Blog

  • Justice for tanmay | तन्मय च्या मारेकऱ्यांना आमच्या स्वाधीन करा – बाबूपेठवासीयांचा उद्रेक

    Justice for tanmay

    Justice for tanmay : चंद्रपूर शहरात 3 जानेवारीला चार अल्पवयीन मुलांनी 19 वर्षीय मुलाची दगडाने ठेचत क्रूर हत्या केली होती, अल्पवयीन मारेकऱ्यांना कठोर शिक्षा व्हावी या मागणीसाठी बाबूपेठ वासीयांनी 8 जानेवारी रोजी सायंकाळी केंडल मार्च काढला.

    12 कोटीचा अपहार, चंद्रपुरात ईडी ने दिली धडक

    डीएड कॉलेजच्या मैदानावरून निघालेला हा कँडल मार्च प्रभागातील भ्रमण करीत नेताजी चौकात पोहचला.

    घटना काय?

    3 जानेवारीला बाबूपेठ निवासी तन्मय जावेद खान हा 19 वर्षीय मुलगा सायंकाळी घरी येत होता वाटेत महाकाली मंदिर जवळ काही अल्पवयीन मुलांच्या दुचाकीला तन्मय च्या वाहनाने कट लागली.


    आमच्या वाहनाला कट का मारली म्हणून अल्पवयीन मुलांनी तन्मय सोबत वाद घालत त्याला मारहाण केली, त्यानंतर तन्मय ला दुचाकी वाहनाला झालेल्या नुकसानीची भरपाई मागितली, तन्मय ने पैसे नसल्याचे सांगताच चार अल्पवयीन मुलांनी गौतमनगर भागात तन्मय ला नेत त्याची दगडाने ठेचत अत्यंत क्रूरपणे हत्या केली.

    या घटनेचा निषेध व्यक्त करीत आज बाबूपेठ भागातील नागरिकांनी तन्मय च्या मारेकऱ्यांना कठोर शिक्षा व्हावी या मागणीसाठी कँडल मार्च (candal march) काढला.

    candal march
    बाबूपेठ वासीयांचा कँडल मार्च

    नेताजी चौकात नागरिकांनी मनातील संताप व्यक्त केला, मारेकरी मुलांना आमच्या स्वाधीन करा आम्ही त्यांचा बंदोबस्त करु अशी मागणी यावेळी करण्यात आली, पोलिसांचे मूल असे गुन्हे करीत आहे म्हणून प्रशासन मारेकऱ्यांची पाठराखण करीत आहे.

    sp office
    पोलीस अधीक्षकांना निवेदन देताना तन्मय ची आई

    मारेकरी अल्पवयीन मुलांना कठोर शिक्षा व्हायला हवी याबाबत तन्मय च्या आईने पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांची भेट घेत निवेदन दिले.

  • Online Booking Scam | चंद्रपुरात असं काय घडलं की “ईडी’ ने धाड मारली

    online booking scam

    online booking scam : ताडोबा ऑनलाइन बुकिंग च्या नावाखाली झालेला गैरव्यवहार पुन्हा एकदा चर्चेत आला असून 8 जानेवारीला सक्त वसुली संचालयाने कोट्यवधी रुपयांची अफरातफर करणाऱ्या ठाकूर बंधूंच्या प्रतिष्ठानावर धाडी मारल्या.

    वर्ष 2020 ते 2023 या कालावधीत ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्पात ऑनलाइन बुकिंग च्या नावाखाली चंद्रपूर वाईल्ड कनेक्टिव्हिटी सोल्युशन कंपनीने ताडोबा व्यवस्थापनाला तब्बल 12 कोटी 15 लाख 50 हजार रुपयांचा चुना लावला होता.

    ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्पातर्फे wildcon 2025 चे आयोजन

    शासकीय पैश्यांची या कंपनीने उधळपट्टी केल्याचे समजताच विभागीय वन अधिकारी सचिन शिंदे यांनी रामनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती.

    या घोटाळ्यामुळे ताडोबा व्याघ्रप्रकल्पातील ऑनलाइन बुकिंग बंद करण्यात आली होती, या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी यासाठी ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्पाचे (tadoba andhari tiger reserved) संचालक डॉ.जितेंद्र रामगावकर यांनी सक्त वसुली संचालयाकडे दाद मागितली, आज 8 जानेवारीला पहाटे 4 वाजता सक्त वसुली संचालयाचे 25 अधिकारी चंद्रपुरात दाखल झाले व त्यांनी कंपनी संचालकांच्या निवासस्थानी व त्यांच्या प्रतिष्ठानावर धाड मारली. ईडी च्या धाडीने पुन्हा ताडोबा तिकीट ऑनलाइन बुकिंग घोटाळा पुन्हा चर्चेत आला. 

    चंद्रपूर वाईल्ड कनेक्टिव्हिटी सोल्युशन कंपनीचे संचालक रोहित ठाकूर व अभिषेक ठाकूर हे दोघे सख्खे बंधू बाहेरगावी असल्याची माहिती आहे. Online booking scam

    दोन्ही ठाकूर बंधूनी ऑनलाइन तिकीट मध्ये आर्थिक गैर व्यवहार केला होता, सदर प्रकरणी दोन्ही बंधूनी न्यायालयासमोर आत्मसमर्पण केले होते. 12 कोटी ची रक्कम तात्काळ जमा करावी असे आदेश न्यायालयाने ठाकूर बंधूंना दिले होते, यामधील काही रक्कम ठाकूर बंधूनी जमा केली अशी माहिती आहे.

    असा झाला घोळ

    चंद्रपूर वाईल्ड कनेक्टिव्हिटी सोल्युशन या नावाच्या कंपनीसोबत ताडोबा-अंधारी टायगर प्रोजेक्ट प्रमोशन फाऊंडेशनचे कार्यकारी संचालक यांनी करार केला. या करारानुसार ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांना सफारीसाठी ऑनलाईन नोंदणी यांच्याकडून करावी लागत होती. ही कंपनी चंद्रपूर येथील गुरुद्वारा रोड येथील अभिषेक विनोदकुमार ठाकूर आणि रोहित विनोदकुमार ठाकूर या दोन सख्या भावंडांची आहे. या करारानुसार, ही कंपनी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात कमिशनच्या आधारावर ऑनलाइन सफारी बुकिंग करू शकत होती. २०२० ते २०२३ या कालावधीत या कंपनीला केलेल्या बुकिंग अंतर्गत २२ कोटी २० लाख एवढी रक्कम ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प प्रमोशन फाउंडेशनकडे जमा करायची होती. मात्र या कंपनीने केवळ १० कोटी ६५ लाख जमा केल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे.

  • Wildcon 2025 | ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्पाने Wildcon परिषदेचे केले आयोजन

    Wildcon 2025

    Wildcon 2025 : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातर्फे  ‘संरक्षित क्षेत्रांच्या बाहेर स्थानिक पातळीवरील तृणभक्षी आणि मांसभक्षी वन्यप्राण्यांच्या मुबलक संख्येवर नियंत्रणासाठी अभिनव आणि संवेदनशील उपाययोजना’ या विषयावर एका विशेष परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. चंद्रपूर वन अकादमी येथे आज या परिषदेचे उद्घाटन झाले. यावेळी झालेल्या चर्चेत आजी-माजी तसेच वरिष्ठ वन अधिकारी, वन्यजीव अभ्यासक, शास्त्रज्ञ, महाविद्यालयीन विद्यार्थी, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी सहभागी झाले.

    परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा वनबल प्रमुख शोमिता बिस्वास, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) विवेक खांडेकर,  व्ही. क्लेमेंट बेन, अतिरिक्त प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव पूर्व),  डॉ. शिरीष उपाध्ये, संचालक, डब्ल्यूआरटीसी, गोरेवाडा, शोभा फडणवीस, आमदार देवराव भोंगळे,  तसेच डॉ. जितेंद्र  रामगावकर, क्षेत्र संचालक, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प ( tadoba andhari tiger reserve) यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी परिषदेच्या विषयाशी संबंधित संशोधनात्मक पोस्टर्सचे प्रदर्शनही आयोजित करण्यात आले. Wildcon 2025

    245 नळ धारकांवर चंद्रपूर मनपाने केली कपातीची कारवाई

    परिषदेच्या पहिल्या सत्रात ‘संरक्षित क्षेत्रांबाहेरील वन्यजीव मुबलकता आणि पर्यावरणीय संदर्भ’ या विषयावरील चर्चेत पर्यावरणीय व सामाजिक मुद्दयांचा परामर्ष घेण्यात आला. यावेळी बिबट्या, माकड, निलगाय, आणि रानडुक्कर यांसारख्या प्रजातींशी संबंधित विशिष्ट आव्हानांचे विवेचन करताना, त्यांचे शेती आणि मानवी वस्तीवर होणारे परिणाम स्पष्ट केले गेले. या सत्रातील चर्चेत  जयकुमार,  उपवनसंरक्षक,  मेळघाट व्याघ्र प्रकल्प, डॉ. बिलाल हबीब, डब्ल्यूआयआय, डेहराडून, डॉ. सिंदुरा गणपथी, फेलो, प्रधान वैज्ञानिक सल्लागार यांचे कार्यालय, भारत सरकार,  अमोल सातपुते,  उपवनसंरक्षक, जुन्नर,  एम. रामानुजन, मुख्य वनसंरक्षक, कोल्हापूर,  रजनीश सिंग,  उपसंचालक,  पेंच, मध्य प्रदेश,  कार्तिकेय सिंग, वन्यजीव आणि वन सेवा संस्था व डॉ. जितेंद्र एस. रामगावकर, क्षेत्र संचालक,  ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प हे सहभागी झाले.

    परिषदेच्या दुस-या सत्रात ‘वन्यजीव लोकसंख्येच्या व्यवस्थापनासाठी धोरण आणि कायदेशीर बाबी’ या विषयावरील चर्चेत संरक्षित क्षेत्रांबाहेरील वन्यजीव लोकसंख्या व्यवस्थापनासाठी अस्तित्वातील कायदे आणि धोरणात्मक चौकट तसेच नवीन कायदेशीर व समाजमान्य पद्धतींची गरज यावर विचारविनिमय करण्यात आला. या सत्रात  सुनील लिमये, माजी प्रधान मुख्य वन संरक्षक (वन्यजीव),  विवेक खांडेकर, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव), एच. एस. पाब्ला, माजी प्रधान मुख्य वन संरक्षक (वन्यजीव), मध्य प्रदेश, डॉ. सेन्थिल कुमार,  विभागीय कार्यालय, पर्यावरण, वने व हवामान बदल मंत्रालय, नागपूर, डॉ. वैभव माथूर, उपमहानिरीक्षक, राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्रधिकरण, श्री. दिपांकर घोष, वरिष्ठ संचालक, डब्ल्यूडब्ल्यूएफ-भारत यांनी सहभाग घेतला.

    तिस-या सत्रात ‘वनक्षेत्रातील पशुवैद्यकीय पायाभूत सुविधांचे मानकीकरण’ या विषयावर चर्चा झाली. यावेळी प्रभावी वन्यजीव आरोग्य सेवा, रोग व्यवस्थापन आणि आपत्कालीन प्रतिसाद सुनिश्चित करण्यासाठी व्याघ्र अभयारण्यांमधील पशुवैद्यकीय पायाभूत सुविधांचे मानकीकरण करण्यावर चर्चा करण्यात आली.

    या चर्चेत डॉ. व्ही. क्लेमेंट बेन, अतिरिक्त प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव पूर्व), डॉ. बहार बाविस्कर, वाईल्ड सीईआर, डॉ. शिरिष उपाध्ये, संचालक,  डब्ल्यूआरटीसी,  गोरेवाडा,  नागपूर, श्रीमती नेहा पंचमिया, आरईएसक्यू चॅरिटेबल ट्रस्ट, डॉ. अखिलेश मिश्रा, ज्येष्ठ वन्यजीव पशुवैद्यक, मध्य प्रदेश, वनविभाग, डॉ. शशिकांत जाधव, डब्ल्यूव्हीएस, डॉ. शैलेश पेठे, उपायुक्त, पशुसंवर्धन विभाग यांनी आपले विचार व्यक्त केले.

  • Home Water Meter | चंद्रपूर मनपाने 245 नळ धारकांवर केली कपातीची कारवाई

    Home Water Meter

    Home Water Meter : चंद्रपुर महानगरपालिकेतर्फे जलमापक यंत्र ( मीटर ) काढुन पाण्याचा वापर करणाऱ्या 245 नळ धारकांवर नळ कपातीची कारवाई करण्यात आली असुन 107 जलमापक यंत्र जप्त करण्यात आले आहे.तसेच मीटर काढुन पाण्याचा वापर करणाऱ्या 2407 नळधारकांची नोंद घेण्यात आली असुन त्यांनी मीटर जोडणी न केल्यास त्यांच्यावरही कारवाई करण्यात येणार आहे.  

    शिक्षकांच्या क्वार्टर मध्ये “दम मारो दम’

       
       आयुक्त विपीन पालीवाल यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवार ७ जानेवारी रोजी शहराती नळ जोडणी योजनेचा आढावा घेण्यात आला.  शहरातील सर्व नळ जोडणीवर जलमापक (मीटर) (Home Water Meter) लावण्यात आले असुन जानेवारी महिन्यापासुन याचा प्रत्यक्ष वापर सुरु आहे. मात्र घरपोच पाणी मिळत असूनही अनेक नागरिकांद्वारे पाण्याचे देयक (cmc chandrapur online payment) भरण्यात कुचराई करण्यात येत असल्याने मोठया प्रमाणात थकबाकी निर्माण होत आहे.

    मीटर लावण्यात आलेल्या घरांपैकी केवळ 14 टक्के इतक्याच नळजोडणी धारकांनी देयकाचा भरणा केलेला आहे. यामुळे प्रामाणिकपणे करभरणा करणाऱ्या नागरिकांचे नुकसान होत असल्याची माहिती पाणी पुरवठा विभागातर्फे देण्यात आली.


        काही नळ ग्राहक हे पाणी वापराचा खर्च टाळण्याच्या दृष्टीने पाईपलाइनवर बसविण्यात आलेले जलमापक यंत्र काढुन पाणी भरत असतात. त्यामुळे अनेकदा  नागरिकांचे देयक हे शून्य रुपये येते. सदरची बाब नियमबाहा असल्याने असे प्रकार थांबविण्याच्या दृष्टीने येत्या 15 दिवसांत पाणी पुरवठा कार्यालयात प्रत्यक्ष अथवा भ्रमणध्वनी व्दारे संपर्क करून नळ जोडणी करून घेण्याच्या सूचनाही व्हॉल्वमनमार्फत सदर नळ धारकांना देण्यात आल्या होत्या. परंतु अजुनही काही नळ धारकांनी नळ जोडणी न केल्याने अश्या ग्राहकांवर दंडात्मक कार्यवाही करण्यात येत आहे.

        याप्रसंगी आयुक्त यांनी सुचनांचे पालन न करणाऱ्या नळ धारकांची नळ जोडणी कपात करण्याच्या तसेच मोठ्या अपार्टमेंटमधील रहिवाश्यांच्या वैयक्तीक कनेक्शन बंद करून सोसायटीच्या नावे एकच कनेक्शन देण्याची सूचना त्यांनी याप्रसंगी दिल्या.

    नळ कपातीसाठी महानगरपालिकेमार्फत 6 पथक तयार करण्यात आले आहे. ज्या नळ ग्राहकांची नळ कपात करण्यात आलेली आहे अश्या ग्राहकांनी पुनश्चः नळ जोडणीकरिता आवश्यक शुल्क आकारणीचा भरणा करावा, यासाठी मनपा पाणी पुरवठा विभाग अथवा पाण्याची टाकी कार्यालय येथे संपर्क करण्याचे मनपाद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे.

  • Drugs Addiction | चंद्रपुरातील शासकीय क्वार्टर मध्ये “दम मारो दम’

    Drugs Addiction

    Drugs Addiction : चंद्रपूर शहर आता नशेच्या धुव्यात उडता चंद्रपूर कडे वाटचाल करीत आहे. गांजा नंतर आता जिल्ह्यात एमडी ड्रग्स ची सर्रास विक्री सुरू आहे.


    भावी पिढीला अवैध व्यवसायिक नशेच्या आहारी जाण्यासाठी प्रोत्साहित करीत आहे, या गंभीर समस्येवर जनप्रतिनिधी व प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे.
    3 जानेवारीला तन्मय खान या मुलाची 4 अल्पवयीन मुलांनी दगडाने ठेचत हत्या केली, कारण तन्मय च्या दुचाकीने त्या अल्पवयीन मुलांच्या दुचाकी वाहनाला कट मारली, वाहनांचे नुकसान झाले म्हणून तन्मय ला 5 हजार रुपये मागितले पैसे देण्यास असमर्थ ठरल्याने अल्पवयीन मुलांनी तन्मय ची हत्या केली. हत्या करताना चारही अल्पवयीन मुले नशेत होते अशी माहिती पुढे आली आहे. D Ed college

    babupeth


    चंद्रपुर शहरातील बाबूपेठ हा भाग गर्दुल्ले, बेवडे व नशेडी लोकांसाठी स्वर्ग बनला आहे, येथील डीएड कॉलेज मधील प्राध्यापकांच्या क्वार्टर मध्ये व्यसनाधीन अल्पवयीन मुलांचा नशा करण्यासाठी सायंकाळी मेळावा भरतो, 10 ते 15 ओसाड असलेल्या शासकीय क्वार्टर मध्ये गांजा, एमडी व दारूचे सर्रास व्यसन केल्या जाते. Government colony

    डीएड कॉलेज मध्ये काही वर्षांपासून प्रशिक्षण घेण्यात तरुण वर्ग निरुत्साही झाल्याने शासकीय अध्यापक विद्यालय आता ओसाड झाले, बोटावर मोजण्याइतके कर्मचारी या प्रशिक्षण केंद्रात उरले आहे.

    ded college qwarter


    पूर्वी असंख्य तरुण-तरुणी या विद्यालयात प्रशिक्षण घेत होते, अनेक शिक्षक या विद्यालयात घडले, त्यावेळी प्राध्यापक वर्गाला राहण्यासाठी डी.एड कॉलेजच्यामागे प्रशस्त क्वार्टर ची व्यवस्था करण्यात आली होती.

    चंद्रपूर मनपाची पोलिसात तक्रार


    आज सर्व क्वार्टर ओसाड पडले, वेळेनुसार अध्यापकांची संख्या कमी झाल्याने केवळ कर्मचारी हे काही क्वार्टर मध्ये राहतात, त्यामुळे प्राध्यापकांची वसाहत पूर्णतः ओसाड पडल्याने व प्रशासनाचे पूर्णतः दुर्लक्ष झाल्याने यामध्ये आता दम मारो दम या कामासाठी क्वार्टर चा उपयोग होत आहे. Drugs addiction


    बाहेरील अल्पवयीन, तरुण मुले दररोज सायंकाळी आपल्या वाहनाने येत सिगारेट द्वारे गांजा व एमडी चे सेवन करतात, यामुळे या परिसरात राहणारे नागरिक गर्दुल्ले यांच्या कृत्याने कंटाळले आहे.

    drugs


    भविष्यात या व्यसनाने मोठी घटना नाकारता येत नाही म्हणून परिसरातील युवक व नागरिकांनी ओसाड पडलेले क्वार्टर जमीनदोस्त करावे अशी मागणी केली आहे.

    पोलीस प्रशासनाची भीती न बाळगता अल्पवयीन मुले बिनधास्त शासकीय क्वार्टर मध्ये सिगरेट ओढतात त्यामधील तंबाखू बाहेर काढत गांजा भरतात, आणि मग नशेच्या दुनियेत जात कुठलंही भयानक कृत्य करायला तयार होतात.

    बाबूपेठ प्रभागात काही अवैध व्यावसायिक गांजाचा व एमडी चा व्यापार करतात, ते सुद्धा पोलीस प्रशासनाला न घाबरता, तत्कालीन पोलीस अधीक्षक परदेशी यांच्या कार्यकाळात ओसाड पडलेल्या वसाहत व इमारतीची रोज झाडाझडती घेत होते, त्यामुळे त्याठिकाणी गैरकृत्य होण्याचे कारण नव्हते मात्र नवे पोलीस अधीक्षक आल्याने ती मोहीम थंडावली आणि परिस्थिती जैसे थे झाली.

    पोलिसांनी नशेचा व्यापार करणाऱ्यांवर करावी करीत त्यांच्यावर एमपीडीए अंतर्गत कारवाई करीत त्यांचं नेटवर्क कायमचे बंद करावे अशी मागणी आता होताना दिसत आहे.

  • Mla Sudhir Mungantiwar | मंत्री नाही तरीही करून दाखविलं

    Mla Sudhir Mungantiwar

    Mla Sudhir Mungantiwar : चंद्रपूर – मुल येथे नवीन शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय व्हावे, यासाठी राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आ. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी सातत्याने प्रयत्न केले. त्यांनी पाठपुरावा करून हा विषय लावून धरला. आता लवकरच हा विषय मंत्रिमंडळाच्या बैठकीत येणार आहे. त्यामुळे आ. श्री. मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांना यश आले आहे.

    वाघांचा जिल्हा म्हणून नावलौकिक असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी आधुनिक शिक्षण घ्यावे. जिल्ह्याचा नावलौकिक देशात वाढवावा. यासाठी जिल्ह्यातील मुल येथे नवीन शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय (polytechnic college) सुरू करण्याचा प्रस्ताव आ. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी दिला होता. यासंदर्भात मंगळवार, दि. ७ जानेवारीला राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत मंत्रालयात बैठक पार पडली. आ. श्री. मुनगंटीवार यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे झालेल्या या बैठकीत तंत्रनिकेतन महाविद्यालयासंदर्भात सविस्तर चर्चा झाली.

    चंद्रपूर मनपाची पोलिसात तक्रार

    यावेळी चंद्रकांत पाटील यांनी सकारात्मक भूमिका घेतली. तसेच मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मुलच्या शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाचा प्रस्ताव मांडण्यासंदर्भात सूचना व निर्देश दिले. महाविद्यालयासंदर्भात वेळोवेळी केलेल्या सहकार्याबद्दल आ. श्री. मुनगंटीवार यांनी विभागाचे अप्पर मुख्य सचिव वेणूगोपाल रेड्डी यांचे आभार मानले आहेत.चंद्रपूर सारख्या आदिवासी बहुल जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना या महाविद्यालयाच्या माध्यमातून आधुनिक शिक्षणाच्या प्रवाहात येण्यास मदत होणार असल्याचा विश्वास आ. श्री. मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.

    आ. श्री. मुनगंटीवार यांनी दिले होते निर्देश


    चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री असताना आ. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी मुल येथे शासकीय पॉलिटेक्निक कॉलेज सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला होता. निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्याच्या उद्देशाने त्यांनी तंत्रशिक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. त्यानंतर मुल येथे शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव तातडीने तयार करण्याचे निर्देश दिले होते, हे विशेष.

    या विद्यार्थ्यांना होणार लाभ

    या विद्यार्थ्यांना होणार लाभ
    या उपक्रमामुळे मूलसह पोंभूर्णा, सावली, सिंदेवाही आणि चंद्रपूर जिल्ह्यातील विद्यार्थी-विद्यार्थिनींना लाभ होणार आहे. मुल येथे यापूर्वीच शासकीय कृषी महाविद्यालय सुरू झाल्याने शहराच्या शैक्षणिक विकासात मोलाचे योगदान मिळत आहे. शासकीय पॉलिटेक्निक सुरू झाल्यास मुल हे शिक्षणासाठी महत्त्वाचे केंद्र ठरणार आहे, असा विश्वास आ. श्री. मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.

  • yavatmal |आरोग्य यंत्रणा सुसज्ज ठेवा – खासदार धानोरकर

    yavatmal

    yavatmal : चंद्रपूर लोकसभा क्षेत्राअंतर्गत येणाऱ्या वणी, आर्णी विधानसभेतील नागरीकांच्या तसेच विकासात्मक कामांच्या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ येथे जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षते खाली व खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

    जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत कापुस उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध समस्यांसदर्भात चर्चा करण्यात आली. तसेच नागपूर-बोरी-तुळजापूर महामार्गासाठी भुसंपादन केलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ मोबदला देण्याच्या संदर्भाने बैठकीत चर्चा झाली. या सोबतच खनिज विकास निधी अंतर्गत कामांना गती देण्याचे आदेश संबंधीत अधिकाऱ्यांना दिले.

    HMPV व्हायरस चंद्रपूर आरोग्य विभागाने केले आवाहन

    यावेळी सध्या जगात थैमान घालण्याऱ्या एचएमपीव्ही विषानुच्या प्रादुर्भाव वाढू नये याकरीता आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करुन आरोग्य यंत्रणा सुसज्ज ठेवण्याचे आदेश खासदार प्रतिभा धानोरकर (pratibha dhanorkar) यांनी आरोग्य अधिकाऱ्यांना दिले.

    यावेळी, सर्व विभागातील अधिकाऱ्यांना खासदार प्रतिभा धानोरकर यांनी लोकसभा क्षेत्रात सुरु असलेल्या विकास कामांना गती देऊन तात्काळ पुर्ण करण्याच्या सुचना देखील केल्या.

    यावेळी, बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, मुख्य कार्यकारी अधिकरी मंदार पतकी, पोलिस अधिक्षक कुमार चिंता, निवासी जिल्हाधिकारी श्री. उंबरकर, जिल्हा खनिकर्म अधिकारी श्री. जोशी, उप विभागीय अभियंता श्री. धांडे, वैशाली रसल, कॉग्रेस नेते जितू मोघे, आरिश बेग, अमर पाटिल, संदीप बुर्रेवार, निखिल देठे, सुनिल भारती, रुपेश कल्याणवार यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

  • Maharashtra Defacement Act | चंद्रपुरात अवैध होर्डिंग, मनपाने केली पोलिसात तक्रार

    Maharashtra Defacement Act

    Maharashtra Defacement Act : शहरात विना परवानगी होर्डिंग व स्टीकर लावणाऱ्यांविरुद्ध महाराष्ट्र विद्रुपीकरण कायदा १९९५ व सार्वजनिक संपत्ती नुकसान निवारण अधिनियम १९८४ अन्वये गुन्हा दाखल करण्याबाबत चंद्रपूर महानगरपालिकेच्या तीनही झोन कार्यालयांद्वारे पोलीस ठाणे येथे तक्रार दाखल करण्यात आली आहे.

    HMPV व्हायरस चंद्रपुर आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर


     चंद्रपूर मनपाच्या झोन क्रमांक १ प्रभागात अज्ञात व्यक्तीद्वारे मैत्री विद्यालय,केसरी बोअरवेल नावाने,झोन क्रमांक २ प्रभागात नकुल वासमवार यांनी तर झोन क्रमांक ३ प्रभागात विक्रम शर्मा (डोग्रा ड्राय फ्रुट्स ) तसेच कार वॉश सेंटरची जाहिरात करणारे अवैध होर्डींग विविध ठिकाणी तसेच बॅनर- स्टीकर भिंतींवर व विद्युत खांबांवर मनपाकडुन पूर्वपरवानगी न घेता लावले असल्याचे सर्व सहायक आयुक्त यांना पाहणीदरम्यान आढळुन आले. (Cmc chandrapur)


        संबंधितास भ्रमणध्वनीद्वारे संपर्क करून सदर होर्डींग,पत्रके काढण्यास सांगितले असता अद्याप पावेतो न काढल्याने या सर्व अवैधरीत्या जाहिरात करणाऱ्यांवर महाराष्ट्र विद्रुपीकरण कायदा १९९५ अंतर्गत कलम ३ व सार्वजनिक संपत्ती नुकसान निवारण अधिनियम १९८४ अन्वये गुन्हा नोंद करण्यात यावा अश्या आशयाची तक्रार करण्यात आली आहे. जाहिरात करण्यास अश्या प्रकारचा अवलंब केल्याने शासकीय निधीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते तसेच शहर सुशोभीकरणाच्या कामातही बाधा निर्माण होते.


       घाटकोपर येथील होर्डींग दुर्घटनेनंतर सुस्वराज फाऊंडेशनची दाखल जनहित याचिका क्र.१५५ / २०११ नुसार मा.उच्च न्यायालयाने शहरातील अनधिकृत होर्डींग,बॅनर, जाहीरात फलकांवर सक्त कारवाई निर्देश दिलेले आहेत.त्याअनुषंगाने आयुक्त विपीन पालीवाल यांच्या मार्गदर्शनात चंद्रपूर मनपाद्वारे मोहीम राबविण्यात येत असुन निष्कासनाची कारवाई करण्यासाठी स्थानिक पोलीस प्रशासनाद्वारे पुरेसे संरक्षण उपलब्ध करून दिले जात आहे.

       यापुर्वी मनपा प्रशासनाद्वारे मनपा क्षेत्रातील प्रिंटर्स व राजकीय पक्ष प्रतिनिधींची बैठक घेऊन मा. उच्च न्यायालयाच्या आदेशाबाबत अवगत करण्यात आले होते व शहरात कुठलेही अवैध बॅनर,जाहीरात फलक,होर्डिंग लाऊ नये अन्यथा न्यायालयीन आदेशानुसार कारवाई करण्यात येणार असल्याची कल्पना देण्यात आली होती.  


        भिंतीपत्रके,पोस्टर्स,बॅनरबाजीमुळे शहराच्या विद्रुपीकरण होते किंबहुना वाहतुकीसही अडथळा निर्माण होत असल्याने याबाबत उच्च न्यायालय आणि राज्य शासनाने आखुन दिलेल्या सुचनांनुसार कारवाई करण्यात येते. त्यानुसार, परवानगीशिवाय पॅम्प्लेट्स, बॅनर्स, होर्डिंग्ज,कापडी फलक लावणा-यांवर आर्थिक दंडासह कायदेशीर कारवाई करण्याची तरतूद या धोरणामध्ये करण्यात आली आहे.

  • What Is Hmpv virus | काय आहे HMPV व्हायरस? चंद्रपूर आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर

    what is hmpv virus

    what is hmpv virus : कोरोना नंतर चीन मधून HMPV व्हायरस चा उदय झाला असून हा व्हायरस चा एक रुग्ण देशातील कर्नाटक राज्यात आढळला असून आता महाराष्ट्र राज्यातील आरोग्य विभाग अलर्ट मोडवर आलेले आहे.

    चंद्रपुरात एकाच रात्री 3 दुकाने फोडली

    याबाबत चंद्रपूर जिल्हा शल्य चिकित्सक महादेव चिंचोळे यांनी याबाबत जिल्ह्यातील जनतेला आवाहन केले की या hmpv व्हायरस कोरोना सारखा नसून काळजी करण्याचे कारण नाही, जर ताप, खोकला आला तर डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.

    एचएमपीव्ही (HMPV) व्हायरस म्हणजे ह्युमन मेटान्युमोव्हायरस (Human Metapneumovirus). हा एक श्वसन संसर्गजन्य व्हायरस असून तो मुख्यतः लहान मुले, वयस्कर व्यक्ती आणि कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती असलेल्या लोकांना प्रभावित करतो. What is hmpv virus

    एचएमपीव्ही व्हायरसची माहिती:

    1. कुटुंब: Paramyxoviridae
      एचएमपीव्ही हा व्हायरस Paramyxoviridae कुटुंबातील आहे, जो इन्फ्लुएंझा किंवा आरएसव्ही (Respiratory Syncytial Virus) सारखाच आहे.
    2. सर्वप्रथम शोध:
      2001 साली नेदरलँड्समध्ये हा व्हायरस प्रथम ओळखला गेला. तो आधीपासून मानवांमध्ये अस्तित्वात होता, परंतु आधुनिक प्रयोगशाळेच्या तंत्रज्ञानामुळे त्याचे निदान झाले.
    3. संक्रमणाचा प्रकार:
      • श्वसनमार्गावर परिणाम करणारा व्हायरस.
      • सामान्यतः थंड हवामानात किंवा हिवाळ्यात अधिक प्रमाणात दिसतो.
      • संसर्ग मुख्यतः थेट संपर्क, श्वसनातून फेकलेले थेंब, किंवा संक्रमित वस्तूंच्या संपर्कातून होतो.

    एचएमपीव्हीचे लक्षणे:

    एचएमपीव्हीचा प्रभाव सौम्य ते गंभीर स्वरूपाचा असू शकतो. लक्षणे इतर श्वसन संसर्गांसारखी असतात: hmpv india

    1. सौम्य लक्षणे:
      • सर्दी, खोकला
      • ताप
      • घसा खवखवणे
      • थकवा
    2. गंभीर लक्षणे (मुख्यतः बालकांत आणि वृद्धांमध्ये):
      • श्वास घेण्यात अडचण
      • ब्रॉन्कायटिस (श्वासनलिका दाह)
      • न्युमोनिया (फुफ्फुसाचा संसर्ग)
      • घरघर (Wheezing)

    जोखीम गट:

    एचएमपीव्ही व्हायरस सामान्यतः खालील गटांना अधिक प्रभावित करतो:

    • लहान मुले: 5 वर्षांखालील मुले
    • ज्येष्ठ नागरिक: विशेषतः 65 वर्षांपेक्षा जास्त वयाचे
    • कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती असलेले रुग्ण
    • अस्थमा किंवा हृदयविकार असलेले रुग्ण

    उपचार आणि प्रतिबंध:

    1. उपचार:
      • सध्या एचएमपीव्हीचा कोणताही विशिष्ट उपचार किंवा लस उपलब्ध नाही.
      • उपचार मुख्यतः लक्षणांवर आधारित असतात:
        • तापासाठी पॅरासिटामॉल
        • पुरेसे पाणी पिणे
        • ऑक्सिजन थेरपी (गंभीर प्रकरणांमध्ये)
    2. प्रतिबंध:
      • चांगल्या स्वच्छतेची सवय लावणे (हात वारंवार धुणे).
      • संक्रमित लोकांपासून लांब राहणे.
      • खोकताना किंवा शिंकताना तोंड झाकणे.
      • सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर करणे.

    एचएमपीव्हीचा तुलनात्मक अभ्यास:

    एचएमपीव्ही हा आरएसव्ही (Respiratory Syncytial Virus), इन्फ्लुएंझा व्हायरस किंवा सामान्य सर्दीसारखाच आहे, परंतु तो गंभीर श्वसन संसर्ग घडवू शकतो. त्याची जटिलता अधिक प्रमाणात न्युमोनिया आणि ब्रॉन्कायटिस निर्माण करण्याची शक्यता वाढवते.

  • chandrapur crime news | चंद्रपुरात एकाच रात्री 3 दुकाने फोडली

    chandrapur crime news

    chandrapur crime news : चंद्रपूर – नागपूर रोडवरील वडगाव परिसरातील तीन दुकाने शनिवारी रात्री चोरट्यांनी फोडली. २ लाख १५ हजाराची रोख रक्कम चोरली.

    चंद्रपुरात गांजा विक्री, 1 किलो गांजा जप्त


    वडगाव परिसरामध्ये असलेले पवनसुत इंटरप्राईजेस, चांडक मेडिकल आणि जनार्धन एजन्सी या तिन्ही दुकानात चोरट्यांनी हात साफ केला. पवनसुत इंटरप्राईजेसचे मालक अतुल कुचनकार यांनी पोलिसात तक्रार दिली.


    शनिवारी पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी पवनसुत इंटरप्राईजेसच्या मागील बाजूचे शटर फोडले. दुकानात प्रवेश करून काऊंटरमध्ये ठेवलेली १ लाख ७० हजार रुपये घेऊन चोरटे पसार झाले.त्याच रात्रीच याच परिसरातील रोहित सुधाकर माडुलवार यांच्या जनार्धन एजन्सीमध्येही चोरट्यांनी हात साफ केला.

    अस्वल चक्क पोलीस चौकी समोर आली आणि….


    यामध्ये ४५ हजार रुपये चोरून नेले. बापटनगर चौकामध्ये असलेल्या चांडक मेडिकलचेही शटर तोडून ३५ हजार रुपये लंपास केले. अतुल कुचनकार, मोहित चांडक, रोहित माडुरवार यांनी रामनगर पोलिसात तक्रार दाखल केली. तक्रारीनंतर पोलिसांनी विविध कलमांन्वये अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.