News34 chandrapur
Category: राजकारण
महाराष्ट्रातील राजकारण बातम्या (Maharashtra Politics News) आणि राष्ट्रीय स्तरावरील सर्व राजकीय घडामोडींसाठी news34.in हे आपले विश्वसनीय व्यासपीठ आहे. आम्ही तुम्हाला स्थानिक ग्रामपंचायत निवडणुकांपासून ते लोकसभा निवडणुकीपर्यंतच्या प्रत्येक मोठ्या-छोट्या अपडेट्सचे कव्हरेज देतो. राजकीय विश्लेषण, पक्षांची धोरणे, नेत्यांची मते आणि महत्त्वाचे शासकीय निर्णय. कोणत्याही राजकीय बातम्या चुकणार नाहीत याची खात्री बाळगा. राजकारण या क्षेत्रातील विश्वसनीय आणि ताज्या बातम्या मिळवण्यासाठी नियमितपणे भेट द्या.
-

सरकारच्या चहापानावर बहिष्कार; महाविकास आघाडीची भूमिका
नागपूर :-राज्यावर दुष्काळ, पाणीटंचाई व अवकाळीचे संकट उभे ठाकले असून शेतकऱ्यांच्या डोळयात अश्रु आहेत. अशा वेळी शेतकऱ्यांची झोप उडाली असताना सरकार मात्र सुस्त आहे. शेतकऱ्यांची ही दुर्देवी परिस्थिती असताना सरकारने चहापानाचा कार्यक्रम टाळायला हवा होत. हा कार्यक्रम टाळला असता तर शासन शेतकऱ्यांबरोबर असल्याचा दिलासा राज्यातील शेतकरी, शेतमजूर यांना मिळाला असता. दुर्देवाने सरकारने शेतकऱ्याप्रती ही संवेदनशीलता दाखवली नाही. पण संपूर्ण राज्यातील शेतकरी दुष्काळ, पाणीटंचाई व अवकाळीचे चटके भोगत असताना आम्ही चहापान कार्यक्रमास उपस्थित राहणे हा संकटात होरपळत असलेल्या शेतकऱ्याप्रती द्रोह ठरेल. त्यामुळे चहापान कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याची भूमीका महाविकास आघाडी सरकारने घेतली आहे. असे विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.आज नागपूर येथील रविभवन येथे अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या पत्रकार परिषदेत श्री. वडेट्टीवार बोलत होते. यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, आमदार बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार जयंत पाटील, आमदार अनिल देशमुख, शिवसेनेचे आमदार सुनिल प्रभू, शेकापचे जयंत पाटील, आमदार राजेश राठोड आदी मान्यवर उपस्थित होते.श्री. वडेट्टीवार म्हणाले की, राज्यावरील वाढलेले कर्ज, शेतकऱ्यांची दैन्यावस्था, शेती क्षेत्राची दुरावस्था, शासकीय रुग्णालयात मृत्यूतांडव, राज्यातील पाणीटंचाई परिस्थीती, स्मारकांची स्थिती, आरक्षणाबाबतची असंवेदनशीलता, अल्पसंख्यांकाबाबत नकारात्मक दृष्टीकोन, कंत्राटी भरती व बेरोजगारीमुळे युवकांमधील वाढता रोष, कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे, सरकारची प्रसिध्दीची हाव, स्थानिक स्वराज्य संस्थांवर प्रशासक, अंतर्गत सत्ता स्पर्धेचे दुष्परीणाम, विदर्भातील कापूस, धान उत्पादक शेतकऱ्यांवरील संकट, अशा अनेक समस्या असताना सरकार चहापान कार्यक्रम करत आहे. यावरून सरकारचा संवेदनशिलपणा हरविल्याचे दिसून येते.छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकर यांच्या पुरोगामी महाराष्ट्राची ओळख दंगलग्रस्त महाराष्ट्र अशी ओळख या महायुती सरकारने केली. पुरोगामी महाराष्ट्रात सर्वात जास्त दंगली झाल्या. महाराष्ट्रात २०२२ मध्ये दंगलीच्या तब्बल ८ हजार २१८ प्रकरणांची नोंद झाली आहे. ही त्या वर्षातल्या देशातील सर्वाधिक नोंद असल्याची केंद्रीय गृहमंत्रालयाच्या माहिती आहे. महायुती सरकार आल्यावर राज्यात दंगली, बलात्काराच्या घटनेत वाढ झाली. संत्रा नगरी असलेल्या नागपूरची ओळख आता चोरांची राजधानी अशी झाली आहे. जर महाराष्ट्राची ही ओळख होत असेल तर या राज्यात गुंतवणूक कशी येणार? उद्योग कसे येणार? असा सवाल श्री. वडेट्टीवार यांनी केला.श्री. वडेट्टीवार म्हणाले, महाराष्ट्रात सर्वाधिक आत्महत्या झाल्याची माहिती एनसीआरबीच्या अहवालात समोर आली आहे. गरीबी, बेरोजगारीमुळे जगणं असह्य झाल्याने अनेकांनी आत्महत्या केल्याचं अहवालात म्हटलं आहे. महाराष्ट्रात एका वर्षात 22,746 आत्महत्या झाल्याची नोंद आहे. कर्जबाजारीपणाच्या विळख्यात अडकून आणि दिवाळखोरीमुळे आत्महत्या करणाऱ्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली. शेती क्षेत्रात दर तासाला एकापेक्षा जास्त शेतकरी आणि शेतमजूर आत्महत्या करतात. याला म्हणतात दिव्याखाली अंधार. NCRB आकडेवारी नुसार २०२२ वर्षात राज्यात सगळ्यात जास्त नागपूर मध्ये २ हजार ५०३ चोरीच्या घटना झाल्या आहेत. महायुती सरकार आल्यावर महाराष्ट्र राज्याच्या प्रतिमेला काळीमा फासला आहे.नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोचा अहवालानुसा महाराष्ट्र खुनाच्या घटनेत तिसरा, बलात्कारात चौथ्या क्रमांकावर, सायबर गुन्ह्यांमध्ये चौथ्या क्रमांकावर आहे. मराठवाड्यात बीडमध्ये सर्वाधिक शेतकरी आत्महत्या. सर्वाधिक दुष्काळ. तरीही शासन आपल्या दारी कार्यक्रमात प्रचंड उधळपट्टी. ही उधळपट्टी म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर तिखट-मीठच सरकारने चोळले. उधळपट्टी ऐवजी शेतकऱ्यांना सरकारने मदत करावी, असेही श्री. वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.श्री. वडेट्टीवार म्हणाले, राज्यातील प्रत्येक माणसाच्या डोक्यावरील कर्जाचा बोजा वाढला असुन सरकारच्या उधळपट्टीमुळे राज्याची आर्थिक घडी विस्कळीत झाली आहे. शासनाचे आरोग्य व्यवस्थेकडे होणारे दुर्लक्ष हे महाराष्ट्र सारख्या प्रगत राज्याला भूषणावह नाही हे खेदाने म्हणावे लागते. महाराष्ट्र हे फुले, शाहु, आंबेडकरांच्या पुरोगामी विचाराचा वारसा जपणारे राज्य असून या सरकारने मात्र जाती जाती मध्ये संघर्ष निर्माण करण्याचे काम सुरु केले आहे. मराठा व ओबीसींच्या राजकीय आरक्षणाबाबत बोटचेपेपणाची भूमिका घेतल्याचे दिसते. त्यामुळे मराठा व ओबीसी समाजामध्ये सरकार बद्दल प्रचंड रोष आहे.जनतेचे प्रश्न सरकारला सोडवता न आल्याने सरकारी तिजोरीतून आपली पाठ थोपठून घेण्याचा प्रयत्न शासन आपल्या दारी या योजनेद्वारे सुरु आहे. यामध्ये राज्य सरकार जनतेची कामे न करता जाहिरातबाजीवर भर देत आहे. “शासन आपल्या दारी” योजनेचा फोलपणा दिसून येत आहे. आपल्या सरकारची कामगिरी खोटी असून प्रसिध्दी मात्र मोठी आहे. राज्य सरकारमधील अंतर्गत मतभेद, मंत्र्याची विसंगत विधाने, एकमेकांवर होणारी कुरघोडी, अंतर्गत सत्तास्पर्धा व हेवेदाव्यांमुळे प्रशासनाचे तीन तेरा वाजले आहेत. एकंदरीतच फुले, शाहु, आंबेडकरांच्या विचारांना काळिमा फासण्याचे काम आपल्या सरकार मार्फत केले जात आहे. चोर-चोर भाऊ-भाऊ सरकारची तिजोरी लुटून खाऊ, अशी या सरकारची अवस्था असल्याचा हल्लाबोल श्री. वडेट्टीवार यांनी केला आहे. -

शेतकऱ्यांच्या प्रश्नांना घेऊन चंद्रपूर मनसे आक्रमक
News34 chandrapur
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकरी पूर्णपणे हवालदिल झालाय. जून ,जुलै मध्ये अतिवृष्टी झाली , येलो मोझॅक सारख्या रोगांनी शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणलं. अवकाळी पाऊसानी अक्षरशः शेतकऱ्यांना झोडपून काढलं.
धान पट्यातील शेतकऱ्यांना अगोदर पुराचा ,आणि अतिवृष्टीच्या मुळे अतोनात नुकसान झालं आणि आता अवकाळी पावसाने कपलेल्या ओळीवर्ती पाणी साचल्याने अतोनात नुकसान झालं , मानमोळी , घाटे अळी मुळे सुधा शेतकरी संकटात सापडला आहे. शासनाने पंचनामे प्रत्येक्षात शेतात जाऊन , नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे पंचनामे करायला पाहिजे ते न करता ऑफिस मध्ये बसून निवडक शेतकऱ्यांना विचारून त्यांच्या मर्जीतील शेतकऱ्यांची नावे लिहले जातात. खरा गरीब नुकसान ग्रस्त शेतकरी आर्थिक मदतीपासून वंचित राहतो. प्रशासनाने यावर कठोर पावले उचलावी.
पीक विमा दिवाळी अगोदर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार होता , तो अजूनही काही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला गेलेला नाही. ज्यांना पाठविलं त्याठी काही तोकडी रक्कम जमा केल्या जाते. ज्या अधिकाऱ्यांना पंचनामे करण्याचे आदेश दिलेत त्यांना आपणाकडून कडक निर्देश द्यावेत. पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात त्वरित जमा करावा. आता अवकाळी पावसाच्या नुकसानीचा सुधा पीक विमा तसेच नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या पिकाच्या नुकसांनाच्या बरोबरीत द्यावे, शेतकऱ्यांची थट्टा करू नये.
शेतकऱ्यांच्या पिकाची वन्य प्राण्यांच्या मुळे झालेल्या नुकसानाची योग्य भरपाई देण्यात यावी. परसोडा येथील शेतकऱ्यांना घेऊन आर.सी.सी.पी.एल. कंपनीशी शेतकऱ्यांच्या मागणी नुसार बैठक करून मार्ग काढून द्यावा. या विविध समस्यांना घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे यावेळी निवेदन देण्यात आले.
यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार , मनसे शेतकरी सेना जिल्हाध्यक्ष आनंद बावणे , वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष महेश वासलवार, वाहतूक सेना जिल्हा उपाध्यक्ष महादेव भाऊ , विद्यार्थी सेना ता.अध्यक्ष विवेक धोटे. केतन ताग्रम, मयूर मदनकर, कोरपना शेतकरी सुधाकर कुंभारे ,पुलगामवार , बोकले पाटील , आणि मनसैनिक उपस्थित होते.
येत्या दिवसात शेतकऱ्यांना न्याय न मिळाल्यास आक्रमक आंदोलनाचा इशारा यावेळी शेतकरी सेना जिल्हाध्यक्ष आनंद बावणे यांनी दिला आहे.
-

आमदाराची पुस्तक तुला
News34 chandrapur
अहमदनगर – विविध व्यासपीठांवरून तरुणाईला शिक्षणाचं आणि वाचनाचं महत्त्व पटवून देणाऱ्या आमदार सत्यजीत तांबे यांच्या कारकिर्दीत एक अनोखा सन्मान त्यांना मंगळवारी प्राप्त झाला. आ. सत्यजीत तांबे शेवगावच्या दौऱ्यावर असताना त्यांनी राजीव राजळे मित्रमंडळ आयोजित ‘राजीव बुक फेस्ट २०२३’ या भव्य पुस्तक प्रदर्शनाला भेट दिली.
या वेळी शेवगावचे नगरसेवक रिंकु कलके आणि ग्रामस्थांनी आमदार सत्यजीत तांबे यांची ‘पुस्तक तुला’ केली. या वेळी स्पर्धा परिक्षांचे मार्गदर्शक प्रा. विठ्ठल कांगणे उपस्थित होते. एखाद्या नेत्याचा पुस्तक तुला करून केलेला सन्मान आपण पहिल्यांदाच पाहिला आणि आपल्या डोळ्यांचे पारणे फिटले, अशी प्रतिक्रिया कांगणे यांनी व्यक्त केली.
सत्यजीत तांबे म्हणाले की, मी नेहमी तरुणाईला सांगत असतो की, पुस्तकी ज्ञान वाढवा. कारण, पुस्तक हे माणूस घडवण्याचे काम करते. पुस्तक माणसाला ज्ञानी बनवतात. पुस्तक म्हणजे केवळ कागदांचा संग्रह नव्हे. तर पुस्तक माणसाच्या आयुष्याला वेगळी दिशा देत असतात. म्हणून आपण पुस्तकांच्या सहवासात सातत्याने राहिले पाहिजे. या पुस्तक तुलेसाठी वापरलेली पुस्तकं आता विविध संस्थांना आणि गरजू विद्यार्थ्यांना दान करण्यात येतील.
पुस्तक हे माणसाचे आयुष्य घडवते. त्यामुळे वाचनसंस्कृती जपली पाहिजे. वाचन संस्कृतीचा वारसा पुढे नेण्याचं काम आ. सत्यजीत तांबे करत आहेत, अशी भावना या वेळी कलके यांनी व्यक्त केली. दरम्यान, आमदार तांबे यांना ‘ज्ञान उपासना सन्मान’ प्रदान करण्यात आला.
-

चंद्रपूर फ्लाईंग क्लब 26 जानेवारी 2024 पासून सुरू करण्याचा संकल्प – पालकमंत्री मुनगंटीवार
News34 chandrapur
मुंबई/चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील मोरवा विमानतळावर फ्लाईंग क्लब येत्या २६ जानेवारी २०२४ पर्यंत सुरू करण्याचा संकल्प असून, या अनुषंगाने प्रशासकीय स्तरावर वेगाने कार्यवाही करण्याचे निर्देश वने, सांस्कृतिक कार्य मंत्री व पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.
नागपूर फ्लाईंग क्लबच्या सेस्ना – १७२ आर. या चार आसनी विमानाचे मोरवा विमातनळावर प्रात्यक्षिक घेण्यात आले आहे. फ्लाईंग क्लब संदर्भातील कामांची रीतसर परवानगी घेऊन धावपट्टीचे कार्पेटिंग,धावपट्टीच्या दुरुस्ती आणि संरक्षण भिंती ही कामे वेगाने पूर्ण करावीत, सूचना देखील यावेळी ना. मुनगंटीवार यांनी दिल्या.
ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली चंद्रपूर येथील फ्लाईंग क्लब संदर्भात आढावा बैठक सह्याद्री अतिथी येथे घेण्यात आली. नक्षलग्रस्त व आदिवासी जिल्ह्यातील युवक-युवतींना वैमानिक होता यावे, यासाठी चंद्रपूर येथे फ्लाईंग क्लब स्थापन करून विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात १० प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
विद्यार्थ्यांना प्रशिक्षणासाठी किमान ३ शिकाऊ विमाने खरेदी करणे आवश्यक आहे. याशिवाय, सीएसआर फंडातून उद्योगपतींकडून अशी शिकाऊ विमाने मिळण्यासंदर्भात कार्यवाही करण्याच्या सूचनाही संबंधितांना मंत्री मुनगंटीवार यांनी दिल्या. या फ्लाईंग क्लबबाबत नागपूर अधिवेशन कालावधीत बैठक घेण्यात येईल असेही ना मुनगंटीवार यांनी सांगितले.
या बैठकीस सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे नागपूरहून विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी, जिल्हाधिकारी चंद्रपूर विनय गौडा, एमएडीसी चे मंगेश कुलकर्णी उपस्थित होते.
-

चंद्रपुरातील पोलीस ठाण्यात शिंदे-ठाकरे गट भिडले
News34 chandrapur
चंद्रपूर – चंद्रपूरात शिवसेना ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गट यांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये रामनगर पोलीस स्टेशनमध्ये रविवारी मोठा राडा झाला. शिंदे गटाच्या नेत्या प्रतिमा ठाकूर आणि ठाकरे गटाचे वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष स्वप्नील काशीकर यांच्या समर्थकांमध्ये ही धक्काबुक्की झाली.
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या भांडणानंतर दोन्ही गट काल रात्री परस्परांविरुद्ध रामनगर पोलीस स्टेशन मध्ये तक्रार देण्यासाठी गोळा झाले होते. या वेळी दोन्ही गटांमध्ये शाब्दिक चकमक व नंतर धक्काबुक्की झाली. यावेळी भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या मिलिंद दोडके या पोलीस कर्मचाऱ्याला देखील झटापटीत धक्काबुक्की झाली.
पोलिसांनी प्रतिमा ठाकूर आणि स्वप्नील काशीकर यांच्यासह दोन्ही गटाच्या ८ लोकांवर ३५३ (शासकीय कामात अडथळा आणणे) चा गुन्हा दाखल केलाय. सोबतच दोन्ही गटांच्या तक्रारीवरून रामनगर पोलिसांनी २९४, ५०६ आणि ३२३ (शिवीगाळ, धमकी देणे आणि धक्काबुक्की करणे) चा गुन्हा दाखल करण्यात आलाय.
विशेष म्हणजे तक्रार देण्यासाठी उभे असलेले काशीकर यांच्यावर पोलीस ठाण्यात हल्ला करण्याचा प्रयत्न झाला, अचानक झालेला हा हल्ला सोडविण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला असता पोलिसांवर सुद्धा हात उगारण्याचा प्रयत्न झाला.
चंद्रपुरात दिवसेंदिवस राजकीय गुंड प्रवृत्ती फोफावत चालली असून पोलिसांनी आतातरी या वृत्तीवर लगाम घालावा अन्यथाया भविष्यात मोठी घटना घडल्याशिवाय राहणार नाही, जेव्हा पोलीस ठाण्यात हल्ला होतो तेव्हा कुठेतरी कायद्याची वचक तर कमी झाली नाही ना? असा प्रश्न उपस्थित होतो.
सध्यातरी पोलिसांनी प्रकरण शांत केले मात्र ही वृत्ती एकदिवस मोठ्या प्रमाणात वाढणार हे नक्कीच.
-

चंद्रपुरात शिवसैनिकांनी पीकविमा कार्यालयाची केली तोडफोड
News34 chandrapur
चंद्रपूर : शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आंदोलन करीत असलेले उबाठा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संदिप गिऱ्हे यांच्या आंदोलनाची प्रशासन व शासनाकडून कोणतेही दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे आंदोलक शिवसैनिकांचा संयम सुटला असून, सोमवारी दुपारी शिवसैनिकांनी चंद्रपूर जिल्हा पीक विमा कंपनीच्या कार्यालयात धाव घेत कार्यालयातील साहित्याची तोडफोड केली.
विशेष म्हणजे, प्रशासनाने व शासनाने शेतकऱ्यांच्या प्रश्नांची दखल न घेतल्यास विमा कंपनीचे ऑफिस फोडू, असा इशारा शिवसेना जिल्हाप्रमुख संदिप गिऱ्हे यांच्याकडून देण्यात आला होता.अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यात यावी, जिल्हा दुष्काळ जाहीर करावा, या मागणीसाठी शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर आंदोलन केले आहे. जिल्ह्यातील महसूल मंडळांकडून अतिवृष्टीत बाधितचा अहवाल देऊन ही. अन्य मंडळांमध्येही अतिवृष्टी आणि पुराच्या जबर तडाख्याने शेतकऱ्यांच्या शेतातील पीक जमीनदोस्त झाल्याने खरीप हंगामाच्या प्रारंभीच शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला.२ लाखच्या वरील हेक्टरवरील शेतीचे नुकसान झाले हाेते.
अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक व शेत जमिनीच्या नुकसान भरपाईसाठी शासनाने मंजूर करावे. रब्बी हंगाम सुरू झाल्यानंतरही शेतकऱ्यांना खरीप हंगामातील नुकसानाचा मदत मिळालेली नाही. या नुकसान भरपाईसह शेतकऱ्यांच्या अन्य मागण्यांसाठी शिवसेनेचे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाला निवेदन देण्यात आला.यावेळी युवासेनेचे जिल्हाधिकारी विक्रांतभाऊ सहारे शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख सिक्कीभैय्या यादव , उपजिल्हा प्रमुख शालिक फाले , शहर प्रमुख बल्लारपूर प्रकाश पाठक माजी महानगर प्रमुख प्रमोदभाऊ पाटील , तालुका प्रमुख संतोषभाऊ नरुले ,तालुका प्रमुख मुलं प्रशांत गट्टूवार ,तालुका प्रमुख गोंडपिपरी सूरज माडूरवार, जिल्हा संघटिका उज्वलाताई नलगे, युवतीसेना जिल्हाधिकारी सौ रोहिणीताई पाटील, विनयभाऊ धोबे, सुमितभाऊ अग्रवाल, हेमराज बावणे, बाळूभाऊ भगत, बाबा साहू, राहुलभाऊ वीरूटकर, विकासभाऊ वीरूटकर, सिक्किभाई खान ,महेशभाऊ खंगार, रिझवानभाई पाठव, शहाबाज शेख, शिवा वझरकर , वैभव काळे गिरीशभाऊ कटारे पदाधिकारी व युवासेनेचे पदाधिकारी व महिला आघाडी व युवती सेना असंख्य प्रमाणात उपस्थित होते
-

चंद्रपूर शहर महिला कांग्रेसची जम्बो कार्यकारणी जाहीर
News34 chandrapur
चंद्रपूर : संघटनात्मक बांधणी करून येणाऱ्या निवडणुकीत महिला संघटन अधिक बळकट करण्याकरिता जम्बो कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे. चंद्रपूर शहर महिला काँग्रेस तर्फे ५१ महिलांची कार्यकारणी जाहीर केली आहे. महिलांनी राजकारणात सक्रिय होण्याचे आवाहन देखील यावेळी आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी केले.याप्रसंगी प्रदेश महासचिव विनोद दत्तात्रय, काँग्रेस शहर जिल्हा अध्यक्ष रामु तिवारी, शहर महिला काँग्रेस अध्यक्ष चंदाताई वैरागडे, ग्रामीण महिला अध्यक्ष नम्रता ठेमस्कर, जेष्ठ कामगार नेते के के सिंग, अल्पसंख्यांक जिल्हा अध्यक्ष सोहेल रजा शेख, माजी महिला अध्यक्ष चित्राताई डांगे, काँग्रेस नेते महेश मेंढे, प्राचार्य नरेंद्र बोबडे, मनीष तिवारी, अनुताई दहेगावकर, प्रीती शहा, राहुल चौधरी, प्रशांत भारती ,शालिनी भगत यांची उपस्थिती होती.याप्रसंगी चंद्रपूर शहर महिला उपाध्यक्ष पदावर वीणा खनके, सकिना अन्सारी, छाया सोनूले, सुनंदा धोबे, अर्चना चिवंडे, संध्या पिंपळकर, एकता गुरले, ललिता रेवल्लीवार, रेखा सुधाकर वैरागडे तसेच चंद्रपूर शहर महिला सचिव पदावर प्रियंका वानखेडे, संगीता पेटकुले, मुन्नी मुमताज शेख, शिल्पा आंबटकर, साधना रामटेके, सुषमा मेश्राम, विद्या गड्डमवार, छबू पोहनकर तसेच चंद्रपूर शहर महिला काँग्रेस महासचिव पदावर शुभांगी भोयर, माया इटनकर, शामीनजी काजी, रेखा भारस्कर, दीपाली वंजारी, जयश्री जाधव, ज्योषना इटनकर, वैशाली किनाके तसेच चंद्रपूर शहर महिला काँग्रेस सदस्य पदावर उषा बल्लावार, रजनी मडावी, वंदना खेडकर, तृप्ती जगनाडे, शीतल गीन्नलवार,प्रज्ञा बारसागडे, माधुरी देशट्टीवार, अर्चना राजूरकर, निशिगंधा खोब्रागडे, अर्चना धकाते, वैशाली ऐसेकर, स्नेहल अंबागडे, संगीता टवलारकर, नम्रताताई मोरे, कविता बावणे, सुवर्णा भारसकर, संगीता देठे, लीला बुटले, राणी बेलोरकर, उज्वला कार्लेवार, उषा तंगडपल्लीवार, स्वीटी नगराळे, स्नेहा शिरपूरकर, शालिनी काळे, अर्चना पिपरे तसेच चंद्रपूर शहर महिला मार्गदर्शक पदावर चित्रा डांगे, संगीता अमृतकर, सुनीता लोढिया, अश्विनी खोब्रागडे, उषा धांडे, सुनीता अग्रवाल, अनुताई दहेगावकर, शालिनी भगत, काजी, वंदनाताई भागवत यांची नियुक्ती करण्यात आली. -

तीन राज्यातील अभुतपूर्व विजयाचा चंद्रपुरात भाजपा कार्यकर्त्यांद्वारा जल्लोष
News34 chandrapur
चंद्रपूर – प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींचे कणखर नेतृत्व, देशभरात विकासाचा झंझावात, ‘सबका साथ, सबका विकास व सबका विश्वास’ हे धोरण यशस्वीपणे राबविल्या गेल्याने भाजपाला मध्यप्रदेश, राजस्थान व छत्तीसगड या राज्यांमध्ये निर्विवाद बहूमत प्राप्त झाल्याने चंद्रपूर महानगरात भाजपा कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करीत विजयाचा जल्लोष साजरा केला. नागरीकांना मिठाई वाटून आनंद व्यक्त केला.
भाजपाचे ज्येष्ठ नेते प्रमोद कडू, युवा नेते रघुवीर अहीर, यांच्या नेतृत्वात दि. 03 डिसेंबर 2023 रोजी कस्तुरबा चौक (गिरणार) येथे साजरा झालेल्या या विजयोत्सवात ब्रिजभुषण पाझारे, राजेंद्र अडपेवार, गिरीष अणे, सुरेश भाकरे, विनोद शेरकी, गणेश गेडाम, राजेंद्र खांडेकर, राहुल घोटेकर, सविता कांबळे, पुष्पाताई उराडे, चंद्रकला सोयाम, रेणुकाताई घोडेस्वार, शेख जुम्मन रिजवी, अरविंद कोलणकर, राजू येले, रवी चहारे, ललित गुलानी, सय्यद चाँद, स्वप्नील मुन, विशाल गिरी, स्वप्निल कांबळे, मोनिषा महातव, चेतन शर्मा, प्रविण चुनारकर, अवलेश यादव यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शेकडो भाजप कार्यकर्त्यांनी या विजयोत्सवात सहभाग घेतला.
या प्रसंगी भाजप कार्यकर्त्यांनी ‘प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जिंदाबाद’ चे नारे देवून तीन राज्य केवल झॉंकी है, लोकसभा अब बाकी है । असे नारे देवून परिसर दणाणून सोडला.
-

डॉक्टरांनी केला उपचारात निष्काळजीपणा, एकाचा मृत्यू
News34 chandrapur गुरू गुरनुले
मुल – ग्रामिण रुग्णालय मूल येथील डॉक्टर व आरोग्य कर्मचार्याच्या दुर्लक्षपणामुळे विनोद कामडे यांचा मृत्यू झाल्याचा आरोप करून, संबधितांवर कारवाई करावी अशी मागणी काँग्रेसने केली आहे. कॉंग्रेसचे जिल्हा महासचिव तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राकेश रत्नावार यांनी जिल्हा शल्य चिकित्सक यांचेकडे तसे निवेदन देवून चौकशीची मागणी केली आहे.
मूल नगर परिषदेचे माजी नगरसेवक विनोद कामडे यांना दिनांक 30/11/2023 ला अचानक पोटामध्ये दुखू लागले त्यांना पहाटे ५.०० वाजता ग्रामीण रूग्णालय मूल येथे उपचार दाखल केले असता त्यांना 12.00 वाजेपर्यंत भरती ठेवलं, दुपारी 12.00 वाजता त्यांना डॉक्टरांनी चुकीच्या पद्धतीने उपचार करून घरी पाठविले मृतक विनोद कामडे यांच्या पोटाच्या तीव्र वेदना होत असताना त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूरला रेफर करण्याऐवजी एसिडिटीचा त्रास आहे असे सांगून थातुरमातूर उपचार केला.
तीव्र वेदना असह्य झाल्याने त्यांना परत दुपारी 4 वाजता ग्रामिण रूग्णालयात भरती करण्यात आले, मात्र त्रास अधिक असल्यांने त्यांना चंद्रपूरला रेफर करण्यात आले. चंद्रपूरला जातानाच रस्त्यातच विनोद कामडे यांची प्राणज्योत मालवली. मूल ग्रामिण रुग्णालयातील डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांने चुकीचा उपचार केले, सकाळीच रेफर केले असते व वेळेवर रूग्णवाहीका उपलब्ध करून दिली असती तर विनोद कामडे यांचा जीव गेला नसता असे निवेदनातून काँग्रेसचे जिल्हा महासचिव राकेश रत्नावार म्हटले आहे.
डॉक्टर व कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळेच विनोद कामडे यांचा जीव गेल्याचा आमचा स्पष्ट आरोप असून याबाबतची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, दोषीवर कठोर कारवाई करावी अशी मागणी रत्नावार यांनी केली आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन दोषीवर कठोर कारवाई केली नाही तर या विरोधात उपजिल्हा रूग्णालयासमोर आंदोलन करण्यात येईल असा इशाराही राकेश रत्नावार यांनी दिला.
-

सतत 4 दिवस आमदार धानोरकर यांचे विधानसभा क्षेत्रात मॅरेथॉन भूमिपूजन
News34 chandrapur
चंद्रपूर : वरोरा- भद्रावती मतदारसंघाच्या आमदार प्रतिभाताई बाळुभाऊ धानोरकर यांनी विकास कामाचा वसा अंगिकारला आहे. भद्रावती तालुक्यात मागील आठवड्यात सर्वाधिक भूमिपूजन व लोकार्पण घेतले. त्याच प्रमाणे आता वरोरा तालुक्यात देखील चार दिवस मॅरॅथॉन भुमीपूजन व लोकार्पण सोहळा घेऊन या भागाच्या विकासाचा नवीन चेहरा निर्माण करण्याचे काम सुरु आहे.
शुक्रवारी वरोरा तालुक्यातील विविध विकास कामांचे भुमीपूजन व लोकार्पण सोहळा पार पडला. या सोहळ्यात आमदार धानोरकर यांच्यासह वरोरा तालुका काँग्रेस अध्यक्ष मिलिंद भोयर, वरोरा कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती राजेंद्र चिकटे, पंचायत समिती माजी सभापती रवींद्र धोपटे, प्रदीप उरकुडे, दिवाकर निखाडे, विजू आत्राम, शालिक झाडे, डॉ. पठाण, बंडू शेलकी यासह सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी, आमदार धानोरकर यांनी सांगितले की, वरोरा भद्रावती मतदारसंघातील सर्व गावांमध्ये विकास कामे सुरू आहेत. या विकास कामांसाठी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा केला होता. या पाठपुराव्याचाच परिणाम म्हणून आज वरोरा तालुक्यातील 16 गावांमध्ये विविध विकास कामांची सुरुवात झाली आहे.
या सोहळ्यात वरोरा तालुक्यातील बोर्डा, जामगाव बु., जामगाव खु., दिदोडा, मेसा, महालगाव बु., धानोली, शेगाव बु., भेंडाळा, चारगाव खु., अकोला नं.2, गिरोला, साखरा, लोधीखेडा, खेमजई आणि परसोडा या गावांमध्ये विविध विकास कामांची सुरुवात करण्यात आली. या कामांमध्ये स्मशानभूमी रस्ता, सिमेंट कॉकीट रस्ता, समाज भवन, ग्रा. पं. भवन, आर.ओ. वॉटर एटीएम मशीन बसविणे, पुलाचे बांधकाम यांचा समावेश आहे. या विकास कामांमुळे वरोरा तालुक्यातील नागरिकांना मोठा लाभ होणार आहे.