Blog

  • Marathi Ukhane | मकरसंक्रांत स्पेशल उखाणे

    Marathi Ukhane

    Marathi Ukhane : मकरसंक्रांत मध्ये आता महिलांचे हळदी-कुंकू कार्यक्रम सुरू झाले आहे, सध्या महिला वाण वाटपात व्यस्त आहे, यासह विविध ठिकाणी महिलांचे मेळावे आयोजित करण्यात आले आहे.

    रात्री भात खाण्याचे साईड इफेक्ट

    हळदी-कुंकू कार्यक्रमात महिला उखाणे घेत नवऱ्याबाबत प्रेम व्यक्त करतात. असेच काही उखाणे आज या माध्यमातून वाचायला मिळणार आहे. (मकरसंक्रांत उखाणे मराठी)

    • चांदण्यांच्या प्रकाशात फुलली गुलाबाची कळी,माझ्या हृदयात आहे फक्त ___चं नाव लिहिलं गोंदणं गोंदली.
    • चांदणं आणि तारे साक्ष,___ आहेत माझ्या जीवनाचे भाग्यलक्ष.
    • तुळशीच्या लगडाला वळसा,___ माझ्या संसाराचा आधार खांदा.
    • नदीच्या प्रवाहाला कधी नाही थांबा, ___ माझं आयुष्य आहेत माझं शांतीचं आभाळ.
    • सोन्याच्या नथीला मोत्यांचा हार,
    • ___ आहे माझ्या आयुष्याचा शृंगार.
    • पाटलाच्या शेताला आहे बांधावर फुलांचा मळा,
    • ___ माझ्या संसाराचं सोनं असलेल्या फुला.
    • चंद्र तारे आकाशात, गोड गुलाबाच्या बागेत,
    • ___ नाव घेऊन पूर्ण करतो वाक्यात.
    • तुळशीवृंदावनात घेतो प्रकाश,
    • ___ माझ्या संसाराचा मळा आहे खास.
    • तिळगुळाचा गोडवा वाढवतो आनंद,
    • ___ आहेत माझ्या जीवनाचा अनमोल बंध.
    • तिळगुळ घ्या गोड गोड बोला,
    • ___ आहेत माझ्या आयुष्याचा लखलखता तारा.
    • पतंग उडवतो आसमंतात,
    • ___ आहेत माझ्या जीवनात भरलेला गोड गोड रंगात.
    • सुर्य उगवला दक्षिणायनातून उत्तरायनात,
    • ___ आहेत माझ्या हृदयात भरलेला साजरा सणात.
    • साखर गुळ आणि तिळाचा गोळा,
    • ___चं नाव घेतो प्रत्येक गोड शब्दांभोवळा.
    • पतंगाच्या मांज्यासारखा गोड,
    • ___ माझ्या संसाराची पकड आहे ठसठशीत जोर.
    • संक्रांतीच्या माळेत ओवतो गोडवा,
    • ___ आहेत माझ्या संसाराचा गंध सुवासवा.
    • तिळगुळ खा गोड बोला,
    • ___चं नाव घेतो, सण साजरा करू आनंदाला.

  • Side effects of eating rice | रात्री भात खातायं, तर मग हे नक्की वाचा

    Side effects of eating rice

    Side effects of eating rice : तुम्हाला सुद्धा भाताशिवाय रातचं जेवण अपूर्ण वाटतं का? जर होय, तर तुम्हाला रात्री भात खाण्याचे काही साइड इफेक्ट्स माहिती असणे गरजेचे आहे.

    भारतात बहुतेक लोकांना डाळ-भात खायला खूप आवडतं. काही लोक तर भाताशिवाय जेवण पूर्ण करतच नाहीत. दुपारच्या वेळी भात (rice) खाण्यामुळे तुमच्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो. पण तुम्हाला माहिती आहे का की आरोग्य तज्ज्ञ नेहमी रात्री भात खाणं टाळण्याचा सल्ला देतात?

    चंद्रपूर जिल्ह्यात एकाच महिन्यात 3 वाघाचा मृत्यू

    तुम्हाला सांगायचं झालं तर रात्रीच्या जेवणात भात खाण्याची सवय तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम करू शकते. रात्री जे लोक भात खातात, त्यांची पचनसंस्था (गट हेल्थ) खराब होऊ शकते.

    रात्री भात खाल्ल्यामुळे तुम्हाला पोटाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. बद्धकोष्ठता आणि ऍसिडिटीसारख्या समस्यांपासून वाचण्यासाठी तुम्ही रात्रीच्या आहारातून भात वगळला पाहिजे.

    रात्री भात खाल्ल्यामुळे तुमचं वजन वाढू शकतं आणि तुम्हाला लठ्ठपणाचा त्रास होऊ शकतो. लठ्ठपणा ही अनेक गंभीर आणि धोकादायक आजारांना आमंत्रण देणारी समस्या आहे. जर तुम्ही तुमचं वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल, तर रात्री भात खाणं टाळा.

    ज्यांना दम्याचा त्रास आहे किंवा ज्यांची श्वास घ्यायला अडचण होते, त्यांनी रात्री भात खाणं टाळावं. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, रात्री भात खाल्ल्यामुळे घशाला खवखव होऊ शकते. शिवाय ज्यांना सायनसचा त्रास आहे, त्यांनी देखील रात्रीच्या जेवणात भात खाणं टाळावं.

    डायबेटीसच्या रुग्णांनी सुद्धा रात्री भात खाणं टाळलं पाहिजे, अन्यथा त्यांचं आरोग्य बिघडू शकतं. त्यामुळे तुमच्या आहारावर विशेष लक्ष देणं गरजेचं आहे.

  • Aamdar Shree । नागपूरचा निलेश जोगी ठरला आमदार श्री चा मानकरी

    Aamdar Shree

    Aamdar Shree : आमदार किशोर जोरगेवार यांच्या संकल्पनेतून महानगरपालिकेच्या पटांगणावर आयोजित विदर्भस्तरीय बॉडी बिल्डिंग स्पर्धेत नागपूरचा निलेश जोगी आमदार श्री २०२५ चा मानकरी ठरला ठरला आहे. तर चंद्रपूरचा आशिष बिरिया बेस्ट पोझर आणि अकोल्याचा अहमद खान यांनी बेस्ट इम्प्रुव्ह विजेतेपद पटकावले आहे. सर्व विजेत्या स्पर्धकांना आमदार किशोर जोरगेवार आणि मिस्टर वर्ल्ड नरेंद्र यादव यांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली आहेत.

    यावेळी श्री महाकाली माता महोत्सव समितीचे सचिव अजय जयस्वाल, युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष रघुवीर अहिर, भारतीय जनता पार्टीचे नेते दशरथ ठाकुर, राजेंद्र अडपेवार, तुषार सोम, माजी नगरसेवक विशाल निंबाळकर, प्रकाश देवतळे, भाजप नेते खुशाल बोंडे, माजी नगर सेवक सुभाष कासनगोट्टूवार, प्रदिप किरणे, शिला चौव्हाण,  श्याम धोपटे, अमोल शेंडे, नकुल वासमवार, रशिद हुसेन, सलीम शेख, ताहीर हुसेन,करणसिंग बैस, सुमित बेले, हर्षद कानमपल्लीवार, राम जंगम, असोशिएशनचे सचिव सुभाष लांजकेर, कोष्याध्यक्ष विवेक भुरटकर, सदस्य गणेश रामगुंडेवार आदींची मंचावर उपस्थिती होती.

    चंद्रपूर जिल्ह्यातील खासदाराचे दमदार काम

    दरवर्षीप्रमाणे यंदाही चंद्रपूरात आमदार किशोर जोरगेवार यांच्या संकल्पनेतून श्री माता महाकाली क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यात विविध स्पर्धा घेतल्या जाणार आहेत. दरम्यान शनिवारी गांधी चौकातील महानगरपालिकेच्या पटांगणावर बॉडी बिल्डर अँड फिटनेस असोसिएशन विदर्भ यांच्या मान्यतेने तथा चंद्रपूर बॉडी बिल्डर अँड फिटनेस असोसिएशनच्या सहकार्याने विदर्भस्तरीय बॉडी बिल्डिंग अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ही स्पर्धा 55, 60, 65, 70, 75 आणि खुल्या अशा सहा वजनगटांत घेण्यात आली होती. यात चंद्रपूरसह नागपूर, वर्धा, अमरावती, बुलढाणा, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, यवतमाळ, वाशीम जिल्ह्यांतील 142 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. संध्याकाळी सहा वाजता 55 वजन गटाच्या स्पर्धेला सुरुवात झाली. (body building competition)

    या स्पर्धेत 55 वजन गटात चंद्रपूरचा आशिष बिरिया, 60 वजन गटात बुलढाण्याचा दत्तात्रेय सावरकर, 65 वजन गटात अकोल्याचा संदीपसिंग ठाकुर, 70 वजन गटात अकोल्याचा सोहेब अहमद, 75 वजन गटात अकोल्याचा सोहेब साहिल यांनी प्रथम पारितोषिक मिळविले. तर या स्पर्धेत आमदार श्रीसाठी घेण्यात आलेल्या स्पर्धेत नागपूरच्या निलेश जोगीने बाजी मारत पहिल्या क्रमांकासाठी असलेले 55,555 रुपयांचे पारितोषिक जिंकत आमदार श्री 2025 चा मान पटकावला. तसेच बेस्ट पोझर म्हणून आशिष बिरियाला 33,333 रुपये आणि शिल्ड, बेस्ट इम्प्रुव्हमेंटसाठी अहमद खान याला 22,222 रुपयांचे पारितोषिक आणि शिल्ड देण्यात आली.

    एका महिन्यात चंद्रपूर जिल्ह्यात ३ वाघाचा मृत्यू

    यावेळी बोलताना आमदार किशोर जोरगेवार म्हणाले की, बॉडी बिल्डिंग ही केवळ शरीराचा व्यायाम नाही, तर मनाच्या शिस्तीचा, मेहनतीचा आणि दृढ संकल्पाचा सर्वोच्च नमुना आहे. आपल्या समाजातील तरुणांना आरोग्याबाबत जागरूक करण्यासाठी अशा प्रकारच्या स्पर्धा खूप महत्त्वाच्या आहेत. आजच्या युगात आरोग्य हीच खरी संपत्ती आहे. फिटनेस आणि व्यायामाच्या माध्यमातून केवळ शरीर सुदृढ होत नाही, तर मन आणि आत्माही उन्नत होतो. युवक व्यसनापासून दूर राहतो, आपल्यातील प्रत्येकाने आपल्या रोजच्या आयुष्यात व्यायामाला प्राधान्य दिलं पाहिजे. पुढे पण असे आयोजन आपण करणार असल्याचे आमदार किशोर जोरगेवार म्हणाले.                                                                   

    यावेळी मिस्टर वर्ल्ड नरेंद्र यादव यांनी स्पर्धकांना कसरत करण्याचे आवश्यक सल्ले देत आयोजनाचे कौतुक केले. यावेळी अभिषेक कारिमवार, अविनाश लोखंडे, राजू कोटेवार, विशाल शिंदे, प्रतीम पाटील, गौतम शंभरकर, योगेश देवतळे यांनी पंच म्हणून काम पाहिले.

    मिस्टर वर्ल्ड नरेंद्र यादव ठरला आकर्षण

    मिस्टर वर्ल्ड आणि तब्बल सात वेळा मिस्टर इंडिया राहिलेला नरेंद्र यादव हा स्पर्धेचे मुख्य आकर्षण ठरला. त्याला पाहण्यासाठी युवकांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी नरेंद्र यादव यांनीही सर्व बॉडी बिल्डरांना सुडौल शरीर तयार करण्यासाठी महत्त्वपूर्ण टिप्स दिल्या.

    body builder narendra yadav

  • Tiger Dead | चंद्रपूर जिल्ह्यात एका महिन्यात ३ वाघांचा मृत्यू

    Tiger Dead

    Tiger Dead : चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यात बल्लारपूर – गोंदिया रेल्वे मार्गावर १९ जानेवारीला रेल्वेच्या धडकेत वाघाचा मृत्यू झाल्याची घटना घडली असून आतापर्यंत जानेवारी महिन्यात १९ दिवसात ३ वाघाचा मृत्यू झाला आहे.

    दक्षिण पुर्व मध्य रेल्वे , बिलासपुर झोन अंतर्गत गोंदिया- नागभीड- चांदाफोर्ट – बल्लारशाह हा रेल्वे मार्ग जास्तीत जास्त जंगलव्यात भागातून आहे. त्यातही नागभीड- चांदाफोर्ट रेल्वे मार्ग घनदाट जंगलातून असुन ताडोबा – अंधेरी राष्ट्रीय व्याघ्र प्रकल्प व घोडाझरी अभयारण्य लागूनच आहे. या रेल्वे मार्गांवर अनेक ठिकाणी वाघ , हरिण , रानगवे , अस्वल यासारखे वन्यप्राणी अपघातात मृत झाल्याच्या घटना घडल्या आहेत. असे असून सुद्धा आजपर्यंत वनविभागाने यावर ठोस उपाययोजना केली नाही.

    चंद्रपूरच्या खासदाराचे दमदार काम

    सिंदेवाही – आलेवाही रेल्वे स्थानकाच्या दरम्यान आज सकाळी बल्लारपूरकडून गोंदियाकडे जाणाऱ्या पॅसेंजर ट्रेनने या वाघाला धडक दिली. मृत वाघ अंदाजे एक वर्षाचा असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल होत त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. घनदाट जंगलातून जाणा-या या रेल्वेमार्गावर वन्यजीव मृत्यूच्या घटना वारंवार होत असून त्या टाळण्यासाठी रेल्वे आणि वनविभाग यांच्यातील समन्वय अधिक मजबूत करण्याची गरज व्यक्त होत आहे. railway line

    आतापर्यंत ३ वाघांचा मृत्यू

    २ जानेवारीला सिंदेवाही वनपरिक्षेत्रात मौजा लाडबोरी येथील शेतशिवारात कुजलेल्या अवस्थेत वाघाचा मृतदेह मिळाला होता, वाघ वयोवृद्ध असल्याने त्याचा नैसर्गिक मृत्यू झाल्याचा अंदाज वनविभागाने नोंदविला होता. ९ जानेवारीला मूल तालुक्यातील भांदुरणा या गावी ५ महिन्याच्या वाघाच्या बछड्याचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला होता. तर १९ जानेवारीला सिंदेवाही – आलेवाही रेल्वे स्थानक दरम्यान रेल्वेच्या धडकेत वाघाचा मृत्यू झाला असल्याची घटना घडली.

  • Paddy planting laborer | धान रोवणी मजुरांसाठी विजय वडेट्टीवार बनले देवदूत

    Paddy planting laborer

    Paddy planting laborer : कर्नाटक राज्यात चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपूरी व सिंदेवाही तालुक्यातील २१ मजूर हे धानपीक रोवणीच्या कामासाठी सुमारे १ महीन्यापुर्वी गेले होते. त्याठिकाणी महीनाभर काम केल्यानंतर मजूरीचे पैसे त्यांना तिथं घेऊन जाणाऱ्या कर्नाटकातील कंत्राटदाराने मजूरांना दिलेच नाही. व तो पसार झाला. त्यामुळे मजूरांकडे गावाकडे परत यायला देखील पैसे नव्हते. ते सगळे संकटात सापडले होते.

    चंद्रपूर जिल्ह्याचे नवे पालकमंत्री अशोक उईके

    अशा स्थितीत संकटात सापडलेल्या मजूरांनी कृउबा संचालक प्रभाकर सेलोकर, माजी नगरसेवक डाॅ.नितीन उराडे, शहर काँग्रेस सचिव पुष्पाकर बांगरे यांच्याशी संपर्क साधून आपली व्यथा सांगितली.

    सदरची बाब ह्या तिन्ही काॅंग्रेस पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र विधानसभेचे माजी विरोधी पक्षनेते तथा ब्रम्हपूरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार यांना कळवली असता लगेचच त्यांनी आपल्या यंत्रणेमार्फत सदर मजूरांपर्यत आर्थिक मदत पोहचवली. व महाराष्ट्रातील आपल्या स्वगृही पोहचण्यासाठी लागणारा खर्च व संपूर्ण सहकार्य देखील आपण करणार असल्याचे सांगितले. (Paddy planting laborer)

    खासदार धानोरकर यांचं दमदार काम

    कर्नाटक राज्यात गेलेल्या मजूरांमध्ये प्रकाश भोयर, तुळशीदास भोयर, माधूरी भोयर, सुनिता कन्नाके रा. आक्सापुर, दिनेश मेश्राम, स्वप्नील मेश्राम, पायल मेश्राम, आशा मेश्राम रा.गडबोरी, देविदास भानारकर, वैशाली सामुसाकडे, गिता भानारकर, रंजू भानारकर रा.मोटेगाव, अशोक जुमनाके, प्रशांत जुमनाके, वंदना जुमनाके, सायली जुमनाके रा.खातगाव, संदीप ठाकरे, वनिता ठाकरे, शिल्पा ठाकरे रा.गिरगाव, चंद्रभागा सामुसाकडे रा.नवरगाव, निशा मेश्राम रा.पाडरवाणी यांचा समावेश आहे.

    हे सर्व मजूर आता परतणार असुन आमदार विजय वडेट्टीवार यांच्या पुढाकाराने हे सर्व शक्य झालं आहे. त्यामुळे सर्व मजूरांनी आमदार विजय वडेट्टीवार यांचे आभार देखील व्यक्त केले आहेत.

  • Guardian Minister Chandrapur | अशोक उईके चंद्रपूर जिल्ह्याचे नवे पालकमंत्री

    Guardian Minister Chandrapur

    Guardian Minister Chandrapur : 18 जानेवारीला महाराष्ट्र सरकारने राज्यातील पालकमंत्र्यांच्या नावाची यादी जाहीर केली आहे.

    यंदा पालकमंत्री यांना सहकार्य करण्यासाठी सह पालकमंत्री सुद्धा नियुक्त करण्यात आले आहे.

    धनंजय मुंडे यांचा पालकमंत्री पदावरून पत्ता कट करण्यात आला असून बीड जिल्ह्याचे पालकमंत्री पद उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वतःकडे ठेवले आहे.

    चंद्रपूर जिल्ह्यातील खासदाराचे दमदार काम

    चंद्रपूर जिल्ह्यातील भाजपचे जेष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांना मंत्रिपद न दिल्याने पालकमंत्री कोण होणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या.
    आज चंद्रपूर जिल्ह्यातील पालकमंत्री म्हणून यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव मतदार संघातील आमदार व आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.


    शिवसेना पक्षातून आपल्या राजकीय पर्वाची सुरुवात करणारे अशोक उईके हे तिसऱ्यांदा विधानसभेवर निवडून आले आहे.


    वर्ष 2024 मध्ये ते भाजप पक्षातून निवडणूक जिंकले.
    अशोक उईके यांच्या विजयात चंद्रपूर लोकसभा क्षेत्राचे माजी खासदार व राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांचा मोठा वाटा आहे.

  • Powerful MP | चंद्रपूर जिल्ह्यातील खासदाराचे दमदार काम

    Powerful MP

    Powerful MP : बामणी हे बल्लारपूर तालुक्यातील महत्वाचे गाव असून जवळपास 10 हजार लोकवस्ती त्या ठिकाणी आहे. खासदार धानोरकर यांच्या बामणी दौऱ्या दरम्याने तेथील नागरीकांनी अनेक समस्या खासदारांसमोर माडल्या.

    चंद्रपुरातील विविध गुन्ह्यात अल्पवयीन मुलांचा वापर

    त्यातील जलद, अतीजलद, इलेक्ट्रिक 9 मी. व 12 मी., तसेच शिवाई, शिवशाही व शिवनेरी या बसेस चा थांबा बामणी येथे मिळावा याकरीता नागरीकांनी मागणी केली होती. त्या संदर्भात खासदार प्रतिभा धानोरकर यांनी मागणीची दखल घेऊन बामणीकर यांची ही समस्या कायमस्वरूपी सोडवीली.

    खासदार प्रतिभा धानोरकर यांनी दौऱ्या दरम्यान बामणी ग्रामपंचायतीला भेट दिली असता. तेथील नागरीकांनी बामणी येथे जलद, अतिजलद, शिवाई, शिवशाही व शिवनेरी या बसेस बामणी येथे थांबत नसल्याने प्रवास्यांची गैरसोय होत असल्याचे खासदार प्रतिभा धानोरकर यांना सांगितले.

    खासदार प्रतिभा धानोरकर यांनी या समस्येची तात्काळ दखल घेऊन सदर समस्या सोडविण्यासाठी विभागीय नियंत्रक राज्यपरिवहन मंडळ, चंद्रपूर यांना आदेशीत केले. त्यासंदर्भाने दि. 15 जानेवारी 2025 रोजी विभागीय नियंत्रक, चंद्रपूर यांनी सर्व आगार व्यवस्थापकांना पत्र देऊन बामणी येथे सर्व बसेस ला थांबा देण्याच्या सुचना दिल्या.

    त्यानुसार पत्र मिळताच आगार प्रमुखांनी चालक व वाहकाला सुचना द्याव्यात, असे देखील पत्रात नमुद केले आहे. सदर समस्येचे तात्काळ समाधान झाल्याने नागरीकांनी खासदार प्रतिभा धानोरकर यांचे आभार मानले.

  • House Breaking | चंद्रपुरातील विविध गुन्ह्यात अल्पवयीन मुलांचा वापर

    House Breaking

    House Breaking : चंद्रपुरातील गुन्हेगारी क्षेत्रात अल्पवयीन मुलांचा सहभाग वाढणे ही आता चिंतेची बाब ठरत आहे, नवीन वर्षात 3 जानेवारीला चंद्रपुरात 4 अल्पवयीन मुलांनी 19 वर्षीय मुलाची अत्यन्त क्रूरपणे हत्या केली होती.

    मात्र आता अल्पवयीन मुले घरफोडीच्या गुन्ह्यात सुद्धा सक्रिय झाले आहे, 17 जानेवारी रोजी चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेने आमटे कॉलोनी, रयतवारी कॉलरी येथे राहणारा 24 वर्षीय मोहम्मद सरफरोज शागिर शाह याला अटक केली.

    चंद्रपूर जिल्ह्यातील शासकीय औद्योगिक संस्थांचे नामकरण

    मोहम्मद सरफरोज ची चौकशी केली असता त्याने घुग्गुस पोलीस स्टेशन हद्दीत व रामनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत घरफोडी केली असल्याचा गुन्हा कबूल केला.

    ह्या गुन्ह्यात 2 विधिसंघर्ष बालक सुद्धा सहभागी असल्याची बाब आरोपीने पोलिसांसमक्ष कबूल केली. आरोपी कडून सोन्या-चांदीचे दागिने व गुन्ह्यात वापरलेले दुचाकी वाहन असा एकूण 3 लाख 67 हजार 690 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

    आरोपीला घुग्गुस पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले असून पुढील तपास घुग्गुस पोलीस करीत आहे. आरोपीचा अजून काही गुन्ह्यात सहभाग आहे का याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहे.

    सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांच्या नेतृत्वात सपोनि दीपक कांकेडवार, पोउपनी संतोष निंभोरकर, पोलीस कर्मचारी चेतन गजलवार, जयंता चुनारकर, नितेश महात्मे, अमोल सावे, प्रफुल्ल गारघाटे, किशोर वाकाटे, अपर्णा मानकर, दीपिका सोडणार व दिनेश अराडे सहित सायबर पोलिसांनी केली.

  • Naming of Government ITIs | चंद्रपूर जिल्ह्यातील 9 शासकीय औद्योगिक संस्थांचे नामकरण

    Naming of Government ITIs

    Naming of Government ITIs : कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या पुढाकारामुळे महाराष्ट्रातील 132 शासकीय औद्योगिक संस्थांचे नामकरण करण्यात आले आहे. प्रथम 14 शासकीय औद्योगिक संस्थांचे नामकरण करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाद्वारे घेण्यात आला होता.

    चंद्रपूर जिल्ह्यातील बेरोजगारांना परदेशात नोकरीची सुवर्णसंधी

    महाराष्ट्रातील फक्त 2 औद्योगिक संस्था सोडल्या तर इतर औद्योगिक संस्थांना या आधी कोणत्याही प्रकारची नावे नव्हती. त्यांनतर कौशल्य विकास विभागाद्वारे महाराष्ट्रातील शासकीय औद्योगिक संस्थांसाठी नागरिकांकडून नावाबाबत सूचना मागवण्यात आल्या होत्या. त्याप्रमाणे राज्यातील 132 आयटीआयचे नामकरण करण्याचा निर्णय आज जाहीर करण्यात आला.

    राज्यातील अकोला,  अमरावती,  कोल्हापूर,  गडचिरोली,  गोंदिया, चंद्रपूर, छत्रपती संभाजीनगर,  जळगाव,  जालना,  धाराशिव, धुळे, नंदुरबार, नागपूर, नांदेड, नाशिक, परभणी, बीड, बुलढाणा, भंडारा, मुंबई उपनगर,  यवतमाळ,  रत्नागिरी,  रायगड, लातूर, वर्धा, वाशिम, सांगली, सातारा, सोलापूर आणि हिंगोली जिल्ह्यातील शासकीय औद्योगिक संस्थांना नवीन ओळख मिळाली.

    चंद्रपूर जिल्ह्यातील 9 शासकीय औद्योगिक संस्थांचे नामकरण : चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेस स्व. यशवंत बाजारे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था असे नामकरण, मुल शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेस मा.सा. कन्नमवार, सिदेंवाही शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेस रामभाऊ बोंडाळे, गोंडपिपरी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण (आदिवासी) संस्थेस नल-नील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, राजुरा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण (आदिवासी) संस्थेस लाला लजपतराय, 

    चंद्रपूर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेस ऋषी अगस्त्य, नागभिड शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेस आचार्य प्रफुल्लचंद्र रे, सावली शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेस क्रांतिकारी खुदीराम बोस, वरोरा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेस गजानन पेंढारकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, वरोरा असे नामकरण करण्यात आले आहे. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील 9 शासकीय औद्योगिक संस्थांना नवीन ओळख मिळाली आहे.

  • employment opportunities in israel | चंद्रपूर जिल्ह्यातील बेरोजगारांना रोजगाराची सुवर्णसंधी

    employment opportunities in israel

    employment opportunities in israel : कौशल्य‍, रोजगार, उद्योजकता व नाविण्यता विभागांतर्गत महाराष्ट्र इंटरनॅशनलच्या सहाय्याने जिल्ह्यातील बेरोजगार युवकांना इस्राईलमध्ये जागतिक स्तरावर रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यात येत आहे.

    इस्राईलमधील होमबेस केअरगिवर या पदासाठी 10 वी उत्तीर्ण व हेल्थ सेक्टरमधील 990 तासांचा शासन मान्यताप्राप्त कोर्स केलेले, जीडीए, ए.एन.एम, जी.एन.एम. बी.एससी नर्सिंग, फिजीओथेरपी आदी शिक्षण असणारे, 25 ते 45 वर्ष वयोगटातील उमेदवार प्राप्त आहेत.

    युको बँकेत रोजगाराची संधी

    सदर पदाकरीता महिलांना प्राधान्य राहील. उमेदवारांना इंग्रजीमध्ये संभाषण करता येणे आवश्यक आहे. सदर पदाकरीता 1 लाख 30 हजार मासिक मानधन असणार आहे.

    https://maharashtrainternational.com या संकेतस्थळावर अधिक माहिती उपलब्ध असून युवकांनी सदर संकेतस्थळावर नोंदणी करुन जागतिक स्तरावर उपलब्ध रोजगार संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त भैय्याजी येरमे यांनी केले आहे.