stray cattle control campaign Chandrapur : चंद्रपूर ९ ऑगस्ट – चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे शहरातील मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याची मोहीम जोमाने सुरु करण्यात आली असुन वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या 58 गायी / म्हशी पकडुन त्यांची रवानगी प्यार फाऊंडेशनची गोशाळा येथे करण्यात आली आहे.
मोकाट जनावरे शहरातील मुख्य तसेच इतर मार्गांवर, रस्त्यांवर ठाण मांडून बसून राहात असल्याने वाहनधारकांचा अपघात होण्याची शक्यता अधिक असते. याबाबत मनपातर्फे यापुर्वीही कारवाई करून जनावरांच्या मालकांना समज देण्यात आली आहे.
या कारणामुळे कारवाई
समज दिल्यानंतर काही काळ ते आपल्या जनावरांवर लक्ष देऊन ते रस्त्यावर येणार नाही याची काळजी घेतात,मात्र त्यानंतर पुन्हा जनावरांना मोकाट सोडुन देण्यात येत असल्याचे निदर्शनास आल्याने मनपातर्फे कारवाई करण्याची सुरवात करण्यात आली आहे.
मागील महिन्यापासुन मनपाच्या पथकाने नागपूर रोड, राष्ट्रवादी नगर, तुकूम, बंगाली कॅम्प, बागला चौक, गांधी चौक बाजार,दाताला रोड रामसेतु इत्यादी परिसरात कारवाई करत मोकाट असलेली 58 जनावरे पकडण्यात आली आहे. त्यांची रवानगी प्यार फाऊंडेशन येथे करण्यात आली सर्व मोकाट जनावरांच्या मालकांचा शोध घेऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल केली जाणार असल्याचे मनपा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
Ramchandra Hindi primary school : चंद्रपूर – चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रातील जटपूरा गेट परिसरात स्थित रामचंद्र हिंदी प्राथमिक शाळेला मॉडेल स्कूल म्हणून विकसित करण्यासाठी ५ कोटींच्या निधीची मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी शालेय शिक्षण मंत्री ना. दादाजी भुसे यांच्याकडे केली आहे. ना. दादाजी भुसे चंद्रपूर दौऱ्यावर असताना, विश्रामगृह येथे आमदार जोरगेवार यांनी त्यांची भेट घेऊन या संदर्भातील निवेदन सादर केले. Model school funding 5 crore
यावेळी भारतीय जनता पक्षाचे महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, महिला आघाडी अध्यक्षा छबू वैरागडे, भाजप नेते अशोक जिवतोडे, विधानसभा महिला प्रमुख वंदना हातगावकर, प्रकाश देवतळे, युवा मोर्चा अध्यक्ष मयूर हेपट, नामदेव डाहुले, महामंत्री मनोज पाल, रवि गुरुनुरे, सविता दंढारे, मंडळ अध्यक्ष प्रदीप किरमे, स्वप्नील डुकरे, सुभाष अदमाने, रवि जोगी, ॲड. सारिका संदुरकर, देवनंद वाढई, वंदना तिखे, सायली येरणे, मंजुश्री कासनगोट्टूवार, प्रज्ञा बोरगमवार यांची उपस्थिती होती.
शाळेची इमारत जीर्ण अवस्थेत
रामचंद्र हिंदी प्राथमिक शाळा प्रभाग क्र. ७ मध्ये असून, ही शाळा गेल्या अनेक वर्षांपासून अल्पसाधनांमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षण देत आहे. शाळेतील बहुतांश विद्यार्थी आर्थिकदृष्ट्या कमकुवत आहेत. सध्या शाळेची इमारत अत्यंत जीर्ण अवस्थेत असून पायाभूत सुविधांचा मोठा अभाव आहे. वर्गखोल्या अपुऱ्या आहेत, शौचालयांची संख्या कमी आहे, तसेच डिजिटल शिक्षणासाठी कोणतीही व्यवस्था उपलब्ध नाही. Chandrapur Jatpura Gate model school funding
या पार्श्वभूमीवर, सदर शाळेला मॉडेल स्कूलचा दर्जा देत नव्याने सुसज्ज इमारत, स्मार्ट क्लासरूम, संगणक कक्ष, प्रयोगशाळा, वाचनालय, शौचालय, शुद्ध पिण्याचे पाणी आणि खेळाचे मैदान उभारण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. यासाठी अंदाजे ५ कोटी निधीची आवश्यकता असुन हा निधी मंजूर करण्यात यावा अशी मागणी यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांना केली आहे.
Vrikshmitra competition Chandrapur : चंद्रपूर 6 ऑगस्ट – वाढत्या उष्णतेचे संकट, हवामानातील असमतोल, वायुप्रदूषण आणि हिरवळीचे घटते प्रमाण या गंभीर समस्यांचा सामना करण्यासाठी चंद्रपूर शहर महानगरपालिका स्वच्छ भारत अभियान व माझी वसुंधरा अभियान अंतर्गत 10 ऑगस्ट 2025 ते 30 ऑगस्ट 2025 या कालावधीत “वृक्षमित्र स्पर्धा 2025” आयोजित करत असल्याची माहिती सहायक आयुक्त शुभांगी सुर्यवंशी यांनी दिली. Chandrapur tree plantation competition
5 ऑगस्ट रोजी मनपा सभागृहात आयोजीत करण्यात आलेल्या बैठकीत सहभागी सामाजिक संस्थांना स्पर्धेचे निकष व इतर माहिती देण्यात आली. स्पर्धेत आतापर्यंत 25 संघांनी सहभाग दर्शविला आहे. यंदाच्या स्पर्धेचा उद्देश “हरित चंद्रपूर” ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवणे, तसेच नागरिक व सामाजिक संस्थांचा सक्रिय सहभाग घेऊन शहरात मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण व संगोपन करणे हा आहे.स्पर्धेत शहरातील सर्व स्थानिक अशासकीय सामाजिक संस्था,एनजीओ,ओपन स्पेस विकास समिती,क्लब्स,जेष्ठ नागरिक मंडळे,युवक युवती मंडळे तसेच महिला मंडळे सहभागी होऊ शकतात. या प्रसंगी सहायक आयुक्त शुभांगी सुर्यवंशी,उपअभियंता रवींद्र कळंबे,गोपाल मुंदडा,साक्षी कार्लेकर तसेच इतर सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थीत होते. Vrikshmitra green city initiative Chandrapur
स्पर्धेचा उद्देश –
वाढते तापमान आणि हवामानातील बदल यांना तोंड देण्यासाठी हिरवळ वाढवणे. प्रत्येक नागरिक व सामाजिक संस्थेमध्ये पर्यावरण संवर्धनाची भावना रुजवणे. सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यांच्या कडेला, मोकळ्या जागेत व सरकारी जमिनीवर वृक्षारोपण करून सौंदर्यवृद्धी व प्रदूषण नियंत्रण साध्य करणे.
सहभागी कोण होऊ शकतात?
नोंदणीकृत व अनोंदणीकृत सामाजिक संस्था (NGO) विविध क्लब, महिला मंडळे, गणेश मंडळे, क्रीडा संघटना, ज्येष्ठ नागरिक मंडळे योग व नृत्य गट, सायकल क्लब, बचत गट इ. (स्पर्धा फक्त गटांसाठी असून वैयक्तिक सहभाग मान्य नाही)
स्थळ निवड अटी – शासकीय जागा, सार्वजनिक मोकळी जागा, रस्त्यालगतची मोकळी पट्टी. किमान क्षेत्रफळ – 1000 चौ. फूट किंवा रस्त्यालगत 500 मीटर अंतर. स्थळाची पूर्वतपासणी महानगरपालिकेमार्फत होईल.
मनपाकडून मिळणारी मदत – वृक्षांची मोफत उपलब्धता. तांत्रिक मार्गदर्शन व देखभाल पद्धतीबाबत सल्ला. गटाची जबाबदारी – वृक्ष लावणे व त्यांचे संगोपन किमान एक वर्ष करणे. वृक्षांना ट्री गार्ड (टाकाऊ साहित्यापासून तयार केल्यास अधिक गुण). वृक्ष संगोपनासोबतच पर्यावरण जनजागृतीसाठी उपक्रम, रॅली, कार्यशाळा आयोजित करणे.
पारितोषिके – NGO/क्लब श्रेणी: प्रथम – ₹21,000/- द्वितीय – ₹15,000/- तृतीय – ₹11,000/- प्रोत्साहनपर (3 गट) – प्रत्येकी ₹5,000/- नागरिक गट श्रेणी – प्रथम – ₹21,000/- द्वितीय – ₹15,000/- तृतीय – ₹11,000/- प्रोत्साहनपर (3 गट) – प्रत्येकी ₹5,000/-
नोंदणी प्रक्रिया – इच्छुक गटांनी मनपाने उपलब्ध करून दिलेल्या Google Form द्वारे अथवा उद्यान विभाग, चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये प्रत्यक्ष नोंदणी करावी. नोंदणीवेळी गटाचे नाव, सदस्यांची यादी, निवडलेले स्थळ व उपक्रमाची संक्षिप्त योजना सादर करावी. संपर्क – उद्यान विभाग, चंद्रपूर महानगरपालिका मो.: 74989 54976, 83291 69743
Har Ghar Tiranga activities : चंद्रपूर 6 ऑगस्ट – “आजादी का अमृत महोत्सव” अंतर्गत ‘हर घर तिरंगा’ अभियान 2 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट दरम्यान राज्यात राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे विविध उपक्रम घेतले जात असुन 5 ऑगस्ट पीएम श्री सावित्रीबाई फुले प्राथमिक व उच्च माध्यमिक शाळेत रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. Azadi Ka Amrit Mahotsav events in schools
स्पर्धेत 4 वी ते 9 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन देशभक्तीपर, तिरंगा, राष्ट्रध्वज, अशोकचक्र, पोस्टर, रांगोळी यांसारख्या विविध संकल्पनांवर आधारित सुंदर रांगोळ्या रेखाटल्या. स्पर्धेचे मूल्यांकन त्रयस्थ परीक्षकामार्फत करण्यात आले. सौंदर्य, रंगसंगती, संदेशवहन आणि स्वच्छता या निकषांवर आधारित प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक निवडण्यात आले. शाळेचे मुख्याध्यापक नागेश नित यांनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले व देशप्रेमाच्या भावना जागृत राहाव्यात म्हणून असे उपक्रम सातत्याने राबवण्याचे महत्त्व सांगितले. Rangoli competition on Independence Day
हर घर तिरंगा, विविध कार्यक्रमाचे आयोजन
मागील तीन वर्षापासून ‘हर घर तिरंगा’ अभियान राबविण्यात येत आहे. यावर्षीचे अभियान पहिला टप्पा 2 ते 8 ऑगस्ट,दुसरा टप्पा 9 ते 12 ऑगस्ट तर तिसरा टप्पा 13 ते 15 ऑगस्ट 2025 या कालावधीत राबविण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात तिरंगा स्वयंसेवक यांची नोंदणी करून उत्कृष्ट काम केलेल्या स्वयंसेवकांना प्रमाणपत्र देणे, शाळेच्या भिंतीवर तिरंगाचे चित्र काढणे, तिरंगाविषयक बाबींचे प्रदर्शन भरवणे, रांगोळी स्पर्धा आयोजित करणे, तिरंगा राखी तयार करण्याची स्पर्धा आयोजित करणे असे विविध स्पर्धात्मक उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
त्याचबरोबर शाळा तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी यांच्याकडून पत्रलेखन करून ते जवान,पोलिसांना पोस्टल सेवेद्वारे पाठविणे. स्वत:चे घर, आजुबाजूचा परिसर, सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविणे, तिरंगाची रोषणाई आणि लाईटिंग करणे असे विविध उपक्रम आहेत.
तिरंगा महोत्सव
दुसऱ्या टप्प्याची सुरूवात 9 ऑगस्टपासून होत असून यात ‘तिरंगा महोत्सव’ राबविला जाईल. त्याचबरोबर तिरंगा मेळावा आणि तिरंगा कॉन्सर्ट कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. तिरंगा बाईक रॅली किंवा सायकल रॅली सुद्धा काढण्यात येणार आहे. तिसरा टप्पा 13 ऑगस्टपासून सुरू होणार असून यात प्रत्येक घर, कार्यालय, वाहने यावर तिरंगा ध्वज फडकविण्यात येणार आहे. अभियानात सर्वांचा सहभाग वाढावा यासाठी ध्वजारोहणच्या सेल्फी काढून केंद्र शासनाच्या www.harghartiranga.com या संकेतस्थळावर अपलोड करण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.
Event MLA Road chandrapur : चंद्रपूर ६ ऑगस्ट – चंद्रपूर शहरातील महात्मा गांधी रोड, कस्तुरबा गांधी रोड, पठाणपुरा, इंजिनिअरिंग कॉलेज परिसर, जटपुरा गेट आदी प्रमुख रस्त्यांची अवस्था सध्या अत्यंत दयनीय बनली आहे. रस्त्यांवरील मोठमोठे खड्डे, उखडलेले डांबर आणि धुळीच्या ढिगाऱ्यांमुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. यामुळे वाहतूक खोळंबते असून अपघात, श्वसन विकार यांसारख्या गंभीर समस्या उद्भवत आहेत.
‘इव्हेंट आमदार मार्ग’ असे नामकरण
या पार्श्वभूमीवर चंद्रपूर शहर काँग्रेसने जिल्हाध्यक्ष रितेश (रामू) तिवारी यांच्या नेतृत्वात तीव्र आंदोलन छेडले. बागला चौक ते कामगार चौक या मार्गावरील खड्ड्यांना प्रतीकात्मक नाव देत ‘इव्हेंट आमदार मार्ग’ असे नामकरण करण्यात आले. “मुक्त करा… मुक्त करा… चंद्रपूरला खड्डे मुक्त करा!”, “आमदारांचा इव्हेंट जोरात… पण रस्त्यावर जनतेचा जीव धोक्यात!” अशा जोरदार घोषणा देत कार्यकर्त्यांनी आपला संताप व्यक्त केला. event MLA road potholes Chandrapur
चंद्रपूर हे ऐतिहासिक, औद्योगिक आणि शैक्षणिकदृष्ट्या महत्त्वाचे शहर असून, येथे दररोज बाहेरून येणाऱ्या नागरिकांची व वाहनांची मोठी वर्दळ असते. मात्र, स्थानिक लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे मागील अनेक वर्षांपासून रस्त्यांचे सुस्थितिकरण झालेले नाही. अमृत जलप्रकल्प आणि भूमिगत गटार योजनेसाठी फोडले गेलेले रस्ते अजूनही दुरुस्त झालेले नाहीत.महापालिकेच्या दुर्लक्षामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.
धुळीमुळे श्वसन विकार तर खड्ड्यांमुळे अपघातांचा धोका वाढला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर काँग्रेसने आंदोलन करत रस्त्यांच्या दुरवस्थेकडे लक्ष वेधले आहे. शहरातील सर्व खड्डे तात्काळ बुजवावेत, अपूर्ण असलेली सिमेंट व डांबरीकरणाची कामे त्वरित पूर्ण करावीत, धूळ कमी करण्यासाठी नियमित रस्ते झाडणे व पाणी मारण्याची व्यवस्था करावी आदी मागण्या करण्यात आल्या. जर या मागण्यांकडे तातडीने लक्ष दिले गेले नाही, तर काँग्रेस पक्षाच्या वतीने आणखी तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा जिल्हाध्यक्ष रितेश (रामू) तिवारी यांनी दिला. dust and pollution problems Chandrapur roads
यावेळी आंदोलनात काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांसह सर्वधर्माचे प्रमुख देखील सहभागी झाले होते. बौद्ध भंते यांनी सहभागी होऊन चंद्रपूरच्या विकासासाठी प्रार्थना केली. हे आंदोलनात चंद्रपूर शहर महिला जिल्हाध्यक्ष चंदाताई वैरागडे, युवक काँग्रेस विधानसभा अध्यक्ष राजेश अडुर, काँग्रेसचे वरिष्ठ कार्यकर्ते युसुफ भाई, तसेच किसान सेल, अल्पसंख्यांक सेल पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.
angdaan jeevan sanjeevani abhiyan : चंद्रपुर 5 ऑगस्ट – चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे “अंगदान – जीवन संजीवनी अभियान पंधरवडा” दिनांक 3 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट 2025 दरम्यान राबविला जात आहे.. या अभियानाचा उद्देश नागरिकांमध्ये अंगदानाविषयी जागृती निर्माण करणे, गैरसमज दूर करणे आणि अधिकाधिक लोकांना अंगदानासाठी प्रोत्साहित करणे हा आहे. organ donation awareness campaign Chandrapur
समाजाभिमुख उपक्रम राबवण्याच्या दृष्टीने मनपा आरोग्य विभागामार्फत अवयवदानबाबत मार्गदर्शन कार्यक्रम राबविण्यात येत आहे 5 ऑगस्ट रोजी मनपा सभागृहात यासंबंधी मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला. डॉ. नयना उत्तरवार यांनी या संदर्भात सविस्तर माहिती उपस्थितांना दिली. याप्रसंगी सर्व उपस्थितांनी अवयवदानाची शपथ घेतली.अवयवदान हे “मरणोत्तर दान” म्हणून याला सर्वोच्च मानले जाते. एका व्यक्तीच्या अंगदानामुळे 8 लोकांचे प्राण वाचू शकतात,अंगदान सुरक्षित, वैद्यकीय दृष्ट्या नियंत्रित आणि कायदेशीर प्रक्रिया आहे.अंगदानामुळे दात्याच्या शरीराचा अपमान होत नाही; सन्मानपूर्वक सर्व प्रक्रिया पार पाडली जाते. अंगदानाच्या एका निर्णयामुळे अनेक कुटुंबांना आशा, आनंद आणि नवे भविष्य मिळू शकते. organ donation drive Chandrapur municipal corporation
डोळे, हृदय, मूत्रपिंड, यकृत, फुफ्फुसे, स्वादुपिंड इ. अवयवांचे प्रत्यारोपण करून रुग्णांना नवे जीवन मिळते. काही अवयव (जसे की किडनी) प्रत्यारोपणामुळे रुग्णाला वर्षानुवर्षे चालणाऱ्या डायलिसिसपासून मुक्ती मिळते. कॉर्निया प्रत्यारोपणामुळे अंध व्यक्तीला पुन्हा दृष्टी मिळू शकते. एका अर्थाने मृत्यूनंतरही आपण समाजासाठी कार्य करू शकतो.
सदर कार्यक्रमाच्या मार्गदर्शन व जनजागृती प्रसंगी उपायुक्त मंगेश खवले, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नयना उत्तरवार,नगरसचिव नरेंद्र बोबाटे,सहायक आयुक्त संतोष गर्गेलवार,डॉ. अमोल शेळके,उपअभियंता रवींद्र कळंबे,उपअभियंता प्रगती भुरे,सोनू थुल,अमित फुलझेले,सागर सिडाम,डॉ. नरेंद्र जनबंधू तसेच अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अवयवदानासाठी कुठे संपर्क साधावा –
अवयवदान संकल्प अणि ऑनलाईन प्रतिज्ञा संदर्भात अधिक माहीतीसाठी नॅशनल ऑर्गन अँड टिश्यू ट्रान्सप्लांट ऑर्गनायझेशन (NOTTO) च्या www.notto.abdm.gov.in या संकेतस्थळावरील वेब पोर्टलच्या माध्यमातुन ऑनलाईन प्रतिज्ञेद्वारे नोंदणी करावी. अधिक माहीतीसाठी NOTTO च्या कॉल सेंटरशी टोल फ्री हेल्पलाईन क्रमांक 1800-11-4770 यावर किंवा चंद्रपूर महानगरपालिका आरोग्य विभाग येथे संपर्क साधावा.
Chandrapur Amma Chowk controversy : चंद्रपूर ४ ऑगस्ट (News३४) | शहर पोलीस स्टेशन व सात मजली इमारतीच्या मधोमध असलेल्या जागेवर चंद्रपूर महानगरपालिकेने कोणतीही पूर्वपरवानगी न घेता अम्मा चौक स्मारकाचे बांधकाम सुरू होते. या पार्श्वभूमीवर चंद्रपूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष रितेश (रामू) तिवारी यांनी पुरातत्त्व विभागाकडे लेखी निवेदन सादर करीत परवानगी देणाऱ्या महानगरपालिकेची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केली आहे.
गांधी चौक परिसराची ऐतिहासिक पार्श्वभूमी लक्षात घेता, येथे भारतीय पुरातत्त्व विभागाच्या सूचनेनुसार कोणतेही काम करता येत नाही, असे असताना देखील केवळ आमदार किशोर जोरगेवार यांच्या मातोश्रींच्या नावे स्मारक उभारण्याचा प्रकार सुरू होता. हे काम १९५८ च्या भारतीय पुरातत्त्व अधिनियमाचे उल्लंघन असून, तातडीने हे बांधकाम थांबवावे व चौकशी करून दोषींवर कारवाई करावी. तसेच, याठिकाणी भारतीय पुरातत्त्व विभागाची अधिसूचना लावण्यात यावी, अशी मागणी रितेश तिवारी यांनी केली आहे. archaeology department Amma Chowk complaint
हा पक्षपाती निर्णय
चंद्रपूरमधील अनेक स्वातंत्र्यसैनिक, समाजसेवक, माजी लोकप्रतिनिधींनी मोठे योगदान दिले आहे, मात्र त्यांना कधीही स्मारक वा गौरव मिळाला नाही. मात्र टोपल्या विकणाऱ्या एका महिलेसाठी स्मारक उभारण्याचा निर्णय हा पक्षपाती आणि चुकीचा असल्याची टीकाही त्यांनी केली आहे.
या संपूर्ण प्रकरणावर महानगरपालिकेने तातडीने खुलासा करावा व या बांधकामाची परवानगी देणाऱ्या महानगरपालिकेवर पुरातत्त्व विभागा कडून कारवाई करावी, अन्यथा काँग्रेस पक्षाकडून जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही तिवारी यांनी दिला आहे.
Ganesh festival online permission portal : चंद्रपूर 3 ऑगस्ट – चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे गणेशोत्सवाप्रसंगी सार्वजनीक गणेश मंडळांना लागणाऱ्या विविध परवानग्या या एकाच ठिकाणाहुन मिळाव्या यासाठी एक खिडकी प्रणाली सुरु करण्यात आली असुन मनपा मुख्य इमारत येथे गणेश मंडळांसाठी मदतकक्ष सुद्धा सुरु करण्यात आला आहे.
येत्या 27 ऑगस्टपासुन शहरात दहा दिवस गणेशोत्सव साजरा होणार आहे. गणेश मंडळांना महापालिका व इतर विभागाकडून रीतसर परवानग्या या घ्याव्या लागतात. पोलीस स्टेशन, ट्राफिक पोलीस स्टेशन,सार्वजनिक बांधकाम, अग्निशमन, महावितरण केंद्र, महानगरपालिका इत्यादी विभागाच्या परवानगी या एकच ठिकाणाहुन घेता याव्या यासाठी एक खिडकी प्रणाली चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे सुरु करण्यात आली आहे. how to get permission for Ganesh pandal
ऑनलाईन करा अर्ज
गणेश मंडळांना अर्ज करणे सोपे जावे याकरीता महानगरपालिका कार्यालयात एकल खिडकी प्रणाली मदतकक्ष सुद्धा स्थापन करण्यात आला आहे. https://pandal.cmcchandrapur.com या लिंकद्वारे ऑनलाईन अर्ज सादर करता येऊ शकतो. गणेशोत्सव प्रदुषणमुक्त होण्याच्या दृष्टीने पीओपी मुर्तींना थारा न देता शाडूच्या मुर्तींचाच वापर करण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.
Aga Khan India climate adaptation initiatives : चंद्रपूर 1 ऑगस्ट – हवामान बदलामुळे वाढता धोका लक्षात घेता, चंद्रपूर महापालिका आणि आगा खान एजन्सी फॉर हॅबिटॅट इंडिया यामध्ये 3 वर्षांसाठी करार करण्यात आला असुन उष्णता आणि पूर यांसारख्या अडचणींवर उपाय शोधले जातील. टाटा ट्रस्ट्स या उपक्रमासाठी पाठबळ देत असुन यामध्ये स्थानिक लोकांचा सहभाग आणि शाश्वत (टिकाऊ) शहर विकास यावर भर दिला जाईल. Tata Trusts supported community training program
या सहकार्यांतर्गत सार्वजनिक ठिकाणी हवामानाशी जुळणारे बदल करणे जसे की अतिउष्णता किंवा अतिवृष्टी यामुळे पुराचा धोका ओळखणे, नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन उपाययोजना करणे इत्यादी अनेक कामे केली जातील.त्याचप्रमाणे 200 हून अधिक गरजू कुटुंबांची घरांमध्ये उष्णता कमी करणाऱ्या उपायांचा अवलंब केला जाईल, जे उन्हाळ्यात घराचे तापमान कमी करण्यात मदत करतील. त्यांच्या परिणामाचा अभ्यास करू इतरांना या उपाययोजना बाबत मार्गदर्शन केले जाईल. heatwave solutions for low-income households
जमिनीचे तापमान, अधिक वेळ टिकून राहणारी उष्णता,जोखीम मूल्यांकन व इतर नैसर्गिक संकटांचा अभ्यास करून आवश्यक भागांमध्ये उपाय योजले जातील. काही शाळा व महापालिकेच्या इमारतींमध्ये ऊर्जा आणि पाण्याचा कमी वापर करणारी उपकरणे बसवण्यात येऊन हरीत भाग वाढवण्यासाठीही प्रयत्न केले जातील. पूर धोका कमी करण्यासाठी निर्णय घेता यावा म्हणून पाण्याचा प्रवाह, भूजल यावर अभ्यास केला जाईल. पावसाचे पाणी मुरवण्यासाठी पेव्हर ब्लॉक्स, पुनर्भरण विहिरी असे काही प्रयोग देखील राबवले जातील.
या उपक्रमात नागरिकांना त्यांनी आपत्तीच्या काळात तत्काळ मदत कशी करावी याचे प्रशिक्षण देण्यात येईल, जेणेकरून ते स्वतःचे व इतरांचे संरक्षण करू शकतील.सदर वेळी उपायुक्त संदीप चिद्रावर,डॉ.नयना उत्तरवार,डॉ.अमोल शेळके, आगा खान एजन्सी फॉर हॅबिटॅट इंडिया चे सीईओ प्रेरणा लांगा, प्रकल्पप्रमुख जुबेर शेख, प्रकल्प व्यवस्थापक विक्रांत हरंखेडे, प्रकल्प समन्वयक हर्षल बारंगे तसेच समुदाय प्रेरक अमित नागदिवे, ऋतिक वाळके, शीतल मगार आणि योगिता खामणकर उपस्थित होते. Aga Khan Habitat India Maharashtra partnership
“चंद्रपूरच्या भौगोलिक रचनेनुसार आणि नागरिकांच्या विविध गरजांनुसार आम्हाला अशा उपायांची गरज आहे जे स्थानिक पातळीवर उपयोगी पडतील व शास्त्रीय माहितीवर आधारित असतील. आगा खान एजन्सी व टाटा ट्रस्ट्स यांच्या सहकार्यामुळे आम्ही उष्णतेच्या लाटांपासून आणि पूर संकटांपासून संरक्षण करण्यासाठी एक पाऊल पुढे टाकले आहे. हा उपक्रम चंद्रपूरला एक सुरक्षित, सर्वसमावेशक आणि हवामानदृष्ट्या मजबूत शहर बनवण्याच्या दिशेने पुढे नेईल.” – आयुक्त विपिन पालीवाल
“हा करार म्हणजे प्रत्यक्ष काम करणाऱ्या उपायांनी हवामान बदलास सामोरे जाण्याची सुरुवात आहे. आम्ही वैज्ञानिक अभ्यास आणि जमिनीवर राबवता येतील अश्या प्रयोगांद्वारे चंद्रपूरची उष्णता व पूर परिस्थितीच्या अडचणींवर काम करून चंद्रपूरला हवामान अनुकूल शहरात रूपांतरित करणे आमचे उद्दिष्ट आहे.” – प्रेरणा लांगा, मुख्य कार्यकारी अधिकारी, आगा खान एजन्सी फॉर हॅबिटॅट इंडिया
आगा खान एजन्सी फॉर हॅबिटॅट इंडियाबद्दल –
ही संस्था २०१६ साली स्थापन झाली असून ती लोकांना नैसर्गिक आपत्तींपासून सुरक्षित ठेवणे, हवामान बदलाशी जुळवून घेण्यास मदत करणे, आणि चांगल्या जीवनासाठी लागणाऱ्या सुविधा उपलब्ध करून देण्याचे काम करते. ही संस्था ना नफा तत्वावर कार्य करणारी असुन सध्या ही संस्था महाराष्ट्र, गुजरात आणि तेलंगणामध्ये काम करते.
Pradhan Mantri Awas Yojana Urban 2.0 : चंद्रपूर 1 ऑगस्ट – चंद्रपूर शहर महानगरपालिकेमार्फत “प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) 2.0” योजना राबविली जात असुन या अंतर्गत दोन प्रकारांत अर्ज मागविण्यात येत आहेत. यातील वैयक्तिक स्वरूपातील घरकुल बांधकाम हा पहिला व तर भागीदारी तत्वावर परवडणारी घरे हा दुसरा घटक आहे.
यातील वैयक्तिक स्वरूपातील घरकुल बांधकाम घटकांतर्गत चंद्रपूर शहरातील ज्या नागरिकांकडे स्थायी पट्टे (स्वतः मालकीची जागा) आहे (बांधकाम प्रतिबंधित क्षेत्र वगळता) त्यांना घरकुलाचा लाभ घेण्यास (रु. 2.50 लक्ष अनुदान) अर्ज करता येतो. तसेच भागीदारी तत्वावर परवडणारी घरे या घटकांतर्गत ज्या नागरीकांकडे स्वमालकीची जागा अथवा जमीन उपलब्ध नाही व चंद्रपूर शहरात भाडेकरू म्हणून वास्तव्यास आहेत अशा नागरिकांना अर्ज सादर करता येणार आहे.
माननीय पंतप्रधान महोदयाच्या “सर्वांसाठी घरे” या संकल्पनेच्या अंतर्गत केंद्र पुरस्कृत “प्रधानमंत्री आवास योजना” आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक व गरजू नागरिकांसाठी सुरु करण्यात आली आहे. या योजनेचा दुसरा टप्पा 1 सप्टेंबर 2024 पासुन राबविण्यात येत आहे.ही योजना महिला सदस्याच्या नावावर किंवा संयुक्त नावावर घर/जमिनीची मालकी देऊन महिला सक्षमीकरणाला प्रोत्साहन देते. या योजनेअंतर्गत, शहरी भागातील झोपडपट्टीवासीय आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS), कमी उत्पन्न गट (LIG) आणि मध्यम उत्पन्न गट (MIG) श्रेणीतील इतर लोकांना प्राधान्य दिले जाते. how to apply PMAY Urban scheme in Chandrapur
लाभार्थी पात्रता –
अर्जदार व त्याचे कुटुंबीय यांच्यापैकी कुणाचेही भारतात पक्के घर नसावे तसेच घरातील सदस्य शासनासोबत किंवा सरकारी गृहनिर्माण संस्थेसोबत घरधारक नसावेत.
अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न 4 लक्ष 50 हजार रुपयांच्या आत असावे.
लाभार्थी म्हणून गेल्या 20 वर्षात शासनाच्या कोणत्याही घरकुल योजनेचा लाभ घेतलेला नसावा. PMAY Urban 2.0 eligibility and documents
शपथपत्र तसेच घटक क्र. 2 मध्ये अर्ज करतांना शहरात कुठेही स्थावर मालमत्ता नसल्याचे प्रमाणपत्र आवश्यक राहील
येथे करावा अर्ज –
उमेदवारांनी https://pmay-urban.gov.in या संकेतस्थळावर किंवा जवळच्या सेतू केंद्रावर ऑनलाईन अर्ज सादर करावा. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करणे बंधनकारक आहे.
अधिक माहितीकरिता संपर्क:
घरकुल विभाग,सात मजली इमारत,प्रथम माळा,चंद्रपूर शहर महानगरपालिका.