Tag: भारत बंद

  • MSEDCL strike day power backup plan । संपाचा कोणताही परिणाम नाही! महावितरणचे युद्धपातळीवर बॅकअप ऑपरेशन

    MSEDCL strike day power backup plan

    MSEDCL strike day power backup plan : चंद्रपूर, दि. ८ जुलै २०२५: महावितरणच्या २३ पैकी ६ कर्मचारी संघटनांनी बुधवारी (दि. ९) एका दिवसाचा संप पुकारला आहे. या संपकाळात वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महावितरणकडून आपत्कालिन नियोजन पूर्ण झाले राज्यभरातील यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे.

    नागरिकांनी वीजपुरवठ्याबाबत कोणत्याही नकारात्मक व चुकीच्या संदेशावर विश्वास ठेवू नये. वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी पर्यायी यंत्रणा २४ तास युद्धपातळीवर सज्ज राहणार आहे. वीजपुरवठ्याबाबत काही तक्रारी किंवा शंका असल्यास २४ तास सुरु असलेल्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा व संपाच्या कालावधीत सहकार्य करावे असे आवाहन महावितरण कडून करण्यात आले आहे.

    दिव्यांग व मागासवर्गीयांसाठी सोन्याची संधी

    राज्यातील वीज कर्मचाऱ्यांच्या सहा संघटनांच्या संयुक्त कृती समितीने राज्यपातळीवरील विविध मागण्यांसाठी बुधवारी (दि. ९) २४ तासांचा संप जाहीर केला होता. हा संप होऊ नये यासाठी कृती समितीमधील संघटनांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत दोन वेळा बैठक झाली. महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र व संचालक (मानव संसाधन) श्री. राजेंद्र पवार यांनी प्रमुख मागण्यांबाबत बैठकीत सकारात्मक प्रतिसाद दिला. वीज ग्राहकांची गैरसोय होऊ नये यासाठी संप टाळण्याचे आवाहन केले. how to manage power supply during employee strike

    महावितरण तर्फे आपत्कालीन व्यवस्था

    आपत्कालिन नियोजन व पर्यायी मनुष्यबळ उपलब्ध- या २४ तासांच्या संप काळासाठी महावितरणकडून आपत्कालीन व्यवस्था उभारण्यात आली आहे. यामध्ये मुख्यालय व क्षेत्रीय परिमंडल कार्यालयांमध्ये स्वतंत्र नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आले आहेत. दर तासाला राज्यातील वीजपुरवठ्याची स्थिती वरिष्ठ अधिकारी व मुख्यालयास कळविण्यात येणार आहे.

    संपकाळात प्राधान्याने सुरळीत वीजपुरवठ्यासाठी पर्यायी मनुष्यबळ उपलब्ध करण्यात येत असून संपात सहभागी नसलेले महावितरणचे कर्मचारी, बाह्य स्त्रोत कर्मचारी, महावितरणच्या निवड सूचीवरील कंत्राटदार व कर्मचारी यांची सुरळीत वीजपुरवठ्यासाठी स्थानिक कार्यालय, उपकेंद्र आदी ठिकाणी तात्पुरत्या नियुक्ती करण्यात आली आहे. आवश्यकतेनुसार बाह्यस्त्रोत कर्मचाऱ्यांच्या कंत्राटदारांना अतिरिक्त मनुष्यबळाची मागणी करण्यात आली आहे. या सर्वांसाठी वाहन व्यवस्था व इतर सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. याबाबतच्या लेखी सूचना क्षेत्रीय कार्यालयांना देण्यात आल्या आहेत. government action plan for electricity during labour strike

    अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या रजा रद्द

    रोहीत्र, वीजवाहिन्यांसह इतर साधनसामुग्री उपलब्ध- संपकाळामध्ये सुरळीत वीजपुरवठ्यासाठी सर्व क्षेत्रीय विभाग कार्यालयांच्या निवडसूचीवर असलेल्या सर्व कंत्राटदारांना आवश्यक साधनसामुग्री, मनुष्यबळ व वाहनांसह संबधीत कार्यालयांमध्ये उपलब्ध राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सोबतच महावितरणकडून वितरण रोहीत्र, ऑईल, वीजतारा, केबल्स, वीजखांब, फिडर पिलर्स, डिस्ट्रीब्यूशन बॉक्सेस, वाहतुकीसाठी वाहने आदी आवश्यक साधनसामुग्री महावितरणच्या विविध कार्यालयांमध्ये उपलब्ध ठेवण्यात आली आहे. यासह गंभीर कारणास्तव घेतलेल्या रजा वगळून इतर अभियंते, अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बुधवारच्या (दि. ९) रजा रद्द करण्यात आल्या आहेत.

    घरगुतीसह अत्यावश्यक क्षेत्रात वीजपुरवठ्याची खबरदारी- संपकाळात प्रामुख्याने घरगुती ग्राहकांसह पाणी पुरवठा योजना, रुग्णालये, मोबाईल टॉवर्स, शासकीय कार्यालये आदींचा वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याची विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. ज्या ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला त्या ठिकाणी सर्वप्रथम पर्यायी व्यवस्थेतून (बॅकफिड) वीजपुरवठा सुरू करण्यात येईल.

    येथे साधा कधीही संपर्क- संपकाळात वीजसेवा देणारे अभियंते व कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे. वीजपुरवठा संदर्भात काही तक्रारी असल्यास शहरी व ग्रामीण भागातील वीजग्राहकांसाठी मध्यवर्ती ग्राहक सेवा केंद्राचे १९१२ किंवा १८००-२१२-३४३५ किंवा १८००-२३३-३४३५ हे टोल फ्री क्रमांक २४ तास उपलब्ध आहेत. MSEDCL power outage support contact number

  • Classification of Scheduled Castes : एससी / एसटी आरक्षणाच्या वर्गीकरणाच्या विरोधात आज बहुजन समाज पार्टीचे आंदोलन

    Classification of Scheduled Castes : एससी / एसटी आरक्षणाच्या वर्गीकरणाच्या विरोधात आज बहुजन समाज पार्टीचे आंदोलन

    Classification of Scheduled Castes देशभरात बुधवार दिनांक 21ऑगस्ट 2024 रोजी भारत बंदची हाक देण्यात आली असून, दलित आणि आदिवासी संघटनांनी हा बंद पुकारला आहे. भारत बंदच्या या आंदोलनामध्ये बहुजन समाज पार्टी सहभागी झाली आहे. चंद्रपूर बहुजन समाज पार्टी च्या वतीने एस सी, एस टी आरक्षण वर्गीकरण रद्द करण्याचा करीत मोठ्या प्रमाणात आंदोलन उभे केले.

    अवश्य वाचा : चंद्रपूर जिल्ह्यातील ही पर्यटन स्थळे बंद

    SC/ST आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयानं निर्णय दिला होता. एससी एसटी अंतर्गत वर्गीकरण करण्याचे अधिकार राज्य सरकारला असल्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयानं दिले आणि त्याविरोधातच ही भारत बंदची हाक देण्यात आली.

    Classification of Scheduled Castes देशाच्या सुप्रीम कोर्टातील सात जजेस च्या बेंचने 1 ऑगस्ट 2024 रोजी अनुसूचित जाती-जमाती चे वर्गीकरण करून त्यांना क्रिमिलियर लावणे संदर्भात निर्णय दिला. हा निर्णय भारतीय संविधानाच्या विरोधात असून असंवैधानिक आहे. त्यामुळे आपण विनाविलंब संसदेचे विशेष सत्र बोलावून हा निर्णय रद्द करावा, तसेच आरक्षणाला भारतीय संविधानाच्या नवव्या अनुसूचित टाकावे. जेणेकरून यापुढे अनुसूचित जाती-जमातीच्या संविधानिक आरक्षणाशी कोणी छेडछाड करणार नाही.

    राजकीय आंदोलन : गृहमंत्री, शिक्षणमंत्री राजीनामा दो – राष्ट्रवादी कांग्रेसचे आंदोलन

    आज देशभरात विविध संघटनाच्या माध्यमातून बंद पुकारण्यात आला, चंद्रपुरात बसपा जिल्हाध्यक्ष शिरीजकुमार गोगूलवार यांच्या नेतृत्वात शांतीपूर्व आंदोलन छेडण्यात आले. जिल्हाधिकारी साहेब यांच्या मार्फत देशाचे महामहिम राष्ट्रपती यांना शिष्टमंडळाच्या वतीने निवेदन देण्यात आले. यावेळी शेकडो बसपा कार्यकर्ते उपस्थित होते.

    आंदोलनकर्त्यांच्या मागणीनुसार संसदेत आरक्षणाच्या मुद्द्याला अनुसरून संसदेत सर्वपक्षीय एक विशेष बैठक बोलावून एका नव्या कायद्याची आखणी करण्यात यावी. या कायद्याला संविधानाच्या यादीमध्ये समाविष्ट करत त्याला संरक्षित करून घ्यावं. याशिवाय सर्वोच्च न्यायालयानं आपल्या निर्णयावर पुनर्विचार करून सदर निर्णय रद्द करावा अशीही मागणी करण्यात आली आहे. आंदोलनकर्त्यांच्या मागणीनुसार एससी, एसटी आणि ओबीसींच्या संविधानिक अधिकारांना संरक्षण देण्यात यावं अशी विशेष मागणी आहे.

    महिला सुरक्षा : चंद्रपुरात महिला सुरक्षेची नागरिक घेणार शपथ


    या प्रसंगी बहुजन समाज पार्टी चे जिल्हा प्रभारी प्रशांत रामटेके, जिल्हा उपाध्यक्ष रत्नाकर साठे,
    जिल्हा संयोजिका अल्का शिंदे, चंद्रपूर विधानसभे चे सर्व पदाधिकारी, शहराचे सर्व पदाधिकारी व बहुजन समाज पक्षाचे शेकडो कार्यकर्ता उपस्थित होते..