Tag: आरोग्य व्यवस्था

  • government healthcare panel for private hospital । खाजगी रुग्णालयांसाठी खुशखबर! आता सरकारी पॅनलवर येण्याची मोठी संधी!

    government healthcare panel for private hospital

    government healthcare panel for private hospital : चंद्रपूर : जिल्ह्यातील नागरिकांना दर्जेदार आणि परवडणाऱ्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी 30 पेक्षा जास्त खाटा असलेल्या रुग्णालयांचा तसेच एकल विशेषत: (Single Speciality) असलेल्या 10 खाटांच्या रुग्णालयांचा एकत्रित आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना व महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजना यांच्या पॅनलवर समावेश करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या उपक्रमामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना मोठ्या प्रमाणात लाभ मिळेल आणि जिल्ह्यातील आरोग्य सुविधा अधिक सक्षम होईल. mjpjay panel hospital requirements

    चंद्रपुरात व्याघ्र संचालकांची ऐतिहासिक बैठक

    पात्र एकल विशेषता 10 खाटांचे रुग्णालय :

    1) नाक, कान, घसा 2) नेत्रविकार 3) अस्थिव्यंग आणि पॉलिट्रॉमा 4) भाजणे 5) बालरोग शस्त्रक्रिया 6) कर्करोग उपचार युनिट्स 7) नवजात आणि बालरोग वैद्यकीय व्यवस्थापन युनिट्स 8) हिमोडायलिसिस मूत्रपिंडशास्त्र युनिट्स

    पॅनलवर समावेश प्रक्रिया

    : 30 पेक्षा जास्त खाटा असलेली रुग्णालये आणि एकल विशेषता असलेली 10 खाटांची रुग्णालये, जी राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण आणि महाराष्ट्र राज्य आरोग्य हमी सोसायटी निकषांची पूर्तता करतील, अशी रुग्णालये आयुष्मान भारत व महात्मा फुले जनआरोग्य योजनांच्या पॅनलवर समावेशासाठी पात्र ठरतील. यामध्ये आधुनिक वैद्यकीय उपकरणे, प्रशिक्षित वैद्यकीय कर्मचारी आणि उच्च दर्जाची रुग्णसेवा यांचा समावेश आहे.

    लाभ : पॅनलवरील रुग्णालयांमध्ये या दोन्ही योजनांतर्गत लाभार्थ्यांना मोफत उपचार मिळतील. यामुळे गंभीर आजारांवरील उपचार परवडणारे होतील आणि रुग्णांवर पडणारा आर्थिक भार कमी होईल.

    अर्ज प्रक्रिया : रुग्णालयांनी पॅनलवर समावेशासाठी https://www.jeevandayee.gov.in (MJPJAY) या संकेतस्थळांवर ऑनलाइन अर्ज करावा. तसेच, चंद्रपूर जिल्हा रुग्णालय जिल्हा समन्वयक किंवा जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याशी संपर्क साधावा.

    जिल्हा प्रशासनाचे आवाहन

    : जिल्ह्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील नागरिकांना मोफत व उच्च दर्जाच्या वैद्यकीय सुविधा देण्यासाठी पात्र खाजगी रुग्णालयांनी आयुष्मान भारत व म. फुले जनआरोग्य योजनांच्या शासकीय पॅनलकरीता प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. नागरिकांना जवळील पॅनलवरील रुग्णालयांची माहिती https://www.jeevandayee.gov.in या संकेत स्तळावर उपलब्ध आहे.

    संपर्क : अधिक माहितीसाठी किंवा पॅनलवर समावेशासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय, चंद्रपूर दूरध्वनी क्रमांक 9136158619 वर संपर्क साधावा किंवा https://www.jeevandayee.gov.in वर भेट द्यावी, असे जिल्हा शल्य चिकित्सक यांनी कळविले आहे.

  • चंद्रपुरात मनसेने काढली आरोग्यव्यवस्थेची तिरडी

    News34 chandrapur

    चंद्रपूर – नुकत्याच घडलेल्या नांदेड, ठाणे, नागपूर येथील दुर्दैवी घटनेनंतर आरोग्य व्यवस्था किती हाल आहे हे स्पष्ट झाले आहे. यातच चंद्रपूर येथील शासकीय महाविद्यालयात डॉक्टर उपलब्ध नसल्याने उपाचाराअभावी परिचारिकेचा मृत्यू झाला.
    यामुळे कुपोषित अवस्थेत पडलेल्या शासकीय रुग्णालयातील आरोग्य व्यवस्थेविरोधात मनसे चंद्रपूर तर्फे आरोग्य व्यवस्थेची तिरडी काढत निषेध नोंदविण्यात आला व यावेळी आरोग्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे करण्यात आली. Realme चा 5G मोबाईल फक्त 11 हजार 999 रुपयात, आजच खरेदी करा amazon वर

     

    तिरडी वर औषधांचा हार चढवत प्रशासनाच लक्ष वेधण्यात आले, तसेच यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार यांनी शासनाकडे अनूपस्थित राहणाऱ्या डॉक्टरांवर कडक शासन करावे, औषधांचा पुरवठा रुग्णांची वाढती संख्या पाहून करावा, गेली दोन वर्षापासून होत असलेली औषध पुरवठ्याची मागणी त्वरित पूर्ण करण्यात यावी, डॉक्टर व इतर कर्मचाऱ्यांची, कामगारांची शेकडो रिक्त पदे त्वरित भरावी, ऑपरेटिंग एक्स-रे मशीन सुरू करावी, रखडलेल्या यंत्रांची खरेदी अती तातडीने करण्यात यावी, सोनुग्राफी करीता महिने महिन्याची तारीख रुग्णांना न देता, त्यावर त्वरित उपययोजना करावी, कर्मचाऱ्यांचे वर्षभरापासून अधिष्ठाता यांचे कार्यालयात रखडलेले उपचाराचे बिल त्वरित अदा करण्यात यावे, खाटांची संख्या वाढविण्यात यावी, या मागण्या यावेळी करण्यात आल्या, विविध फलक दाखवीत निद्रावस्थेत असलेल्या शासनाच्या व सरकारच्या ढिम्म कारभाराचा यावेळी निषेध केला.

     

    यावेळी उपअधीक्षक यांचे कार्यालय गाठत खाली असलेल्या कार्यालयात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तब्बल अर्धा तास ठिय्या मांडत अधिकाऱ्यांना बोलावून चर्चा केली. यावेळी शासनाकडून खरेदीत, भरीत प्रक्रियेत, व औषधी पुरवठा करण्यात होणारी दिरंगाई यामुळे अनेक अडचणींना स्थानिक अधिकाऱ्यांना व डॉक्टर यांना समोर जावे लागत आहे हे स्पष्ट झाले. यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना अवगत करून आरोग्य मंत्री यांच्याकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार यांनी दिले.

     

    सदर आंदोलनात कामगार सेना जिल्हाध्यक्ष रविष सिंह,व्यापारी सेना जिल्हाध्यक्ष महेश शास्त्रकार, वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष महेश वासलवार,विधीसेना जिल्हाध्यक्ष मंजुषा लेडांगे,शेतकरी सेना जिल्हाध्यक्ष आनंद बावणे, जनहित सेना जिल्हाध्यक्ष सुनील गुडे,तालुअक अध्यक्ष प्रकाश नागरकर,शहर संघटक मनोज तांबेकर, मनवीसे जिल्हाउपाध्यक्ष कुलदीप चंदनखेडे, ग्रामपंचायत सदस्य नितीन टेकाम, अक्षय चौधरी, राज वर्मा,वर्षा भोमले, युगल ठेंगे, नितेश जुमडे, करण नायर, मयुर मदनकर, कार्तिक खंगार,सुयोग धनवलकर, राकेश पराडकर, तुषार येरमे,पियुष धुपे,असलम शेख, अभी उमरे, विनोद रेब्बावार,ऋषि बालमवार, कार्तिक खंगार व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.

  • डॉक्टरांची पदे कधी भरणार? कांग्रेस आक्रमक

    News34 chandrapur गुरू गुरनुले

    मुल – शासनाचे आरोग्य सेवेकडे दुर्लक्ष होत असून रुग्णांचे बेहाल होत आहेत. आजच्या स्थितीत एका दिवशी हिवताप व विषमज्वर असे 890 रुग्ण उपचारासाठी दाखल होत असल्याने रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची व कर्मचाऱ्यांची संख्या आवश्यकतेनुसार अपुरी असल्याचे दिसून येत आहे.

     

    यामधे मंजूर पदे ४८ भरलेली पदे ३२ कंत्राटी ५ असून १३ पदे रिक्त असल्याचे प्रत्यक्ष दिसून आले. मुल तालुक्यात सर्वाधिक गावांची संख्या लक्षात घेता उपजिल्हा मंजूर केले. परंतु उपजिल्हा रुग्णालयात भरती होणाऱ्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच जात असल्याने रुग्णांवर विविध आजारांवर उपचार करणारे डॉक्टर पुरेसे नाहीत. तालुक्यात मोठे उपजिल्हा रुग्णालय असून देखील आय.सी. यु.ची सोय नाही. त्यामुळे भरती केल्यानंतर लगेच त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी त्यांना रेफर केल्या जात असल्याच्या तक्रारी आहेत.

     

    औषधांचा साठा पुरेसा नाही तसेच रुग्णालयात बेसिक मेडीसिन नाही. जे इंजेक्शन उपलब्ध आहेत ते पुअर कंडीशनचे असल्याने रुग्णांना तात्काळ फायदा होत नाही. आक्सिजन सुविधा बरोबर नाही. ती गरजेनुसार वेळेवर उपलब्ध केल्या जाते. एटीबायटिक नाही. सोनोग्राफी सेवा असून हप्त्यात फक्त दोनच दिवस तपासणी होत आहे.

     

    कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांची वेतन अडले

    पहिलेच कंत्राटी डाक्टर कर्मचारी यांची संख्या कमी असून मागील चार महिन्यापासून वेतन दिल्या जात नसल्याचे कंत्राटी कर्मचाऱ्यांची दमशक झाली आहे. याबाबत मुल तालुका कांग्रेस,महिला कांग्रेस,युवक काँग्रेस,शहर कांग्रेस वतीने आरोग्य सेवेबाबत लेखी पत्र देऊन अपुरे कर्मचारी त्वरित भरण्यात यावे. औषधांचा साठा पुरेसा उपलब्ध करावे. आय सी.यु. युनिट नियमित ठेवण्यात यावे. उपजिल्हा रुग्णालयात अत्यावश्यक सोई तात्काळ करावे.

     

    शक्यतोवर चंद्रपूरला रेफर करणे टाळावे. रुग्णांवर इथेच उपचार करुन त्यांचे समाधान करावे. नियमित एक्सरे टेक्निशियन ठेवावे. इत्यादी मागण्या बाबत चंद्रपूर येथील शल्य सिकित्सक डॉ.महादेव चिंचोळे यांना तात्काळ बोलावून निवेदन देण्यात आले. याप्रसंगी जिल्हा रुग्णालय येथील डॉ.रामटेके, डॉ कन्नाके, वैद्यकीय अधीक्षक डॉ. लाडे.उपअधीक्षक डॉ.प्रफुल लांडेकर , बालरोग तज्ञ डॉ.मेंढे उपस्थित होते.

     

    समस्यांचे व मागण्यांचे निवेदन देताना कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती राकेश रत्नावार, तालुका कांग्रेस अध्यक्ष गुरु गुरनुले, शहर अध्यक्ष सुनील शेरकी,महिला तालुका अध्यक्षा रुपाली संतोषवार,माजी नगर सेविका लीना फुलझेले, युवक अध्यक्ष पवन निलमवार,शहर अध्यक्ष व्यंकटेश पुल्लकवार,महिला शहर अध्यक्ष नलिनी आडपवार, बंडू गुरनुले, सुरेश फुलझेले, सरचिटणीस संदीप मोहबे, आशिष रामटेके यांचे उपस्थितीत निवेदन देण्यात आले.

     

    ग्रामीण आरोग्य सेवा कोलमडली

    ग्रामीण विभागातील जिल्हा परिषदे अंतर्गत राबविल्या जाणाऱ्या आरोग्य सुविधेच्या बाबतीत प्राथमिक आरोग्य केंद्र ,उपकेंद्र अपुरे कर्मचारी असल्याच्या असंख्य तक्रारी प्राप्त झाल्या असून तालुक्यातील आरोग्यसेवा निकामी झाल्याने चित्र दिसून येत आहे.

     

    ग्रामीण भागातही बाहेरून औषधी आणायला सांगतात. मौजा बेंबाल प्राथमिक आरोग्य केंद्राची काही दिवसापूर्वी गावाच्या दृष्टीने ग्रामीण आरोग्य सेवेसाठी नवीन वास्तू उभारण्यात आली.गेल्या सहा दिवसापूर्वी सायंकाळी ६ वाजता बेंबाड प्राथमिक आरोग्य केंद्रात डीलव्हरीची केस नेली असता तिथे एकही डाक्टर, नर्स ,कर्मचारी उपलब्ध नाही. याबाबत तालुका वैद्यकीय अधिकारी यांचेकडे तेथील सरपंच चांगदेव केमेकर यांनी संपर्क साधून माहिती दिली असताना सुद्धा त्या महिलेवर उपचार होऊ शकला नाही ही वस्तूस्थिती नाकारता येत नाही. त्यामुळे ग्रामीण आरोग्य सेवाही आक्सिजनवर राबविली जात आहे.