Author: Admin

  • Ballarpur vidhansabha : बल्लारपूर विधानसभेत माळी समाजाचा उमेदवार हवा

    Ballarpur vidhansabha : बल्लारपूर विधानसभेत माळी समाजाचा उमेदवार हवा

    Ballarpur vidhansabha मुल – राज्यात मराठा आणि ओबीसींमध्ये आरक्षणाच्या प्रश्नावरून वाद पेटलेला आहे. त्यावरुन विधानसभेच्या निवडणुकीत पक्षांचा चांगलाच कस लागणार आहे. त्यातच आता माळी समाजाने राज्यातील ४३ विधानसभा मतदार संघांवर दावा केला. याठिकाणी जो राजकीय पक्ष संधी देईल, त्याच पक्षाला माळी समाज साथ देईल. अशा स्वरूपातील उभे राहण्याचा ठराव रविवारी भुसावळ येथे माळी समाज हक्क परिषदेत करण्यात आला. तसेच मराठा समाजाला ओबीसी मधून नव्हे तर स्वतंत्र आरक्षण द्यावे व 54 लाख कुणबी मराठा नोंदी रद्द कराव्या असा ठराव घेण्यात आला.

    अवश्य वाचा : अमरावती येथील युवकांचा चंद्रपुरात मृत्यू

    Ballarpur vidhansabha हक्क परिषदेत कण्यात आलेल्या मागण्या. १) विधान परिषदेवर माळी समाजाला प्रतिनित्त्व द्यावे. २) राज्यातील ४३ मतदार संघात समाजाचे प्राबल्य आहे. तेथे समाजाला विधान सभेदाठी प्राधान्य मिळावे. जो पक्ष उमेदवारी देईल, त्या पक्षाला माळी समाज साथ देईल व खंभिरपने पाठिशी उभे राहील.

    ३) ज्या ठिकाणी समाजाचा सक्षम उमेदवार आहे, पण त्याला कोणत्याही पक्षाने उमेदवारी दिली नाही तर अपक्ष म्हणून समाजाने पाठबळ द्यावे. असेही ठरविण्यात आले. अशी मागणी पुढे आली. भुसावळ शहरातील नाहाटा महाविद्यालयाजवळील माळी भवनात रविवारी ‘ दिनांक २३ जून २४ रोजी माळी समाज हक्क परिषद' आयोजित केली होती.

    Ballarpur vidhansabha या परिषदेला राज्यभरातून १९२ प्रतिनिधींसह वेगवेगळ्या पक्ष, संघटनांमध्ये कार्यरत माळी समाजाचे पदाधिकारी उपस्थित होते. सकाळी पहिल्या सत्राच्या अध्यक्षस्थानी माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अविनाश ठाकरे, माजी आमदार कृष्णराव इंगळे प्रदेश अध्यक्ष अरुण तीखे, माजी जी.प. अध्यक्ष संध्याताई गुरनुले, सचिव नाना साहेब कांडलकर, व राज्यस्तरीय पदाधिकारी उपस्थित होते. पहिल्या सत्रात आलेल्या सर्वांचा परिचय घेण्यात आला. सह भोजन नंतर दुसऱ्या सत्राला सुरुवात झाली.

     

    अध्यक्षस्थानी माजी आमदार कृष्णराव इंगळे होते. याप्रसंगी राजकीय विषयावर जिल्हानिहाय मंथन मनोगत घेण्यात आले. पूर्वी समाजाचे १८ आमदार राहायचे परंतु आता ही संख्या कमी झाली यावर चर्चा करण्यात आली. आता येणाऱ्या विधान सभेत माळी समाजाचे संघटन मजबूत करुन तिकिटासाठी संघर्ष करण्याचे ठरविण्यात आले.

    https://ads.timesdiginews.com/2024/06/mp-pratibha-dhanorkar-in-loksabha/

    माळी समाजाचे प्राबल्य असलेले मतदार संघ गोंदिया, साकोली, नागपूर (दक्षिण), बल्लारपूर, काटोल,मोर्शी, अचलपूर,तिवसा, आकोट, बाळापूर ,जळगाव जामोद, मलकापूर, धरणगाव, एरंडोल, मालेगाव,सठणा, नांदगाव,नाशिक,(मध्य), विंचूर,नगर,(दक्षिण), मिरजगाव, कर्जत ,जुन्नर, हडसपर, शिकापुर, पालघर, कन्नड, फुळंबी, परतूर, घनसांगवी, कळंबनुरी, कारंजा,वाशिम, मंग्रुळपिर, आष्टी,धाराशिव, मंगोला ,माढा, अक्कलकोट, जिंतूर वाई, या मतदार संघात माळी समाज प्रतिनिधित्व करेल असे ठरविण्यात आले.

     

    Ballarpur vidhansabha माळी समाज हक्क परिषदेचे यशस्वी आयोजन मुख्य संयोजक कैलास महाजन, गजेंद्र महाजन, व त्यांच्या सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले. माळी हक्क परिषदेला चंद्रपूर जिल्ह्यातून माळी महासंघाचे प्रदेश अध्यक्ष अरुण तीखे, माळी महासंघाच्या महिला आघाडीच्या प्रमुख संध्याताई गुरनुले, चंद्रपूर महानगर पालिका माजी नगर सेविका वंदना तीखे, माळी महासंघाचे विभागीय महासचिव तथा मुल तालुका कांग्रेस कमिटीचे अध्यक्ष गुरुभाऊ गुरनूले, समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक माजी प्राचार्य, बंडूभाऊ गुरनुले, माळी महासंघाचे विभागीय पदाधिकारी व ओबीसी कांग्रेस सेलचे राज्यस्तरीय सरचिटणीस, गुरुदास चौधरी उपस्थित होते. प्रत्येक जिल्हा निहाय हक्क परिषदेचे आयोजन करण्याच्या सूचना आलेल्या माळी पदाधिकाऱ्यांना देण्यात आल्या. माळी हक्क परिषदेला २५० च्या वर राज्यातून पदाधिकारी उपस्थित होते.

  • Youth killed in train collision : अमरावती येथील 2 युवकांचा चंद्रपुरात मृत्यू, नेमकं कारण काय?

    Youth killed in train collision : अमरावती येथील 2 युवकांचा चंद्रपुरात मृत्यू, नेमकं कारण काय?

    Youth killed in train collision भद्रावती- तालुक्यातील मुरसा येथे रेल्वे पटरी जवळ दोन युवकांचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू झाल्याचे प्रकरण 24 जून ला सकाळी 11 वाजता उघडकीस आले.
    या प्रकरणी भद्रावती पोलिसांनी मर्ग दाखल केला आहे.
    मृतक संदीप सहादेव बेलसरे वय 25 राहणार जामणी (आर ) तालुका चिखलदरा जिल्हा अमरावती व दुसरा मृतक विजय तुलसाराम मावसकर वय 28 राहणार राहणार जामनी (आर ) असे दोन्ही मृतकाचे नाव आहे.

    अवश्य वाचा : संविधानाचा जयघोष करीत प्रतिभा धानोरकर यांनी घेतली खासदारकी ची शपथ

    मृतक युवक हे अत्यंत हलाखीच्या कुटुंबातील आहे, त्यांच्या मृत्यूची वार्ता आई-वडीलपर्यंत पोहचली असता त्यांना भद्रावती येथे पोहचायला वेळ लागला, कुटुंबाला आधार मिळावा यासाठी संदीप व विजय हे एकाच गावातील युवक घुग्गुस येथील लोयड कंपनी मधील केवी कन्स्ट्रक्शन कंपनीत मजुरी करायला आले होते.
    विशेष बाब म्हणजे ते दोघेही काही दिवसांपूर्वी घुग्गुस येथे आले होते. घटनेच्या दिवशी दोन्ही युवक कंत्राटदाराकडून पैसे घेत घुग्गुस बाजारात जातो असे सांगत बाहेर निघाले होते. मात्र त्यादिवशी ते दोघे परतले नाही. दुसऱ्या दिवशी दोघांचे मृतदेह भद्रावती तालुक्यातील मुरसा गावाजवळील रेल्वे पटरी जवळ आढळले.

    Youth killed in train collision याबाबत लोको पायलट यांनी याबाबत भद्रावती पोलीस स्टेशनला माहिती दिली. त्यांनी सांगितले की दोन्ही युवक रेल्वे पटरी वर बसून होते, त्यानंतर त्यांना रेल्वेने धडक दिली. या धडकेत दोघे जागीच ठार झाले.

    माहिती मिळाल्यावर भद्रावती पोलीस घटनास्थळी दाखल झाले, यावेळी मृतदेहाचा पंचनामा करण्यात आला. 25 जून ला दोघांचे शवविच्छेदन करीत त्यांचे मृतदेह कुटुंबाला सोपविण्यात आले. भद्रावती पोलिसांनी मर्ग दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गेडाम करीत आहे.

    अवश्य वाचा : खरीप पीकविमा बाबत ही गोष्ट लक्षात ठेवा

    Youth killed in train collision सदर घटनेत नेमकं काय घडलं, हे घटनेच्या दुसऱ्या दिवशी कुणाला कळले नाही, याबाबत पोलिसांशी सम्पर्क साधला असता त्यांनीही आधी माहिती दिली नाही, अखेर सायंकाळी याबाबत माहिती मिळाली.
    दोन्ही युवक गरीब कुटुंबातील असल्या कारणाने पोलिसांनी जी तत्परता दाखवायला हवी होती ती दाखवली नाही.

  • MP Pratibha Dhanorkar : संविधानाचा जयघोष प्रतिभा धानोरकर यांनी घेतली खासदारकी ची शपथ

    MP Pratibha Dhanorkar : संविधानाचा जयघोष प्रतिभा धानोरकर यांनी घेतली खासदारकी ची शपथ

    MP Pratibha Dhanorkar चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभेसह भारतात सर्वच ठिकाणी लोकसभेच्या निवडणूक पार पडून खासदार म्हणून अनेक पक्षाचे नेते  निवडून आले. त्यात कॉग्रेसच्या चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभेच्या खासदार म्हणून प्रतिभा धानोरकर निवडून आल्या. त्यांनी आज संसदेच्या नविन इमारतीत आपल्या सदस्य पदाची शपथ घेतली.

    चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा क्षेत्राच्या खासदार पदी प्रतिभा धानोरकर ह्या भरघोस मतांनी निवडून आल्या. त्यांनी जनतेच्या अनेक कामांना सुरुवात देखील केली. त्यांच्या कार्याची खरी सुरुवात आज पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी 11 वाजून 13 मिनीटांनी शपथ घेऊन झाली.

    अवश्य वाचा : कांग्रेस नेत्याने चंद्रपूर जिल्ह्यातील पत्रकाराला दिली जीवे मारण्याची धमकी

    MP Pratibha Dhanorkar निवडणूकी दरम्यान देखील संविधान वाचविण्याची शपथ घेणाऱ्या धानोरकर यांनी नविन संसद भवनात नतमस्तक होऊन प्रवेश केला व आपल्या पदाची शपथ घेऊन जह हिंद जय संविधान चा नारा देऊन आपली लढाई हि लोकशाही व संविधान वाचविण्यासाठी असेल असे देखील सांगितले. संसद भवनाच्या नविन इमारतीत आज अनेक खासदारांनी आपल्या सदस्य पदाची शपथ घेतली. खासदार प्रतिभा धानोरकर यांनी देखील मराठी भाषेतून शपथ घेऊन मराठा भाषेचा सन्मान जागविला.

    अवश्य वाचा : वेकोली मध्ये तुकडेबंदी कायद्याची अवहेलना

    भविष्यात संविधानाच्या रक्षणासाठी संसदेत आज बुलंद करणार असून आपल्या क्षेत्राच्या विकासासाठी सदैव कटिबध्द असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. यावेळी पुनःश्च एकदा जनतेचे आभार मानून मी माझ्या नव्या राजकीय जीवनाला सुरुवात करीत असल्याचे सांगितले.

  • Leader of Opposition Vijay Wadettiwar : विजय वडेट्टीवार यांच्या उपक्रमाची चर्चा

    Leader of Opposition Vijay Wadettiwar : विजय वडेट्टीवार यांच्या उपक्रमाची चर्चा

    Leader of Opposition Vijay Wadettiwar
    ग्रामीण भागातील नागरिकांना ग्रामस्तरावर विविध समस्या भेडसावत असतात. त्यामध्ये प्रशासनाबाबत काही तक्रारी असतात सोबतच विकासकामां संदर्भात देखील अनेक प्रश्न असतात. त्यामुळे नागरिक आपल्या समस्या घेऊन माझ्यापर्यंत येतील याची वाट न बघता महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते तथा ब्रम्हपूरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी ब्रम्हपुरी तालुक्यातील विविध गावांत भेटी देऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेत तात्काळ मार्गी लावल्या.  यामध्ये झिलबोडी(परसोडी), धामणगाव, तुलन्हानमेंढा, गायडोंगरी, परसोडी(तु.) या गावांचा समावेश आहे.
    सोबतच ब्रम्हपूरी मतदारसंघात गावांगावात सुरू असलेली विकासकामे, जनसेवा याबाबत नागरिकांना माहिती देण्यात आली. जनतेच्या सेवेसाठी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी स्वखर्चातून सुरू केलेल्या “विजयदुत” या उपक्रमाबाबत माहिती देऊन शासकीय कामासंदर्भात येणाऱ्या अडचणींसाठी विजयदुत यांच्या कडून कामे करून घ्यावीत असेही त्यांनी यावेळी सांगितले. नागरिकांनी दिलेली निवेदने तातडीने मार्गी लावून पुढील विकासकामांचे नियोजन करण्यात आले.
    Leader of Opposition Vijay Wadettiwar यावेळी प्रामुख्याने विरोधी पक्षनेते तथा ब्रम्हपूरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खेमराज तिडके, माजी जि.प.सदस्य डॉ. राजेश कांबळे, न.प.माजी बांधकाम सभापती विलास विखार, माजी पं.स.सदस्य थानेश्वर कायरकर, महीला काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष मंगलाताई लोनबले, काॅंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष मोंटु पिलारे, बाजार समितीचे संचालक किशोर राऊत, अॅड आशिष गोंडाणे, अतुल राऊत, रवी पवार, जनसंपर्क अधिकारी सुधीर पंदीलवार, सरपंच निता शेंडे, सरपंच सचिन लिंगायत, मंगेश शेंडे, कैलाश खरकाटे, रवी शेंडे, अमर गाडगे, प्रमोद भर्रे, धनराज मिसार, संदीप राऊत, सुशील शेंडे, भगवान ठाकरे, ईश्वर कुथे यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते.
  • Threats to journalist : चंद्रपूर जिल्ह्यातील पत्रकाराला जीवे मारण्याची धमकी

    Threats to journalist : चंद्रपूर जिल्ह्यातील पत्रकाराला जीवे मारण्याची धमकी

    Threat to journalist मूल :- येथील तालुका पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष, व जेष्ठ सदस्य आणि दै.पुण्यनगरीचे तालुका प्रतिनिधी संजय पडोळे यांना कॉंग्रेसच्या एका नेत्याने जीवे मारण्याची आणि परिवाराला संपविण्याची धमकी देण्यात आली.त्या घटनेचा तालुका पत्रकार संघ,मूल तर्फ्रे तीव्र निषेध करण्यात आला. याबाबत तालुका पत्रकार संघाची तातडीची सभा घेण्यात आली.सभेच्या अध्यक्षस्थनी संघाचे अध्यक्ष राजू गेडाम हे होते.त्यात निषेधाचा ठराव घेण्यात आला. आणि धमकी देणारे कॉंग्रेसचे नेते प्रकाश पाटील मारकवार यांच्या विरूदध कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणीही करण्यात आली.

    https://ads.timesdiginews.com/2024/06/wcl-fragmentation-law-hansraj-ahir-meeting/

    या मागणीचे निवेदन मूल येथील उपविभागीय अधिकारी, उपविभागीय पोलिस अधिकारी,तहसिलदार आणि पोलिस निरिक्षक पोलिस स्टेशन मुल यांना देण्यात आले. २२ जून २०२४ रोजी एका नामांकित वृत्तपत्रामध्ये प्रकाशित झालेल्या झालेल्या एका बातमीच्या संदर्भात कॉंग्रेसचे नेते प्रकाश पाटील मारकवार यांनी संजय पडोळे हे आपल्या कर्तव्यावर सावली येथे असताना भ्रमणध्वनी वरून जीवे मारण्याची धमकी आणि परिवाराला व संपविण्याची भाषा वापरली. एखादया बातमीच्या संदर्भात वृत्तपत्राच्या बातमीदाराला धमकी देणे म्हणजे वृत्तपत्राच्या स्वातंत्र्यांची पायमल्ली करण्यासारखे आहे.

     

    Threat to journalist प्रत्येक बातमीदाराला आपआपल्या पद्धतीने लिखाणाचे स्वातंत्र्य आहे.हे स्वातंत्र्य कोणी हिरावून घेत असेल तर ते खपवून घेतले जाणार नाही. हे अशोभनीय कृत्य आहे. लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या वृत्तपत्राच्या प्रतिनिधींना संरक्षण मिळालेच पाहिजे, अशा आशयाचा ठराव पत्रकार संघातर्फे सभेमध्ये घेण्यात आला.व्यक्ती कोणीही आणि कोणत्याही पक्षाचा का असेना त्याचा निषेध झालाच पाहिजे असे मत उपस्थित पदाधिका-यांनी आणि सदस्यांनी व्यक्त केले.

    अवश्य वाचा : खासदार धानोरकर यांच्यामुळे मिळाली 45 लाखांची आर्थिक मदत

    या घटनेचा निषेध करून प्रकाश मारकवार यांच्या विरूदध पोलिस प्रशासनाने कडक कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. मागणीचे एक निवेदन मूल येथील उपविभागीय अधिकारी विशाल मेश्राम ,तहसिलदार मृदूला मोरे आणि पोलिस निरिक्षक पो. स्टे. मुल यांना देण्यात आले.सभेला व निवेदन देताना पत्रकार संघाचे अध्यक्ष राजू गेडाम,उपाध्यक्ष युवराज चावरे ,सचिव विनायक रेकलवार, ज्येष्ठ सदस्य, माजी अध्यक्ष गुरू गुरूनूले, प्रा. चंद्रकांत मनियार,वासूदेव आगडे,दीपक देशपांडे,अशोक येरमे,भोजराज गोवर्धन,रविंद्र बोकारे,गंगाधर कुनघाडकर इत्यादी सदस्यगण उपस्थित होते.

    चौकशी करण्याचे आदेश:-

    Threat to journalist मिळालेल्या धमकी नंतर संजय पडोळे यांनी सावली पोलिस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केली.याबाबत चौकशीचे आदेश दिले असल्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी शिवाजी भगत यांनी भ्रमणध्वनी वरून बोलताना मूल तालुका पत्रकार संघाला सांगितले.

  • wcl fragmentation law : तुकडेबंदी कायद्याची अवहेलना प्रकरणी प्रकल्पग्रस्तांना न्याय द्या – हंसराज अहिर

    wcl fragmentation law : तुकडेबंदी कायद्याची अवहेलना प्रकरणी प्रकल्पग्रस्तांना न्याय द्या – हंसराज अहिर

    wcl fragmentation law राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील सिध्दबल्ली परसोडा लाईमस्टोन माईन्स, केपीसीएल तसेच अरबिंदो कंपनीशी संबधित ओबीसी व अन्य प्रवर्गातील शेतकरी, नागरीकांचे प्रलंबित प्रश्न, समस्या व कंपनी प्रबंधनाद्वारे सुरू असलेल्या अन्यायी धोरणाबाबत जिल्हाधिकारी व प्रशासनातील वरीष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेवून प्रलंबित समस्या तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश दिले.

    अवश्य वाचा : बामणी प्रोटिन्स कामगारांचा प्रश्न मुख्यमंत्री शिंदे यांच्या दरबारी

    जिल्हाधिकारी कार्यालयात दि. २४ जून रोजी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीस जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी, उपविभागीय अधिकारी चंद्रपूर श्री. पवार, उपविभागीय अधिकारी वरोरा श्रीमती लंगडापुरे, सहा. कामगार आयुक्त, भूअर्जन अधिकारी व अन्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

     

    wcl fragmentation law वेकोलि क्षेत्रातील तुकडेबंदी कायदा अवहेलना प्रकरणातील फेरफार राज्य सरकारच्या २०१७ च्या सुधारीत शासन निर्णयानुसार ग्राह्य धरण्यात यावे तसेच भटाळी, पाटाळा व अन्य प्रकल्पातील एक ७/१२, दोन आराजी, प्रकरणामध्ये विक्रीच्या आधारावर मालकी मान्य करून, दोन नोकऱ्या मंजूर करण्याचे निर्देश वेकोलि प्रबंधनास द्यावेत अशी सुचना हंसराज अहीर यांनी केली. तसेच सास्ती विस्तारीकरण परियोजना, बल्लारपूर क्षेत्राची आर/आर लाभ यादी तातडीने मंजूर करण्यात यावी जेणेकरून प्रकल्पग्रस्तांचे नोकरी प्रस्ताव वेकोलिद्वारे मार्गी लागतील असे सांगीतले.

    अवश्य वाचा : खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या मुळे कामगाराच्या कुटुंबाला मिळाली 45 लाखांची मदत

    सिध्दबल्ली कंपनीतील जुन्या कामगारांची देय राशी व त्यांच्या नोकरीविषयी अनेकदा बैठका होवूनही प्रबंधन याप्रश्नी गंभीरपणे कार्यवाही करीत नसल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी याविषयी गंभीर दखल घेवून अन्यायग्रस्त कामगारांना न्याय मिळवून देण्याचे निर्देश दिले. याप्रकरणी लवकरच सिध्दबल्ली अधिकाऱ्यांसोबत बैठक बोलावण्याची सुचना जिल्हाधिकाऱ्यांना एनसीबीसी अध्यक्षांनी केली.

    wcl fragmentation law अरबिंदो माईन्स व कोरपना तालुक्यातील आरसीसीपीएल परसोडा लाईमस्टोन कंपनीत खनन कार्य सुरू करण्यास परवानगी देणे ही प्रशासनाची मोठी चुक होती. प्रकल्पातील जमिनीचे अधिग्रहण व पुनर्वसन होईस्तोवर माईन्स सुरू करण्याची परवानगीच द्यायला नको होती असे स्पष्ट करून कंपनीद्वारा एकमुश्त भूसंपादन होणे गरजेचे असतांना ग्रामसभेचा ठराव पारीत न करता खनन कार्य सुरू आहे. आधी पुनर्वसन त्यानंतरच उत्पादन असे सरकारचे धोरण असतांना प्रशासनाने कशाच्या आधारावर कंपनीला माईन्स सुरू करण्याची परवानगी दिली? अशी विचारणा अहीर यांनी या बैठकीत केली व दोंन्ही कंपनीमध्ये भूमिअधिग्रहण कायद्यानुसार सरसकट जमिनीचे संपादन करण्यास कंपनीला बाध्य करावे असे निर्देश जिल्हप्रशासनास एनसीबीसी अध्यक्षांनी दिले.

    यावेळी केपीसीएल प्रश्नांवर चर्चा झाली. पुनर्वसन तसेच वनजमिनीवर उत्खनन याबाबत जिल्हा प्रशासनाने माहिती घेवून कायदेशीर प्रक्रीया राबविण्याची सुचना केली. रॉयल्टी विषयी मॉनिटरींग, केपीसीएलमधून निघणाऱ्या वाहनांचे रेकॉर्ड तपासण्यात यावे, खासगी माईन्स मधुन कोळसा वाहतूकीच्या गाड्यांची वेब्रीजवर क्रॉस वेरिफीकेशन तसेच ड्रोनचा वापर करण्याची सुचनाही अहीर यांनी या बैठकीत केली.

    सदर बैठकीला अशोक हजारे, धनंजय पिंपळशेंडे, अॅड. प्रशांत घरोटे, अंकुश आगलावे, राजू घरोटे, प्रदिप महाकुलकर, पवन एकरे, मधूकर नरड, विनोद खेवले, विजय आगरे, उत्तम आमडे, हंसराज रायपूरे, सुभाष गौरकार, गंगाधर कुंटावार, अरूण मैदमवार व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

  • Sudhir mungatiwar : बामणी प्रोटिन्स कामगारांचा मुद्दा मुख्यमंत्री यांच्या दरबारी

    Sudhir mungatiwar : बामणी प्रोटिन्स कामगारांचा मुद्दा मुख्यमंत्री यांच्या दरबारी

    Sudhir mungantiwar कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन कंपनी पुन्हा सुरू करण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत आणि यासाठी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मुंबई येथे बैठक घेऊन तोडगा काढण्यात येईल, असा विश्वास राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बल्लारपूर बामणी प्रोटीन्स येथील भारतीय केमिकल वर्कर युनियनच्या कामगारांना दिला.एक महिन्यापासून बंद असलेल्या बामणी प्रोटीन्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या ठिय्या आंदोलन मंडपाला ना. श्री. मुनगंटीवार यांनी भेट देऊन कामगारांची विचारपूस केली.

    अवश्य वाचा : खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या मुळे कामगाराच्या कुटुंबाला मिळाली 45 लाखाची मदत

    यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, वन विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष चंदन सिंग चंदेल, वर्कर युनियनचे अध्यक्ष देवराव निंदेकर,महामंत्री जहीरूद्दीन शेख, कार्याध्यक्ष दिनेश गोंदे,उपाध्यक्ष चंद्रशेखर निकोडे,उपाध्यक्ष अशपाक शेख,भाजपा जेष्ठ नेते राजेंद्र गांधी,बाळकृष्ण गोंदे, प्रभाकर वैद्य,मोठ्या संख्येने कामगार उपस्थिती होते.

    महत्त्वाचे : पेपरफुटी कायद्यात महत्वाची तरतूद काय?

    भारतीय केमिकल वर्कर युनियनचे बामणी प्रोटीन्स अध्यक्ष देवराव नींदेकर यांच्याशी ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी सविस्तर चर्चा केली. मुंबई येथे मुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे यांच्यासोबत बैठक घेऊन समस्येवर तोडगा काढणार असल्याचे सांगून ना. श्री. मुनगंटीवार यांनी कर्मचाऱ्यांना दिलासा दिला. याबाबत पालकमंत्री श्री. मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे यांना दूरध्वनी करून पुढील आठवड्यात मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेण्याबाबत चर्चा देखील केली.

    Sudhir mungantiwar बामणी प्रोटीन्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या हिताचा निर्णय घेण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत, असेही पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. तत्पूर्वी, पुढील १-२ दिवसांत जिल्हाधिकाऱ्यांनी कंपनीच्या वरिष्ठ अधिका-यांसोबत तसेच कामगार प्रतिनिधी व कर्मचाऱ्यांसोबात झुम बैठक घ्यावी, असेही निर्देश ना. मुनगंटीवार यांनी दिले.

  • Pratibha dhanorkar : खासदार धानोरकर मुळे त्या मृत कामगारांच्या कुटुंबाला मिळाली 45 लाखांची आर्थिक मदत

    Pratibha dhanorkar : खासदार धानोरकर मुळे त्या मृत कामगारांच्या कुटुंबाला मिळाली 45 लाखांची आर्थिक मदत

    Pratibha dhanorkar ताडाळी येथील सिद्धबली कंपनीत काल दुपारी 4.00 वा. अपघात होऊन अपघातात श्री. श्यामराव बबन ठेंगणे हे मृत्युमुखी पडले. सदर घटनेची माहिती खासदार धानोरकर यांना होताच त्यांनी कंपनीतील अधिकाऱ्यांशी संपर्क करुन या प्रकरणी कंपनी दोषी असून मृताच्या पत्नीस मोबदला देण्याची मागणी केली. सदर मागणी आज पुर्ण होऊन मृताच्या पत्नीस 45 लाखांचा मोबदला देण्यात आला.

    अवश्य वाचा | काय आहे पेपरफुटी कायदा?

    सिद्धबली येथे दि. 23 जुन रोजी दुपारी 4.00 वा. झालेल्या अपघाता श्री. श्यामराव बबन ठेंगणे यांचा मृत्यू झाला. सदर मृत्यूस कंपनीतील प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप खासदार धानोरकर यांनी केला. कंपनी कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेची कुठलही काळजी न घेत असल्याने सदर अपघात घडला असल्याचे खासदार धानोरकर यांनी सांगितल. या अपघाताची तात्काळ माहिती होताच खासदार धानोरकर यांनी कंपनीतील अधिकाऱ्यांशी बोलणी करुन आपल्या पदाधिकारी व स्वीय सहायक ला दवाखान्यात पाठविले. जोवर मृत्याच्या कुटूंबीयांना आर्थिक मोबदला मिळणार नाही तोपर्यंत माघार घेणार नाही व कुटूंबीया सोबत राहू अशी भुमिका घेतली.

     

    Pratibha dhanorkar आज सकाळी कुटूंब व कंपनी चे अधिकारी तसेच कर्मचारी यांच्या समवेत बैठक घडवून आणून मृताच्या पत्नीस 45 लाख रुपये कंपनी तर्फे आर्थिक मोबदला मिळवून दिला. या प्रसंगी कुटुंबीयाशी संवाद साधून तुमच्या दुःखात सहभागी असल्याचे खासदार धानोरकर यांनी सांगितले. तसेच सर्व कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांची सुरक्षेची काळजी घ्यावी याकरीता लवकरच जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली सहाय्यक कामगार आयुक्त व कंपनीतील विविध अधिकाऱ्यांशी बैठकीचे आयोजन करणार असल्याचे सांगितले.

  • Anti-Paper Leak law : पेपरफुटी कायद्यामध्ये नेमकी तरतूद काय?

    Anti-Paper Leak law : पेपरफुटी कायद्यामध्ये नेमकी तरतूद काय?

    Anti-Paper Leak law मागील अनेक महिन्यापासून देशात विविध क्षेत्रातील परीक्षेचे पेपरफुटी चे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले होते, यावर विरोधी पक्षाने केंद्र सरकारला चांगलेच धारेवर धरले अखेर सरकारला झुकावे लागले त्यांनी पेपरफुटी विरोधात कायदा लागू केला आहे.

    अवश्य वाचा : धनगर समाजातील विद्यार्थ्यांना मिळणार 60 हजार रुपये

    विवीध क्षेत्रातील पेपर परिक्षेआधी फूटत होते, त्यामुळे अभ्यास करून मेहनत करणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रचंड नुकसान झाले तर लाखो रुपयात पेपर विकत घेणारे विद्यार्थ्यांना मात्र पैकी च्या पैकी गुण मिळाले.

    Anti-Paper Leak law असाच प्रकार नुकत्याच झालेल्या नीट परीक्षा निकालात घडला, यावेळी सदर प्रकरण विरोधी पक्षांनी उचलून धरत सरकारला यावर कायदा बनवावा यासाठी परावृत्त केले.

    या कायद्यामध्ये काय तरतूद आहे हे आपण आज जाणून घेऊया..

    महत्त्वाचे : खरीप पिकविम्या बाबत ह्या गोष्टी लक्षात ठेवा

    Anti-Paper Leak law ‘नीट’ आणि ‘युजीसी नेट’ परीक्षेत गैरप्रकार झाल्याचे उघडकीस आल्यानंतर मोदी सरकार ‘ॲक्शन मोड’ मध्ये आले आहे. पेपरफुटी रोखण्यासाठी सरकारने मोठा निर्णय घेत कठोर कायदा लागू केला आहे. केंद्र सरकारने ‘पब्लिक एक्झामिनेशन्स (प्रिव्हेन्शन ऑफ फेअर मीन्स) कायदा, 2024′ अधिसूचित केला आहे. या पेपरफुटीविरोधी कायद्याचा उद्देश स्पर्धा परीक्षांमध्ये पेपरफुटी आणि कॉपी रोखणे हा आहे. या कायद्यांतर्गत गुन्हेगारांना कमाल 10 वर्षे तुरुंगवास आणि 1 कोटी रुपयांपर्यंत दंडाची तरतूद आहे.

     

    कायद्यात विविध १५ कृत्यांसाठी शिक्षेची तरतूद आहे. 

     

     १.परीक्षेपूर्वी प्रश्नपत्रिका किंवा उत्तरपत्रिका फुटणे.

     

    २. पेपर फोडण्यात सहभाग.

     

    ३. कोणत्याही अधिकाराशिवाय प्रश्नपत्रिका किंवा ओएमआर शीट पाहणे किंवा ठेवणे.

     

    ४. परीक्षेदरम्यान कोणत्याही अनधिकृत व्यक्तीने एक किंवा अधिक प्रश्नांची उत्तरे दिल्यावर.

     

    ५. उमेदवाराला कोणत्याही परीक्षेत उत्तरे लिहिण्यासाठी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष पद्धतीने मदत करणे.

     

    ६. उत्तरपत्रिका किंवा OMR शीटमध्ये काही विसंगती आढळल्यास.

     

    ७. कोणत्याही अधिकाराशिवाय किंवा वास्तविक त्रुटीशिवाय मूल्यांकनातील कोणतीही फेरफार.

     

    ८. कोणत्याही परीक्षेसाठी केंद्र सरकारने घालून दिलेल्या मानकांचे आणि नियमांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष किंवा उल्लंघन झाल्यास.

     

    ९. उमेदवार शॉर्टलिस्ट करण्यासाठी किंवा त्याची गुणवत्ता किंवा रँक निश्चित करण्यासाठी आवश्यक मानल्या जाणाऱ्या कोणत्याही दस्तऐवजात छेडछाड करणे.

     

    १०. परीक्षा आयोजित करताना अनियमितता निर्माण करण्याच्या उद्देशाने सुरक्षा मानकांचे जाणीवपूर्वक उल्लंघन केल्याबद्दल.

     

    ११. संगणक नेटवर्क, संगणक संसाधन किंवा कोणत्याही संगणक प्रणालीशी छेडछाड देखील यामध्ये समाविष्ट आहे.

     

    १२. उमेदवाराने परीक्षेत फसवणूक करण्याच्या उद्देशाने आसनव्यवस्था, परीक्षेची तारीख किंवा शिफ्ट वाटप यामध्ये काही अनियमितता केली असल्यास.

     

    १३. सार्वजनिक परीक्षा प्राधिकरण, सेवा प्रदाता किंवा कोणत्याही सरकारी संस्थेशी संबंधित लोकांना धमकावणे किंवा कोणत्याही परीक्षेत व्यत्यय आणणे.

     

    १४. पैसे उकळण्यासाठी किंवा फसवणूक करण्यासाठी बनावट वेबसाइट तयार करणे.

     

    १५. बनावट परीक्षा आयोजित करणे, बनावट प्रवेशपत्र किंवा ऑफर लेटर देणे यासाठीही शिक्षा होऊ शकते.

     

  • Sunday market chandrapur : कांग्रेसचा जनसंवाद कार्यक्रम

    Sunday market chandrapur : कांग्रेसचा जनसंवाद कार्यक्रम

    Sunday market chandrapur जनसंवाद कार्यक्रमाच्या माध्यमातून संडे मार्केटच्या फुटपाथवर व्यवसाय करणाऱ्या छोट्या व्यापाऱ्यांसोबत संवाद साधून त्यांच्या समस्या आणि त्यांच्या जीवनात येणाऱ्या अडचणी कशा दूर करता येईल या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली.

    https://ads.timesdiginews.com/2024/06/drugs-in-chandrapur-aaps-statement-to-the-police-administration/

    फुटपाथवर व्यवसाय करणाऱ्या छोट्या व्यवसायिकांना ज्या समस्या येतात त्या समस्या संबंधी प्रश्नांना घेऊन काँग्रेसच्या माध्यमातून निश्चितच लढा देण्यात येईल तसेच  गोरगरीब जनतेच्या पाठीशी सदैव राहणार असे आश्वासन काँग्रेस नेते महेश मेंढे यांनी दिले.

     

    Sunday market chandrapur कार्यक्रमादरम्यान फूटपाथ वर व्यवसाय करणाऱ्या छोट्या व्यवसायिकाच्या पावसापासून संरक्षण व्हावं म्हणून काँग्रेस नेते महेश मेंढे यांच्या माध्यमातून छत्र्या वाटप करण्यात आले.

    अवश्य वाचा : टायगर अभि जिंदा है – सुधीर मुनगंटीवार

    जनसंवाद कार्यक्रमामध्ये मंचावर सामाजिक कार्यकर्ते सय्यद हाजी,  अधिवक्ता मोहम्मद रफीक शेख, काँग्रेस युथ महासाचिव कादर शेख,  संडे मार्केट असोसिएशनचे अध्यक्ष हमीद रजा राजा भाई आदी प्रामुख्याने उपस्थित होते.  मोठ्या संख्येने संडे मार्केट असोसिएशन चे सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन आणि आभार प्रदर्शन मोहम्मद इरफान शेख यांनी केले.