Tag: क्रीडा स्पर्धा

  • benefits of summer sports training camps । ‘समर कॅम्प’ तरुणांना सुपरफिट ठेवण्याचा उपक्रम – आ. सुधीर मुनगंटीवार

    benefits of summer sports training camps

    benefits of summer sports training camps : चंद्रपूर – जिल्ह्यातील युवक-युवतींना शारीरिक, मानसिक आणि बौद्धिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी विविध उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी सुरू झाली आहे. बल्लारपूर येथे १ मेपासून सुरू झालेल्या उन्हाळी शिबिरात एकूण १५ खेळांचे प्रशिक्षण देण्यात आले असून, समाजभान आणि मूल्यसंस्कारांची जोड देणाऱ्या या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक बदल घडत आहेत.हा ‘समर कॅम्प’ तरुणांना सुपरफिट ठेवणारा प्रभावी उपक्रम असल्याचे प्रतिपादन राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी शिबिराच्या समारोप समारंभात केले. youth development through sports India

    चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सायबर घोटाळ्याची होणार चौकशी

    हे शिबिर स्वर्गीय डॉ. सच्चिदानंदजी मुनगंटीवार यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे आयोजक श्रीकांत आंबेकर अध्यक्ष, सुधीरभाऊ फॅन्स क्लब बल्लारपूर, समीर केने, काशी सिंग, मुन्ना ठाकूर, राजू दारी, संदीप पुणे, सुनील यादव, प्रशांत झांबरे, रोहित तुक्कर आदिंची उपस्थिती होती.

    youth development sports

    ‘मिशन ऑलिंपिक २०३६’च्या दिशेने भक्कम पाऊल

    आ. मुनगंटीवार पुढे म्हणाले की, जिल्ह्यातील बल्लारपूर, मुल, पोंभुर्णा आणि चंद्रपूर येथे युवकांसाठी दर्जेदार क्रीडा सुविधा उभारण्यात आल्या आहेत. चंद्रपूरमधील वातानुकूलित बॅडमिंटन कोर्ट, बल्लारपूरमधील कॉलरी गेट मैदान, वन अकादमी आणि सैनिकी शाळेतील सुविधा हे प्रेरणादायी ठरत आहेत.स्वातंत्र्यसैनिक वीर बाबुराव शेडमाके यांच्या नावाने म्हाडामध्ये उभारले जात असलेले २५ खेळप्रकारांचे अत्याधुनिक स्टेडियम ‘मिशन ऑलिंपिक २०३६’च्या दिशेने भक्कम पाऊल ठरेल, असा विश्वासही आ.मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.

    sudhir mungantiwar

    विसापूर क्रीडा संकुलात झालेल्या राष्ट्रीय अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेला देशभरातील २८ राज्यांमधून स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाचे सर्वत्र कौतुक झाले आहे.समर कॅम्पच्या उत्कृष्ट आयोजनासाठी आ. मुनगंटीवार यावेळी अभिनंदन केले.

    महिला सक्षमीकरणासाठी कौशल्य विकास उपक्रम


    गरजू मुलींसाठी एस.एन.डी.टी. विद्यापीठ व स्व. सुषमा स्वराज स्किल सेंटरच्या माध्यमातून कौशल्य प्रशिक्षण उपक्रम राबवले जात आहेत. या उपक्रमांमधून अनेक मुलींना स्वबळावर उभं राहण्याची संधी मिळत आहे.विसापूर येथे ‘आर्चरी सेंटर’ सुरू करण्याचे नियोजन असून, युवक-युवतींनी या क्रीडा व प्रशिक्षण सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन आमदार मुनगंटीवार यांनी यावेळी केले.

  • चंद्रपूर शहरातील बाईक रॅलीत जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक झाले दुचाकी चालक

    चंद्रपूर शहरातील बाईक रॅलीत जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक झाले दुचाकी चालक

    News34 chandrapur

    चंद्रपूर  : राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नातून जिल्ह्यात राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन होत आहे. या निमित्ताने जिल्ह्यात विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातून खेळाडू येण्यास सुरवात झाली आहे. या खेळाडूंचा उत्साह वाढविण्यासाठी तसेच क्रीडा स्पर्धेचा ज्वर वाढवून वातावरण निर्मितीकरीता पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या सुचनेवरून जिल्हा प्रशासनाच्यावतीने आज (दि.25) चंद्रपूर व बल्लारपूर या शहरात बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. रॅलीत नागरिकांनी स्वत:हून मोठ्या प्रमाणात सहभागी होत उत्स्फुर्त प्रतिसाद नोंदविला.

     

    बाईक रॅलीला सुरवात होण्यापूर्वी जिल्हाधिकारी विनय गौडा म्हणाजे, दिनांक 26 ते 31 डिसेंबर या कालावधीत बल्लारपुर क्रीडा संकुलात होणाऱ्या राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धा जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब आहे. या क्रीडा स्पर्धेबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले असून चंद्रपूरचा नावलौकीक देशभरात होण्यासाठी या कार्यक्रमात सर्वांनी सहभागी होऊन स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रत्येकाने आपले योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

     

    सदर रॅलीला जिल्हा क्रीडा संकुल येथून सुरूवात करण्यात आली. ही रॅली पुढे वरोरा नाका, प्रियदर्शनी चौक, जटपुरा गेट, माता महाकाली मंदिर, बल्लारपूर शहर, ब्राह्मणी फाटा या मार्गाने विसापूरपर्यंत पोहचली. तालुका क्रीडा संकुल बल्लारपूर येथे रॅलीचा समारोप झाला. यावेळी उपस्थितांनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त बल्लारपूर येथील क्रीडा संकूलात असलेल्या वाजपेयी यांच्या पुतळ्याला अभिवादन केले.

     

    रॅलीत जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्यासह जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा पोलिस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी, सहायक जिल्हाधिकारी मुरुगानंथम एम., उपवनसंरक्षक श्वेता बोड्डू, जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड, राहुल पावडे, डॉ. मंगेश गुलवाडे, ब्रिजभूषण पाझारे तसेच विविध विभागाचे अधिकारी-कर्मचारी व क्रीडा संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले होते.