Blog

  • District Index : विविध विकास निर्देशांकाबाबत चंद्रपूर जिल्ह्याचा प्रथम क्रमांक

    District Index : विविध विकास निर्देशांकाबाबत चंद्रपूर जिल्ह्याचा प्रथम क्रमांक

    News34 chandrapur

    चंद्रपूर – जिल्ह्याने विविध विकास निर्देशांकाबाबत प्रथम क्रमांक नोंदविल्यामुळे जिल्हाधिकारी विनय गौडा यांना मुंबई येथे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. दि.15 फेब्रुवारी 2024 रोजी मुंबई येथे होणाऱ्या जिल्हा निर्देशांक 2023 या समारंभात सदर पुरस्कार देण्यात येणार आहे. District index

     

     

    लोकसत्ता चा अत्यंत महत्त्वाचा उपक्रम म्हणजे “जिल्हा निर्देशांक”. सांख्यिकी विभागाकडे असलेल्या तपशिलाच्या आधारे पुणे येथे विख्यात गोखले अर्थशास्त्र संस्थेतर्फे विविध जिल्ह्याच्या कामगिरीचे विश्लेषण केले गेले. त्यानुसार, चंद्रपूर जिल्ह्याने विविध विकास निर्देशांकाबाबत प्रथम क्रमांक नोंदविला. Lok satta news paper

     

     

    या निर्देशांकाचे सादरीकरण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणार असून यावेळी केंद्र सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार डॉ. अनंत नागेश्वरन यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.

     

  • Shiv Jayanti : राज्यात 19 फेब्रुवारीला शिवजयंती उत्साहात आणि मोठ्या प्रमाणात साजरी होणार

    Shiv Jayanti : राज्यात 19 फेब्रुवारीला शिवजयंती उत्साहात आणि मोठ्या प्रमाणात साजरी होणार

    News34 chandrapur

    चंद्रपूर – छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांनी स्थापन केलेले स्वराज्य हा भारताच्या इतिहासातील एक दैदीप्यमान अध्याय आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची राजकीय, सामाजिक आणि प्रशासकीय ध्येय धोरणे आजही आपल्या सर्वासाठी प्रेरणादायी व मार्गदर्शक आहेत. त्यामुळे त्यांच्या जयंती दिनी त्यांच्या प्रति कृतज्ञता अर्पण करणे, हे सर्वांचे कर्तव्य आहे. त्यामुळे राज्यातील सर्वांनी ही शिवजयंती अतिशय उत्साहाने आणि मोठ्या प्रमाणात साजरी करावी, असे आवाहन राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे. Shivjayanti

     

     

    यासंदर्भात, मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी सर्व जिल्हाधिकारी यांना पत्र पाठवले असून प्रत्येक जिल्ह्यात शिवजयंती उत्सव विविध कार्यक्रमांनी, सर्वांचा सहभाग घेत साजरी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. शिवजयंती ज्या ठिकाणी साजरी होईल, त्या ठिकाणचा परिसर स्वच्छ सुंदर व आकर्षक ठेवावा. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा स्वच्छ करुन घ्यावा. ज्या ठिकाणी जयंती साजरी करण्यात येणार आहे त्याठिकाणी रंग-रंगोटी करुन विद्युत रोषणाई करणे, रांगोळी काढणे, भगवा ध्वज उभारणे आदी व्यवस्था करण्याबाबत कळविले आहे.

     

     

    शिवजयंती उत्सवाच्या आरंभी महाराष्ट्र राज्याचे राज्यगीत वाजविण्यात यावे व त्यासाठी पोलीस बँडची व्यवस्था करावी. कार्यक्रमाच्या अगोदर व कार्यक्रमादरम्यान शिववंदना, स्थानिक कलावंतांकडून पोवाडा गायन, छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भातील गीत-गायन इत्यादी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करावेत. शिक्षण विभागा मार्फत विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा, शौर्यगीत स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात. यासंदर्भात स्थानिक जिल्हा स्तरावर व्यापक प्रसिध्दी करावी. जिल्ह्यातील अधिकाधिक नागरिकांचा यामध्ये सहभाग असावा, अशा सूचना मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी सर्व जिल्हाधिकारी यांना दिल्या आहेत.

     

    कार्यक्रमाच्या अनुषंगाने स्थानिक स्तरावर प्रसिद्धीसाठी टीजर, शॉर्ट क्लिप, ग्राफिक्स, विविध मान्यवर यांच्या आवाहनाचे छोटे व्हिडियो असा समाज माध्यमांचा उचित उपयोग करावा. कार्यक्रमाच्या प्रसिद्धीसाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करावे, अशा सूचनाही मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी केल्या आहेत.

     

    राज्य शासनामार्फत दरवर्षी दिनांक 19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची शासकीय कार्यालयात जयंती साजरी करण्यात येते. या दिवसाचे औचित्य साधून या थोरपुरुषांचे ज्या ज्या ठिकाणी पुतळे/स्मारके आहेत, तेथे यावर्षी देखील छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात यावी, असे निर्देशही राज्य शासनाने दिले आहेत. त्याचीही अंमलबजावणी करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

     

    सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून वर्षभरात विविध उपक्रम : दरम्यान,  शिवराज्याभिषेकाच्या 350 व्या वर्षानिमित्त राज्यात मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून सांस्कृतिक कार्य विभाग आणि इतर विभागांच्या साह्याने विविध उपक्रम राबविण्यात आले. यामध्ये बऱ्याच वर्षापासून प्रतापगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या अफजलखानाच्या कबरीच्या ठिकाणी झालेले अतिक्रमण दिनांक  10 नोव्हेंबर 2022 रोजी वन विभागामार्फत हटविण्यात आले.

     

    दिनांक 19 फेब्रुवारी 2023 रोजी आग्रा येथील औरंगजेबाच्या दिवाण ए खास या महालामध्ये शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला. त्या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार हे उपस्थित होते. राज्याभिषेकाच्या एक महिना अगोदर छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगड येथील भवानी मातेच्या मंदिरामध्ये भवानी मातेसाठी छत्र अर्पण केले होते. त्या घटनेचे औचित्य साधून मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी यावर्षी दिनांक 21 मे 2023 रोजी प्रतापगड येथील भवानी मातेस चांदीचे छत्र अर्पण केले.

     

    सन 2023 च्या रायगड येथील शिवराज्याभिषेकाच्या सोहळ्यासाठी देशभरातील विविध ठिकाणचे पवित्र जल एकत्र करून सहस्त्रजलकलश यात्रा दिनांक 26 मे 2023 रोजी राजभवन येथून सुरू करण्यात आली व या जलाद्वारे रायगड येथे दिनांक 2 जून 2023 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याच्या वेळी जलाभिषेक करण्यात आला. रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात येतो. त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांची मिरवणूक चांदीच्या पालखीतून काढण्यात येते. या मिरवणूक सोहळ्यासाठी चांदीची पालखी मंत्री श्री. मुनगंटीवार यांचे मार्फत रायगड उत्सव समितीस भेट देण्यात आली.

     

    दिनांक 1 जून 2023 रोजी गेट वे ऑफ इंडिया, मुंबई येथे राज्य शासनाच्या पुरातत्त्व विभागामार्फत शिवकालीन शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन भरविण्यात आले. 350 व्या शिवराज्याभिषेक वर्षानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागामार्फत विशेष लोगोचे प्रसारण करण्यात आले. किल्ले रायगड येथे दिनांक 2 जून 2023 रोजी तिथीप्रमाणेही शिवराज्याभिषेक सोहळा जल्लोषात साजरा करण्यात आला. दिनांक 6 जून 2023 रोजी शिवराज्याभिषेक वर्षाच्या निमित्ताने “शिवकालीन होन” या विशेष टपाल तिकिटाचे राजभवन मुंबई येथे अनावरण करण्यात आले. मंत्रालयात सार्वजनिक उद्घोषणा प्रणाली द्वारे दररोज सकाळी शिवविचार प्रसारणास दिनांक 18 ऑगस्ट 2023 पासून सुरुवात झाली.

     

    छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील श्री शहाजीराजे यांच्या वरील विशेष टपाल तिकिटाचे अनावरण दिनांक 18 ऑगस्ट 2023 रोजी मंत्रालयात करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाच्या वधासाठी वापरलेली वाघनखे सध्या लंडन येथील व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम मध्ये आहेत. ती वाघनखे भारतात आणण्याच्या सामंजस्य करारावर दिनांक 3 ऑक्टोबर 2023 रोजी स्वाक्षरी करण्यात आली. जम्मू काश्मीर मधील कुपवाडा येथे भारतीय आर्मीच्या बेसवर छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा दिनांक 7 नोव्हेंबर 2023 रोजी बसविण्यात आला. दिनांक 12 जानेवारी 2024 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री मासाहेब जिजाऊ यांच्या जयंती दिनानिमित्त त्यांचे जन्मस्थळ सिंदखेडराजा, जिल्हा बुलढाणा येथे विशेष टपाल तिकिटाचे अनावरण करण्यात आले. सांस्कृतिक विभागामार्फत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित महानाट्याचे प्रयोग प्रत्येक जिल्ह्यात करण्यात येत आहेत. याचा शुभारंभ दिनांक 13 जानेवारी 2024 रोजी नागपूर येथे करण्यात आला. “मराठा साम्राज्याचे चलन” या विषयासंदर्भात जनजागृती साठी एकदिवशीय शिबिर महाराष्ट्र राज्यात बारा ठिकाणी घेण्यात येणार आहे. तसेच या विषयासंदर्भात मराठी,  हिंदी, इंग्रजी या भाषांमध्ये कॉफी टेबल बुक तयार करण्यात येणार आहे.

     

    राज्याचे वित्त व नियोजन मंत्री असताना मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी पुढाकार घेऊन श्री शिवाजी मेमोरियल कमिटी, श्रीशैल्यम, आंध्र प्रदेश यांच्या मागणीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांचे श्रीशैल्यम येथे ध्यानमंदिर बांधण्यासाठी रुपये 3 कोटी 38लाख एवढी आर्थिक मदत महाराष्ट्र शासनामार्फत करण्यात आली होती.

  • Surjagad Iron Ore : सुरजागड लोहखनिज प्रकल्प विरोधात आंदोलन

    Surjagad Iron Ore : सुरजागड लोहखनिज प्रकल्प विरोधात आंदोलन

    News34 chandrapur

    मूल – मुल तालुक्यातील सुशी दाबगावं गावातून मोठ्या प्रमाणात दिवसरात्र सुरजागड येथील लोहखनिज उत्खनन करणाऱ्या कंपनीतर्फे जड वाहतूक सुरू असून त्या वाहतुकीमुळे व होणाऱ्या प्रदूषणामुळे सुशी दाबगावं वाशिय नागरिक मोठ्या प्रमाणात त्रस्त झाले आहेत. यावर प्रशासनाने तत्काळ उपाय योजना करावी यास्तव उलगुलान संघटनाचे संस्थापक अध्यक्ष राजु झोडे यांच्या नेतृत्वात गावकऱ्यांच्या बहुसंख्य युवकाच्या उपस्थितीत काही दिवसापूर्वी रास्तारोको आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलेला होता. Surjagad Iron Ore

     

    त्यानुसार आज सुशी बसस्थानक परिसरात अनेक युवकांच्या उपस्थितीत आंदोलन करण्यात आला असून तसे निवेदन उपविभागीय पोलीस अधिकारी मलिकार्जून इंगळे, ठाणेदार सुमित परतेकी, ना. तहसीलदार कुमरे याना देण्यात आले.

     

     

    गडचिरोली सुर्जागड येथील लोह खनिज उत्पादन करण्याऱ्या कंपनीतर्फे मोठ्या प्रमाणात मुल तालुक्यातील सुशी गावातून लोहखनिज याची जड वाहतूक गेल्या वर्षभरापासून सुरू आहे. त्यामुळे प्रचंड प्रमाणात रस्त्याची वाट लागली असून प्रदूषणाची गंभीर समस्या निर्माण झालेली आहे.

     

     

    गावातील छोटी मुले गर्भवती माता स्थनदा माता नागरिकांना स्वसणाचे डोळ्याचे असे विविध आजाराला सामोरे जावे लागत असून आरोग्याची मोठी समस्या निर्माण झाल्या आहे. परिणामी भरधाव वेगाने येणाऱ्या वाहनाने जिल्हा परिषद शाळा, व आश्रम शाळा यांनाही मोठा धोका झालेला असून रस्त्यालगत असल्याने ब्रेकर अभावी अपघात होऊन जीव जाण्याचं धोका नाकारता येत नाही. तसेच गावातील अनेक सुशिक्षित युवक बेरोजगार असून गावातील युवकांना रोजगार मिळावा असे विविध समस्यांना घेऊन हे आंदोलन करण्यात आले होते. याची शासनस्तरावरून तत्काळ दखल घ्यावी अशी मागणी सुशी वाशियाना घेऊन उलगुलान संघटनाचे वतीने करण्यात आला आहे. याची योग्य दखल न घेतल्यास समोर मोठे आंदोलन करू असा इशारा देण्यात आलेला आहे.

     

     

    त्यावेळी उलगुलान संघटनाचे संस्थापक अध्यक्ष राजुभाऊ झोडे, सामाजिक कार्यकर्ते विनोद शेंडे , श्यामभाऊ झिलपे, पत्रकार दुर्वास घोंगडे ,रुपेश कोठारे, मगेश कपाट, रुपेश निमसारक,कविश्र्वर कपाट, अमोल बोरसरे,मोहन बुरांडे, पंचशील तामगाडगे, सिताराम भांडेकर, नंदाजी भांडेकर,बंडू सोमनकर, पंकज तावाडे. महेश सातपुते, सुनील भांडेकर, अंकित बुरांडे, आदि गावकरी आंदोलक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  • Chandrapur Heritage : व्हॅलेंटाईन डे ला चंद्रपुरात सलाम राणी हिराई कार्यक्रम

    Chandrapur Heritage : व्हॅलेंटाईन डे ला चंद्रपुरात सलाम राणी हिराई कार्यक्रम

    News34 chandrapur

    *‘सलाम राणी हिराई’ सारख्या कार्यक्रमातून युवकांनी आदर्श घ्यावा*
    *शहरातील प्रेमाचे प्रतिक असलेल्या गोंडराजे बिरशहा-राणी हिराई वास्तुवर पुष्पअर्पण करीत इतिहासाला उजाळा*
    *इको-प्रोसह एफईएस, सरदार पटेल, खत्री व समाजकार्य महाविद्यालयाच्या शेकडो विद्यार्थ्यांचा सहभाग*

    चंद्रपूरः शहरात गोंडकालिन ऐतिहासिक वास्तु असलेली गोंडराजे बिरशहा व राणी हिराई यांच्या समाधीवर ‘सलाम राणी हिराई’ कार्यक्रम अंतर्गत इको-प्रो संस्था, एफईएस गर्ल्स महाविद्यालय, सरदार पटेल महाविद्यालय, खत्री महाविद्यालय व मामीडवार समाजकार्य महाविदयालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनाच्या विदयार्थीनीनी पुष्पअर्पण करून”सलाम राणी हिराई” कार्यक्रमातून अजरामर प्रेमाचे, कर्तृत्वाला उजाळा देत कार्यक्रमातून संदेश देण्यात आला.

    आजच्या युवकांना प्रेमदिनाच्या निमीत्ताने क्षणभंगुर प्रेमाच्या मागे न लागता, प्रत्येक नात्यातील प्रेम वृध्दीगंत करण्याकरिता विशीष्ट दिवसाची गरज नसुन, पाच्छिमात्याचे अनुकरण न करता विदयाथ्र्याना योग्य संदेश देता यावा म्हणुन दरवर्षी गोंडराजे यांचे समाधीस्थळावर या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. प्रेमाचे प्रतीक असलेले राजे बिरशहा यांची समाधी राणी हिराईने त्यांच्या मृत्युनंतर या समाधी-वास्तुचे सुंदर असे बांधकाम केले होते. ताजमहलच्या नंतर त्याच तोडीची गोंडवानातील सुंदर आकर्षक अशी वास्तु बांधुन न थांबता राजेच्या मृत्युनंतर राज्यकारभार योग्य रित्या सांभाळत अनेक विकासकामे केलेली आहेत. अनेक मंदीराचा जिर्णोध्दार सुध्दा केलेला आहे, राणी हिराईचा कार्यकाळ चंद्रपूरच्या इतीहासात नोंदवीला गेलेला आहे. राणी हिराईने आपल्या कार्यातुन आपल्या पतीप्रती असलेले प्रेम अजरामर केले आहे. राणी हिराईचा हा आदर्श आजच्या युवकांनी-युवतीनी घेण्याची गरज आहे.

    ‘‘चंद्रपूर शहरात असलेली ही प्राचीन पुरातन वास्तु खऱ्या अर्थाने आपला ऐतिहासिक वारसा संवर्धनाचा तसेच आपल्या कार्यातुन गोंडराजे बिरशहा व राणी हिराई यांच्यातील प्रेम अजरामर करून ताजमहलच्या तोडीची वास्तु निर्माणा सोबतच पुढील काळात योग्य राजकारभार करून या राणीने बांधुन एक आदर्श घालुन दिलेला आहे’’ असे मत विविध प्राध्यापकांनी सलाम राणी हिराई या कार्यक्रमादरम्यान डॉ करुणा करकाडे, डॉ रवी वाळके, डॉ माहुरे यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले. ‘‘राणी हिराई आणि राजा बिरशहा यांच्यातील प्रेमचं होत की जे मृत्युनंतरही अजरामर झाले आहे, त्याच्या कार्यातुन ते सतत जिवंत राहणार आहे. आजच्या दाम्पत्यांनी तसेच युवकांनी अशा स्थळांना, स्मारंकाना भेट देत आपल्या जिवनात, हा आदर्श घेण्याची गरज असल्याचे, मत यावेळी इको-प्रो चे बंडु धोतरे यांनी व्यक्त केले.

    यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा.डाॅ. राजेंद्र बारसागडे तर आभार प्रा डॉ आनंद वानखेडे यांनी मानले, उपस्थित प्राध्यापक यावेळी एफईएस महाविद्यालयचे प्रा. डॉ.मिनाक्षी जुमले, डॉ मेघमाला मेश्राम, डॉ.राजेश चिमनकर, डॉ.योगेश निमगडे, डॉ अनिल कुभंलकर, प्रा लोकेश दरवे, प्रा.पल्लवी खोके, प्रा स्वाती कनडोतीवार, सरदार पटेल महाविदयालय चे प्रा कुलदीप गौड, खत्री महाविद्यालय चे प्रा संतोष कावरे इको-प्रो चे नितीन रामटेके,  धर्मेंद्र लुनावत, राजू काहिलकर, ओमजी वर्मा, भारती शिंदे, सुनील पाटील, सुनील लिपटे, सचिन धोतरे, अब्दुल जावेद यासह अन्य इको-प्रो सदस्य व शेकडो विद्यार्थी प्रामुख्याने उपस्थित होते.

  • Valentine Day Chandrapur : प्रेयसीचा लग्नास नकार प्रियकराने उचलले टोकाचे पाऊल

    Valentine Day Chandrapur : प्रेयसीचा लग्नास नकार प्रियकराने उचलले टोकाचे पाऊल

    News34 chandrapur

    रमेश निषाद

    बल्लारपूर :- येथील डॉ, राजेंद्र प्रसाद वॉर्ड मधील राहणारा अमित बालाजी चौहान (27)याचे प्रेम मेव्हणी सोबत होते दोघेही एकमेकांवर प्रेम करीत होते. Valentine day chandrapur

     

    अमित ने प्रेयसी सोबत लग्न करण्याचे ठरविले होते पण त्याला प्रेयसिने लग्नास नकार दिला या कारणाने अमित 12 फेब्रुवारी रोजी कोणालाही न सांगता घरून निघून गेला.आणि जंगलात जात अमित ने गळफास घेत आत्महत्या केली. Lovers day

     

    Psi गोविंद चाटे आपल्या चमू सोबत रात्री दीड वाजता पेट्रोलिंग करीत असतांना मेन रोड वर एक बाईक उभी दिसून आली त्यांनी पोलीस स्टेशन ला फोन करून गाडी क्रमांक MH-15-HF5409ही गाडी लवारीस अवस्था मध्ये उभी असल्याचे कळविले असता माहिती मिळाली की सदर होंडा शाईन गाडी ही अमित चौहान यांची आहे. Happy Valentine’s day 2024

     

    अमित च्या कुटुंबियांशी सम्पर्क साधला असता अमित हा सकाळी घरून गाडी घेऊन निघून गेला होता मात्र तो अजूनही घरी परतला नाही असे मृतकाचे काका प्रसाद चौहान यांनी पोलीस स्टेशन ला कळविले.

     

    मृतकाचे काका यांना सोबत घेऊन गाडी दाखविली आणि मेन रोड च्या आतमध्ये पाहणी केली असता 50मीटर चा आत एका झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत अमित दिसून आला. मृतक आपल्या काकाचा दुकानात टेलरिंग चे काम करीत होता. पुढील तपास ठाणेदार असिफ रजा यांच्या मार्गदर्शनात गोविंद चाटे करीत आहे.

  • Police In Action : चंद्रपुरात मद्यपी पळू लागले सैरावैरा

    Police In Action : चंद्रपुरात मद्यपी पळू लागले सैरावैरा

    News34 chandrapur

    चंद्रपूर – चंद्रपूर जिल्ह्यात वाढत असलेला गुन्हेगारी आलेख कमी व्हावा यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांच्या मार्गदर्शनात आज 13 फेब्रुवारीला सायंकाळी स्थानिक गुन्हे शाखेने कारवाईचा धडाका सुरू केला आहे. Chandrapur police

     

    शहरातील अनेक दारू दुकानासमोर विविध ठिकाणी मद्यपी दारू पितात ज्यामुळे भांडणाचे प्रकार वाढतात, या भांडणाचे रूपांतर मोठ्या वादात होते.

     

     

    दारू दुकानाबाहेर असलेल्या मद्यपीचा अनेक महिला व मुलींना नाहक त्रास होतो, यामुळे गुन्हेगारीत वाढ होण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे आज स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक जितेंद्र बोबडे व पोलीस उपनिरीक्षक विनोद भुरले यांच्या नेतृत्वात शहरातील बंगाली कॅम्प, मूल रोड, रयतवारी कॉलरी, तुकुम भागात असणाऱ्या देशी दारू व वाईन शॉपी समोर मद्यपिंवर धडक कारवाई मोहीम राबविण्यात आली. Police live action

     

     

    सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक महेश कोंडावार, सपोनि जितेंद्र बोबडे, पोलीस उपनिरीक्षक विनोद भुरले व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली.

  • Save Democracy : 15 फेब्रुवारीला चंद्रपुरात प्राध्यापक श्याम मानव यांचे जाहीर व्याख्यान

    Save Democracy : 15 फेब्रुवारीला चंद्रपुरात प्राध्यापक श्याम मानव यांचे जाहीर व्याख्यान

    News34 chandrapur

    चंद्रपूर – देशातील लोकशाही व संविधान हे धोक्यात आले आहे, ते वाचविण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र आले पाहिजे असे वक्तव्य अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक श्याम मानव यांनी आज शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत केले. Shyam manav

     

    श्याम मानव हे 14 व 15 फेब्रुवारीला चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे, 14 फेब्रुवारीला भद्रावती येथे आम्ही भद्रावती कर यांच्या वतीने आयोजित जाहीर व्याख्यान कार्यक्रमात श्याम मानव उपस्थित राहणार आहे, 15 फेब्रुवारीला चंद्रपुरातील आम्ही चंद्रपूरकर यांच्या वतीने आयोजित जाहीर व्याख्यान कार्यक्रमात भारतीय लोकशाही पुढील आव्हाने याविषयावर श्याम मानव नागरिकांना संबोधित करतील.
    आयोजित कार्यक्रमात विधानपरिषद आमदार सुधाकर अडबाले उपस्थित राहणार आहे. Public lecture

     

     

    यावेळी श्याम मानव यांनी नागरिकांना कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले.

    आयोजित पत्रकार परिषदेत आम्ही चंद्रपूरकर संयोजक एडवोकेट गोविंद भेंडारकर, उमाकांत धांडे उपस्थित होते.

  • Mla Pratibha Dhanorkar : वेळ सांगून येत नाही त्यासाठी महिलांनी आत्मनिर्भर बना – आमदार प्रतिभा धानोरकर

    Mla Pratibha Dhanorkar : वेळ सांगून येत नाही त्यासाठी महिलांनी आत्मनिर्भर बना – आमदार प्रतिभा धानोरकर

    News34 chandrapur

    चंद्रपूर – मकर संक्रांतीच्या निमित्याने चंद्रपूर शहर( जिल्हा ) महिला काँग्रेस कमिटी च्या वतीने महिला मेळावा तसेच हळदी कुंकू वाण वाटप कार्यक्रमाचे आयोजन स्थानिक संताजी भवन गिरनार चौक चंद्रपूर येथे वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रांच्या आमदार मा. प्रतिभाताई धानोरकर यांचे अध्यक्षतेखाली करण्यात आले. Mahila congress

     

     

    कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून रामुभैय्या तिवारी अध्यक्ष चंद्रपूर शहर काँग्रेस कमिटी,डाँ अभिलाषा गावतुरे सामाजिक कार्यकर्त्या,काँग्रेस चे जेष्ठ नेते महेशभाऊ मेंढे,माजी महापौर संगीता अमृतकर ,ओबीसी प्रदेश सरचिटणीस प्राचार्य नरेंद्र बोबडे,ओबीसी शहर अध्यक्ष राहुल चौधरी, आयोजक तथा शहर महिला काँग्रेस अध्यक्ष सौ चंदाताई वैरागडे,माजी नगरसेविका विना खनके,राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षिका सौ अनिता बोबडे, सौ धोबे प्रीती शाहा, पिंपळकर ,गुजरकर यांचे सह महिला काँग्रेस पदाधिकारी यांची उपस्थिती होती. Chandrapur congress

     

    सर्व मान्यवरांनी सावित्रीबाई फुले,राजमाता जिजाऊ, स्व इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन ,द्वीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली,याप्रसंगी सौ.तृप्ती राजूरकर यांनी अप्रतीम स्वागत नृत्य सादर केले.

     

     

    कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच वैशाली कांमडे ,कविता जुमडे यांनी महिलांकरिता छोटे छोटे मनोरंजनात्मक खेळ घेतले, यामध्ये अनेक महिलांनी सहभाग घेतला,या खेळात प्रथम आलेल्या स्पर्धकांना आमदार प्रतिभाताईच्या हस्ते बक्षीस देणून प्रोत्साहित करण्यात आले,आयोजक सौ चंदाताई वैरागडे यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणातून काँग्रेस पक्ष नेहमीच महिलांचा सन्मान करणारा,शेतकऱयांना,युवकांना गोर गरिबांना न्याय देणारा पक्ष आहे.

     

    आमदार प्रतिभाताई आणि आमच्या नेत्या संध्याताई सव्वालाखे ,आणि रामुभाऊ तिवारी यांच सक्षमआणि प्रेरणादायी नेतृत्व असल्यामुळेच शहरात आम्ही महिलांचं इतकं मोठ संघटन करू शकलो असे सांगितले,याप्रसंगी डॉ. अभिलाषा गावतुरे यांनी चंदाताई वैरागडे यानि चंद्रपूर खऱ्या अर्थाने महिलांना सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून आत्मनिर्भर बनवून महिलांची इतकी मोठी फौज तयार केली असे मनोगतातून व्यक्त केले,याप्रसंगी महेश मेंढे,प्राचार्य नरेंद्र बोबडे, संगीता अमृतकर यांनीही महिलांना मार्गदर्शन केले.

     

     

    कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी महिलांनी घरातील प्रत्येक व्यवहार समजून घेतला पाहिजे,कुठलीही चांगली वाईट वेळ सांगून येत नाही अश्या वेळी रडत बसण्यापेक्षा परिस्थितीचा सामना करण्यासाठी आपल्या मानसिकता तयार असायला पाहिजे,आज महिला प्रत्येक्ष क्षेत्रात आघाडीवर आहेत,आपणही मागे न राहता सक्षम बना असे सांगत,महिला अध्यक्ष चंदाताई यांच्या अतिशय उत्तम नियोजमूळे काँग्रेस मेळाव्याला आणि हळदी कुंकू कार्यक्रमाला इतक्या मोठ्या संख्येने महिलाची उपस्थिती बघून मन भारावून गेल्याचे मनोगतातून सांगितले,मकर संक्रांत निमित्य उपस्थित सर्व महिलांना महिला काँग्रेस तर्फे हळदी कुंकू तसेच वाण देण्यात आले.तसेच काँग्रेस चे जेष्ठ नेते महेशभाऊ मेंढे यांनी उपस्थित सर्व महिलांना मकर संक्रांतीच्या निमित्याने घड्याळ भेट दिली.

     

    कार्यक्रमाला महिलांची भरगच्च उपस्थिती होती, कार्यक्रमाचे संचालन तेजु पोडे,मीनल वैरागडे यांनी तर आभार मीनाक्षी गुजरकर यांनी मानले.शेवटी सर्व महिलांना अल्पोपहार देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

  • Big Accident Chandrapur : दारूचा मोह जीवावर बेतला

    Big Accident Chandrapur : दारूचा मोह जीवावर बेतला

    News34 chandrapur

    वरोरा – तालुक्यातील खांबाडा येथील पेट्रोल पंप वरून डिझल भरून वर्धा जिल्ह्यातील नंदोरी येथे जात असलेल्या टिप्पर ला भरधावं वेगात असलेली दुचाकी टिप्पर च्या मागून घुसली यात घडलेल्या अपघातात दुचाकीवरील २ जण जागीच ठार झाले तर एक गंभीर जखमी असल्याची घटना खांबाडा येथील उदय बार जवळ सायंकाळी ७.३० वाजता घडली. मारोती चप्पलवार {२२), वैभव अडबले (२० ) दोघेही राहणार गोठाडी शेगाव, जि. वर्धा असे मृतक युवकाचे नाव आहे. Chandrapur accident

     

     

    वर्धा जिल्ह्यातील नंदोरी येथील गिता कन्ट्रक्शन कंपनीचा टिप्पर क्रमांक एमएच ३४ – २८०६ हा डिझेल भरण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्याची सीमा असलेल्या खांबाडा येथील पेट्रोल पंप वर आला. डिझल भरून परत जात असताना त्याच मार्गाने तीन जण बसलेली दुचाकी भरधावं वेगात टिप्परच्या मागच्या बाजूने घुसली या भीषण अपघातात मारोती चप्पलवार व वैभव अडबले या दोन्ही युवकांचा जागीच मृत्यू झाला तर एक गंभीर जखमी झाला. तिघेही वर्धा जिल्हातील गोठाडी शेगाव, येथील रहिवाशी असुन वर्धा जिल्ह्यात दारूबंदी असल्यामुळे खांबाडा येथे दारू पार्टी करण्यासाठी आले असल्याची चर्चा आहे. वृत्त लिहीपर्यंत गंभीर जखमी युवकाचे नाव कळले नाही. Marathi news

     

     

    घटनेची माहिती मिळताच वरोरा येथील रुग्णदूत लखन केशवानी घटना स्थळी तात्काळ दाखल होत अपघातग्रस युवकांना उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे दाखल केले. पुढील तपास ठाणेदार अमोल काचोरे यांच्या मार्गदर्शनात वरोरा पोलीस करीत आहे.

  • Maharashtra Politics : चंद्रपूर जिल्ह्यातील दिग्गज कांग्रेस नेता भाजपच्या वाटेवर?

    Maharashtra Politics : चंद्रपूर जिल्ह्यातील दिग्गज कांग्रेस नेता भाजपच्या वाटेवर?

    News34 chandrapur

    चंद्रपूर – कांग्रेसचे माजी मुख्यमंत्री व आमदार अशोक चव्हाण यांनी कांग्रेस सदस्यपदाचा राजीनामा देत राजकीय वर्तुळात खळबळ माजवली, अशोक चव्हाण यांच्या सोबतीला अजून किती नेते जाणार या बाबत अजूनही सस्पेन्स कायम आहे. Maharashtra congress

     

    मात्र महायुतीचे नेते व शिंदे गटातील आमदार संतोष बांगर यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील एक दिग्गज कांग्रेस नेता लवकरचं भाजप पक्षात प्रवेश करतील असा खळबळजनक दावा केला आहे. Ashok chavhan resignation

     

    आदर्श घोटाळ्यावरून जेलवारी न व्हावी यासाठी चव्हाण यांनी सदर पाऊल उचलले असल्याची चर्चा आहे, चव्हाण यांच्या निर्णयामुळे कांग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे. Mla santosh bangar

     

    हिंगोली येथे प्रसार माध्यमासोबत बोलत असताना आमदार बांगर यांनी भाजप ला लोकसभा निवडणुकीत यश मिळावे यासाठी कोणता नेता निवडणूक जिंकू शकतो यावर भाजपची नजर आहे, येणाऱ्या आठ दिवसात कांग्रेस पक्ष नाहीसा होणार असा दावा यावेळी बांगर यांनी केला आहे.

     

     

    चंद्रपूर जिल्हा सहित, लातूर व अमरावती येथील कांग्रेस नेते भाजपच्या वाटेवर आहे व लवकरच ते महायुती मध्ये सामील होणार असा दावा बांगर यांनी केला आहे.