Tag: इरई नदी खोलीकरण

  • district collector river review meeting updates । इरई नदी खोलीकरणाचा दुसरा टप्पा होणार सुरु

    district collector river review meeting updates

    district collector river review meeting updates : चंद्रपूर ७ जून (News३४) : चंद्रपूर शहराला 9 कि.मी. समांतर वाहणा-या इरई नदीच्या खोलीकरणाचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून दुसऱ्या टप्प्याच्या कामाला सोमवारपासून सुरुवात होणार आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी आज (दि. 7) संबंधित यंत्रणेचा आढावा घेऊन सूचना दिल्या.

    जेष्ठ नागरिकाला अधिकाऱ्याने म्हटले गेट आउट

    व्हीसीद्वारे घेण्यात आलेल्या या बैठकीला जिल्हाधिकाऱ्यांसह मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, मनपा आयुक्त विपीन पालीवाल, उपविभागीय अधिकारी संजय पवार,  तहसीलदार विजय पवार,  कार्यकारी अभियंता (सार्वजनिक बांधकाम) अक्षय पगारे, जलेश सिंग (जलसंपदा), जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार आदी उपस्थित होते. 

    इरई नदीचे खोलीकरण तीन टप्प्यात करण्यात येणार असून यातील पहिला टप्पा रामसेतू ते चौराळा पुलापर्यंत काम पूर्ण झाले आहे. दुसरा टप्पा माना खदान (लालपेठ कॉलरी) ते नांदगाव पोडे,असा असून सदर कामाला सोमवारपासून सुरवात होईल. तर तिसरा टप्पा इरई ते वर्धा नदी संगमापर्यंतचा आहे.

    यावेळी बोलताना जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, दुसऱ्या टप्प्यात जास्तीत जास्त काम करून खोलीकरणातून निघालेला गाळ त्वरित वाटप करावा. माना खदान ते नांदगाव पोडे  टप्प्यासाठी गाळ संचयित करण्याचे ठिकाण उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांनी निश्चित करण्यासाठी रोज पाहणी करावी.  त्याचबरोबर भूमी अभिलेख आणि जलसंपदा विभागाने दुसऱ्या टप्प्यातील आखणी करून त्वरित कामाला सुरवात करावी. 

    असे झाले पहिल्या टप्प्यातील काम :

    रामसेतू ते चौराळा पूल दरम्यान 2400 मीटरचे काम पूर्ण झाले आहे.  यात 70 टीसीएम  गाळ उपसा करण्यात आला असून 118 शेतकर्‍यांना 17 हजार ब्रास गाळ वाटप करण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात 10 पोकलेन, 25 ट्रॅक्टर, 22 टिप्पर कार्यरत आहेत. दुसऱ्या टप्प्यात या यंत्र सामुग्रीसह अतिरिक्त यंत्र सामुग्री वाढविण्याचे प्रशासनाचे नियोजन आहे. silt distribution to farmers

  • Free silt distribution for farmers | इरई नदी खोलीकरण मोहिमेत शेतक-यांना मोफत गाळ वाटप सुरु

    Free silt distribution for farmers

    Free silt distribution for farmers : चंद्रपूर –  इरई नदी ही चंद्रपूर शहराची जीवनवाहिनी आहे. शहराला 9 कि.मी. समांतर वाहणा-या या नदीच्या खोलीकरणाचे काम जिल्हा प्रशासनाच्यावतीने हाती घेण्यात आले आहे. निरंतर 45 दिवस सुरू राहणा-या या अभियानसाठी जिल्हा प्रशासनाने योग्य नियोजन केले असून नदीच्या खोलीकरणातून निघणारा गाळ शेतक-यांना मोफत देण्यात येत आहे. Silt distribution for farmers in Chandrapur

    चंद्रपुरात ब्लॅक आऊट?

    ज्या शेतक-यांनी गाळासाठी नोंदणी केली आहे, त्यांना मोफत गाळ वाटपाचे काम शुक्रवारपासून सुरू करण्यात आले. ऑनलाईन पध्दतीने 24 शेतक-यांची नोंदणी झाली आज शेतक-यांना 70 ब्रास गाळ मोफत उपलब्ध करून देण्यात आला. सदर गाळ नेण्याकरीता वाहनाची व्यवस्था शेतक-यांना स्वत: करायची आहे.  सद्यस्थितीत अम्युझमेंट पार्क जवळ आणि महर्षी विद्या मंदीर शाळेमागे खोलीकरणाचे काम सुरू आहे. यासाठी विविध विभाग आणि खाजगी असे एकूण 21 ट्रॅक्टर, 17 हायवा / टिप्पर, 7 पोकलेन मशीन आणि 1 जेसीबी कार्यरत आहेत. ही यंत्रसामुग्री वाढविण्याचे जिल्हा प्रशासनाचे नियोजन आहे. Government river dredging project

    चंद्रपूर शहर ते इरई – वर्धा नदी संगमापर्यंतच्या 17 कि.मी. लांबीत इरई नदी पात्रातील वाढलेली झाडेझुडपे, गाळ काढून नदी पात्राचे खोलीकरण व रुंदीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे नदी पात्राची पूर वहन क्षमता वाढण्यास मदत होईल व शहराला दरवर्षी पडणारा पुराचा वेढा कमी होईल, या उद्देशाने 25 एप्रिल 2025 रोजी राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांच्या हस्ते इरई नदी खोलीकरण अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. तीन टप्प्यात खोलीकरण करण्यात येणार असून पहिला टप्पा रामसेतू ते चौराळा पुल, दुसरा टप्पा माना टेकडी (लालपेठ कॉलरी) आणि तिसरा टप्पा इरई ते वर्धा नदी संगमापर्यंतचा आहे.

    इरई नदी खोलीकरण मोहिमेत शासनाच्या जिल्हा परिषद, पोलीस प्रशासन,वन विभाग,चंद्रपूर महानगरपालिका,कृषी विभाग,पाटबंधारे विभाग,भूमि अभिलेख कार्यालय, जिल्हा खनिकर्म, प्रादेशिक परिवहन विभाग,पाटबंधारे विभाग,महाराष्ट्र प्रदुषण महामंडळ ही सर्व शासकीय कार्यालये, सीटीपीएस व डब्ल्युसीएल या खाजगी आस्थापना भारतीय जैन संघटना, नाम फाऊंडेशन व टाटा ट्रस्ट या स्वयंसेवी संस्थांचा सहभाग आहे.

  • Irai river deepening Chandrapur project । पूर आता इतिहास? चंद्रपूरसाठी इरई नदी बनतेय सुरक्षा कवच!

    Irai river deepening Chandrapur project

    Irai river deepening Chandrapur project : चंद्रपूर, दि. 4 मे : चंद्रपूर शहराला 9 कि.मी. समांतर वाहणा-या इरई नदीच्या खोलीकरणाचे काम जिल्हा प्रशासनाच्यावतीने हाती घेण्यात आले आहे. या मोहिमेत शासनाच्या विविध विभागांचा सहभाग असून सामाजिक संघटना, लोकसहभाग आदींच्या माध्यमातून सदर मोहीम 45 दिवस निरंतर सुरू राहणार आहे. विविध यंत्रसामुग्रीच्या माध्यमातून सद्यस्थितीत नदीच्या खोलीकरणाचे काम प्रगतीपथावर आहे. flood prevention Irai river Chandrapur

    घरकुल धारकांना रेती उपलब्ध होणार, सुधीर मुनगंटीवार ऍक्शन मोडमध्ये

    पुराचा वेढा कमी होणार

    चंद्रपूर शहर ते इरई – वर्धा नदी संगमापर्यंतच्या 17 कि.मी. लांबीत इरई नदी पात्रातील वाढलेली झाडेझुडपे, गाळ काढून नदी पात्राचे खोलीकरण व रुंदीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे नदी पात्राची पूर वहन क्षमता वाढण्यास मदत होईल व शहराला दरवर्षी पडणारा पुराचा वेढा कमी होईल, या उद्देशाने  25 एप्रिल 2025 रोजी राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांच्या हस्ते इरई नदी खोलीकरण अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. तीन टप्प्यात खोलीकरण करण्यात येणार असून पहिला टप्पा रामसेतू ते चौराळा पुल, दुसरा टप्पा माना टेकडी (लालपेठ कॉलरी) आणि तिसरा टप्पा इरई ते वर्धा नदी संगमापर्यंतचा आहे. benefits of Irai river deepening

    ५ हजार ६०० ब्रास गाळ बाहेर

    पहिल्या टप्प्यात राम सेतू ते चौराळा पुल दरम्यान अम्युझमेंट पार्कजवळ काम सुरू असून आतापर्यंत नदीपात्रातील 200 मीटर जागेतील 14 टीसीएम (अंदाजे 5600 ब्रास ) गाळ काढण्यात आला आहे. यासाठी 8 पोकलॅन मशीन, 15 हायवा / टिप्पर, 9 टॅक्टर, 2 जे.सी.बी. सद्यस्थितीत असले तरी ही यंत्रसामुग्री वाढविण्याचे जिल्हा प्रशासनाचे नियोजन आहे.

    flood prevention Irai river Chandrapur
    इरई नदी खोलीकरण: पहिल्या टप्प्यातील काम प्रगतीपथावर.
    शेतकऱ्यांना गाळ निशुल्क उपलब्ध

    सदर मोहिमेत जिल्हा परिषद, पोलीस प्रशासन, वन विभाग, चंद्रपूर महानगरपालिका, कृषी विभाग, पाटबंधारे विभाग, भूमि अभिलेख कार्यालय, जिल्हा खनिकर्म, प्रादेशिक परिवहन विभाग, पाटबंधारे विभाग, महाराष्ट्र प्रदुषण महामंडळ ही सर्व शासकीय कार्यालये, सीटीपीएस व डब्ल्युसीएल या खाजगी आस्थापना तर भारतीय जैन संघटना, नाम फाऊंडेशन व टाटा ट्रस्ट या स्वयंसेवी संस्थांचा सहभाग आहे. मोहिमेदरम्यान निघणारा सुपीक गाळ शेतक-यांना निःशुल्क उपलब्ध करून देण्यात येत आहे. मात्र त्यासाठी वाहनाची व्यवस्था शेतक-यांनी स्वत: करायची आहे.

  • How to get free soil from Irai River project । इरई नदीतून मोफत माती! चंद्रपूरच्या शेतकऱ्यांसाठी मोठी संधी, जिल्हाधिकारी यांचा आढावा

    How to get free soil from Irai River project

    How to get free soil from Irai River project : चंद्रपूर – जिल्हा प्रशासनाच्या वतीने चंद्रपूर शहराची जीवनदायिनी असलेल्या इरई नदीचे खोलीकरण अभियान सुरू करण्यात आले आहे. 25 एप्रिल रोजी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांच्या हस्ते या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी आज (दि. 28) कामाच्या प्रगतीचा आढावा घेतला. Vinay Gowda review of Irai River cleaning progress

    प्रकल्पग्रस्तांच्या नोकरीसाठी खासदार धानोरकर आक्रमक

    जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या या बैठकीला उपवनसंरक्षक श्वेता बोड्डू, अतिरिक्त जिल्हाधिकारी नितीन व्यवहारे, मनपा आयुक्त विपीन पालिवाल, अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी नुतन सावंत, तहसीलदार विजय पवार व इतर अधिकारी उपस्थित होते.

    यावेळी जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, इरई नदी खोलिकरण अभियान 45 दिवस चालणार असून या कामासाठी जिल्हा प्रशासनाने वेगवेगळ्या समित्यांचे गठन केले आहे. यात नियेाजन समिती, गौन खनीज /साठा विल्हेवाट समिती, निधी / यंत्र सामुग्री उपलब्धता समिती, खोलीकरण क्रियान्वयन समिती, यंत्रसामुग्री दर निश्चिती, लागणारे इंधन व वंगण खर्च समिती, भरण करावयाच्या जागा निश्चिती व नियोजन समिती, प्रचार – प्रसार व जनजागृती समिती यांचा समावेश आहे. District administration initiatives for Irai River rejuvenation

    प्रत्येक समित्यांनी आपापले काम अतिशय गांभिर्याने करणे आवश्यक आहे. नदीच्या खोलिकरणातून काढण्यात आलेला गाळ शेतक-यांना नि:शुल्क उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी शेतक-यांना वाहनाची व्यवस्था स्वत: करावी लागेल. तर व्यावसायिक कामासाठी निश्चित करण्यात आलेली रॉयल्टी व आवश्यक शुल्क भरणा करून वाळू किंवा वाळूमिश्रीत गाळ नेता येणार आहे. ज्यांना खोलिकरणातून गाळ, किंवा वाळू न्यायची आहे त्यांच्या कागदपत्रांची पुर्तता करण्यासाठी एसओपी तयार करावी, अशा सुचना जिल्हाधिका-यांनी दिल्या.