Blog

  • Stree Shakti Samvad Yatra : महिलांनी केला निर्धार संदीप गिर्हे आमचा आमदार

    Stree Shakti Samvad Yatra : महिलांनी केला निर्धार संदीप गिर्हे आमचा आमदार

    बल्लारपूर विधानसभा आम्ही लढणार व जिंकणार – माजी महापौर किशोरी पेडणेकर यांचा विश्वास

    Stree Shakti Samvad Yatra चंद्रपूर :- शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) चंद्रपूर महिला आघाडीच्या वतीने स्त्रि-शक्ती संवाद यात्रा निमित्ताने महिला मेळाव्याचे आयोजन मुबईच्या माजी महापौर तथा शिवसेना उपनेत्या किशोरीताई पेडणेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत दि. १९ सप्टेंबर रोजी बल्लारशाह येथील नाट्यगृहात पार पडला.
    यावेळी किशोरीताई पेडणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली बल्लारपुर विधानसभा क्षेत्रातील उपस्थित महिलांनी ‘ मशाल ‘ घरा-घरात पोहचवण्याचे वचन दिले.

    अवश्य वाचा : वडेट्टीवार यांच्यासमोर विधानसभा निवडणुकीत भाजपच्या हा नेता लढणार


    यावेळी किशोरी पेडणेकर मार्गदर्शन करताना म्हणाल्या राज्यात स्त्रि-अत्याचाराची प्रलंबित प्रकरणे आहेत,कायदा व सुव्यवस्था बिघडलेली आहे.मात्र महिला सुरक्षेचं सोडून सरकारने निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राबविण्यासाठी जाहिरातीवर अव्वाढव्य खर्च करून राज्याची तिजोरी लुटण्याचे काम केले आहे.अशा राजकीय स्वार्थी धोरणामुळे खरच स्त्रि-सुरक्षा अबाधित राखल्या जाणार आहे का? असा प्रश्न यावेळी या महाघातकी सरकारला कीशोरीताई पेडणेकर यांनी उपस्थित केला. (Stree Shakti Samvad Yatra)

    चंद्रपुरातील सहा विधानसभेतील बल्लारपुर विधानसभा मतदार संघासह आणखी एक विधानसभा मतदार संघ शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकरिता सुटतील असा प्रयत्न पक्षाकडून चालु असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.संदिप गिऱ्हे यांनी पक्षाचे संघटन मजबुत करण्यासाठी बल्लारपूर विधानसभा पिंजून काढत आहे.गिऱ्हे यांना युवक व महिलांची मोठी पसंती मिळत आहे.एवढेच नव्हे तर शहर व गावात संदिप गिऱ्हे यांना उमेदवारी देण्याच्या संबंधाने कार्यकर्ते कामाला लागले आहे.त्यामुळे येणाऱ्या बल्लारपूर विधानसभा निवडणुकीसाठी गिऱ्हे यांच्या सोबत कटिबध्द राहण्याचा संदेशही उपस्थित महिलांना पेडणेकर यांनी दिला. (Stree Shakti Samvad Yatra)

    शिवसेना जिल्हा प्रमुख संदिप गिऱ्हे यांनी महिलेच्या सुरक्षितेतचा प्रश्न उपस्थित करून सरकारने महिलेच्या सुरक्षितेसंबंधीत ठोस पाऊले उचलली नसल्याने आज महिलांना असुरक्षिततेची भावना निर्माण होत असल्याचे ते बोलत होते.या सरकारने फक्त जाहिरातबाजी व इव्हेंटवर करोडोचा खर्च करण्याचाच काम केला आहे. पण वाढती बेरोजगारी, महागाई, शेतकऱ्यांचे प्रश्न,महिलांची सुरक्षा, लोकांना शुद्ध पाणी, आरोग्य सेवा याकडे सरकारने पुर्णपणे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे अश्या सरकारला आपण हद्दपार करणे गरजेचे आहे.त्यामुळे बल्लारपूर विधानसभेतील सर्व महिलांनी हातात मशाल घेऊन क्रांती घडवून आणण्याची वेळ आली आहे असा निर्धार महिला मेळाव्यातून त्यांनी व्यक्त केला. (Stree Shakti Samvad Yatra)

    यावेळी ‘ स्त्रि-संवाद यात्रा ‘ महिला मेळाव्याला शिवसेना चंद्रपूर संपर्क प्रमुख प्रशांत कदम, चंद्रपूर जिल्हा संपर्क संघटिका सुषमा साबळे, महिला आघाडी संपर्क नेत्या सोनाली म्हात्रे,पक्ष निरीक्षक शालिनीताई सावंत,पक्ष निरीक्षक निधीताई शिंदे, नागपूर जिल्हा संपर्क संघटिका मंदाकिनीताई भावे, जिल्हा प्रमुख संदिपभाऊ गिऱ्हे, उपजिल्हा प्रमुख सिक्की यादव,महिला जिल्हाप्रमुख कल्पनाताई गोरघाटे, प्रमोद पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी हजारोच्या संख्येने महिलांची उपस्थिती होती.

  • Solar power project : रिन्यू एनर्जीने सोलर प्रोजेक्ट गुजरातला हलवण्याच्या योजना नाकारल्या

    Solar power project : रिन्यू एनर्जीने सोलर प्रोजेक्ट गुजरातला हलवण्याच्या योजना नाकारल्या

    Solar power project 15 हजार कोटींचा सौर ऊर्जा प्रकल्प गुजरातला हलविला असा दावा विरोधी पक्षाने केला मात्र त्या दाव्याचा फुगा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी फेटाळून लावत फोडला.

    Solar power project द रिन्यूने लेखी निवेदनात म्हटले आहे की, “महाराष्ट्र सरकारशी चर्चा अपूर्ण राहिल्याने किंवा उच्च वीज दरांमुळे आम्ही महाराष्ट्रात गुंतवणूक करणार नाही असे आम्ही सांगितलेले वृत्त पूर्णपणे खोटे आहे”.

    अवश्य वाचा : वाघाने केली गुराख्याची शिकार

    TLN टीमने 19 सप्टेंबर 2024 रोजी लिहिलेले
    सौर प्रकल्प गुजरातला हलवण्याबाबतचा नवा अहवाल रिन्यूने नाकारला, नागपुरातील प्रस्तावित 15,000 कोटी रुपयांचा सौरऊर्जा प्रकल्प गुजरातमध्ये हलवण्यात आल्याचे वृत्त रिन्यू कंपनीने फेटाळून लावले आहे. मीडियाच्या विभागात या संदर्भातील बातम्या खोट्या आणि दिशाभूल करणाऱ्या असल्याचा खुलासा कंपनीने केला आहे. Solar power project

    द रिन्यूने लेखी निवेदनात म्हटले आहे की, “महाराष्ट्र सरकारशी चर्चा अपूर्ण राहिल्याने किंवा उच्च वीज दरांमुळे आम्ही महाराष्ट्रात गुंतवणूक करणार नाही असे आम्ही सांगितलेले वृत्त पूर्णपणे खोटे आहे”.

    हे अहवाल केवळ दिशाभूल करणारे नाहीत तर अत्यंत बेजबाबदार आहेत. कंपनीने सांगितले.

    कंपनी स्टेटमेंटचे नूतनीकरण करा

    महाराष्ट्रात आम्ही गुजरातमध्ये नव्हे तर सौरउर्जेतील अपस्ट्रीम व्हॅल्यू चेनमध्ये गुंतवणूक करणार आहोत. नूतनीकरण ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी कंपनी आहे आणि आमची महाराष्ट्राशी बांधिलकी आहे. महाराष्ट्रात आम्ही 550 मेगावॅट क्षमतेची यंत्रणा बसवली असून आणखी 2000 मेगावॅटचे बांधकाम सुरू आहे. 2026 पर्यंतची ही योजना आहे, त्यासाठी 15,000 कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे. याशिवाय पंप स्टोरेज, ग्रीन डायहाइड्रोजन या क्षेत्रातही आम्ही काम करणार आहोत. राज्यात 30 हजार रोजगार निर्माण होतील. कंपनी महावितरणला स्पर्धात्मक दराने 550 मेगावॅट वीज पुरवत असून, सध्याचे प्रकल्प आणि आगामी प्रकल्पांच्या दृष्टीने आम्ही राज्यात 1 लाख कोटींची गुंतवणूक करणार आहोत. Solar power project

    महाराष्ट्रात आम्ही गुजरातमध्ये नव्हे तर सौरउर्जेतील अपस्ट्रीम व्हॅल्यू चेनमध्ये गुंतवणूक करणार आहोत. नूतनीकरण ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी कंपनी आहे आणि आमची महाराष्ट्राशी बांधिलकी आहे. महाराष्ट्रात आम्ही 550 मेगावॅट क्षमतेची यंत्रणा बसवली असून आणखी 2000 मेगावॅटचे बांधकाम सुरू आहे. 2026 पर्यंतची ही योजना आहे, त्यासाठी 15,000 कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे. याशिवाय पंप स्टोरेज, ग्रीन डायहाइड्रोजन या क्षेत्रातही आम्ही काम करणार आहोत. राज्यात 30 हजार रोजगार निर्माण होतील. कंपनी महावितरणला स्पर्धात्मक दराने 550 मेगावॅट वीज पुरवत असून, सध्याचे प्रकल्प आणि आगामी प्रकल्पांच्या दृष्टीने आम्ही राज्यात 1 लाख कोटींची गुंतवणूक करणार आहोत.

  • Tiger attack news : वाघाने केली गुराख्याची शिकार

    Tiger attack news : वाघाने केली गुराख्याची शिकार

    tiger attack news गुरू गुरनुले मूल : तालुक्यातील काटवन जंगलातील कक्ष क्र. ७५६ मध्ये शेळ्या चारण्या करीता गेलेल्या चिचोली येथील देवाजी वारलु राऊत (५०) ह्याचेवर हल्ला करून नरभक्षी वाघाने त्याचा बळी घेतल्याची घटना आज संध्याकाळी ४.३० वा. चे दरम्यान घडली. घटनेची माहीती होताच वनविभागाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. मृतक देवाजी राऊत यांचे पार्थीव लागलीच उपजिल्हा रूग्णालय मूल येथे शवविच्छेदना करीता पाठविण्यात आले.

    अवश्य वाचा : ब्रह्मपुरी विधानसभेत भाजपची दावेदारी

    Tiger attack news घटनास्थळी वनपरीक्षेञ अधिकारी राहुल कारेकर, क्षेञ अधिकारी गजानन वरगंटीवार, वनरक्षक परचाके, बुरांडे यांनी भेट देवुन पाहणी करत नरभक्षी पट्टेदार वाघ आहे किंवा बिबट याचा शोध घेण्यासाठी कँमेरे लावण्यात आल्याचे वनपरीक्षेञ अधिकारी कारेकर यांनी सांगीतले. मृतक देवाजी यांच्या कुटूंबाला २० हजार रूपयाची तातडीची मदत देण्यात आली. (Tiger attack news)

    मृतकाचे पश्चात पत्नी आणि मूल आहेत. मृतकाचे शव विच्छेदन करुन कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आले. काटवन परीसरात यापुर्वीही वाघाने हल्ला करून तीन ते चार जणांचा जीव घेतला आहे. त्यामूळे परीसरात दहशत पसरली असून नुकतेच चंद्रपूर येथील वनसंरक्षक वनवृत्त चंद्रपूर यांचेकडे वाघाचा त्वरित बंदोबस्त करण्यात यावे अन्यथा जनआंदोलन करण्यात येईल असा इशारा कांग्रेस नेते,चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष संतोष सिंह रावत यांनी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सुभाष धोटे यांचे नेतृत्वात निवेदन दिले.त्याच वेळेस वनसंरक्षक डॉ.रामगावकर व विभागीय वनआधिकारी खाडे यांनी यावर आम्ही नक्कीच उपाययोजना करु असे आश्वासन दिले होते. दहा दिवसात पुन्हा घटना घडली असल्याने अधिकाऱ्यांनी दिलेल्या आश्वासनांचे काय.असा प्रश्न नागरिकांनी केला आहे. उपजिल्हा रुग्णालयात मृतकाच्या नातेवाईकांनी व नागरिकांनी गर्दी केली होती.

  • HDIL SCAM : एचडीआयएल घोटाळा प्रकरणाला लागले वेगळे वळण : राकेश वाधवान यांचा प्रशासकावर गंभीर आरोप

    HDIL SCAM : एचडीआयएल घोटाळा प्रकरणाला लागले वेगळे वळण : राकेश वाधवान यांचा प्रशासकावर गंभीर आरोप

    HDIL SCAM मुंबई – एचडीआयएल (HDIL) च्या पालघर येथील पॅराडाईज सिटी प्रकल्पातील फ्लॅट मालकांचे कथित खोटे दावे स्वीकारून, कंपनी प्रशासक (रिझोल्यूशन प्रोफेशनल) अभय मानुधाने यांनी संबंधित कोट्यवधी रुपयांच्या कर्जाची परतफेड करण्याचा ठराव मंजूर केला. एचडीआईएल कंपनी चे प्रमोटर राकेश वाधवान यांनी या ठरावाला विरोध केला असून, ठरावाविरोधात भारतीय दिवाळखोरी मंडळाकडे (Insolvency and Bankruptcy Board of India – IBBI) तक्रार दाखल केली आहे.

    अवश्य वाचा : गरीब रुग्णाच्या मदतीसाठी धावली आप पार्टी, डॉक्टर विरोधात अर्धनग्न आंदोलन

    Hdil scam वाधवान यांनी तक्रारीत नमूद केले आहे की, पालघर येथील पॅराडाईज सिटी प्रकल्पाचे काम पूर्ण झाल्यानंतर प्रकल्पाला प्रशासनाकडून ऑक्युपन्सी सर्टिफिकेट (OC) मिळाले होते. सेक्टर १ मधील अनेक इमारतींनी स्वत:च्या सोसायट्या स्थापन केल्या असून, अनेक ग्राहकांनी या प्रकल्पातील घरांचा ताबा घेतला आहे. असे असतानाही, ताब्यात घेतलेल्या आणि आपल्या घरात राहत असलेल्या अनेक घर खरेदीदारांची नावे कर्जदारांच्या यादीत समाविष्ट करण्यात आली आहेत, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

    तक्रारीत असा आरोप करण्यात आला आहे की, प्रशासकाने येथे राहणाऱ्या लोकांच्या खोट्या दाव्यांची योग्य चौकशी न करता ठराव आराखडा मंजूर करून कंपनीचे दायित्व वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. अनेक सदनिकाधारक, ज्यांनी वेळेवर ताबा घेतला नाही आणि ज्यांच्याकडून कंपनीने व्याज वसूल करावे, अशा सदनिकाधारकांचाही ठराव प्रशासकाने कर्जबुडव्या यादीत समाविष्ट केला आहे. त्यामुळे कंपनीवर अतिरिक्त आर्थिक भार टाकण्याचे प्रयत्न करण्यात आल्याचा वाधवान यांचा आरोप आहे. (Hdil scam)

    चाणक्य कौशल्य विकास प्रशिक्षण

    राकेश वाधवान यांनी आपला दावा मजबूत करण्यासाठी काही कागदपत्रे सादर केली आहेत. त्यात असे सांगितले आहे की, अनेक खोटे दावे चौकशी न करता मान्य करण्यात आले, ज्यामुळे कंपनीच्या कर्जदारांची संख्या वाढली आहे. वाधवान यांच्या म्हणण्यानुसार, फक्त पालघरच्या पॅराडाईज सिटी प्रकल्पातच नव्हे, तर नाहूर आणि कुर्ला येथील प्रकल्पांमध्येही अशा बनावट दाव्यांना मान्यता देण्यात आली आहे, ज्यामुळे कंपनीच्या आर्थिक अडचणींमध्ये वाढ झाली आहे.

    मात्र, तत्पूर्वी रिझोल्यूशन प्रोफेशनल (RP) यांनी या आरोपांवर तक्रारदाराला स्पष्टीकरण दिले होते. त्यांनी म्हटले की, केवळ नेमप्लेटवर नाव आहे याचा असा अर्थ होत नाही की ग्राहकांना घरे मिळाली आहेत. याशिवाय, रिझोल्यूशन प्लॅन स्वीकारल्यानंतरही छाननी समिती दाव्यांची पुनर्तपासणी करते, आणि कोणत्याही ग्राहकाला पुन्हा घर दिले जाणार नाही, याची खात्री करुन घेते. या प्रक्रियेत कोणतीही अनियमितता होणार नाही, असे आश्वासनही आरपीकडून देण्यात आले आहे.

    मात्र, तक्रारदाराने भारतीय दिवाळखोरी मंडळाकडे (IBBI) मागणी केली आहे की या प्रकरणाची सखोल चौकशी करून खोटे दावे कर्जदारांच्या यादीतून वगळावेत. तक्रारदाराच्या या मागणीवर विचार करून बोर्ड लवकरच या प्रकरणावर सुनावणी घेऊ शकेल, अशी अपेक्षा आहे.

  • Ganpati visarjan : प्रशासनाचे दुर्लक्ष, गणेश विसर्जन सोहळा शांततेत

    Ganpati visarjan : प्रशासनाचे दुर्लक्ष, गणेश विसर्जन सोहळा शांततेत

    Ganpati visarjan (गुरू गुरनुले) मूल – गणपती बाप्पा मोरया, पुढल्या वर्षी लवकर या म्हणत शहरातील गणपती विसर्जन दरवर्षी प्रमाणे याही वर्षी शांततेत पार पडले. परंतू प्रशासनाच्या दुर्लक्षामूळे गांधी चौकात निर्माण झालेल्या तीन मंडपामूळे वाहतुकी सोबतचं ध्वनी प्रदुषणाचा नाहक त्रास गणेश भक्तांना नागरीकांना सहन करावा लागला.

    महत्वाचे – ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रातून भाजपतर्फे पाल यांची दावेदारी


    Ganpati visarjan बुधवारी रात्री शहरातील ३२ सार्वजनिक गणेश मंडळाने गणेश विसर्जनाच्या शोभायात्रा काढून बस स्थानक लगतच्या तलावात श्री गणेशाला निरोप दिला व पुढल्या वर्षी लवकर या अशी आराधना केली. गणेश विसर्जनाचे निमित्याने स्थानिक पोलीस प्रशासनाने शांतता समितीच्या सभेत साार्वजनिक गणेश मंडळांना शांतता व सुव्यवस्था राखण्यासोबतचं शासनाने दिलेल्या ध्वनी आणि प्रकाश प्रदुषणाचे नियम पाळण्याचे निर्देश दिले. परंतु एकाही गणेश मंडळाने शांतता समितीच्या सभेत दिलेल्या निर्देशाचे पालन केल्याचे दिसून आले नाही. प्रमाणाच्या बाहेर डि.जे. वाजत होते तर लेझर लाईटच्या वापरावर बंदी असतांना लेझर लाईटच्या प्रखर प्रकाशात युवा पिढी नाचत होती.

    शोभायात्रे दरम्यान स्थानिक गांधी चौक आणि शोभायात्रेच्या मुख्य मार्गावर गणेश भक्तांची, नागरीकांची प्रचंड गर्दी असतानाही सार्वजनिक गणेश मंडळाचे पदाधिकारी कुठलाही अनुचित प्रकार न करता किंवा अपघाताची भिती न बाळगता पोलीस अधिकारी आणि कर्मचा-यांसमोर बिनधास्त फटाक्यांची आतिषबाजी करतांना दिसले. गणेश विसर्जनाचे दिवशी दरवर्षी स्थानिक गांधी चौकात प्रशासनाच्या वतीने नियंत्रण ठेवणे अधिका-यांना सोईचे व्हावे म्हणून मंडप उभारण्यांत येत होते. मंडप उभारण्याची परवानगी द्यावी यासाठी न.प.प्रशासनाला पत्रही दिले होते. मात्र प्रशासनाने मंडप न उभारण्याचा निर्णय घेतल्याने भाजप राजकिय पक्षाने परवानगी न घेताच मंडप उभारले. त्यामुळे आपणही का, मागे राहायचे म्हणून त्याचं मंडपाला लागूनच लगेच महाविकास आघाडी तर्फे कांग्रेस व शिवसेना (ऊबाठा) यांनी देखील मंडप उभारले. विधानसभेची निवडणुकीची चाहूल लागल्याची संधी साधून प्रचाराचाही श्री. गणेशा केल्याचे दिसून आले. (Ganapti visarjan)

    विसर्जनाकरीता येणा-या नागरीकांसमोर शक्ती प्रदर्शन करीण्याकरीता भाजपा, काॅंग्रेस आणि शिवसेनेच्या वतीने गांधी चौकात वेगवेगळे तीन मंडप उभारले होते. भाजपाच्या मंडपात जिल्हयाचे पालकमंत्री तथा क्षेत्राचे आ. सुधीर मुनगंटीवार समर्थकांसह उपस्थित होते.व लक्की. ड्र्lचे बक्षीस वितरण केले. तर महाविकास आघाडी व संतोष सिंह रावत मित्र परिवार तर्फे उभारलेल्या मंडपात सी.डी.सी.सी. बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत, घनश्याम मुलचंदानी आपल्या असंख्य पदाधिकाऱ्यांसह मंचावर होते.सोबत शिवसेना जिल्हा प्रमुख संदीप गि-हे ( उबाठा )हे सुद्धा होते.व रावत मित्र परीवरांतर्फे आयोजित सर्व गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचा शाल श्रीफळ सन्मानचिन्ह देऊन सन्मान केला.आणि घरगुती गणपती स्पर्धेत विजेत्या स्पर्धकांना रोख बक्षेस दिले. तर लागूनच शिवसेना गटाच्या मंडपातून शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गि-हे आपआपल्या समर्थकांसह उपस्थित् राहून गणेश भक्तांना शुभेच्छा देत होते. (Ganpati visarjan)

    Ganpati visarjan उभारण्यांत आलेल्या राजकिय पक्षांच्या तीनही मंडपामध्यें कर्कश आणि मोठया आवाजात भोंगे व साऊंड वाजविल्या जात असल्याने गांधी चौकात ध्वनी प्रदुषणाची गंभीर समस्या निर्माण झाली होती. हया सर्व घटना कायदयाचे उल्लंघन करून घडत असतांना प्रशासनाला मात्र नाईलाजाने बघ्याची भुमीका घेतल्याने त्यांचे नशीब चांगले की, काहीही गालबोट लागले नाही हे विशेष, याविषयी नागरिकात आश्चर्य व्यक्त करण्यांत येत आहे. गणपतीचे दर्शन घेण्याकरिता तालुक्यातील व नगरातील हजारोच्या संख्येने गणेश भक्तांची रीघ होती.

  • Brahmapuri Assembly : भाजपच्या या नेत्याला द्या विधानसभेची उमेदवारी

    Brahmapuri Assembly : भाजपच्या या नेत्याला द्या विधानसभेची उमेदवारी

    Brahmapuri Assembly ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्राकारिता भारतीय जनता पार्टीकडून जनमतातील उमेदवार अविनाश पाल यांना उमेदवारी मिळावी म्हणून विधानसभा क्षेत्रातील प्रमुख पदाधिकारी यांनी चंद्रपूर भाजपा प्रभारी फग्गनसिंह कुलस्ते यांची भेट घेऊन निवेदन दिले.

    अवश्य वाचा : गरीब रुग्णासाठी आप पार्टीचे अर्धनग्न आंदोलन

    Brahmapuri Assembly ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रात यावेळेस बदल करायचा असल्यास अविनाश पाल यांना उमेदवारी देण्यात यावी व उमेदवारी मिळाल्यास त्यांना जिंकून आणाची जबाबदारी आम्ही प्रमुख पदाधिकारी घेऊ असे त्यांच्या भेटीदरम्यान सांगितले.


    भारतीय जनता पार्टीचा कट्टर कार्यकर्ता असून दोन पंचवार्षिक पंचायत समिती सदस्य, भाजपा तालुका अध्यक्ष, कृषी उत्पन्न बाजार समितीचे मुख्य प्रशासक म्हणून त्यांनी चांगले काम केले असून सर्वाना न्याय देण्याचा पुरेपूर प्रयत्न केलेला असून आजपर्यंत सावली तालुक्यात उमेदवारी मिळाली नाही त्यामुळे यावेळेस भारतीय जनता पार्टीने सावली तालुक्यातील अविनाश पाल यांना उमेदवारी देण्यात यावी अश्या मागणीचे निवेदन कार्यकर्त्यांनी त्यांना सोपविले.

    महायुती सरकारचे मोठे पाऊल, युवक-युवतींना मिळणार मोफत कौशल्य प्रशिक्षण


    निवेदन देताना दौलत भोपये, सदाशिव बोबाटे, नितीन टेप्पलवार, डियेज आभारे, मुक्तेश्वर थोराक, प्रविण देशमुख, प्रविण मेश्राम, ज्ञानेश्वर निकोडे, रोशन अन्सारी, देवानंद पाल, शरद मडावी, रामदास गेडाम, वर्षा गेडाम, गौरव यम्पलवार, अरविंद निकेसर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

  • Problem solving meetings : आश्रमशाळेतील शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित समस्‍यांबाबत समस्‍या निवारण सभा

    Problem solving meetings : आश्रमशाळेतील शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित समस्‍यांबाबत समस्‍या निवारण सभा

    Problem solving meetings चंद्रपूर : विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचा उपक्रम “समस्‍या तुमच्या, पुढाकार आमचा” अंतर्गत सरकार्यवाह तथा आमदार सुधाकर अडबाले यांच्या अध्यक्षतेखाली एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प चंद्रपूर व चिमूरअंतर्गत आश्रमशाळेतील शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित समस्‍यांबाबत समस्‍या निवारण सभा १८ सप्टेंबर रोजी प्रकल्‍प कार्यालय सभागृह, चंद्रपूर येथे पार पडली. या समस्या निवारण सभेत चंद्रपूर व चिमूर प्रकल्पातील शिक्षकांच्या समस्या तात्काळ निकाली काढण्याचे निर्देश आमदार सुधाकर अडबाले यांनी प्रकल्प अधिकाऱ्यांना दिले.

    Problem solving meetings सभेत माध्यमिक शिक्षकांना ४८००/- ग्रेड- पे लागू करणे, जीपीएफ व डीसीपीएस च्या पावत्या तात्काळ देणे, एकस्तर वेतनश्रेणी लागू करणे, सेवा पुस्तिका पडताळणी करणे, कर्मचाऱ्यांचे वेतन एक तारखेला अदा करणे, सेवानिवृत्ती प्रकरणे तात्काळ मंजूर करणे, कर्मचाऱ्यांचे वरिष्ठ व निवड श्रेणीचे प्रस्ताव निकाली काढणे, वैद्यकीय प्रतिकृती प्रस्ताव देयके निकाली काढणे, कार्यरत कर्मचाऱ्यांच्या अर्जित रजा वेतन, वैद्यकीय रजा, प्रसुती रजा व इतर रजा प्रलंबित कर्मचाऱ्यांची माहिती देणे, प्रकल्पातील मयत कर्मचाऱ्यांच्या वारसांना जुनी पेन्शन योजनेचा लाभ देणे, कर्मचाऱ्यांची मूळ सेवा पुस्तिका तयार करून त्यांना दुय्यम प्रत अद्यावत करून देणे, वेतन बिल वेळेवर न देणाऱ्या मुख्याध्यापकावर कारवाई करणे, माहे जुलै ची वेतन वाढ लावूनच बिल स्वीकारने व इतर वैयक्तिक समस्यावर चर्चा करून सदर समस्या तात्काळ निकाली काढण्याचे निर्देश चंद्रपूर व चिमूर प्रकल्प अधिकाऱ्यांना आमदार श्री. सुधाकर अडबाले यांनी दिले.

    अवश्य वाचा : ना आक्रमकता, ना तोडफोड, आप च्या आंदोलनाने वेधले लक्ष

    सर्व प्रलंबित समस्या लवकरात लवकर निकाली काढण्याचे आश्वासन सभेत प्रकल्प अधिकारी चंद्रपूर व चिमुर यांनी दिले. सभेला चंद्रपूर व चिमूर प्रकल्प अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. (Problem solving meetings)

    वंदे भारत एक्सप्रेस

    यावेळी महामंडळ सहकार्यवाह जगदीश जुनगरी, जिल्हाध्यक्ष केशवराव ठाकरे, कार्याध्यक्ष लक्ष्मणराव धोबे, जिल्हा कार्यवाह श्रीहरी शेंडे, कोषाध्यक्ष दिगांबर कुरेकार, महानगर कार्यवाह सुरेंद्र अडबाले, कनिष्ठ महाविद्यालयीन प्रतिनिधी प्रा. ज्ञानेश्वर सोनकुसरे, सावली तालुका अध्यक्ष विनोद मानापुरे, आदिवासी संस्कृती संघटनेचे भोजराज फुंडे, अनुदानित / शासकीय आदिवासी आश्रमशाळा संघटना चंद्रपूरचे अध्यक्ष प्रमोद साळवे, सचिव मनोज आत्राम, कार्याध्यक्ष चंद्रभान वरारकर, उपाध्यक्ष शंकर लोनगाडगे, प्रभाकर वडस्कर, सुरेश वरारकर, सदस्य युवराज मेश्राम, गोपाल बोबाटे, बजरंग जेणेकर, प्रा. रवी झाडे, दिलीप मोरे, आश्रमशाळा मुख्याध्यापक व समस्याग्रस्त शिक्षक  उपस्थित होते.

  • Today Environmental protection : पर्यावरणाचे रक्षण ही सामाजिक जबाबदारी – पालकमंत्री मुनगंटीवार

    Today Environmental protection : पर्यावरणाचे रक्षण ही सामाजिक जबाबदारी – पालकमंत्री मुनगंटीवार

    Environmental protection चंद्रपूर: वसुंधरेच्या संरक्षणासाठी निसर्गाचे शोषण थांबावे, पर्यावरणाचे रक्षण व्हावे ही सामाजिक जबाबदारी असून वनविभागाने महाराष्ट्र बांबू बोर्डाच्या माध्यमातून जैविक विघटन होऊ शकेल अशा बांबू ट्री गार्डचे तसेच बांबू चारकोल साबणाचे उत्पादन जागतिक बांबू दिनाच्या औचित्य साधून सुरू केले याचा मनापासून आनंद होत असल्याचे गौरवोद्गार राज्याचे वन सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी आज काढले. महाराष्ट्र वन विभाग व बांबू बोर्डाच्या वतीने जागतिक बांबू दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात दूरदृश्य प्रणालीद्वारे ना. मुनगंटीवार बोलत होते.

    Environmental protection यावेळी वनबल प्रमुख श्रीमती शोमिता विश्वास, प्रधान मुख्य वनसंरक्षक (नियोजन व विकास) श्री. कल्याणकुमार यांच्यासह वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. महिला बुरड गटाने उत्पादित केलेल्या बांबू ट्री गार्ड तसेच बांबू चारकोल सोप (साबण) चे लोकार्पण करण्यात आले.

    चंद्रपूर शहरातील गणेश विसर्जन सोहळा

    यावेळी बोलताना ना. मुनगंटीवार पुढे म्हणाले की, २०१३ मध्ये पॅरिस येथे संपन्न झालेल्या एका जागतिक परिषदेत पृथ्वीच्या भविष्याबाबत चिंता व्यक्त करण्यात आली होती. स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी मनुष्याकडून निसर्गावर मात करत नवे शोध लावण्यासाठी वसुंधरेचा शाप ओढवल्याबाबत गांभीर्याने चर्चा झाली. त्यानंतर देखील पर्यावरणावरील होत असलेल्या आक्रमणाची चिंता वाढत गेली. पर्यावरणाचे रक्षण करत असताना ट्रिगार्ड मात्र आपण दुर्दैवाने प्लास्टिकचेच वापरत होतो; पण महाराष्ट्राच्या बांबू बोर्डाने जागतिक बांबू दिनानिमित्त जैविक विघटन होऊ शकेल अशा बांबूच्या ट्री गार्डचे उत्पादन करून, पर्यावरण रक्षणात मोठे पाऊल उचलले आहेच; परंतु रोजगाराच्या संधी देखील उपलब्ध करून दिल्या याचा मला मनापासून आनंद होत आहे, असे ते म्हणाले. (Environmental protection)

    ग्रामीण महिला व बचत गटांचा होणार विकास

    बांबू चारकोल साबण ही अतिशय उत्तम कल्पना असून याचे योग्य पद्धतीने डिजिटल मार्केटिंग करणे अपेक्षित असल्याचे सांगून स्पर्धेच्या या युगात उत्तम पॅकेजिंग व उत्तम वितरण याकडे गांभीर्याने लक्ष देण्याच्या सूचना ना. मुनगंटीवार यांनी केल्या. आदिवासी तसेच मानव विकास कक्षेत असलेल्या तालुक्यांमध्ये रोजगारासाठी शासनाकडे भरपूर निधी उपलब्ध असतो; त्या माध्यमातून महिला बचत गटांना ट्री गार्ड बनवण्याचे किंवा बांबू चारकोल साबण बनवण्याचे प्रशिक्षण योग्य पद्धतीने दिल्यास निश्चितपणे या भागातील ग्रामीण महिलांचा व बचत गटांचा विकास होईल अशी अपेक्षा ना. मुनगंटीवार यांनी व्यक्त केली. (Environmental protection)

    अवश्य वाचा : चंद्रपुरात आम आदमी पक्षाच्या गांधीगिरी आंदोलनाची चर्चा

    राष्ट्रीय आणि राज्य महामार्गाच्या कडेला वापरता येतील बांबू ट्री गार्ड

    जागतिक बांबू दिनानिमित्त बांबू ट्रीगार्डची निर्मिती करून वनविभागाने मोठे पाऊल उचलले आहे. परंतु एवढ्यावरच न थांबता आपण सातत्याने पाठपुरावा करून राष्ट्रीय महामार्गाच्या कडेला लागणाऱ्या वृक्ष लागवडी संदर्भात माहिती घेऊन त्यासाठी बांबू ट्री गार्ड वापरता येतील अशा पद्धतीने प्रस्ताव तयार करावा, राज्याच्या बांधकाम विभागाला देखील असा प्रस्ताव आपण देऊ शकतो, अशा सूचना करत यासंदर्भात शिक्षण प्रशिक्षणाकडेही लक्ष देण्याचे सुचविले.

  • Best Jhatka Machine : शेतकऱ्यांना झटका मशीन उपलब्ध करून देणार – पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार

    Best Jhatka Machine : शेतकऱ्यांना झटका मशीन उपलब्ध करून देणार – पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार

    jhatka machine विविध प्रकारच्या नैसर्गिक आपत्तींमुळे शेतपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. सोबतच वन्य प्राण्यांपासून देखील शेत पिकांना धोका असतो. वन्य प्राण्यांपासून झालेल्या नुकसानामुळे शेतकऱ्यांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागते. त्यामुळे वन्य प्राण्यांपासून शेतपिकांचे नुकसान होऊ नये, यासाठी शेतकऱ्यांना झटका मशीन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. चिचपल्ली वनपरिक्षेत्र कार्यालयातंर्गत येत असलेल्या संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी कटिबद्ध आहे, असा शब्द राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथाचंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिला.

    वंदे भारत एक्सप्रेस

    Jhatka machine वनपरिक्षेत्र कार्यालय, चिचपल्ली अंतर्गत संयुक्त वनव्यवस्थापन समितीच्या समस्यांवरील उपाययोजनासाठी नियोजन भवन सभागृह चंद्रपूर येथे वनविभागासोबत बैठकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक डाॅ. जितेंद्र रामगावकर, उपवनसंरक्षक श्वेता बोड्डू, विभागीय वन अधिकारी प्रशांत खाडे, जगन येलके, चिचपल्ली वनपरिक्षेत्रातील गावांचे सरपंच, उपसरपंच वनपरिक्षेत्र अधिकारी व कर्मचारी आदी उपस्थित होते.

    अवश्य वाचा : 3 हजार 200 रुपयासाठी आम आदमी पार्टीचे अर्धनग्न आंदोलन

    गावातील नैसर्गिक संसाधनांचा शाश्वत विकास साधून त्यांची उत्पादकता वाढविणे तसेच गावकऱ्यांचे वनांवरील अवलंबत्व कमी करणे यासाठी डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जनवन विकास योजना सुरू करण्यात आली, याचा श्री. मुनगंटीवार यांनी सुरुवातीलाच उल्लेख केला.  ‘वन्यप्राण्यांपासून शेतपिकांचे नुकसान टाळणे खूप आवश्यक आहे. याकरीता वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी सातारा तुकूम, गिलबिली, आसेगाव, वलनी, जांभरला आणि टेमटा या सहा गावांमध्ये जावे. आणि शेतकऱ्यांकडून झटका मशीन संदर्भातील अर्ज ऑफलाइन तसेच ऑनलाईन स्वरूपात भरून घ्यावे. वनविभागाने थेट लाभ हस्तांतरणमार्फत या मशीनचे अनुदान लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्याची व्यवस्था करावी.

    चंद्रपूरचा राजा गणेश विसर्जन मिरवणूक

    चिरोली, कांतापेठ, जानाळा ही गावे डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जनवन योजनेमध्ये समाविष्ट करावी. (Jhatka machine) त्यासोबतच, वन्य प्राण्यांपासून शेत पिकांचे नुकसान होऊ नये यासाठी लवकरच शेतकऱ्यांना झटका मशीन उपलब्ध करून देण्यात येणार आहे,’ असेही वनमंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले.

    पुढे ते म्हणाले, ‘जंगलालगत असणाऱ्या विहिरींना लोखंडी जाळीचे कुंपण लावण्यासाठी डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जनवन योजनेअंतर्गत लाभ देण्यात येईल. बफर क्षेत्रातील सहाही गावांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे.’ तसेच संयुक्त वन व्यवस्थापन निधीचा वाटा येत्या 10 दिवसांत देण्याचे नियोजन करावे, असे निर्देश वनमंत्री श्री. मुनगंटीवार यांनी वनविभागाला दिले. (Jhatka machine)

    पोर्टल विकसित करण्याचे निर्देश

    संयुक्त वन व्यवस्थापन सूक्ष्म आराखड्यासाठी वनविभागाने डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जनवन योजनेचे पोर्टल विकसित करावे, अशा सूचना मंत्री मुनगंटीवार यांनी वन अधिकारी यांना दिल्या. या पोर्टलमध्ये गाव आराखडा, गाव पातळीवर होणाऱ्या बैठकीचे फोटो, व्हिडिओ तसेच इतिवृत्त अपलोड करावे. जेणेकरून, गावप्रमुखासह सर्वांना हा आराखडा पाहणे शक्य होईल. त्यासोबतच, डाॅ. शामाप्रसाद मुखर्जी जनवन योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी शासननिर्णयाच्या अनुषंगाने, विस्तृत चर्चा करण्याची आवश्यकता असल्याचेही ते म्हणाले.

    झटका मशीन

    21 सप्टेंबरला आढावा ; आंदोलन स्थगित

    संयुक्त वन व्यवस्थापन समिती यांनी विविध मागण्या केल्या होत्या. शासन निर्णयानुसार, 50 टक्के मोबदला देणे. संयुक्त वन व्यवस्थापन समितीचा सूक्ष्म आराखडा तयार करून देणे, शेतशिवाराची वन्य प्राण्यांपासून नुकसान होऊ नये, यासाठी झटका मशीन संपूर्ण शेतकऱ्यांना उपलब्ध करून देणे. वन्य प्राण्याला जीवित हानी होऊ नये यासाठी जंगलालगत असणाऱ्या विहिरींना लोखंडी जाळी बसविणे तसेच डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी जनवन योजनेचा लाभ देण्यात यावा, आदी मागण्यांसाठी त्यांनी आंदोलन केले.

    या मागण्यांवर सकारात्मक कार्यवाही करण्याचा शब्द वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिला. तसेच वन विभागाला या मागण्यांच्या पूर्ततेसाठी 21 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 11 वाजता चंद्रपूर येथील वनअकादमी सभागृह येथे प्रधान सचिव (वने) वेणूगोपाल रेड्डी आणि संयुक्त वनव्यवस्थापन समितीसोबत बैठकीचे निर्देश श्री. मुनगंटीवार यांनी दिले. या आश्वासनाची दखल घेऊन गावकऱ्यांनी 19 सप्टेंबर रोजी होणाऱ्या आंदोलनाला स्थगिती दिली आहे.

  • Gandhi Giri : चंद्रपुरात आप ची गांधीगिरी

    Gandhi Giri : चंद्रपुरात आप ची गांधीगिरी

    Gandhi giri 4 दिवसांपूर्वी राजुरा तालुक्यातील डोंगरगाव येथील शिवाजी कांबळे हे आपल्या कुटुंबातील व्यक्तीला चंद्रपुरातील डॉ आलूरवार सिटी स्कॅन सेंटरमध्ये mri करण्यासाठी आले होते, त्यावेळी आधी डिपॉझिट म्हणून 7 हजार 200 रुपये जमा करण्यात आले, मात्र रुग्ण स्थिर न राहिल्याने त्याचे mri करण्यात आले नाही, डिपॉझिट असलेले पैसे परत मागितले असल्यास डॉक्टरांनी 4 हजार रुपये परत केले मात्र उर्वरित 3 हजार 200 रुपये परत केले नाही, यावर कांबळे यांनी आप पक्षाचे जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार यांच्याशी संपर्क साधला व त्यानंतर आप पक्षाने अर्धनग्न आंदोलन सुरू करीत त्या रुग्णाचे पैसे गांधीगिरीने परत करायला लावले.

    अवश्य वाचा : जटपुरा गेट परिसरात अडकली गणरायाची मूर्ती आणि घडलं असं

    Gandhi giri 4 दिवसापासून mri करायला आलेल्या रुग्णाला डॉक्टर आलूरवार यांनी परत पाठविले मात्र त्या रुग्णाचे उर्वरित 3200 रुपये परत केले नाही, पैसे परत मिळत नसल्याने शिवाजी कांबळे यांनी आप चे जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार यांच्याशी संपर्क साधला, त्यांना संपूर्ण प्रकरणाची माहिती देण्यात आली, त्यांनतर राईकवार यांनी डॉक्टर सोबत मोबाईल द्वारे संवाद साधला मात्र डॉक्टर आलूरवार यांनी तुम्हाला जे करायचे ते करा, कितीही आंदोलन करा पैसे परत मिळणार नाही अशी मुजोरी केली.


    त्यानंतर राईकवार यांनी पदाधिकारी सोबत घेत आलूरवार यांच्या दवाखाण्यासमोर अर्धनग्न आंदोलन सुरू केले.
    या आंदोलनाचे फेसबुक वर लाईव्ह टेलिकास्ट करण्यात आले, त्यांना सोशल मीडियावर नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला यामुळे डॉक्टर आलूरवार यांना आप पक्षाच्या आंदोलनासमोर झुकावे लागले व रुग्णाचे 3200 रुपये त्यांनी परत केले.
    आप पक्षाचे जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार यांच्या अर्धनग्न आंदोलनाची सध्या जिल्ह्यात चांगली चर्चा आहे, या आंदोलनाच्या माध्यमातून आंदोलनात कसलीही तोडफोड, आक्रमक व कुणालाही काही न बोलता अहिंसेच्या माध्यमातून गांधीगिरीने गरीब रुग्णाला त्याचा हक्क मिळवून दिला. Gandhi giri

    वंदे भारत एक्स्प्रेस

    मयूर राईकवार यांचे विधान:

    “गरिबांच्या हक्कासाठी लढणे हे आमचे कर्तव्य आहे. जर अशा प्रकारे अर्धनग्न होऊन आंदोलन करावे लागले, तरी आम्ही मागे हटणार नाही. आज एका गरीब रुग्णाला न्याय मिळाला, हे आमच्यासाठी मोठे यश आहे.”
    सदर अर्धनग्न आंदोलनात


    या घटनेने चंद्रपूर शहरात मोठी खळबळ उडवून दिली आहे. अनेकांनी आम आदमी पक्षाच्या या कृतीचे कौतुक केले आहे, गरीब रुग्णांच्या हक्कांसाठी लढा देण्याच्या पक्षाच्या भूमिकेचे सर्वत्र स्वागत होत आहे. Gandhi giri

    मयूर राईकवार (जिल्हाध्यक्ष, आम आदमी पक्ष), राजू कूडे (युवा जिल्हाध्यक्ष), मनीष राऊत (युवा संघटन मंत्री), आदित्य नंदनवार (युवा जिल्हा सचिव), राजकुमार नगराळे जिल्हा सचिव, प्रशांत सिदुरकर जिल्हा सचिव, संगम सागोरे (वाहतूक संघटन जिल्हाध्यक्ष), कुणाल शेटे जिल्हा पदाधिकारी क्रिश कपूर, विशाल बिरमवार यांचा सहभाग होता.

    गांधीगिरी ची शैली