चंद्रपूर शहर (Chandrapur City) आणि आसपासच्या परिसरातील प्रत्येक लहान-मोठी बातमी वाचा news34.in वर. महानगरपालिका, स्थानिक राजकारण, गुन्हेगारी, शैक्षणिक आणि सांस्कृतिक घडामोडींचे त्वरित आणि अचूक कव्हरेज येथे उपलब्ध आहे. तुमच्या चंद्रपूर शहर परिसरातील प्रत्येक महत्त्वाच्या विषयावर सविस्तर माहिती आणि सत्य घटनांचे अपडेट्स मिळवा. स्थानिक नागरिकांसाठी हे सर्वात विश्वसनीय स्रोत आहे.
चंद्रपूर – शहरातील प्रसिद्ध शिक्षण संस्थेच्या सरदार पटेल महाविद्यालयात दरवर्षी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना होणारा त्रास चंद्रपूर युवासेना जिल्हाप्रमुख अडबाले यांच्यामुळे कमी झाला.
30 सप्टेंबरला युवासेना जिल्हाप्रमुख सुर्या अडबाले यांना महाविद्यालयात होत असलेल्या त्रासाबद्दल विद्यार्थ्यांनी तक्रार केली, तक्रार प्राप्त होताच अडबाले SP कॉलेजमध्ये दाखल झाले, त्याठिकाणी विद्यार्थ्यांच्या लांबलचक रांगा बघितल्यावर त्यांची विचारपूस केली असता त्यांनी सांगितले की आम्हाला दरवर्षी महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी प्रचंड त्रास सहन करावा लागतो.
कारण याठिकाणी अर्ज भरण्यासाठी एकच काउंटर लावण्यात आला आहे, शैक्षणिक वर्षात बाहेरगावातून हजारो विद्यार्थी प्रवेशासाठी येतात मात्र महाविद्यालय प्रशासन त्यांची व्यवस्थित सोय करीत नाही, ज्यामुळे अनेक विद्यार्थी शैक्षणिक सत्राला मुकतात.
विद्यार्थ्यांची समस्या ऐकल्यावर सुर्या अडबाले यांनी प्राचार्यांच्या कक्षात धडक मारत त्यांना या समस्येबाबत अवगत केले, प्रवेश काउंटर वाढविण्याची मागणी प्राचार्याला केली.
विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर युवासेनेची आक्रमकता बघता महाविद्यालय प्रशासनाला नमावे लागले, त्यांनी तात्काळ त्याठिकाणी 4 काउंटर सुरू केले.
तात्काळ समस्या दूर होताच महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी युवासेना जिल्हाप्रमुख सुर्या अडबाले यांचे आभार मानले.
चंद्रपूर – मुंबई येथे शुक्रवारी (दि.२९) राज्याचे मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली विविध ओबीसी संघटनांच्या प्रतिनिधींची अतिशय सकारात्मक बैठक घेण्यात आली. यात संघटनांच्यावतीने मांडण्यात आलेल्या सर्व मागण्या सरकारने मान्य केल्या असून राज्य सरकार ओबीसी समाजाच्या उत्थानाला प्राधान्य देईल, अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. विशेष म्हणजे राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य तसेच मत्स्यव्यवसाय मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारामुळे ही बैठक घडून आली.
चंद्रपूर येथे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे जिल्हाध्यक्ष रविंद्र टोंगे यांच्या उपोषण मंडपाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी भेट दिली. उपोषणकर्ते श्री. टोंगे, विजय बलकी, प्रेमानंद जोगी यांना लिंबू पाणी देऊन २० दिवसांपासून सुरू असलेल्या उपोषणाची सांगता करण्यात आली.
ओबीसी समाजाच्या मागण्यांसाठी २० दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग उपोषण करणारे राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी महासंघाचे जिल्हाध्यक्ष रविंद्र टोंगे यांच्या उपोषण मंडपाला पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी १८ सप्टेंबरला भेट दिली होती. त्यांच्यासोबत जवळपास दीड तास चर्चा केली. ओबीसी समाजाच्या मागण्या चर्चेतून आणि संवादातून सोडविण्यात येतील, असा विश्वास देऊन श्री. टोंगे यांनी अन्नत्याग उपोषण सोडावे, असे आवाहन त्यांनी केले होते. श्री. मुनगंटीवार यांच्या शिष्टाईमुळेच उपोषणाची सांगता होऊ शकली, अशी प्रतिक्रिया जनमानसांतून व्यक्त होत आहे.
ओबीसी समाजाच्या मागण्यांबाबत श्री. मुनगंटीवार सुरुवातीपासून अतिशय आग्रही आहेत. त्यांनी याबाबत सातत्याने सरकारकडे पाठपुरावा देखील केला. त्यांच्याच पुढाकारातून शुक्रवार दि. २९ सप्टेंबर २०२३ ला मुंबई येथे ओबीसींच्या मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा घडून आली. राज्य शासनाने सर्व मागण्या मान्य केल्या. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना श्री. टोंगे यांचे उपोषण सोडण्यासाठी चंद्रपुरात आणण्यात पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यशस्वी देखील ठरले.
चंद्रपूर – मागील 20 दिवसापासून सुरू असलेल्या राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी महासंघ जिल्हाध्यक्ष रवींद्र टोंगे यांच्या अन्नत्याग आंदोलनाला आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट देत त्यांच्या विविध मागण्या मान्य करीत आंदोलनाची सांगता केली. 55 इंचाचा स्मार्ट टीव्ही फक्त 30 हजार रुपयात
मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करण्यात येऊ नये, राज्यामध्ये बिहारच्या धर्तीवर जातनिहाय सर्वे करण्यात यावा तसेच प्रत्येक जिल्ह्यात ओबीसी मुला-मुलींसाठी स्वतंत्र वसतीगृह सुरू करण्यात यावे या मागण्यांसाठी मागील 20 दिवसांपासून राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे नेतृत्वात सुरू असलेल्या आंदोलनावर अखेर 29 सप्टेंबर रोजी तोडगा निघाला.
मुंबईतील सह्याद्री अतिथी गृहावर राज्यातील ओबीसी नेत्यांच्या शिष्टमंडळासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीमध्ये ओबीसींच्या सर्व मागण्या तत्वतः मान्य करण्याचे आश्वासन दिले तसेच या मागण्यांवर लवकरात लवकर अंमलबजावणी करण्याचे आश्वासन सुद्धा राज्य सरकारने दिल्यामुळे ओबीसींचे चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 20 दिवसापासून सुरू असलेले अन्नत्याग आंदोलन अखेर स्थगित करण्यात आले. Samsung कंपनीचा 5 स्टार वॉशिंग मशीन अवघ्या 28 हजार 490 रुपयात, आजच खरेदी करा
शनिवार सकाळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील आंदोलन मंडपाला भेट देत उपोषणकर्ते रवींद्र टोंगे, विजय बल्की व प्रेमानंद जोगी यांचे उपोषण पाणी पाजून सोडविले. त्यानंतर अधिकृतपणे आंदोलन स्थगित केल्याचे राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे जाहीर करण्यात आले.
यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी माहिती दिली की भाजप सरकारच्या कार्यकाळात मी मुख्यमंत्री असताना ओबीसी समाजाच्या हितासाठी तब्बल 26 शासन निर्णय काढले होते, आज राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी समाज उभा आहे, मात्र आरक्षण मुद्द्यावर दोन्ही समाजात तेढ निर्माण होऊ देणार नाही अशी सरकारची भूमिका आहे.
सह्यादी अतिथीगृहात मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ओबीसी समाजाच्या मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाली, झालेली बैठक ही रेकॉर्डवर आहे, आम्ही ओबीसी संघाला शब्द दिला आहे, शब्द पाळला नाही अशी वेळ आम्ही येऊ देणार नाही, जातनिहाय जनगणना बाबत बिहार ने पाऊल उचलले असले तरी त्यानंतर त्याचा काय परिणाम येतो ते बघून आपण राज्यात जातनिहाय जनगणनेबाबत काय करता येईल त्यावर नक्की सकारात्मक राहू असे फडणवीस यांनी आश्वाशीत केले.
ओबीसी समाजातील काही मागण्या आम्ही विसरलो किंवा आपल्याला काही सांगायचं असेल तर नक्की आम्हाला कळवा, त्या मागण्यांवर सकारात्मक चर्चा होणार.
राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ओबीसी अन्नत्याग आंदोलनाला भेट देत आपली शिष्टाई दाखविली, त्यांनतर सरकार व ओबीसी संघटनांची बैठक घडवून आणण्यात मुख्य भूमिका मुनगंटीवार यांनी बजावली.
राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी रविंद्र टोंगे यांचं अन्नत्याग आंदोलन मागे घेतल्याची घोषणा केली.
यावेळी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, आमदार किशोर जोरगेवार व आमदार किर्तीकुमार भांगडीया, परिणय फुके, सचिन राजूरकर, दिनेश चोखारे, पप्पू देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.
चंद्रपूर – गेल्या १० दिवसांपासून मोठय़ा भक्ति भावाने सुरू असलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवासह घरोघरी बसलेल्या गणरायाला अनंत चतुर्दशीच्या दिवशी निरोप देण्यात आला.
मोठ्या १२२ मोठ्या मूर्तींसह विसर्जनाच्या दिवसापर्यंत एकूण ६७५६ गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. चंद्रपूर शहर महानगरपालिका, पोलीस विभाग,जिल्हा प्रशासन यांच्या योग्य नियोजनाद्वारे सोहळा पार पडला. यादरम्यान मनपातर्फे पहाट होण्यापूर्वीच शहरातील मुख्य रस्त्यांची सफाई करण्यात येऊन शहर स्वच्छ करण्यात आले.
विसर्जन सोहळ्यास सहभागी होणारी अनेक मंडळे, लाखोंच्या संख्येने सहभागी होणारी गर्दी, खाद्यान्न पदार्थांचे स्टॉल्स यामुळे शहरात मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण होतो विशेषतः रस्त्यावर पडलेल्या कागदी प्लेटस ज्या गर्दीच्या चालण्याने रस्त्याशी इतक्या मिसळतात की त्यांना अक्षरशः खरडुन काढावे लागते. मनपा स्वच्छता कर्मचारी इतक्या वक्तशीर स्वच्छतेचे काम करतात की सकाळी निघालेल्या नागरीकांना कळणार सुद्धा नाही की रात्री इतका कचरा या रस्त्यावर होता.
यंदाही सकाळी ६ पूर्वीच सर्व रहदारीचे मार्ग स्वच्छ करण्यात आले होते.
विसर्जन स्थळावर १२२ मोठ्या सार्वजनिक गणेश मुर्तींचे विसर्जन करण्यात आले यातील अखेरच्या मुर्तीचे विसर्जन करण्यास सकाळी ८ वाजले होते. यादरम्यान क्रेनद्वारे उचलुन रीतसर विसर्जन करण्यात आले.आपत्ती व्यवस्थापन चमुने पुर्ण वेळ तैनात राहुन मोठे सर्च लाईट, फायर अँड रेस्क्यु व्हेइकल, पावर बोट,लाईफ जॅकेट लाईफ सेव्हींग ट्युब्ज इत्यादी व्यवस्था सज्ज ठेवल्याने कुठेही अनुचित घटना घडली नाही. ईरई नदी काठावर विसर्जनासाठी ६ घाट उभारण्यात आल्याने कुठेही गर्दी झाली नाही.
ईरई धरणातून पाणी सोडण्याची व्यवस्था प्रशासनाच्या मार्फत केली गेली असल्याने नदीपात्रात मोठ्या मुर्तीच्या विसर्जनास अडचण गेली नाही. मनपा अधिकारी व कर्मचारी यांनी पुर्ण उपस्थीत राहुन विसर्जन सोहळा व्यवस्थीत पार पडेल याची खात्री केली. सार्वजनिक गणेश मंडळ,पोलीस प्रशासन,जिल्हा प्रशासन व नागरीकांनी विसर्जन सोहळा यशस्वी पार पाडण्यास सहकार्य केले याबद्दल मनपा प्रशासनाने आभार व्यक्त केले.
चंद्रपूर – काही दिवसांपूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार हे टिल्लूपंप आहेत, तुम्ही त्यांना चहा पाजलात किंवा ढाब्यावर घेऊन गेलात तर बातम्या प्रसिद्ध करतात, असे सांगून पत्रकारांचा अपमान केला होता. त्यांच्या वक्तव्यामुळे राज्यभरातील पत्रकार दुखावले असून त्यांच्यावर सर्वत्र निषेध प्रकट केला जात आहे.
या मालिकेत आज बावनकुळे यांना चंद्रपुरात ही निषेध करण्याचा निर्णय डिजिटल मीडिया संस्थेने घेतला आहे. डिजिटल मीडिया संस्थेने “या बावनकुळे धाब्यावर” या नावाने एक कार्यक्रम आयोजित करण्याचे ठरवले असून त्यांनी बावनकुळे यांना रविवार, 1 ऑक्टोबर रोजी चंद्रपूर येथील लोहारा ढाब्यावर रात्री 8:00 वाजता सावजी भोजनासाठी आमंत्रित केले आहे. बावनकुळे साहेबांनी आम्हाला ढाब्यावर पत्रकारांना अनेकदा खाऊ घातला आणि चहाही दिला, त्यामुळे आता त्यांच्यासाठी आमच्याकडून ही रिटर्न गिफ्ट पार्टी असल्याचे संघटनेने म्हटले आहे.
या निमंत्रित मेजवानीला बावनकुळे साहेब आले नाहीत तर मात्र त्यांचा तिथे निषेध करण्यात येईल. येत्या नवरात्रीच्या काळा पासून त्यांच्या जिभे मधून कोणतेही वाईट शब्द येऊ नयेत यासाठी गणेशाने त्यांना सदबुद्धी आणि वरदान द्यावे, अशी प्रार्थनाही संस्थेने केली आहे.
संस्थेच्या या बैठकीत डिजिटल मीडिया असोसिएशन चंद्रपूरचे अध्यक्ष जितेंद्र चोरडिया, जितेंद्र जोगाड, राजेश नायडू, दिनेश एकवणकर, जयपाल गेडाम यांच्यासह पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चंद्रपुर – मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करण्यात येऊ नये, राज्यामध्ये बिहारच्या धर्तीवर जातनिहाय सर्वे करण्यात यावा तसेच प्रत्येक जिल्ह्यात ओबीसी मुला-मुलींसाठी स्वतंत्र वसतीगृह सुरू करण्यात यावे या मागण्यांसाठी मागील 22 दिवसांपासून राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे नेतृत्वात सुरू असलेल्या आंदोलनावर आज अखेर 29 सप्टेंबर रोजी तोडगा निघाला.
मुंबईतील सह्याद्री अतिथी गृहावर आज दुपारी 2 वाजता राज्यातील ओबीसी नेत्यांच्या शिष्टमंडळासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीमध्ये ओबीसींच्या सर्व मागण्या तत्वतः मान्य करण्याचे आश्वासन दिले, तसेच या मागण्यांवर लवकरात लवकर अंमलबजावणी करण्याचे आश्वासन सुद्धा राज्य सरकारने दिल्यामुळे ओबीसींचे चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 22 दिवसापासून सुरू असलेले अन्नत्याग आंदोलन अखेर स्थगित करण्यात आले.
या बैठकीला जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे ,अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे ,महासचिव सचिन राजूरकर तसेच अशोक जीवतोडे, दिनेश चोखारे एडवोकेट पुरुषोत्तम सातपुते, डॉ.संजय घाटे, सूर्यकांत खनके, मनीषा बोबडे ,अनिल शिंदे, अनिल डहाके इत्यादी ओबीसी नेते उपस्थित होते.
शनिवार दिनांक सकाळी नऊ वाजता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील आंदोलन मंडपाला भेट देऊन उपोषणकर्ते रवींद्र टोंगे, विजय बल्की व प्रेमानंद जोगी यांचे उपोषण सोडवतील. त्यानंतर अधिकृतपणे आंदोलन स्थगित केल्याचे राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे जाहीर करण्यात येईल.
चंद्रपूर जिल्हा बंद स्थगित
राष्ट्रीय ओबीसी महासंघ तर्फे दिनांक 30 सप्टेंबर 2023 रोजी पुकारण्यात आलेल्या चंद्रपूर जिल्हा बंद आंदोलन स्थगित करण्यात आले आहे. राज्य शासनाने या संदर्भात सकारात्मक ओबीसीच्या मागण्यांसंदर्भात शासनाने दिलेल्या भूमिकेचे राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे स्वागत करतो.शासनाने मागण्या मंजूर केल्या असून त्याची तातडीने अमलबजावणी करण्यात यावी.
आजपर्यंत नागरिकांनी राजकीय पक्षाची युती बघितली मात्र प्रथमच चंद्रपुरातील अग्रगण्य डिजिटल मीडिया मधील 4 News पोर्टल व Youtube चॅनेल ने महायुती करीत श्री गणेश विसर्जन सोहळ्याचे थेट प्रक्षेपण केले. JBL चे हेडफोन फक्त 600 रुपयात त्वरा करा
आधी हे थेट प्रक्षेपण होणार कसे असा प्रश्न अनेकांना पडला होता, कारण आजच्या आधुनिक युगात अनेक नवे बदल झाले आहे, स्थानिक वृत्त वाहिनी यांचं प्रस्थापित नेटवर्क सध्या सुरू आहे, शहरातील विविध जागेवर केबल टाकून या वाहिन्या थेट प्रक्षेपण करतात मात्र यावेळी डिजिटल मीडियाने नवा प्रयोग करीत वायरलेस थेट प्रक्षेपण करीत चंद्रपूरकरांची मने जिंकली आहे.
चंद्रपुरातील अग्रगण्य डिजिटल मीडिया मधील News34, पार्थशर समाचार, DIG News व Mh24x7 यांनी थेट प्रक्षेपणात येणाऱ्या अडचणींचा अभ्यास करीत वायरलेस प्रक्षेपणाचे उत्कृष्ट कार्य केले, व हे काम चंद्रपुरात प्रथमच केल्याचा बहुमान चंद्रपुरातील डिजिटल मीडियाने प्राप्त केला आहे.
चंद्रपुरातील डिजिटल मीडियाने 28 सप्टेंबर ला सकाळपासून थेट प्रक्षेपणाची सुरुवात केली, हजारो नागरिकांनी चंद्रपुरातील श्री गणेश विसर्जनाचा सोहळा एकाचवेळी 4 चॅनेल वर बघितला, चंद्रपूर व अन्य जिल्ह्यातील वाचक वर्गाचे News34 चे संचालक संपादक प्रकाश हांडे, पार्थशर समाचार चे संपादक राजेश नायडू, DIG News चे संपादक गणेश अडलूर व Mh24x7 चे आकाश नामेवार व तरन्नुम शेख यांनी आभार मानले आहे.
चंद्रपूर / वीजबिल भरण्यास ग्राहकांना गैरसोईचे होऊ नये यासाठी सुट्टीच्या दिवशीही 30 सप्टेंबर व 1ऑक्टोबर या सुट्टीच्या दिवशीही जिल्ह्यातील सर्व वीजबिल भरणा केंद्रे सुरु ठेवण्यात आली आहेत. One plus कंपनीचे इअर बड्स फक्त 2 हजार रुपयात
सोबतच वीजबिलांचा भरणा करण्यासाठी महावितरणद्वारा ग्राहकांना पर्यावरणपुरक ऑनलाईन पेमेंट, मोबाईल अॅप, गुगल पे,पेटीएम या यासारख्या ग्राहकाभिमुख सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून नियीमत ग्राहकांचा प्रतिसादही या सुविधांना चांगल्या प्रकारे लाभत आहे. iPhone 14 फक्त 62 हजार रुपयात त्वरा करा..
ऑनलाईन पर्यांयाद्वारे वीजबिलांचा वीजदेयक भरल्यास वेळ व श्रमाची बचत होईलच सोबतच ०.२५ % डिजीटल पेमेंट सुट पण मिळेल. वीजग्राहकांनी घरबसल्या महावितरणची वेबसाईट, मोबाईल एप किंवा इतर ऑनलाईन पर्यांयाद्वारे वीजबिलांचा भरणा करून महावितरणची आर्थिक स्थिती समजून घेवून वीजबिल भरून महावितरण कंपनीला सहकार्य करावे असे आवाहन करण्यात येत आहे.
चंद्रपूर – मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यात येऊ नये, ओबीसी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाची व्यवस्था करण्यात यावी यासह विविध मागण्यांसाठी चंद्रपुरात मागील 19 दिवसांपासून रविंद्र टोंगे, विजय बलकी व आजपासून प्रेमानंद जोगी हे आमरण उपोषणाला बसले आहे, तब्बल 19 दिवसांनी मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहात ओबीसी शिष्टमंडळाची मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्यासोबत बैठक आयोजित करण्यात आली आहे.
ओबीसी समाजाच्या विविध मागणीबाबत या बैठकीत चर्चा करण्यात येणार असून सदर बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, मुख्य सचिव महाराष्ट्र, ओबीसी संघटनांचे प्रतिनिधी सचिन राजूरकर, दिनेश चोखारे, डॉ. संजय घाटे, पुरुषोत्तम सातपुते, अनिल डहाके, मनीषा बोबडे, बबलू कटरे, सूर्यकांत खनके, अनिल शिंदे हे उपस्थित राहणार आहे.
मलबार हिल मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहात 29 सप्टेंबर ला दुपारी 2 वाजता आयोजित या बैठकीत ओबीसी संघटनांच्या विविध मागण्यांवर काय चर्चा व तोडगा निघणार यावर सर्व ओबीसी संघटनांचे लक्ष लागले आहे.
चंद्रपूर – जिल्ह्यात जोमात सुरू असलेल्या नियमबाह्य व्हिडीओ गेम पार्लर बाबत News34 ने बातमी प्रसारित केल्यावर प्रशासनाने कारवाईचा धडाका सुरू केला मात्र ठोस कारवाई अजूनही झाली नाही.
विशेष बाब म्हणजे वर्ष 2022 पासून व्हिडीओ गेम पार्लर चे परवाने नूतनीकरण करण्यात आले नसल्याने आजही हे पार्लर सुरू आहे.
आता या नियमबाह्य जुगाराची तक्रार थेट राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना करण्यात आली आहे, राष्ट्रवादी कांग्रेसचे सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष प्रियदर्शन इंगळे यांनी व्हिडीओ गेम पार्लर च्या नावाखाली सुरू असलेला जुगार कायमस्वरूपी बंद करावा अशी मागणी मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस यांना निवेदनाद्वारे केली आहे, इंगळे यांनी तक्रारीची प्रत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री कार्यालयाला पाठवली आहे.
इंगळे यांनी निवेदनात म्हटले आहे की पूर्णतः सेट केलेल्या मशिनद्वारे पैसे लावण्यात येतात मात्र खेळणारा पैसे कधी जिंकत नाही, उलट तो पैसे हरतो, यामुळे अनेकांचे घरे उध्वस्त झाली आहे, काही युवकांनी या व्हिडीओ गेम पार्लर मुळे आत्महत्या केल्याच्या घटना सुद्धा घडल्या आहे.
प्रत्येक वेळी जिल्हा प्रशासनातील अधिकारी मार्फत पार्लर च्या परवाना नुसार काही नियमांचा भंग तर होत नाही याबाबत तपासणी करण्याचा अधिकार आहे मात्र आजपर्यंत अशी तपासणी मोहीम राबविण्यात आली नाही.
पोलीस प्रशासनाने कारवाई केल्यावर जिल्हाधिकारी यांनी तपासणी मोहीम राबवा असे आदेश दिले, त्यानंतर पार्लर धारकांची बैठक घेत नियमबाह्य व्हिडीओ गेम पार्लरवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले, मात्र ज्यांनी नियमांचा भंग केला ते सुद्धा त्या बैठकीत उपस्थित होते तर मग जिल्हाधिकारी कारवाईचा इशारा कुणाला देत होते? यामध्ये संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे.
प्रियदर्शन इंगळे यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना चंद्रपुरातील व्हिडीओ गेम पार्लर कायमस्वरूपी बंद करावे अशी मागणी केल्याने पार्लर संचालकांचे धाबे दणाणले आहे.
हरणाऱ्या व्यक्ती कडून पार्लर चालकांनी अनेकांचे दागिने व मालमत्ता गहाण ठेवल्याची सुद्धा माहिती इंगळे यांनी निवेदनामार्फत दिली आहे.
अश्या जुगारावर कायमस्वरूपी बंदी घालावी अन्यथा भविष्यात अनेकांचे घरे उध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही अशी मागणी इंगळे यांनी केली आहे.