Blog

  • Today Tuberculosis : चंद्रपूर जिल्ह्यात 2 लक्ष 32 हजार 888 व्यक्तींची व संशयीत क्षयरुग्णांची तपासणी

    Tuberculosis

    Tuberculosis राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रम अंतर्गत जिल्ह्यात 100 दिवस क्षयरोग मोहिमेची सुरूवात खासदर प्रतिभा धानोरकर यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून करण्यात आली. वरोरा येथे पार पडलेल्या या कार्यक्रमाला उपविभागीय अधिकारी जेनिथ चंद्रा, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अशोक कटारे, तहसीलदार योगेश कोटकर, श्री साई वर्धा पॉवर जनरेशन लिमिटेडचे वरिष्ठ अधिकारी श्रीकृष्ण किशोर, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. ललितकुमार पटले आदी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व रॉबर्ट कॉक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.


    यावेळी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना उपचारावरील क्षय रुग्णांना पोषण आहार किट उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. तसेच क्षयरोगाची लक्षणे दिसताच आरोग्य संस्थेमध्ये जाऊन क्षयरोग तपासणी करावी तसेच क्षयरोग झाल्यास वेळेवर उपचार घेण्याचे आवाहन केले. Tuberculosis

    चंद्रपूर जिल्ह्यात बहुजन समाज पक्षाला मोठा धक्का


    जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे यांनी 100 दिवस मोहिमेसंदर्भात मार्गदर्शन केले. मोहीम कालावधीत 364 आयुष्यमान आरोग्य मंदिर येथे निक्षय शिबीर व सक्रीय क्षयरुग्ण शोध मोहिमेचे आयोजन करून जोखीमग्रस्त गटातील 2 लक्ष 32 हजार 888 व्यक्तींची व संशयीत क्षयारुग्णांची तपासणी करण्यात येणार आहे, असे सांगितले.

    यावेळी प्रधानमंत्री टीबी मुक्त भारत अभियान उपक्रमांतर्गत निक्षय मित्र श्री साई वर्धा पॉवर जनरेशन लिमिटेड यांना सन्मानीत करण्यात आले. तसेच खासदारांच्या हस्ते उपचारावरील 10 क्षयरुग्नांना पोषण आहार किटचे वाटप करण्यात आले. सोबतच वरोरा तालुक्यात टीबी चाम्पियन म्हणून क्षयरोगासंबंधित जनजागृती करण्याकरिता सहाय्य करणारे सचिन कामडी यांचाही सत्कार करण्यात आला. या दरम्यान सर्व उपस्थित मान्यवर, अधिकारी, पदाधिकारी, रुग्णालय कर्मचारी यांनी टीबी मुक्त भारत शपथ घेतली. chandrapur maharashtra

    Tuberculosis campaign program


    100 दिवस क्षयरोग मोहिमेमध्ये आयुष्यमान आरोग्य मंदिर येथे निक्षय शिबीर आयोजित करण्यात येत असून यामध्ये जोखीमग्रस्त गटातील लोकसंख्या व संशयीत क्षयरुग्ण यांची क्षयारोगाबाबत NAAT तपासणी व क्ष-किरण तपासणी करण्यात येणार आहे. जोखीमग्रस्त गटातील लोकसंख्येमध्ये खालील व्यक्तींचा समावेश करण्यात आलेला आहे. chandrapur maharashtra

    • 1) 60 वर्षावरील व्यक्ती, 2) मधुमेह व्यक्ती, 3) धुम्रपान करणारे व्यक्ती, 4) मागील पाच वर्षामध्ये क्षयरोग झालेले व्यक्ती, 5) क्षय रुग्णांच्या घरातील व्यक्ती, 6) 18 पेक्षा कमी BMI असणारे व्यक्ती, 7) HIV बाधित व्यक्ती.


    कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. ललितकुमार पटले यांनी केले. संचालन सोनाली रासपायले यांनी तर आभार उपजिल्हा रुग्णालय वरोराचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. प्रफुल खुजे यांनी मानले. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रतिक बोरकर, उपजिल्हा रुग्णालयातील कर्मचारी, तालुका क्षयरोग पथक, जिल्हा क्षयरोग केंद्र कर्मचारी आदी उपस्थित होते.

  • mahayuti leader : त्या मुलांची महायुतीच्या नेत्यांनी केली विचारपूस

    mahayuti leader

    Mahayuti leader आज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, चंद्रपूर येथे पारडी येथील अन्नातून विष बाधित झालेल्या मुलांची भेट घेण्यात आली. मा.डॉ.सुधीर मुनगंटीवार यांच्या निर्देशानुसार ही भेट घेण्यात आली असून, या मुलांच्या आरोग्याविषयी सविस्तर माहिती घेण्यात आली.

     जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूरचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे व   शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे आणि वैद्यकीय तज्ज्ञांनी या मुलांवर आवश्यक ती उपचार प्रक्रिया सुरू केली आहे.

    विद्यापीठाच्या चुकीमुळे त्या मुलीची नोकरी जाणार पण त्या क्षणी…

    डॉक्टरांनी त्यांची स्थिती स्थिर असल्याची माहिती दिली असून, त्यांच्या आरोग्य सुधारासाठी विशेष लक्ष दिले जात आहे. Food poisoning cases

    यावेळी मा.सुधीर मुनगंटीवार यांच्या सामाजिक भानाची भावना आणि त्यांनी केलेले मार्गदर्शन हे प्रेरणादायी ठरले आहे. प्रशासन आणि वैद्यकीय विभाग मिळून या परिस्थितीवर योग्य नियंत्रण मिळविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत.

    विधानसभा सभागृहात दणाणला जय चंद्रपूरचा नारा

    असे आश्वासन वैद्यकीय अधिकाऱ्यानी भाऊंच्या मार्गदर्शनात भेट देण्यात आलेल्या महायुतीच्या डॉ. मंगेश गुलवाडे, बंडू हजारे, नितीन भटारकर, प्रकाश देवतळे, जयप्रकाश कांबळे, छबूताई वैरागडे, किरण बुटले, मनोज पाल, रुद्रनारायण तिवारी, धनराज कोवे, उमेश आष्टणकर, राकेश बोमनवार, रामकुमार आकापल्लीवार यांच्या शिष्टमंडळाला दिली.

  • DBATU University : विद्यापीठाची एक चूक, नोकरी जाणार पण तेव्हा…

    DBATU University

    Dbatu university DBATU रायगड विद्यापीठ अंतर्गत राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालय चंद्रपूर येथे कित्येकदा विद्यार्थ्याना विद्यापीठाच्या गलथान कारभारामुळे व महाविद्यालयाच्या निष्काळजीपणामुळे नेहमी त्रासाला समोर जावे लागत असते.

    मागील वेळी सुद्धा निलेश बेलखेडे यांच्या तत्परतेने व सहकार्याने शेकडो विद्यार्थ्याचें वार्षिक नुकसान वाचले होते, विद्यार्थ्यांना सहकार्य करणारे व त्त्यांच्या पाठीशी सदैव खंबीरपने उभे राहणारे व्यक्तिमत्व म्हणून युवकांमध्ये एक वेगळी ओळख असणार नेतृत्व युवासेना सचिव, सिनेट सदस्य इंजि.निलेश बेलखेडे यांची पुन्हा एकदा तत्परतेने सहकार्य करणार व्यक्तिमत्व व कार्य करण्याची शैली बघायला आली. Dbatu university

    विधानसभेच्या सभागृहात दणाणला जय चंद्रपूर चा नारा

    राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालय मध्ये 2024 सत्रात उत्तीर्ण झालेली चव्हाण नामक विदयार्थीनी ला पुणे येथील नामांकित कंपनी मध्ये नौकरी लागली परंतु विद्यार्थिनी उत्तीर्ण होऊनही सहाव्या सेमिस्टर ची मार्कशीट मिळुनही तिची पाचव्या सेमिस्टर ची पास ची मार्कशीट अद्यापही महाविद्यालय येथे मिळालेली नव्हती.

    वारंवार महाविद्यालय येथे जाऊन विचारपूस करूनही ही चुकी विद्यापीठाची असून आम्ही प्रयत्न करीत आहो, काही दिवसात येऊन जाईल असे उत्तरे महाविद्यालय प्रशासन यांच्याकडुन येत होते. परंतु 10 दिवसात नौकरी लागलेल्या कंपनी ला सर्व मार्कशिट्स न पाठविल्यास नौकरी पासून वंचित राहावे लागेल असा निरोप आल्यानंतर विदयार्थीनीच्या पालकांनी बल्लारपूर शिवसेना नगरसेवक,उपजिल्हा प्रमुख सिक्की भैया यादव यांच्या माध्यमातून निलेश बेलखेडे यांच्याशी बोलून सदर विषय सांगितला. Shivsena ubt

    विषयांचे गांभीर्य ओळखून निलेश बेलखेडे यांनी महाविद्यालय प्राचार्य, प्रशासन यांच्याशी दूरध्वनी वर बोलून विचारणा केली असता आम्ही प्रयत्न करून थकलो परंतु विद्यापीठाकडून पाहिजे तसं सहकार्य नाही.

    असे उत्तरे मिळाले असता बेलखेडे यांनी थेट रायगड येथील DBATU विद्यापीठाच्या मुख्य शाखा येथे कुलगुरू, परीक्षा निमंत्रक अधिकारी यांच्याशी बोलण करून शिवसेना च्या पद्धतीने दम दिला व वारंवार विदयार्थ्याच्या भविष्यासोबत खेळणाऱ्या गोष्टी खपवून घेतल्या जाणार नाही अशे खडसावून यापुढे विदयापीठाच्या नागपूर कार्यालयाला घेराव घालून बंद पाडू असा इशारा दिला. Shivsena ubt

    त्यानंतर विद्यापीठाद्वारे लगेच अवघ्या 1 तासामध्ये विद्यार्थिनी ची पाचव्या सेमिस्टर ची मार्कशीट शिवसेना युवासेना पूर्व विदर्भ सचिव, सिनेट सदस्य सचिव निलेशजी बेलखेडे यांच्या व्हाट्सअँप नंबर वर पाठविली व दिलगिरी व्यक्त करत यापुढे चुका होणार नाही याची काळजी घेऊ असा विश्वास दिला.

    अश्या रीतीने सहकार्य करीत निलेश बेलखेडे यांनी विदयार्थी व पालकांना ती मार्कशीट पाठवून तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. विद्यार्थीनीच्या पालकांनी आनंद व्यक्त करीत इतक्या तत्परतेने काम करून सहकार्य केल्यामुळे पत्र लिहून शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे )युवासेना व युवासेना पूर्व विदर्भ सचिव प्रा. निलेश बेलखेडे यांचे विशेष आभार मानले.


    इतक्या तत्परतेने मदत करून त्या विद्यार्थिनीची पहिलीच नौकरी वाचवून तिच्यासाठी निलेश बेलखेडे हे देवदूत ठरले त्यांच्या या शिक्षण क्षेत्रातील सेवा भावी वृतीचे सर्वाकडून अभिनंदन केल्या जात आहे.

  • Encroachment on government land : त्या 84 कुटुंबाच्या मदतीला धावले आमदार जोरगेवार

    Encroachment on government land

    Encroachment on government land नकोडा येथील शासकीय जागेवर अतिक्रमण करून घरे बांधलेल्या ८४ कुटुंबांना न्यायालयीन आदेशाचा संदर्भ देत नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. या संदर्भात ५ डिसेंबर रोजी तहसील कार्यालयात विशेष बैठक झाली.

    या बैठकीत नागरिकांनी प्रशासनाच्या कारवाईविरोधात आक्षेप नोंदवला. या कुटुंबांची आर्थिक परिस्थिती हालाखीची असल्याने त्वरित कारवाई न करता त्यांना सवलत देण्यात यावी, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे आमदार किशोर जोरगेवार यांनी जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्याकडे केली आहे. Encroachment

    महाराष्ट्र विधानसभेच्या सभागृहात धडाडली चंद्रपूरची तोफ

      आ. किशोर जोरगेवार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी विनय गौडा यांची भेट घेत चंद्रपूर मतदारसंघातील विविध विषयांवर चर्चा केली. या चर्चे दरम्यान नकोडा येथील ८४ कुटुंबांना सवलतीची मागणी त्यांनी केली.

    या बैठकीत माझी नगर सेवक सुभाष कासनगोट्टूवार, मनोज पाल, गणपत गेडाम यांच्या सह भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आणि नकोडा येथील नागरिक उपस्थित होते.

    चंद्रपूर जिल्ह्याच्या राजकारणातील मोठी बातमी

      नकोडा येथील सर्वे क्र. ५८ आराजी ५.२९ पैकी ६१६ चौ. मी. शासकीय जागेवर निवासी व वाणिज्य प्रयोजनार्थ अतिक्रमण झाल्याचे आढळून आले आहे. यामुळे तहसील प्रशासनाने या कुटुंबांना नोटिसा बजावल्या आहेत.

    नोटिसांमध्ये सात दिवसांच्या आत अतिक्रमण स्वतःहून हटवण्याचा इशारा देण्यात आला आहे. अतिक्रमण न हटविल्यास महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ अंतर्गत प्रशासनाच्या वतीने अतिक्रमण हटवण्याची कार्यवाही होईल, असे नमूद आहे.

      आ. किशोर जोरगेवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले की, नकोडा येथील ८४ कुटुंबे आर्थिक दृष्ट्या अतिशय गरीब असून त्यांच्याकडे इतरत्र घरे बांधण्यासाठी जागा नाही.

    या कारणास्तव, या कुटुंबांना शासकीय जागेवरील अतिक्रमणाबाबत सवलत देऊन त्यांची इतरत्र योग्य व्यवस्थापन करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

  • Jay Chandrapur : महाराष्ट्र विधानसभेत धडाडली चंद्रपूरची तोफ

    Jay Chandrapur

    Jay chandrapur चंद्रपूर मतदारसंघाचे आमदार किशोर जोरगेवार यांनी शनिवारी मुंबई येथील विधानभवनात सलग दुसऱ्यांदा आमदार म्हणून शपथ घेतली. यावेळी त्यांनी “जय चंद्रपूर” म्हणत आपल्या नावाबरोबर आईचे नाव घेऊन शपथ ग्रहण केली.

      नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार किशोर जोरगेवार यांनी काँग्रेस पक्षाचे उमेदवार प्रवीण पडवेकर यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव केला. या विजयानंतर सलग दुसऱ्यांदा या मतदारसंघातून आमदार म्हणून ते निवडून आले.

    चंद्रपूर बसपा जिल्हाध्यक्ष यांचा कांग्रेस पक्षात प्रवेश

      आज विशेष अधिवेशनात नवनिर्वाचित आमदारांनी शपथ घेतली. किशोर जोरगेवार यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करून, “मी किशोर प्रभाताई, गंगूबाई, गजानन जोरगेवार” असे म्हणत शपथ घेतली. त्यांनी “जय हिंद, जय भीम, जय सेवा, जय माता महाकाली, जय चंद्रपूर” असे उद्गार काढत सर्व धर्मीय मतदारांचे आभार मानले. Maharashtra vidhansabha

      ते म्हणाले, “चंद्रपूरच्या जनतेने दुसऱ्यांदा सेवा करण्याची संधी दिली आहे. अनेक विकासकामे पूर्ण करण्याचा संकल्प आहे. मागील पाच वर्षांत सुरू केलेले समाजोपयोगी उपक्रम गतीने पुढे न्यायचे आहेत. अभ्यासिकांची कामे लवकरात लवकर पूर्ण करून ती विद्यार्थ्यांसाठी खुली करणे हे प्राथमिक उद्दिष्ट आहे.”

    रामनगर पोलिसांची मोठी कारवाई

    ते पुढे म्हणाले, “मंजूर दीक्षाभूमी विकासकाम, वढा आणि धानोरा बॅरेज यांसारखी प्रकल्पे जलद गतीने पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाईल. किशोर जोरगेवार यांच्या शपथविधीने चंद्रपूरच्या जनतेला नवीन आशा दिल्या आहेत.

  • Bsp District President join congress : चंद्रपूर बसपा जिल्हाध्यक्षाचा कांग्रेस पक्षात प्रवेश

    Bsp District President join congress

    Bsp district president join congress चंद्रपूर : बहुजन समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष शिरीष गोगुलवार यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश केला. खासदार प्रतिभा धानोरकर, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार सुभाष धोटे यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम शनिवारी (ता. ७) पार पडला.

    रामनगर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाची मोठी कारवाई


    यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते के. के. सिंग, प्रदेश काँग्रेसचे पदाधिकारी विनोद दत्तात्रय, चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रितेश (रामू) तिवारी, माजी जिल्हाध्यक्ष विनायक बांगडे, चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोष रावत, प्रविण काकडे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. Big news today

    खासदार प्रतिभा धानोरकर, माजी आमदार सुभाष धोटे यांनी गोगुलवार आणि सर्व कार्यकर्त्यांचा पक्षाचा दुपट्टा टाकून स्वागत केले.

    लोकसभा व विधानसभा निवडणुकीत चंद्रपूर जिल्ह्यात बहुजन समाज पक्ष मोठ्या प्रमाणात उतरत्या क्रमात गेला, बसपा सारखा एकेकाळी मोठा पक्ष आज हळूहळू नामशेष होत असल्याचे चित्र आहे.

    या कारणामुळे आता पदाधिकारी सुद्धा बहुजन समाज पक्षाला रामराम करीत दुसऱ्या पक्षाचा हात आपल्या हातात घेत आहे. असेच चित्र आता चंद्रपूर जिल्ह्यातील राजकारणात दिसले आहे.

  • ramnagar police station chandrapur : 5 दुचाकी सहित 2 आरोपींना रामनगर पोलिसांनी केली अटक

    ramnagar police station chandrapur

    ramnagar police station chandrapur रामनगर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने 2 वेगवेगळ्या कारवाईत 5 दुचाकी सहित 2 अट्टल गुन्हेगारांना अटक केली आहे.

    पहिल्या कारवाईत 30 सप्टेंबर रोजी रात्री 10 वाजता चंद्रपूर वडगाव येथील निवासी 31 वर्षीय निखिल ठोंबरे यांनी आपली मोपेड दुचाकी क्रमांक MH34 A N 7130 ही स्वतःच्या किराणा दुकानासमोर ठेवली असता कुणीतरी अज्ञाताने चोरून नेली, याबाबत ठोंबरे यांनी रामनगर पोलीस स्टेशनमध्ये दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल केला होता.

    106 विद्यार्थ्यांना विषबाधा

    गुन्हा दाखल होताच गुन्हे शोध पथकाने तपास सुरू केला, परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तपासणी करीत फुटेज व तांत्रिकदृष्ट्या तपास केला, खबरी नेटवर्क ला ऍक्टिव्ह करीत गुन्हे शोध पथकाने आरोपी 22 वर्षीय चेतन आगडे रा. जटपुरा गेट याला अटक करीत चोरी केलेली दुचाकी वाहन जप्त करण्यात आले.

    आरोपी आगडे ची कसून चौकशी केली असता त्यांच्याजवळून काळ्या रंगाचे स्प्लेंडर वाहन क्रमांक mh34 t 872 व काळ्या रंगाचे पॅशन प्लस वाहन करमणुक mh34 an 4877 जप्त करण्यात आले. दोन्ही वाहन चोरीचे असल्याचे निष्पन्न झाले. ramnagar police station chandrapur

    ईव्हीएम मशीन विरोधात चंद्रपुरात आमरण उपोषण

    दुसऱ्या गुन्ह्यात राधिका सभागृह तुकुम जवळ राहणारे 23 वर्षीय पंकज जैन यांनी 1 डिसेंबर रोजी युनियन बँकेच्या पार्किंग मध्ये आपले दुचाकी वाहन क्रमांक MH33 CC 7461 ठेवली असता अज्ञाताने सदर वाहन चोरी केले अशी तक्रार रामनगर पोलीस स्टेशनमध्ये दिली.

    याबाबत पंकज जैन यांनी रामनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली, गुन्हे शोध पथकाने तक्रारीची दखल घेत तपास सुरू केला, गुन्हे शोध पथकाने कौशल्यपूर्ण तपास करीत गोपनीय माहिती मिळवत 33 वर्षीय आरोपी कपिल मेश्राम राहणार परिवर्तन चौक, फुकटनगर याला अटक केली.

    आरोपी मेश्राम ची कसून चौकशी केली असता त्यांच्याजवळून काळ्या पांढऱ्या रंगांची इलेक्ट्रिक मोपेड वाहन जप्त करण्यात आले, दोन्ही गुन्ह्यात 5 दुचाकी सहित एकूण 1 लाख 84 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. Chandrapur police

    दोन्ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक आसिफराजा शेख यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शोध प्रमुख सपोनि देवाजी नरोटे, सपोनि उगले, पोलीस कर्मचारी पेतरस सिडाम, शरद कुडे, सचिन गुरनुले, आनंद खरात, प्रशांत शेंदरे, लालू यादव, मनीषा मोरे, अमोल गिरडकर, हिरालाल गुप्ता, रविकुमार ढेंगळे, प्रफुल पुप्पलवार, संदीप कामडी, पंकज ठोंबरे व ब्युल्टी साखरे यांनी केली.

  • Government hostel : शासकीय वसतिगृहात प्रवेश हवायं, निकष वाचा

    Government hostel

    Government hostel इतर मागासवर्गीय प्रवर्गातील मुले / मुलींना उच्च शिक्षण घेता यावे तसेच वाढत्या स्पर्धेमध्ये टिकून राहता यावे, यासाठी शासकीय वसतीगृह सुरू करण्यात आले आहे.

    चंद्रपुरातील वरून ची भरारी, t20 अंडर 19 वयोगटात निवड

    सन 2024-25 या वर्षासाठी व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी फक्त पदवी प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. सदर विद्यार्थी 12 वी किमान 60 टक्क्यांनी उत्तीर्ण असावा.

    इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग, आर्थिक मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी मुले/ मुलींच्या शासकीय वसतीगृहात प्रवेशासाठी 14 डिसेंबर 2024 पर्यंत अर्ज सादर करावे, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या सहायक संचालक आशा कवाडे यांनी केले आहे. Government hostel application

    बुद्ध रूपाची प्रतिष्ठापना

    असे आहेत प्रवेशाचे निकष व नियमावली : विद्यार्थी हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा मात्र चंद्रपूर येथील स्थानिक रहिवासी नसावा. विद्यार्थी हा फक्त पदवी प्रथम वर्षातच शिक्षण घेणारा असावा, वार्षिक उत्पन्न 2 लक्ष 50 हजारांच्या आत असावे.

    वय 30 वर्षांपेक्षा जास्त नसावे. व्यावसायिक शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांनी नॉन क्रिमिलेअर व कास्ट व्हॅलिडीटी जोडणे बंधनकारक आहे. सर्व विद्यार्थ्यांनी उत्पन्नाचा दाखला, बोनाफाईड व वैद्यकीय तपासणी प्रमाणपत्र ओरीजनल जोडावे.

    असा करा अर्ज : जाहिरात काळजीपूर्वक वाचून दिलेला क्यूआर कोड स्कॅन करावा. लिंकवर क्लिक करून फॉर्म डाऊनलोड व प्रिंट करावा. अर्जात नमुद संर्पूण कागदपत्रे जोडून सदर अर्ज वसतीगृहात जमा करावा. 

    अधिक माहितीकरीता सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण विभाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, शासकीय दूध डेअरी रोड, जलनगर चंद्रपूर येथे संपर्क करावा.

  • T20 Cricket : चंद्रपुरातील वरून ची अंडर19 क्रिकेट मध्ये निवड

    T20 cricket

    T20 cricket चंद्रपूर येथिल वरून सादमवार हा 17 वर्षीय मुलगा दशरथ फौंडेशन फिजिकल सेंटरमध्ये गेल्या काही वर्षांपासून फिजिकल फिटनेसचा सराव करीत होता त्याचच फळ त्याला मिळालं आणि आज अंडर 19 मध्ये सिलेक्शन झालं.

    बुद्धीरूपी मूर्तीची प्रतिष्ठापना


    चंद्रपूर येथील राहणाऱ्या एका ध्येयवेड्या तरुणाने मारली महाराष्ट्र t20 क्रिकेटमध्ये मजल मारली.


    नोव्हेंबरमध्ये झालेल्या आग्रा येथील टी20 क्रिकेट असोसिएशन ऑफ इंडिया द्वारे आयोजित 14 वी ऑल इंडिया C.S.M ट्राफीमध्ये वरून सादमवार याची निवड महाराष्ट्र स्काड B मध्ये करण्यात आली होती. त्याच्या समोरील वाटचालीस टीम D दशरथ कडून सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या.

    नझुल जमीन धारकांसाठी विशेष अभय योजना


    यावेळी त्याने आपल्या यशाचे श्रेय त्यांचे फिजिकल कोच दर्शन मासिरकर आणि आपल्या आई वडिलांना दिले.

  • gautam buddha murti : सावलीतील बुद्ध विहारात बुद्धरुपाची प्रतिष्ठापणा

    gautam buddha murti

    gautam buddha murti सावली : येथील धम्मसेनापती सारिपुत्त-महामोग्गलायन बुद्ध विहार सावली येथील बुद्ध विहारात भगवान तथागत गौतम बुद्धाच्या तसेच डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांच्या रुपाची प्रतिष्ठापणा शनिवार (दि.३० नोव्हेंबर) रोजी संघारामगिरी येथील वंदनीय भन्ते ज्ञानज्योती महाथेरो व भिक्खुसंघाच्या हस्ते करण्यात आली.


    सावली येथील जयभीम वाचनालयाच्या शेजारी मागील काही वर्षांपूर्वी धम्मसेनापती सारिपुत्त-महामोग्गलायन बुद्ध विहाराचे बांधकाम करण्यात आले. विहाराची निर्मिती झाल्यापासून येथे वर्षावासाच्या काळात नियमीत बुद्ध-धम्म-संघ वंदनेचे पठण करण्यात येत आहे. Buddha murti

    पोषण आहाराचा खेळखंडोबा, 103 विद्यार्थ्यांना विषबाधा

    येथे नव्यानेच बौद्ध उपासक-उपासिका यांच्यामार्फत तथागत गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची अष्ठधातूची मुर्ती आणण्यात आली. याची प्रतिष्ठापणा वंदनीय भन्ते ज्ञानज्योती महाथेरो, भन्ते सोन, भन्ते बुद्धज्योती यांच्यासह भिक्खू संघांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी बुद्ध-धम्म-संघ वंदनेचे पठण करुन परित्राण पाठ करण्यात आले. त्यानंतर वंदनीय भन्ते ज्ञानज्योती महाथेरो यांच्यासह भिक्खू संघाचे प्रवचन पार पडले. त्यानंतर भीमशक्ती युवा संघटनेतर्फे भोजनदान देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. gautam buddha murti

    संचालन व आभार समितीचे पदाधिकारी डिलक्स डोहणे यांनी केले. कार्यक्रमाला सावलीच्या नगराध्यक्ष लता लाकडे, बौद्धाचार्य लोमेश खोब्रागडे, बौद्धाचार्य घनश्याम भडके यांच्यासह बौद्ध अनुयायांची प्रमुख उपस्थिती होती.

    ईव्हीएम विरोधात चंद्रपुरात बेमुदत आमरण उपोषण

    यशस्वीतेसाठी समितीचे अध्यक्ष आबाजी दुधे, अरुंधती दुधे, डिलक्स डोहणे, नम्रता डोहणे, प्रदयुत डोहणे, ज्योती बोरकर, वंदना बोरकर, इंद्रजित गेडाम, भुवन बोरकर यांच्यासह धम्मसेनापती सारिपुत्त-महामोग्गलायन बुद्ध विहार समितीच्या पदाधिकारी व सदस्यांनी प्रयत्न केले.