Blog

  • Drugs in Chandrapur : शहरातील बाबूपेठ भागात अंमली पदार्थ? आपचे पोलीस प्रशासनाला निवेदन

    Drugs in Chandrapur : शहरातील बाबूपेठ भागात अंमली पदार्थ? आपचे पोलीस प्रशासनाला निवेदन

    Drugs in Chandrapur चंद्रपूर – चंद्रपूर शहरातील सर्वात मोठा प्रभाग म्हणजेच बाबूपेठ मात्र या भागात सध्या गुन्हेगारी फोफावत आहे, याला कुठेतरी आळा घालण्याची गरज आहे. मात्र तसे काही होताना दिसत नसल्याने आप ने याविरोधात आवाज उठविला आहे.

    https://ads.timesdiginews.com/2024/06/bamboo-research-and-training-centre-chandrapur/

    या भागात दिवसाढवळ्या रेती चोरी होत आहे इतकेच नाही तर अंमली पदार्थ सेवन करणारे अल्पवयीन मुले घरफोड्या करत आहे. घरासमोरील वाहने चोरीला जात आहेत. सध्या शहरातील गुन्हेगारीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असतांना कोणाचेही याकडे लक्ष नाही. पोलिसांनी याकडे तातडीने लक्ष पुरविणे गरजेचे आहे. याबाबत आपचे युवा नेते राजू कुडे यांनी स्थानिक रामनगर पोलिस स्टेशनला एक निवेदन सादर केले आहे.

    बाबूपेठ परिसरातील काही भागात चोरी, अंमली पदार्थांची तस्करी असे अनेक अवैध उद्योग फोफावत आहे, मात्र त्याकडे प्रशासनाचे लक्ष नाही, जर आज यावर आवाज उचलला नाही तर येणाऱ्या काळात परिस्थिती हाताबाहेर निघून जाणार.

    मात्र आप युवा जिल्हाध्यक्ष राजू कुडे यांनी सदर प्रकरणाची गांभिर्यता लक्षात घेत त्याबाबत सखोल माहिती जाणून घेत पोलीस प्रशासनाला याबाबत माहिती व्हावी व प्रशासनाने काहीतरी कारवाई यावर करावी असे निवेदन त्यांनी प्रशासनाला दिले आहे.

    पोलीस प्रशासन हा विषय कसा हाताळणार यावर बाबूपेठ येथील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

    अवश्य वाचा – PM विश्वकर्मा मार्गदर्शन कार्यक्रम

    Drugs in Chandrapur शहरातील गुन्हेगारीला तातडीने आळा घालण्याची मागणी त्यांनी सादर केलेल्या निवेदनातुन केली आहे. निवेदन देते वेळी आपचे युवा जिल्हाध्यक्ष राजू कुडे, वाहतूक महानगरचे अध्यक्ष जयदेव देवगडे, जिल्हा उपाध्यक्ष अनुप तेलतुबडे, अल्पसंख्याकचे अध्यक्ष जावेद सय्यद, व प्रशांत रामटेके उपस्थित होते.

  • Bamboo Research and Training Centre : बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राला देशातील अग्रगण्य संस्था बनविणार – सुधीर मुनगंटीवार

    Bamboo Research and Training Centre : बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राला देशातील अग्रगण्य संस्था बनविणार – सुधीर मुनगंटीवार

    Bamboo Research and Training Centre बांबू क्षेत्रात संशोधन प्रशिक्षण आणि कौशल्य विकासासाठी असलेली चिचपल्ली (जि.चंद्रपुर) येथील बीआरटीसी ही देशात एकमेव संस्था आहे. संशोधनासोबतच रोजगाराभिमुख प्रशिक्षण देऊन सामान्य नागरिकांचे जीवनमान उंचावणे, हे या संस्थेचे प्रमुख उद्दिष्ट आहे. बांबू तसेच उद्योग क्षेत्रात चालना देणारी देशातील ही एक अग्रगण्य संस्था म्हणून नावारूपास नक्की येईल, असा विश्वास राज्याचे वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.

    अवश्य वाचा : टायगर अभि जिंदा है, सुधीर मुनगंटीवार असं का म्हणाले?

    वन अकादमी येथे बांबू संशोधन व प्रशिक्षण संस्थेचा (बीआरटीसी) आढावा घेताना ते बोलत होते. यावेळी प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा वनबल प्रमुख शैलेश टेंभुर्णीकर, ताडोबा – अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्रीय संचालक डॉ. जितेंद्र रामगावकर, बांबू संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे संचालक अशोक खडसे, उपवनसंरक्षक श्वेता बोड्डू, कार्यकारी अभियंता सुनील कुंभे, मुकेश टांगले, भूषण येरगुडे, अपर संचालक मनिषा भिंगे, डॉ. मंगेश गुलवाडे, प्रकाश धारणे आदी उपस्थित होते.

    Bamboo Research and Training Centre 4 डिसेंबर 2014 रोजी बांबू संशोधन व प्रशिक्षण संस्थेची निर्मिती झाली असून राज्याच्या वनविभागाची ही एक स्वायत्त संस्था आहे, असे सांगून वनमंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले, जिल्ह्यात ताडोबा – अंधारी हा जगप्रसिद्ध व्याघ्र प्रकल्प आहे. ताडोबातील बफर झोनमधील शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीच्या अर्ध्या क्षेत्रात अनुदानावर बांबू लागवडीसाठी प्रवृत्त करावे. सोबतच भाजीपाला क्लस्टर सुद्धा देता येईल का, याचा विचार करावा.

    या संस्थेतील फायर फायटिंग व्यवस्था अतिशय अत्याधुनिक, तंत्रशुद्ध व अचूक असावी. सादरीकरणांमध्ये ज्या बाबी ठरविण्यात आल्या आहेत, त्याचे प्रमुख उद्दिष्ट ठरविणे अत्यंत गरजेचे आहे. याबाबत सविस्तर आराखडा तयार करून टाटा ग्रुप, अदानी ग्रुप, दालमिया यांच्याशी सुद्धा बांबू उत्पादनाबाबत चर्चा करावी. सोबतच बांबू लागवड आणि उत्पादनासाठी लघु व सूक्ष्म उद्योग (एम. एस. एम. ई.)अंतर्गत काही नियोजन करता येते, का त्याचा सुद्धा अधिकाऱ्यांनी अभ्यास करावा. बांबू लागवड, उत्पादन व त्यातून कौशल्य विकास या संदर्भात पीएम विश्वकर्मा योजनेत या बाबींचा समावेश करण्यासाठी नियोजन करावे, अशा सूचना वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या.

    Bamboo Research and Training Centre यावेळी प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा व वनबल प्रमुख शैलेश टेंभुर्णीकर म्हणाले, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने देशात बांबू संशोधन व प्रशिक्षण संस्था (बीआरटीसी) ही भारतात एकमेव संस्था उभी राहिली आहे. प्रशिक्षणासोबतच शिक्षण, त्याचे सादरीकरण त्यातून रोजगार याबाबतीत ही संस्था देशपातळीवर नावारूपास येणे गरजेचे आहे. राज्यातील शेतकऱ्यांना सुद्धा या संस्थेमध्ये बांबू विषयक प्रशिक्षण देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

     

    सादरीकरणात बीआरटीसी चे संचालक अशोक खडसे म्हणाले, समाज, नागरिक आणि उद्योगांच्या प्रगतीसाठी बांबूक्षेत्रात स्वयंरोजगार निर्माण करणे, हे या संस्थेचे प्रमुख उद्दिष्ट आहे. बीआरटीसी अंतर्गत बांबू टेक्नॉलॉजी मध्ये डिप्लोमा, शेतकऱ्यांना प्रशिक्षण आणि बांबू व्होकेशनल ट्रेनिंग देण्यात येत आहे. सोबतच महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) च्या सहकार्याने सहा ठिकाणी सुविधा केंद्र (सीएफसी) सुरू करण्यात आले आहे. तसेच पोंभूर्णा येथे बांबूपासून अगरबत्ती निर्मिती युनिट सुद्धा कार्यान्वित करण्यात आले आहे. बांबू पासून निर्माण करण्यात आल्या वस्तूंची विक्री चंद्रपूर, मोहर्ली, कोलारा आणि बल्लारपूर येथे होत आहे.

     

    भविष्यात येथे विविध प्रशिक्षण आयोजित होणार असल्यामुळे वसतिगृहाची निर्मिती, इंडक्शन किचनसाठी इलेक्ट्रॉनिक वस्तू, आग प्रतिबंधक व्यवस्था व त्याची देखभाल दुरुस्ती, पाणी शुद्धीकरण प्रकल्प, इंटरनेट आणि वायफाय सुविधा, डिजिटल लॅब, टिशू कल्चर लॅब, ऑडिटोरियम, सौर ऊर्जा व्यवस्था, वाहतुकीसाठी 30 आसन व्यवस्थेची बस, परिसरात सादरीकरणासाठी डिस्प्ले युनिट्स, एक्जीबिशन हॉल, आरोग्य केंद्र, क्रीडा सुविधा, कंप्यूटर लॅब, लायब्ररी, आदींचा विस्तार करण्यात येणार आहे.

    Bamboo Research and Training Centre सन 2017 पासून डिप्लोमा इन बांबू टेक्नॉलॉजी अंतर्गत विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येत असून जून 2024 पासून विद्यार्थी क्षमता 30 करण्यात आली आहे. सन 2023 – 24 मध्ये बांबू निर्मिती, हॅंडीक्राफ्ट आणि कौशल्य विकास, फर्निचर बनविणे, निवासी व अनिवासी शेतकरी प्रशिक्षण, बांबूपासून ज्वेलरी, बास्केट, आदी संदर्भातील 17 प्रशिक्षण वर्ग घेण्यात आले असून यात 516 नागरिक सहभागी झाले होते. आगामी काळात नवीन फॉरेस्ट गार्ड साठी बांबूबाबत मूलभूत प्रशिक्षण, विदर्भ आणि राज्यस्तरावरची कार्यशाळा, बांबू क्षेत्रातील उत्कृष्ट कारागीर आणि तज्ञांद्वारे कॉन्फरन्स, व्होकेशनल ट्रेनिंग, शेतकरी ट्रेनिंग आदी घेण्याचे नियोजन आहे, असे अशोक खडसे यांनी सांगितले.

     

    बॉटनिकल गार्डनच्या नियामक मंडळाची सभा : विसापूर येथे असलेल्या श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी बॉटनिकल गार्डनच्या नियामक मंडळाची सभा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी प्रस्तावित बाबींना मान्यता देऊन उर्वरित कामे त्वरित पूर्ण करण्याचे निर्देश वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले. बॉटनिकल गार्डनबाबत क्षेत्रीय संचालक डॉ. जितेंद्र रामगावकर यांनी सादरीकरण केले.

  • PM Vishwakarma Yojana 2024 :  कुशल कामगारांच्या उज्ज्वल भविष्यासाठी महत्त्वाचे पाऊल – आमदार किशोर जोरगेवार

    PM Vishwakarma Yojana 2024 : कुशल कामगारांच्या उज्ज्वल भविष्यासाठी महत्त्वाचे पाऊल – आमदार किशोर जोरगेवार

    PM Vishwakarma Yojana 2024 शासनाच्या अनेक योजना आहेत. मात्र त्या शेवटच्या गरजू घटकापर्यंत पोहोचविण्याचे मोठे आव्हान राहिले आहे. परिणामी अनेक पात्र लाभार्थी अशा समाजउपयोगी योजनांपासून वंचित राहत आहेत. मात्र सुतार (झाडे) समाजाने आज पीएम विश्वकर्मा योजना मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करत सदर योजनेचे फायदे समाजाला पटवून दिले आहेत. हे आयोजन नक्कीच समाजातील कुशल कामगारांच्या उज्ज्वल भविष्यासाठीचे महत्त्वाचे पाऊल ठरेल असे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.

    https://ads.timesdiginews.com/2024/06/minister-sudhir-mungantiwar-ballarpur-victory-meeting/

        सुतार (झाडे) समाज महासंघ आणि महाराष्ट्र राज्य विश्वकर्मीय सुतार समाज समन्वय समिती तसेच महासंघांतर्गत महासंघ सखी व युवा मंच यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकच्या सभागृहात सुतार (झाडे) समाज आर्थिक महामंडळ तसेच पीएम विश्वकर्मा योजना मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी आ. जोरगेवार बोलत होते. या कार्यक्रमाला सेवा निवृत्त को-ऑपरेटिव्ह अधिकारी माणिकराव गहोकर, माजी प्रादेशिक व्यवस्थापक राजेंद्र राजुरकर, मेहकर विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. संजय रायमुलकर, विद्यानंद मानकर,  नारायण क्षीरसागर, मुकेश मुंजनकर, प्रदीप जानवे,  ज्योती राखुंडे, सतीश माणुसमारे, यांच्यासह इतर मान्यवरांची मंचावर उपस्थिती होती.

    अवश्य वाचा : धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी शासनाने सुरू केली ही महत्त्वाची योजना

                   यावेळी पुढे बोलताना आ. जोरगेवार म्हणाले की, सुतार समाज हा कष्टकरी समाज आहे. या समाजाच्या हाताला कला-कौशल्य आहे. मात्र आता नवी पिढी रोजगाराकडे वळल्याने ही अमूल्य संपत्ती नष्ट होत आहे. आपण उच्च शिक्षण घेतले पाहिजे. मात्र त्याचबरोबर आपला पारंपरिक व्यवसायही आपण केला पाहिजे. या व्यवसायाला नव्या तंत्रज्ञानाची जोड देत एका वेगळ्या पद्धतीने आपण आपल्यातील हस्तकलेचे कौशल्य जगासमोर नेले पाहिजे असे यावेळी आ. जोरगेवार म्हणाले.

    PM Vishwakarma Yojana 2024 प्रत्येक समाजाच्या विकासात आणि प्रगतीत कामगार, कारीगर आणि छोटे उद्योजक यांचे योगदान अनमोल असते. आपल्या देशातील विविध क्षेत्रातील कुशल कामगारांनी आपल्या कौशल्यांनी देशाची अर्थव्यवस्था बलशाली केली आहे. पीएम विश्वकर्मा योजना या सर्व कुशल कामगारांसाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. आपल्या कारीगरांना आणि कुशल कामगारांना त्यांचे कौशल्य अधिकाधिक विकसित करण्याची संधी देणे आणि त्यांना आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी बनवणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. आपल्या देशात विश्वकर्मा समाजाच्या पारंपारिक कौशल्यांचा विकास करण्यासाठी ही योजना महत्त्वपूर्ण आहे.

     

    या योजनेद्वारे आपल्या उत्पादनांचे ब्रँडिंग, आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख आणि जागतिक बाजारपेठेत त्यांना स्थान मिळवून देण्याचे काम केले जाते. ही योजना आपण समाजाच्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचविल्यास समाजातील कारीगर आणि कुशल कामगारांना एक नवीन दिशा मिळेल. त्यांना त्यांचे काम अधिक प्रभावीपणे करण्याची संधी मिळेल. आजचा हा मार्गदर्शन कार्यक्रम महत्त्वपूर्ण आहे.

    PM Vishwakarma Yojana 2024 या कार्यक्रमातून आपण या योजनेची माहिती आपल्या गावांमध्ये,  शहरांमध्ये आणि आपल्या परिवारांमध्ये पोहोचावी, त्यांना या योजनेत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करावे असेही यावेळी आमदार किशोर जोरगेवार म्हणाले. या कार्यक्रमाला समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

  • Minister sudhir mungantiwar : मुनगंटीवार यांना आराम हवा पण टायगर अभि जिंदा है – सुधीर मुनगंटीवार

    Minister sudhir mungantiwar : मुनगंटीवार यांना आराम हवा पण टायगर अभि जिंदा है – सुधीर मुनगंटीवार

    Minister sudhir mungantiwar मोदीजी पंतप्रधान होऊ नयेत यासाठी पाकिस्तानमध्ये लोक प्रार्थना करत होते. भारतातही काही लोक मुस्लीम, आदिवासी बांधवांमध्ये भीती निर्माण करण्याचा प्रयत्न करीत होते. काँग्रेसने खोट्या प्रचाराच्या सर्व मर्यादा ओलांडल्या. याच खोट्या प्रचाराच्या आधारावर काँग्रेसने देशात काही जागा जिंकल्या.

     

    पण काँग्रेसच्या गेल्या तीन निवडणुकांची बेरीजही २४० होत नाही. उलट जनतेने पुन्हा एकदा देशगौरव पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वातील भाजप आणि मित्र पक्षांना पूर्ण बहुमत दिले. मोदी सरकारचा हा विजयी शंखनाद देशाच्या सर्वांगीण विकासासाठी आहे, असे प्रतिपादन राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

    Sudhir mungantiwar bjp
    बल्लारपूर विजयी शंखनाद सभेत मार्गदर्शन करताना पालकमंत्री मुनगंटीवार

    Minister sudhir mungantiwar लोकसभा निवडणुकीत मोदी सरकारच्या सलग तिसऱ्या विजयानिमित्त उत्सव आयोजित करण्यात आला होता. यावेळी ना. श्री. मुनगंटीवार बोलत होते. या कार्यक्रमाला भाजपचे ज्येष्ठ नेते चंदनसिंग चंदेल, भाजपचे जिल्हाध्यक्ष हरिष शर्मा, भाजप नेते शिवचंद द्विवेदी, काशीनाथ सिंह, रणंजय सिंग, शिवसेना नेते कमलेश शुक्ला, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राकेश सोमाणी, महिला मोर्चा प्रदेश सरचिटणीस विद्याताई देवाळकर, महिला अध्यक्ष वैशालीताई जोशी, बल्लारपूर नगरपरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल वाघ यांच्यासह नीलेश खरबडे, मनीष पांडे, देवेंद्र वाटकर, प्रदेश सदस्य रेणुकाताई दुधे, आशीष देवतळे, राजूभाई दारी यांची प्रमुख उपस्थिती होती.

    अवश्य वाचा : कर्नाटक एमटा प्रशासन अखेर नरमले, प्रकल्पग्रस्तांच्या समस्या सुटणार

    ‘देशातील जनतेच्या मतदानरुपी आशीर्वादाने जननायक मा. श्री. नरेंद्रजी मोदी यांनी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. ७.१२ मिनिटांनी पंतप्रधान मोदीजी राष्ट्रपती भवनात शपथ घेण्यासाठी पुढे जात होते तेव्हा मला ताडोबातील वाघाची आठवण आली. एखाद्या वाघाप्रमाणे ते भासत होते. आणि हा सोहळा प्रत्यक्ष अनुभवण्याचे भाग्य मला लाभले,’ अशा भावना ना. श्री. मुनगंटीवार यांनी व्यक्त केल्या.

    Minister sudhir mungantiwar ते पुढे म्हणाले, ‘सरकार स्थापन झाल्याबरोबर सर्वांत पहिले आणखी ३ कोटी गरिबांना घरे देण्याचा निर्णय एनडीए सरकारने घेतला. तिकडे काँग्रेसने प्रचारात महिलांना ८ हजार ५०० रुपये खटाखट देण्याच्या घोषणा करून महिलांची फसवणुक केली. काही राज्यांमध्ये काँग्रेसने गॅरंटी कार्ड दिले. सरकार आले नाही तरी, आमचा खासदार निवडून आला तर आम्ही पैसे देऊ असे त्यात म्हटले.

     

    आता उत्तर प्रदेश, राजस्थानमध्ये जिथे काँग्रेसचे खासदार आले तिथे महिला फॉर्म ( गॅरंटी गार्ड )घेऊन पोहोचत आहेत आणि काँग्रेस नेते गायब आहेत. काँग्रेसचा हा खोटा चेहरा पुन्हा एकदा लोकांच्या पुढे आला’.भाजप सत्तेचे नाही सेवेचे राजकारण करते. त्यामुळे जेव्हा जेव्हा बल्लारपूरच्या जनतेने मला विधानसभेत पाठवले मी सेवेचा उद्देश ठेवला. कधी जात-पात-धर्म बघितला नाही. मदतीसाठी कुणी आला तर त्याचे काम बघितले. आताही नव्या ऊर्जेने कामाला लागणार आहे. गरिबांसाठी घरे, मालकी हक्काचे पट्टे अशा अनेक अपूर्ण विकासकामांना पूर्ण करणार आहे, असा निर्धारही ना. श्री. मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.

    ‘त्या’ मतदारांचे खूप खूप आभार
    ज्या ४ लाख ५६ हजार मतदारांनी जातीचे राजकारण, आरक्षणाच्या अफवांकडे दुर्लक्ष करून मला मतदान केले त्यांचे मी आभार मानतो. महायुतीच्याही सर्व नेत्यांचे, कार्यकर्त्यांचे मी आभार मानतो. कारण आपण एक कुटुंब होऊन लढलो आहोत, अशा भावनाही ना. श्री. मुनगंटीवार यांनी व्यक्त केल्या.

    ‘टायगर अभी जिंदा है’

    Minister sudhir mungantiwar निवडणूक जिंकून संसदेत गेलो असतो तर रेल्वे कोचचा कारखाना चंद्रपुरात आणण्याचा संकल्प होता. बल्लारपूर ते मुंबई व पुणे अशी थेट गाडी सुरू करण्याची मागणी करण्याचा संकल्प होता. मूर्ती येथील रखडलेले विमानतळ पूर्ण करण्याचा संकल्प होता. अशा अनेक गोष्टींचा विचार केला होता. पण मुनगंटीवार खूप काम करतात त्यांना थोडी आरामाची गरज आहे, असा विचार जनतेने केला असेल. पण जनतेच्या कामासाठी मला फरक पडत नाही कारण ‘टायगर अभी जिंदा है’, असेही ते म्हणाले.

    ‘मी थकणारा आणि थांबणारा नाही’
    लोकांचे प्रेम आजही कायम आहे. याच प्रेमाची ऊर्जा घेऊन काम करायचे आहे. ही निवडणूक विकासाच्या आधारावर नाही तर जातीच्या आधारावर झाली आहे. ही धोक्याची घंटा आहे. समाजात राजकीय कॅन्सर पसरण्याचे संकेत आहेत. या कॅन्सरचा समूळ नायनाट करून विकास करायचा आहे. पुन्हा एकदा शक्तीने काम सुरू करायचे आहे. मी थकलो नाही आणि थांबलोही नाही. शेवटच्या श्वासापर्यंत जनतेचे काम करायचे आहे, असेही ना. श्री. मुनगंटीवार म्हणाले.

    आरोग्य सुविधा केंद्राच्या इमारतीचे उद्घाटन
    विजयी उत्सव सभेपूर्वी बल्लारपूर शहरातील राणी लक्ष्मीबाई वॉर्ड येथे नागरी आरोग्य सुविधा केंद्र इमारतीच्या नूतनीकरणाच्या कामाचे ना. श्री. मुनगंटीवार यांच्या हस्ते उद्घाटन झाले. हे काम जिल्हा स्तरावरील नगरोत्थान योजनेतून २२ लक्ष रुपये खर्चातून पूर्ण करण्यात आले आहे. तसेच बल्लारपूर नगरपरिषद अग्निशमन विभागाला जिल्हा अग्निशमन योजनेतून मिळालेल्या अग्निशमन वाहनाचेही यावेळी लोकार्पण झाले. हे वाहन अरुंद गल्लीबोळातून जाण्यास सक्षम असल्याने आणीबाणीच्या प्रसंगी उपयुक्त ठरणार आहे.

  • Maharashtra swayam student yojana : आता विद्यार्थ्यांना दरवर्षी मिळणार 60 हजार रुपये, जाणून घ्या या योजनेबद्दल

    Maharashtra swayam student yojana : आता विद्यार्थ्यांना दरवर्षी मिळणार 60 हजार रुपये, जाणून घ्या या योजनेबद्दल

    Maharashtra swayam student yojana शासकीय वसतिगृहांमध्ये प्रवेश न मिळू शकलेल्या व उच्च शिक्षण घेणाऱ्या धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना भाड्याने खोली घेऊन राहण्यासाठी व जेवणासाठी पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयम् योजना ओबीसी कल्याण विभागाने सुरू केली आहे.

    https://ads.timesdiginews.com/2024/06/free-school-uniform-scheme-maharashtra-government/

    त्यानुसार विद्यार्थ्यांना वर्षाकाठी ६० हजार रुपयांपर्यंतची रक्कम दिली जाणार आहे. मुंबई शहर, उपनगर, नवी मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी-चिंचवड आणि नागपूरमध्ये राहून शिक्षण घेणाऱ्या धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना भोजन भत्ता वर्षाकाठी ३२ हजार रु., निवासी भत्ता २० हजार रु. आणि निर्वाह भत्ता ८ हजार रु. असे ६० हजार रुपये दिले जातील. 

     

    Maharashtra swayam student yojana इतर महसुली विभागीय शहरांतील उर्वरित क वर्ग महापालिका क्षेत्रांमध्ये भोजनभत्ता २८ हजार रु., निवास भत्ता १५ हजार रु. आणि निर्वाह भत्ता ८ हजार रु. असे ५१ हजार रुपये देण्यात येतील. इतर जिल्ह्यांच्या ठिकाणी ही रक्कम अनुक्रमे २५ हजार रु., १२ हजार रु. आणि ६ हजार रु. म्हणजे एकूण ४३ हजार रु. असेल. तालुक्याच्या ठिकाणी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही रक्कम अनुक्रमे २३ हजार रु., १० हजार रु. आणि ५ हजार रु. अशी ३८ हजार रु. असेल.

     

    Maharashtra swayam student yojana प्रत्येक जिल्ह्यातील ६०० विद्यार्थ्यांना म्हणजे राज्यातील २१ हजार विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ दिला जाईल.* त्यात व्यावसायिक शिक्षण घेणारे ७० टक्के विद्यार्थी, तर बिगरव्यावसायिक शिक्षण घेणारे ३० टक्के विद्यार्थी असतील. ६० टक्के गुणांसह १२ वीनंतरचे शिक्षण घेणाऱ्यांसाठी ही योजना लागू असेल. रक्कम विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात थेट जमा केली जाईल.

    सध्या कोणाला लागू?

    अनुसूचित जाती, जमातींच्या विद्यार्थ्यांसाठी स्वयम् योजना आधीपासूनच लागू करण्यात आली आहे. धनगर समाजातील उच्च शिक्षण घेऊ पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी स्वयम् योजना लागू करून महायुती सरकारने दिलेला शब्द पाळला आहे. या समाजातील विद्यार्थ्यांना हे एक मोठे प्रोत्साहनच असेल. – अतुल सावे, ओबीसी कल्याण मंत्री

  • Karnataka emta Coal Mines : कर्नाटक एमटा प्रशासन खासदार धानोरकर यांच्या आंदोलनानंतर नरमले

    Karnataka emta Coal Mines : कर्नाटक एमटा प्रशासन खासदार धानोरकर यांच्या आंदोलनानंतर नरमले

    Karnataka emta Coal Mines भद्रावती स्थित कर्नाटक एम्टामधील संचालक मंडळ व प्रकल्पग्रस्त शेतकरी यांच्यात मा. खासदार प्रतिभा धानोरकर, मा. जिल्हाधिकारी व मा. पोलिस अधिक्षक यांच्या प्रमुख उपस्थित आज बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या मान्य करीत असल्याचे कर्नाटक एम्टातील संचालक मंडळाने व अधिकाऱ्यांनी मान्य केले.

     

    Karnataka emta Coal Mines कर्नाटक एम्टा व बंराज मोकासा येथील प्रकल्पग्रस्तांच्या अनेक मागण्यांसाठी मागील दोन दिवसांपासून आंदोलन सुरु होते. या आंदोलना दरम्यान प्रकल्पग्रस्तांवर व पदाधिकाऱ्यावर गुन्हे देखील दाखल झाले. प्रकल्पग्रस्त शेतकऱ्याकडून कोळसा खान देखील बंद पाडण्यात आली.

     

    या सर्व आंदोलनाच्या अनुषंगाने खासदार प्रतिभा धानोरकर यांनी प्रकल्पग्रस्तांची बाजु घेत मा. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली एम्टातील संचालक मंडळ, अधिकारी व प्रकल्पग्रस्त शेतकरी यांच्यात नियोजन भवन येथे आज दि. 22 जुन रोजी बैठक घडवून आणली. सदर बैठकीत 2006 पासून प्रलंबित मागण्यांच्या संदर्भात चर्चा करण्यात आली.

     

    Karnataka emta Coal Mines यामध्ये प्रामुख्याने प्रकल्पग्रस्तांना नौकरी,  पुर्नवसन, शेतकऱ्याची नुकसान भरपाई या सर्व विषयाच्या अनुषंगाने मार्ग काढण्यात आला. यावेळी एम्टा मधील अधिकाऱ्यानी तात्काळ नोकरी व शेतकऱ्यांचे उर्वरित पैसे देण्याचे मान्य केले. त्यासोबतच अनुकंपातील नौकरीचा प्रश्न देखील प्राधान्याने सोडविण्याचे मान्य केले. मा. जिल्हाधिकारी यांनी कंपनीतील अधिकारी यांना जुलै महिन्यापर्यंत सर्व मागण्या मान्य करुन प्रकल्पग्रस्त शेतकऱ्याना न्याय देण्यात यावा असे तोंडी आदेश दिले.

    https://ads.timesdiginews.com/2024/06/mp-pratibha-dhanorkar-great-honor-in-chandrapur/

    मा.खासदार प्रतिभा धानोरकर यांनी संबंधीत कंपनीच्या अधिकाऱ्याना प्रकल्पग्रस्तांना न्याय देतांना कंपनीने गावकऱ्याना विश्वासात घेऊन संपुर्ण मागण्या पुर्ण कराव्या असे देखील सांगितले. यावेळी प्रकल्पग्रस्त गावातील सरपंचांनी मा. जिल्हाधिकारी यांच्या समक्ष गावकऱ्याच्या मागण्या मांडल्या. भविष्यात या मागण्या पुर्ण न झाल्यास अधिकाऱ्यानी संबंधीत कंपनीची गंभीर दखल घ्यावी अशी मागणी देखील उपस्थितांपैकी करण्यात आली.

    अवश्य वाचा : चंद्रपूर शहरात हवी 20 फूट उंच भिंत -aimim

    यावेळी कर्नाटक एम्टा संचालक मंडळाकडून आजवर अनेक आश्वासने चुकीचे दिले हे मान्य करुन भविष्यात प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या पुर्ण करणार असल्याचे सांगितले. यावेळी खासदार धानोरकर यांनी प्रकल्पग्रस्त शेतकरी व नागरीक जो निर्णय घेतील त्यांच्या सोबत आपण राहणार असल्याचे सांगितले. यावेळी मा. खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या सोबत मा. जिल्हाधिकारी, मा. पोलिस अधिक्षक, मा. पोलिस विभागीय अधिकारी, मा. तहसिलदार भद्रावती, कंपनीचे संचालक मंडळ व अधिकारी तसेच प्रकल्पग्रस्त गावातील सरपंच व शेतकऱ्याची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.

  • Kharif Crop Insurance scheme : खरिपातील पिकविम्याबाबत या गोष्टी लक्षात ठेवा

    Kharif Crop Insurance scheme : खरिपातील पिकविम्याबाबत या गोष्टी लक्षात ठेवा

    Kharif Crop Insurance scheme राज्यात सर्वत्र मान्सूनच्या पावसाने हजेरी लावली असून राज्यातील शेतकर्‍यांनी पेरण्या आणि लागवडीला सुरूवात केली आहे. यंदाच्या खरीप हंगामातील एकूण क्षेत्रापैकी जवळपास ५ टक्क्यांहून अधिक क्षेत्रावर पेरण्या झाल्या असून पेरण्या केलेल्या शेतकऱ्यांनी पीकविम्यासाठी अर्ज करण्यास सुरूवात केली आहे. पण पिकविम्यासाठी अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांनी बँक पासबुक आणि आधार कार्डसंदर्भात काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे.

    https://ads.timesdiginews.com/2024/06/mp-pratibha-dhanorkar-great-honor-in-chandrapur/

    दरम्यान, मागच्या खरीप हंगामात १ कोटी ७० लाख शेतकऱ्यांनी १ रूपयांत पीक विमा या योजनेचा लाभ घेतला होता. यावर्षीसुद्धा शेतकऱ्यांना १ रूपयांत पीकविमा या योजनेचा लाभ घेता येणार आहे. पिकविमा भरण्यासाठी pmfby.gov.in या संकेतस्थळावर जाऊन अर्ज करावा लागणार आहे. आपल्या जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रावर किंवा सीएससी केंद्रावर विम्यासाठी अर्ज करता येणार आहे.

     

    कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या?

    Kharif Crop Insurance scheme पिकविमा अर्ज करताना अर्जावरील नाव आणि आधारकार्डवरील नाव सारखं असायला पाहिजे. त्याशिवाय या अर्जाची प्रक्रिया पूर्ण होणार नाही. त्याचबरोबर राष्ट्रीयकृत बँकेच्या खात्यावरील नावसुद्धा आधारकार्डशी मिळतंजुळतं असायला पाहिजे. या खात्याला आधार कार्ड लिंक असायला हवे. तर शेतकऱ्यांनी लागवड केलेल्या पिकाची नोंदणी ई-पीकपाहणी करून घेणे गरजेचे आहे.

    महत्त्वाचे : वर्ग 1 ते 8 पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मिळणार मोफत पाठ्यपुस्तके

    आवश्यक कागदपत्रे – आधार कार्ड, बँक पासबुक, सातबारा, आठ अ, पीकपेरा स्वयंघोषणापत्र

    अर्ज करण्याची अंतिम मुदत – १५ जुलै

  • MP Pratibha Dhanorkar : ज्यांनी मला मतदान केलं नाही त्यांनी…खासदार प्रतिभा धानोरकर

    MP Pratibha Dhanorkar : ज्यांनी मला मतदान केलं नाही त्यांनी…खासदार प्रतिभा धानोरकर

    Mp pratibha dhanorkar राष्ट्रीय ओबीसी महासंघ, विमुक्त भटक्या जाती, जमाती व अनुसूचित जाती समाजाच्या वतीने 22 जून ला चंद्रपूर लोकसभेच्या नवनिर्वाचित खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या सत्कार कार्यक्रमाचे आयोजन प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सभागृहात करण्यात आले होते.

    अवश्य वाचा : आता विधानसभा निवडणुकीची तयारी, चंद्रपूर जिल्हा प्रशासन लागले कामाला

    आयोजित कार्यक्रमात राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे, महासचिव सचिन राजूरकर, आमदार सुधाकर अडबाले, जयदीप रोडे यांची मंचावर उपस्थिती होती.

    यावेळी राष्ट्रीय ओबीसी महासंघ व सर्व जाती जमतीतर्फे खासदार प्रतिभा धानोरकर यांचा सत्कार करण्यात आला.

    https://ads.timesdiginews.com/2024/06/congress-news-maharashtra-chandrapur-mud-movement/

    Mp pratibha dhanorkar यावेळी खासदार प्रतिभा धानोरकर म्हणाल्या की लोकसभा निवडणुकीत ओबीसी, एससी, एसटी सहित सर्व समाजाने मला भरभरून मदत केली, आज मी आपल्यासमोर एक गोष्ट सांगू इच्छिते की मी 18 लाख मतदारांची प्रतिनिधी आहे, ज्यांनी मला मतदान केलं व ज्यांनी मतदान केलं नाही त्यांनी आपल्या मनात कसलीही शंका न बाळगता माझ्याकडे काहीही काम असल्यास आवर्जून व हक्काने यावे.

     

    Mp pratibha dhanorkar आपल्या मनात असा विचार आणू नका की आपण मला मतदान केलं नाही तर मी आपलं काम करणार नाही, मी आपल्या सर्वांची प्रतिनिधी आहे, प्रत्येक नागरिकांचे काम करण्याचा अधिकार आपण मला दिला आहे. असे प्रतिपादन सत्कारमूर्ती खासदार धानोरकर यांनी यावेळी केले.

    आयोजित कार्यक्रमात असंख्य नागरिकांची उपस्थिती होती.

  • Amrit Water Supply Scheme : चंद्रपुरातील नागरिकांना अमृत कधी मिळणार? – शिरीजकुमार गोगुलवार

    Amrit Water Supply Scheme : चंद्रपुरातील नागरिकांना अमृत कधी मिळणार? – शिरीजकुमार गोगुलवार

    Amrit Water Supply Scheme कोट्यवधी रुपये खर्च करून महानगरपालिका प्रशासनाने चंद्रपूर शहरात अमृत जल योजना सुरू केली. योजनेच्या माध्यमातून संपूर्ण शहरात पाण्याची पाईप लाईन टाकण्याची व्यवस्था करण्यात आली. तरीसुद्धा शहराच्या अनेक भागात अमृत जल योजनेची पाईप लाईन पोहोचलीच नाही. आणि ज्या भागात पाईप लाईन पोहोचली त्या भागात कनेक्शन सुरू करण्यात आले नाही.

    https://ads.timesdiginews.com/2024/06/free-school-uniform-scheme-maharashtra-government/

    विशेषता: चंद्रपूर शहराच्या महाकाली कॉलरी ,बाबुपेठ व पठाणपूरा या प्रभागात अजूनही अमृत जल योजनेचे कनेक्शन् सुरू केले नाही. या प्रभागातील लोकांना पाण्यासाठी इतरत्र भटकावं लागत आहे. इतर कोणतेही पर्याय पाण्यासाठी या प्रभागात उपलब्ध नसल्यामुळे  बहुजन समाज पक्षाचे जिल्हा अध्यक्ष शिरीजकुमार गोगुलवार यांच्या नेतृत्वात तिन्ही प्रभागाच्या महिला मोठया संख्येने उपस्थित राहत चंद्रपूर शहर महानगरपालिकेचे आयुक्त विपीन पालीवाल यांना अमृतजल योजनेचे कनेक्शन महाकाली कॉलरी, बाबुपेठ व पठानपुरा या भागात लवकरात लवकर सुरू करण्याबबत चर्चा करण्यात आली , सकारात्मक चर्चे नंतर या समस्येसंबंधीचे निवेदन आयुक्त यांना देण्यात आले.

    अवश्य वाचा : चंद्रपूर शहराला पुरा पासून वाचवायचे असेल तर 20 फूट उंच भिंतिचे निर्माणकार्य करावे लागेल

    Amrit Water Supply Scheme यावेळी बहुजन समाज पक्षाचे चंद्रपूर शहराचे अध्यक्ष अमोल राहुलगडे, घुगुस शहराचे अध्यक्ष सिद्धांत कोंडागुर्ला, प्रशांत रामटेके, अखिल निमगडे इतर बसपा कार्यकर्ता व महाकाली कॉलरी, पठानपूरा व बाबुपेठ परिसरातील महिलांची मोठया संख्येने उपस्थिती होती.

  • elements of flood risk : चंद्रपुरात 20 फूट उंच दगडाच्या भिंतीचे निर्माण करा – AIMIM ची मागणी

    elements of flood risk : चंद्रपुरात 20 फूट उंच दगडाच्या भिंतीचे निर्माण करा – AIMIM ची मागणी

    Elements of flood risk पावसाळ्यात चंद्रपूर शहरातील काही भागात भयावह पुरजन्य स्थिती निर्माण होते, मात्र त्यावर आजपर्यंत काही उपाययोजना करण्यात आल्या नाही, दरवर्षी आलेल्या कृत्रिम पुराने नागरिकांचे नुकसान होते, त्यामुळे या कृत्रिम पुरापासून शहरातील काही भाग वाचवायचे असेल तर AIMIM ने प्रशासनाला 20 फूट उंच भिंत बांधण्याचा उपाय सुचविला आहे. याबाबत AIMIM ने जिल्हाधिकारी व मनपा आयुक्त यांना निवेदन सुद्धा दिले आहे.

    अवश्य वाचा : विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले चंद्रपूर जिल्हा प्रशासन

    Elements of flood risk शहरातील पठाणपुरा, सिस्टर कॉलोनी व रहमत नगर भागात पावसाच्या पाण्याने पूर येतो, त्यासाठी पठाणपुरा ते नदी पात्र पर्यंत गोंड कालीन किल्ल्यासारखी दगडाची तब्बल 20 फूट उंच भिंत बांधावी, जेणेकरून सदर भिंत पुराच्या पाण्याचा प्रवाह थांबविणार, कारण चंद्रपूर शहर हे गोंड कालीन किल्ल्याच्या आत वसलेलं आहे, किल्ल्याच्या भिंतीमुळे शहरात पुराचे पाणी शिरकाव करू शकत नाही.

    https://ads.timesdiginews.com/2024/06/railway-over-bridge-babupeth-mp-pratibha-dhanorkar/

    त्याप्रमाणे चंद्रपूर प्रशासनाने 20 फूट उंच ऐतिहासिक भिंतीचे बांधकाम करून नागरिकांना पुरापासून संरक्षण देण्याचे काम करावे अशी मागणी AIMIM जिल्हाध्यक्ष अमान अहमद व शहर अध्यक्ष अजहर शेख यांनी जिल्हाधिकारी व मनपा आयुक्त यांना केली आहे.