Tag: घोडाझरी तलाव

  • Ghoda Jhari Lake drowning incident । चंद्रपूरमध्ये भीषण दुर्घटना! पर्यटनाला गेलेल्या पाच तरुणांचा तलावात बुडून मृत्यू

    Ghoda Jhari Lake drowning incident

    Ghoda Jhari Lake drowning incident : चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यात असलेल्या घोडाझरी प्रकल्पावर पर्यटनासाठी गेलेले पाच मुले तलावात बुडाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना आज शनिवारी ( 15 मार्च) सायंकाळ चार वाजताच्या सुमारास घडली. घटनास्थळी नागभीड पोलीस दाखल झाल्यावर त्यांनी शोधमोहीम राबवित पाचही युवकांचे मृतदेह बाहेर काढले.

    5 मुले ही जिल्ह्यातीलच चिमूर तालुक्यातील साटगाव कोलारी येथील होते. जनक किशोर गावंडे, यश किशोर गावंडे , अनिकेत यशवंत गावंडे, तेजस बालाजी गावंडे व तेजस संजय ठाकरे अशी तलावात बुडालेल्या मुलांची नावे आहेत. यापैकी दोन सख्खे भाऊ असून दोन चुलत भाऊ आहेत. हे चार जण गावंडे कुटुंबातील आहेत. तर एका मित्राचा समावेश आहे. Ghoda Jhari lake news update

    चंद्रपुरात बस व ट्रकचा भीषण अपघात, वाहकाचा मृत्यू तर १५ प्रवासी गंभीर


    चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यात घोडाझरी पर्यटन स्थळ आहे. या ठिकाणी ब्रिटिश कालीन तलाव आहे. तलाव व पर्यटनस्थळ असल्यामुळे येथे बारमाही पर्यटकांची गर्दी असते. शनिवार आणि रविवारी तलावावर बाहेरून पर्यटक येतात. आज शनिवारी चिमूर तालुक्यातील साट गाव कोलारी येथील जनक किशोर गावंडे, यश किशोर गावंडे , अनिकेत यशवंत गावंडे, तेजस बालाजी गावंडे, तेजस संजय ठाकरे व आर्यन हेमराज हिंगोली हे सहा मुले पर्यटनासाठी आली होती. दुपारपासून त्यांनी घोडाझरी तलावावरील पर्यटनाचा आनंद घेतला.

    त्यानंतर त्यांना पोहावयाचे राहवले नाही. त्यामुळे सायंकाळी चारच्या सुमारास नळ पाणीपुरवठा योजना योजनेच्या विहिरी असलेल्या परिसरात सहा मुले पोहण्याकरिता तलावात उतरली. पाण्याची पातळी खोल गेल्याने आणि या परिसरात डोह असल्यामुळे सहाही जण डोहामध्ये बुडाले. त्यापैकी आर्यन हेमराज हिंगोली हा 16 वर्षाचा मुलगा कसाबसा वाचला तर उर्वरित जनक किशोर गावंडे, यश किशोर गावंडे , अनिकेत यशवंत गावंडे, तेजस बालाजी गावंडे, तेजस संजय ठाकरे हे पाचही मुले तलावात बुडाली. पाच मुलांपैकी चार गावंडे कुटुंबातीलच आहेत.

    त्यामध्ये दोन सख्खे भाऊ आहेत. तर एका मित्राचा समावेश आहे. सर्व मुले 18 ते 22 वर्षे वयोगटातील आहेत. तलावातून वाचून बाहेर आलेल्या मुलाने सदर घटना घटनास्थळी असलेल्या नागरिकांना सांगितली. त्यानंतर तत्काळ नागभीड पोलिसांना माहिती देण्यात आली. अवघ्या काही वेळातच नागभीड पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. पाचही मुले तलावातच बुडालेले आहेत. सदर घटनेची माहिती मुलांच्या कुटुंबीयांना साटगाव कोलारी येथे देण्यात आलेली आहे. पोलिसांनी घटनास्थळी प्राथमिक चौकशी सुरू करीत तात्काळ शोधमोहीम राबवित बुडालेल्या युवकांचे मृतदेह बाहेर काढले. rescue operation in Chandrapur

  • घोडाझरी तलावात बुडून मृत्युमुखी पडलेल्या चार युवकांच्या कुटुंबियांना मदतीचा हात

    घोडाझरी तलावात बुडून मृत्युमुखी पडलेल्या चार युवकांच्या कुटुंबियांना मदतीचा हात

    News34 chandrapur

    चंद्रपूर : घोडाझरी तलावात बुडून वरोरा तालुक्यातील चार युवकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. हि घटना अतिशय वेदनादायी असून या कुटुंबियांना विशेष बाब तत्वावर मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून आर्थिक मदत करण्याची लोकहितकारी मागणी आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती. मुख्यमंत्र्यांनी तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश देत त्वरित निधी देण्याचे आदेश दिले. आज आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्याहस्ते मृतकाच्या कुटुंबियांना धनादेश दिले.

     

    वरोरा तालुक्यातील शेगाव येथील जहागिर गजानन झाडे, वय-27 वर्ष , मनिष भारत श्रीरामे, वय-32 वर्ष, चेतन भिमराव मांदाडे, वय- 21 वर्ष, संकेत प्रशांत मोडक, वय-25 वर्ष मौजा- गिरोला असे मृत युवकांची नावे आहेत.

     

    वरोरा तालुक्यातील शेगांव येथील 04 युवकांचा ब्रम्हपुरी तालुक्यातील घोडाझरी तलावात बुडून दु:खद मृत्यु झालेला होता. सदर प्रकरणात आर्थिक मदत आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या हस्ते देण्यात आली. यावेळी वरोरा कृ ऊ बा माजी सभापती राजेंद्र चिकटे, वरोरा पं स. माजी उपसभापती विजय आत्राम, नायब तहसीलदार काळे, मंडळ अधिकारी अजय निखाडे, महादेव कोटकर, चंदूभाऊ जयस्वाल, संजय कोटकर, गोलू वाढई, ग्राप सदस्य शेगांव दिवाकर मेश्राम, प्रभाकर घोडमारे व शेगांव ग्रामस्त उपस्थित होते.

  • नागभीड येथील घोडाझरी तलावात मासेमारीसाठी गेलेल्या युवकाचा बुडून मृत्यू

    नागभीड येथील घोडाझरी तलावात मासेमारीसाठी गेलेल्या युवकाचा बुडून मृत्यू

    News34 chandrapur

    प्रशांत गेडाम

    नागभीड- नागभीड तालुक्यातील घोडाझरी तलावावर मासेमारीसाठी गेलेल्या एका युवकाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना शनिवारला सांयकाळी ४.30 वाजताच्या सुमारास घडली. प्रमोद अर्जुन नान्हे वय-३० रा. नवानगर (नवखळा) ता.नागभीड असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

    नेहमीप्रमाणे घोडाझरी तलावात चार ते पाच व्यक्ती मासेमारीसाठी सांयकाळी ४ वाजताच्या सुमारास गेले होते. ट्युबवर बसून तलावात मासेमारीसाठी जाळे लावत होते. ते लावत असताना अचानक प्रमोद नान्हे यांचा
    तोल जाऊन जाळयात पडला. त्यात त्यांचा बुडून मृत्यू झाला. त्याच्या सहकाऱ्यांनी त्याला बाहेर काढले. या घटनेची माहिती जवळील नागभीड पोलीस स्टेशनला देण्यात आली.

     

    लगेच पोलीस घटनास्थळी पोहोचले. घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी नागभीडच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेचा पुढील तपास नागभीडचे पोलीस निरीक्षक योगेश घारे करीत आहेत.