Tag: गडचांदूर

  • Gadchandur zendi mundi gambling news । गडचांदूरात सट्टेबाजांचा दबदबा: पोलिस का गप्प?

    Gadchandur zendi mundi gambling news

    Gadchandur zendi mundi gambling news : चंद्रपूर जिल्ह्यात अनेक छुप्या पद्धतीने अवैध धंदे सुरु आहे, मात्र जिल्ह्यातील गडचांदूर मधील लक्ष्मी टॉकीज परिसरात गडचांदूर (gadchandur) पोलिसांच्या नाकावर टिच्चून सट्टा केंद्र खुलेआम सर्रासपणे सुरु आहे. विशेष म्हणजे news३४ च्या बातमीनंतर २ मे रोजी पोलिसांनी कारवाई केली मात्र ती कारवाई फक्त देखावा असल्याची चर्चा नागरिकांमध्ये चांगलीच रंगली आहे. Gadhchandur betting racket Laxmi Talkies

    घुग्गुस पोलिसांची महत्वपूर्ण कामगिरी, अल्पवयीन मुलीला पळवून नेणाऱ्या आरोपीला ठोकल्या बेड्या

    गडचांदूरात सट्टेबाज पोलिसांना घाबरत नाही

    गडचांदूर हे औद्योगिक नगरी आहे याठिकाणी बाहेरील कामगार रोजगारासाठी येत असतात मात्र तिथे या मजूर व कामगार वर्गाला लुटण्यासाठी सट्टेबाज (Gambling) अलिखित परवानगी घेऊन धंदा सुरु करून बसले आहे. पोलिसांच्या कारवाई नंतर सुद्धा हा सट्टा सर्रासपणे पुन्हा येईन च्या पार्श्वभूमीवर सुरु झाला, याचाच अर्थ पोलिसांची वचक आता गुन्हेगारांवर व अवैध धंद्यावर राहिली नाही असे दिसून येत आहे. Illegal gambling in Chandrapur district

    gambling in small towns

    हे आहे मुख्य सूत्रधार

    गडचांदूर शहरातील या सट्ट्याच्या धंद्यात काही भागीदार आहे, ज्यामध्ये शेरू, किट्टु, गणेश आणि लल्लू यांचा समावेश आहे. इसाफ बँक जवळ लक्ष्मी टॉकीज असा या सट्टेबाजांचा पत्ता आहे. Gadchandur zendi mundi gambling news

    सकाळी व सायंकाळी ओपन व नेट च्या जाळ्यात अलगद अडकून आकड्यांचा खेळ सुरु होतो, कुणाला आकडे लागतात तर कुणाचा क्षणभंगुर होतो, तर कुणी गेम लागला म्हणून त्याठिकाणी उड्या मारत बसतो, झटपट पैसे कमविण्याचे आमिष हे सट्टेबाज नागरिकांना देत आहे.

    police ignoring local crime
    पाठबळ कुणाचं?

    जिल्ह्यात अवैध धंदे सुरु करण्यापूर्वी व्यावसायिकांना अलिखित परवानगी घ्यावी लागते, त्यासाठी वरिष्ठ ते कनिष्ठ पर्यंत आर्थिक देवाणघेवाण होते, देवाणघेवाण झाल्यावर व्यवसाय करण्याच्या अटी सांगितल्या जातात, त्यानंतर जागा ठरवीत, आकड्यांचा खेळाला सुरुवात होते. गडचांदूरमध्ये सट्टा, झेंडी मुंडी असे खेळ खेळल्या जातात, पण पोलिसांची यांच्यावर कारवाई करण्याची हिम्मत का बरं होत नसेल? हा एक प्रश्नचं आहे. सट्टेबाज यांच्याकडे अशी कोणती शक्ती आहे कि ते पोलिसांना सुद्धा घाबरत नाही.

  • police ignoring local crime । चंद्रपूर जिल्ह्यात गुन्हेगारीचं साम्राज्य, गडचांदूरमध्ये सट्ट्याचं केंद्र

    police ignoring local crime

    police ignoring local crime : गडचांदूर – औद्योगिक जिल्हा म्हणून चंद्रपूरचे नाव समोर येते या औद्योगिक नगरीमध्ये गडचांदूर शहराचे नाव अग्रेसर आहे, सिमेंट कारखान्याचे जाळे या शहरात आहे. त्यामुळे रोजगारासाठी गडचांदूर शहरात बाहेरचे कामगार मोठ्या प्रमाणात येतात, या कामगाराना लुटण्याचे काम गडचांदूर शहरातील काही सट्टेबाज नागरिक करीत आहे. Gadchandur latest news

    जनावरांच्या कळपाने घेतला नववधूच्या आईचा जीव

    जुगार खेळायचा तर गडचांदूर मध्ये या या मथळ्याखाली बातमी news ३४ ने प्रकाशित केली होती मात्र पोलिसांचे लक्ष याकडे गेले नाही कारण कारवाई केल्यास आर्थिक संबंध बिघडून जातात. आर्थिक संबंध जोपासण्यासाठी या सट्टेबाजांवर कारवाई केल्या जात नाही हे विशेष. local crime news

    गडचांदूर शहरातील वार्ड क्रमांक ४ मधील लक्ष्मी टॉकीज हे सट्ट्याचं मुख्य केंद्र बनले आहे, याबाबत संपूर्ण व्हिडीओ सुद्धा news ३४ च्या हाती लागलेला आहे. झेंडी मुंडी, सट्टा, तीन पत्ती असे अनेक अवैध धंदे गडचांदूर शहरात सुरु आहे. गडचांदूर पोलीस जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र बघायला मिळत आहे.

    gambling in small towns

    कोण आहे सूत्रधार?

    गडचांदूर शहरातील या सट्ट्याच्या धंद्यात काही भागीदार आहे, ज्यामध्ये शेरू, किट्टु, गणेश आणि लल्लू यांचा समावेश आहे. इसाफ बँक जवळ लक्ष्मी टॉकीज असा या सट्टेबाजांचा पत्ता आहे.

    चंद्रपूर जिल्हा पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन जिल्ह्यातील अवैध धंदे संपुष्टात यावे यासाठी ते सतत प्रयत्नशील आहे मात्र त्यांच्या या प्रामाणिक प्रयत्नांना स्थानिक पोलीस फाटा देत आहे, गुन्हेगारीने जिल्ह्यात डोके वर काढले असताना सुद्धा पोलीस यंत्रणा अजूनही घडणाऱ्या गुन्ह्याबद्दल गाफील असल्याचे बघायला मिळत आहे. मध्यंतरी पोलीस विभागात काहीसे बदल झाले. पण अजूनही चांगले पोलीस अधिकारी चंद्रपूर जिल्ह्याला लाभलेले नाही.

    पोलीस अधीक्षकांनी लक्ष द्यावे..

    गडचांदूर शहरात सुरु असलेल्या अवैध धंद्यावर पोलीस अधीक्षकांनी लक्ष देणे गरजेचे आहे कारण भविष्यात हे धंदे मोठ्या गुन्हेगारीचे दर्शन पोलीस विभागाला नक्की दाखवेल.