Author: Admin

  • Today Acb trap news : चंद्रपूर जिल्ह्यात लाचलुचपत विभागाचा कारवाईचा चौकार

    Today Acb trap news : चंद्रपूर जिल्ह्यात लाचलुचपत विभागाचा कारवाईचा चौकार

    Today acb trap news चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 19 जूनला कारवाईचा चौकार मारीत, दोन वेगवेगळ्या कारवाईत 4 जणांना अटक केली.

    पहिली कारवाई 
    वैद्यकीय अहवाल पाहिजे असेल तर 10 हजार रुपये द्यावे लागतील अशी मागणी करणारे चंद्रपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील वरिष्ठ सहायक व वरिष्ठ लिपिक यांना 10 हजाराची लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय चंद्रपूरचे 58 वर्षीय वरिष्ठ सहायक अशोक बाबुराव बगुलकर व वरिष्ठ लिपिक 36 वर्षीय दीपक केशव सज्जनवार यांना या प्रकरणी अटक करण्यात आली.

    अवश्य वाचा : खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या भावाची दादागिरी

    Today acb trap news तक्रारदार हे वणी तालुक्यातील वेडाबाई जिल्हा यवतमाळ येथील रहिवासी असून ते एसटी महामंडळ चंद्रपूर येथे वाहक या पदावर कार्यरत आहे.
    वर्ष 2022 मध्ये बंगाली कॅम्प चंद्रपूर येथे तक्रारदार यांचा अपघात झाल्याने त्यांच्या पायात रॉड टाकण्यात आला, काही दिवसानंतर पायातील रॉड चे स्क्रू निघाल्याने त्यांच्या पायात पायजन झाले, त्यावेळी नागपूर येथील एम्स मध्ये त्यांचा उपचार करण्यात आला, या कालावधीत ते रजेवर होते.

    महत्त्वाचे : शालेय विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी

    Today acb trap news उपचार झाल्यावर त्यांना कर्तव्यावर रुजू होण्यासाठी वैद्यकीय अधिकारी यांचे प्रमाणपत्र हवे होते, प्रमाणपत्रासाठी ते जून महिन्यात जिल्हा सामान्य रुग्णालयात तपासणीसाठी गेले, तपासणी झाल्यावर त्यांना फिट फॉर लाईट ड्युटी एकस्पेक्ट ड्रायव्हिंग असा शेरा नमूद करीत वैद्यकीय अहवाल कार्यालयात सादर केला, परंतु वैद्यकीय अहवालामध्ये ते चालक पदाची कामगिरी करण्याबाबत स्पष्ट नव्हते, त्यामुळे तक्रारदार यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय चंद्रपूर येथील वरिष्ठ सहायक अशोक बाबूरावजी बगुलकर यांना वारंवार भेटून वैद्यकीय अहवाल देण्याबाबत विनंती केली.परंतु बगुलकर यांनी वैद्यकीय अहवाल देण्यात टाळाटाळ केली, 18 जून रोजी तक्रारदार यांना तुला लगेच वैद्यकीय अहवाल हवा असेल तर 10 हजार रुपये लागतील नाहीतर तुझे काम होणार नाही असे म्हणत बगुलकर यांनी लाच मागितली. मात्र तक्रारदाराला लाच देण्याची मुळीच इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग चंद्रपूर येथे तक्रार दाखल केली.

    तक्रारीच्या आधारे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस उपअधीक्षक मंजुषा भोसले यांनी आधी तक्रारीची पडताळणी केली. बगुलकर यांनी सदर लाच रक्कम शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे वरिष्ठ लिपिक दीपक केशवराव सज्जनवार यांच्याकडे देण्यास सांगितले होते.

     

    Today acb trap news 19 जून रोजी हॉटेल सेलिब्रेशन, दाताला रोड च्या बाजूला असलेल्या रोमा इलेक्टरीक दुकानासमोर दीपक सज्जनवार याला 10 हजार रुपये स्वीकारताना रंगेहात अटक करण्यात आली, त्यावेळी सज्जनवार यांनी बगुलकर यांना पैसे मिळाले असल्याचे सांगत त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. पोलीस उपअधिक्षक मंजुषा भोसले व चमू ने अशोक बगुलकर यांना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.

    सदरकची यशस्वी कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक राहुल माकनिकर, अप्पर पोलीस अधीक्षक संजय पुरंदरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक मंजुषा भोसले यांच्या नेतृत्वात पोलीस कर्मचारी रमेश दुपारे, नरेशकुमार नन्नावरे, रोशन चांदेकर, हिवराज नेवारे, अमोल सिडाम, प्रदीप ताडाम, मेघा मोहूर्ले व रवी तायडे यांनी केली.

    कारवाई दुसरी 

    घरकुल चे उर्वरित पैसे खात्यात जमा करण्याकरिता ग्रामीण गृहनिर्माण अभियंता (कंत्राटी) याने 20 हजार रुपयांची लाच मागितली, या प्रकरणी तडजोडीअंती 10 हजार रुपये खाजगी इसमाद्वारे स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दोघांना अटक केली आहे.
    27 वर्षीय मिलिंद मधुकर वाढई, ग्रामीण गृहनिर्माण अभियंता (कंत्राटी) पंचायत समिती कार्यालय,चिमूर व 28 वर्षीय आशिष कुशाब पेंदाम, मिस्त्रिकाम यांना अटक करण्यात आली.

    अवश्य वाचा : मुलीच्या लग्नासाठी महाराष्ट्र सरकार देणार 25 हजार रुपये

    Today acb trap news तक्रारदार हे मौजा कळमगाव पोस्ट जामगाव, तालुका चिमूर जिल्हा चंद्रपूर येथील रहिवासी असून ते रोज मजुरीचे काम करतात, तक्रारदार यांच्या नावाने शबरी आवास योजनेच्या वर्ष 2022-23 या आर्थिक वर्षाकरिता घरकुल मंजूर झाले होते.

    घरकुल बांधकामकरिता चार टप्प्यात बांधकामासाठी रक्कम जमा होणार होती, त्यांना 2 किस्त 65 हजार रुपये जमा झाले होते, तर तिसरा व चौथ्या टप्प्यातील अनुक्रमे रक्कम 45 व 20 हजार असे जमा करून देण्याकरिता अभियंता मिलिंद वाढई तक्रारदाराला 20 हजार रुपयांची लाच मागितली.

     

    Today acb trap news अभियंता वाढई यांचे मित्र आशिष पेंदाम यांनी तक्रारदाराला पैसे देण्यास प्रोत्साहित केले, तडजोडीअंती 10 हजार रुपये देण्याचे ठरले.
    तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी सम्पर्क साधत त्यांना याबाबत तक्रार दिली, तक्रारीची पडताळणी पोलीस निरीक्षक जितेंद्र गुरनुले यांनी केल्यावर 19 जून ला सापळा कारवाई दरम्यान पंचायत समिती कार्यालयात 10 हजार स्वीकारताना अभियंता वाढई यांना रंगेहात अटक करण्यात आली, सोबतच आशिष पेंदाम यांना यावेळी ताब्यात घेण्यात आले.

    सदरची यशस्वी कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस उप अधीक्षक मंजुषा भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलोस निरीक्षक जितेंद्र गुरनुले यांच्या नेतृत्वाखाली पोलीस कर्मचारी संदेश वाघमारे, वैभव गाडगे, राकेश जांभुळकर व सतीश सिडाम यांनी केली.

  • Free school uniform scheme : विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी

    Free school uniform scheme : विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी

    Free school uniform scheme मोफत गणवेश योजनेप्रमाणेच शासकीय तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील इयत्ता 1 ली 8 वी मधील सर्व विद्यार्थ्यांना सन 2023-24 पासून दरवर्षी एक जोडी बुट व दोन जोडी पायमोजे चा लाभ शाळा व्यवस्थापन समितीकडून देण्यात येत आहे. याकरीता प्रति विद्यार्थी 170 रुपये इतकी रक्कम निश्चित करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने चंद्रपूर जिल्ह्यातील 1610 शाळांमधील 1 लक्ष 2 हजार 425 विद्यार्थ्यांकरीता प्रति विद्यार्थी 170 रुपये याप्रमाणे एकूण 1 कोटी 74 लक्ष 12 हजार 250 रुपयांचा निधी वर्ग करण्यात आला आहे.

    अवश्य वाचा : खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या भावाची दादागिरी

    शाळा व्यवस्थापन समिती स्तरावरून सर्व विद्यार्थ्यांना एक जोडी बुट व दोन जोडी पायमोजेचा लाभ देण्यासाठी आवश्यक कार्यवाही सुरू असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. यांनी कळविले आहे.

    https://ads.timesdiginews.com/2024/06/chandrapur-police-news-accommodation-for-candidates/

    Free school uniform scheme केंद्र शासनाच्या समग्र शिक्षा कार्यक्रमांतर्गत शासकीय तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये इयत्ता 1 ली ते 8 वी मध्ये शिक्षण घेत असलेल्या सर्व मुली, अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील मुले तसेच दारिद्र्य रेषेखालील पालकांच्या मुलांना मोफत गणवेश योजनेचा लाभ देण्यात येतो. तसेच सन 2023-24 या शैक्षणिक वर्षापासून प्रस्तुत योजनेचा लाभ दारिद्र्य रेषेवरील पालकांच्या मुलांनासुद्धा देण्याबाबतचा निर्णय 6 जुलै 2023 च्या शासन निर्णयाद्वारे घेण्यात आला.

    अवश्य वाचा : पोलीस भरती मध्ये उमेदवारांना आमिष द्याल तर याद राखा – पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन

    केंद्र शासनाच्या समग्र शिक्षा कार्यक्रमांतर्गत मोफत गणवेश योजनेकरीता निर्धारीत केलेल्या प्रती गणवेश 300 रुपये याप्रमाणे राज्य शासनानेसुध्दा दोन गणवेशाकरीता प्रति विद्यार्थी 600 रुपये रक्कम निश्चित केली आहे.

  • Karnataka Power Corporation Limited : निवडून येताच खासदार धानोरकर यांच्या भावाची “दादागिरी”

    Karnataka Power Corporation Limited : निवडून येताच खासदार धानोरकर यांच्या भावाची “दादागिरी”

    Karnataka Power Corporation Limited चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती शहरालगतच्या कर्नाटक -एमटा कोळसा खाण व्यवस्थापकाला नवनिर्वाचित खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या उपस्थितीत त्यांचे भाऊ प्रवीण काकडे यांनी शिवीगाळ केली.

     

    त्यानंतर त्यांच्या समर्थकांनी आंदोलनादरम्यान खाण व्यवस्थापकाला मारहाण केली. खाण प्रकल्पग्रस्त स्थानिकांच्या 16 मागण्यांसाठी प्रकल्पग्रस्त व काँग्रेस कार्यकर्त्यांनी खाण कार्यालयासमोर आंदोलन सुरू केले होते. दरम्यान आंदोलनस्थळी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी भेट दिली.

     

    Karnataka Power Corporation Limited चर्चेरम्यान आंदोलक व प्रवीण काकडे यांची व्यवस्थापक सोबत मागण्याच्या पुर्ततेवरून आधी शाब्दिक चकमक व नंतर व्यवस्थापक शिवप्रसाद यांना मारहाण करण्यात आली. या घटनेनंतर पोलिसांनी जमावाला पांगविले. काँग्रेस कार्यकर्त्यांनी मागण्या पूर्ण होईपर्यंत खाणीचे काम बंद पाडले आहे.

     

    विशेष म्हणजे अजूनही प्रतिभा धानोरकर यांनी खासदार पदाची शपथ घेतलेली नाही, मात्र त्यापूर्वी त्यांच्या भावाची मुजोरी मात्र सुरू झाली आहे, काही दिवसांपासून बामणी प्रोटिन्स उद्योगाचे कामगार व cmpl चे कामगार अन्यायाविरूद्ध लढत आहे त्यांच्याकडे सपेशल दुर्लक्ष खासदार धानोरकर यांनी केले आहे.

    काही महिन्यांपूर्वी बरांज मोकासा येथे महिलांनी कर्नाटक एमटा विरोधात लढा उभारला मात्र त्या आंदोलनाची साधी दखल आताच्या खासदार यांनी घेतली नव्हती हे विशेष.

    अवश्य वाचा : पोलीस भरती, 1 फुल लाखो माली

    Karnataka Power Corporation Limited कांग्रेस पक्ष हा कधीही अहिंसेला समर्थन करीत नाही मात्र आज कांग्रेस पक्षाच्या खासदार समोर ही घटना घडली, निवडुन येताच त्यांच्या पदाचा बंधू प्रवीण काकडे यांनी मुजोरी उपयोग सुरू केला आहे.

  • Flood of unemployment : आजपासून पोलीस भरती प्रक्रियेला सुरुवात

    Flood of unemployment : आजपासून पोलीस भरती प्रक्रियेला सुरुवात

    Flood of unemployment आपलं गाव आणि घर सोडून, मैलोनमैल प्रवास करत, मोठ्या शहरात तरुण डोळ्यांत खाकी वर्दीचे स्वप्न आहे.

    या तरुणांच्या स्वप्नांची वाट यंदा खडतर बनून गेली आहे. कारण पोलीस भरतीसाठी आलेल्या अर्जांची संख्या.. पोलीस खात्यातील एका जागेसाठी 101 अर्ज आले आहेत.   

    अवश्य वाचा : neet परिक्षेविरोधात हजारो विद्यार्थी रस्त्यावर

    Flood of unemployment राज्यभरात आजपासून 17 हजार 471 जागांसाठी पोलिस भरती सुरू होत असून यासाठी 17 लाख 76 हजार 256 अर्ज आलेले आहेत.

     

    Flood of unemployment पोलीस खात्यात शिपाई पदासाठी बारावी तर चालक आणि बॅण्ड पथकात भरतीसाठी  शिक्षणाची अट इयत्ता दहावी उत्तीर्ण इतकी आहे. तरी अत्यंत उच्चशिक्षित तरुणांनीही या पदांसाठी अर्ज केले आहेत. डॉक्टर, इंजिनीअर अगदी एमबीए केलेल्या तरुणांनीही पोलीस भरतीसाठी अर्ज केले आहेत.विशेष म्हणजे अनेक उच्चशिक्षित उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज केले आहेत. अगदी डॉक्टर, व्यवस्थापन पदव्युत्तर पदवी (एमबीए) अभियांत्रिकी पदवी (बीटेक), विधि पदवी (एलएलबी) झालेले उमेदवारही स्पर्धेत आहेत. 

    महत्त्वाचे : पोलीस भरती मध्ये आलेल्या उमेदवारांना आमिष दिल्यास कारवाई अटळ – पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन

    कोणत्या जागेसाठी किती अर्ज?

    पोलीस शिपाई  – 9 हजार 595 पद असून 8 लाख 22 हजार 984 अर्ज आलेले आहेत.

    चालक पदासाठी – 1 हजार 686 पदांसाठी, 1 लाख 98 हजार 300 अर्ज आलेत.

    बँड्समन – 41 पद असून 32 हजार 26 अर्ज आलेले आहेत.

    एसआरपीएफ – 4 हजार 349 जागा असून 3 लाख 50 हजार 592 अर्ज आलेले आहेत.

    तुरुंग शिपाई – 1 हजार 800 पदांसाठी 3 लाख 72 हजार 354 अर्ज आलेले आहेत.

     

    Flood of unemployment बँड पथकातील जागेसाठी सर्वाधिक स्पर्धा पोलिस शिपाई, चालक, बँड्समन, शीघ्र कृती दलातील पदे आणि तुरूंग विभागातील पदांसाठी भरती होत आहे. त्यातील बँडसमन म्हणजेच पोलिसांच्या बँड पथकातील जागेसाठी सर्वाधिक स्पर्धा असल्याचे दिसत आहे. या पदासाठी 41 जागा आहेत. त्यासाठी 32 हजार 26 अर्ज आले आहेत.या पदाच्या एका जागेमागे 781 उमेदवार स्पर्धेत आहेत. राज्यातील पोलिस भरती बुधवारपासून सुरू होत असून सुरूवातीला मैदानी चाचणी नंतर शारीरिक चाचणी आणि नंतर लेखी परीक्षा होणार आहे.

     

    भरती प्रक्रिया पुढे ढकलण्याची मागणी

    एका पदासाठी एकशे एक अर्ज… अशी सगळी परिस्थिती असताना, अनेक भागांत पाऊस पडत असल्याने भरती पुढे ढकलण्याची मागणी करण्यात येतेय. तर, भरती प्रक्रियेदरम्यान पाऊस आल्यास भरती प्रक्रिया पुढे ढकलण्यात येईल. तसेच अनेक पदांसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना दोन्ही ठिकाणी एकच  तारीख मिळाली असल्यास ती तारीख बदलून दिली जाईल, अशी माहिती अप्पर पोलिस महासंचालक राजकुमार व्हटकर यांनी दिलीय.

     

    प्रचंड मोठ्या प्रमाणातल्या बेरोजगारीमुळे यंदाची पोलीस भरती म्हणजे एक फुल, लाखो माली… अशी गत होऊन बसलीय.

  • Janata Career Launcher : जनता करीअर लॉंचर ने पुन्हा इतिहास रचला

    Janata Career Launcher : जनता करीअर लॉंचर ने पुन्हा इतिहास रचला

    Janata Career Launcher चंद्रपूर : दि.17 जून ला सायंकाळी महाराष्ट्र शासनातर्फे घेण्यात येणार MH-CET निकाल जाहीर झाला असून त्यामध्ये जनता करीअर लाँचर मधील बहुतांश विद्यार्थी अग्रस्थानी आहेत. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी जनता करीअर लाँचरने इतिहास घडविला आहे. या विद्यार्थ्यांचा वैद्यकीय व अभियांत्रिकी क्षेत्रात प्रवेशित होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

    अवश्य वाचा : जिल्ह्यातील या कामगारांचा वाली कोण?

    यामध्ये अनुश्री घोडमारे, तुषार महाकुलकर, राशिक उरकुडे, ईशा राऊत, रोशन आवारी, तीलक बुरे, हर्षल पिंपलकर, हर्षाली काळे, कुणाल ठेंगणे, रोहन एकरे, प्रज्वल कुकडे, रोहन पोलेलवार, संकेत कुनघाटकर, सुशांत ढोढरे, कार्तिक निमजे, प्रणय दांडेकर, प्रतीक गेडाम, सानिका विधाते, दर्शन मोहितकर, प्रिया काकडे व इतर अनेक विद्यार्थी अव्वल आले आहेत.

    महत्त्वाचे : नीट परीक्षा घोटाळा, चंद्रपुरात हजारो विद्यार्थी रस्त्यावर

    Janata Career Launcher या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्थेतर्फे डॉ. अशोक जीवतोडे, अनुभवी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी केले आहे.

    Janata Career Launcher
    तर मग आजच आपला प्रवेश निश्चित करा….
  • Worker’s movement : चंद्रपुरातील या कामगारांचा वाली कोण?

    Worker’s movement : चंद्रपुरातील या कामगारांचा वाली कोण?

    Workers’ movement CMPL या माती उत्खनन कंपणीने कार्यरत स्थानिक कामगारांना पत्र पाठवीत तुमचं काम संपलं आहे, अश्या आशयाचे पत्र पाठवीत त्यांना कामावरून कमी करण्याचा प्रयत्न झाला, सदर कंपनीचे काम राजुरा येथील सास्ती भागात सुरू आहे, त्या कंपनीत कामगारांना स्थलांतरित करावे अशी विनंती कामगारांनी केली मात्र त्यांचं काही ऐकल्या गेलं नाही.

    अवश्य वाचा : हंसराज अहिर यांच्या प्रयत्नांना यश

    त्यामुळे कामगारांनी राजुरा तहसील कार्यालय समोर 10 जून पासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले, कामगार व त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची पाळी आली आहे, मात्र त्यांना न्याय देण्याचं काम कुणी करीत नाही आहे, अश्यात सामाजिक कार्यकर्ते भूषण फुसे यांनी कामगारांच्या लढ्यात उडी मारली व त्यांना समर्थन देत त्या आंदोलनात सामील झाले.

    हे ही वाचा : चंद्रपुरात neet परीक्षा घोटाळा विरोधात हजारो विद्यार्थी उतरले रस्त्यावर

    आतापर्यंत कामगारांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपल्या रक्ताने न्याय द्या असे पत्र लिहले, त्यानंतर सुद्धा कामगारांची सुनावणी झाली नाही. कामगारांनी मुंडन आंदोलन सुद्धा केले पण काही फायदा झाला नाही.

    अनैशा वाहन चालक कामगार संघटना चे संस्थापक सूरज उपरे व भूषण फुसे या आंदोलनाचे नेतृत्व करीत आहे.

    Workers’ movement 4 जून रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला, आणि चंद्रपुरात प्रतिभा धानोरकर ह्या निवडून आल्या, 6 जून ला अनैशा वाहन चालक कामगार संघटनेचे अध्यक्ष सूरज उपरे सहकाऱ्यांना सोबत घेत खासदार प्रतिभा धानोरकर यांची भेट घेत त्यांना कामगारांच्या आंदोलनाबाबत माहिती दिली.

    महत्त्वाचे : मुलीच्या लग्नासाठी महाराष्ट्र सरकार देणार 25 हजार रुपये

    मी कंपनीशी एकदा चर्चा करते त्यांनतर आपल्याला सांगते असे उत्तर खासदार धानोरकर यांनी कामगारांना दिले, त्यानंतर खासदार धानोरकर यांनी त्यांना कळविले की CMPL कंपनीचा कंत्राटदार तुम्हाला न्याय देऊ शकत नाही, आम्ही त्यांना कामावर घेणार नाही असे उत्तर दिले.

     

    Workers’ movement खासदार धानोरकर यांच्या या उत्तराने कामगार काहीशे हताश झाले मात्र त्यांनी न खचता आंदोलन सुरूच ठेवले. आज सूरज उपरे यांनी धानोरकर यांच्याशी झालेली भेट याबाबत माहिती दिली.

    सामाजिक कार्यकर्ते भूषण फुसे यांनी यावेळी माहिती दिली की जर कामगारांना जनप्रतिनिधी न्याय देत नसेल तर त्यांचा वाली कोण?

    विशेष म्हणजे खासदार धानोरकर यांनी अधिकारी व कंपनी व्यवस्थापनाची बैठक बोलवायला हवी होती त्या बैठकीतून काही मार्ग निघाला असता मात्र तसे काही झाले नाही, चंद्रपूर हा औद्योगिक जिल्हा आहे, याठिकाणी हजारो कामगार कार्यरत आहे.

    मात्र आज कामगारांना अश्या हिटलर शाही विरोधात लढा द्यावा लागत आहे, त्यावर लोकप्रतिनिधी हे हतबल अवस्थेत बसले आहे, ही या जिल्ह्याची मोठी शोकांतिका आहे.

    Workers’ movement एकीकडे बामणी प्रोटिन्स चे कामगार आपल्या कुटुंबासहित लढाई लढत आहे तर दुसरीकडे CMPL चे कामगार सुद्धा असाच लढा लढत आहे, त्यांना लोकप्रतिनिधी व शासनाकडून न्याय हवा मात्र ही व्यवस्था त्यांना न्याय देऊ शकत नसल्याने आता पुढे काय करायचं? हा प्रश्न त्यांच्या पुढे उभा आहे.

  • Hansraj Ahir : हंसराज अहिर यांच्या प्रयत्नांना भरीव यश

    Hansraj Ahir : हंसराज अहिर यांच्या प्रयत्नांना भरीव यश

    Hansraj ahir चंद्रपूरः- वेकोलिच्या विविध क्षेत्राशी निगडीत प्रकल्पग्रस्त शेतकन्यांचे अनेक प्रलंबित प्रश्न, समस्यांच्या निवारणार्थ सुनावणी, बैठक व बृहत पत्रव्यवहार व सतत पाठपुराव्याने अखेर प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या अनेक ज्वलंत प्रश्नांची सोडवणूक करण्यात राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष तथा पुर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर याना यश मिळाले असून दि. 17 जून 2024 रोजी हंसराज अहीर यांच्या अध्यक्षतेत नागपुरातील वेकोलि विश्रामगृहात वेकोलिचे अध्यक्ष तथा प्रबंध निदेशक (सीएमडी) व अन्य वरिष्ठांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत विविध महत्वपुर्ण प्रलंबित समस्यांचे निराकरण झाल्याने प्रकल्पग्रस्तांच्या दृष्टीने ही बैठक फलदायी ठरली आहे.

    अवश्य वाचा : नीट परीक्षा घोटाळा, चंद्रपुरात विद्यार्थ्यांचा मोर्चा

    सदर बैठकीस वेकोलि मुख्यमहाप्रबंधक (भूमि) व (औ.स.) मांजी आमदार सुदर्शन निमकर, विनोद शेरकी, अॅड. इंजी. प्रशांत घरोटे, धनंजय पिंपळशेंडे, मधुकर नरड, पवन एकरे, माजी सरपंच बंडु रायपुरे, कोलगांवचे उपसरपंच पुरुषोत्तम लांडे, चुनाळाचे सरपंच बाळनाथ वडसकर, लक्ष्मण बोढे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
    वेकोलि प्रबंधनाने सास्ती एक्सपॉन्शन प्रकल्पातील नोकरीचे प्रस्ताव या महिनाभरात स्वीकारण्यास अनुमती दिली.

    महत्त्वाचे : 19 जूनपासून चंद्रपुरात पोलीस भरतीचा प्रारंभ, 137 जागेसाठी 22 हजार अर्ज

    Hansraj ahir गोवरी पोवनी प्रकल्पातील आर्थिक मोबदला देयकास अंतिम मंजूरीही जून महिन्यातच देण्याचे मुख्यालयाने मान्य केले. गोवरी सेंट्रल प्रकल्प सेक्शन 4 करीता लवकरच प्रस्तावित करण्याचे तसेच भूमि अधिग्रहण प्रकल्पातील ग्रैंड डॉटर (नात) मुलीचा मुलगा/मुलगी व सुनेच्या नोकरीविषयी लवकरच निर्णय होवून अनुकंपा नोकरीत विवाहीत मुलीच्या तसेच मृतक नामनिर्देशीताचा भाऊ, बहीण यांना नोकरी देण्याविषयी मुख्यालयीन स्तरावर लवकरच सकारात्मक निर्णय होणार असल्याची माहिती सीएमडी यांनी हंसराज अहीर यांना या बैठकीत दिली.

     

    न्यायालयीन प्रकरणातील प्रलंबित नोकऱ्या मार्गी लावण्यास गुणवत्ता प्राधान्य प्रकरणामध्ये निर्णय घेण्याबाबत ठोस धोरण स्वीकारले जाईल, भूमिगत खाणीतून सुरक्षा प्रहरीकरीता आवेदन केलेल्या कामगारांची कॅडर बदल विषयक सुची प्रकीयाधीन असून ती लवकरच जाहीर करण्यात येईल असेही बैठकीत आश्वस्त करण्यात आले.

    Hansraj ahir या व्यतिरिक्त पोवनी, सास्ती, सोनुर्ली गावातील उर्वरीत जमिनीचे अधिग्रहण, सीएमपीडीआयएल द्वारा सव्र्व्हेक्षण करुन तातडीने अंमल करण्याच्या सुचना एनसीबीसी अध्यक्षांनी केल्या. यावेळी भटाळी, पाटाळा व अन्य प्रकल्पातील एक सातबारा व 2 एकर पेक्षा अधिक तसेच दोन आराजी असल्यास फेरफार प्रक्रियेनंतर 2 नोकऱ्या देण्यास अडचण नसल्याचे ही प्रबंधनाने या बैठकीत स्पष्ट केले. तुकडेबंदी अवहेलना प्रकरणात प्रलंबित नोकरी प्रस्तावाबाबत जिल्हाधिकारी स्तरावर सकारात्मक निर्णय घेण्यात यावा अशा सुचना देण्यात आल्या. सदर बैठकीत या व्यतिरिक्त अनेक महत्वपुर्ण विषयांवर शिक्कामोर्तब झाल्याने प्रकल्पग्रस्तांमध्ये संतोष व्यक्त होत आहे.

  • Gharkul construction : मूल तालुक्यात अवैध रेतीसाठा, शिवसेनेचे प्रशासनाला निवेदन

    Gharkul construction : मूल तालुक्यात अवैध रेतीसाठा, शिवसेनेचे प्रशासनाला निवेदन

    गुरू गुरनुले

    Gharkul construction मुल – मुल तालुक्यातील एमआयडीसी मरेगाव परिसरात पाण्याच्या टाकी समोर मोठ्या प्रमाणावर अवैद्य रेतीसाठा जमा करून ठेवला आहे. सदर रेतीसाठा विषयी माहिती जाणून घेतली असता एम.आय.डी.सी. परिसरात सिमेंट रस्त्याचे काम सुरू असून त्यासाठी मोठ्या प्रमाणात जवळपास अंदाजे ५० हायवा रेतीसाठा करून ठेवला आहे. सदर कंत्राटदाराने या रेतीसाठी कोणत्याही प्रकारची रॉयल्टी अथवा शासनाकडून परवानगी घेतलेली नाही. याविषयी दिनांक ८ जून २०२४ रोजी तहसीलदार साहेब यांना मोबाईल द्वारे शिवसेना जिल्हा प्रमुख संदीप गिऱ्हे यांचे मार्गदर्शनात शिवसेना तालुका प्रमुख प्रशांत गट्टूवार तक्रार स्वरूपात माहिती तथा रेतीसाठ्याचे व्हिडिओ क्लिप पाठवली असता तहसीलदार यांचे कडून अद्यापही कोणतीही कारवाई केलेली नाही.

    अवश्य वाचा : नीट परिक्षेविरोधात चंद्रपुरात हजारो विद्यार्थी रस्त्यावर

    ही बाब अत्यंत गंभीर असून महसूल विभाग विषयी शंका व्यक्त केली जात आहे. संबंधित कंत्राटदार आणि महसूल विभाग यांचेमध्ये काहीतरी साठे-लोटे असल्याचे बोलले जात आहे. एकीकडे शासनाने ग्रामीण जनतेसाठी अनेक घरकुल योजना राबविण्याचे ठरविले असताना घरगुती घरकुल बांधकाम करणाऱ्यांना किंवा इतरही शासकीय काम करणाऱ्यांना रेती उपलब्ध होत नाही.

    महत्त्वाचे : पोलीस भरतीसाठी उमेदवारांना आमिष द्याल तर याद राखा – पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन

    Gharkul construction गरीब गरजू लोकांना घरकुल मंजूर झाले असताना रेती अभावी त्यांचे घरकुल बांधकाम अडून पडले आहे तर काहींचे अर्धवट झाले आहेत. ही बाब शासनाच्या उद्देशांना हरताळ फासणारी आहे. तर दुसरीकडे अशा कंत्राटदारांकडे मोठ्या प्रमाणात अवैध रेती साठा कसा काय उपलब्ध झाला. याबाबत तर्क वितर्क लावल्या जात आहे. या संबंधाने शिवसेनेच्या वतीने दिनांक १८/६/२०२४ ला तक्रार दिलेली असता.ही बाब अतिशय निषेधार्थ असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

     

    याबाबत तालुका शिवसैनिकांनी एका निवेदनाद्वारे  तहसीलदार मुल यांना निवेदनातून विनंती केली असून सदर रेतीची लिज नसतांना रेती आली कुठून, करीता रेती साठ्याबाबत संबंधित कंत्राटदाराविरोधात तात्काळ शासकीय नियमानुसार तात्काळ कठोर कारवाई करून सदर रेती साठा जप्त करावा, आणि ही रेती घरकुल लाभार्थ्यांना उपलब्ध करून द्यावी. अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.

    अवश्य वाचा : चंद्रपूर विधानसभेतील सिंचनाचा प्रश्न सुटणार

    Gharkul construction आपणाकडून सदर विषयावर तातडीने कारवाई न झाल्यास शिवसेना तालुका मूलच्या वतीने आपल्या शिवसेना स्टाईलने सदर प्रकरण हाताळल्या जाईल आणि यात कायदा सुव्यवस्थेचं प्रश्न निर्माण झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी शासनाची राहणार.असा इशारा यावेळी शिवसेना तालुका प्रमुख प्रशांत गट्टूवार यांनी दिला.यावेळी शिवसेना शहर प्रमुख आकाश राम,युवासेना शहर प्रमुख आमित आयलानी,दादाजी लोडेलिवांर व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

  • Neet exam 2024 : चंद्रपुरात हजारो विद्यार्थी NEET परीक्षेत झालेल्या घोटाळ्याविरोधात रस्त्यावर

    Neet exam 2024 : चंद्रपुरात हजारो विद्यार्थी NEET परीक्षेत झालेल्या घोटाळ्याविरोधात रस्त्यावर

    Neet exam 2024 देशात नीट परिक्षे दरम्यान झालेला घोटाळा उघड झाल्यावर विद्यार्थ्यांनी जागोजागी निदर्शने केली, लाखो रुपये खर्च करीत नीट चा पेपर फुटला, निकाल लागल्यावर 67 विद्यार्थ्यांना पैकी च्या पैकी गुण मिळाले शिक्षणाचा हा सर्वात मोठा भ्रष्टाचार असल्याचे मत चंद्रपूर कोचिंग क्लासेस असोसिएशनने लावत चंद्रपूर शहरात भव्य मोर्चा 18 जून रोजी काढला.

    अवश्य वाचा : चंद्रपूर पोलीस भरती प्रक्रियेदरम्यान आमिषाला बळी पडू नका, तक्रार करा – पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन

    शहरातील गांधी चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत निघालेल्या या मोर्च्यात हजारो विद्यार्थी सहभागी झाले होते, नीट परीक्षेतील घोटाळ्याची चौकशी व्हावी, आरोपीना कठोर शिक्षा व्हावी अश्या घोषणा विद्यार्थी मोर्च्यादरम्यान देत होते.

     

    Neet exam 2024 जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात हा मोर्चा पोहचल्यावर चंद्रपूर कोचिंग क्लासेस चे विजय बदखल व नाहीद हुसेन यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली, ते म्हणाले की देशात विद्यार्थ्यांचा शिक्षण क्षेत्रावरून विश्वास उडायला लागला आहे, कारण परीक्षेत असे घोळ होऊ लागले तर प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान यामुळे झाले आहे.या सर्व प्रकरणाची सीबीआय व ईडी द्वारे चौकशी व्हायला हवी अशी मागणी यावेळी केली.

    महत्त्वाचे : मुलीच्या लग्नासाठी महाराष्ट्र सरकार देणार 25 हजार रुपये

    मोर्च्यात सहभागी विद्यार्थ्यांनी यावर प्रतिक्रिया दिली की जर पैसे देऊन परीक्षा पास करायची तर अभ्यास करण्याची गरज काय आहे? असे प्रकार देशात होऊ लागले तर अश्या परीक्षेत भाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भविष्याचे यामुळे मोठे नुकसान होईल, त्यामुळे आरोपीवर कठोर कारवाई व्हायला हवी.
    चंद्रपूर कोचिंग क्लासेस असोसिएशनच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
    आयोजित मोर्च्यात हजारो विद्यार्थी सामील झाले होते.

  • Irregular power supply : अनियमित वीज पुरवठ्यामुळे पाणी पुरवठा ठप्प

    Irregular power supply : अनियमित वीज पुरवठ्यामुळे पाणी पुरवठा ठप्प

    गुरू गुरनुले

    Irregular power supply मूल – सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने उन्हाची तीव्रता देखील अधिक जाणवत आहे. चीड चीड व घाम गळणारी उष्ण दाहकता निर्माण झाली आहे. अशाही परिस्थितीत विद्युत वितरण प्रणाली मात्र या ना त्या कारणाने नियमित दिवस असो वा रात्र रोजच एकसारखी विद्युत लाऊन बंद होत असल्याच्या तक्रारी सर्व सामान्य नागरिकांकडून ऐकायला येत आहेत.

    अवश्य वाचा : पोलीस भरतीसाठी आलेल्या उमेदवारांना आमिष दिले तर कारवाई अटळ – पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन

    एकंदरीत हा रोजचा धंदाच झाला आहे. मुल नगरातील व पूर्ण मुल तालुक्यातील खेडे गावात सुद्धा पहिल्याच पावसात रोजच नियमित विद्युत पुरवठा बंद होत आहे. यामुळे ग्रामीण व शहरी नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला. तसेच शहरी व ग्रामीण भागातील खेडे गावातील पाणीपुरवठ्या यंत्रणेवर सुद्धा याचा परिणाम झाला. परंतु तांत्रिक कारणामुळे वीजपुरवठा खंडीत झाल्याचे महावितरणाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. वारंवार वीज सेवा खंडीत होत असल्याने शहराच्या पाणी पुरवठ्यावर परिणाम पडल्याचे सांगून नगर पालिकेच्या प्रशासन अधिकारी देखील पांघरून घालत आहेत.

    मूल शहरासह तालुक्यात काही ठिकाणी शुक्रवारी तुरळक स्वरूपाचा पाऊस असल्याने विद्युत पुरवठा खंडित झाला. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आणि पाणीपुरवठा यंत्रणेवरही परिणाम होऊन पावसाळ्यात तांत्रिक कारणामुळे वीजपुरवठा खंडित होत असल्याचे दिसून येत आहे.
    मुल नगरातील वादळी हवेमुळे झाडाच्या फांद्या पडणे, वीज कडकडणे यासह वेळेवर येणारी अनेक कारणे यासाठी कारणीभूत आहेत. त्यामुळे नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागतो.

    पंकज उजवणे, सहायक अभियंता, महावितरण, मूल

    Irregular power supply पावसाळा सुरु झाला असला तरी मात्र पाहिजे त्या प्रमाणात मृग नक्षत्र पूर्ण होण्याची वेळ आली मात्र मृगनक्षत्रानंतरचा मेघ गर्जनेसह पाऊस थोड्या प्रमाणात कोसळला. पावसाच्या आगमनाने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण होते. शेतकऱ्यांनी शेतीच्या हंगामाला सुरुवात केली. पण दुसरीकडे प्रचंड चिक्कट उकाड्यालासुद्धा त्यांना सामोरे जावे लागत आहे. खऱ्या मान्सुनचा पाऊस कधी बरसेल याची नागरिकांना उत्सुकता अजूनही कायम आहे.

    महत्त्वाचे : खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या हस्ते अनेकांनी केला कांग्रेस पक्षात प्रवेश

    काही प्रमाणात पावसाला सुरवात झाली. रात्रीही पावसाचे थेंब पडले. परंतु उष्णता काही कमी झालेली नाही. पहिल्याच पावसाने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला. पावसामुळे वीजपुरवठा वारंवार खंडित होत होता. दिवसा ऊन आणि दुपारी पाऊस यामुळे गर्मी आणि उकाड्यात भर घातल्या गेली होती. अशातच वीज सेवा खंडीत झाल्याने नागरिकांना त्रास होत आहे. तसेचपाणीपुरवठ्यावरसुद्धा परिणाम झाला.

    विद्युत पुरवठा सारखा बंद असल्यामुळे हरणघाट येथून पाणीपुरवठा सुरू होवू शकला नाही. त्यामुळे शहरातील चारही पाण्याच्या टाकीत ठणठणाट निर्माण झाला. नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना शनिवारी खंडीत होत असल्याने शहराच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होत आहे. बेंबाळ येथील वीज केंद्रातून हरणघाट पाणीपुरवठा येथे सरळ विदयुत सेवा देण्यात आली आहे. पावसामुळे झाड पडल्याने विदयुत सेवा खंडीत झाली. त्यामुळे पाणी पुरवठ्यावर परिणाम झाला.- विनोद येनुरकर, पाणीपुरवठा अधिकारी यांनी सांगितले.

    Irregular power supply एकंदरीत पाणीपुरवठा संबंधी व्हॉटसअॅप ग्रुपवरून नागरिकांना सूचना द्यावी लागली. पहिल्याच पावसात अनेक वेळा विद्युत पुरवठा बंद होत असल्याने व त्याच कारणाने पाणीपुरवठा खंडीत झाल्याने नागरिकांनी व्हॉटसअॅप ग्रुपवर प्रशासनाविषयी रोषही व्यक्त केला जात आहे. याला जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे.