Author: Admin

  • Office Of district collector chandrapur : चंद्रपूर जिल्ह्यात 121 डॉक्टरांवर धाड

    Office Of district collector chandrapur : चंद्रपूर जिल्ह्यात 121 डॉक्टरांवर धाड

    Office Of district collector chandrapur शासन निर्णय फेब्रुवारी 2000 अन्वये बोगस वैद्यकीय व्यवसायिकांवर आळा घालण्यासाठी तथा प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. सदर समिती मार्फत चंद्रपूर जिल्हयातील बोगस डॉक्टर शोध मोहीम कार्यवाहीचा जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी आढावा घेतला.

    अवश्य वाचा – बिअर बार परवाना गैरव्यवहार SIT चौकशी करा – सुधीर मुनगंटीवार

    Office Of district collector chandrapur जिल्हाधिकारी कार्यालयातील वीस कलमी सभागृहात पार पडलेल्या या बैठकीला जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे, चंद्रपूर महनगरपालिकेच्या वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. वनिता गर्गेलवार, वैद्यकीय अधिकारी डॉ नयना उत्तरवार, जिल्हा साथरोग अधिकारी मिना मडावी यांच्यासह जिल्ह्यातील सर्व तालुका आरोग्य अधिकारी उपस्थित होते.

    वाचा – शिक्षणाधिकारी यांची आमदार अडबाले यांनी केली तक्रार

    Office Of district collector chandrapur यावेळी जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, जिल्हयातील शहरी किंवा ग्रामीण भागातील विना परवानगीने चालविण्यात येणा-या नर्सिग होमची माहिती घेवून अशा नर्सिग होमला शेवटची नोटीस द्यावी तसेच त्यांचे नर्सिग होम तात्काळ बंद करण्याची कार्यवाही करण्यात यावी. परवानगीनुसार सुरु असलेले नर्सिंग होम तथा दवाखाने परवानगीच्या अटी व शर्ती नुसार चालतात की नाही, शासनाच्या नियमांचे  काटेकोर पालन करतात की नाही, याची सुध्दा तपासणी करण्यात यावी.

     

     

    तसेच या विषयीबाबतची कोणतीही तक्रार आल्यास त्याची तात्काळ चौकशी पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी आरोग्य विभागास दिले. तसेच समितीमार्फत 33 प्रकरणामध्ये नोंदविण्यात आलेल्या एफ.आय.आर. बाबत पुढील कार्यवाही तात्काळ करण्याच्या सूचना पोलिस विभागास त्यांनी दिल्या. यावेळी नर्सिंग होम तथा मोठया हॉस्पीटल्स मधून होणाऱ्या मेडीव्हेस्टचे योग्य व्यवस्थापन होणे गरजेचे असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले.

     

    चंद्रपूर जिल्हयातील सदर समितीमार्फत आजपर्यंत 121 धाडी टाकण्यात आल्या असून त्यापैकी 33 प्रकरणामध्ये एफ.आय.आर. नोंदविण्यात आल्याची माहिती अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविष्कार खंडारे यांनी दिली. सदर बैठकीमध्ये जिल्हा परिषदेचे व मनपा आरोग्य अधिकारी तथा कर्मचारी उपस्थित होते.

  • Beer bar license in maharashtra : चंद्रपुरातील दारू परवाना वितरणाची SIT चौकशी होणार, मुनगंटीवार यांचे महत्वाचे पाऊल

    Beer bar license in maharashtra : चंद्रपुरातील दारू परवाना वितरणाची SIT चौकशी होणार, मुनगंटीवार यांचे महत्वाचे पाऊल

    Beer bar license in maharashtra सन २०२१ मध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठवल्यानंतर उत्पादन शुल्क अधीक्षक संजय पाटील या अधिकाऱ्याने कायद्याची पायमल्ली करत कायद्याच्या चौकटीत न बसणाऱ्यांना मद्य परवाने दिले.

    अवश्य वाचा – आमदाराने शिक्षणाधिकारी विरोधात केली तक्रार

    यासंदर्भात अनेकदा तक्रारी करूनही त्याचे पुढे काहीच झाले नाही आणि मद्य परवाना वितरणातील गैरव्यवहार मोठ्या प्रमाणात वाढला. या संपूर्ण गैरव्यवहाराची एसआयटीमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

    महत्वाची बातमी : 1 जूनपासून हा नियम बदलणार आहे

    Beer bar license in maharashtra सुधीर मुनगंटीवार यांनी यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन चर्चा करणार असल्याचेही सांगितले आहे. दारूबंदी उठविण्यात आल्यानंतर उत्पादन शुल्क अधीक्षक संजय पाटील या अधिकाऱ्यांनी कायद्याची पायमल्ली करत कायद्याच्या चौकटीत न बसणाऱ्यांना मद्य परवाने दिले. येणाऱ्या तक्रारी जिल्हाधिकारी यांच्यापर्यंत पोहोचू दिल्या नाहीत आणि स्वतःकडेच कुलूपबंद केल्या. अनेक ठिकाणी ना हरकत प्रमाणपत्र नसतानाही मद्य परवाने देण्यात आले. गोंडपिंपरी तालुक्यातील धाबा येथे तर रमाई आवास योजनेंतर्गत बांधण्यात आलेल्या घरी बियर बार देण्यात आला, याकडेही ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी लक्ष वेधले.

     

    नागरिकांना आवाहन : शासकीय अधिकारी पैश्याची मागणी करीत आहे, तर आम्हाला कॉल करा

    Beer bar license in maharashtra त्याचवेळी ना. श्री. मुनगंटीवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना या संदर्भात चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. अतिरिक्त पोलिस महासंचालक (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग) श्री. विश्वास नांगरे पाटील यांनाही दूरध्वनीद्वारे संपर्क साधून या प्रकरणात कसून चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

     

    यासंदर्भात ज्यांना तक्रारी करायच्या असतील त्यांनी भाजपा जनसंपर्क कार्यालयातील 95527 99608 या मोबाईल नंबर व्हॉट्सॲप तक्रारी पाठवाव्यात. दूरध्वनीवरून प्रत्यक्ष संपर्क साधण्यासाठी तक्रारकर्त्यांनी भाजपा जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा (7261967820), भाजपा माजी जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे (9822255932) यांच्याशी संपर्क साधावा.

  • Arvind Kejriwal update : चंद्रपुरात आम आदमी पक्षाचा जल्लोष

    Arvind Kejriwal update : चंद्रपुरात आम आदमी पक्षाचा जल्लोष

    Arvind Kejriwal update आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांची कारागृहातून सुटका झाल्यानंतर आम् आदमी पक्षाच्या स्थानिक नेत्यांच्या उपस्थितीत चंद्रपूर येथील जटपूरा गेट समोर जल्लोष करण्यात आला.

    नक्की वाचा : चंद्रपुरात मद्य घोटाळा, कारवाई करा

    उत्पादन शुल्क धोरण प्रकरणात ईडीने दारू घोटाळ्याच्या खोट्या आरोपात
    मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केली होती.

     

    Arvind Kejriwal update अटकेनंतर 51 दिवसानंतर त्यांना जामीन देण्यात आला आहे. ते जेल मधून बाहेर पडताच आम् आदमी पक्षाच्या स्थानिक नेत्यांच्या उपस्थितीत चंद्रपूर येथील जटपूरा गेट समोर जल्लोष करण्यात आला.

    हे ही वाचा : चंद्रपूर मनपा आता नागरिकांवर ठोठावणार 20 हजार रुपयांचा दंड

    या वेळी आप चे नेते सुनील देवराव मुसळे, महानगर अध्यक्ष योगेश गोखरे, युवा जिल्हा अध्यक्ष राजू कुडे, जिल्हा संघटणमंत्री योगेश मुरेकर, जिल्हा सहकारी आघाडी अध्यक्ष मधुकर साखरकर, महानगर महिला अध्यक्ष तब्बसूम शेख, महानगर उपाध्यक्ष सुनील सदभैय्या, अप्लासंख्यक आघाडी महानगर अध्यक्ष जावेद सय्यद, महानगर संघटणमंत्री संतोष बोपचे सिकेंदर सागोरे, शशिकांत मेश्राम, शकील पठाण, सुजाता देठे, रमाना ताई, नजमा बेग, मनीष राऊत, दिपक घोडगे, विजुभाऊ चांबारे व इतर अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

  • Gopani Aryan Power Company : त्या कुटुंबाला कामगार संघटनेने दिला आर्थिक आधार

    Gopani Aryan Power Company : त्या कुटुंबाला कामगार संघटनेने दिला आर्थिक आधार

    Gopani Aryan Power Company चंद्रपूर ताडाळी एम.आय.डी.सी.स्पंज आर्यण कामगार संघटनेच्या वतीने गोपाणी आर्यण पावर कंपनीचे कामगार वामन सिडाम यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करण्यात आली.

    हे ही वाचा : शिक्षणाधिकारी यांची आमदाराने केली तक्रार

    वामन सिडाम यांचे दि. दि ४ /१/ २०२४ रोजी अकस्मात निधन झाले होते. त्यांचे वय ४५ वर्षे होते.

    ते कंपनीत १५ – २० वर्षांपासून काम करत होते. ते एक निष्ठावान आणि परिश्रमी कामगार होते. त्यांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबावर मोठा आघात झाला आहे.

    पर्यटनाचा अतिउत्साहीपणा – पर्यटकाने केला ताडोबा जंगलात अतिउत्साहीपणा, दंड ठोठावला

    Gopani Aryan Power Company या पार्श्वभूमीवर ताडाळी एम.आय.डी.सी.स्पंज आर्यण कामगार संघटनेने त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करण्याचा निर्णय घेतला. संघटनेच्या अध्यक्ष मा. दिनेशभाऊ चोखारे यांच्या मार्गदर्शनाखाली संघटनेच्या सर्व सभासदांनी एकत्रितपणे ७९२०० रुपयांचा धनादेश त्यांच्या पत्नी व मुलीला दिला.

     

    यावेळी संघटनेचे अध्यक्ष. श्री. दिनेशभाऊ चोखारे, उपाध्यक्ष श्री. मोहन वाघमारे, महासचिव श्री. संतोष बांदुरकर, कार्याध्यक्ष श्री. तुळशिराम डेरकर, कोषाध्यक्ष श्री. सदाशीव चतुर, सहकोषाध्यक श्री. दशरथ रोगे, विजय मोरे, रमेश आरपेल्ली, नंदु टोंगे, सागर कन्नीरवार, विकास आवारी, संतोष खोब्रागडे, महेश जुनघरे यांची उपस्थीत होते.

     

    या आर्थिक मदतीमुळे वामन सिडाम यांच्या कुटुंबियांना काही प्रमाणात दिलासा मिळेल, अशी अपेक्षा संघटनेने व्यक्त केली आहे.

  • Maharashtra Civil Service Rules 1979 : शिक्षक आमदाराने केली शिक्षणाधिकारी यांची तक्रार

    Maharashtra Civil Service Rules 1979 : शिक्षक आमदाराने केली शिक्षणाधिकारी यांची तक्रार

    Maharashtra Civil Service Rules 1979 चंद्रपूर : जिल्‍हा परिषद चंद्रपूर येथील तत्‍कालिन माध्यमिक शिक्षणाधिकारी श्रीमती कल्‍पना चव्‍हाण यांनी सदर पदावर कार्यरत असताना केलेल्‍या अनियमिततेच्या अनुषंगाने त्‍यांच्याविरूध्द महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्‍त व अपील) नियम १९७९ च्‍या नियम १० अन्‍वये कारवाई करण्याबाबत दोषारोपपत्र आयुक्‍त (शिक्षण) सूरज मांढरे यांनी सादर केलेले आहे.

    अवश्य वाचा आणि ही चूक करू नका : ताडोबा जंगलात पर्यटकावर ठोठावला 5 हजार रुपयांचा दंड

    आमदार सुधाकर अडबाले यांनी यासंदर्भात वरिष्ठांकडे तक्रार व हिवाळी अधिवेशन २०२३ मध्ये प्रश्न उपस्थित केला होता. त्याची दखल घेऊन ही चौकशी करण्यात आली आहे.

    अवश्य वाचा : चंद्रपुरात पावसाचे थैमान

    Maharashtra Civil Service Rules 1979 चंद्रपूर जिल्ह्यातील शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची मोठ्या प्रमाणात प्रकरणे प्रलंबित असल्‍याच्या अनेक तक्रारी होत्‍या. आमदार अडबाले यांनी याबाबत वरिष्ठांकडे तक्रार केल्‍यानंतर त्‍यांच्या कार्यालयाची चौकशी समितीमार्फत चौकशी करण्यात आली. यात समितीला कार्यालयात बऱ्याच अनियमितता आढळून आल्‍या. इंदिरा विद्यालय, वरुर रोड (ता. राजुरा) येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्री. रामदास गिरटकर यांना तात्‍पुरते सेवानिवृत्ती वेतन मंजूर न करणे, कार्यालयीन कामकाजावर व अधिनस्‍त कर्मचाऱ्यांवर नियंत्रण नसणे, दफ्तर दिरंगाई करणे, लोकसेवा हमी कायद्यांतर्गत चुकीचा अहवाल सादर करणे, आदी दोषारोप त्‍यांच्यावर लावण्यात आले आहे.

     

    Maharashtra Civil Service Rules 1979 विभागीय शिक्षण उपसंचालक, नागपूर कार्यालयाचे स्तरावरून दिनांक 28.08.2023 रोजी शिक्षणाधिकारी (माध्यमिक), जिल्हा परिषद, चंद्रपूर कार्यालयाची तपासणी विभागीय शिक्षण उपसंचालक यांचे अध्यक्षतेखाली करण्यात आलेली होती. तपासणी दरम्यान शिक्षणाधिकारी कार्यालयाकडे सेवानिवृत्ती प्रकरण, सेवानिवृत्ती उपदान, वैद्यकिय देयके, वरिष्ठ वेतनश्रेणी प्रकरणे, निवड श्रेणीची प्रकरणे, कार्यालयीन आस्थापनेवरील मृतकांचे गटविमा योजनेचे लाभ वेळीच न देता कुटूंबास लाभापासून वंचित ठेवण्याची प्रकरणे मोठ्या प्रमाणात प्रलंबित ठेवण्यात आल्‍याचे आढळून आले. सदर बाबीची नोंद तपासणी अधिकारी यांनी तपासणी अहवालात घेवून तपासणी पथकाने मौखिक विचारणा केली असता समर्पक उत्तर देता आले नाही. यावरून श्रीमती कल्पना चव्हाण, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांनी जाणीवपूर्वक प्रकरणे प्रलंबित ठेवल्याचे दिसून आले.

     

     

    श्री. रामदास गिरटकर, मुख्याध्यापक हे इंदिरा विद्यालय, वरुर रोड, राजुरा, जि. चंद्रपूर या शाळेतून दिनांक 30.3.2023 रोजी सेवानिवृत्त झाले होते. परंतु, म.ना.से. (निवृत्ती वेतन) नियम 1982 चे नियम 130 नुसार कार्यवाही न करता श्रीमती चव्हाण यांनी श्री. गिरटकर यांना तात्पुरत्या सेवानिवृत्ती वेतनापासून वंचित ठेवले.

     

    शिक्षणाधिकारी (माध्यमिक), जिल्हा परिषद, चंद्रपूर यांनी माहे मार्च 2023, माहे एप्रील, 2023, माहे मे 2023, माहे जुन 2023 व माहे जुलै 2023 चा लोकसेवा हमी कायद्याअंतर्गत विभागीय शिक्षण उपसंचालक, नागपूर यांना सादर केलेल्या मासिक अहवालानुसार माहे जुन 2023, माहे जुलै 2023 चे अहवालामध्ये कार्यालयास प्राप्त झालेली सेवानिवृत्ती प्रकरणे, वैद्यकिय प्रतिपूर्ती मंजूरीची देयके, मान्यता प्रकरणे, वरिष्ठ श्रेणीची प्रकरणे, निवडश्रेणीची प्रकरणे निकाली निघालेली असल्याचे नमुद केलेले असून, प्रलंबित प्रकरणाचा आकडा शून्य दर्शविण्यात आलेला आहे.

     

    Maharashtra Civil Service Rules 1979 प्रत्यक्षात तपासणीचे दिवशी उक्त प्रकरणे बऱ्याच मोठ्या प्रमाणात प्रलंबित असल्याचे दिसून आलेले आहे. ज्‍यात सेवानिवृत्ती प्रकरणे ११५, सेवानिवृत्त सेवा उपदानाची प्रकरणे ५७, वैद्यकिय देयके ४३, वरिष्ठ श्रेणीची प्रकरणे ३१ व निवड श्रेणीची ३८ प्रकरणे प्रलंबित असल्‍याचे आढळून आले. याचाच अर्थ शिक्षणाधिकारी (माध्यमिक), जिल्हा परिषद, चंद्रपूर यांनी लोकसेवा हमी कायद्यांतर्गत वरिष्ठ कार्यालयास चुकीचा अहवाल सादर करून वरिष्ठ कार्यालयाची दिशाभुल केलेली असल्याचे स्पष्ट दिसून येते.

     

    श्रीमती कल्पना चव्हाण, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांची ही कृती महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम 1979 मधील नियम क्रमांक 3 मधील शर्तीचा भंग करणारी असल्‍याचे दोषारोपपत्रात म्‍हटले आहे. त्‍यानुसार तत्‍कालिन शिक्षणाधिकारी (माध्य.) यांच्यावर तात्‍काळ निलंबनाची कारवाई करण्याची मागणी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे सरकार्यवाह तथा आमदार सुधाकर अडबाले यांनी केली असून येत्‍या पावसाळी अधिवेशनात सुद्धा सदर मुद्दा उपस्‍थित करून शिक्षकांना न्‍याय मिळवून देणार आहेत.

  • Superintendent of Excise  : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या तपासात मोठा खुलासा होणार पण….

    Superintendent of Excise : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या तपासात मोठा खुलासा होणार पण….

    Superintendent of Excise 7 मे ला चंद्रपुरात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ऐतिहासिक कारवाई करीत उत्पादन शुल्क विभाग अधीक्षक संजय पाटील, दुय्यम निरीक्षक चेतन खारोडे व कार्यालय अधीक्षक अभय खताळ यांच्या नवीन बिअर शॉप च्या परवान्यासाठी 1 लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

    अवश्य वाचा : ताडोबा जंगलात असं काय घडलं की पर्यटकांवर ताडोबा प्रशासनाने केली कारवाई

    Superintendent of Excise  मात्र आता ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधिक विभागाच्या जिव्हारी लागत असल्याची माहिती सुत्रांद्वारे पुढे आलेली आहे, तपास थांबवावा असे दबावतंत्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागावर वापरण्यात येत आहे अशी खळबळजनक माहिती मिळाली आहे.

     

    Superintendent of Excise  लाच प्रकरणात अधीक्षक संजय पाटील हे सद्या फरार असून ते पोलिसांच्या हाती लागले नाही, दुय्यम निरीक्षक व कार्यालय अधीक्षक आधीच पोलिसांच्या अटकेत आहे, संजय पाटील यांच्या घरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने धाडी मारल्या, त्यामध्ये त्यांना मोठं घबाड मिळाले, मात्र पाटील अटकेबाहेर असल्याने ते आपल्या धनशक्तीचा वापर करीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करीत आहे.

     

    Superintendent of Excise  जर पाटील हे पोलिसांच्या हाती लागल्यास चंद्रपुरातील अनेक बडे अधिकारी यांचे नाव सुद्धा नियमबाह्य दारू दुकानाच्या परवान्याबाबत केलेल्या वसुली मध्ये हिस्सेदार म्हणून समोर येणार, ही चाहूल लागताच भ्रष्टाचारी अधिकारी आपल्या संपर्काचा वापर करीत पाटील यांना वाचविण्याचे प्रयत्न करीत आहे.

     

    पाटील हे काही अधिकाऱ्यांच्या संपर्कात असून ते चंद्रपुरात घडत असलेल्या घडामोडीवर लक्ष ठेवून आहे, आतापर्यंत उत्पादन शुल्क विभागाने कुणाकडून किती वसुली केली, व या वसुली मोहिमेत कोण कोण सहभागी आहे हे पाटील यांच्या अटकेनंतर पुढे येईल, मात्र अटकेपासून ते स्वतःचा बचाव करीत आहे.

     

    Superintendent of Excise  विशेष म्हणजे पोलीस उपअधीक्षक मंजुषा भोसले यांनी मोठी कारवाई करीत राज्यात खळबळ उडवून दिली आहे, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या इतिहासात चंद्रपुरात आजपर्यंत कुणीही इतकी मोठी कारवाई केली नाही.

     

    त्यांच्यावर सुद्धा पोलीस विभाग व लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी दबाव टाकत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे, मात्र कर्तव्यापुढे काही नाही अशी भूमिका भोसले यांनी घेतली आहे.

     

    उत्पादन शुल्क चंद्रपूर विभागाचे पीडित दारू व बार मालक आता या वसुली मोहिमेपासून दूर झाले आहे. पोलीस विभागाकडे इतकी सशक्त यंत्रणा असल्यावर सुद्धा संजय पाटील अजूनही त्यांच्या हाती का लागले नाही हा मोठा सवाल आहे? मोठे मंत्री असो की अधिकारी ते तात्काळ तपास यंत्रणेच्या हाती लागतात मग चंद्रपुरात असं का घडत नाही. याजागी कुणी सामान्य नागरिक असता तर तो कधीचाचं पोलिसांच्या हाती लागला असता.

     

    10 मे ला अटकेत असलेल्या दोघांची पोलीस रिमांड संपत आहे जर त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली तर तपास हा अर्धवट राहणार, जोपर्यंत संजय पाटील यांना अटक होणार नाही तो पर्यंत अटकेत असलेल्या आरोपींची न्यायालयीन कोठडी वाढविण्यात यावी अशी चर्चा आता जनमानसात रंगली आहे.

  • Tadoba safari timing : ताडोब्यात असं काय घडलं? पर्यटकावर कारवाई

    Tadoba safari timing : ताडोब्यात असं काय घडलं? पर्यटकावर कारवाई

    Tadoba safari timing चिमूर – ताडोबा व्याघ्र प्रकल्पात विना परवाना पर्यटन रस्त्याने अपप्रवेश करणे पर्यटकास महागात पडले असून वन विभागाने पर्यटकांवर दंडात्मक कारवाई केली आहे.

     

    Tadoba safari timing ताडोबातील व्याघ्र दर्शनासाठी देश विदेशातील पर्यटक ताडोबात येत असतात. विविध सेलिब्रिटींना सुद्धा ताडोबातील वाघ भुरळ पाडतात. व्याघ्र दर्शन करताना दिलेल्या नियमाचे पालन करूनच व्याघ्र दर्शन करावे लागतं. पण काही पर्यटक अतीउत्साहात नियमाची पायमल्ली करताना आढळून येतात.

    हे ही वाचा : चंद्रपूर जिल्ह्यात पावसाचे थैमान

    आज दिनांक 9 मे 2024 रोजी सकाळी दहा वाजताच्या सुमारास नीमढेला गेट परिसरात एम एच 49. BK 2818 या क्रमांकाचे श्रीमती सविता ताकसांडे यांच्या मालकीचे चारचाकी वाहनाने विना परवाना पर्यटन रस्त्याने अपप्रवेश करताना सफारी पर्यटकांना आढळले असता सफारी गाईड यांनी वन विभागाला दूरध्वनी द्वारे माहिती दिली, वन परिक्षेत्र अधिकारी किरण धानकुटे यांचे मार्गदर्शनात रेंजर ऑफिसर मोहन हटवार वनरक्षक बोपचे STPF टीम यांनी श्रीमती सविता ताकसांडे यांचेवर पाच हजार रुपयाची दंडात्मक कारवाई केली.

  • Chandrapur weather rain : चंद्रपूर जिल्ह्यात पावसाचे थैमान

    Chandrapur weather rain : चंद्रपूर जिल्ह्यात पावसाचे थैमान

    Chandrapur weather rain चंद्रपूर – हवामान खात्याने 7 मे ते 14 मे पर्यंत चंद्रपूर जिल्ह्याला पावसाचा यलो अलर्ट दिला आहे, हवामान खात्याचा अंदाज खरा ठरत असून आज 9 मे रोजी दुपारी 12 वाजता ढगाळ वातावरणामुळे भर दुपारी काळोख पसरला.

     

    वाघाचा हल्ला – वाघाच्या हल्ल्यात 7 वा बळी

    अवघ्या काही वेळातच सोसाट्याचा वारा सुरू झाला, वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली.

    Chandrapur weather rain अर्धा तास पडलेल्या या पावसाने जिल्ह्यात थैमान घातले, अनेक ठिकाणी वृक्ष कोसळले, सावली येथे बाजारात अनेक दुकानाचे टिन उडाले, जिल्ह्यातील विविध तालुक्यात हीच परिस्थिती कायम होती.

     

    Chandrapur weather rain चंद्रपूर शहरातील बिनबा गेट मार्गावर 1 ते दीड फूट पाणी रस्त्यावर साचले होते, या पाण्यातून अनेक नागरिक आपला मार्ग काढत पुढे जात होती.
    सध्या जिल्ह्यात या मुसळधार पावसाने किती नुकसान झाले याबाबत सध्या माहिती मिळालेली नाही, घुटकाला प्रभागात रस्त्यावर मोठे वृक्ष कोसळले.

    चंद्रपूर जिल्ह्यात आज अर्ध्या तासाच्या थैमानात 32 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे.

  • Human Wildlife Conflict in india : चंद्रपुर जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्यात सातवा बळी

    Human Wildlife Conflict in india : चंद्रपुर जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्यात सातवा बळी

    गुरू गुरनुले

    Human Wildlife Conflict in india मूल – मुल तालुक्यातील पडझरी समोर रत्नापुर जंगलातील वनपरिक्षेत्र वनविभाग मुल अंतर्गत येत असलेल्या कक्ष क्रमांक ३२४ दिनांक ९/५/२०२४ रोजी सकाळी ६-३० वाजता रत्नापूर येथील चार ते पाच शेतकरी व शेतमजूर तेंदूपत्ता तोडणी करीता जंगलात गेले असता त्याठिकाणी दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला केला, यामध्ये एकाचा मृत्यू झाला.

     

    अवश्य वाचा : 1 जूनपासून होणार मोठा बदल, तर त्या अनुदानाचा लाभ मिळणार नाही

    Human Wildlife Conflict in india तेंदूपत्ता तोडणीचे काम सुरू झाल्याने ग्रामीण भागातील शेतकरी व शेतमजुरांना दुसरे मजुरीचे कोणतेही काम नसल्याने पोटाच्या भाकरीसाठी आशिष सुरेश सोनुले वय (३४) वर्ष हा गावातील इतर चार व्यक्तीमिळून तेंदूपत्ता तोडणीसाठी गेले असता जंगलात आत दूरपर्यंत गेल्याने झाडाच्या आड बसून असलेल्या पट्टेदार वाघाने त्यातील आशिष सुरेश सोनुले यांचेवर हल्ला करून जागीच ठार केल्याची घटना आज सकाळी घडली. त्यामुळे रत्नापूर व पडझरी परिक्षेत्रात भीतीचे वातावरण पसरले आहे.

     

     

    Human Wildlife Conflict in india तालुक्यातील जंगल व्याप्त ग्रामीण भागात उन्हाळ्याच्या दिवसात शेतकरी व शेतमजुरांना दुसरे कोणतेही काम नसल्यामुळे कुटुंबीयांना पोटाची भाकर, शिक्षण, लग्न इत्यादी अडचणी मोठ्या प्रमाणात भेडसावत असतात. आणि नुकतेच मे महिना सुरु होतात शासनाने तेंदूपत्ता तोडणीला सुरुवात केली आहे. तेंदूपत्ता तोडणीची मजुरीही मजुरांना व शेतकऱ्यांना परवडण्यासारखी असते. यासाठी जंगल व्याप्त गावातील मजुरांना पैशासाठी उन्हाळी सिजन करुन घेणे भाग पडते कारण दुसरे उत्पन्नाचे व मजुरीचे कोणतेही साधन नाही.

     

    चालू वर्षातील वाघाने ठार केल्याची मुल तालुक्यातील पहिली घटना आहे. मागील वर्षी तालुक्यात एकूण १७ घटना घडल्या आहेत. त्यात रत्नापूरला लागूनच असलेल्या पडझरी जंगलात वाघाने ठार केल्याची घटना घडली होती. आणि सर्व ग्रामस्थांनी एकत्र येऊन जमाव करुन काँग्रेसचे नेते व सी.डी.सी.सी.बँकेचे अध्यक्ष संतोष सिंह रावत यांचे नेतृत्वात वनविभागाने त्वरित वाघाचा बंदोबस्त करावा अशी मागणी रेटून धरली व वनपरिक्षेत्र अधिकारी यांना एक तास घेराव सुद्धा केला होता.

     

    Human Wildlife Conflict in india त्यामुळे वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी उपवनसंरक्षक विश्राम गृह मुल येथे तात्काळ बैठक घेऊन ग्रामस्थांचे समाधान केले होते. आज ठार केलेल्या आशिष सुरेश सोनुले यांना पत्नी, दोन मुली व एक मुलगा असा परिवार आहे. कुटुंबातील प्रमुख व्यक्ती गेल्यावर त्या कुटुंबीयांचा आधारच हिरवल्या जात असते. अशा प्रसंगी शासनाने अशा निराधार झालेल्या कुटुंबीयांना आर्थिक मदत करावी व वन्यप्राण्यांची दहशत वाढल्याने गावक-यांकडून वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली जात आहे.

     

    रत्नापूर येथील घटनेची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी कोरेकर यांच्या मार्गदर्शनात क्षेत्र सहायक पाकेवार, वनरक्षक एस.जी. पाळडे , वनरक्षक ज्योती दवरेवार यांनी तात्काळ घटनास्थळाचा पंचनामा करून मृतकाला शव विचछेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.

     

    त्याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते विक्रम गुरनुले व काही ग्रामस्थ हजार होते. तेव्हाच वनविभागाकडून मृतकाच्या कुटुंबीयांना २५ हजार रुपये तातडीची आर्थिक मदत देण्यात येणार असल्याचे क्षेत्र सहायक श्री. पाकेवार यांनी सांगितले.

    चंद्रपूर जिल्ह्यात मानव वन्यजीव संघर्षाची ही 7 वि घटना घडली आहे.

  • ear tag applicator : 1 जूनपासून पशुधनाची खरेदी-विक्री होणार बंद

    ear tag applicator : 1 जूनपासून पशुधनाची खरेदी-विक्री होणार बंद

    ear tag applicator राज्यातील सर्व पशुंना टॅगिंग करून त्याची नोंद भारत पशुधन प्रणालीवर घेणे बंधनकारक करण्याबाबतचा शासन निर्णय निर्गमित झाला आहे. जिल्ह्यातील सर्व पशुपालक, शेतक-यांकडे असलेल्या सर्व पशुधनाच्या कानात इअर टॅगिंग करून त्यांची नोंदणी भारत पशुधन प्रणालीवर करणे आवश्यक आहे.

    अवश्य वाचा : कुणी लाच मागताय, तर आम्हाला कॉल करा

    ear tag applicator तसेच दिनांक 1 जून 2024 नंतर इअर टॅगिंग शिवाय पशुधनाची खरेदी व विक्री करण्यास प्रतिबंध करण्यात आला असून त्याची नोंद भारत पशुधन प्रणालीवर असल्याशिवाय खरेदी विक्री करता येणार नाही. तसेच पशुधनास पशुवैद्यकीय दवाखान्यामधून पशुवैद्यकीय सेवा दिली जाणार नाही.

    सविस्तर बातमी – चंद्रपुरात आता मद्य घोटाळा फाईल्स

    आणि नैसर्गिक आपत्ती, विजेचा धक्का तसेच वन्यप्राण्याचा हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या पशुधनास इअर टॅगिंग केलेली नसल्यास नुकसान भरपाईची रक्कम मिळणार नाही. तसेच पशुधनाची वाहतूक इअर टॅगिंग असल्याशिवाय करता येणार नाही. जर केल्यास कार्यवाहीसाठी समोर जावे लागेल.

    इअर टॅगिंग नसलेल्या पशुधनाची बाजार समित्या, आठवडी बाजार व गावागावातील खरेदी विक्री करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. त्यामुळे इअर टॅगिंग नसलेले पशुधन बाजार समिती मध्ये आणले जाणार नाहीत व त्यांची खरेदी विक्री होणार नाही.असे जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. मंगेश काळे यांनी सांगितले आहे.