Tag: खासदार प्रतिभाताई धानोरकर

  • Crop damage declare a wet drought । ३७९ गावांतील २२ हजार शेतकरी संकटात, ‘ओला दुष्काळ’ जाहीर करा – खासदार प्रतिभा धानोरकर यांची मागणी

    Crop damage declare a wet drought

    Crop damage declare a wet drought : चंद्रपूर: मागील महिनाभर चंद्रपूर जिल्ह्यात सुरू असलेल्या सततच्या पाऊस आणि अतिवृष्टीमुळे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या गंभीर परिस्थितीची दखल घेत खासदार प्रतिभा धानोरकर यांनी कृषी मंत्र्यांना पत्र पाठवून, जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे.

    चंद्रपुरातील सिव्हेज ट्रीटमेंट प्लांट मधून क्लोरीन गळती, नागरिकांना हलविले

    पत्रात नमूद केल्यानुसार, जिल्ह्यातील सोयाबीन, कापूस आणि तूर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. विशेषतः सोयाबीन पिकावर खोडकूज, मूळकुज आणि यलो व्हेन मोझॅक यांसारख्या बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे, ज्यामुळे पिकांची स्थिती अत्यंत वाईट झाली आहे.

    १५,६८३.२० हेक्टर क्षेत्रावरील सोयाबीन पीक बाधित

    जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाच्या अहवालानुसार, जिल्ह्यातील ३७९ गावांमध्ये जवळपास २२,४३८ शेतकऱ्यांचे १५,६८३.२० हेक्टर क्षेत्रावरील सोयाबीन पीक बाधित झाले आहे. यापैकी १०,९००.२० हेक्टरवर ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाल्याचे नमूद आहे.

    सततच्या पावसामुळे शेतात पाणी साचले असून, पिके पिवळी पडली आहेत. पत्रात, या नुकसानीचे पंचनामे न करता सरसकट नुकसान भरपाई देण्याची विनंती करण्यात आली आहे.

    या सर्व बाबी लक्षात घेऊन, खासदार प्रतिभा धानोरकर यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्वरित कार्यवाही करण्याची मागणी कृषी मंत्र्यांकडे केली आहे.

  • poor road conditions in tribal areas । आदिवासी भागातील दुरावस्थेचा रस्ता, खासदारांचा सवाल अनुत्तरित

    poor road conditions in tribal areas

    poor road conditions in tribal areas : चंद्रपूर : जिल्ह्याच्या कोरपना तालुक्यातील दुर्गम आदिवासी भागात रस्त्यांची दुरवस्था आणि पावसाळ्यात उद्भवणाऱ्या पुराच्या समस्येवर संसदेत प्रश्न विचारल्यावर केंद्र सरकारने दिशाहीन आणि वस्तुस्थितीला धरून नसलेले उत्तर दिल्याने खासदार प्रतिभा धानोरकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सरकार टोलवाटोलवी करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

    शासकीय कार्यालयात पत्त्यांचा खेळ, व्हिडीओ व्हायरल

    खासदार प्रतिभा धानोरकर यांनी येरगरव्हान-चनाई खुर्द, कन्हालगाव-मांडवा, आणि इतर आदिवासी-बहुल भागांना जोडणाऱ्या रूपापेठ-खडकी-सवालहिरा रस्त्याची दुरवस्था आणि खड्ड्यांमुळे होणाऱ्या जीवघेण्या प्रवासाकडे लक्ष वेधले होते. यावर, ग्रामीण विकास मंत्रालयाने “ग्रामीण रस्ते” हा राज्याचा विषय असल्याचे सांगत जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला. पुढे, महाराष्ट्र सरकारने कळवल्यानुसार, हे रस्ते खराब स्थितीत नाहीत, असे मंत्रालयाने सांगितले. mp raises question in parliament on road issue

    मंत्रालयाने खडकी-तंगला-चेन्नई-कन्हाळगाव रस्त्याचे (T-16) बांधकाम प्रधानमंत्री ग्राम सडक योजना (PMGSY)-I अंतर्गत १ मे २०१८ रोजी पूर्ण झाल्याचे आणि त्याची दोष दायित्व कालावधी (DLP) १ मे २०२३ रोजी संपल्याचे नमूद केले. तसेच, महाराष्ट्र सरकारने हा रस्ता चांगल्या स्थितीत आणि वाहन चालवण्यायोग्य असल्याचे म्हटले आहे. हे उत्तर स्थानिक नागरिकांच्या प्रत्यक्ष अनुभवाच्या पूर्णपणे विरुद्ध आहे, असे खासदार प्रतिभा धानोरकर यांनी म्हटले.

    सरकारचे अस्पष्ट उत्तर

    तसेच खासदार प्रतिभा धानोरकर यांनी तंगला चंपाती आणि जंभुलधारा येथील पूल पावसाळ्यात पाण्याखाली जातात का, असा प्रश्न विचारला होता, ज्यामुळे वाहतूक पूर्णपणे थांबते. यावर, सरकारने कबूल केले की तंगलापासून खडकी रस्त्यावर तंगला गावाजवळ असलेल्या पुलांवर पावसाळ्यात पाणी येते, ज्यामुळे वाहतूक सुमारे २ ते ३ तास थांबते. मात्र, या समस्येवर ठोस उपाययोजना करण्याऐवजी, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना-II (MMGSY-II) सारख्या राज्य योजनांचा वापर केला जाईल, असे अस्पष्ट उत्तर देऊन सरकारने वेळ मारून नेल्याची टीका खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केली. rural roads under pmgsy in bad condition

    यासोबतच आदिवासी भागातील नागरिकांना भेडसावणाऱ्या गंभीर समस्यांवर सरकार ठोस कारवाई करण्याऐवजी दिशाहीन उत्तरे देत असल्याचा आरोप खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केला आहे.

  • Vacancies in Revenue Department । ⚡ “महसूलमंत्रीच नागपूरचे आणि तिथेच दिरंगाई? धानोरकरांचा संतप्त सवाल!”

    Vacancies in Revenue Department

    Vacancies in Revenue Department : चंद्रपूर नागपूरचे असलेले महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याच विभागात नायब तहसीलदार पदांच्या पदोन्नतीला दिरंगाई का होत आहे, असा थेट आणि संतप्त सवाल उपस्थित करत खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी महसूलमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. कोकण विभागातील पदोन्नत्या पूर्ण झाल्या असताना, नागपूर विभागातील अव्वल कारकून आणि मंडळ अधिकारी संवर्गातून नायब तहसीलदार संवर्गात पदोन्नतीची प्रक्रिया रखडल्याने खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून, ही प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याची मागणी केली आहे.

    फळांच्या बियांनी भरले चंद्रपुरातील जंगल

    नागपूर महसूल विभागात अंदाजे ४५ नायब तहसीलदारांची पदे रिक्त आहेत. यामुळे अनेक ठिकाणी एका नायब तहसीलदाराकडे दोन ते तीन सर्कलचा अतिरिक्त कार्यभार आहे. परिणामी, जनतेची कामे वेळेवर मार्गी लागत नाहीत आणि शासनाच्या योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे होण्यास विलंब होत आहे. revenue department promotion delay

    खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे की, विभागीय आयुक्त, नागपूर विभाग, नागपूर यांनी अव्वल कारकून, मंडळ अधिकारी यांच्या निवडसूची २०२४-२५ नुसार विभागीय पदोन्नती समितीद्वारे मंजूर केलेली निवडसूची मार्च २०२५ मध्येच शासनाकडे सादर केली आहे. असे असूनही, गेल्या दोन महिन्यांपासून ही फाईल मंत्रालयीन स्तरावर प्रलंबित आहे, ही चिंतेची बाब आहे. pending promotion file deputy tehsildar

    कोकण विभागातील अशाच प्रकारच्या पदोन्नत्या पूर्ण झाल्या असताना, नागपूर विभागाच्या पदोन्नती प्रक्रियेला विलंब का होत आहे, आणि विशेषतः महसूलमंत्री स्वतः नागपूरचे असताना हा अन्याय का, असा सवालही खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी उपस्थित केला आहे.

    निवडणुकीच्या कामावर होणार परिणाम

    खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी पत्रात सर्वोच्च न्यायालयाच्या अलीकडील निर्देशांचाही संदर्भ दिला, ज्यात स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, महानगरपालिका यांच्या निवडणुका घेण्याचे निर्देश शासनाला दिले आहेत. नायब तहसीलदारांची पदे रिक्त असल्याने निवडणुकीच्या कामांवरही परिणाम होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.

    कृती आराखडा कार्यक्रम अंतर्गत रिक्त पदे भरण्याची ग्वाही

    याव्यतिरिक्त, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १३ जानेवारी २०२५ रोजीच्या शासन निर्णयानुसार १०० दिवसांचा कृती आराखडा कार्यक्रम आयोजित केला होता, ज्यात सर्व विभागांतील रिक्त पदे १०० दिवसांच्या कार्यक्रमानुसार भरण्याची ग्वाही दिली होती. या ग्वाहीकडे महसूल विभागाने लक्ष देऊन तातडीने पदोन्नती प्रक्रिया पूर्ण करावी, अशी मागणी खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी महसूलमंत्र्यांकडे केली आहे.

    खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी आग्रह केला आहे की, या महत्त्वाच्या पदोन्नती प्रक्रियेला गती देऊन जनतेची कामे वेळेवर मार्गी लागावीत आणि प्रशासकीय यंत्रणा अधिक सक्षम व्हावी यासाठी महसूलमंत्र्यांनी जातीने लक्ष घालावे.