Blog

  • Chandrapur City Encroachment : चंद्रपूर शहरात अतिक्रमण हटाव मोहिमेवरून राजकारण तापलंय

    Chandrapur City Encroachment : चंद्रपूर शहरात अतिक्रमण हटाव मोहिमेवरून राजकारण तापलंय

    Chandrapur City Encroachment चंद्रपूर – चंद्रपूर शहरात 2 मे पासून महानगरपालिका, पोलीस व वाहतूक विभागाच्या संयुक्त कारवाईत अतिक्रमण हटविण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे मात्र या मोहिमेवरून आता राजकारण तापलंय.

     

    ही अतिक्रमण हटाव मोहीम महानगरपालिकेच्या जिव्हारी लागत असल्याचे चित्र पुढे आले आहे.

    अवश्य वाचा : त्या मृतकाची ओळख पटेना

    Chandrapur City Encroachment 2 मे ला मुख्य मार्गावरील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून ते बिनबा गेट पर्यंत अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली, मात्र त्याठिकाणी काही विशिष्ट समाजाच्या नागरिकांचे अतिक्रमण हटविण्यात आले, असा थेट आरोप राष्ट्रवादी कांग्रेस शरद पवार गटाचे शहर अध्यक्ष दीपक जयस्वाल यांनी लावला आहे.

     

    Chandrapur City Encroachment आयुक्त विपीन पालिवाल हे राजकीय दबावापोटी अतिक्रमण हटविण्याची कारवाई करीत आहे, हे चुकीचे आहे, आमचा कारवाईला विरोध नाही पण त्यांनी सर्वांना समान न्याय द्यायला हवा.

    अवश्य वाचा : पशुधनाला इयर टॅगिंग करा

    Chandrapur City Encroachment 3 मे रोजी जटपूरा गेट ते रामनगर चौक पर्यंत अतिक्रमण मोहीम मनपाने राबवली मात्र या कारवाई दरम्यान वंचित बहुजन आघाडीचे राजेश बेले यांनी तीव्र आक्षेप घेत आयुक्त विपीन पालिवाल हे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे सेवक असल्याचा आरोप करीत त्यांनी कारवाई थांबवली नाही तर आयुक्तांची गाढवावर बसून धिंड काढणार असा इशारा राजेश बेले यांनी दिला आहे.

     

    आयुक्त पालिवाल यांनी यावर आम्ही नियमाप्रमाणे अतिक्रमण काढत आहो, शहरातील रस्ते आधीच अरुंद आहे, त्यामुळे नागरिकांना पार्किंग साठी जागा मिळत नाही, म्हणून अतिक्रमण हटाव मोहीम आम्ही राबवित आहे, सदर मोहीम ही पुढील 15 दिवस चालणार असल्याची प्रतिक्रिया विपीन पालिवाल यांनी दिली आहे.

  • Cattle smugglers chandrapur : स्थानिक गुन्हे शाखेची गोवंश तस्करावर कारवाई

    Cattle smugglers chandrapur : स्थानिक गुन्हे शाखेची गोवंश तस्करावर कारवाई

    Cattle smugglers chandrapur चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध धंद्यावर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांना दिले होते, आदेशाची अंमलबजावणी करताना कोंडावार यांनी विविध पथके नेमत आतापर्यंत अनेक कारवाया केल्या आहे.

     

    कत्तलीसाठी नेण्यात येत असलेल्या 137 गोवंश जनावरांची नुकतीच सुटका करण्यात आली होती, सदर प्रकरणी 15 आरोपींवर गुन्हा दाखल करीत 1 कोटीच्या वर मुद्देमाल स्थानिक गुन्हे शाखेने जप्त केला होता.

     

    पुन्हा 2 दिवसांनी स्थानिक गुन्हे शाखेने मूल पोलीस स्टेशन हद्दीत जनावर तस्करांवर कारवाई केली आहे, 3 मे ला मध्यरात्री स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळालेल्या गोपनीय माहिती मिळाली की मूल शहरातून जनावरांची वाहतूक करण्यात येणार आहे, माहितीच्या आधारे मूल रेल्वे स्टेशन जवळ नाकाबंदी करण्यात आली. Cattle smugglers chandrapur

     

    त्यावेळी वाहन क्रमांक CG24 S7667 ला थांबविण्यात आले, वाहनाची झडती घेतली असता त्यामध्ये निर्दयतेने जनावरांना कोंबण्यात आले होते, त्यापैकी 4 जनावरे मृत अवस्थेत होती.

     

    Cattle smugglers chandrapur 2 आरोपी घटनास्थळावरून पसार झाले तर वाहन चालक 39 वर्षीय नईमुद्दीन करीमुद्दीन शेख रा.घुग्गुस याला ताब्यात घेण्यात आले, पळून गेलेले आरोपी असलम शेख, इर्शादउल्ला खान राहणार मूर्तिजापूर अकोला, सदर जनावरे कुरखेडा जिल्हा गडचिरोली येथून वाहतूक करीत आणले असल्याची कबुली वाहनचालक शेख यांनी दिली.

     

    गडचांदूर येथील सादिक खान यांच्याकडे जनावरे घेऊन जायचे होते असेही वाहन चालकाने सांगितले, वाहनात 37 गोवंश जनावरे व ट्रक सहित एकूण 16 लाख 50 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. 33 गोवंश जनावरे प्यार फाउंडेशन चंद्रपूर मध्ये नेण्यात आले. Cattle smugglers chandrapur

     

     

    सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांच्या नेतृत्वात सहायक पोलिस निरीक्षक हर्षल एकरे, पोलीस उपनिरीक्षक विनोद भुरले, पोलीस कर्मचारी नितीन साळवे, प्रकाश बलकी, सुभाष गोहोकार, संतोष यलपुलवार, नितीन रायपुरे, दिनेश अराडे यांनी केली.

  • Appeal of administration to citizens : त्या मृतकाची ओळख पटेना, मग आता काय?

    Appeal of administration to citizens : त्या मृतकाची ओळख पटेना, मग आता काय?

    Appeal of administration to citizens दिनांक 31 मार्च 2024 रोजी जिल्हा सामान्य रुग्णालय, चंद्रपूर आवारातील गेट जवळ एक अनोळखी इसम झोपलेल्या स्थितीत दिसल्याने त्यास वॉर्डबॉयने उठवून पाहिले असता तो हालचाल करीत नव्हता. त्यामुळे सदर इसमास जिल्हा सामान्य रुग्णालय, चंद्रपूर येथील अपघात विभागात भर्ती केल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

    अवश्य वाचा : चंद्रपुरात पार्किंग ची समस्या, प्रशासनाने सुरू केली ही मोहीम

    Appeal of administration to citizens याबाबत शहर पोलिस स्टेशन येथे नोंद करण्यात आली असून सदर मृतक हा अनोळखी असून त्याची अजुनपर्यंत ओळख पटलेली नाही व त्याचे कोणीही नातेवाईक समोर आलेले नाही. मृतकाची ओळख पटविण्याकरीता नातेवाईकांचा शोध घेतला असता ते सुध्दा मिळू शकले नाही, त्यामुळे सदर अनोळखी मृतकाची ओळख पटविण्यासाठी संबंधितांनी संपर्क करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

     

    मृतकाचे वर्णन :  अनोळखी इसम वय अंदाजे 65 वर्ष, रंग काळा सावळा, चेहरा-लांबट, डोक्याचे केस बारीक पांढरे, दाढी मिशीचे केस पांढरे, उजव्या हाताला पंजापासून खांदयापंर्यंत दवाखान्याचे बॅंडेज बांधलेला, अंगात तपकिरी काळया लाईन असलेला मळकट फुल शर्ट, सिमेंट रंगाचा फुलपॅन्ट घातलेला अनोळखी पुरुष इसम. Appeal of administration to citizens

  • Animal Ear Tags : पशुधनाला इयर टॅगिंग करा, पशुसंवर्धन विभागाचे आवाहन

    Animal Ear Tags : पशुधनाला इयर टॅगिंग करा, पशुसंवर्धन विभागाचे आवाहन

    Animal Ear Tags राज्यातील सर्व पशुंना टॅगिंग करून त्याची नोंद भारत पशुधन प्रणालीवर घेणे बंधनकारक करण्याबाबतचा शासन निर्णय निर्गमित झाला आहे. सदरील शासन निर्णयानुसार जिल्ह्यातील सर्व पशुपालक, शेतक-यांकडे असलेल्या सर्व पशुधनाच्या कानात इअर टॅगिंग करून त्यांची नोंदणी भारत पशुधन प्रणालीवर करणे आवश्यक आहे.

     

    अवश्य वाचा – चंद्रपुरात अतिक्रमण हटाव मोहिमेला सुरुवात

    Animal Ear Tags तसेच दिनांक 1 जून 2024 नंतर इअर टॅगिंग शिवाय पशुधनाची खरेदी व विक्री करण्यास प्रतिबंध करण्यात आला असून त्याची नोंद भारत पशुधन प्रणालीवर असल्याशिवाय  खरेदी विक्री करता येणार नाही. तसेच पशुधनास पशुवैद्यकीय दवाखान्यामधून पशुवैद्यकीय सेवा दिली जाणार नाही.

    अवश्य वाचा : चंद्रपुरात काळा दिवस

    Animal Ear Tags जाणीवपूर्वक नष्ट केलेल्या पशुधनाची इअर टॅगिंग व त्याची नोंद भारत पशुधन प्रणालीवर असल्याशिवाय त्यांना केंद्र व राज्य शासनाकडून देय असलेले अर्थिक सहाय्य मिळणार नाही. नैसर्गिक आपत्ती, विजेचा धक्का तसेच वन्य पशुंच्या हल्यामुळे मृत्युमुखी पडलेल्या पशुधनास इअर टॅगिंग केलेली नसल्यास नुकसान भरपाईची रक्कम मिळणार नाही. पशुधनाची वाहतुक इअर टॅगिंग असल्याशिवाय करता येणार नाही. तसे केल्यास पशुधनाचे मालक व वाहतुकदार यांच्यावर नियमानुसार कार्यवाही करण्यात येईल.

     

     

    Animal Ear Tags इअर टॅगिंग नसलेल्या पशुधनाची बाजार समित्या, आठवडी बाजार व गावागावातील खरेदी विक्री करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. त्यामुळे इअर टॅगिंग नसलेले  पशुधन बाजार समिती मध्ये आणले जाणार नाहीत व त्यांची खरेदी विक्री होणार  नाही, याची दक्षता संबंधीत बाजार समितीने घ्यावी. पशुधनाच्या मालकी हस्तांतरण बाबतच्या नोंदी संबंधित पशुवैद्यकीय अधिकाऱ्याकडून त्वरीत अद्यावत करुन घेण्याची  जबाबदारी संबंधीत पशुपालकाची राहील.

     

     

    त्यामुळे जिल्ह्यातील सर्व पशुपालकांनी आपल्याकडे  असलेल्या सर्व पशुधनास संबंधीत पशुवैद्यकीय संस्था प्रमुखांशी संपर्क करुन इअर टॅगिंग करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. मंगेश काळे  व जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. उमेश हिरुडकर यांनी केले आहे. Animal Ear Tags

  • Chandrapur mahanagar Palika : चंद्रपूर मनपाची मान्सूनपूर्व तयारी

    Chandrapur mahanagar Palika : चंद्रपूर मनपाची मान्सूनपूर्व तयारी

    Chandrapur mahanagar Palika चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या वतीने मान्सूनपूर्व नाले स्वच्छता मोहिमेची सुरवात करण्यात आली असुन गाळ किंवा कचऱ्यामुळे मोठ्या नाल्यातील पाणी अडणार नाही याची दक्षता घेण्यात येत आहे.

    अवश्य वाचा : चंद्रपुरात अतिक्रमण हटाव मोहिमेला सुरुवात

    Chandrapur mahanagar Palika   भारतीय हवामान खात्याने यावर्षी सरासरीहून अधिक पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. तसेच हवामान बदलांमुळे ठिकठिकाणी अवकाळी पाऊस पडत असल्याचे लक्षात घेऊन महापालिका आयुक्त तथा प्रशासक विपीन पालीवाल यांच्या मार्गदर्शनानुसार पावसाळापूर्व गटार सफाई कामे लवकरच एप्रिल महिन्यापासुन सुरु करण्यात आलेली आहेत.

    सविस्तर वाचा : 15 आरोपी, 1 कोटींचा मुद्देमाल, स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई

    Chandrapur mahanagar Palika अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील व उपायुक्त मंगेश खवले यांच्या प्रत्यक्ष नियंत्रणात सफाई मोहिम सुरु असुन १२० सफाई कर्मचारी, ३ जेसीबी, २ पोकलेन, गाळ वाहतुकीसाठी ६ ट्रॅक्टरद्वारे नैसर्गिक मोठ्या नाल्यांच्या साफसफाईची कामे तसेच बंदिस्त गटारे साफसफाईची कामे करण्यात येत आहेत.

     

    नाले स्वच्छता अभियानाअंतर्गत नाल्यांची रूंदी व खोली पूर्णपणे स्वच्छ करून पावसाळी पाणी वाहण्याकरिता सुरळीत प्रवाह करण्यात येत असुन याद्वारे वाहणाऱ्या पाण्याची क्षमता वाढेल आणि नाल्यांच्या काठावर असलेल्या वस्त्यांत पावसाळ्यात येणाऱ्या पूरापासून सुरक्षा प्रदान होईल.

     

     

    शहरातील मोठ्या नाल्यांची तसेच लहान नाल्यांची साफ सफाई सुरू असून, मनुष्यबळ व जेसीबीच्या मदतीने गाळ आणि कचरा बाहेर काढण्यात येत आहे. तसेच नाल्याभोवती वाढलेली झाडेझुडपी व नाल्यातील दगड बाहेर काढून सांडपाण्याला वाट काढून दिली जात आहे.

  • Removel of Encroachment : चंद्रपुरात आजपासून अतिक्रमण हटाव मोहिमेची सुरुवात

    Removel of Encroachment : चंद्रपुरात आजपासून अतिक्रमण हटाव मोहिमेची सुरुवात

    Removel of Encroachment चंद्रपूर शहरातील विविध भागात अतिक्रमणाचे जाळे वाढल्याने शहरात पार्किंग चा पर्याय उरला नसल्याने वाहतूक सेवेत अडथळा निर्माण होत आहे, मात्र आता काही दिवसात नागरिकांना वाहने नियोजित ठिकानी पार्क करण्यासाठी समस्येचा सामना करावा लागणार नाही.

    अवश्य वाचा : चंद्रपुरातील राक्षस

    याकरिता चंद्रपूर वाहतूक विभाग, शहर पोलीस विभाग व चंद्रपूर मनपाने कंबर कसली असून रखरखत्या उन्हात अतिक्रमण काढण्याचे काम 2 मे पासून सुरू करण्यात आले आहे. Removel of Encroachment

    अवश्य वाचा – RTE च्या नियमात बदल का?

    चंद्रपूर वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक प्रवीण पाटील व पोलीस उपनिरीक्षक सुधीर जाधव यांच्या नेतृत्वात मुख्य मार्गावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते बिनबा गेट या मार्गावरील अतिक्रमण हटाव मोहीम आज राबविण्यात आली. Removel of Encroachment

    यावेळी पोलीस निरीक्षक पाटील म्हणाले की शहरात वाहने पार्क करण्यासाठी नागरिकांना अतिक्रमण मुळे अडथळा निर्माण होत आहे, त्याकरिता शहरात ज्या ठिकाणी अतिक्रमनाने विळखा घातलाय त्याठिकाणी आम्ही सदर अतिक्रमण हटविण्याची मोहीम सुरू केली आहे. पुढच्या 15 दिवसात शहरातील पार्किंग व्यवस्थेत बदल बघायला मिळेल.

  • Cattle mafia chandrapur : चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई

    Cattle mafia chandrapur : चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई

    Cattle mafia chandrapur चंद्रपुर जिल्ह्यातील अवैध धंद्यावर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी स्थानिक गुन्हे शाखेला आदेश दिले होते.

    अवश्य वाचा : महाराष्ट्र दिनी चंद्रपुरात पाळला काळा दिवस

    आदेशाचे अंमलबजावणी करताना स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांनी विविध पथक तयार करीत जिल्ह्यातील अवैध धंदे बंद करण्यासंबंधीने निर्देश दिले. Cattle mafia chandrapur

     

    1 मे महाराष्ट्र दिनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गोपनीय माहिती मिळाली की मोठ्या प्रमाणात गोवंश कत्तलीकरिता तेलंगणा राज्यात जाण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातून वाहतुक होणार आहे.

    बातमी आपल्या कामाची : चंद्रपूर पोलिसांनी केला समाजमाध्यमाचा योग्य वापर आणि हरवलेला मुलगा अवघ्या 3 तासात सापडला

    माहितीच्या आधारे पोलिसांनी मौजा हिरापूर येथील शेत शिवारात धाड मारली, त्याठिकाणी क्षमतेपेक्षा जास्त प्रमाणात तब्बल 7 वाहनात एकूण 150 गोवंश अवैधरित्या क्रूरतेने हात-पाय बांधून त्यांना कोंबले होते. Cattle mafia chandrapur

     

    7 वाहनातील 150 गोवंश ला बाहेर काढत त्यांची सुटका करीत नगरपालिका राजुरा येथील कोंडवाड्यात जमा करण्यात आले.

     

    पोलिसांनी या प्रकरणी अब्दुल अजीज अब्दुल सहित तब्बल 15 आरोपींवर गुन्हे दाखल केले आहे, स्थानिक गुन्हे शाखेने या कारवाईत एकूण 1 कोटी 30 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपीना पुढील तपासकामी गडचांदूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. Cattle mafia chandrapur

     

    सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांच्या नेतृत्वात सहायक पोलिस निरीक्षक हर्षल एकरे, पोलीस उपनिरीक्षक विनोद भुरले, पोलीस कर्मचारी धनराज, स्वामीदास, अजय, प्रकाश, नितीन, सुभाष, किशोर, रजनीकांत, दिनेश, संतोष व प्रशांत यांनी केली आहे.

  • Amma Ka Tiffin : जिल्हा सामान्य रुग्णालयातील कामगारांना मिळाला अम्मा का टिफिन

    Amma Ka Tiffin : जिल्हा सामान्य रुग्णालयातील कामगारांना मिळाला अम्मा का टिफिन

    Amma Ka Tiffin 1  मे कामगार दिनानिमित्त आमदार किशोर जोरगेवार यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयातील कामगारांची भेट घेत संवाद साधला. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी कामगारांच्या अडचणी समजून घेत त्या सोडविण्याच्या सुचनाही उपस्थित अधिका-यांना केल्या आहे.

    चंद्रपुरातील कॅन्सर माफिया : कॅन्सर माफिया ‘हनुमान” अडकला LCB च्या जाळ्यात

    यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर सोनारकर, माया आत्राम, राष्ट्रीय फ्लोरेंस नाइटिंगेल अवार्ड प्राप्त नर्सिंग अध्यापिका पुष्पा पोडे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. Amma Ka Tiffin

     

    आज महाराष्ट्र दिन आणि कामगार दिना सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. दरम्यान आमदार किशोर जोरगेवार यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात जात येथे रुग्ण सेवा देत असलेल्या कंत्राटी कामगारांची भेट घेतली. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी कामगारांच्या समस्या समजून घेतल्या. Amma Ka Tiffin

     

    कामगारांशी शिवाय कोणताही विकास शक्य नाही. यातही रुग्णालयात रुग्ण सेवा देत असलेले कामगार हे ईश्वरीय कार्य करत आहे. रुग्णालयात येणा-या व्यक्ती हा दुखात असतो. त्यामुळे आपण अशांसोबत सौजन्यपूर्ण वागुन त्यांच्या चेह-यावर हसु फुलविण्याचे काम आपल्या माध्यमातून अपेक्षित असल्याचे ते यावेळी म्हणाले. येथील सुरक्षा रक्षकांची गार्ड बोर्ड मध्ये नोंद करण्यात यावी, कर्मचा-यांसाठी येथे पाळणाघर तयार करण्यात यावे, कामगारांना नियमित वेतन देण्यात यावे अशा सुचना त्यांनी यावेळी केल्या आहे. Amma Ka Tiffin

     

    रुग्णालय प्रशासनानेही येथील कामगारांशी आदराने वागावे असेही ते यावेळी म्हणाले. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी कामगारांना अम्मा का टिफिन भेट स्वरुप दिला. यावेळी कामगार वर्गाची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

  • Chandrapur tobacco smuggler : बाबूपेठ मधील हनुमान अडकला LCB च्या जाळ्यात

    Chandrapur tobacco smuggler : बाबूपेठ मधील हनुमान अडकला LCB च्या जाळ्यात

    Chandrapur tobacco smuggler चंद्रपूर पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी स्थानिक गुन्हे शाखेला अवैध धंद्यावर अंकुश आणावे यासाठी आदेश दिले आहे.

     

    पोलीस अधीक्षकांच्या आदेशाची अंमलबजावणी करताना पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांनी विविध पथके नेमत जिल्ह्यातील अवैध धंद्यावर संक्रात आणण्याचे काम सुरू केले आहे. Chandrapur tobacco smuggler

     

    30 एप्रिलला रात्री च्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गोपनीय माहिती मिळाली की बाबूपेठ येथे तंबाखू तस्कर हनुमान आंबटकर यांनी आपल्या घरी सुगंधित तंबाखूचा साठा विक्री साठी आणला आहे. Chandrapur tobacco smuggler

     

    माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेने हनुमान च्या घरी धाड मारीत त्याच्या घरून ईगल हुक्का, होला हुक्का, मजा सुगंधित तंबाखूचा साठा एकूण किंमत 3 लाख 89 हजार 870 रुपये जप्त केला.

     

    हनुमान ची चौकशी केली असता त्याने सांगितले की हा माल रयतवारी कॉलरी येथील अमरदीप गुप्ता यांच्याकडून आणला आहे. Chandrapur tobacco smuggler

     

    स्थानिक गुन्हे शाखेने हनुमान आंबटकर व अमर दीप गुप्ता यांच्यावर रामनगर पोलीस ठाण्यात अन्न सुरक्षा मानके कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.
    सदरची कारवाई पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक हर्षल एकरे, पोलीस उपनिरीक्षक विनोद भुरले, किशोर वैरागडे, रजनीकांत पुठ्ठावार, सतीश अवथरे यांनी केली.

     

    कोण आहे हनुमान?

    चंद्रपूर शहरातील बाबूपेठ परिसरात मराठा चौकात राहणारा हनुमान आंबटकर हा अनेक वर्षांपासून सुगंधित तंबाखू चा व्यवसाय करीत आहे, काही वर्षांपूर्वी शहर पोलिसांनी कारवाई केली होती, आता तंबाखू विकणे सहज व्हावे यासाठी हनुमान होलसेल किराणा दुकान टाकत त्याने पुन्हा व्यवसायाला भरारी देण्याचे काम केले, मराठा चौक व आता गन्नूरवार चौकात त्याने होलसेल चे दुकान थाटले आहे.

     

    बाबूपेठ परिसरातील अनेक पान ठेला व्यवसायिकांना हनुमान सुगंधित तंबाखू पुरवतो, या तंबाखूचे खर्रा मार्फत अनेक युवकांना व्यसन जडले आहे, त्या व्यसनाचे रूपांतर आता कॅन्सर आजारात होत आहे, जिल्ह्यातील जयसुख, वसीम, गुप्ता आणि हनुमान हे सर्व व्यावसायिक काही पैश्यासाठी प्रतिबंधित तंबाखूचा व्यापार करीत भविष्यातील तरुण पिढीला कॅन्सर च्या खाईत ढकलण्याचे काम करीत आहे.

    मात्र शहर पोलिसांच्या हद्दीत असलेल्या या माफियावर कठोर कारवाई का होत नाही? तंबाखू तस्करी करताना इतका साठा हनुमान आणत असतो तर त्याला आशीर्वाद कुणाचा आहे? हे सुद्धा वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी शोधायला हवं.

  • Demand for independent Vidarbha state : चंद्रपुरात महाराष्ट्र दिनाला काळा दिवस आंदोलन

    Demand for independent Vidarbha state : चंद्रपुरात महाराष्ट्र दिनाला काळा दिवस आंदोलन

    Demand for independent Vidarbha state 1 मे महाराष्ट्र दिन राज्यात उत्साहाने साजरा करण्यात येत आहे तर दुसरीकडे चंद्रपुरात 1 मे च्या दिवशी काळा दिवस पाळला गेला.

     

    अवश्य वाचा : RTE नियमाबाबत आप चा राज्य सरकारला सवाल

    विदर्भ राज्य आंदोलन समितीचे संयोजक व माजी आमदार वामनराव चटप यांच्या नेतृत्वात जटपूरा गेट येथे हाताला काळी फित लावून काळा दिवस पाळला गेला. Demand for independent Vidarbha state

     

     

    या निदर्शने आंदोलनात माजी आमदार चटप यांनी प्रतिक्रिया देत म्हटले की महाराष्ट्र राज्यात सुख शांती आहे मात्र विदर्भाच्या वाट्याला सिंचनाचा अनुशेष, शेतकऱ्याच्या आत्महत्या, प्रदूषणाची मार आली आहे, सध्या लोकसभा निवडणूक सुरू आहे. Demand for independent Vidarbha state

    4 जून नंतर केंद्रात नवं सरकार स्थापन होईल आमची त्यांना एकच मागणी राहणार शपथ घेतल्यावर प्रथम काम स्वतंत्र विदर्भ राज्य निर्मितीची घोषणा करावी, आजचे आमचे आंदोलन हे स्थापन होणाऱ्या नव्या सरकार ला इशारा आहे.