Author: Admin

  • corruption complaint number : तर आम्हाला कॉल करा – उपअधीक्षक मंजुषा भोसले

    corruption complaint number : तर आम्हाला कॉल करा – उपअधीक्षक मंजुषा भोसले

    corruption complaint number 7 मे रोजी चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जिल्ह्यात सर्वात मोठी कारवाई केली, उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक संजय पाटील, दुय्यम निरीक्षक चेतन खारोडे व कार्यालय अधीक्षक अभय खताळ यांच्यावर बिअर बार चालकाला नव्या परवान्यासाठी तब्बल 1 लाख रुपयांच्या लाचेची मागणी प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला.

     

     

    corruption complaint number चेतन खारोडे व अभय खताळ यांना 10 मे पर्यंत न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे, मात्र संजय पाटील हे अद्यापही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या हाती लागले नाही, त्यांच्या मागावर सध्या पोलीस पथक लागले आहे.

     

     

    corruption complaint number लाचलुचपत प्रतिबंधक विभाग चंद्रपूरच्या पोलीस उपअधीक्षक मंजुषा भोसले यांनी जर शासकीय कार्यालयातील अधिकारी किंवा कर्मचाऱ्याने आपल्याला लाच मागत असेल तर आम्हाला सम्पर्क करा, 1064 या टोल फ्री क्रमांकावर आपण कॉल करू शकता. असे आवाहन भोसले यांनी यावेळी केले.

  • Chandrapur News Today : आता चर्चा चंद्रपूर मद्य घोटाळ्याची

    Chandrapur News Today : आता चर्चा चंद्रपूर मद्य घोटाळ्याची

    Chandrapur news today चंद्रपूर: चंद्रपूरच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक संजय पाटील,दुय्यम निरीक्षक चेतन खारोडे व कार्यालयीन अधीक्षक अभय खताळ यांचे विरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हे दाखल केले.

     

    Chandrapur news today या तीन आरोपी पैकी दोन आरोपींना अटक झाली असून अधीक्षक संजय पाटील फरार आहेत. अधीक्षक संजय पाटील यांना तातडीने अटक करून त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आज जनविकास सेनेचे संस्थापक अध्यक्ष पप्पू देशमुख यांच्या नेतृत्वात एका शिष्टमंडळाने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस उपाधीक्षक मंजुषा भोसले यांच्याकडे केली. चंद्रपूरच्या मद्य घोटाळ्यातील आरोपींची चौकशी करून कारवाई करण्याच्या बाबत यावेळी उपाधीक्षक भोसले यांना स्मरणपत्र दिले.यावेळी जनविकास सेनेचे घनश्याम येरगुडे, इमदाद शेख, अक्षय येरगुडे, प्रफुल बैरम, गितेश शेंडे, अमोल घोडमारे उपस्थित होते.

     

    Chandrapur news today चंद्रपूर जिल्ह्यात देशी विदेशी दारूचे दुकान,बियर बार,वाईन शॉप, बियर शॉपी यांना मंजूरी देतांना झालेल्या गैरव्यहाराविरुद्ध कारवाई करण्याकरिता स्मरण पत्र दिले.यापूर्वी जिल्ह्यातील अनेक दारू दुकानांच्या वाटपामध्ये झालेल्या गैरव्यवहाराची पुराव्यानिशी तक्रार जनविकास सेने तर्फे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली होती.

    अवश्य वाचा बातमी भ्रष्टाचाराची : 3 शासकीय नोकरदाराने बिअर शॉप मालकाला मागितली 1 लाखांची लाच

    आज पुन्हा एकदा जनविकास सेनेच्या शिष्टमंडळाने पुराव्यांचा गठ्ठा घेऊन लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात धडक दिली.या विभागाचे पोलीस उपअधीक्षक मंजुषा भोसले यांची भेट घेऊन जुन्या तक्रारीबाबत स्मरणपत्र दिले.

    नियम धाब्यावर बसवून दारू दुकानांना मंजूरी

    राज्य उत्पादन शुल्क विभाग, महसूल विभाग तसेच पोलीस विभाग या सर्व विभागातील मंत्रालयापासून जिल्हास्तरापर्यंत कार्यरत अधिकाऱ्यांनी संगनमत करून नियम धाब्यावर बसवून चंद्रपूर जिल्ह्यात विविध प्रकारच्या दारू दुकानांना परवाने दिले. अवैध व बेकायदा बांधकाम असलेल्या अनेक इमारतींमध्ये सरसकट दारू दुकानांना मंजुरी देण्यात आली. अंतराचे नियम पायदळी तुडविण्यात आले. याचा मोबदला म्हणून या विभागाच्या अधिकाऱ्यांनी करोडो रुपयांची लाच दारू दुकानदारांकडून स्वीकारली.

    Chandrapur news today चंद्रपूरचे तात्कालीन जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांचे सह विविध पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक व राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी यांची नावासह व पुरावे देऊन जनविकास सेनेने सुमारे दोन वर्षांपूर्वी तक्रार केली होती. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे राज्याचे महासंचालक तसेच नागपूरचे पोलीस अधीक्षक यांच्याकडे सुद्धा तक्रार करण्यात आली होती. मात्र आजपर्यंत कोणतीही चौकशी अथवा ठोस कारवाई चंद्रपूरच्या मद्य घोटाळ्यातील आरोपीं विरुद्ध करण्यात आली नाही. नुकतीच राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना लाच घेताना अटक झाल्यामुळे पुन्हा एकदा जनविकास सेनेने आक्रमक भूमिका घेतली.

  • Chandrapur news today : अतिक्रमण हटाव मोहीम थांबवा – राजू कुडे यांची मागणी

    Chandrapur news today : अतिक्रमण हटाव मोहीम थांबवा – राजू कुडे यांची मागणी

    Chandrapur news today चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रात रस्त्याच्या बाजूला अस्थाई स्वरूपात दुकाने चालवणाऱ्या पथविक्रेत्यांवर सुरू असलेली अतिक्रमण हटाव मोहीम तात्काळ थांबवावी अशी मागणी आम् आदमी पक्षाचे युवा जिल्हाध्यक्ष राजू कुडे यांनी केली आहे.

    अवश्य वाचा : बिअर शॉपीचा परवाना हवा, 1 लाख रुपये द्या, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची चंद्रपुरात मोठी कारवाई

    Chandrapur news today कुडे यांनी महानगरपालिकेच्या कारवाईला विरोध दर्शवत म्हटले आहे की, शहरात वाढीव लोकसंख्येसाठी पुरेसे बाजारपेठा उपलब्ध नाहीत.

     

    त्यामुळे अनेक गरीब व्यापारी रस्त्यावरच दुकाने लावून आपले जीवन जगण्यास भाग पाडले जातात. महानगरपालिकेने या व्यापाऱ्यांसाठी हक्काची जागा उपलब्ध करून दिली नाही तर अतिक्रमण हटाव मोहीम थांबविली पाहिजे.

    महत्वाची बातमी : पोहण्याची हौस जीवावर बेतली, गोंडपीपरी मध्ये शोककळा

    Chandrapur news today नगररचना अधिनियम आणि टाऊन प्लॅनिंग Act नुसार शहराच्या वाढीव लोकसंख्येनुसार जागेची नियोजन करणे हे महानगरपालिकेचे कर्तव्य आहे. महानगरपालिकेने किरकोळ व्यापाऱ्यांसाठी जागा राखीव केली असल्यास त्यांना व्यवसाय करण्यासाठी उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी त्यांनी केली. गेल्या अनेक वर्षांपासून नवीन बाजारपेठा तयार न केल्यामुळेच आज रस्त्यावर दुकाने लावण्याची वेळ आली आहे.

     

    Chandrapur news today कुडे यांनी पथविक्रेत्यांसाठी हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. तोपर्यंत पोटाची भूक भागवण्यासाठी झटत असणाऱ्या पथविक्रेत्यांवर अतिक्रमण हटाव मोहीम थांबवण्यात यावी असे आवाहन त्यांनी केले आहे.

     

    महानगरपालिकेने पथविक्रेत्यांच्या मागण्यांकडे लक्ष देऊन त्यांना त्वरित न्याय द्यावा अशी अपेक्षा कुडे यांनी व्यक्त केली आहे.

  • Chandrapur News Today : मित्र पळाले आणि दोन मुले बुडाली

    Chandrapur News Today : मित्र पळाले आणि दोन मुले बुडाली

    Chandrapur news today चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपीपरी येथे 7 मे रोजी धक्कादायक घटना घडली, गोंडपीपरी न्यायालयाच्या मागील बाजूस असणाऱ्या तलावात 2 मुले बुडाली.

    महत्वाची बातमी – चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकानो आपण यांना पाहिलंत का?

    Chandrapur news today मंगळवारी दुपारी 12 वाजताच्या सुमारास काही मुले फिरायला गेली होती, त्यानंतर मुलांना त्या तलावात पोहण्याचा मोह आवरला नाही, तलावात पोहत असताना दोन मुले बुडायला लागली, ते दृश्य बघून इतर मुले घराकडे गेली, मात्र त्यांनी इतरत्र त्याबाबत कुणालाही सांगितले नाही.

     

    Chandrapur news today 2 मुले सायंकाळी घरी न आल्याने कुटुंबीयांनी त्यांचा शोध घेणे सुरू केले, मुले पोहायला गेली असे कळल्यावर कुटुंबीयांनी तलावाकडे धाव घेतली असता त्याठिकाणी दोन मुलांचे कपडे आढळले, त्यावेळी रात्रीचे 8 वाजले होते.

    अवश्य वाचा – चंद्रपूर उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक, दुय्यम निरीक्षक व कार्यालय अधीक्षक यांच्यावर गुन्हा दाखल, बिअर शॉपी परवान्यासाठी मागितले 1 लाख

    घटनेची माहिती मिळताच गोंडपीपरी चे ठाणेदार रमेश हत्तीगोटे आपल्या चमुसह तलावाजवळ दाखल झाले, मुलांचा शोध घेण्यासाठी पथकाला पाचारण करण्यात आले, मात्र रात्र झाल्याने शोध मोहीम थांबली.

     

    Chandrapur news today 14 वर्षीय गौरव विलास ठाकूर व 15 वर्षीय शौर्य भास्कर पिंपळशेंडे राहणार शिवाजी चौक असे तलावात बुडालेल्या मुलांची नावे आहे.

     

    आपली मुले तलावात बुडाली असे समजताच कुटुंबातील सदस्यांनी टाहो फोडला, सकाळी पुन्हा शोधमोहिमेला सुरुवात केल्यावर दोन्ही मुलांचे मृतदेह शोध पथकाच्या हाती लागले.

  • Today Acb Trap News : चंद्रपुरात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

    Today Acb Trap News : चंद्रपुरात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

    Today Acb Trap News 7 मे ला चंद्रपुरातील उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक संजय पाटील, दुय्यम निरीक्षक चेतन खारोडे व कार्यालय अधीक्षक अभय खताळ यांना 1 लाखांची लाच स्वीकारल्या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे.

    अवश्य वाचा : मित्रांचे टोळके तलावात पोहायला गेले, दोघे जण बुडताच इतर मित्र पळाले, धक्कादायक घटना

    Today Acb Trap News फिर्यादी हे घुग्गुस येथील रहिवासी असून त्यांचं घुग्गुस येथे गोदावरी बार अँड रेस्टारेंट आहे, फिर्यादी यांनी वर्ष 2023 नोव्हेंबर मध्ये नवीन बिअर शोपीच्या परवान्यासाठी अर्ज केला होता, मात्र त्यावेळी त्यांना अधीक्षक संजय पाटील व कार्यालय अधीक्षक अभय खताळ यांनी फिर्यादीला आज या उद्या या म्हणत त्यांना नाहक त्रास देत टाळाटाळ केली.

     

     

    Today Acb Trap News काही दिवसांनी दुय्यम निरीक्षक चेतन खारोडे यांनी मी तुमचा बिअर शोपीचा परवाना मंजूर करून देतो मात्र त्यासाठी अधीक्षक व स्वतःसाठी 1 लाख रुपयांची मागणी केली.
    फिर्यादी यांची पैसे देण्याची मुळीच इच्छा नसल्याने त्यांनी 25 एप्रिलला चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला तक्रार दिली.

     

    Today Acb Trap News मध्यंतरी फिर्यादी यांना 1 लाख रुपयांची लाच मागितली, 7 मे रोजी उत्पादन शुल्क विभाग चंद्रपूर कार्यालयात कार्यालय अधीक्षक अभय खताळ यांनी खारोडे यांच्या सांगण्यावरून 1 लाख रुपयांची रक्कम स्वीकारली, त्यानंतर चेतन खारोडे यांनी पैसे मिळल्याबाबत अधीक्षक पाटील यांना मोबाईल द्वारे सूचना दिली, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने खात्री पटवित, 1 लाख रुपये स्वीकारताना अभय खताळ यांना रंगेहात अटक केली.

    सदर लाच प्रकरणी अधीक्षक संजय पाटील, अभय खताळ व चेतन खारोडे यांच्यावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

     

    Today Acb Trap News सदरचा यशस्वी सापळा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक राहुल माकनिकर, अप्पर पोलीस अधीक्षक संजय पुरंदरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक मंजुषा भोसले यांच्या नेतृत्वात पोलीस कर्मचारी नरेश नन्नावरे, हिवराज नेवारे, संदेश वाघमारे, राकेश जांभुळकर, प्रदीप ताडाम, पुष्पा काचोळे व सतीश सिडाम यांनी केला.

     

     

    वर्ष 2015 मध्ये तत्कालीन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी केली होती, 6 वर्षानंतर म्हणजेच 2021 ला महाविकास आघाडी सरकारने जिल्ह्याची दारूबंदी हटविली.

     

    Today Acb Trap News दारूबंदी हटल्यानंतर चंद्रपुरातील उत्पादन शुल्क विभागाने नियमबाह्य दारू दुकानासाठी परवाने दिले, विभागाचे अधीक्षक संजय पाटील हे रुजू झाल्यावर सुद्धा हीच परिस्थिती कायम राहली. ज्यावेळी चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी करण्यात आली त्यावेळी एकूण 350 बिअर बार होते, वर्ष 2021 मध्ये दारूबंदी उठविल्यावर जिल्ह्यात तब्बल 750 बिअर बार अस्तित्वात आले, अधीक्षक संजय पाटील यांच्या कार्यकाळात 400 नव्या बिअर बार ला परवाने देण्यात आले.

     

    अधीक्षक संजय पाटील यांच्या संपत्तीची SIT मार्फत चौकशी करा – मनोज पाल भाजप नेते

    उत्पादन शुल्क विभाग अधीक्षक संजय पाटील यांनी नियमबाह्य पध्दतीने बिअर बार चे परवाने वाटप केले, आणि एका परवान्यामागे लाखो रुपये यांनी मागितले होते, याबाबत संपूर्ण माहिती आम्ही काढलेली आहे, याबाबत आम्ही पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना चौकशी करण्यासंबंधीचे निवेदन दिले आहे, लवकरच कारवाई होणार अशी अपेक्षा आहे, संजय पाटील विरोधात आम्ही लवकरच पत्रकार परिषदेमार्फत खुलासा करणार आहो.

  • Navjivan Express : चंद्रपुरातील मुलगी नंदुरबार मध्ये?

    Navjivan Express : चंद्रपुरातील मुलगी नंदुरबार मध्ये?

    Navjivan Express 7 मे रोजी चंद्रपूर पोलीस विभागातर्फे नागरिकांना महत्वाचे आवाहन करण्यात आले असून चंद्रपूर जिल्ह्यातील एक मुलगी RPF स्टेशन, नंदुरबार येथे सापडली आहे.

    अवश्य वाचा : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली चंद्रपुरात मोठी कारवाई

    सदर मुलगी ही स्वतःचे नाव कल्पना चंद्रभान सोनकुसरे, चंद्रपूर असे सांगत आहे, RPF पोलिसांनी मुलीची माहिती घेतल्यावर याबाबत चंद्रपूर पोलिसांना कळविले आहे.

     

    Navjivan Express जिल्ह्यातील 15 तालुक्यापैकी कुठेही सदर मुलीबाबत मिसिंग काही गुन्हा दाखल असेल तर तात्काळ 7028893369 या मोबाईल क्रमांकावर सम्पर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

     

    सदर मुलगी ही नवजीवन एक्स्प्रेस मध्ये रेल्वे पोलिसांना मिळाली आहे, जर कुणाला याबाबत माहिती असेल तर त्यांनी रेल्वे पोलीस किंवा चंद्रपूर पोलिसांसोबत सम्पर्क साधावा.

  • Heavy rain in chandrapur : चंद्रपुरात गारपीटसह जोरदार पाऊस

    Heavy rain in chandrapur : चंद्रपुरात गारपीटसह जोरदार पाऊस

    Heavy rain in chandrapur मार्च महिना लागताच उन्हाळाची चाहूल लागते व एप्रिलनंतर उन्हाची दाहकता वाढून तापमानात वाढ होते.दिनांक ६ मे रोजी चंद्रपुरात ४३ अंश सेल्सिअस तापमान होते.

    अवश्य वाचा : चंद्रपूर मनपा नागरिकांवर ठोठावणार 20 हजारांचा दंड

    Heavy rain in chandrapur वाढतं तापमान बघता उष्माघातापासून बचावासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयसह ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात शीतकक्ष कार्यन्वित करण्यात आले आहेत हे विशेष.

     

     

    परंतु आज ७ मे रोजी पुन्हा तापमानात बदल झाल्याने चंद्रपुरात गारपीटसह जोरदार पावसाचे आगमन झाले आहे.

    या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे काही प्रमानात नुकसान झाले, मात्र जिल्ह्यात वाढत्या उकड्यापासून नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मात्र नक्की मिळाला आहे.

  • Yuvasena Party : संदीप-विक्रांत च्या नेतृत्वावर युवकांचा विश्वास

    Yuvasena Party : संदीप-विक्रांत च्या नेतृत्वावर युवकांचा विश्वास

    Yuvasena party राज्यात एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्ष जरी फोडला असेल तरीही आज अनेकांची उद्धव ठाकरे यांना पसंती आहे, आजही अनेक नागरिक उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत पक्षप्रवेश करीत आहे.

    अवश्य वाचा – तर चंद्रपूर शहरातील या नागरिकांना भरावा लागेल 20 हजार रुपयांचा दंड

    Yuvasena party चंद्रपुरात मात्र शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे व युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे यांच्या नेतृत्वावर युवकांचा विश्वास असून युवक मोठ्या प्रमाणात युवासेनेत प्रवेश करीत आहे.

    अवश्य वाचा – न्यायालयाने शिक्षण विभागाला फटकारले, rte अंतर्गत जुन्या नियमांनी होणार प्रवेश

    चंद्रपूर जिल्ह्यात एकही आमदार किंवा खासदार पक्षाचा नसताना सुद्धा शिवसेना ठाकरे यांच्या नावाने नागरिकांचे कामे होत आहे, बल्लारपूर शहरातील अनेक युवकांनी 6 मे रोजी विक्रांत सहारे यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश केला.

     

    Yuvasena party यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख सिक्की यादव यांच्या हस्ते युवकांच्या हाती शिवबंधन बांधण्यात आले, पक्ष वाढीसाठी आम्ही अहोरात्र प्रयत्न करू असा विश्वास युवकांनी दाखविला.

     

    Yuvasena party जिल्ह्यातील शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे व युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे यांच्या नेतृत्वावर आम्हाला विश्वास आहे, म्हणून आम्ही आज युवासेनेत प्रवेश घेत आहो अशी प्रतिक्रिया युवकांनी यावेळी दिली.

     

    यावेळी उपजिल्हाप्रमुख सिक्की यादव,महिला जिल्हा संघटिका सौ कल्पना गोरघाटे , तालुका प्रमुख प्रकाश पाठक, तालुका समन्वयक प्रदीप गेडाम,शहर प्रमुख बाबा साहू , उप शहर प्रमुख युसूफ शेख, उपशहर प्रमुख बॉबी कादासी, प्रशांत गाद्दला युवा पदाधिकारी , सर्वेश मिश्रा युवा पदाधिकारी, व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

  • why rain water harvesting is important : हे काम करा नाहीतर 20 हजार दंड भरा, चंद्रपूर मनपाचा इशारा

    why rain water harvesting is important : हे काम करा नाहीतर 20 हजार दंड भरा, चंद्रपूर मनपाचा इशारा

    why rain water harvesting is important : चंद्रपूर महानगरपालिका हद्दीत ज्या मालमत्ताधारकांच्या घरी बोअरवेल अथवा विहीर आहे मात्र त्यांनी रेन वॉटर हार्वेस्टींग केलेले नाही अश्या मालमत्ताधारकांची प्रत्यक्ष तपासणी मनपातर्फे सुरु करण्यात आली असुन रेन वॉटर हार्वेस्टींग केले नसल्याचे आढळल्यास २० हजार रुपये दंड ठोठावण्यात येणार आहे.

    अवश्य वाचा – Right To Education न्यायालयाने शिक्षण विभागाला फटकारले

    why rain water harvesting is important :   शहरातील सर्व बोअरवेलधारक,विहीरी असणारी घरे, मोठ्या इमारतींना (अपार्टमेंट)  रेन वॉटर हार्वेस्टिंग करणे अनिवार्य आहे, अश्या मालमत्ताधारकांना प्रसार माध्यमे,दूरध्वनी, एसएमएस, व्हॉइस मॅसेज, नोटीसद्वारे मागील वर्षी सूचित करण्यात आले होते व या वर्षीसुद्धा सूचित करण्यात येत आहे. तसेच रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्यास ठराविक कालावधीची मुदत सुद्धा देण्यात आली होती.मात्र अनेक मालमत्ताधारकांनी याकडे दुर्लक्ष केल्याने मनपामार्फत सदर कारवाई करण्यात येत आहे.

     

    why rain water harvesting is important :   चंद्रपूर महानगरपालिकेद्वारे  हद्दीत नवीन बांधकाम करताना रेन वॉटर हॉर्वेस्टिंग व्यवस्था करणे अनिवार्य असून, त्यासाठी इमारत बांधकाम परवानगी देताना छताच्या आकारानुसार व मजलानिहाय अनामत रक्कम आकारण्यात येते. मात्र, शहरातील ज्यांचे बांधकाम पूर्ण झाले असून, रेनवॉटर हॉर्वेस्टिंग व्यवस्था केल्याचे पुरावे सादर केलेले नाही, अशा बांधकामधारकांची अनामत रक्कम यापुर्वी जप्त करण्यात आली आहे.

     

    शहरात भूगर्भातील पाण्याची पातळी दिवसेंदिवस खोलवर जात आहे. यावर उपाययोजना म्हणून पावसाळ्यात पडणारा प्रत्येक पावसाचा थेंब हा जमिनीत जिरविण्याची आवश्यकता आहे. रेन वॉटर हॉर्वेस्टिंगची अमलबजावणी प्रभावीपणे करण्यासाठी घराच्या छताच्या आकारमानानुसार ५,७ व १० हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान तसेच पुढील ३ वर्षांपर्यंत २ टक्के मालमत्ता करात सुट महानगरपालिकेतर्फे देण्यात येते.

  • Right To Education Admission : न्यायालयाच्या निर्णयानंतर RTE मध्ये प्रवेशाचा मार्ग मोकळा

    Right To Education Admission : न्यायालयाच्या निर्णयानंतर RTE मध्ये प्रवेशाचा मार्ग मोकळा

    Right To Education Admission सरकारच्या बदललेल्या आरटीई नियमांमुळे इंग्रजी माध्यमांच्या खासगी शाळेत आरटीई अंतर्गत प्रवेशाची वाट कठीण झाली होती. यामुळे आर्थिक दुर्बल घटकातील पालकांत मोठ्या प्रमाणात संतापाचे वातावरण होते. महाराष्ट्र सरकारच्या या नव्या आरटीई नियमांना उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले.

    अवश्य वाचा – चंद्रपूर भाजप महानगर अध्यक्ष राहुल पावडे यांनी मागितला विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांचा राजीनामा

    Right To Education Admission ज्येष्ठ वकील ॲड.जयना कोठारी, चंद्रपूरचे ॲड.दीपक चटप, ॲड. गायत्री सिंग, ॲड. संजोत शिरसाट, ॲड. वसुधा चंदवानी, ॲड.पायल गायकवाड, ॲड.ऋषिकेश भोयर यांच्या माध्यमातून शिक्षण हक्कांवर काम करणाऱ्या संस्था व कार्यकर्त्यांनी जनहित याचिका दाखल केली आहे. उच्च न्यायालयाने राज्य सरकारच्या सुधारित नियमांना स्थगिती दिली असून राज्यातील लाखो गरीब विद्यार्थ्यांना व पालकांना दिलासा मिळाला आहे.

    अवश्य वाचा : 520 रुपये वार्षिक भरा आणि मिळवा 10 लाखांचा विमा

    Right To Education Admission आरटीई अंतर्गत वंचित, दुर्बल, सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास घटकांतील विद्यार्थ्यांना २५ टक्के राखीव जागांवर प्रवेश दिले जातात. शालेय शिक्षण विभागाने यंदा आरटीई प्रवेश प्रक्रियेत महत्त्वपूर्ण बदल केला आहे. त्यानुसार विद्यार्थ्याच्या निवासस्थानापासून एक किमी.पर्यंतच्या अनुदानित शाळा, शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेत प्रवेश देण्यात येणार आहे.

     

    यातील उपलब्ध शाळा नसल्यास स्वयंअर्थसहाय्यित खासगी शाळेत प्रवेश दिला जाणार आहे. नुकतेच RTE चे online अर्ज सुरु झाले आहे. या नियमांची अंमलबजावणी झाल्यास विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होणार होते. उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती देवेंद्रकुमार उपाध्याय व न्यायमुर्ती ए.एस. डॉक्टर यांनी शिक्षण विभागाच्या नव्या नियमांना स्थगिती दिली आहे.

     

    Right To Education Admission केंद्र सरकारच्या शिक्षण हक्क कायदा २००९ च्या तरतुदीशी महाराष्ट्र सरकारची नियमावली विसंगत असल्याचे प्रथमदर्शनी दिसून आल्याने ही स्थगिती देण्यात आल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. नव्या नियमांमुळे श्रीमंतांच्या मुलांसाठी इंग्रजी माध्यमांच्या खासगी शाळा तर गरीब मुलांसाठी शासकीय शाळा अशी वर्गवारी तयार होईल. याआधी हिमाचल प्रदेश, अरुणाचल प्रदेश, उत्तरप्रदेश आदी राज्यांत खासगी शाळांत मुभा देणारे नियम तेथील सरकारने तयार केले. मात्र तसे नियम हे उच्च न्यायालयाने रद्द केले आहे.

     

    २००९ च्या शिक्षण हक्क कायद्यानुसार खासगी विनाअनुदानित शाळांना मुभा देता येत नाही. खासगी शाळांना वेळेत परतावा दिल्यास त्यांचा देखील विरोध होणार नाही. राज्य सरकारचे नवे नियम बेकायदेशीर व अन्यायकारक असल्याने न्यायालयाच्या स्थगितीमुळे विद्यार्थी व पालकांना दिलासा मिळाला असल्याचे मत याचिकाकर्त्यांनी मांडले.

    10 मे पर्यंत पालकांनी पाल्यांचे प्रवेश करावे अशी मुदतवाढ शिक्षण विभागाच्या वतीने देण्यात आली होती, न्यायालयाच्या निर्णयानंतर ऑनलाइन पोर्टल मध्ये येत्या 2 ते 3 दिवसात बदल होणार असून त्यानंतर पालकांनी rte अंतर्गत शाळेत प्रवेश घ्यावा.