Tag: भाजप चंद्रपूर जिल्हा

  • bjp municipal election strategy chandrapur । चंद्रपूर महापालिका निवडणुकीसाठी भाजपची स्ट्रॅटेजी ठरली, पालिकेत एकहाती सत्ता मिळवणार!

    bjp municipal election strategy chandrapur

    bjp municipal election strategy chandrapur : चंद्रपूर – आमदार किशोर जोरगेवार यांच्या नेतृत्वावर आमचा पूर्ण विश्वास आहे. आज येथे मोठ्या संख्येने जमलेला कार्यकर्ता वर्ग याची साक्ष देणारा आहे. आजच्या बैठकीत कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर पक्षाच्या माध्यमातून जनतेसाठी काम करण्याची दिसणारी जिद्द आणि विजयाचा संकल्प या भरोशावर येणाऱ्या महापालिका निवडणुकीत एकहाती सत्ता आणू, असे प्रतिपादन आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. डॉ. अशोक उईके यांनी केले.

    कोब्रा व मुजोर स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात

    आमदार किशोर जोरगेवार यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पक्ष चंद्रपूर विधानसभा मतदारसंघाच्या वतीने कन्यका सभागृहात मनपा निवडणूक आढावा बैठक, महानगर अध्यक्ष आणि नवनियुक्त मंडळ अध्यक्ष सत्कार समारंभ तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा सप्ताह नियोजनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.

    या कार्यक्रमाला आमदार किशोर जोरगेवार, महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, भाजप नेते अशोक जिवतोडे, माजी महापौर राखी कंचर्लावार, माजी उपमहापौर अनिल फुलझले, नेते विजय राऊत, युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष रघुवीर आहिर, माजी नगरसेवक संजय कंचर्लावार, माजी संत मनीष महाराज, तुषार सोम, दशरथसिंह ठाकूर, नामदेव डाहुले, रवी आसवानी, ऍड. सुरेश तालेवार  राजेंद्र अडपेवार, अरुण तिखे,  राहुल घोटेकर, श्याम कणकम, रवी गुरनूले, शीतल गुरनूले, कल्पना बबूलकर, वंदना तिखे, शीतल आश्राम, माया उईके, सारिका नंदुरकर, वंदना जांभुळकर, शीला चौव्हाण, शीतल कुळमेथे, संगीता खांडेकर, आशिष मासिरकर, वंदना हातगावकर, सविता दंढारे, सायली येरणे, अमोल शेंडे, राशिद हुसेन, जितेश कुळमेथे, करणसिंह बैस, कार्तिक बोरेवार, संजय तिवारी आदींची उपस्थिती होती.

    यावेळी महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार यांच्यासह नवनियुक्त मंडळ अध्यक्ष सुभाष अदमाने, स्वप्निल डुकरे, रवी जोगी, सारिका नंदुरकर, प्रदीप किरमे यांचा पालकमंत्री अशोक उईके आणि आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

    bjp chandrapur 2025 municipal election planning

    यानंतर पुढे बोलताना पालकमंत्री ना. उईके म्हणाले की, भारतीय जनता पक्ष हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. (ashok uike guardian minister chandrapur updates)येथे कार्यकर्त्यांना नेहमीच सन्मान दिला जातो. मात्र पक्षात काम करत असताना कार्यकर्त्यांसाठी एक संस्कारपूर्ण आचारसंहिता आहे. जनतेची कामे करताना सौजन्याने वागले पाहिजे. प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्याला पक्ष नेहमीच त्याच्या कामाची पावती देतो. आपण काम करत असताना पक्षाचा विचार आणि धोरण प्रत्येक घरी पोहोचविले पाहिजे. चंद्रपूर जिल्ह्यात पक्ष खूप मोठा झाला आहे. कार्यकर्त्यांसाठी समर्पित असलेले किशोर जोरगेवार यांसारखे नेतृत्व आपल्याला लाभले आहे. या ताकदीवर आपण सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकून पक्ष अधिक बळकट करू, असा विश्वास यावेळी पालकमंत्री उईके यांनी व्यक्त केला. bjp chandrapur 2025 municipal election planning


    नव्या पदाधिकाऱ्यांसह पक्षाच्या नव्या संघटन पर्वाची सुरुवात – आ. किशोर जोरगेवार

    नवीन मंडळ अध्यक्षांची आपण निवड केली आहे. या मंडळ अध्यक्षांना सोबत घेऊन महानगर अध्यक्षांनी जनतेचे प्रश्न सोडविण्याचे काम करावे. भारतीय जनता पक्ष हा केवळ व्यक्तीकेंद्रीत पक्ष नाही. हा पक्ष म्हणजे विचार, मूल्ये आणि जनसेवेचा सातत्यपूर्ण ध्यास आहे. प्रत्येक कार्यकर्ता हा पक्षाची ऊर्जा आहे. पक्षाची धोरणे आणि विचार प्रत्येक घरापर्यंत पोहोचविण्याची मोठी जबाबदारी तुमच्यावर आहे. kishor jorgewar bjp leadership speech

    आपल्या समोर महानगरपालिकेच्या निवडणुका उभ्या आहेत. ही केवळ निवडणूक नाही, तर आपल्या कामाचं आणि सेवाभावाचं मूल्य जनतेसमोर मांडण्याची संधी आहे. पक्षाच्या संघटनेत नवीन दमदार नेतृत्वाची भर पडली आहे. मंडळ अध्यक्ष नुकतेच नव्याने नियुक्त झाले आहेत. तुमच्यावर पक्षाने मोठा विश्वास टाकला आहे. हा विश्वास म्हणजे जबाबदारी, सेवा आणि समर्पण याचं प्रतीक आहे. मंडळ हे संघटनेचं मूलभूत स्तर आहे. आपल्या सोबत असलेला जनतेचा विश्वास आणखी दृढ करत एकजुटीने, निर्धाराने आणि आत्मविश्वासाने पुढे जाण्याचे आवाहन यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी केले. या कार्यक्रमाला भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्याम हेडाऊ यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले.

  • BJP Chandrapur district new mandal presidents । 🚨 भाजपच्या चंद्रपूर जिल्ह्यात नवे २७ मंडळ अध्यक्ष – बघा नावांची यादी

    BJP Chandrapur district new mandal presidents

    BJP Chandrapur district new mandal presidents : चंद्रपूर, दि. ३० : मुंबई येथे झालेल्या विशेष बैठकीत भारतीय जनता पक्षाच्या चंद्रपूर जिल्हा ग्रामीण अंतर्गत कार्यरत २७ मंडळांसाठी नवीन मंडळ अध्यक्षांची यादी निश्चित करण्यात आली. ही बैठक भाजपाचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष मा. रविंद्रजी चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीला प्रदेश महामंत्री श्री. विक्रांतजी पाटील, श्री. रविंद्रजी अनासपुरे, श्री. रणधीरजी सावरकर, श्री. राजेश पांडे, श्री. विजयराव चौधरी, माधवीताई नाईक तसेच विदर्भ संगठन मंत्री श्री. उपेंद्रजी कोठेकर हे प्रामुख्याने उपस्थित होते. या नव्या यादीची अधिकृत घोषणा भाजपाचे जिल्हाध्यक्ष श्री. हरीश शर्मा यांनी आज केली आहे. BJP rural leadership appointments

    भाजप आमदार विरोधात चंद्रपुरात भव्य निषेध मोर्चा

    नवीन नियुक्त मंडळ अध्यक्षांची नावे पुढीलप्रमाणे आहेत.

    • 1)बल्लारपुर शहर- ॲड रणन्जय सिंह
      2)बल्लारपुर ग्रामिण- श्री.चंद्रकांत(पिंटु)देऊळकर
      3)मुल शहर- श्री.प्रविण मोहुर्ले
      4)मुल ग्रामिण- श्री.चंदु मारगोनवार
      5)दुर्गापुर/उर्जानगर- श्री.श्रीनिवास जनगमवार
      6)पोंभुर्णा-श्री.हरी पाटील ढवस
       7)गोंडपीपरी – श्री दीपक सातपुते
      8)गडचांदूर शहर – श्री अरुण तुकाराम डोहे,
      9)राजुरा शहर – श्री सुरेश हरी रागीट,


    10)राजुरा ग्रामीण – श्री वामन मारोती तुराणकर,
    11) जिवती – श्री दत्ता हरी राठोड,
    12)कोरपना – श्री संजय रामचंद्र मुसळे,
    13)नंदोरी – मुधोली– श्री दयानंद जांभुळे,
    14)वरोरा शहर –श्री संतोष पवार,
    15)नागरी – सालोरी– श्री राजेंद्र सवई,
    16)भद्रावती शहर – श्री सुनील नामोजवार,
    17)बोर्डा- आबामक्ता – श्रीमती वंदनाताई राजू दाते,
    18)घोडपेठ- पाटाळा – श्री श्यामसुंदर उरकुडे, 19)अर्‍हेरनवरगाव– श्री सुधीर दोनाडकर,
    20)तळोधी– श्री हेमराज शांताराम लांजेवार,
    21)नागभीड –श्री संतोष विठ्ठल रडके,


    22)चिमूर – श्री गजानन गुडधे,
    23) भिसी – नेरी – श्री मनीष दत्तात्रय तूम्पलीवार,
    24) सावली – श्री किशोर भाऊराव वाकुडकर
    25)ब्रह्मपुरी शहर – श्री सुयोग वामनराव बाळबुधे
    26)ब्रह्मपुरी ग्रामीण – श्री ज्ञानेश्वर राजाराम दिवटे
    27)सिंदेवाही –श्री नागराज मुकुटराव गेडाम
     यांची नियुक्ती झाली आहे.

    जिल्हाध्यक्ष श्री हरीश शर्मा यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करताना सांगितले की,“पक्षाची विचारधारा आणि धोरणे जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी ही नवीन टीम प्रभावी कार्य करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

    नवनियुक्‍त पदाधिकाऱ्यांचे महाराष्ट्राचे माजी वने व सांस्कृतिक कार्य तथा मत्स्य व्यवसाय मंत्री आमदार  सुधीरभाऊ मुनगंटीवार, केंद्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराजभैय्या अहीर,चंद्रपूर जिल्‍हा ग्रामीण अध्‍यक्ष हरिश शर्मा,वनविकास महामंडळाचे माजी अध्यक्ष श्री.चंदनसिंह चंदेल,आमदार किर्तीकुमार भांगडीया,आमदार देवराव भोंगळे,आमदार करण देवतळे, माजी आ.प्रा. अतुल देशकर, माजी आ. अॅड. संजय धोटे, माजी आ. सुदर्शन निमकर,श्री.विजय राऊत,श्री.राजेंद्र गांधी,श्री.प्रमोद कडु,श्री.रमेश राजुरकर,सौ.विद्याताई देवाडकर प्रदेश भाजपा चिटणीस , प्रदेश महिला मोर्चा सरचिटणीस अल्काताई आत्राम,भाजपा जिल्हा महामंत्री श्रीमती संध्याताई गूरनुले,डाॅ.मंगेश गुलवाडे, श्री.विवेक बोढे आदींनी अभिनंदन केले आहे.