महाराष्ट्रातील राजकारण बातम्या (Maharashtra Politics News) आणि राष्ट्रीय स्तरावरील सर्व राजकीय घडामोडींसाठी news34.in हे आपले विश्वसनीय व्यासपीठ आहे. आम्ही तुम्हाला स्थानिक ग्रामपंचायत निवडणुकांपासून ते लोकसभा निवडणुकीपर्यंतच्या प्रत्येक मोठ्या-छोट्या अपडेट्सचे कव्हरेज देतो. राजकीय विश्लेषण, पक्षांची धोरणे, नेत्यांची मते आणि महत्त्वाचे शासकीय निर्णय. कोणत्याही राजकीय बातम्या चुकणार नाहीत याची खात्री बाळगा. राजकारण या क्षेत्रातील विश्वसनीय आणि ताज्या बातम्या मिळवण्यासाठी नियमितपणे भेट द्या.
Shivsena thackeray chandrapur पहिल्या टप्प्यात होणाऱ्या चंद्रपूर लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे, मात्र या रणधुमाळी मध्ये शिवसेना ठाकरे गटाने भाजपला जोरदार धक्का दिला आहे.
चंद्रपूरातील निंबाळा गावातील भाजपचे सरपंच सौरभ संतोष दुपारे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व जिल्ह्यातील नेतृत्व संदीप गिर्हे यांच्या कार्यावर विश्वास ठेवत शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला. Shivsena thackeray chandrapur
जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे यांनी सरपंच दुपारे यांचं पक्षात स्वागत करीत पक्ष वाढीसाठी जोमात कार्य करावे अश्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी गावातील नागरिक व युवासेनेचे विनय धोबे उपस्थित होते.
Chandrapur shivsena thackeray चंद्रपूर जिल्ह्यात एकही आमदार किंवा खासदार नसताना सुद्धा युवकांचा कल शिवसेना ठाकरे गटाकडे वाढत आहे.
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व चंद्रपूर जिल्ह्यातील शिवसेना नेतृत्वावर विश्वास ठेवत असंख्य युवकांनी पक्षात प्रवेश केला. पहिल्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युवकांचा पक्षप्रवेश प्रस्थापित पक्षांना धक्का मानला जात आहे. Chandrapur shivsena thackeray
12 एप्रिलला बल्लारपूर येथील शिवसेना जनसंपर्क कार्यालयात चंद्रपूर युवासेना विस्तारक रियाज पटेल, शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे यांच्या नेतृत्वात बल्लारपूर शहरातील असंख्य युवकांनी हाती शिवबंधन बांधले. Chandrapur shivsena thackeray
गोरगरिबांचे काम कसे होणार याकडे सर्वांनी लक्ष देत पक्षवाढी कडे युवकांनी लक्ष द्यावे असा संदेश संदीप गिर्हे यांनी दिला. Chandrapur shivsena thackeray
आयोजित पक्षप्रवेश कार्यक्रमात उपजिल्हाप्रमुख सिक्की यादव, युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे, महिला जिल्हा संघटिका कल्पना गोरघाटे बल्लारपूर तालुका प्रमुख नीरज यादव, शहर प्रमुख अनिकेत बेलखोडे, सागर राऊत, बाबा साहू, प्रशांत मेश्राम व सोनू श्रीवास यांची उपस्थिती होती.
Pratibha dhanorkar speech चंद्रपुरात एकीकडे सूर्यदेव तापू लागला आहे. लोकसभा निवडणूकीमुळे या तापमाणात यात अधिकची भर पडल्याचे चित्र आहे. नाक्यानाक्यावर मतदानाची बेरीज,वजाबाकी करताना मतदार दिसत आहेत. चंद्रपूर लोकसभा मतदार संघात महायुती, महाआघाडीत थेट लढतीचे चित्र आहे. मात्र प्रचारात प्रतिभा धानोरकरांनी आघाडी घेतली आहे.
आज वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्रात धानोरकरांनी दौरा केला. या दौऱ्यात प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. विशेष करून कॉर्नर सभा, मोठ्या सभांमध्ये महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. सभा मंडपात बसायला जागा मिळाली नसताना घराच्या स्लॅबवर बसून धानोरकर यांचे भाषण ऐकायला नागरिकांनी गर्दी केली होती. Pratibha dhanorkar speech
चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदार संघात निवडणूकीचे वातावरण तापले आहे. या तापलेल्या वातावरणात प्रतिभा धानोरकर यांनी गावभेटीचा धडाका लावला आहे. आज ( शुक्रवार ) वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्रातील डोंगरगाव, नंदोरी, कोंढा, माजरी वस्ती, कुचना, पाटाळा, घोडपेठ, तांडा, मांगरी, बेलगाव, पावना राय, सागरा, चोरा, वडेगाव, गूळगाव, वायगाव, आष्टा, शेगाव खुर्द, चंदनखेडा या गावात डोर टू डोर धानोरकर यांनी भेटी घेतल्या. या गावभेटीत गावकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला. Pratibha dhanorkar speech
बैलबंडीवरुन महाविकास आघाडी उमेदवार धानोरकर प्रचार करताना
Prakash ambedkar on narendra modi लोकसभेच्या रणधुमाळी मध्ये 11 एप्रिलला रात्री 9 वाजता वंचित बहुजन आघाडीची सत्ता परिवर्तन सभा पार पडली, या सभेत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची उपस्थिती होती.
चंद्रपूर लोकसभा उमेदवार राजेश बेले यांच्या प्रचारार्थ सदर सभेचे आयोजन करण्यात आले होते.
आयोजित सभेत प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर निशाणा साधत मोदी हे पंतप्रधान पदाच्या खुर्चीसाठी लायक माणूस नाही, कारण मोदी हे गल्लीतल्या दादासारखं वागत आहे, गल्लीतला दादा हा त्या वस्तीत असणाऱ्या दुकानदारांकडून हफ्ता वसूल करतो मात्र नरेंद्र मोदी त्या दादासारखं देशपातळीवर ईडी चा वापर करून हफ्ता वसूल करण्याचे काम करतो, ज्यांच्याकडून मोदी यांना पैसे घ्यायचे असतात त्यावेळी त्या कंपनीला ईडीची नोटीस दिल्या जाते, पैसे दिल्यावर मात्र चौकशी पूर्णतः थांबविण्यात येते, असाच प्रकार गल्लीतला दादा करतो. याला आपण आज इलेक्टरोल बॉण्ड म्हणतो. Prakash ambedkar on narendra modi
मला कांग्रेस पक्षासोबत युती करायची होती मात्र ती काही कारणास्तव झाली नाही, देशात मोदी बॅकफूटवर आहे, त्यांच्याविरोधात अनेक मुद्दे आहे, ते मुद्दे आपण जनतेसमोर घेऊन जाऊ असं मी कांग्रेसला सांगितले मात्र ते काही तयार नव्हते. जेव्हा देशात घटना अस्तित्वात आली त्यावेळी त्या घटनेला सर्वात जास्त विरोध भाजप व आरएसएस ने केला होता, मोदी शाळेत न गेल्याने त्यांना इतिहास माहिती नाही. Prakash ambedkar on narendra modi
आज पंतप्रधान मोदी हे आपली गॅरंटी देत आहे मात्र जो स्वतः आपल्या पत्नीला गॅरंटी देऊ शकत नाही ते देशाला कसली गॅरंटी देणार, लक्षात ठेवा मोदी हा खोटारडा माणूस आहे.
सत्ता परिवर्तन सभेत नागरिकांची हजारोंच्या संख्येत उपस्थिती होती.
Prachar Sabha Pratibha Dhanorkar चंद्रपूर : चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदार संघातील अनेक गावात महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर यांच्या सभा होत आहे. बल्लारपूर तालुक्यातील कोठारी गावात आज ( गुरुवार ) सभा झाली. धानोरकरांच्या या सभेला प्रचंड प्रतिसाद लाभला. कोठारी परिसरातील अनेक गावातील जनता, कार्यकर्ते, समर्थकांनी सभेला मोठी गर्दी केली होती.
चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदार संघा महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर यांनी बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील कोठारी येथे आज दौरा केला. यावेळी धानोरकर यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. प्रतिभा धानोरकर यांनी जनतेशी जिव्हाळयाने संवाद साधला. त्यानंतर कोठारी येथे सभा झाली. Prachar Sabha Pratibha Dhanorkar
आमदार सुधाकर अडबाले, संदिप गिर्हे शिवसेना नेते (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट), घनश्याम मुलचंदानी (काँग्रेस नेते), दिलीप चौधरी(संभाजी ब्रिगेड) , प्रकाश पाटील मारकवार, गोविंदा उपरे (बल्लारपूर तालुका अध्यक्ष, कॉंग्रेस), संतोष इटनकर, सुरेश चहारे, मिंटू गेडाम, संजय खोडीलकर मंचावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन विलास राजूरकर यांनी केले. Prachar Sabha Pratibha Dhanorkar
इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीतील घटक पक्ष शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट), राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी( शरदचंद्र पवार गट), द्रमूक, आम आदमी पार्टी, समाजवादी पार्टी, संभाजी ब्रिगेड, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. हुकूमशाही विरोधातील ही लढाई आहे. देश्यातील उद्योगपतींच्या हिताचे निर्णय केंद्रातील सरकारने घेतले. मात्र देश्यातील तरुणांचा पुढे रोजगाराची मोठी समस्या उभी आहे. महागाईमुळे सामान्य जनता मेटाकुटीस आली आहे. हे प्रश्न सरकारला महत्वाचे वाटू नये, ही मोठी शोकांतिका आहे,असे धानोरकर म्हणाल्या.
Sudhir mungantiwar bjp चंद्रपूर : चंद्रपूर लोकसभा निवडणूक जसजशी जवळ येत आहे तसतशी वेगवेगळ्या क्षेत्रातील सामाजिक संघटना चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदार संघातील भाजपा महाविकास आघाडीचे उमेदवार ना. सुधीर मुनगंटीवार यांना जाहीर पाठींबा देत आहेत. महिला पतंजलि योग समिती महाराष्ट्र, पालेवार भोई समाज चंद्रपूर, चंद्रपूर जिल्हा साऊन्ड सिस्टम असोशिएशन चंद्रपूर, राष्ट्रीय हिन्दू महासभा (भारत), राष्ट्रीय संघर्ष समिती ईपीएस ९५ चंद्रपूर जिल्हा, सोनार समाज चंद्रपूर जिल्हा,विश्वब्राम्हण पांचाळ सेवा समिती जिल्हा चंद्रपूर यांच्यासह अनेक सामाजिक संघटनांनी ना. सुधीर मुनगंटीवार यांना निवडून देण्याचा संकल्प हाती घेतला आहे. सुधीरभाऊंसारखा आपल्या हक्काचा उमेदवार निवडून यावा यासाठी अनेक संघटना सरसावल्या आहेत.
चंद्रपूर लोकसभा मतदार क्षेत्रात आता निवडणुकीचे जोरदार वारे वाहू लागले आहेत. हुकूमशाही विरुद्ध लोकशाही, माफियाराज विरुद्ध गुंडाराज असं चित्र यावेळी पाहायला मिळत असून सुधीर भाऊंची बाजू भक्कम दिसत आहे. ना. मुनगंटीवार चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री राहिलेत, मंत्री राहिलेत, त्यामधून त्यांनी केलेली अनेक विकासकामे ही त्यांची जमेची बाजू आहे.ते सलग निवडून येत आहेत. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव मतदारसंघात आहे. Sudhir mungantiwar bjp
विमानतळ, वेकोलीचे भूमिअधिग्रहण, प्रकल्पग्रस्तांच्या रोजगाराचा प्रश्न कळीचा सातत्याने ते लावू धरत आहेत. महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष चित्राताई वाघ यांच्या माध्यमातून सोनार व्यावसायिकांसाठी जाचक असणारी कलम ४११ रद्द करण्यात आली त्यामुळे आम्हाला फायदा होत आहे. त्यामुळे आम्ही सर्व सोनार समाज बांधव कार्यकारी अध्यक्ष प्रफुल चावरे, विदर्भ अध्यक्ष लक्ष्मीकांत लोळगे, जिल्हाध्यक्ष सुधाकर त्रिपुरवर, कोषाध्यक्ष सुमेध कसुळ्कर पाठींबा देत असल्याचे समर्थन पत्रात त्यांनी सांगितले आहे. Sudhir mungantiwar bjp
विश्वब्राम्हण पांचाळ सेवा समिती जिल्हा चंद्रपूर यांनी समाज बांधवानी सभा घेऊन ना. मुनगंटीवार यांना निवडून देण्याचा संकल्प हाती घेतला आहे. यावेळी सुधाकर श्रीपुरवार, रविंद्र मुकुलवार, गिरीश कंठीवार, सचिव बंडोपंत देवोजवार, दिलीप लिंगोजवर यांच्यासह अनेक सदस्यगण उपस्थित होते. राष्ट्रीय संघर्ष समिती ईपीएस ९५ चे चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष परशुराम तुंडुलवार, पुरुषोत्तम राऊत, अरुण जमदाडे, दीपक जोगी, वसंत शिकारे कृष्णा बागुलकर आदींनी ना. मुनगंटीवार यांना जाहीर पाठींबा दिला आहे. राष्ट्रीय हिन्दू महासभा (भारत) चे प्रदेश अध्यक्ष शिवदास शर्मा यांनी समर्थनपत्र देऊन सुधीर भाऊंच्या विजयाचा संकल्प केला आहे. Sudhir mungantiwar bjp
चंद्रपूर जिल्हा साऊन्ड सिस्टम असोशिएशन यांनी ना. सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेऊन त्यांना जाहीर पाठींबा दिला आहे. यावेळी असोशिएशनचे अध्यक्ष उमेश लांडगे, देवाशिष गांगुली, अभिजित बेले, हर्षद साखरकर, एड मनीष शर्मा यांच्यासह अनेक सदस्य उपस्थित होते. पालेवार भोई समाज चंद्रपूर चे अध्यक्ष अभय बडकेलवार, सचिव राजेंद्र गर्गेनलावर, अजय कोतपल्लीवार, अरुण गर्गेनलावर, प्रदीप गर्गेनलावर यांच्यासह अनेक सदस्यांनी आम्ही ना. मुनगंटीवार यांच्या पाठीशी आहोत असा निर्धार केला. महिला पतंजलि योग समिती महाराष्ट्रच्या नसरीन शेख, स्मिता रेभनकर, वंदना भुशांवर, प्रतिभा रोकडे, स्मिता श्रीगडीवार, सविता मसराम, ज्योती कुंभार, मनीषा गौरकार आदींनी आम्ही सुधीर भाऊंना निवडून आनण्यासाठी पूर्णपणे प्रयत्न करू अशी ग्वाही देऊन समर्थन पत्र दिले आहे.
Sudhir mungantiwar आज गुढीपाडवा सण आहे, गुढीपाडवा म्हणजे मांडवस. पूर्वीपासुन शेतकरी बांधव हा सण साजरा करतात. या उत्सवामध्ये आपल्या शेतीत जो वर्षभर प्रामाणिक, उत्तम काम करतो. त्याला आपण मांडवसला पुन्हा वर्षभर काम करण्याची संधी देतो. आणि जो काम चुकारपणा करतो, त्याला कायमची सुट्टी देतो.
आपल्या चंद्रपूर लोकसभा मतदार संघाचा लेखा जोखा बघितला तर विकास कामे झालेली दिसत नाही. त्यामुळे आज मांडवस उत्सव आहे, याच महिन्यात लोकसभा निवडणुक आहे. तुम्ही सर्व मला लोकसभेत पाठवून मांडवसची भेट द्या. आपण माझ्यावर विश्वास ठेवून या मांडवसला लोकसभेत पाठवले तर मी जीव ओतून काम करेल, असे आवाहन भाजपा लोकसभा उमेदवार ना. सुधीर मुनगंटीवार यांनी केले. Sudhir mungantiwar
चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदार संघातील भाजपा महाविकास आघाडीचे उमेदवार ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या प्रचारार्थ जाहीर वरोरा तालुक्यातील सालोरा, मेसा, शेगाव, खेमजई, आसाळा, टेमुर्डा, खांबाडा आणि बारव्हा येथे प्रचार आणि जाहीर सभा पार पडली. या सभेला मार्गदर्शन करताना ते बोलत होते. पुढे बोलताना त्यांनी गुढीपाडवा आणि मांडवसचा अर्थ उलगडून सांगितला. ते म्हणाले की, मी शेतकरी कुटुंबातील आहे. Sudhir mungantiwar
कष्टकरी शेतकरी मजूर बेरोजगार बेघर वंचित लोकांसाठी मी जीव तोडून काम करेल. जर मी काम केलें नाही तर मला पण सुट्टी द्या, असे भावनिक आवाहन ना. मुनगंटीवार यांनी व्यक्त केले. आज मला येथील अनेक लोकांनी भेटून वरोरा ते शेगाव रस्ता दुरुस्त करण्याची मागणी केली व काही नागरिकांनी निवेदन दिले. मागील साडेचार वर्षात काँग्रेस पक्षाचे आमदार खासदार यांनी काहीही काम केले नाही. त्यामुळे आज येथील रस्त्यात चालताना उडी मारतो की काय? असे चित्र दिसून येते. आपण निवडून आल्यानंतर प्राधान्याने येथील रस्त्याचा प्रश्न सोडवू अशी ग्वाही त्यांनी दिली. पुढे बोलताना ते म्हणाले की, मी कधीही जातीपातीचे राजकारण केले नाही, घाणेरडे राजकारण केले नाही. Sudhir mungantiwar
मला एक दिवस ताप आला तरी काँग्रेसने त्याचे घाणेरडे राजकारण केले, पण मी विकासाचा राजकारण करतो विकासावर बोलतो. विकास हाच माझा प्रमुख मुद्दा आहे मुख्यमंत्री विलासराव देशमुख असताना माझा आदर्श आमदार म्हणून गौरव करण्यात आलेला आहे. मागील २९ वर्षापासून मी आमदार आहे मला विधानसभेत काम करण्याचा दांडगा अनुभव आहे. या अनुभवाच्या जोरावर मी संपूर्ण चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचा कायापालट करेल याचा तुम्हाला विश्वास देतो असे ते म्हणाले. वरोरा, सालोरा, मेसा, शेगाव, खेमजई, आसाळा, टेमुर्डा, खांबाडा, बारव्हा येथे आयोजित सभेला विजय राऊत, डॉ. बोदकुलवार, इंजी. बोदकुलवार, रमेश राजूरकर, सागर कोहळे, गौरव हेकाळे, नितीन मते, सदाशिव ताजने, किशोर टोंगे, भगवान गायकवाड, डॉ. अंकुश आगलावे, वंदना दाते, संगीता निंबाळकर, ओम मांडवकर, अमित चवले, आशिष ठाकरे, स्वाती बावने, कल्पना तुमरे, अर्चना चौधरी, अती शाम अली, सुनील वर्धे, सुमित वर्धे, निर्मला वर्धे, किसन वर्धे, मंजुळा दडमल, वनिता नरड, रूपाली नरड, स्नेहा लोकरे, चंदा खारकर, मंजुषा ताजने, शीतल साळवे, शिवानी साळवे, राजु गायकवाड, किरन ढोक, मारोती जांभळे, सरपंच वर्षा सरतापे, वासुदेव शेंडे, उमेश भुते, मोरेश्वर डुकरे, सिंधु जुमले, शुभम डाफ, विजय बोकासे, करन देवतळे, कविता बोराडे, गोपाळ गोगावले, किशोर पडोळे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
सायबर क्राईमकडे करणार काँगेसची तक्रार…
काँग्रेसने दंगल घडवून १९८४ ला आणीबाणीच्या काळात शीख बांधवांना प्रचंड त्रास दिला, अन्याय अत्याचार केला, याचा अर्धवट व्हिडिओ कट करून तो सोशल मीडियावर व्हायरल करण्यात येत आहे. या दंगलीत काँग्रेसने किती अन्याय अत्याचार केले हे सर्वश्रुत असताना मीडियामध्ये कुठलाही विपर्यास केलेला नाही. पण काँग्रेस मुद्दामपणे जनतेची दिशाभूल करण्यासाठी अर्धवट व्हिडिओ व्हायरल करने सुरू केले आहे. त्यामुळे याची आपण सायबर क्राईमकडे तक्रार करणार आहोत. त्यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी करू असे ना. मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले.
शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपामध्ये प्रवेश…
देशाचे कर्तबगार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर, लोकसभा उमेदवार ना सुधीर मुनगंटीवार यांच्यावर विश्वास ठेवून शेकडो कार्यकर्ते रोज भाजपामध्ये प्रवेश करीत आहेत. आज वरोरा, सालोरा, मेसा, शेगाव, खेमजई, आसाळा, टेमुर्डा, खांबाडा, बारर्व्हा आदी क्षेत्रांतील शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपा प्रवेश केला. यामध्ये अनिल लोळे, मंगेश फुलकर, देवराव ढोके, नंदु फुलकर, देवराव नलावटे, प्रदीप चवरे, प्रणय नरड, नवजीवन मत्ते, दिनेश कावळे, भाउराव सोनुने, सूरज सहारे, आनंद पेटकर, विकास कष्टी, गुणवंत देहरकर, तुळशीराम साखरकर, प्रभाकर पेंदोर, भारत कुमरे, राजेंद्र जुगणाके, सुरेश किंन्नाके, आकाश ओयाम, आकाश भगत, रीतिक सोयाम, निलेश पेंदोर, मनोहर मेश्राम, अरूण चांभारे, दिवाकर जुमणाके, नंदकिशोर चिडे, प्रभाकर नाथे, कैलास येरमे, सौरभ टोंगे, सौरभ जुमणाके यांनी भाजपामध्ये प्रवेश घेतल्याबद्दल ना. सुधीर मुनगंटीवार यांनी त्यांचे स्वागत करून पुढील वाटचालिकरिता शुभेच्छा दिल्या.
सभेत मार्गदर्शन करताना
वरोरा येथे ढोल ताशांच्या गजरात जंगी स्वागत...
चंद्रपूर लोकसभा भाजपा उमेदवार ना. सुधीर मुनगंटीवार यांचे आज मंगळवारी सकाळी वरोरा येथे आगमन होताच भगव्या सांस्कृतिक वाद्य पथकाच्या ढोल ताशांच्या गजरात जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी त्यांनी श्री राम मंदिर येथे पुष्पहार अर्पण करून श्रीराम यांचे दर्शन आशीर्वाद घेतले. तसेच मुख्य चौकातील स्वातंत्र्य विर सावरकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. या प्रसंगी राम मंदिर वरोराचे अध्यक्ष ऍड. जयंता ठाकरे यांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी डॉ. सागर वझे, बाबा भाकरे, गोडे मॅडम, घनश्याम गोडे उपस्थित होते.
काँग्रेसला मत म्हणजे विनाशच विनाश..
कडूलिंबामध्ये कितीही साखर टाकली तरी ते कडूच राहते गोड होत नाही. तशीच अवस्था काँग्रेस पक्षाची झाली आहे, आज पर्यंत काँग्रेसने जनतेची निराशा केली आहे. त्यामुळे वरोरा भद्रावती विधानसभा मतदारसंघाचा विकास खुंटला आहे. या विभागाचा खऱ्या अर्थाने विकास करायचा असेल तर येत्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या कमळला मतदान करा, विकास म्हणजे कमळ आणि काँग्रेस म्हणजे विनाशच विनाश, अशी जोरदार टीका भारतीय जनता पक्षाचे लोकसभा उमेदवार ना. सुधीर मुनगंटीवार यांनी आज केली.
A big political explosion in Chandrapur 7 एप्रिलला बीआरएस चे वमशीक्रिष्णा अरकिल्ला यांनी भाजप उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांना पक्षाच्या वतीने समर्थन पत्र दिले होते, त्याबाबत 10 एप्रिलला बीआरएस पक्षाचे नेते भूषण फुसे यांनी त्या समर्थनाबाबत मोठा खुलासा केला आहे, अरकिल्ला यांना पत्र देण्याचा मुळीच अधिकार नाही, बीआरएस पार्टी कांग्रेस व भाजप विरोधात आहे, अरकिल्ला यांनी कुणालाही विश्वासात न घेता स्वयंम भाजप उमेदवाराला पाठिंबा दिला, ही बाब निषेधार्थ असून आम्ही सर्व वमशीक्रिष्णा अरकिल्ला यांचा निषेध करीत आहो अशी माहिती फुसे यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दिली.
अरकिल्ला यांना उमेदवाराला समर्थन देण्याचे कसलेही अधिकार नाही, राज्यातील नेतृत्वाने कुणाला समर्थन द्यायचे याबाबत आदेश दिले नाही, उलट पक्षाचे 5 खासदार भाजपने पळविण्याचे पाप केले आहे. A big political explosion in Chandrapur
वमशीक्रिष्णा अरकिल्ला यांचे कृत्य अधिकृत व सुसंगत नसून पक्ष निष्ठेच्या विरोधात आहे त्यामुळे अरकिल्ला यांचा पक्षाच्या वतीने निषेध करीत आहो अशी प्रतिक्रिया फुसे यांनी दिली. A big political explosion in Chandrapur
बीआरएस पक्षाने भाजप उमेदवाराला पाठिंबा दिल्याने भाजप गोटात आनंदाची लहर होती मात्र फुसे यांच्या गौप्यस्फोटाने भाजप व अरकिल्ला समर्थकांची झोप उडाली आहे.
Kcr व बीआरएस पक्षाला मानणाऱ्या नागरिकांनी आपली भूमिका तटस्थ ठेवावी असे आवाहन भूषण फुसे यांनी जनतेला केले आहे.
Sudhir mungantiwar video 8 एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभेत सुधीर मुनगंटीवार यांनी कांग्रेसच्या आणीबाणीचा उल्लेख करीत त्या काळी झालेल्या अत्याचाराचा उल्लेख आक्षेपार्ह वक्तव्य केलं, 9 एप्रिलला मुनगंटीवार यांचा व्हिडीओ समाजमाध्यमावर प्रचंड प्रमाणात व्हायरल झाला.
मंगळवारी सायंकाळी गांधी चौकात आम आदमी पक्षाच्या वतीने मुनगंटीवार यांना सद्बुद्धी मिळो याबाबत त्यांच्या प्रतिमेची आरती करणार होते मात्र ऐनवेळी पोलिसांनी आप पक्षाचे आंदोलन बंद पाडले. Sudhir mungantiwar video
यावर जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार यांनी मुनगंटीवार यांचा निषेध करीत बेताल वक्तव्य केले म्हणून आम्ही त्यांच्या प्रतिमेची आरती करीत त्यांना सद्बुद्धी मिळो अशी कामना करणार होतो मात्र पोलिसांनी बळाचा वापर करीत आमचे आंदोलन बंद पाडले. Sudhir mungantiwar video
आम्हि आंदोलनाची परवानगी घेतली होती मात्र ऐनवेळी आंदोलन सुरू करताना ती परवानगी नाकारण्यात आली, सुधीर मुनगंटीवार यांनी महिलांबाबत केलेले आक्षेपार्ह वकत्व मागे घेत जनतेची माफी मागावी अशी मागणी राईकवार यांनी यावेळी केली.
Sudhir Mungantiwar’s reaction 8 एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभेत महायुती उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी कांग्रेस काळात झालेल्या आणिबाणीबाबत वक्तव्य केलं, त्या वक्तव्याचा वेगळा अर्थ काढत अर्धवट क्लिप कांग्रेसतर्फे व्हायरल करण्यात आली त्यावर आज सुधीर मुनगंटीवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
कांग्रेसने लावलेल्या आणीबाणीत अनेक घटना घडल्या, महिलांवर अत्याचाराच्या घटना घडल्या, त्यावेळी पेपर मध्ये बातमी देण्याआधी आधी तपासणी व्हायची, 1984 च्या शीख दंगलीत पत्नीसमोर पतीला आगीत टाकण्यात आले होते, या सर्व बातम्या वर्तमानपत्रात छापून आल्या होत्या. Sudhir Mungantiwar’s reaction
त्यावर कांग्रेस पक्षाने खंडन करण्याऐवजी माझ्या भाषणाची अर्धवट क्लिप पूर्ण न ऐकता घरात बसून सर्वत्र व्हायरल करण्यात आली, कांग्रेस उमेदवार धानोरकर यांनी दिल्लीवरून सोशल मीडिया टीम कामाला लावली आहे, मोदी यांच्या सभेतील विशाल जनसमुदाय बघून कांग्रेसला पोटदुखी झाली त्यामुळे माझ्या भाषणाची अर्धवट क्लिप सर्वत्र पसरविण्यात आली, विकासाच्या नावावर मते मागा तेव्हा जनता जागा दाखवेल अशी प्रतिक्रिया सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. Sudhir Mungantiwar’s reaction
त्यावेळी जे घडलं ते अतिशय भयावह होत मात्र आज अघोषित आणीबाणी असल्याचे वातावरण देशात आहे, मणिपूर आजही हिंसेने जळत आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यावर ब्र सुद्धा काढला नाही, कांग्रेस पक्षाने असं केलं त्यांनी तसं केलं बस भाषण केले आणि निघाले, महिला पैलवान यांच्यावर भाजप खासदार ब्रिजभूषण सिंग यांनी लैंगिक अत्याचार केला असे आरोप लावण्यात आले होते, मात्र त्यांच्याबाबत सुद्धा सरकार गप्प आहे. Sudhir Mungantiwar’s reaction
सरकार मधील मंत्र्यांना विरोधात प्रश्न विचारले तर त्यांना जेल मध्ये किंवा कामावरून काढण्यात येते, उत्तर प्रदेशातील उन्नाव व हातरस ची घटना आजही देश विसरू शकला नाही, कोरोना काळात मजुरांचा मृत्यू झाला, त्यांना परत जाण्यासाठी मोदी सरकारने काही केले नाही, मात्र देशात विमानाद्वारे चित्ते आणण्यात आले. Sudhir Mungantiwar’s reaction
आज चंद्रपूर लोकसभा मतदार संघात पहिल्या टप्प्यातील निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे, आधीचे जातीचे राजकारण, त्यानंतर विकास, विधवा महिलेचे अश्रू, सहानुभूती, शिलाजीत आणि आता सरळ आणीबाणी मधील आक्षेपार्ह वक्तव्य, यामुळे विकास हा खाटेवर लेटविण्यात आला असे चित्र जिल्ह्यात निर्माब झाले आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील समस्या – प्रदूषण, बेरोजगारी, सिंचन व्यवस्था, चंद्रपुर व इतर ग्रामीण भागात येणारा पूर, बाबूपेठ उड्डाणपूल असे अनेक महत्वाचे कामे कित्येक वर्षांपासून प्रलंबित आहे, त्यावर मात्र चर्चा होताना दिसत नाही आहे, ही निवडणूक विकासाच्या दिशेने सुरू होत व्यक्तिगत झाली आहे.