Tag: बाईक रॅली

  • Har Ghar Tiranga 2025 । तिरंगा रॅलीत युवकांचा उत्स्फूर्त सहभाग – देशभक्तीने रंगले चंद्रपूरचे रस्ते

    Har Ghar Tiranga 2025

    Har Ghar Tiranga 2025 : चंद्रपूर, दि. 14 : नागरिकांमध्ये राष्ट्राभिमान, देशभक्ती निर्माण व्हावी तसेच भारतीय स्वातंत्र्याचा ज्वाजल्य इतिहासाचे सर्व नागरिकांना स्मरण व्हावे, या उद्देशाने शासनामार्फत ‘हर घर तिरंगा’ अभियान राबविण्यात येत आहे. तिरंगा हा प्रत्येक भारतीयाच्या अभिमानाचे प्रतीक असल्याने चंद्रपूर जिल्हा प्रशासन आणि महानगर पालिकेच्या वतीने शहरातून तिरंगा बाईक रॅली काढून देशभक्तीचा जागर करण्यात आला.

    वाघाने केला गाईवर हल्ला, कोरपना तालुक्यात वाघाची दहशत

                यावेळी प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे, मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, मनपा आयुक्त विपीन पालिवाल, अपर पोलिस अधिक्षक ईश्वर कातकाडे यांनी हिरवी झेंडी दाखवून तिरंगा रॅलीला रवाना केले. प्रियदर्शिनी सभागृहापासून सुरू झालेली ही बाईक रॅली शहरातून जनता कॉलेज चौक – सावरकर चौक – बंगाली कॅम्प, बसस्थानक मार्गे परत येऊन प्रियदर्शिनी सभागृह येथे रॅलीचा समारोप करण्यात आला.

                याप्रसंगी डॉ. व्यवहारे म्हणाले, ‘हर घर तिरंगा’ अभियान अंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यात विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. यात भाषण स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, झेंडा रॅली याद्वारे नागरिकांमध्ये भारतीय स्वातंत्र्य आणि देशभक्तीची भावना निर्माण करणे, स्वातंत्र्यासाठी आपल्या पुर्वजांनी काय यातना सोसल्या याची जाणीव करून देणे, हे प्रमुख उदिृष्ट आहे. तसेच चंद्रपूर शहरात आज तिरंगा बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले असून यात शासकीय अधिकारी कर्मचा-यांसह नागरिकही सहभागी झाले आहेत. Har Ghar Tiranga bike rally

    बाईक रॅलीतुन राष्ट्रभक्तीचा जागर

                मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह म्हणाले, ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत जिल्ह्यातील शाळांमध्ये विविध उपक्रम राबविण्यात आले आहेत. तिरंगा बाईक रॅलीमध्ये नागरिकांनी उत्स्फुर्त सहभाग नोंदविला असल्याचे त्यांनी सांगितले. तर मनपा आयुक्त विपीन पालीवाल म्हणाले, ‘हर घर तिरंगा’ हा केवळ एका वर्षाचा कार्यक्रम नाही तर जनमानसाने हा उपक्रम नेहमीसाठीच स्वीकारला आहे. दरवर्षीप्रमाणेच यावर्षीसुध्दा तिरंगा बाईक रॅलीतून राष्ट्रभक्तीचा जागर करण्यात येत आहे. 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत प्रत्येक नागरिकाने आपल्या घरावर राष्ट्रध्वज लावावा तसेच 15 ऑगस्ट रोजी सुर्यास्तापूर्वी हा राष्ट्रध्वज काढावा, असे आवाहन त्यांनी केले. flag hoisting every home campaign

                सदर रॅलीमध्ये विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी, युवक-युवती, खेळाडू तसेच  नागरिकांनी सहभाग नोंदविला.

  • चंद्रपूर शहरातील बाईक रॅलीत जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक झाले दुचाकी चालक

    चंद्रपूर शहरातील बाईक रॅलीत जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक झाले दुचाकी चालक

    News34 chandrapur

    चंद्रपूर  : राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नातून जिल्ह्यात राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन होत आहे. या निमित्ताने जिल्ह्यात विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातून खेळाडू येण्यास सुरवात झाली आहे. या खेळाडूंचा उत्साह वाढविण्यासाठी तसेच क्रीडा स्पर्धेचा ज्वर वाढवून वातावरण निर्मितीकरीता पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या सुचनेवरून जिल्हा प्रशासनाच्यावतीने आज (दि.25) चंद्रपूर व बल्लारपूर या शहरात बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. रॅलीत नागरिकांनी स्वत:हून मोठ्या प्रमाणात सहभागी होत उत्स्फुर्त प्रतिसाद नोंदविला.

     

    बाईक रॅलीला सुरवात होण्यापूर्वी जिल्हाधिकारी विनय गौडा म्हणाजे, दिनांक 26 ते 31 डिसेंबर या कालावधीत बल्लारपुर क्रीडा संकुलात होणाऱ्या राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धा जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब आहे. या क्रीडा स्पर्धेबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले असून चंद्रपूरचा नावलौकीक देशभरात होण्यासाठी या कार्यक्रमात सर्वांनी सहभागी होऊन स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रत्येकाने आपले योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

     

    सदर रॅलीला जिल्हा क्रीडा संकुल येथून सुरूवात करण्यात आली. ही रॅली पुढे वरोरा नाका, प्रियदर्शनी चौक, जटपुरा गेट, माता महाकाली मंदिर, बल्लारपूर शहर, ब्राह्मणी फाटा या मार्गाने विसापूरपर्यंत पोहचली. तालुका क्रीडा संकुल बल्लारपूर येथे रॅलीचा समारोप झाला. यावेळी उपस्थितांनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त बल्लारपूर येथील क्रीडा संकूलात असलेल्या वाजपेयी यांच्या पुतळ्याला अभिवादन केले.

     

    रॅलीत जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्यासह जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा पोलिस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी, सहायक जिल्हाधिकारी मुरुगानंथम एम., उपवनसंरक्षक श्वेता बोड्डू, जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड, राहुल पावडे, डॉ. मंगेश गुलवाडे, ब्रिजभूषण पाझारे तसेच विविध विभागाचे अधिकारी-कर्मचारी व क्रीडा संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले होते.