employment generation 135 percent success : चंद्रपूर, दि. 22 : राज्यातील युवक-युवतींना उद्योजकतेसाठी प्रोत्साहन देऊन स्थानिक पातळीवर रोजगार निर्मिती व्हावी, या उद्देशाने शासनाने 1 ऑगस्ट 2019 पासून मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (CMEGP) सुरू केला. या योजनेत सन 2024-25 मध्ये चंद्रपूर जिल्ह्याने जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांच्या नेतृत्वात उल्लेखनीय कामगिरी करत 135.38 टक्के उद्दिष्टपूर्ती केली आहे.
उद्योग विभागाचे विकास आयुक्त दीपेन्द्र सिंह कुशवाह यांनी दिलेल्या अभिनंदन पत्रानुसार, चंद्रपूर जिल्ह्याची ही उद्दिष्टपूर्ती जिल्हा प्रशासनाचे सक्षम नेतृत्व जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांच्या नेतृत्वात, यंत्रणेमधील प्रभावी समन्वय आणि अधिकाऱ्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे शक्य झाली आहे. जिल्ह्यातील युवक-युवतींना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी हा उपक्रम मोलाची भूमिका बजावत असल्याचे त्यांनी सांगितले.
या उत्कृष्ट कामगिरीबद्दल जिल्हा प्रशासनातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे कौतुक करण्यात आले असून 2025-26 मध्ये देखील या योजनेद्वारे अधिकाधिक युवक-युवतींना उद्योजकतेसाठी प्रेरणा मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
vinay gowda flood inspection chandrapur : चंद्रपूर, दि. 10 : जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसाच्या संततधारेमुळे अनेक तालुक्यांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यातच जिल्ह्यातील काही तालक्यांना पुराचा चांगलाच तडाखा बसला असून जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी आज (दि.10) सावली आणि पोंभुर्णा तालुक्यातील पूरग्रस्त भागाला भेट देऊन बाधित क्षेत्राची पाहणी केली. district collector flood visit Chandrapur
यावेळी जिल्हाधिका-यांनी सावली तहसील कार्यालयात तालुका आपत्ती व्यवस्थापन समितीची बैठक घेतली. यावेळी जिल्हाधिकारी म्हणाले, आपत्तीला तात्काळ प्रतिसाद व आपत्तीनंतर पूर्व परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी उपाययोजना कराव्यात. सर्व अधिकाऱ्यांनी अलर्ट मोडवर राहून काम करावे. आपात्कालीन परिस्थितीत नागरिकांना राहण्याच्या सोयीकरिता गावातील शासकीय, निमशासकीय असलेल्या इमारती तसेच शाळा/ महाविद्यालये येथे आश्रय देण्याकरीता चांगली व्यवस्था करावी. पूरबाधित गावात धान्य आणि किराणाची कमतरता पडणार नाही, याबाबत दक्ष राहावे.
पूर परिस्थितीत रस्ते बंद असल्यामुळे इतर ठिकाणांवरून तालुक्याच्या ठिकाणी शाळा, महाविदयालमध्ये येणा-या विद्यार्थ्यांना शाळेत न- येण्याबाबत मुख्यध्यापक/ प्राचार्य यांना सुचना द्याव्यात. तसेच बाधित गावात अधिकारी/ कर्मचा-यांची नियंत्रण अधिकारी म्हणून नेमणूक करावी. रस्त्यांवरील खड्या बाबत सार्वजनिक बांधकाम विभागाला सुद्धा त्यांनी सुचना दिल्या. collector vinay gowda flood area action
पुढे जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, पूर परिस्थिती दरम्यान शेती पीक, मनुष्यहानी, पशुहानी, घर, गोठा व वीज पडून झालेल्या नुकसानीचे तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिका-यांनी त्वरित पंचनामे करावे. तसेच जे पुल पाण्याखाली गेले आहेत, त्याठिकाणी पोलिस विभागाने तात्काळ बॅरीकेट लावावे व पोलिस कर्मचा-याची नेमणुक करून जिवीतहानी होणार नाही, याबाबत दक्षता घेण्यात यावी. पूर परिस्थितीत आपदा मित्र येथील कर्मचा-यांनी जिवीतहानी टाळण्याकरिता 24 तास सतर्क राहण्याच्या सूचना जिल्हाधिका-यांनी दिल्या. flood affected villages visited by collector Chandrapur
यावेळी जिल्हाधिकारी श्री. गौडा यांनी सावली तालुक्यातील जिबगाव-सिर्सी- साखरी हरांबा व व्याहाड बुज- वैनगंगा नदी मार्गाची व पूर परिस्थिती बाधीत क्षेत्राची पाहाणी केली. तसेच जिबगांव येथील ग्रामस्थ, सरपंच यांच्याशी संवाद सादला. पाहणीदरम्यान उपविभाग अधिकारी अजय चरडे, तहसीलदार प्रांजली चिरडे, गटविकास अधिकारी संजय नैताम, ठाणेदार श्री. पुल्लरवार, वैद्यकीय अधिकारी श्री. चौधरी, मुख्याधिकारी श्री. डोये यांच्यासह मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक आदी उपस्थित होते.
पोंभुर्णा तालुक्यात पूरग्रस्त भागाला भेट :
वैनगंगा नदीच्या पाण्याच्या वाढत्या पातळीमुळे निर्माण झालेल्या पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी टोक गावास भेट दिली. या दौऱ्यात त्यांनी गावाची व आसपासच्या परिसराची पाहणी केली. यावेळी त्यांनी घाटकुळ दिशेने जाणाऱ्या पुलाचे निरीक्षण केले. सदर पुलावरून पुराचे पाणी वाहत असल्यामुळे रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. दौऱ्यादरम्यान त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. ग्रामस्थांनी कापूस व काही प्रमाणात सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे निदर्शनास आणून दिले. याची गंभीर दखल घेत जिल्हाधिका-यांनी तात्काळ शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश प्रशासनास दिले.
टोक गाव वैनगंगा नदीच्या पुरामुळे पूर्णतः पाण्याने वेढले गेले असून पाणीपातळी आणखी वाढली तर गावात येणारा एकमेव रस्ताही बंद होण्याची शक्यता आहे. ही स्थिती लक्षात घेता प्रशासनाने पूर्वतयारी म्हणून कालच गावातील गरोदर माता यांना पोंभुर्णा ग्रामीण रुग्णालयात हलवले होते. तसेच संपूर्ण गावावर प्रशासनाने रात्रीभर लक्ष ठेवून आवश्यक उपाययोजना राबवल्या.
pmkkky scheme implementation details : चंद्रपूर, दि. 9 : खनिज मंत्रालयाच्या वतीने राष्ट्रीय पातळीवरील जिल्हा खनिज प्रतिष्ठान (DMF) कार्यशाळेचे आयोजन नवी दिल्ली येथे करण्यात आले. चंद्रपूर जिल्ह्यातील कार्पेट प्रकल्पासाठी जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांचा सदर कार्यशाळेत सत्कार करण्यात आला.
या एकदिवसीय कार्यशाळेचा मुख्य उद्देश जिल्हा खनिज प्रतिष्ठान अंतर्गत विविध राज्यांमध्ये सुरू असलेल्या उपक्रमांचा परस्पर अभ्यास, अधिकाऱ्यांची कार्यक्षमता वाढविणे आणि प्रधानमंत्री खानिज क्षेत्र कल्याण योजना (PMKKKY) च्या प्रभावी अंमलबजावणीस गती देणे हा होता.
कार्यशाळेदरम्यान “पारदर्शकता व अनुपालन” या विषयावर सखोल चर्चा झाली. यात मुख्यतः DMF योजनांच्या अंमलबजावणीत आढळणाऱ्या त्रुटी, संभाव्य धोके तसेच या योजनांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी आवश्यक असलेल्या अल्पकालीन व दीर्घकालीन उपाययोजनांची सविस्तर मांडणी करण्यात आली. mineral development and social impact
भविष्यातील धोरणनिर्मितीस दिशा
चर्चेमधून मिळालेल्या महत्त्वपूर्ण शिफारशींमुळे भविष्यातील धोरणनिर्मितीस दिशा मिळणार असून DMF योजना अधिक प्रभावी, पारदर्शक व लोकाभिमुख करण्यासाठी मार्गदर्शन झाले आहे. या कार्यशाळेत सहभागी अधिकाऱ्यांना विविध राज्यातील यशस्वी उपक्रमांची माहिती घेण्याची संधी मिळाली.
विशेष म्हणजे, या राष्ट्रीय कार्यशाळेत चंद्रपूर जिल्ह्यातील महिला आर्थिक विकास महामंडळाद्वारे राबविण्यात येत असलेल्या कार्पेट निर्मिती प्रकल्पाचे स्टॉलही आकर्षणाचे केंद्र ठरले. या उपक्रमाद्वारे स्थानिक महिलांना रोजगार उपलब्ध होत असून त्यांच्या आर्थिक सक्षमीकरणाला चालना मिळत आहे.
सदर कार्यशाळा ही खनिज क्षेत्रातील सामाजिक विकासाची प्रभावी साधने म्हणून DMF च्या भविष्यातील वाटचालीस निश्चितच मार्गदर्शक ठरणार आहे.