद्ध आम्हाला तक्रार द्या त्यांच्या दबावाला बळी न पडता त्यांना खंडणी देऊ नका. चंद्रपुरात सध्या ५०० रुपये घेत बोगस आयकार्ड वाटपाचा प्रकार सुरु आहे.

  • no FIR filed despite evidence । ठोस पुरावे असूनही FIR नाही; आप ने दिला खळखळ्खट्याक आंदोलनाचा इशारा

    no FIR filed despite evidence

    no FIR filed despite evidence : चंद्रपूर महानगरपालिकेतील भ्रष्टाचाराचा (chandrapur mahanagarpalika corruption)अजून एक काळा अध्याय समोर आला आहे. कोहिनूर ग्राउंड येथील नागरिकांच्या फिरण्यासाठी तयार केलेल्या ट्रॅकवरील शासकीय पेव्हर्स अर्बन एनव्हायरॉन कंपनीने चोरून स्वतःच्या खासगी कार्यालयात लावले आहेत. यासंदर्भात दि. १६ मे रोजी पालिका आयुक्तांना तक्रार व ठोस पुरावे (फोटो, व्हिडीओ) सादर करूनही अद्याप कोणतीही FIR नोंदवण्यात आलेली नाही.

    माजी सैनिकाने दिला आमरण उपोषणाचा इशारा

    गाडीत टाकून नेले ती चोरी नाही

    याप्रकरणी पालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्री. चंदन पाटील यांची भेट घेतली असता, त्यांनी अत्यंत उद्धटपणे व निष्काळजीपणे उत्तर दिले की, “पेव्हर्स गाडीत टाकून नेले, त्याला चोरी म्हणता येत नाही.” हे उत्तर म्हणजे जनतेच्या डोळ्यात धूळ फेकण्याचा प्रयत्न आहे आणि यामधून पालिका प्रशासनाचा भ्रष्ट चेहरा पुन्हा एकदा उघड झाला आहे.

    महानगरपालिकेतील संपूर्ण यंत्रणा भ्रष्टाचाराने पोखरलेली असून, हे अधिकारी स्वतःला कोणीही वाकडं करू शकत नाही अशा भ्रमात आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांकडून महानगरपालिकेतील भ्रष्टाचाराबाबत सातत्याने आवाज उठवला जात आहे. मात्र अधिकारी वर्गाची मानसिकता इतकी बधीर झाली आहे की, सामान्य जनतेच्या हक्कांची खुलेआम पायमल्ली केली जात आहे.

    शासकीय संपत्तीवर डल्ला

    ही घटना केवळ पेव्हर्स चोरीची (Pavers theft) नसून, ती सामान्य जनतेच्या हक्कांवर आणि शासकीय संपत्तीवर डल्ला मारण्याची लक्षणीय घटना आहे. जर सामान्य नागरिक काही चूक करतो, तर प्रशासन त्याच्यावर कठोर कारवाई करते. पण एवढा मोठा प्रकार उघडपणे घडूनही महानगरपालिका शांत का आहे? यामागे गुप्त सांठगांठ व भ्रष्टाचाराचा गंभीर वास येतो.

    आज दिनांक ६ जून २०२५ रोजी आम आदमी पक्षाच्या (Aam Aadmi party) वतीने जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना या गंभीर घटनेबाबत सविस्तर तक्रार अर्ज सादर करण्यात आला.
    या वेळी उपस्थित होते:
    👉 मयूर राईकवार (जिल्हाध्यक्ष),
    👉 राजू कूडे (युवा जिल्हाध्यक्ष),
    👉 योगेश गोखरे (शहर अध्यक्ष),
    👉 प्रशांत सिदुरकर (जिल्हा सचिव),
    👉 संतोष बोपचे (महानगर संगठन मंत्री),
    👉 एड. तबस्सुम शेख (शहर महिला अध्यक्ष),
    👉 हांडेकर गुरुजी (शहर पदाधिकारी),
    👉 विशाल बिरमवार (शहर पदाधिकारी)
    आणि इतर पदाधिकारी व कार्यकर्ते.

    या घटनेबाबत जर पुढील ८ दिवसांत कोणतीही शासकीय कार्यवाही झाली नाही, तर आम आदमी पक्ष चंद्रपूर जिल्हा तर्फे अभिनव आणि बहिरे असल्याचे सॉन्ग करणाऱ्या भ्रष्ट अधिकार्‍यांचा विरोधात तीव्र व ‘खडकट्याक आंदोलन’ करण्यात येईल, असा जबरदस्त इशारा आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार यांनी दिला आहे.

    हा लढा केवळ भ्रष्टाचाराविरोधात नाही, तर सामान्य जनतेच्या न्यायासाठी आहे. आम आदमी पक्ष शेवटच्या श्वासापर्यंत या लढ्याला न्याय मिळवून देण्यासाठी कटिबद्ध आहे.

  • Aam Aadmi Party : छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान सहन केल्या जाणार नाही – मयूर राईकवार

    Aam Aadmi Party : छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान सहन केल्या जाणार नाही – मयूर राईकवार

    Aam Aadmi Party मालवण राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या कोसळण्याच्या घटनेविरोधात आम आदमी पक्षाचे तीव्र आंदोलन

    मालवण राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या कोसळण्याच्या अत्यंत दुर्दैवी आणि संतापजनक घटनेविरोधात आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्री मयूर राईकवार यांच्या नेतृत्वात जटपुरा गेट येथे एक प्रभावी आंदोलन आयोजित करण्यात आले. या घटनेने महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाच्या भावना दुखावल्या आहेत.

    आंदोलनाचे प्रमुख मुद्दे:

    1. पुतळ्याच्या तात्काळ दुरुस्तीची मागणी
    2. या घटनेस जबाबदार असणाऱ्यांवर कडक कारवाईची मागणी
    3. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी प्रभावी उपाययोजनांची मागणी
    4. ऐतिहासिक वारसा जतन करण्यासाठी विशेष निधीची मागणी

    Aam aadmi party आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्री मयूर राईकवार यांनी या प्रसंगी भाष्य करताना म्हटले, “छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचेच नव्हे तर संपूर्ण भारताचे अभिमान आहेत. त्यांच्या स्मृतीचा असा अपमान कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही. आम्ही शासनाला आवाहन करतो की या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन तात्काळ कारवाई करावी. जोपर्यंत योग्य ती कारवाई होत नाही, तोपर्यंत आमचे आंदोलन सुरूच राहील.”

    ज्येष्ठ नेते श्री सुनील मुसळे यांनी या घटनेचा ऐतिहासिक संदर्भ देत म्हटले, “छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या कार्याने महाराष्ट्राला एक नवी दिशा दिली. त्यांच्या विचारांचा आणि कार्याचा सन्मान करणे हे प्रत्येक महाराष्ट्रीयनाचे कर्तव्य आहे. या घटनेमुळे आमच्या भावना अत्यंत दुखावल्या गेल्या आहेत.”

    अवश्य वाचा : महायुती सरकारचा कोथळा जनता काढल्याशिवाय राहणार नाही – रामू तिवारी

    महानगर अध्यक्ष श्री योगेश गोखरे यांनी या प्रसंगी आपले विचार मांडताना म्हटले, “छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ एक ऐतिहासिक व्यक्तिमत्व नाहीत, तर ते आमच्यासाठी जीवनमूल्यांचे प्रतीक आहेत. त्यांच्या पुतळ्याची दुरवस्था म्हणजे आमच्या संस्कृतीचा आणि मूल्यांचा अपमान आहे. आम्ही मागणी करतो की शासनाने न केवळ या पुतळ्याची दुरुस्ती करावी, तर राज्यभरातील सर्व ऐतिहासिक वास्तूंचे आणि पुतळ्यांचे संरक्षण आणि जतन करण्यासाठी एक विशेष कृती आराखडा तयार करावा. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आणि आदर्श नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्याची गरज आहे. आम्ही या विषयावर तडजोड करणार नाही आणि आमचे आंदोलन सुरूच ठेवू.”

    Aam aadmi party युवा जिल्हाध्यक्ष श्री राजू कुडे यांनी तरुणांच्या भूमिकेवर भर देत सांगितले, “आजची तरुण पिढी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांनी प्रेरित आहे. आम्ही त्यांच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी कटिबद्ध आहोत आणि अशा घटनांमुळे आमचा संकल्प अधिकच दृढ होतो.”

    महानगर महिला अध्यक्ष ऍड. तबसुंम शेख यांनी महिलांच्या सहभागावर भर देत म्हटले, “छत्रपती शिवाजी महाराजांनी महिलांच्या सन्मानासाठी केलेले कार्य अतुलनीय आहे. आजच्या या आंदोलनात मोठ्या संख्येने महिला सहभागी झाल्या आहेत, जे दर्शवते की महाराजांचे विचार आजही तितकेच प्रासंगिक आहेत.”

    Aam aadmi party आंदोलनात सहभागी झालेल्या प्रमुख नेत्यांमध्ये श्री राजकुमार नगराळे (जिल्हा सचिव), श्री प्रशांत सिदुरकर, श्री कुणाल शेटे, श्री योगेश मुरेकर (जिल्हा संगठन मंत्री), श्री संगम सागोरे (वाहतूक जिल्हाध्यक्ष), श्री संतोष बोपचे (महानगर संगठन मंत्री), श्री जावेद सय्यद (अल्पसंख्याक अध्यक्ष), श्री संतोष दोरखंदे (जिल्हा महासचिव), श्री आदित्य नंदनवार (युवा सचिव), श्री सुनील सद्भय्या (महानगर उपाध्यक्ष), श्री सिकंदर सागोरे, श्री विकास मंडल, श्री शुभम साखरकर, श्री जितेंद्र कुमार भाटिया, श्री कार्तिक सीडाम, श्री चेतन आगळे, श्री माधव मामीडवार, श्री अशीष सिंग, श्री ईश्वर सहारे यांचा सह असंख्य पदाधिकारी कार्यकर्ते यांचा समावेश होता.

    आंदोलनादरम्यान आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते अत्यंत तीव्र भावनिक अवस्थेत होते. त्यांनी आपल्या मागण्यांबाबत कडक भूमिका घेतली आणि न्यायासाठी ठामपणे उभे राहिले. शासनाच्या निष्क्रियतेमुळे त्यांच्या संतापाची पराकाष्ठा झाली होती. त्यांनी शासनाला स्पष्ट इशारा दिला की जर लवकरात लवकर योग्य ती कारवाई करण्यात आली नाही, तर येत्या काळात अधिक उग्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल. आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानाच्या विरोधात कोणतीही तडजोड करण्यास तयार नाहीत.

    आम आदमी पक्ष या प्रकरणाचा कडक पाठपुरावा करत राहील आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मृतीचा योग्य तो सन्मान राखला जाईल यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेल.

    संपर्क:
    श्री राजेश चेटगुलवार
    जिल्हा सोशल मीडिया प्रमुख, आम आदमी पक्ष
    मोबाईल:

  • चंद्रपूर मनपाचा अजब कारभार

    चंद्रपूर मनपाचा अजब कारभार

    News34 chandrapur

    चंद्रपूर : जिल्ह्यातील बल्लारपूर शहरात राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त लागणाऱ्या एलईडी स्क्रीनसाठी चंद्रपूर महानगरपालिकेने निविदा काढली आहे. बल्लारपूर शहरात हा कार्यक्रम होत असतानाही चंद्रपूर महानगरपालिकेने निविदा काढून आपली हद्दपार केली आहे.

    दुसऱ्या शहरातील एल.ई.डी. स्क्रिनसाठी चंद्रपूर मनपाने निविदा कशी काढली, असा प्रश्न आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार यांनी उपस्थित केला आहे. हि निविदा काढण्यास आम आदमी पार्टीने विरोध दर्शवला असून, चंद्रपूरच्या जनतेचा पैसा इतर ठिकाणी खर्च करण्याचा अधिकार आयुक्त विपीन पालीवाल यांना कोणी दिला, असा सवाल आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार यांनी विचारला आहे. भारतीय जनता पार्टीचे नेते आणि पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची मर्जी राखण्यासाठी ही निविदा काढण्यात आली, असा आरोप केला आहे.

    चंद्रपूर शहर महानगरपालिका, चंद्रपूर यांनी जावक क्रमांक: चंशमनपा/विद्युत्त/२०२३/३१० दिनांक : २२/१२/२०२३ नुसार ई-निविदा सुचना काढली आहे. आयुक्त चंद्रपूर शहर महानगरपालिका, जि. चंद्रपूर यांचे वतीने खालील कामासाठी दोन लिफाफा पद्धतीने ई निविदा पद्धतीच्या पंजीबद्ध कंत्राटदाराकडून/फर्मकडुन ई निवीदा मागविण्यात आल्या. निवीदेच्या विस्तृत नमुना महाराष्ट्र शासनाच्या http://www.mahatenders.gov.in या संकेतस्थळावर दिनांक २२/१२/२०२३ पासून पाहण्यास उपलब्ध आहे. ई-निविदा प्रसिद्धीचा तपशील कामाचे नाव चंद्रपुर व बल्लारपूर शहरात ४ एल.ई.डि. स्क्रिन उभारणीचे काम असे दाखविण्यात आले आहे. ऑनलाईन निविदा विक्री व स्वीकृती दिनांक दिनांक २२/१२/२०२३ ते २७/१२/२०२३ ला दु. १२.०० वाजेपर्यंत आणि ऑनलाईन निविदा उघडणी दिनांक दिनांक २८/१२/२०२३ ला दु. ३.०० वाजता असे नमूद आहे. ही जाहिरात एका स्थानिक दैनिकांत देण्यात आली आहे.

     

    राईकवार यांनी सांगितले कि, चंद्रपूर महानगरपालिका आणि बल्लारपूर नगरपालिका या दोन स्वतंत्र संस्था आहेत. कोणतेही काम करताना सीमेच्या बाहेर जाऊन काम करता येत नाही. परंतु, चंद्रपूर महानगरपालिकेचे आयुक्त विपीन पालीवाल यांनी यांनी केवळ पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची मर्जी राखण्यासाठी हा निविदा काढली. या निविदामुळे चंद्रपूर महानगरपालिकेच्या तिजोरीवर वाढीव खर्च होणार आहे. त्यामुळे अवास्तव खर्च टाळण्यासाठी ही निविदा रद्द करण्यात यावी, अशी मागणी राईकवार यांनी केली आहे.