Author: Admin

  • Mission Shikhar chandrapur : आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांची JEE परीक्षेत उत्तुंग भरारी

    Mission Shikhar chandrapur : आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांची JEE परीक्षेत उत्तुंग भरारी

    Mission Shikhar chandrapur एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालय चंद्रपूर अंतर्गत आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांकरीता मिशन शिखर उपक्रम राबविला जात आहे. या उपक्रमांतर्गत आदिवासी विद्यार्थ्यांना JEE/NEET/CET/NDA/CLAT अशा विविध परिक्षेचे मोफत मार्गदर्शन प्रशिक्षक / शिक्षक यांच्या मदतीने दिले जाते. दिनांक 24 एप्रिल 2024 ला JEE परीक्षेचा निकाल जाहीर झाला. त्यामध्ये मिशन शिखर मधील 5 आदिवासी विद्यार्थी पात्र झाले आहेत.

     

     यात सुनिता श्यामराव मेश्राम, रा. जिवती (69.14 टक्के),  प्रितिका जंगु करपाते, रा. भारी  (68.23 टक्के), अदिती उमेश जुमनाके, रा. मांडवा, ता. कोरपना (64.44 टक्के), अर्जुन विजु वेलादी, रा. कारगाव, ता. कोरपना  (54.46 टक्के) आणि गौरव चित्तरंजन कोवे, रा. मोहाळी, ता. बल्लारपूर (47.46 टक्के) अशी पात्र विद्यार्थ्यांची नावे आहेत. हे सर्व विद्यार्थी चंद्रपूर जिल्हयातील असून आदिवासी समाजाचे आहेत तसेच हे विद्यार्थी एकलव्य मॉडेल रेसीडेंशिअल पब्लिक  स्कुल, देवाडा येथे शिकत आहेत. सर्व पात्र विद्यार्थी व त्यांच्या पालकांना प्रकल्प कार्यालयात आमंत्रित करून त्यांना भेट वस्तू देवून त्यांचा सत्कार केला. Mission Shikhar chandrapur

     

    मिशन शिखर 2023-2024 अंतर्गत जेईई/नीट/सीईटी/एनडीए/सीएलएटी चा CRASH Course प्रकल्पात राबविला जात असून त्यामध्ये यावर्षी सीईटी करीात 85, जेईई 27, नीट 54 आणि एनडीए साठी 20 विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जात आहे. भविष्यात जास्तीत जास्त संख्येने विद्यार्थ्यांना परीक्षेमध्ये पात्र करणे हा आदिवासी विकास प्रकल्पाचा उद्देश असल्याचे प्रकल्प अधिकारी श्री. राचेलवार यांनी सांगितले. Mission Shikhar chandrapur

     

    प्रकल्पात पहिल्यांदाच ऐवढ्या संख्येने आश्रम शाळेतील विदयार्थी जेईई सारख्या परीक्षेत पात्र झालेले आहेत. आदिवासी विद्यार्थीसुद्धा कोणत्याही परिस्थितीवर मात करून घवघवीत यश संपादन करू शकतो, हे या यशाने दाखवून दिले आहे. मे 2024 ला होणा-या विविध मेडिकल / इंजिनिअरींग परीक्षेकरीता मिशन शिखर अंतर्गत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जात आहे. त्यामध्ये जास्तीत जास्त विद्यार्थी पात्र होतील, असा विश्वास प्रकल्प अधिकारी यांनी व्यक्त केला आहे. Mission Shikhar chandrapur

     

     

    यावेळी सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षक, मिशन शिखर उपक्रमास भेट देणारे प्रकल्प कार्यालयातील अधिकारी,  एकलव्य मॉडेल रेसीडेंशिअल पब्लिक स्कुल, देवाडा या सर्वांचे कौतुक करण्यात आले आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या उपक्रमांत सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले. प्रकल्पात आदिवासी विद्यार्थ्यांकरीता मिशन शिखर, समर कॅम्प, ताडोबा शैक्षणिक सहल, भारत दर्शन, परदेशी शिष्यवृत्तीचा लाभ, शिक्षकांकरीता भविष्यावेधी प्रणाली नुसार प्रशिक्षण, आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना विविध अभ्यासपूरक प्रशिक्षण असे विविध उपक्रम सुरू करण्यात आले आहेत.

  • river indie electric scooter : देशात एसयूव्ही ऑफ स्कूटर लाँच

    river indie electric scooter : देशात एसयूव्ही ऑफ स्कूटर लाँच

    river indie electric scooter जर तुम्ही देखील इलेक्ट्रिक स्कूटर घेण्याचा विचार करत असाल आणि तुमच्या पर्यायामध्ये OLA आणि Ather ची इलेक्ट्रिक स्कूटर्स असतील, तर आता तुमचा विचार बदला. कारण आज आम्ही अशा इलेक्ट्रिक स्कूटरबद्दल माहिती देणार आहोत, तिची खास रचना, वैशिष्ट्ये आणि किंमत जाणून घेतल्यानंतर तुम्ही ही स्टायलिश दिसणारी इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करण्याचा विचार कराल. ही इलेक्ट्रिक स्कूटर खूपच महाग दिसते. पण हे OLA, Ather Rizta, Hero, Chetak, TVS इत्यादींच्या इलेक्ट्रिक स्कूटरपेक्षा खूपच स्वस्त आहे.

     

     

    बेंगळुरू स्थित ईव्ही स्टार्ट-अप कंपनी रिव्हरने ही स्टायलिश दिसणारी आणि शक्तिशाली इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च केली आहे. ज्याला रिव्हर इंडी ई-स्कूटर असे नाव देण्यात आले आहे. या इलेक्ट्रिक स्कूटरला “एसयूव्ही ऑफ स्कूटर” असेही म्हणतात. कारण त्यात भरपूर जागा देण्यात आली आहे. कंपनीने या इलेक्ट्रिक स्कूटरचे डिझाईन इतके आकर्षक बनवले आहे की कोणीही ती विकत घेण्याचा विचार करतो. river indie electric scooter

     

    रिव्हर इंडी इलेक्ट्रिक स्कूटरची खास वैशिष्ट्ये आम्ही तुम्हाला सांगतो, जी खरेदी करण्यापूर्वी तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे. रिव्हर इंडी इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये तुम्हाला कधीही जागेची कमतरता भासणार नाही. कारण कंपनीने याला 3-लिटर अंडर-सीट बूट स्पेस दिली आहे, जी आजपर्यंत सर्वात जास्त बूट स्पेस स्टोरेज असलेली इलेक्ट्रिक स्कूटर आहे. river indie electric scooter

     

     

    रिव्हर इंडीला डॅशबोर्डवर समोर 12-लिटर लॉक करण्यायोग्य ग्लोव्ह बॉक्स स्टोरेज मिळते. तसेच आरामात बसण्यासाठी लांब आणि रुंद आसन आहे. या इलेक्ट्रिक स्कूटरच्या अद्वितीय डिझाइनमुळे रिव्हर इंडी इलेक्ट्रिक स्कूटर इतर सर्वांपेक्षा वेगळी आहे. या स्कूटरचा फ्रंट लूकही लोकांना खूप आकर्षित करत आहे. समोर अतिशय अद्वितीय डबल पॉड एलईडी हेडलॅम्प सेटअप देण्यात आला आहे. river indie electric scooter

     

    रिव्हर इंडी इलेक्ट्रिक स्कूटर IP67-रेट केलेल्या 4 KWh क्षमतेच्या लिथियम आयन बॅटरी पॅकचा वापर करते, त्यासोबत त्यात 6.7 KWh पॉवर इलेक्ट्रिक मोटर आहे, जी 26 Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. त्याची बॅटरी 80 टक्के चार्ज होण्यासाठी 5 तास लागतात.

     

     

    रेंजबद्दल सांगायचे तर, या इलेक्ट्रिक स्कूटरची बॅटरी एकदा पूर्ण चार्ज झाली की, 120 किलोमीटरची ड्रायव्हिंग रेंज गाठता येते. त्याचा टॉप स्पीड 90 किलोमीटर प्रति तास आहे, जो 3.9 सेकंदात 0 ते 40 किलोमीटर प्रति तास वेग वाढवू शकतो. यात समोर 240 mm डिस्क ब्रेक आणि मागील बाजूस 200 mm डिस्क ब्रेक आहे. सस्पेन्शनबद्दल बोलायचे झाले तर यात समोरील भागात टेलिस्कोपिक फोर्क सस्पेन्शन सेटअप आहे आणि रिअलमध्ये ट्विन हायड्रोलिक सिस्टीम आहे. river indie electric scooter

     

     

    यात 14 इंची अलॉय व्हील्स आहेत. रिव्हर इंडी इलेक्ट्रिक स्कूटरच्या वैशिष्ट्यांबद्दल सांगायचे तर, यात 6-इंचाचा डिजिटल कलर इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आहे. याशिवाय यात यूएसबी चार्जिंग सॉकेट, डिजिटल स्पीडोमीटर, पुश बटण स्टार्ट, तीन रायडिंग मोड (इको, राइड आणि रश), पोझिशन लॅम्प, हॅझर्ड लाइट्स, स्विंग आर्म ड्युअल साइड, सीटखाली 43 लीटर बूट स्पेस, एलईडी हेडलाइट, रिव्हर्स आहेत.

     

     

    असिस्ट, LED टेल लाईट, LED टर्न सिग्नल लॅम्प, मोठा 20-इंच फूटबोर्ड यांसारखी वैशिष्ट्ये समाविष्ट आहेत. कंपनीने रिव्हर इंडी इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात आणली आहे ज्याची सुरुवातीची किंमत 1.38 लाख रुपये आहे (एक्स-शोरूम). इलेक्ट्रिक स्कूटरची कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवरून 2,500 रुपयांच्या टोकन रकमेवर प्री-ऑर्डर केली जाऊ शकते. रिव्हर इंडी इलेक्ट्रिक स्कूटर मान्सून ब्लू, समर रेड आणि स्प्रिंग यलो या तीन रंगांच्या पर्यायांमध्ये खरेदी केली जाऊ शकते.

  • Chief Minister’s Aid Fund : आमदार किशोर जोरगेवार मुळे त्या रुग्णाला मिळाली मदत

    Chief Minister’s Aid Fund : आमदार किशोर जोरगेवार मुळे त्या रुग्णाला मिळाली मदत

    Chief Minister’s Aid Fund मेंदु रोग आजाराने त्रस्त असलेल्या रुग्णाला उपचाराकरीता आमदार किशोर जोरगेवार यांच्या प्रयत्नामुळे मुख्यमंत्री सहायता निधी मधून 1 लक्ष रुपयांची मदत करण्यात आली आहे. या निधीतून आता  समीर खाँ रहीमतुल्ला खाँ पठान या रुग्णावर नागपूर येथील खाजगी रुग्णालयात उपचार केला जाणार आहे.

     

    समीर खाँ रहीमतुल्ला खाँ पठान या 52 वर्षीय व्यक्तीला मेंदूच्या आजाराने ग्रासले होते. परिस्थिती हलाकीची असल्याने योग्य उपचार करणे त्यांच्याने शक्य होत नव्हते. आजवर अनेक ठिकाणी उपचार घेतला मात्र पैश्याअभावी त्यांच्यावर पूर्ण उपचार होऊ शकले नाही. Chief Minister’s Aid Fund

     

    परिणामी त्यांच्या वेदना त्रासदायक होऊ लागल्या. अश्यात त्यांनी आमदार किशोर जोरगेवार यांच्या जनसंपर्क कार्यालयाशी संपर्क साधला. यावेळी यंग चांदा ब्रिगेडच्या आरोग्य सेवकांच्या वतीने त्यांना सदर आजारावरील उपचारा बाबत माहिती देण्यात आली. Chief Minister’s Aid Fund

     

    तसेच यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीतुन मदत मिळवून देण्याबाबत आमदार किशोर जोरगेवार यांना कळविण्यात आले. त्यानंतर आमदार किशोर जोरगेवार यांनी पाठपूरावा करत सदर रुग्णाला उपचारा करिता मुख्यमंत्री सहायता निधीतून 1 लाख रुपयांना निधी मिळवून दिला आहे. सदर निधीतुन आता या रुग्णावर नागपूर येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार केल्या जात असुन त्यांच्यावर क्रॅनियोप्लास्टी शस्त्रक्रिया केली जाणार आहे.

  • Sunita Patil Aap : हातात झाडू घेत त्या पक्षात पुन्हा परतल्या

    Sunita Patil Aap : हातात झाडू घेत त्या पक्षात पुन्हा परतल्या

    Sunita Patil Aap काहि महिन्यांपुर्वी आम आदमी पक्षाला सोडचिट्टी देत काँग्रेस पक्षात प्रवेश करणाऱ्या आम आदमी पक्षाच्या माजी महिला अध्यक्षा एड. सुनिताताई पाटिल यांची आम आदमी पक्षात पुन्हा घरवापसी केली.

    स्पर्धा निकाल : चिमूर का छोकरा चंद्रपूर लोकसभेत प्रथम

    आम आदमी पक्ष सोडून काँग्रेस मध्ये प्रवेश केल्यानंतरही आम आदमी पक्षाची विचारसरणी व केजरीवाल साहेबांच्या विकासकार्यांवर त्यांची निष्ठा कमी होऊ शकली नाही. त्यामुळेच जिल्हा संघठनमंत्री श्री. भिवराज सोनी यांच्या नेतृत्वात तसेच जिल्हा उपाध्यक्ष प्रा.नागेश्वर गंडलेवार, जिल्हा संघटन मंत्री योगेश मुरेकर, जिल्हा कोषाध्यक्ष सरफराज भाई शेख, युवा जिल्हा उपाध्यक्ष सुमित हस्तक, महानगर उपाध्यक्ष सुनील सदभय्या, श्री सुनील जी भोयर, श्री रामदास चौधरी, बल्लारपूर शहर अध्यक्ष रविकुमार पुप्पलवार, बल्लारपूर युवा अध्यक्ष सागर कांबळे, यांच्या प्रमूख उपस्थितीत त्यांनी आम आदमी पक्षात पुन्हा घरवापसी केली. Sunita Patil Aap

    पुतळ्याची विटंबना – त्या समाजकंटकांना अटक करा

    यासोबतच केजरीवाल यांच्या विचारसरणीवर विश्वास ठेवून जनसामान्यांचा हक्कासाठी व पक्ष वाढिसाठी जोमाने कार्य करणार असे देखील एड. सुनिता पाटिल यांनी यावेळी म्हटले. Sunita Patil Aap

     

    या वेळी ऍड. सुनीताताई पाटील सह पूजा खोबरे, स्वाती डोंगरे, सीमा पेंदाम, शुभांगी बावणे, मनीषा बावणे, ज्योती संगेवार, काजल उचके, देवकाबाई इंगळे, साधना पाटील, सुहास रामटेके, संतोशी यादव, ज्योती यादव, प्रशांत रामटेके, नंदकिशोर स्वान, सुनील चौधरी, निधी चौधरी, निलेश दाडे, अदनान शेख व असंख्य महिला कार्यकर्ता व पुरुष कार्यकर्ता यांनी पक्षप्रवेश केला.

  • Lok Sabha Election Voting : रिल्स स्पर्धेत चिमूर का छोकरा आशिष बोबडे प्रथम

    Lok Sabha Election Voting : रिल्स स्पर्धेत चिमूर का छोकरा आशिष बोबडे प्रथम

    Lok Sabha Election Voting लोकसभा सार्वत्रिक निवडणूक  – 2024 अंतर्गत चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने मतदान केल्याचा सेल्फी, रिल्स्, पोस्टर्स आणि मिम्स् स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला नागरिकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद देऊन मतदानाची टक्केवारी वाढविण्यात सहकार्य केले.

    सर्वसामान्य पालकांचा अधिकार – RTE कायद्याचे बदलले नियम

    या स्पर्धांचा निकाल जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. आणि मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांच्या उपस्थितीत लकी ड्रॉ च्या माध्यमातून नुकताच घोषित करण्यात आला आहे.

     

    सन 2019 च्या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी कमी असल्यामुळे यावर्षी 2024 मध्ये मतदारांमध्ये मतदानाचा उत्साह निर्माण व्हावा, लोकशाही प्रक्रियेत सहभाग नोंदवून मतदानाची टक्केवारी वाढावी, या उद्देशाने स्वीप अंतर्गत जिल्हा प्रशासनाने वेगवेगळे उपक्रम राबविले. Lok Sabha Election Voting

     

    तरुण मतदारांमध्ये रिल्स्, पोस्टर्स, मिम्स् बाबत असलेली प्रचंड उत्सुकता पाहता जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांनी ‘माय व्होट इज माय फ्युचर, पॉवर ऑफ वन व्होट’ या थीमवर रिल्स्, पोस्टर्स, मिम्स् तयार करून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावरून अपलोड करणे, तसेच ‘तुमचे मत द्या आणि आकर्षक बक्षीसे जिंका’ या थीमवर आधारीत मतदान केल्यानंतर शाई लावलेले बोट दाखवत मतदान केंद्रासमोर सेल्फी क्लिक करून फोटो अपलोड करण्याबाबत स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. Lok Sabha Election Voting

     

    या स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला असून विजेत्या स्पर्धकांना जिल्हाधिकारी यांच्या हस्ते पुढील आठवड्यात नियोजन भवन येथे पारितोषिक वितरीत करण्यात येणार आहे. स्पर्धेचा लकी ड्रा काढतांना जिल्हाधिकारी कार्यालय येथे उपवनसंरक्षक श्वेता बोड्डू, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य) श्याम वाखर्डे व इतर अधिकारी उपस्थित होते. Lok Sabha Election Voting

     

    हे आहेत स्पर्धेतील विजेते मतदार : मतदान केंद्रासमोर Selfie क्लिक करणे

                या स्पर्धेचे प्रथम पारितोषिक (अपाची मोटरसायकल) सुरेंद्र देवराव पोहाणे, रा. तुकुम चंद्रपूर यांना, द्वितीय पारितोषिक (रेसींग सायकल) प्रशांत मधुकर गेडाम, रा. मूल यांना तर तृतीय पारितोषिक (ॲन्ड्रॉईड मोबाईल) अशोक ऋषी बारसागडे, रा. चंद्रपूर यांना लकी ड्रॉ च्या माध्यमातून घोषित करण्यात आले आहे.

     

                Reels स्पर्धा : प्रथम पारितोषिक (15 हजार रुपये) आशिष बोबडे, रा. टिळक वॉर्ड, बालाजी मंदीरजवळ, चिमूर यांना, द्वितीय पारितोषिक (10 हजार रुपये) मंगेश साखरकर, रा. पालगाव, पो. आवाळपूर, ता. कोरपना यांना, तृतीय पारितोषिक (5 हजार रुपये) कोमील ज्ञानेश्वर मडावी, रा. वॉटर सप्लाय कॉर्टर, गोपालनगर, तुकुम, चंद्रपूर यांना लकी ड्रॉ च्या माध्यमातून घोषित करण्यात आले आहे.

     

                Posters स्पर्धा : प्रथम पारितोषिक (5 हजार रुपये) प्रथमेश यशवंत निकोडे, रा. नेहरू नगर, नवीन वस्ती, डीआरसी रोड, चंद्रपूर यांना, द्वितीय पारितोषिक (3 हजार रुपये) आचल राजू धोगडे, रा. शासकीय कन्या वसतीगृह, भिवकुंड (विसापूर) यांना, तृतीय पारितोषिक (2 हजार रुपये) वैष्णवी राजू मिलमिले, रा. तिलक वॉर्ड, बोर्डा, ता. वरोरा यांना लकी ड्रॉ च्या माध्यमातून घोषित करण्यात आले आहे.

     

                Mems स्पर्धा : प्रथम पारितोषिक (5 हजार रुपये) येवन संतोष येलमुले, रा. सुब्बई, ता. राजुरा यांना, द्वितीय पारितोषिक (3 हजार रुपये) संजय बाबुराव सोनुने, रा. हुडको कॉलनी, अमर चौक, चंद्रपूर यांना, तृतीय पारितोषिक (2 हजार रुपये) अनुप रंगलाल शाहा, रा. मच्छीनाला, मुक्तीकॉलनी, चंद्रपूर यांना लकी ड्रॉ च्या माध्यमातून घोषित करण्यात आले आहे.

  • Mul City Bus Station : मूल बस स्थानकावर प्रवाशांचे हाल बेहाल

    Mul City Bus Station : मूल बस स्थानकावर प्रवाशांचे हाल बेहाल

    गुरू गुरनुले

    Mul City Bus Station मुल – स्वच्छ सुदंर शहर म्हणून ओळख असलेल्या मुल शहरात कोटी रुपये खर्च करुन बसस्थानक बांधण्यात आले. तरी देखील अन्य सोई सुविधा, कर्मचाऱ्यांची कर्तव्यात कुचराई मात्र अजूनही कायम असल्याने रात्रीच्या वेळेला प्रवाशी बांधव महिला व शाळेच्या विद्यार्थ्यांचे बेहाल होत असल्याचे अडून राहिलेल्या ग्रामीण प्रवाशी बांधवांनी बोलून दाखविले आहे.

     

    दिनांक २४ एप्रिल २०२४ रोजी रात्री ८-३० वाजता गोंडपीपरी मार्गाकडे जाणारी बस रात्री ८ वाजता यायला पाहिजे परंतु ती बस रात्री ९-४० नंतर आल्याने तोपर्यंत शाळेचे विद्यार्थी व लग्नकार्यालां आलेले जूनासूर्ला,व त्यामार्गावरील असंख्य प्रवासी बसस्थानकावर अडून पडल्याने बिचाऱ्या प्रवाशी बांधवांचे बेहाल झाल्याचे प्रवाशी बांधवांनी बोलून दाखविले आहे. Mul City Bus Station

    Rte – RTE चे नवे नियम पालकांना त्रासदायक

    वाहतूक नियंत्रक गायब

    मुल हे मध्यवर्ती बसस्थानक असल्याने याठिकाणी वाहतूक नियंत्रक यांची ड्युटी सकाळी ५ ते दुपारी १४ नंतर दुपारी १४ ते रात्री २२(१०) पर्यंत असल्या नंतरही ज्या कुणाची ड्युटी आहे तो वाहतूक नियंत्रक रात्री ८ वाजताच घरी निघून जात आहे. त्यामुळे बसस्थानकावर असणाऱ्या प्रवाशांनी कुणाकडून बसची चौकशी करावी असा प्रश्न प्रवाशांना पडला. Mul City Bus Station

     

    चंद्रपूर – गडचिरोली मार्गाच्या बसेस रात्री १० वाजेपर्यंत येतात तेव्हा स्थानकावर कोणीही जबाबदार व्यक्ती दिसून येत नाही ही वस्तुस्थिती आहे. मग स्थांनकावरची वाहतूक व्यवस्था कोण पाहणार.? असा प्रश्न पडतो. Mul City Bus Station

     

    विभागीय नियंत्रक व आगार व्यवस्थापकांनी लक्ष द्यावे

    मुल शहरातील नगराच्या मध्यभागी असलेल्या मध्यवर्ती बसस्थानकावर नेहमीच प्रवाशांची,ग्रामीण नागरिकांची किंवा राजकीय पदाधिकाऱ्यांची तक्रार असतेच. मुल येथील बसस्थानकावर प्रवाशी वाहतुकीबाबत चंद्रपूर जिल्हा विभागीय नियंत्रकांना दुर्लक्ष होत असल्याचे दिसून आले. तसेच आगार व्यवस्थापकांनी सुद्धा मूलच्या बसस्थानका कडे लक्ष द्यावे अशी मागणी केली जात आहे.

  • Desecration of statue of Mahatma Phule : त्या समाजकंटकांना अटक करा

    Desecration of statue of Mahatma Phule : त्या समाजकंटकांना अटक करा

    गुरू गुरनुले

    Desecration of statue of Mahatma Phule मुल – ज्या महापुरुषांच्या विचारानेच देशाची लोकशाही टिकली आहे अशाच महात्म्यांच्या पुतळ्याची विटंबना केली जात आहे. तरी देखील केंद्र व राज्य सरकार गप्प आहे. २१ एप्रिल २०२४ रोजी यवतमाळ येथे महात्मा फुलेंच्या पुतळ्यांची शाही फेकून विटंबना केली.त्याचा शोध घेऊन अटक करावी अशी मागणी निवेदनाद्वारे उपविभागीय अधिकारी यांचेकडे समाज संघटनेच्या विविध पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

    कायदा मोफत शिक्षणाचा : RTE च्या नव्या नियमविरुद्ध उच्च न्यायालयात याचिका

    माळी महासंघ,समता परिषद, अ.भा.मां.संघ,सावित्रीबाई फुले विकास संस्था, समजोठ्त्थाण मंडळ,महिला गट, ओबीसी व बहुजन समाजाच्या वतीने गांधी चौक मुल येथे निषेध करुन निवेदन देण्यात आले. Desecration of statue of Mahatma Phule

    Mahatma phule

    निवेदन देताना माजी.जी.प.सदस्य,प्रा.रामभाऊ महाडोरे, माजी प्राचार्य बंडू गुरनुले,माळी महासंघाचे विभागीय महासचिव व तालुका कांग्रेस अध्यक्ष गुरु गुरनुले, समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रा.विजय लोनबले, प. स.सदस्य डॉ.पद्माकर लेंनगुरे, माजी उपाध्यक्ष चंदू चटारे, भाजपा युवा अध्यक्ष राकेश ठाकरे,स.म.अध्यक्ष प्रा.सुधीर नागोशे, कार्याध्यक्ष शशिकला गावतूरे, माजी सभापती केमदेव मोहूरले, हसन वाढई, डॉ.राकेश गावतूरे ,दीपक वाढई, सरपंच नितीन गुरनूले, राकेश मोहूरले, आनंद गोंगले, अरुण ढोले,सचिन पुल्लावार, चित्तरंजन वाढई,बाळकृष्ण निकोडे, प्रवीण मोहुरले,बालाजी लेंनगूरे, रवी खोब्रागडे, मंगेश शेंडे,सचिन आंबेकर, विवेक मांदाडे, ओमदेव मोहुर्ल, निखिल वाढई, सत्यवान मोहूर्ल,सुनील कावळे, देवराव गुरनुले,राकेश पुंनावार, रेखा चौधरी, शामला बेलसरे, पापिता मंदाडे, जयश्री कावळे, सीमा लोनबले, प्रमिला शेंडे,प्रदीप वाढई, परशुराम शेंडे, रामदास गुरनुले,श्रीरंग नागोशे,नामदेव वाढई,उमेश ढोले यांचेसह अनेक ओबीसी बहुजन समाज बांधव उपस्थित होते.

  • Right To Education New Rules : RTE कायद्याच्या नव्या नियमांमुळे पालकांमध्ये संभ्रम

    Right To Education New Rules : RTE कायद्याच्या नव्या नियमांमुळे पालकांमध्ये संभ्रम

    Right to education new rules  वर्ष 2009 मध्ये मनमोहन सिंग काळात सुरू झालेला शिक्षणाचा अधिकार RTE ची सुरुवात झाली होती, मात्र वर्ष 2024 मध्ये महायुती सरकारने या कायद्याची पायमल्ली करीत नियमात मोठे बदल केले आहे.

    काळाबाजार | दलाल असे करतात रेल्वे तिकिटांची बुकिंग

    मोफत व सक्तीच्या शिक्षणाच्या अधिकार अंतर्गत ऑनलाइन अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे.
    मात्र अर्ज प्रक्रियेत मोठा घोळ असल्याने पालक वर्ग संभ्रमाच्या अवस्थेत आला आहे, अर्ज भरताना 10 शाळा निवड करायच्या आहे मात्र ऑनलाइन प्रक्रियेत इंग्रजी शाळा दाखवीत नाही आहे. Right to education new rules

    महत्वाची बातमी – चंद्रपूर मनपा आयुक्त बनले, CISF अधिकारी आणि….

     

    शिक्षण विभागाने शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५ मधील आरटीई प्रवेशांसाठी शिक्षण हक्क कायद्यात सुधारणा केली. त्यानुसार एक किलोमीटरच्या परिघात महापालिकेची शाळा असेल तर त्याच शाळेत प्रवेश घ्यावा लागणार आहे. त्यानुसार खासगी शाळांऐवजी प्राधान्याने शासकीय आणि अनुदानित शाळांमध्ये प्रवेश देण्याचे निश्चित करण्यात आले आहे. शासकीय आणि अनुदानित शाळा उपलब्ध नसलेल्या भागातच खासगी शाळेत प्रवेश घेता येणार आहे. मात्र, अर्ज करताना निवडायच्या शाळांमध्ये एकही इंग्रजी माध्यमाच्या शाळेचा समावेश नसल्याचे समोर आल्याने पालकांनी नाराजी व्यक्त केली आहे. Right to education new rules

     

    आठवडाभरात चंद्रपूर जिल्ह्यातून केवळ 150 ऑनलाइन अर्ज

    शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करिता जिल्ह्यातील एक हजार ८४६ शाळांची नोंदणी केली होती. या शाळेमध्ये १५ हजार ६२५ जागा आरटीई प्रवेशासाठी रिक्त ठेवण्यात आल्या आहे. आरटीई प्रवेशासाठी १६ एप्रिलपासून प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. १८ एप्रिलपर्यंत ऑनलाइन 150 अर्ज करण्यात आल्याची पोर्टलवर नोंद करण्यात आली आहे. मात्र अजूनही सदर अर्ज सबमिट करण्यात आले नाही. Right to education new rules

     

    पालकांमध्ये संताप

    खासगी शाळांचे शुल्क मोठ्या प्रमाणात असते. त्यातच आरटीईमुळे वंचित घटकांतील मुलांना दिलासा मिळत होता. मात्र, आता ऑनलाइन अर्ज भरताना फक्त मराठी शाळांचा समावेश दिसून येत आहे. इंग्रजी माध्यमांची एकही शाळा उपलब्ध नाही. जर मराठी शाळेतच आरटीईमधून प्रवेश मिळत असेल तर त्यापेक्षा सरळ मराठी शाळेत प्रवेश घेणे सोयीचे ठरेल. आरटीईमध्ये अर्ज करून पैसे खर्च करण्यात अर्थच काय, असा प्रश्न पालक करत आहेत. Right to education new rules

    Rte च्या ऑनलाइन पोर्टल मध्ये खाजगी इंग्रजी शाळांच्या समोर self finance available असा पर्याय दाखवीत आहे, मात्र त्यामध्ये प्रवेश कसा घ्यायचा याचा पर्याय दिसत नसल्याने, आता प्रवेश घ्यायचा कसा असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

     

    उच्च न्यायालयात याचिका दाखल

    महायुती सरकारच्या या बदललेल्या नियमामुळे इंग्रजी माध्यमांच्या शाळेत मुलांच्या प्रवेशाची वाट खडतर झाली आहे, या बदललेल्या नियमांना ऍड जयेश कोठारी, चंद्रपूरचे ऍड दीपक चटप, ऍड पायल गायकवाड, ऍड ऋषिकेश भोयर यांच्या माध्यमातून शिक्षण हक्कांबाबत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल केली आहे.

     

    उच्च न्यायालयाने राज्य सरकारच्या शिक्षण विभागाला नोटीस बजावीत 8 मे पर्यंत उत्तर मागविले आहे.
    ऍड दीपक चटप यांनी याबाबत माहिती दिली की सरकारच्या नियमांमुळे खासगी इंग्रजी शाळा ही श्रीमंतांच्या मुलांसाठी तर गरीब मुलांसाठी शासकीय शाळा अशी वर्गवारी तयार होणार, याआधी हिमाचल प्रदेश, अरुणाचल प्रदेश व उत्तर प्रदेश आदि राज्यात खासगी शाळांना मुभा देणारे नियम स्थानिक सरकारने तयार केले होते, त्या नियमांना उच्च न्यायालयात आव्हान देत सदर नियम रद्द केले, 2009 च्या rte कायद्यानुसार खासगी शाळांना मुभा देता येत नाही, खासगी शाळांना वेळेवर परतावा दिल्यास त्यांचा विरोध होणार नाही, राज्य सरकारचे नवे नियम बेकायदेशीर व अन्यायकारक असल्याचे मत याचिकाकर्ता तर्फे ऍड दीपक चटप यांनी मांडले आहे.

  • Railway ticket brokers : रेल्वे तिकिटांचा गोरखधंदा

    Railway ticket brokers : रेल्वे तिकिटांचा गोरखधंदा

    Railway ticket brokers सध्या रेल्वे गाड्यांमध्ये गर्दी खूप वाढली आहे. कुठेही जायचं असलं तरी कोणत्याही कोट्याशिवाय कन्फर्म तिकीट मिळेलच याची शाश्वती नाही. यामुळेच आता लोकांना शेवटच्या क्षणी अडचण येऊ नये म्हणून 2-3 महिने आधीच रेल्वे तिकीट बुक करावे लागते. जेव्हा तुम्ही काउंटरवर जाता किंवा स्वतः तिकीट बुक करण्याचा प्रयत्न करता तेव्हा ही समस्या अनेकदा उदभवते. पण जी तिकिटे मिळत नाहीत ती दलालांकडे सहज उपलब्ध होतात हे तुमच्या लक्षात आले असेलचं.

    ऐतिहासिक बातमी – चंद्रपुरात 25 हजार वर्षापूर्वी च्या वस्तीचे पुरावे

    ट्रेनमध्ये प्रतीक्षा यादी कितीही लांब असली तरी काही मिनिटांत दलाल तिकीट कन्फर्म करतात. मात्र, यासाठी प्रवाशांकडून दुप्पट किंवा तिप्पट दर आकारले जातात. मात्र प्रदीर्घ प्रतीक्षा करून दलाल तिकीट कसे कन्फर्म करतात हा प्रश्न आहे. त्यामुळे यामागे एक युक्ती आहे. Railway ticket brokers

    गुन्हेगारी – रेल्वे तिकिटांचा काळाबाजार, चंद्रपुरात 14 दलालांना अटक

    या युक्तीबद्दल जाणून घेऊया.

     

    तिकीट इतर कोणत्याही नावाने बुक केले असल्यास, तिकिटावर तुमचे नाव नसण्याची 100 टक्के शक्यता आहे. त्याऐवजी ब्रोकर तुम्हाला सांगेल की TTE ID मागणार नाही.

    शिक्षणाची बातमी – RTE च्या नियमात मोठा बदल, पालक संभ्रमावस्थेत

    वास्तविक, दलाल तिकीट काउंटरवरून वेगवेगळ्या नावाने तिकीट बुक करतात. तुम्ही त्याला कोणत्याही ठिकाणी कन्फर्म केलेले तिकीट मागितल्यास तो दुप्पट पैसे घेतो आणि तुम्हाला तिकीट देतो आणि म्हणतो की TTE तुमचा आयडी विचारणार नाही तर फक्त तुमचे नाव कन्फर्म करण्यासाठी विचारेल. कारण तिकीट काउंटरवरून घेतलेल्या तिकिटांसाठी आयडी विचारला जात नाही. म्हणूनच दलाल तुम्हाला बदललेले नाव सांगण्यास सांगतात. Railway ticket brokers

     

    तुमचे नशीब चांगले असेल, तर यादीत तुमचे नाव पाहूनच TTE पुढे जाईल, पण तसे न झाल्यास तुम्ही मोठ्या संकटात सापडू शकता. TTE ला काही शंका असल्यास, तो तुमच्याकडून आयडी प्रूफ मागू शकतो. आयडी आणि तिकिटाचे नाव जुळत नसल्यास तुम्हाला दंडही भरावा लागू शकतो. ही सीट तुम्हाला खूप महागात पडू शकते. कारण तुम्ही या सीटसाठी ब्रोकरला दोन ते तीन पट जास्त पैसे दिले आहेत आणि बनावट तिकीट दाखवल्यानंतर TTE तुमच्याकडून दंड वसूल करेल. यानंतर तुम्हाला नवीन तिकीट काढावे लागेल, तेही वेटिंगमध्ये. म्हणजे सीट गमावली जाईल आणि बरेच पैसेही खर्च होतील. Railway ticket brokers

     

    आम्ही तुम्हाला सांगतो की कन्फर्म तिकीट देण्यासाठी, दलाल 400 ते 2000 रुपयांची तिकिटे देतात. त्यामुळे दलालांमार्फत तिकीट बुक करण्याऐवजी थेट तिकीट काउंटरवरून बुक करा. तिकिटाची प्रतीक्षा असली तरी किमान या सर्व समस्यांना तोंड द्यावे लागणार नाही आणि प्रवासही सुखकर होईल.

  • Stone age implements at Chandrapur : चंद्रपुरात 25 हजार वर्षांपूर्वीच्या वस्तीचे पुरावे

    Stone age implements at Chandrapur : चंद्रपुरात 25 हजार वर्षांपूर्वीच्या वस्तीचे पुरावे

    Stone age implements at Chandrapur
    कोरपणा तालुक्यातील वर्धा नदीच्या किनारी असलेल्या भोयेगाव जवळ शेती आणि जंगल परिसरात २५,००० वर्षादरम्यानच्या मध्यपाषांन ( Mesolithic ) युगातील आदिमानवांची अवजारे येथील भूशास्त्र आणि पर्यावरण अभ्यासक प्रा सुरेश चोपणे ह्यांनि नुकतीच शोधली आहेत.

    राजकीय बातमी – मोफत रुग्णवाहिका सेवेची शिवसेनेने केली सुरुवात

    चंदपूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी अशी अवजारे मिळाली असली तरी ह्या परिसरात प्रथमच अश्या प्रकारची मध्याश्मयुगीन अवजारे मिळाली आहेत अशी माहिती त्यांनी नुकतेच प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
    भोयेगाव येथे आढळलेली ही अवजारे आर्कीयन काळातील रुपांतरीत खडकापासून बनविलेली असून त्यात अर्ध मौल्यवान समजल्या जाणाऱ्या जास्पर, अगेट,क्वार्ट्झ ह्या खडकांचा समावेश आहे. Stone age implements at Chandrapur

    बातमी अवश्य वाचा : चंद्रपूरच्या विद्यार्थिनींचे मुख्यमंत्र्यांना पत्र

    विदर्भ आणि विशेषता चंद्रपूर जिल्हा हा पाषांनयुगात विशेषता हिमयुगात जास्त लोकसंख्या असलेला प्रदेश होता हे अनेक ठिकाणी आढळलेल्या अवजारावरून लक्षात येते. अश्मयुगात मानव नदीकिनारी राहत असे. भोयेगाव परिसरात नदीकिनारी आढळणारे खडक हे १५० कोटी वर्षाच्या आर्कीयन काळातील असून ते रुपान्तरीत प्रकारात मोडतात. Stone age implements at Chandrapur

     

    हे खडक ह्या परिसरात हिमयुगात वाहून आलेले,गाल मिश्रित अल्लूवियम, असून त्यात लहान गोल खडक आढळतात. हे खडक ४०००० ते २५००० वर्षादरम्यान वाहात आलेले आहेत ह्यात क्वार्टझाईट, अगेट, क्वार्ट्झ, जास्पर हे खडक अतिशय टणक आणि मजबूत असून अश्म अवजारांसाठी अत्यंत उपयुक्त आहेत.

     

    म्हणूनच अश्मयुगातील लोकांना क्वार्टझाईट मँन असे म्हटल्या गेले. भोयेगाव जवळील अवजारात पूर्व पाषाण युगात वापरात असलेली खूप मोठ्या आकाराचचे अवजारे नाहीत तर लहान आकाराची हात कुर्हाड,आणि ब्लेड्स जास्त प्रमाणात आढळतात. Stone age implements at Chandrapur

     

    ह्या पूर्वी प्रा सुरेश चोपणे ह्यांनी चंद्रपूर तालुक्यातील वर्धा नदीकिनारी हडस्ती येथे २००७ मध्ये, चंद्रपूर जवळ झरपट नदीकिनारी (पापामिया) येथे १९९७ मध्ये तसेच इरई नदीजवळ दाताळा येथे 2011 मध्ये ,पोभुर्णा जवळ वैनगंगा नदीकिनारी २००८ मध्ये अशी १५ ठिकाणी त्यांनी अश्मयुगीन अवजारे शोधली आहेत. २ लाख ते ५ हजार वर्षे कालखंडात अश्म युगाचे पुराश्म युग,मध्याश्म युग आणि नवाश्म युग असे प्रामुख्याने ३ भाग पाडण्यात आले असून चंद्रपूर जिल्ह्यात तीनही कालखंडात मानव वास्तव्यास होता.

     

    प्राचीन मानव हा भटकंती करीत असला तरी तो हा बारमाही नदी किंवा नाल्याच्या जवळ काही काळ राहत असे. ह्या परिसरात गुहा नसल्याने ते झाडाच्या आसऱ्याने उघड्यावर जीवन जगात असे.`अवजारे बनविणे आणि अन्नाच्या शोधात भटकणे असा त्यांचा दिनक्रम असे..ज्या ठिकाणी अवजारे बनविण्यासाठी योग्य खडक असेल आणि अन्न उपलब्ध असेल तेथे काही वर्षे राहणे आणि पुढे योग्य ठिकाणी जाणे असे त्यांचे जीवन होते. खर तर बहुजन समाज वंशज- आज जिल्ह्यात जो आदिवासी आणि बहुजन समाज आहे ते अश्मयुगीन मानवांचेच वंशज आहेत. Stone age implements at Chandrapur

     

    आदिमानवामध्ये सुधा वांशिक विभिन्नता होती हे त्यांच्या आजच्या चेहरेपटीवरून लक्षात येते, पुढे वांशिक सरमिसळ झाली आणि मानव विविध जातीत विभागलेला आजचा बहुजन समाज निर्माण झाला. पुढे नवाश्म युगात आपण शेती करायला शिकलो आणि गावे करून स्थाईक झालो.