Tag: आणीबाणी

  • government exhibition on emergency era । १९७५ ची आणीबाणी पुन्हा डोळ्यासमोर! चंद्रपूरमध्ये आगळं वेगळं प्रदर्शन

    government exhibition on emergency era

    government exhibition on emergency era : चंद्रपूर, दि. 25 : तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी 25 जून 1975 रोजी देशात आणीबाणी जाहीर केली होती. या घटनेला आज 50 वर्षे पूर्ण होत आहे. त्याचे आौचित्य साधून केंद्र आणि राज्य सरकारच्या सुचनेनुसार आणीबाणी विरोधातील संघर्ष लढ्याचे नागरिकांना अवलोकन व्हावे, या उद्देशाने जिल्हा प्रशासन आणि जिल्हा माहिती कार्यालय, चंद्रपूरच्या वतीने चार दिवसांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.

    ब्रह्मपुरी मध्ये घरफोडी, पोलिसांनी आरोपीना केली अटक

    सदर प्रदर्शन प्रशासकीय इमारतीमध्ये दि. 25 ते 28 जूनपर्यंत कार्यालयीन वेळेत नागरिकांसाठी खुले राहणार आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार, जिल्हा माहिती अधिकारी राजेश येसनकर आदी उपस्थित होते.

    प्रदर्शनामध्ये समाविष्ट बाबी

    पुरातन काळापासून भारतात सुरू असलेली लोकशाही व्यवस्था, लोकशाही परंपरेनुसार यात असलेला लोकांचा सहभाग व दृष्टीकोण, लोकशाहीचे तत्व, भारतीय परंपरा आणि सामुहिक भागीदारीने चालविण्यात आलेले शासन, ग्रामीण आणि शहरी भागातील जमीन स्तरावरील लोकशाही व्यवस्था, स्वतंत्र भारत आणि लोकशाही प्रणाली, आणीबाणीपूर्व व पश्चात भारतीय समाजव्यवस्था, आणीबाणी लावल्यानंतर प्रसिध्द झालेले राजपत्र, प्रसारमाध्यमांवरील निर्बंध, सरकारच्या विरोधात जनआंदोलन, आणीबाणी संपल्यानंतर लोकशाही मुल्यांच्या रक्षणासाठी उचलण्यात आलेली पाऊले, चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांचा आणीबाणी विरोधातील संघर्ष लढा, आदींचा यात समावेश करण्यात आला आहे.

    emergency 1975

    आणीबाणीधारकांना प्रमाणपत्राचे वाटप

    आणीबाणीत तुरंगवास भोगलेल्या नागरिकांना जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. यात हेमंत वासुदेव डहाके, गिरीश वासुदेवराव अणे, अनिल मधुकर अंदनकर, सुधीर वसंतराव टिकेकर, नारायण कृष्णराव पिंपळापुरे, कृष्णा दत्तात्रय देशपांडे यांचा समावेश होता. certificates to emergency prisoners in Maharashtra