Category: क्रीडा

क्रीडा (Sports) जगतातील प्रत्येक ब्रेकिंग न्यूज आणि सविस्तर अपडेट्स वाचा news34.in वर. क्रिकेट, फुटबॉल, कबड्डी, आणि स्थानिक स्तरावरील सर्व खेळांचे निकाल, सामन्यांचे विश्लेषण आणि खेळाडूंच्या मुलाखती येथे त्वरित उपलब्ध होतात. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधील महत्त्वाच्या घडामोडींचे कव्हरेज आम्ही देतो. क्रीडा बातम्या (Krida Batmya) आणि रोमांचक माहितीसाठी नियमितपणे भेट द्या.

  • Cultural Festival : मूल येथे झाडीपट्टी सांस्कृतिक महामहोत्सव

    Cultural Festival : मूल येथे झाडीपट्टी सांस्कृतिक महामहोत्सव

    News34 chandrapur

    गुरू गुरनुले

    मूल – महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक विभागाच्या अंतर्गत सांस्कृतिक कार्य महासंचालनालय मुंबई व जिल्हा प्रशासन चंद्रपूर यांच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात व चंद्रपूर जिल्हा भाजपा अध्यक्ष हरीश शर्मा यांच्या मार्गदर्शनात मूल येथे दिनांक १८,१९ व २० फेब्रुवारीला झाडीपट्टी सांस्कृतिक महामहोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

     

     

    या तीन दिवसात विविध सांस्कृतिक कार्यक्रमाची मांदीयाळी रंगणार आहे. झाडीपट्टीतील चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील झाडीपट्टी कलाकार यात भाग घेणार आहेत. विकास पुरुष नाम. सुधीर मुनगंटीवार यांच्या सुयोग्य नेतृत्वात व मार्गदर्शनात हा झाडीपट्टी महा महोत्सव पार पडणार आहे.

     

     

    झाडीपट्टीतील जेष्ठ कलावंत पद्मश्री डॉ.परशुराम खुणे यांच्या मार्गदर्शनात व नाट्य कलावंत सदानंद बोरकर, देवेंद्र दोडके,मुकेश गेडाम, शेखर डोंगरे, अनिरुद्ध वनकर, युवराज प्रधान, युवराज गोंगले,अरविंद झाडे यांच्या सहकार्याने विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी कला रसिकांना मिळणार आहे. तीन दिवस चालणाऱ्या या झाडीपट्टी महामहोत्सवात नाटक, दंडार, खडीगंमत, रेला नृत्य,आदिवासी नृत्य, कीर्तन, भुलाबाईची गाणी, रोवण्याची गाणी, महादेवाची गाणी, डहाका, संबळ, सुमधुर सुगम संगीत आदी कार्यक्रम या महोत्सवात सादर केले जाणार आहेत.

     

    दिनांक 19 फेब्रुवारीला शिवजयंतीच्या पर्वावर मूल शहरातून सांस्कृतिक महोत्सवानिमित्त रॅलीचे आयोजन केले आहे. या रॅलीत नाम. सुधीर मुनगंटीवार,सिने कलावंत, सिने अभिनेत्री आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या रॅलीत विविध नेत्रदीपक देखावा सादर केल्या जाणार आहेत. तीन दिवस चालणारे या सांस्कृतिक महोत्सवाचा नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन मूल येथील झाडीपट्टी सांस्कृतिक महामहोत्सव समितीने केले आहे.

  • Chandrapur Yuvasena : चंद्रपुरातील युवासेनेत असंख्य युवकांचा प्रवेश

    Chandrapur Yuvasena : चंद्रपुरातील युवासेनेत असंख्य युवकांचा प्रवेश

    Chandrapur yuvasena चंद्रपूर – राज्याच्या राजकारणात दिवसेंदिवस होणारा बदल व सध्याची परिस्थिती बघता युवकांचा कल शिवसेना ठाकरे गटाकडे वाढत आहे. 

    त्या दलालांविरुद्ध अनुसूचित जनजाती आयोगाकडे तक्रार

    Chandrapur yuvasena चंद्रपुरातील वडगाव येथील अनेक युवकांनी रविवारी शिवसेना प्रणित युवासेनेत प्रवेश केला. सदर पक्षप्रवेश कार्यक्रम शिवसेना कार्यालयात पार पडला.

    शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे व युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेनेचे उपशहर प्रमुख स्वप्नील पाटील यांच्या नेतृत्वात वडगाव येथील युवकांनी जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे यांच्या उपस्थितीत युवासेनेत प्रवेश केला, यावेळी सहारे यांनी उपस्थित युवकांच्या गळ्यात दुपट्टा टाकत स्वागत केले.

    यावेळी राहुल वाढई, मयूर येरगुडे, प्रतीक कोकांडे, शिवम बलकी, श्रेयश देवाळकर, मोहम्मद शेख, आकाश बलकी, महेश देरकर, सौरभ भोयर, अंकित वैद्य, गिरीश रामटेके, आर्यन निमकर, सूरज बलकी, प्रतीक बोरीकर, रोहित मडावी व शुभम बलकी यांनी प्रवेश केला.

    आयोजित पक्षप्रवेश कार्यक्रमात युवासेना शहर प्रमुख शाहबाज शेख, गणेश ठाकूर, शाहरुख शेख, चेतन भाऊ व अनिकेत चंदनखेडे यांची उपस्थिती होती.

    चंद्रपूर जिल्ह्यात वेगवेगळे राजकीय पक्ष आहे, मात्र त्या पक्षांना सोडून युवक युवासेनेत प्रवेश करीत आहे, राजकारणात युवकांनी मोठ्या संख्येत सहभाग घ्यायला पाहिजे त्यानंतर प्रस्थापित नेत्यांची मक्तेदारी संपुष्टात येईल. संदीप गिर्हे यांनी शिवसेना पक्षात जीव ओतून काम करीत एक चांगल संगठना उभी केली, त्यांनतर युवासेना मध्ये विक्रांत सहारे हे दिवसेंदिवस पक्षात नवनव्या युवकांचा पक्ष प्रवेश घेत आहे, त्यामुळे पक्षाची ताकद नक्कीच वाढणार.

  • Ashok Chavhan Resignation : माजी मुख्यमंत्री चव्हाण यांच्या राजीनाम्यावर विजय वडेट्टीवार यांची महत्वाची प्रतिक्रिया

    Ashok Chavhan Resignation : माजी मुख्यमंत्री चव्हाण यांच्या राजीनाम्यावर विजय वडेट्टीवार यांची महत्वाची प्रतिक्रिया

    News34 chandrapur

    चंद्रपूर – कांग्रेसचे माजी मुख्यमंत्री व आमदार अशोक चव्हाण यांनी कांग्रेस सदस्यपदाचा 12 फेब्रुवारीला दुपारी 3 वाजता राजीनामा दिल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ माजली होती, ते भाजपात जाणार काय? अशी चर्चा सर्वत्र रंगू लागली आहे. Maharashtra congress

     

    अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यावर विरोधी पक्ष नेता विजय वडेट्टीवार यांनी महत्वाची प्रतिक्रिया दिली आहे. Ashok chavhan resignation

     

    अशोक चव्हाण यांचा निर्णय धक्कादायक असून मी गेली सोळा वर्षे त्यांच्यासोबत काम केले आहे. त्यांच्या मंत्रिमंडळात देखील मी सोबत काम केले आहे. मात्र गेले काही महिने त्यांच्या मागे चौकशीचा फेरा होता अशी देखील माहिती आहे. त्याबाबत फारसे स्पष्ट झालेले नाही.

     

    अशोक चव्हाण यांच्या काँग्रेस सोडण्याच्या वार्ता माझ्या बाबतीतही जोडल्या गेल्या. मात्र मी सध्या मतदारसंघात आहे. त्यांनी कोणाशी चर्चा केली हेही कळू शकलेले नाही.

  • RTE Scheme : चंद्रपुरात शिक्षणाचा अधिकार योजनेपासून शाळा दुरावणार?

    RTE Scheme : चंद्रपुरात शिक्षणाचा अधिकार योजनेपासून शाळा दुरावणार?

    News34 chandrapur

    चंद्रपूर – सर्वाना शिक्षणाचा समान अधिकार मिळावा यासाठी देशात RTE योजना सुरू करण्यात आली, सदर योजनेत पहिली ते आठवी पर्यंत शिक्षण विद्यार्थ्यांना मोफत मिळते.

     

    मात्र आता या योजनेत महाराष्ट्र शासन दुर्लक्ष करीत आहे, चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक शिक्षण संस्था ही योजना राबवितात मात्र या योजनेद्वारे शासनातर्फे मिळणारा निधी शाळांना मिळत नाही आहे. Right to education

     

     

    जिल्ह्यात वर्ष 2018 पासून शाळांना तुटक-तुटक पैसे मिळत आहे, याबाबत तात्काळ तोडगा निघावा याकरिता विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ कॉन्व्हेंट विभाग व मेस्टा चंद्रपूर द्वारे कॉन्व्हेंट संचालक व मुख्याध्यापक यांची बैठक घेण्यात आली. Maharashtra government

     

     

    प्रत्येक शिक्षण संस्थेत RTE योजनेचा 25 टक्के कोटा निर्धारित असो याद्वारे दरवर्षी विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जात आहे.

     

    यावेळी शिक्षक संघाचे कार्यवाह सुरेंद्र अडबाले, कॉन्व्हेंट विभागाचे अध्यक्ष फैय्याज अहमद, सचिव सिमरन साहनी, मेस्टा चंद्रपूर चे आनंद कवाडे, प्रमोद पेद्दीलवार व KGN शाळेचे संचालक महमूद सर यांची बैठकीला उपस्थिती होती.

     

     

    कॉन्व्हेंट विभागाचे अध्यक्ष फैय्याज अहमद यांनी या योजनेचे पैसे रखडले असल्याने त्यामुळे काय समस्या निर्माण झाल्या याबाबत अडबाले यांना माहिती दिली, अडबाले यांनी शिक्षक आमदार सुधाकर अडबाले यांना याबाबत माहिती दिल्या जाणार व जर प्रलंबित पैसे मिळाले नाही तर प्राथमिक शिक्षणाधिकारी यांच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन करू अशी माहिती अडबाले यांनी दिली.

  • Chandrapur Film Festival : राज्यात आता मराठी चित्रपट उत्सव – मंत्री सुधीर मुनगंटीवार

    Chandrapur Film Festival : राज्यात आता मराठी चित्रपट उत्सव – मंत्री सुधीर मुनगंटीवार

    News34 chandrapur

    चंद्रपूर – चित्रपट हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून त्याच्या कथानकामध्ये एक अद्भूत शक्ती असते. डॉक्टर पेक्षा चित्रपटाच्या डायरेक्टरचा हात प्रेक्षकांच्या थेट हृदयापर्यंत पोहचतो. अशी चित्रपटसृष्टी राज्यात टिकली पाहिजे, यासाठी आपण सदैव प्रयत्नशील असून फिल्म फेस्टीवलच्या धर्तीवर आता भव्यदिव्य मराठी चित्रपट उत्सव सुरू करणार असल्याची ग्वाही राज्याचे सांस्कृतिक मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. Film festival chandrapur

     

     

    चंद्रपूर येथील मिराज सिनेमा येथे दुस-या चंद्रपूर इंटरनॅशनल फिल्म फेस्टीवलचे उद्घाटन करतांना ते बोलत होते. यावेळी मंचावर प्रसिध्द दिग्दर्शक तथा पुणे फिल्म फेस्टीवलचे अध्यक्ष डॉ. जब्बार पटेल, जिल्हाधिकारी विनय गौडा, मनपा आयुक्त विपीन पालीवाल, प्रसिध्द दिग्दर्शक समर नखाते, वल्ली चित्रपटाचे दिग्दर्शक मनोज शिंदे, अभिनेता देवा गाडेकर यांच्यासह हरीश शर्मा, राहुल पावडे, डॉ. मंगेश गुलवाडे, प्रकाश धारणे आदी उपस्थित होते. World of cinema

     

     

    भाषेपूर्वी अभिनयातून संवाद साधला जात होता, असे सांगून मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले,  1913 मध्ये आलेला ‘राजा हरीशचंद्र’ हा चित्रपट मूकपट होता. अभिनयातून तो प्रेक्षकांना कळला. 1932 मध्ये ‘अयोध्येचा राजा’ हा चित्रपट आला. वैशिष्ट म्हणजे अयोध्येशी चंद्रपूरचे एक वेगळे नाते तयार झाले आहे. प्रभु रामाच्या मंदिरासाठी चंद्रपूर जिल्ह्याचे सागवान गेले असून कुठल्याही भाविकाला अयोध्या येथे दर्शनासाठी चंद्रपूरच्या लाकडाच्या दरवाज्यातूनच जावे लागेल, असा उल्लेख त्यांनी आवर्जून केला.

     

     

    पुढे श्री. मुनगंटीवार म्हणाले, महाराष्ट्राचे वर्णन हे ‘चांदा ते बांदा’ असे केले जाते. त्यामुळे गत दोन वर्षापासून फिल्म फेस्टिवल चंद्रपूरमध्ये घेण्याचा निर्णय घेतला. चंद्रपूर जिल्हा हा खनीज आणि कोळसाकरीता प्रसिध्द आहे. कोळसा खाणीत हिरा सापडतो तसे चंद्रपूरमध्ये अभिनयातील कोहीनूर आहेत. जयंत सोमलकर, ‘एका रात्रीचा पाऊस’ या चित्रपटाच्या निर्मात्या प्रतिष्ठा ताई ह्या चंद्रपूरच्या आहेत. आपल्या जिल्ह्यात कलाकारांची कमी नाही, त्यांना संधी मिळवून दिली तर नक्कीच ते संधीचे सोने करतील, त्यासाठीच चंद्रपूर इंटरनॅशनल फिल्म फेस्टीवल घेण्याचा प्रयत्न केला आहे. या माध्यमातून येथील कलाकार प्रेरणा घेऊन अभिनय, दिग्दर्शन, निर्माता या क्षेत्रात आपला ठसा उमटवतील. येथील कलाकाराला राष्ट्रीय फिल्म फेअर अवार्ड मिळावा व चंद्रपूरची शान जगामध्ये वाढावी, असा आशावाद सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.

     

    सुधीरभाऊंनी जागतिक सिनेमा चंद्रपुरात आणला : दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल

    चंद्रपूर इंटरनॅशनल फिल्म फेस्टीवलचे हे दुसरे वर्ष आहे. चंद्रपूर आणि आजुबाजूच्या परिसरात चित्रपटाच्या शुटींगकरीता लागणारे सुंदर लोकेशन आहे. येथेही अभिनेते आणि दिग्दर्शक घडावे, याासाठी राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जागतिक सिनेमा चंद्रपुरात आणला, असे गौरवोद्गार प्रसिध्द दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांनी काढले.

     

    पुढे ते म्हणाले, जगातील सामाजिक आशय आजचा तरुण टिपत आहे. समाजामध्ये शांततेचा संदेश देण्यासाठी यावर्षी पांढरे कबुतर हे चित्रपट महोत्सवाचे बोधचिन्ह ठेवले आहे.

     

    मुंबई बाहेर चंद्रपूर, लातूर, औरंगाबाद येथेही पुणे फिल्म फेस्टीवलचे आयोजन होत आहे.  या तीन दिवसात चंद्रपूरकरांसाठी उत्कृष्ट चित्रपटांची मेजवानी पालकमंत्री सुधीरभाऊंनी उपलब्ध करून दिली आहे, याचा प्रेक्षकांनी लाभ घ्यावा. कारण सुधीरभाऊंमध्ये उत्कृष्ट रसिकता असल्यामुळेच हे शक्य झाले आहे, असेही डॉ. जब्बार पटेल म्हणाले.

     

     

    मुंबईच्या फिल्मसीटी बाहेर चित्रपटाची शुटींग नि:शुल्क : मुंबई फिल्मसिटीबाहेर इतर जिल्ह्यात चित्रपटाची शुटींग करायची असेल तर ‘वन विंडो सिस्टीम’ सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच शुटींगसाठी कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही.

     

    75 नाट्यमंदिराची निर्मिती: स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त तसेच नाट्य परिषदेचे हे 100 वे वर्ष असल्यामुळे राज्यात 75 नाट्यमंदिराची निर्मिती करण्यात येणार आहे. त्यासाठी 9 कोटी 33 लक्ष रुपये मंजूर करण्यात आले आहे.

     

    फिल्मसिटीत सर्व सुविधा उपलब्ध होणार : मुंबई येथील फिल्मसिटी 521 एकरमध्ये आहे. तसेच त्यालगत 104 चौ. किमी. मध्ये संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आहे. या ठिकाणी चित्रपटासाठी लागणा-या सर्व अत्याधुनिक व्यवस्था उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

     

    मान्यवरांचा सत्कार : यावेळी सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते प्रसिध्द दिग्दर्शक समर नखाते, वल्ली या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शक मनोज शिंदे, अभिनेता देवा गाडेकर, मिराज सिनेमाचे रौनक चोरडीया यांचा सत्कार करण्यात आला.

  • Vishwa Hindu Parishad : जय श्री रामाच्या घोषणा देत चंद्रपुरातील नागरिक अयोध्येला रवाना

    Vishwa Hindu Parishad : जय श्री रामाच्या घोषणा देत चंद्रपुरातील नागरिक अयोध्येला रवाना

    Vishwa Hindu Parishad चंद्रपूर – अयोध्या येथे 22 जानेवारीला श्रीराम मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली होती, त्यादिवशी देशात दिवाळी सारखे वातावरण तयार झाले होते.

    Vishwa hindu parishad अनेक वर्षांनी राम मंदिर निर्माण झाल्याने चंद्रपूर जिल्ह्यातील विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाचे तब्बल 60 कार्यकर्ते आज 11 फेब्रुवारीला दुपारी 4 वाजता अयोध्येला रवाना झाले.

    अभय योजनेची प्रभावी अंमलबजावणी करा – आमदार किशोर जोरगेवार

    यामध्ये 40 पुरुष व 20 महिलांचा समावेश आहे, श्री रामाचे दर्शन केल्यावर 2 दिवस अयोध्येला मुक्काम करीत नागरिक परत येणार आहे.

    यावेळी विश्व हिंदू परिषदेचे माजी प्रांताध्यक्ष रमेश बागला यांनी 35 वर्षांपूर्वीच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.

    यावेळी बागला यांनी बस ला झेंडी दाखवीत पुढच्या प्रवासासाठी रवाना केले.

    मागील अनेक वर्षे हा लढा सुरू होता, अनेक कार सेवकाना तुरुंगात डांबत त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्यात आली होती.

    विशेष म्हणजे जिल्ह्यातील जेष्ठ विश्व हिंदू परीषदेचे नेते रमेशचंद्र बागला यांनी पुढाकार घेत आपल्या सदस्यांना राम मंदिराचे मोफत दर्शनाचा लाभ मिळावा यासाठी प्रार्थना काफीत आहे.

    यंदा 60 कार्यकर्ते अयोध्या गेले आहे तर पुढच्या वेळी अजून 60 कार्यकर्त्यांना राम मंदिराचे दर्शन आम्ही घडवुन आणू असा विश्वास रमेश्चंद्र यांनी अशी प्रतिक्रिया दिली आहे. पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उदघाटीत मंदिराचे दर्शन घेणे हा अतिशय एक पवित्र अनुभव आहे अशी प्रतिक्रिया नागरिकांनी यावी दिल्या.  यावेळी असंख्य विश्व हिंदू परीषद चे कफायकर्ते उपस्थित हप्ते.

  • Industrial Expo : चंद्रपुरात “इंडस्ट्रियल एक्सपो बिजनेस अँड इन्व्हेस्टमेंट कॉनक्लेव्ह

    Industrial Expo : चंद्रपुरात “इंडस्ट्रियल एक्सपो बिजनेस अँड इन्व्हेस्टमेंट कॉनक्लेव्ह

    News34 chandrapur

    चंद्रपूर – चंद्रपुरात “इंडस्ट्रियल एक्सपो बिजनेस अँड इन्व्हेस्टमेंट कॉनक्लेव्ह”चे आयोजन 1 व 2 मार्च रोजी करण्यात येत आहे. या एक्सपोच्या यशस्वी आयोजनाबाबत जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी जिल्ह्यातील उद्योजकांसमवेत आढावा घेतला. Industrial Expo in chandrapur

     

     

    जिल्हाधिकारी कार्यालयातील विस कलमी सभागृहात पार पडलेल्या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, मनपा आयुक्त विपिन पालीवाल, निवासी उपजिल्हाधिकारी संजय पवार, उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार, रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त भैय्याजी येरमे, विशेष कार्य अधिकारी डॉ. विजय इंगोले, तसेच जिल्ह्यातील विविध औद्योगिक संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते.

     

     

    जिल्हाधिकारी विनय गौडा म्हणाले, नागपूर येथे नुकतेच औद्योगिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. त्याच धर्तीवर चंद्रपुरात “इंडस्ट्रियल एक्सपो बिजनेस अँड इन्व्हेस्टमेंट कॉनक्लेव्ह”चे आयोजन करण्यात येत आहे. 1 व 2 मार्च या दोन दिवसीय कालावधीत वन अकादमी येथे सदर कार्यक्रम पार पडणार आहे. यासाठी उद्योग विभागाने प्लॅन करून योग्य नियोजन करावे. एमआयडीसी क्षेत्रासोबतच जिल्ह्यातील इतरही उद्योगांची यादी तयार करावी. एक्सपो कार्यक्रमाबाबत सर्व उद्योगांना कळवावे. तसेच जिल्ह्यातील विविध उद्योगांशी संबंधित असलेल्या संघटना व लोकांना एक्सपोमध्ये आमंत्रित करावे. Chandrapur Industries

     

     

    जिल्हाधिकारी श्री. गौडा पुढे म्हणाले, सदर एक्सपोमध्ये 200 स्टॉल उभारण्याचे नियोजन आहे. यासाठी जागा निश्चित करावी. जिल्ह्यातील मायनिंग आणि मिनरल्स, कोल, आयरन, स्टील, सिमेंट मॅन्युफॅक्चरिंग, शिक्षण, एफ.आय.डी.सी, टुरिझम, पावरप्लांट, फ्लाईंग क्लब, बांबू आणि पेपर उद्योग आदी उद्योगांचे स्टॉल उभारणे अपेक्षित आहे. या एक्सपोमध्ये संबंधित उद्योगांवर आधारित मार्गदर्शकांचे मार्गदर्शनपर सत्र पार पडणार आहे. सदर सत्र विहित वेळेत पार पाडण्यासाठी नियोजन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी श्री. गौडा यांनी बैठकीत दिल्या.

  • Film Festival : चंद्रपुरात दुसऱ्या आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलचे उदघाटन

    Film Festival : चंद्रपुरात दुसऱ्या आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलचे उदघाटन

    News34 chandrapur

    चंद्रपूर – आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय सिनेमा आणि या क्षेत्रात काम करणारी मंडळी दर्जेदार आणि गुणसंपन्न आहे; परंतु जगातील तसेच भारतातील उत्तम चित्रपट चंद्रपूरच्या रसिकांना बघता यावे यासाठी पुणे फिल्म फेस्टिवलच्या धर्तीवर चंद्रपूर फिल्म फेस्टिवल (सिफ) चे आयोजन मागील वर्षीपासून करण्यात आले आहे.

     

    आज 9 फेब्रुवारी पासून दुसऱ्या तीन दिवसीय चंद्रपूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे मिराज सिनेमा येथे सांस्कृतिक कार्य मंत्री पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते रात्री 8.30 वाजता उदघाटन करण्यात आले.

     

     

    उदघाटन कार्यक्रमात जेष्ठ दिग्दर्शक निर्माते जब्बार पटेल, जिल्हाधिकारी विनय गौडा, मनपा आयुक्त विपीन पालिवाल उपस्थित होते.

     

    ९ ते ११ फेब्रुवारी २०२४ दरम्यान मिराज सिनेमा येथे संपन्न होणाऱ्या या महोत्सवाची “सिनेमा इज़ होप” ही थीम आहे.

     

    महोत्सवात एकूण देश विदेशातील १७ चित्रपटांचे प्रदर्शन होणार आहे. हे सर्व चित्रपट इंग्लिश सबटायटल सहित प्रेक्षकांना पाहण्याची संधी लाभणार आहे.

     

     

    यावेळी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चित्रपटातील अभिनय यावर विस्तृत मार्गदर्शन केले, जेव्हा भाषेचा जन्म झाला नसेल तर एखादी वस्तू मागताना सुद्धा ते अभिनयाने मागितली जात असेल.
    यावेळी शहरातील असंख्य सिनेरसिकांची उपस्थिती होती.

  • Vegetable seller : चंद्रपुरात चिल्लर भाजीपाला विक्रीचा वाद शिगेला

    Vegetable seller : चंद्रपुरात चिल्लर भाजीपाला विक्रीचा वाद शिगेला

    Vegetable seller चंद्रपूर – चंद्रपुरात कृषी उत्पन्न बाजार समिती मधील ठोक भाजीपाला विक्रेता व्यापाऱ्यांनी मनमर्जी वागत भाजीपाल्याची चिल्लर विक्री सुरू केली आहे, ते पूर्णतः नियमबाह्य आहे, त्या चिल्लर विक्रीमुळे गंजवार्ड येथील भाजीपाला विक्रेत्यांवर उपासमारीची पाळी आली आहे.

    त्या दलालांविरोधात अनुसूचित जनजाती आयोगाला तक्रार

    Vegetable seller ठोक व्यापाऱ्यांनी चिल्लर विक्री बंद न केल्यास गंजवार्ड येथील भाजी विक्रेता संघटना 12 फेब्रुवारीला कृषी उत्पन्न बाजार समिती समोर ठिय्या आंदोलन करणार असा इशारा 9 फेब्रुवारीला आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आला आहे.
    विशेष म्हणजे सदर चिल्लर विक्री ही ठोक व्यापारी व बाजार समिती संचालकांनी सुरू केली आहे.

    चंद्रपुरात आता ठोक व चिल्लर भाजी विक्रेत्यांचा वाद येणाऱ्या काळात वाढणार असल्याची चिन्हे आहे.

    चंद्रपूर शहरात दररोज पहाटे कृषी उत्पन्न बाजार समिती मार्केट मध्ये शेतकरी भाजीपाला घेऊन दाखल होतात, सदर भाजीपाल्याची बोली लागल्यावर लहान व्यापारी ते खरेदी करतात, आणि बाजारात विक्रीसाठी आणतात मात्र सध्या मोठे व्यापारी चिल्लर विक्री करीत असल्याने लहान व्यापाऱ्यांचा माल कुणी खरेदी करीत नाही, त्यामुळे मोठ्या व्यापाऱ्यांनी चिल्लर विक्री बंद अशी मागणी लहान व्यापाऱ्यांनी केली आहे.

    छोटे व्यापारी म्हणतात की आम्ही चिल्लर विक्री करीत आपल्या परिवाराचे पोषण करतो मात्र मोठे व्यापारी आमच्या पोटावर लाथ मारू बघत आहे, हे अत्यन्त चुकीचे आहे त्यांनी आता चिल्लर विक्री थांबवायला हवी. अन्यथा आम्हाला मोठ्या व्यापारी विरोधात आंदोलन करावे लागेल.

  • Big Accident : काम आटोपून ते घराकडे येत होत्या पण मध्येचं घडलं भीषण

    Big Accident : काम आटोपून ते घराकडे येत होत्या पण मध्येचं घडलं भीषण

    News34 chandrapur

    चंद्रपूर : ब्रम्हपूरी शहरापासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या माहेर या गावातून वर्धा जिल्ह्यात चणा कापणीसाठी गेलेल्या १७ महिला सुमो गाडीतून काम आटोपून परतत असताना, उमरेड तालुक्यातील सिर्सीजवळ काल गुरुवारी रात्री साडेनऊच्या सुमारास वाहन उलटल्याने तीन महिलांचा जागीच मृत्यू झाला. चालकासह १४ महिला गंभीर जखमी झाल्या.

     

    ब्रह्मपुरी शहराजवळील माहेर येथील १७ महिला गेल्या काही दिवसांपासून वर्धा जिल्ह्यात चणा कापणीसाठी जात होत्या. याकरीता महिलांनी सुमो वाहन भाड्याने घेतले होते. ते वाहन महिला कामगारांना दररोज ने आण करीत होते. काल गुरूवारी चालकाने माहेर गावातून पहाटेला १७ महिलांना सुमो वाहनात बसून पिंपरी गावी चना कापणीला घेऊन गेला होता. दिवसभर चणा कापणीच्या कामानंतर सायंकाळी साडेसातच्या सुमारास उमरेड तालुक्यातील सिर्शी जवळ परत येत असताना महिलांचे वाहन उलटून गंभीर अपघात झाला.

     

     

    अपघातामध्ये रत्नमाला मेश्राम, इंदिरा महाजन, रसिका बागडे या महिलांचा जागीच मृत्यू झाला. तर तनवी विनोद मेश्राम, दुर्गा विजय आडकिने, संगीता देविदास आडकिने, वीणा विक्रांत अडकिने, सोनाबाई सिद्धके, संध्या संतोष बागडे, सरिता विजय नागापुरे, मनोरथा शांताराम मेश्राम, राजश्री राजेश्वर मेश्राम, बेबी ईश्वर मेश्राम, जनाबाई अर्जुन बावणे, अश्विनी अरविंद बागडे या महिलांसह वाहन चालक शंकर प्रभाकर मसराम (३०) रा. जांभुळघाट गंभीर जखमी झाला.

     

    घटनेची माहिती मिळताच माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सतीश वारजुकर यांनी घटनास्थळ गाठून मदत कार्याला सुरुवात केली. एका रुग्णवाहिकेतून तीन महिलांचे शव उमरेड येथे पाठविण्यात आले. उर्वरित जखमींना चार रुग्णवाहिकेतून नागपूर येथे हलविण्यात आले असून स्वतः सतीश वारजुकर जखमी सोबत नागपूरला गेले आहेत. घटनेने माहेर गावात शोककळा पसरली आहे.