Tag: तलवार

  • youth arrested with sword । हातात तलवार घेऊन चंद्रपूरच्या रस्त्यावर दहशत – गुन्हे शाखेची तातडीची कारवाई!

    youth arrested with sword

    youth arrested with sword : चंद्रपूर – चंद्रपुरात गुन्हेगारी वृत्ती मोठ्या प्रमाणात वाढत आहे, हि गुन्हेगारी वृत्ती नागरिकांमध्ये दहशत निर्माण करण्याचे काम करीत आहे, गुन्हेगारीचा आलेख सतत वाढत असताना चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेने हातात तलवार घेऊन परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या युवकाला अटक केली. असून त्याच्यावर भारतीय हत्यार कायद्यांवये गुन्हा दाखल करीत अटक करण्यात आली आहे.

    चंद्रपुरात भरदिवसा चाकू हल्ला

    चंद्रपूर शहरातील महाकाली मंदिर जवळील हनी बार जवळ हातात तलवार घेऊन एक युवक परिसरात दहशत निर्माण करण्याचे काम करीत असल्याची माहिती गस्त करीत असलेल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती, माहितीच्या आधारे पथकाने हनी बार समोर धडक देत त्या युवकाला ताब्यात घेत तलवार जप्त केली.

    २१ वर्षीय आरोपी

    आरोपी २१ वर्षीय विक्रमसिंग सबजितसिंग टाक राहणार जुनोना चौक, बाबुपेठ याला पोलिसांनी शिताफीने पकडत चंद्रपूर शहर पोलीस स्टेशनमध्ये भारतीय हत्यार कायदा कलम ४, २५ अन्व्ये गुन्हा दाखल करीत शहर पोलिसांच्या ताब्यात दिले. fear created by armed youth in city

    सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रीना जनबंधू यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात पोउपनि विनोद भुरले, सुनील गौरकार, पोलीस कर्मचारी सुभाष गोहोकार, सतीश अवथरे, रजनीकांत पुठ्ठावार, प्रशांत नागोसे, इम्रान खान, किशोर, सुमित बरडे व शेखर माथनकर यांनी केली.